प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें   

प्रकाशलेखन (फोटोग्राफी)- प्रकाशाच्या साहाय्यानें चित्रें काढण्याच्या कृतीविषयीं या शास्त्रांत विवेचन केलेलें असतें. फोटोग्राफीच्या रासायनिक क्रियेस केव्हांपासून सुरवात झाली हें सांगणें बरेंच कठिण आहे. सूर्यप्रकाशाच्या योगानें कातडीं कमावलीं जाणें ही क्रिया फोटोग्राफीच्या क्रियेसारखींच आहे; कारण प्रकाशाच्या योगानें परमाणूंत बदल होऊन पदार्थाचा रंग बदलतो. ही क्रिया प्रकाशलेखनाच्या रासायनिक क्रियेंत आहे; व तीच क्रिया प्रकाशानें कातडें कमावण्यांत प्रमुख्यानें घडते. के. डब्ल्यू. शील यानें रजतहरिदा (सिल्व्हर क्लोराइड)  वर सूर्यप्रकाशानें कसाकाय परिणाम घडतो हें प्रथमतः निदर्शनास आणलें. पाण्याच्या तळाशीं सिल्व्हर क्लोराइड ठेऊन त्यावर सूर्यप्रकाश पाडला तर कांहीं तरी रासायनिक क्रिया होऊन एक पदार्थ पाण्यांत विद्राव्य होतो; नंतर त्या पाण्यांत रजतनत्रित (सिल्व्हर नायट्रेट) घातलें असतां सिल्व्हर क्लोराइडचा नवीन सांका बसतो; या मिश्रणांत नंतर अम्र (अमोनिया) घातला असतां त्या कृष्णवर्णाच्या सिल्व्हर क्लोराइडपासून शुद्ध रूप्याचा सांका बसतो. वरील शास्त्रज्ञाच्या असेहि निदर्शनास आलें कीं, सूर्याच्या सप्तरंगी किरणापैकीं जांभळ्या रंगाच्या किरणाच्या पट्टयानें फारच लवकर सिल्व्हर क्लोराइड कृष्णवर्णाचें होतें. १७८२ सालीं जे. सेनेबिअर यानें शीलचे प्रयोग फिरून एकवार करून पाहिले; त्यावरून त्याला असें दिसून आलें कीं, जांभळ्या किरणानें १५ सेकंदात जे कार्य होतें तेंच कार्य तांबडया किरणांकडून होंण्याला सुमारें २० मिनिटें लागतात.

कौंट रंगफोर्ड, राबर्ट हारप, जोहान विल्हेल्म रिटर, थामस जोहान सिबेक, जाक्स एटेएन् बेरार्ड, विल्यम् हाइड, वोलस्टन् इत्यादि शोधकांचीं या शास्त्रांतील कांहीं गोष्टींचा शोध लावला.

शील यानें जो शोध लावला त्याचा व्यावहारिक उपयोग प्रथमतः करण्याचें श्रेय इंग्लंडनें संपादिलें. सन १८०२ सालच्या जूनमध्यें थामस वेजवुड (१७७१-१८०५) यानें रॉयल इन्स्टिटयूट संस्थेच्या नियतकालिकांत एक लेख प्रसिद्ध केला. त्यांत त्यानें असें दाखवून दिलें कीं, सिल्व्हर नायट्रेटमध्यें कागद बुडवून त्यावर प्रकाश आणि छाया यांच्या साहाय्यानें चित्र काढतां येतें; परंतु तयार झालेलें चित्र कितीहि धुतलें तरी कायम राहील असें मात्र करतां येत नाहीं; कारण सिल्व्हर नायट्रेट नांवाचा वरील रौप्यक्षार कागदावर थोड्या प्रमाणानें तरी रहातोच; व त्यामुळें कागद काळा झाल्याकारणानें उमटलेलें मूळचें चित्र नाहींसें होतें. या पद्धतीनें फोटो तयार करण्याच्या कृतींत, सध्यां चालूं असलेलें फोटोग्राफींतील ''प्रिंटिंग'' नांवाच्या क्रियेचें बीज आहे. फ्रान्कांइस चॉसिअर यानें १७९९ सालीं सोडियम थिओसल्फेट नांवाचा पदार्थ शोधून काढला. या पदार्थाचा फोटोग्राफींतील 'प्रिन्ट' कायम करण्याकरितां उपयोग केला आहे. यानंतर लुइ जेकस् मांडे डांगेरे (१७८९ ते १८५१) आणि निप्से यांनीं फोटोग्राफींत कांहीं नवीन कल्पना काढून त्या अंमलांत आणल्या. यांच्या पद्धतीनें चित्र काढून घेण्यास सुमारें सहा सात तास लागत, परंतु आतां फोटोग्राफींत इतकी सुधारणा झाली आहे कीं, १/३५० सेकंद इतका वेळ फोटो घेण्यास पुरेसा होतो. यावरून फोटोग्राफीच्या कलेंत किती प्रगति झाली आहे याची सामान्य कल्पना वाचकांस होईल.

