विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरांबा - बिहार-ओरिसा, ओरिसाचे मांडलिक संस्थान. क्षेत्रफऴ १३४ चौरस मैल. या संस्थानचा संस्थापक एक मल्ल होता अशी दंतकथा आहे. संस्थानचे उत्पन्न ४३००० रु. असून संस्थान ब्रिटिश सरकारास वार्षिक १३९८ रु. खंडणी देते. लोकसंख्या (१९९१) ४१४२९. बहुतेक लोक हिंदु आहेत. मणियाबुंध येथे उत्तम रेशमी व सुती कापड होते.