विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरेंद्र – महानदी व करतोया नद्यांमधील पूर्व बंगालच्या भागाचे प्राचीन नांव, या ठिकाणीच प्राचीन काळी पुंड्रांचे राज्य होते. व हल्ली तो राजशाही विभागाचा पश्चिम भाग आहे. ११ व्या शतकांत बल्लाळसेन राजाने याचें हे नांव ठेविले असावे, व अद्यापहि दिनाजपूर, मालया, राजशाही व बोग्रा या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील उंचट प्रदेशास बरेंद्र म्हणतात.