विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बार्डोली - मुंबई प्रांतात, सुरत जिल्ह्यांमधील याच नांवाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे ताप्तीव्हॅली रेल्वेचे स्टेशन असून, सुरतपासून १९ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारे पांच हजार. येथे ४०० वर्षांचे जुने केदारेश्वराचें देवालय आहे, तेथे वार्षिक जत्रा भरते.