विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बारण - राजपुताना, कोटा संस्थानामध्ये याच नांवाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे गांव बाणगंगा नदीच्या कांठी कोटा शहरापासून ४५ मैलांवर आहे. पश्चिमेस अर्ध्या मैलावर ग्रेट इंडियन रेल्वेच्या बीना वारण शाखेचा शेवट आहे. लोकसंख्या (१९११) ९५०७. हे गांव चवदाव्या किंवा पंधराव्या शतकांत सोळंकी रजपुतांनी वसविले, व येथे जवळच्या बारा गांवांतील लोक राहण्यास आले म्हणून याचे नांव बारणी असे ठेविले. हे या संस्थानांत व्यापाराचे मुख्य ठिकाण आहे. व येथील चुनडी बंडया प्रसिध्द आहेत.