आर्द्र कोलोडियनची पद्धति- ही पद्धत सुरू होण्यापूर्वी ज्या दुसर्‍या पद्धती चालू होत्या त्या सर्वास हिनें मागें सारलें. या रीतीनें फोटो घेण्यास वेळ अगदीं थोडा लागूं लागला; परंतु या पद्धतींत कांचेवर बसविलेला कोलोडियनचा थर ओला ठेवावा लागतो. कारण हा थर वाळल्यानंतर प्रकाशाचें कार्य नीटपणें घडत नाहीं. तेव्हां थर ओला असतांनाच फोटो घेण्याचें काम चित्रकारास करावें लागे. जेथें फोटो घ्यावयाचा असेल त्या ठिकाणीं कोलोडियनसह सर्व रासायनिक पदार्थ नेऊन एक लहानशीं राहुटी उभारावी लागत असे. त्या राहुटींत अगदीं पूर्णपणें अंधेर करून तेथें तांबडया उजेडांत कांचेवर विशिष्ट थर बसवावा लागत असे. नंतर थर बसविलेली कांच क्यामेर्‍यांत घालून तो थर वळण्यापूर्वीच फोटो घ्यावा लागत असे. ही सारी दगदग वांचविण्याकरतां कोरडया थराच्या कांचा तयार करण्याचा उपक्रम सुरू झाला.

कोरडया थराच्या कांचा- या प्रकारच्या कांचा तयार करण्याची रीत मार्क अन्टोनाइन आगस्टीन गौडीन यानें प्रथमतः काढली. २२ एप्रिल, १८५४ रोजीं त्यानें आपली पद्धत एका शास्त्रीय मासिकांत प्रसिद्ध केली. त्याच सालच्या आगष्टांत ४ थ्या तारखेस इंग्लंडांत जी. आर. मूरहेड यानें आपली माहिती प्रसिद्ध केली. परंतु या माहितीचा व्यवहारांत उपयोग करून दाखविण्याचें श्रेय जे. एम. टापनाट यानें संपादिलें. पुढें सन १८६४ सालीं कोलोडियनच्या कांचा तयार करण्याच्या पद्धतींत डब्ल्यू. बी. बोल्टन आणि बी. जे. साइस यांनीं कांहीं सुधारणा सुचविल्या व त्याप्रमाणें शोध करतां करतां पुढें असें दिसून आलें कीं, कोलोडियनमध्येंच रूप्याचे क्षार मिश्रित करून त्यायोगानें कांचा तयार करण्याची सुधारलेली पद्धत अमलांत आणणें फायदेशीर आहे. यानंतर कोलोडियनच्या ऐवजीं शुद्ध सरस वापरतां येईल काय, म्हणून कित्येक शास्त्रज्ञांनीं तपास सुरू केला. अगदीं सर्वांत जुना प्रयत्‍न सन १८७१ सालीं डॉ. आर. एल्. म्याडॉक्स यानें केला. त्यानंतर किंग, जे. बर्गेस, आर. केनेट, सी. बनेट, आब्जे, डी. बी. व्हान, मान्खोव्हन इत्यादि शास्त्रज्ञांनीं फार परिश्रम करून ही पद्धत पुढें आणण्यास मदत केली.

शुष्क कांचा करण्याची संक्षिप्त माहिती- शुद्ध सरस किंवा जिलेटीनचा उपयोग करून कांचा तयार करण्याची पद्धत पुढें दिली आहे- या रीतीनें कांचा तयार करतांना ग्यासचा किंवा मेणबत्तीचा उजेड उपयोगांत आणावा. हा उजेड ''चान्से'' च्या तांबडया कांचेंतून घ्यावा व तो उजेड नारिंगी रंगाच्या कागदांतून जाऊं देऊन नंतर उपयोगांत आणावा. अशा प्रकारें काळजी घेऊन तांबडा उजेड उपयोगांत आणल्यास रूप्याच्या क्षारावर यत्किंचितहि परिणाम होत नाहीं. जर सूर्यप्रकाश उपयोगांत आणावयाचा असेल तर तांबडया कांचेवर दुहेरी नारिंगी कागद वापरावा.
खालीं दिलेले पदार्थ वजन करून घ्यावेत -

(१) पोटयाशियम आयोडाइड ५     ग्रेन;
(२) पोटयाशियम ब्रोमाइड १३५   ,,
(३) नेल्सनचें नं. १ चें फोटोग्राफीचें जिलेटीन ३०    ,,
(४) सिल्व्हर नायट्रेट १७५  ,,
(५) आटोटाईप किंवा दुसरें कठिण जिलेटीन. १००  ,,
नेल्सनचें नं. १ चें जिलेटिन १००  ,,

