विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलिजा - मद्रास इलाख्यांतील या जातीची संख्या १०,००,००० वर आहे. यांचा धंदा बांगडया करण्याचा व मोती आणि पोवळयाचे दागिने करण्याचा आहे. यांची कुलनामे सिग्री, गुडारी, जदल, संगानाड व दासिरी अशी आहेत. एकाच आडनावांच्या लोकांत विवाह होत नाहीत. यांचे पुरोहित जंगम लोक आहेत. पुनर्विवाह निषिध्द आहे. यांच्या माला जातीस जास्त मान आहे. कायू आणि बलिजा यांचा मान खालच्या दर्जाचा आहे. हे प्रेतांना बसवून पुरतात.