विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाघेलखंड - बुदेलखंड जवळचा, मध्यहिंदुस्थानांतील एजन्सीचा एक भाग. रजपुतांच्या बाघेला जातीवरून या प्रदेशाला बाघेलखंड हे नाव पडले असून आज सहा सात शतके हा प्रदेश त्यांच्याच ताब्यांत आहे. या प्रदेशांत नैर्ॠत्येपासून ईशान्येपर्यंत कैमूर पर्वताची रांग गेलेली आहे. या रांगेच्या पश्चिमेकडील भाग उंच असून सपाटीचा आहे, व पूर्वेकडील डोंगराळ आणि जंगली आहे. पश्चिम भागांतून टोन्स व पूर्व भागांत शोण नद्या वाहतात.