विभाग आठरावा : बडोदें ते मूर

बाफिंडा – काश्मीरमधील एक जात. लोकसंख्या (१९११) २६८३०. यांचा धर्म मुसुलमानी असून पंजाब व संयुक्तप्रांतांतील जुलाह लोकांप्रमाणेच ही एक जात आहे ह्यांचा पिढीजात धंदा कोष्टयाचा असून जम्मु शहरांतील या जातीचे लोक एकदा श्रीमंत व्यापारी होते.