नंबर तीन आणि पांच यांतील पदार्थ झटकन पाण्याखालीं धुवून घ्यावेत. म्हणजे त्यांच्या पृष्ठभागावर बसलेली धूळ किंवा केरकचरा निघून जातो. नं. दोनच पदार्थ १॥ ओैंस पाण्यांत विरघळवितात. त्याला फिक्कट तांबूस पिवळट रंग येईपर्यंत त्यांत थोडें आयोडिनचें टिंक्चर घालतात. नं. १ चा पदार्थ ६०० मिनिम पाण्यांत विरघळवितात. नंबर ४ हा अर्धा औंस पाण्यांत विरघळवितात. नंबर ३ ला १ औंस पाण्यांत फुगूं देतात आणि नंतर उष्णतेनें ते सर्व विरघळवितात वरील सर्व मिश्रणें कांचेच्या चंबूंत (फ्लास्कांत) घालून ते १५०० उष्णमानापर्यंतच्या पाण्यांत ठेवून नंतर अंधेर्‍या (म्हणजेच तांबडया प्रकाशाच्या)  खोलींत नेतात. नंतर नंबर ३ आणि ४ हे एका चंबूंत एकत्र करतात. नंतर नंबर २ चे थेंब सोडून तें अर्धे संपवितात. नंतर राहिलेल्यांत नंबर एकचें मिश्र करून ते सर्व एकत्र करतात. हे सर्व एकत्र झाल्यावर ते मिश्रण चिकट झालें पाहिजे. त्याचा रंग ग्यासच्या उजेडांत तांबडा भडक दिसला पाहिजे; किंवा सूर्यप्रकाशांत नारिंगी दिसला पाहिजे. हें मिश्रण चंबूंत ठेऊन तो चंबू आधणाच्या पाण्यांत सुमारें ४५ मिनिटें ठेवितात, व नंतर त्याला १००० फा. उष्णमानावर ठेवितात म्हणजे त्यांत नंबर ५ चें मिश्रण घालण्याची योग्यता येते. नंबर ५ ला मध्यंतरीच्या काळांत २ औंस पाण्यांत फुगूं देऊन नंतर विरघळवितात. हें तयार झालेलें जिलेटिनचें मिश्रण एकीकडे थंड होण्यासाठीं ठेवितात.

वरील सर्व एकत्र झालेलीं मिश्रणें जाडया कॅनव्हासच्या पिशवींत घालून दाबतात म्हणजे शेवयाप्रमाणें त्यांचे तंतू निघतात. हे निघालेले तंतू थंड वहात्या पाण्यांत पडूं देतात; म्हणजे त्या मिश्रणांतील विद्राव्य क्षार निघून जातात. फिरून एकवार कॅनव्हासच्या पिशवींतून हें मिश्रण गाळून नंतर गरम करून नंतर त्यांत अर्धा औंस अल्कोहल विरघळवितात. शेवटीं ते शामॉइस कांतडयांतून किंवा उत्तम मलमलींतून गाळून घेतात. अशा प्रकारें शुद्ध केल्यामुळें हें मिश्रण कांचेवर बसविण्यालायक होतें.

कांचेवर मिश्रण बसविण्याची पद्धत- कांचा प्रथमतः नायट्रिक अ‍ॅसिडानें स्वच्छ करून पाण्यानें धुतात. नंतर पोटयाशियम मिश्रणानें धूवून पाण्यानें स्वच्छ करतात. नंतर स्वच्छ कापडानें त्या कोरडया करतात. नंतर त्यावर मिश्रण ओतात. मिश्रण ओतण्यापूर्वी दोहोंचेंहि उष्णमान १२०० फा. इतकें असलें पाहिजे. नंतर समपातळींत (लेव्हलमध्यें) असलेल्या टेबलावर कांचा ठेऊन वरील मिश्रण सर्व बाजूंनां सारखें लागेल असें करतात. नंतर त्या कांचा उष्ण वारा वहाणार्‍या कपाटांत ठेऊन वाळवितात. सुमारें बारा तासांत कांचा वाळून तयार होतात.

प्रकाशदर्शनाचा काल- सूर्य-प्रकाश उत्तम पडला असून लेन्साच्या मुख्य केंद्राच्या एकषोडषांश प्रमाणाचें छिद्र असेल तर मैदान, कुरणें इत्यादि उघडयावरील फोटो घेण्यास अर्ध्या सेकंदापासून ते एकपंचमांश सेकंद वेळा पुरा होतो. जर फोटो घेण्याच्या देखाव्यांत झाडेंझुडपें इत्यादि हिरवे भाग जास्त प्रमाणांत असतील तर थोडासा वेळ जास्त लागतो. ह्याप्रमाणेंच प्रकाश असून जर फोटोच्या खोलींत फोटो घ्यावयाचा असल्यास अर्ध्या सेकंदापासून चार पांच सेकंदापर्यंत प्रकाशदर्शन करावें. लागतें.

