विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बरगांव - बिहार, पाटणा जिल्ह्याच्या बहार पोटविभागांतील एक खेडे. लोकसंख्या (१९०२) ५९७. याचें पूर्वीचे नांव विहारग्राम असे होते असे सिध्द झाले आहे. येथे हजार वर्षांपूर्वी नालंदा नावाचा प्रसिध्द बौध्द मठ होता. ह्युएनत्संग या चिनी प्रवाशाने धार्मिक शिक्षण घेण्याकरिता येथे बरेच दिवस काढिले.