विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बनास - रजपुतान्यांतील एक नदी. लांबी ३०० मैल. ही नदी उदेपूर संस्थानांत अरवली डोंगरांत उगम पावून, ईशान्येकडे उदेपूर, जयपूर, बुंदी, टोंक, करोली व ब्रिटिश अजमीर वगैरे प्रदेशांतून वहात जाऊन रामेश्वराजवळ चंबळा नदीला मिळते. बेराच, कोठारी, खारी, डेन, माशी, धिल व भौरेल या बनासला मिळणा-या नद्या होत. हिच्या कांठी बिलासपूर व राजमहाल ही शहरे आहेत.