विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बशहर - पंजाबांत सिमल्याच्या डोंगरी संस्थानांपैकी एक. याचे क्षेत्रफळ ३८८१ चौरस मैल. १९२१ साली लोकसंख्या ९०३६६ होती. खेडयांची संख्या ८६ हे गुरखे लोकांनी जिंकून १८०३ पासून १८१५ पर्यंत आपल्या ताब्यांत ठेविले. १८१५ त गुरखे लोकांचा पराभव झाल्यावर इंग्रज सरकारने बशहरच्या राजास सनद देऊन गादीवर कायम केले. व त्याकडून २२५०० रु. खंडणी घेण्याचे कबूल करून घेतले. १८४७ त खंडणी ५९१० रु. केली व बाहेर जाणा-या मालावरील जकात काढून ते मक्त्याने लावले. राजघराणे रजपूत आहे. संस्थानचे उत्पन्न सरासरी दीड लाख आहे. इंग्रज सरकारास दरसाल खंडणी दाखल ३९४५ रु. द्यावे लागतात इंग्रज सरकारास दर वर्षास १०००० रु. प्रमाणे जंगले वहिवाटीस दिली आहेत.