चित्राचें प्रकटीकरण- डेव्हलपमेंट उर्फ प्रकटीकरणकरितां फेरस आक्सलेटचें मिश्रण किंवा अल्कलीयुक्त पायरोगालीक अ‍ॅसिडचें मिश्रण यांपैकीं कोणत्याहि एकाचा उपयोग करतात. रिस्ट्रेनर उर्फ रासायनिक प्रतिरोधक द्रव वापरण्याची जरूरी भासत नाहीं. कारण जिलेटिन हाच स्वतः प्रतिरोधकाचें कार्य करतो; अल्कलाइन डेव्हलपर या नांवाखालीं मोडणारी रासायनिक द्रव्यें उपयोगांत आणल्यामुळें शुष्क पद्धतींत जास्त सौकर्य उत्पन्न झालें. पुढें दिलेलीं मिश्रणें सन १८८० च्या सुमारास किंवा तत्पूर्वी वापरीत असत. या मिश्रणांत अद्याप (१९११) पर्यंत फारसा फेरफार झाला नाहीं हें ध्यानांत घेण्यासारखें आहे.

(१) ऐकेनोजेन डेव्हलपर मिश्रण:-
ऐकेनाजेन २५ भाग
सोडियम सल्फाइट ५० ,,
सोडियम कार्बोनेट ५० ,,
पोटयाशियम ब्रोमाइड १/२ ,,
पाणी १०००० ,,
ह्या वरील एकाच मिश्रणानें कार्यभाग होतो.
(२) मिथाल डेव्हलपरत मिश्रण- अ मिश्रण
मिथाल २ भाग
पाणी १०० ,,
ब मिश्रण
सोडियम कार्बोनेट ६ भाग
पोटयाशियम ब्रोमाइड १ ,,
पाणी १०० ,,
उपयोग करतांना ''अ'' मिश्रणांतील १ भाग घेऊन त्यांत 'ब' मिश्रणाचे ३ भाग मिसळावेत.
(३) आर्टोल डेव्हलपर मिश्रण-
अ मिश्रण
आरटोल १५ भाग
सोडियम मेटयाबायसल्फाइट ७ ,,
पाणी १००० ,,
ब मिश्रण
सोडियम कार्बोनेट १०० भाग
सोडियम सल्फाइट १२५ ,,
पोटयाशियम ब्रोमाइड ३ ,,
पाणी १००० ,,
अ आणि ब मिश्रणें सम प्रमाणांत मिसळून वापरणें.
(४) अमिडोल डेव्हलपर मिश्रण-
अमिडोल ३ भाग
सोडियम सल्फाइट १०० ,,
पोटयाशियम ब्रोमाइड १ ते ३ ,,
पाणी १००० ,,

                  
या मिश्रणांत अल्कली घालावा लागत नाहीं. या वरील चार प्रकारच्या डेव्हलपर मिश्रणांशिवाय दुसरीं कांहीं मिश्रणें आहेत परंतु तीं फारशीं प्रचारांत नसल्याकारणानें दिलीं नाहींत. वर दिलेल्या मिश्रणांत गेल्या दोन पिढयांत विशेषसा फेरफार झाला नाहीं हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.

फोटोच्या कांचा डेव्हलप करण्याच्या कामांत रिस्ट्रेनर (रासायनिक क्रियेचा प्रतिरोधक) नांवाच्या द्रव्याचा उपयोग करण्याची कोठें कोठें रीत आहे. या प्रकारची अल्कली आणि ब्रोमिन किंवा क्लोरीन यांच्या रासायनिक संयोगापासून तयार केलेलीं असतात. या द्रव्यांच्या योगानें फोटोच्या कांचेवर जास्त व्यवस्थित रीतीनें कार्य होतें. व त्यामुळे फोटो बिघडण्याचा संभव फारच कमी होतो.

प्रकर्षीकरण- कित्येक वेळां घेतलेल्या कांचेवरील चित्राचें प्रकर्षीकरण (इन्टेन्सीफाईंग) करणें अत्यंत जरूर असतें. प्रकर्षीकरण करण्याच्या पुष्कळच पद्धती आहेत. परंतु पुढें दिलेली कृति अत्यंत उत्तम आहे. ही पद्धत चापमन जोन यानें बसविली आहे. मरक्युरिक क्लोराइड नांवाच्या द्रव्याचें संपृक्त द्रावण (सोल्यूशन) घेऊन त्यांत कांच टाकावी. नंतर ती त्यांतून काढून फेरस आक्सलेटमध्यें घालावीं. चित्रास योग्य तितकी जाडी न आल्यास ह्या कृतीच्या अनेक आवृत्त्या कराव्यात. दुस-या कृतीपेक्षां या कृतींत हें विशेष आहे कीं, दुस-या कृतींत चित्र पिंवळें पडून नाहींसें होण्याची भीति असते; परंतु अशा प्रकारची भीति या कृतींत संभवत नाहीं.

