विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारामती - मुंबई इलाखा, पुणे जिल्ह्यामध्ये, भिमथडी तालुक्यांतील एक गाव. हे पुण्यापासून ५० मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारे दहा हजार. येथे एक दवाखाना व हायस्कूल आहे. गांवाजवळच साखर तयार करण्याचा मोठा कारखाना आहे. येथे गुळाचा मोठा व्यापार चालतो. रेशीमकांठी धोतरेजोडे चांगले निघतात. या गांवी बाबूजी नाइकाच्या पदरी प्रसिध्द मोरोपंत कवि रहात असत.