विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बलराम - वसुदेवपुत्र व कृष्णाग्रज; हा शेषावतार होता. बलराम गदायुध्दंत प्रवीण असे. नांगर व मुसळ ही याची शस्त्रे, त्यावरून त्याला हलायुध, मुसली वगैरे नांवे पडली आहेत. हा फार भोळा, उदार व न्यायी असे पण फार रागीट असे. मद्यपान व अक्षक्रीडा त्याला फार प्रिय असत. याच्या पत्नीचे नाव रेवती होते.