वॉरनिस चढविणें- याप्रमाणें तयार झालेल्या कांचेस 'ऋण' किंवा 'निगेटिव्ह' म्हणण्याची चाल आहे. या कांचेचें उत्तम प्रकारें रक्षण व्हावें म्हणून त्यावर कित्येक ठिकाणीं वॉरनिस चढविण्याची चाल आहे. याकरितां प्रथमतः कोलोडियनचा थर देऊन नंतर लाखेच्या रोगणाचा हात देतात. या प्रकारें रोगण चढविलें असतां कांचेवरून तसबीर छापून घेतांना कागदावरील रौप्यक्षार लागून कांच खराब होत नाहीं. दुस-या प्रकारचे वॉरनिस पुढें दिल्याप्रमाणें तयार करतात. कोलोडियन घेऊन तें ऍमिल ऍसिटेट नांवाच्या पदार्थात विद्राव्य करतात. हें एक प्रकारचें वॉरनिसच होय. या वॉरनिसाच्या योगानें सरदीपासून निगेटीव्ह कांचेचें उत्तम प्रकारें रक्षण होतें.

फोटो छापण्याचे कागद तयार करण्याची कृति- पुढील कृतीनें हे कागद तयार करतात. १५० भाग अमोनियम क्लोराइड, २४० भाग स्पिरिट आफ वाईन, आणि २००० भाग पाणीं घेतात. हे एकत्र करून सर्वांचा एकजीव होऊं देतात. नंतर १५ अंडयांतील पांढरा बलक त्यांत घालून सर्व मिश्रण घोळून एकजीव बनवितात. उष्ण हवामान असल्यास त्यांत क्यारबॉलिक ऍसिडाचा एखादा थेंब टाकतात. क्यारबॉलिक ऍसिडाच्या योगानें मिश्रण विटून बिघडत नाहीं. हें मिश्रण दोनतीन दिवस राहूं देऊन नंतर कांचेच्या नरसाळयांत स्पंज ठेऊन त्यांतून गाळून काढतात; किंवा दुहेरी-तिहेरी मलमलीच्या कापडांतून गाळूण घेतात; व नंतर ते उथळ बशींत टाकून ते कागद एक मिनीटपर्यंत तरंगूं देतात व नंतर काढून घेऊन ऊष्ण खोलींत ते वाळवितात.

फोटोवर रंग चढविण्याचा असल्यास कागदावर चकाकी असतां कामा नये. चकाकी असल्यास रंग कागदावर नीट रीतीनें बसत नाहीं. त्याकरितां निराळया कृतीनें कागद तयार करावे लागतात. ९० भाग अमोनियम क्लोराइड, १०० भाग सोडियम सायट्रेट, १० भाग जिलेटिन आणि ५००० भाग शुद्ध पाणीं उतकें जिन्नस घ्यावेत. प्रथम पाणी गरम करून त्यांत जिलेटिन घालावा; तो उत्तम प्रकारें विरघळल्यावर त्यांत दुसरे पदार्थ घालावेत. नंतर हें मिश्रण गाळून घ्यावें. ह्या मिश्रणावर तीन मिनिटेंपर्यंत कागद तरगंत ठेवावा; नंतर तो काढून घेऊन वाळवावा. हा कागद चेतनायुक्त करण्याकरितां पुढील कृति करावी लागते.

सचेतनीकरण- सिल्व्हर नायट्रेट हें शेकडा १० या प्रमाणांत पाण्यांत विद्राव्य करून त्यावर वरील कागद सुमारें ३ मिनिटेंपर्यंत तरंगत ठेवावा व नंतर तो काढून घेऊन वाळवावा. ह्या कागदावर निगेटिव्ह कांचेच्या साहाय्यानें चित्र छापून काढतात. हें चित्र आपणांस जितकें दाट पाहिजे असेल त्यापेक्षां जास्त दाट (काळसर) करून घेतात.

छापील कागदाचें स्थिरीकरण- वरीलप्रमाणें छापून चित्र तयार केल्यानंतर त्यावर पुढें दिल्याप्रमाणें कृती कराव्या लागतात. या कृती केल्याशिवाय चित्र स्थिर होत नाहीं. पुढें तीन मिश्रणें दिलीं आहेत त्यांपैकीं कोणतेंहि एक वापरलें असतां चालेल.

पद्धत पहिली- गोल्ड क्लोराइड १ भाग; सोडियम कार्बोनेट १० भाग; पाणी ५००० भाग; हीं द्रव्यें एकत्र करून मिश्रण करावें व त्याचा उपयोग करावा.

पद्धत दुसरी- (अ) बो-याक्स (टांकणखार) १०० भाग; पाणी ४००० भाग; (आ) गोल्ड कोराइड १ भाग; पाणी ४००० भाग. हीं अ आणि आ मिश्रणें अगदीं आयत्या वेळीं समप्रमाणांत एकत्र करून ताबडतोब उपयोगांत आणावींत. (अ) आणि (आ) हीं एकत्र होऊन फार वेळ राहिल्यास निरुपयोगी होतात.

