विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारमेर – राजपुताना, जोधपूर संस्थानांतील मल्लानी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे जोधपूर –बिकानेर रेल्वेवर आहे. लोकसंख्या (१९११) ६३८०. हे शहर तेराव्या शतकांत राजा बाहदाने वसविले असे म्हणतात, त्यावरून त्याचे नावं बहारमेर डोंगरी (टेंकडीवरील किल्ला) असे पडले व त्याचेंच बारमेर झाले. येथे जाती तयार होतात व ती सर्व बाहेर पाठविली जातात. बारमेर हे मल्लानीमधील एका प्रमुख जहागिरीचे नांव आहे.