विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बर्मिंगहॅम - या शहराचे म्युनिसिपालिटीविभाग व प्रतिनिधिविभाग असे दोन भाग असून इंग्लंडातील व्यापारी जिल्ह्याच्या राजधानीचे हें शहर आहे. लोकसंख्या (१९२१) ९१९४३८. येथे व्हिक्टोरिया राणी, नेल्सन, पील वगैरेंचे पुतळे आहेत. येथे युनिव्हर्सिटी असून रसायनशास्त्र, वैद्यक व कला या विषयांची कॉलेजे व इतर अनेक शिक्षणसंस्था आहेत. कांही रात्रीच्या शाळाहि आहेत. मोफत वाचनालये, रुग्णालये, भिक्षागृहे (आम्स हाऊस), व सार्वजनिक वर्गाचे अनेक आहेत. खिळे, टांचण्या, तारा, आगगाडीचे सामान, मोटारी व इतर अनेक प्रकारच्या लोखंडी व पोलादी सामानाचे कारखाने येथे आहेत.