पद्धत तिसरी- गोल्ड क्लोराइड २ भाग; क्लोराइड ऑफ लाइम २ भाग; खडू (चॉक) ४० भाग व पाणी ८०००० भाग; हीं एकत्र करितात परंतु पाणी गरम करून घेतात. थंड झाल्यावर मिश्रण उपयोगांत आणावें पहिल्या दोन पद्धतींचा उपयोग करण्यापूर्वी छापलेले चित्र पाण्यानें पूर्णपणें धुवून काढावें. तिस-या पद्धतीचा उपयोग करावयाचा असल्यास चित्र पाण्यानें अर्धवट धुवून घ्यावें. या तिन्ही पद्धतींतील मिश्रणांत चित्र घातल्यानंतर त्याला चांगला जांभळा आबाशाई रंग येईपर्यंत राहूं द्यावें; तें नंतर काढून घेऊन पुढें दिलेल्या मिश्रणांत सुमारें १० मिनिटें घालून ठेवावें. शेंकडा २० भाग या प्रमाणांत हायपोसल्फाइट ऑफ सोडा घेऊन १०० भाग पाण्यांत घालून त्यांत ऑमोनियाचे कांहीं थेंब टाकावे म्हणजे मिश्रण तयार होतें. यांत सुमारें १० मिनिटेंपर्यंत चित्र राहूं द्यावें. नंतर वहात्या पाण्यांत कित्येक तास पर्यंत चित्र धुवून नंतर तुरटीच्या द्रवांत कांहीं वेळ राहूं देऊन नंतर फिरून एकवार धुवून चित्र कांचेवर लावून वाळवावें.

रंगीत फोटो- वरील रीतीनें फोटो घेतले असतां त्यांत रंग येत नाहींत. पुष्कळ वेळां हातानें फोटो रंगवितात, परंतु या रीतीनें चित्र जसें पाहिजे तसें वठत नाहीं, शिवाय रंगविण्यास बरेंच कौशल्य लागतें. हा सर्व त्रास चुकावा व नैसर्गिक रीतीनें सर्व रंग निघावेत म्हणून कित्येकांनां बरेच प्रयत्न केले आहेत; त्यांपैकीं अगदीं अलीकडचा सुप्रसिद्ध प्रयत्न म्हटला म्हणजे १९०७ सालीं ए. लुमिअर एटसेस फिल्स याचा होय. याची पद्धत पुष्कळ सोपी असून या पद्धतीनें अगदीं नैसर्गिक रंगांप्रमाणें रंग येतात. ही पद्धत आपल्या देशांत प्रचारांत अद्याप आली नाहीं.

चित्रलेखक यंत्र- कॅमे-याविषयीं साद्यंत विवेचन येथें करतां येणें शक्य नाहीं. कॅमे-याचे निरनिराळे भाग प्रत्यक्ष पाहिल्याखेरीज त्या भागांविषयीं केलेलें विवेचन समजणें शक्य नाहीं. जरी अशी वस्तुस्थिति आहे तरी पण कॅमे-याविषयीं थोडेसें विवेचन करून त्यांतील तत्त्व सांगतां येणें बरेंच सुलभ आहे तें असें-

कॅमे-यामध्यें एक पेटी असते. तिला तोंडाशीं लेन्ससमुच्चय बसविलेला असतो. या लेन्सांतून येणारा प्रकाश केंद्रीभूत होऊन पाठीमागें एका पडद्यावर पडतो. हा पडदा ग्राऊंडग्लास नांवाच्या अर्धपारदर्शक कांचेचा असतो. या ग्राऊन्डग्लासावर पडणारी प्रतिमा नीट यावी एतदर्थ हा पडदा पुढेंमागे हलविण्याची सोय एका मलसूत्रानें केलेली असते. या कॅमे-यांत पडद्यावर ज्या प्रतिमा पडतात त्या उलटया असतात; म्हणजे खालीं डोके आणि वर पाय अशा असतात; अर्थात प्रकाशलेखनाची कला साध्य करून घेतांना नवशिक्यास असलीं उलटीं चित्रें (पडद्यावरील) पाहाण्याची संवय करून घ्यावी लागते. ग्राउंडग्लासवरील प्रतिमा केंद्रांत आणून नंतर त्याजागीं फोटो घेण्याची कोरडी कांच बसवितात. कांच बसविण्यापूर्वी लेन्साचें तोंड काळ्या मखमलीनें आंतून मढविलेल्या टोपीनें बंद करतात. यानंतर प्रकाशाच्या मानानें आणि कोरडया कांचेच्या प्रकाशग्राहकशक्तीप्रमाणें लेन्सावरील टोपी काढून कांहीं वेळपर्यंत लेन्सांतून प्रकाशा जाऊं देतात; त्यायोगानें कोरडया कांचेवर इष्ट पदार्थाची प्रतिमा पडते; व त्यायोगानें कांचेवरील रुप्याच्या क्षारावर रासायनिक फेरफार होतात. पुढें या कांचेंवर डेव्हलपर मिश्रण आणि दुसरी मिश्रणें लावून ती प्रतिमा व्यक्त करून स्थिर करितात. नंतर या कांचेवरून कागदावर चित्र छापण्याची क्रिया करतात व पुढें त्या कागदावर रासायनिक क्रिया करून कागदावरील चित्र स्थिर करतात.

