विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरिपाडा – ओरिसामध्ये मयूर भंज मांडलिक संस्थानची राजधानी. ही बु-हाबल्दंग नदीवर आहे. लोकसंख्या पांच हजार. बंगाल-नागपूर रेल्वेवरील रप्सा जंक्शनपासून बरिपाडापर्यंत लहान रेल्वे आहे व मिदनापूर शहरापर्यंत पक्के रस्ते आहेत. हे संस्थानिकांचे राहण्याचे ठिकाण असून राज्यकारभाराचेहि मुख्य ठिकाण आहे. येथे एक दवाखाना व हायस्कूल आहे.