विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बांकीपूर, पोटविभाग - बिहार प्रांतांतील, पाटणा जिल्ह्याचा पोटविभाग. क्षेत्रफळ ५३४ चौरस मैल. लोकसंख्या (१९०१) ३४१०५४. या विभागाच्या उत्तरेस गंगानदी आहे. मोठी गांवे पाटणाशहर व फुलवाडी ही होत.
गांव - पाटणा जिल्ह्याचे व विभागाचे मुख्य ठिकाण. हे गंगा नदीच्या उजव्या तीरावर आहे. बांकीपूर हे पाटणा म्युनिसिपालिटीचा पश्चिम उपांतभाग आहे. यूरोपीय लोकांचे बंगले न्यायकोर्ट व दुसरी सार्वजनिक ऑफिसे याच भागांत नदीच्या तीरावर आहेत. येथे एक विस्तीर्ण मैदान व शर्यतीची जागा आहे. येथे युनिव्हर्सिटी स्थापन झाली आहे. ('पाटणा' पहा)