विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बब्रुवाहन - अर्जुनाला चित्रांगदेपासून झालेला पुत्र हा मणिपुरचा राजा होता. अश्वमेधाच्या दौ-यांत याचा अर्जुनाने जाणूनबुजून अपमान केल्याने याने त्याच्याशी लढून त्याला ठार केले, तेव्हा अर्जुनपत्नी उलुपी हिने पातळांतून संजीवनी मणि आणून अर्जुनाला उठविले.