विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बल्लाळपूर – मध्यप्रांत. चांदा जिल्ह्यांत चांद्यापासून हे ६ मैल दक्षिणेस आहे. गोंड राजांचे हे मुख्य ठिकाण होते. येथे ओबडधोबड दगडांनी बांधलेला सुंदर किल्ला आहे. गांवाच्या पूर्वेस एका गोंड राजाची कबर आहे. त्याच दिशेस वर्धा नदीत असणा-या एका लहान बेटावर एक सुंदर व चमत्कारिक देवालय आहे. हे पुष्कळ महिने पाण्याच्या आंत बुडालेले असते. या जागेला रामतीर्थ असें म्हणतात. हे गांव वर्धा नदीमुळे व आमराईमुळे मनोहर दिसतें.