खस्थ प्रकाश लेखन उर्फ तारकादिकांचे फोटोग्राफ.- आकाशस्थ ज्योतींचे फोटो घेण्याला कोणकोणत्या गोष्टींची जरूरी आहे; व या कामांत कोणत्या अडचणी येतात याचा प्रथमतः विचार केला पाहिजे.

प्रकाश- ता-यांचा प्रकाश अत्यंत मंद असतो. जर व्यवहारांत आपणाला मनुष्यदिकांचा फोटो घेतांना प्रकाशाची उणीव भासली तर कृत्रिम प्रकाश उत्पन्न करून ही उणीव दूर करून फोटो घेतां येतो. परंतु ता-यांच्या बाबतींत ही गोष्ट लागू पडत नाहीं. कारण कितीहि जोरदार सर्च लाइटच्या योगानें ता-यावर प्रकाश पाडण्याचा यत्न केला तरी ता-यांचें अंतर इतकें दूर आहे कीं त्या प्रकाशाचा यत्किंचितहि परिणाम घडत नाहीं. जिलेटीनच्या कोरडया कांचा निघाल्यापासून मात्र ही अडचण ब-याच अंशानें दूर झाली आहे. ज्यावेळेस कोलोडिअनच्या ओल्या कांचा वापरण्याची पद्धत होती त्यावेळेस बराच वेळ प्रकाशदर्शन करून फोटो घेता येत नसे. कारण कीं, कांचा वाळल्यानंतर त्यावर रासायनिक परिणाम घडत नसे. परंतु कोरडया कांचा निघाल्यापासून ही अडचण बरीच दूर झाली आहे. आतां यांत्रिक रीतीनें फिरणा-या दुर्बिणीसारख्या कॅमे-यांत कांच ठेवून तिला तासांचे तास प्रकाशदर्शन करविणें शक्य आहे, इतकेच काय परंतु कित्येक दिवस किंवा महिने, किंबहुना वर्षे देखील प्रकाशदर्शन करवितां येतें. दिवस सुरू होण्यापूर्वी कॅमे-याच्या तोंडावर झांकण बसवून फिरून रात्र सुरू झाल्यावर योग्य कोन करून यंत्र सुरू करावें व नंतर झांकण उघडावें म्हणजे झालें.

महत्करण (मॅग्निफिकेशन)- साध्या कॅमे-यांत आपणांस मोठा फोटो घ्यावयाचा असल्यास कॅमेरा बसलेल्या इसमाजवळ नेऊन लावल्यास मोठा फोटो घेतां येतो व दूर अंतरावरून कॅमेरा लावल्यास लहान फोटो निघतो. परंतु तारे कोटयवधि मैल अंतरावर असल्याकारणानें दहा वीस फूट कॅमेरा हलविल्याच्या योगानें ता-याचें मोठें चित्र काढतां येणें शक्य नाहीं. याकरितां मोठा फोटो घ्यावयाचा असल्यास लेन्सांत फरक करवून ही गोष्ट घडवून आणतां येते. परंतु या रीतीनें फोटो मोठा करण्याच्या मार्गांत कांहीं नैसर्गिक अडचणी आहेत. कॅमेरा आणि तारका यांच्या दरम्यान हवेचा एक मोठा हलता थर आहे. या थराच्या योगानें घेतलेल्या चित्रांत फारच चलबिचल होते; व ज्या ज्या प्रमाणांत महत्करण करावें त्या त्या प्रमाणांत ही चलबिचल चित्रामध्यें जास्त प्रमाणावर दिसून येते; यामुळें ठराविक मर्यादेबाहरे महत्करण करून चित्र घेतां येणें शक्य नाहीं.

स्तब्धता- साध्या फोटोग्राफीमध्यें फोटोग्राफरला आपला कॅमेरा स्थिर करून फोटो काढून घेणा-या इसमाला स्तब्ध बसवावयास लावलें म्हणजे काम भागतें. परंतु खस्थ-ज्योती सतत एका ठराविक गतीनें फिरत असतात. तेव्हां कॅमेरा त्या ज्योतीकडे तोंड करून सतत फिरत राहील अशी यंत्रयोजना करावी लागते. या कामीं घडयाळाच्या धर्तीवर यांत्रिक योजना करून हे कॅमेरे ठराविक गतीनें विशिष्ट ता-याकडे तोंड करून सतत फिरत राहतील अशी योजना करतां येते.

