विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बसार - बंगालमध्ये मुझफरपूर जिल्ह्यांत हाझिपूर पोट विभागांतील खेडे. लोकसंख्या तीन हजार. वेशाली नांवाच्या प्राचीन राज्याची हीच राजधानी होती असे म्हणतात. इसवी सनापूर्वी ६ व्या शतकांत लिच्छवी लोकांची सत्ता येथे होती. हे बौध्द धर्माचे एक वेळ केंद्र असून येथे दुसरी संगीति भरली होती.