विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलसाड - मुंबई इलाख्यांतील सुरत जिल्ह्याचा दक्षिणेकडील तालुका. यांत बलसाड हे तालुक्याचें गाव व ९५ खेडी आहेत. यांतील प्रदेश डोंगराळ असून यांतून ब-याच नद्या वहात गेल्या आहेत. हा तालुका समुद्राकांठी असल्यामुळे येथील हवा नेहमी आरोग्यकारक असते.
बलसाड गांव सुरतच्या दक्षिणेस ४० मैलावर मुंबई-सुरत फांटयावर असून औरंगा नदीकाठी आहे. येथील लो.सं. १६ हजार, पैकी बरेचसे तैस किंवा बाटून मुसुलमान झालेले हिंदु आहेत. ते कापड विणण्याचा धंदा करीत असतात. येथे इ.स १८५५ पासून म्युनिसिपालिटी स्थापन झाली आहे. हे गांव समुद्रकिना-याजवळ असल्यामुळे व्यापारीदृष्टया महत्वाचे आहे. येथून काठेवाडांत भावनगर वगैरे ठिकाणी मालाची नेआण होत असून येथे तयार झालेला रेशमाचे कापड, इमारती लांकूड वगैरे माल मुंबईस जातो.