प्रकाशलेख किंवा प्रकाशचित्रें.- आकाशांत अत्यंत दूर अंतरावर तारे आहेत; तेव्हां त्यांचे फोटो एखाद्या बिंदूप्रमाणें आले पाहिजेत; परंतु घेतलेले फोटो पाहिले असतां ते केवळ बिंदूप्रमाणेंच  असत नाहींत; फोटोंत एक बारीकसा ठिपका आणि त्याच्या भोंवती बारीक बारीक वलयें असलेलीं दिसतात. ही वलयें येण्याचें कारण असें आहे कीं, ता-यांचा प्रकाश हा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशापासून झालेला असतो; व हे रंग निरनिराळ्या प्रमाणांत लेन्सांतून वक्रीभवन पावतात. त्यामुळें विशिष्ट रंगाचें केंद्रीभवन होतें; परंतु बाकीच्या रंगाच्या किरणांचें त्याच अंतरावर केंद्रीभवन होत नाहीं; त्यामुळें हीं वलयें येतात. परंतु विशिष्ट रंगाची कांच कॅमे-याच्या तोंडावर बसवून त्या योगानें विशिष्ट रंगाचेच तेवढे किरण घेऊन फोटो काढल्यास हीं वलयें फारच कमीं प्रमाणांत येतात.

ता-यांचे नकाशे- वरील प्रकारानें फोटो घेऊन ता-यांचे नकाशे प्रसिद्ध करतां येतात. १८८७ सालीं जगावरील निरनिराळ्या अठरा वेधशाळंनीं सहकार्य करून एक उत्तम नकाशा तयार केला आहे. फोटोग्राफीच्या योगानें पुष्कळदां दोन ता-यांतील कोन मोजतां येतो.

प्रकाशपृथक्करणयुक्त फोटो- वर सांगितलेल्या कॅमे-याच्या तोंडावर त्रिपार्श्व लोलकाचा तुकडा बसविला तर येणा-या प्रकाशाचें पृथक्करण होतें. तेव्हां या पृथग्भूत प्रकाशापैकीं हव्या त्या रंगाचा फोटो घेणें शक्य आहे. या प्रकारच्या फोटोपासून सूर्याच्या निरनिरळया भागाची होणारी हालचाल (रासायनिक उलथापालथ) पाहणें अगदीं सुलभ आहे.

आकाशगंगेंतील तारकांचे फोटो घेणें- आकाशांतील तारकादिकांचे फोटो घेण्याच्या कामांत प्रथमतः आकाशगंगेच्या फोटोंत चांगलें यश आलें. तीन फूट व्यासाच्या अंतरगोल आरशाच्या साहाय्यानें डॉक्टर ए.ए.कामन (१८४१-१९०३) यानें मृगशीर्ष नांवाच्या तारकापुंजांतील आकाशगंगेचा फोटो घेतला. यानंतर प्रो.जे.इ.कलिर (१८५७-१९००) यानें अशा प्रकारचें पुष्कळच फोटो घेतले. या फोटोंवरून आकाशगंगा नागमोडी आकाराची असल्याचें दिसून आलें आहे.

चंद्र व तारकादिकांचे फोटो- चंद्राचे फोटो घेऊन त्यावरून त्याच्या ज्वालामुखींच्या तोंडांची लांबी-रूंदी मोजतां आली आहे. धूमकेतूच्या फोटोच्या योगानें त्याच्या शेपटीविषयीं बरीच महिती उपलब्ध झाली. त्यावरून त्याच्या पुच्छांत कसे बदल होत असतील याचें अनुमान काढतां येतें.

सूर्याचे फोटो- सूर्याचा प्रकाश इतका तीव्र आहे कीं, त्याचें योग्य इतक्या कमी प्रमाणांत दर्शन (कॅमे-यांतील पेटीस) करवून फोटो काढवून घेणें अशक्य होतें; परंतु शास्त्रज्ञांनीं खस्थ फोटो घेण्याच्या युक्तींत पुष्कळशीं प्रगती केल्यावर असे फोटो घेतां येऊं लागले; या फोटोंत सूर्यावरील डाग उत्तम प्रकारें दिसूं लागले आहेत; परंतु कडेच्या भागांत बरीचशी अंधुकता येत असे. त्यामुळें असें वाटूं लागलें होतें कीं, सूर्यावरील वातावरणाच्या योगानें प्रकाशाचें अपशोषण होत असावें. परंतु अलीकडील १५।२० वर्षांत या विषयांत बरीच प्रगति झाली आहे. विशेषतः पृथक्करणयुक्त फोटोच्या योगानें निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या प्रकाशकिरणांचे फोटो घेण्यापासून असें दिसून आलें आहे कीं, अशा प्रकारचे डाग नुसत्या कडेच्याच भागावर नसून सूर्यावर सर्वत्र पसरलेले आहेत.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .