प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें 
          
प्रकाश, प्रकाशाचें स्वरूप- एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापर्यत शास्त्रज्ञ लोकांत प्रकाशाविषयीं सिद्धान्तस्वरूपाच्या अशा मूळ दोन कल्पना प्रचलित होत्या. लहरीच्या योगानें एका स्थलाहून दुसर्‍या स्थळीं प्रकाश गमन करतो असें एका पक्षानें मानलें होतें व दुसर्‍या पक्षानें असें मानलें होते कीं, प्रकाशकणांच्या स्थित्यन्तरामुळें प्रकाशाचें एका स्थलाहून दुसर्‍या स्थळीं गमन होतें. या दुसर्‍या प्रकारच्या मताच्या पुरस्कर्त्यात प्रसिद्ध न्यूटन हा अग्रगण्य होता; व याच्याच परिश्रमामुळें ही सिद्धान्तस्वरूपाची कल्पना एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापर्यत शास्त्रज्ञ मंडळांत बहुमतानें मान्य ठरली.

प्रकाशलकरीची कल्पना- न्यूटनच्या ह्या सिद्धान्तास बरीच वर्षपर्यंत शास्त्रज्ञ लोकांकडून मान मिळत होता; परंतु फ्रेसनेल आणि यंग यांनीं विद्यातक टीका केली व तत्पुष्टयर्थ अनेक प्रयोगहि केले. या प्रयोगाच्या योगानें शास्त्रज्ञांचा ''प्रकाशकण'' सिद्धान्तावरील विवास नाहींसा झाला. सध्या ''प्रकाशलहरी'' सिद्धान्त शास्त्रज्ञ-मंडळांत बहुमतानें मान्य झाला आहे.

विद्युच्चुंबकम कल्पना- फ्रेसनेल आणि यंग यांच्या नंतर म्याक्सवेल यानें आपली विद्युच्चुंबकमय कल्पना सिद्धान्त स्वरूपानें पुढें मांडली आहे. हेन्‍रीश हर्ट्झ यानें जे विद्युल्लहरीविषयीं प्रयोग केले आहेत त्यांच्या योगानें म्याक्सवेलच्या सिद्धान्तास चांगलीच बळकटी आली आहे. हर्ट्झ यानें लघु प्रकंपन असलेल्या विद्युल्लहरी उत्पन्ना केल्या, अर्थात ह्या विद्युल्लहरींत व प्रकाशलहरींत एक साम्य आहे. प्रकाशलहरीचीं प्रकंपनें अत्यंत लघु असतात तेव्हां जर विद्युल्लहरींची अत्यंत लघु अशी प्रकंपनें करतां आलीं तर त्या विद्युल्लहरींच्या ठिकाणी प्रकाशलहरीचें गुणधर्म दिसून आले पाहिजेत व हर्ट्झ याच्या प्रयोगावरून असें दिसून आले कीं, या लहरींची प्रकाशाप्रमाणेंच परावर्तनें, वक्रीभवनें, व्यतिकरणें आणि ध्रुवीभवनें होतात. यामुळे लहरीच्या योगानें प्रकाशाचें स्थलान्तर होते या मतास पुष्टि मिळते.

रोमरची पद्धत (प्रकाशाचा वेग)- प्रकाशाला एक ठराविक गति असते असा शोध प्रथमतः ओले रोमर यानें पॅरिस येथें इ. स. १६७८ मध्यें लावला. याकरतां त्यानें गुरूच्या चंद्राची ग्रहणें अवलोकन केली.

गुरूच्या चंद्राचीं ग्रहणें अगदी ठराविक वेळानें होतात. एका विशिष्ट ठिकाणीं पृथ्वी असतांना सुरू झालेलें ग्रहण दिसूं लागतें; त्यापेक्षा दुसर्‍या एखाद्या ठिकाणीं पृथ्वी असतांना हें ग्रहण दिसण्यास कांहीं मिनिटें जास्त वेळ लागतो. याप्रमाणें सुर्यप्रकाशास पृथ्वीच्या कक्षेस व्यासाच्या अंतराइतकें अंतर आक्रमण्यास सरासरी १६.६ मिनिटें लागतात. पृथ्वीच्या कक्षेस व्यास १९५६००००० मैल इतका आहे; अर्थात् प्रत्येक सेकंदास प्रकाशाच्या वेगाचें १९५६०००००/१६.६x६० =१८६३०० मैल सरासरी प्रमाण पडतें.

फिझो यानें एका गतिमान दंतुरचक्राचा उपयोग करून त्या चाकाच्या दांत्यांतून पाठविलेला प्रकाशकिरण एका आरशावरून परावृत होऊन पुन्हां दंतुरचक्राशीं येण्यास त्यास किती वेळ लागतो हें पाहून त्यावरून प्रकाशाचा वेग ठरविला. तो तासास ३१ कोटी मीटर म्हणजे एक लक्ष ८६ हजार मैल इतका आला.

प्रकाशच्युति (अ‍ॅबरेशन).- आकाशगामी तारे वगैरे गोलांच्या द्दश्य गतीस प्रकाशच्युति म्हणतात. तारे हे त्यांच्या अक्षांशाप्रमाणें (किंवा विषुववृत्तापासून त्यांच्या असणार्‍या अंतराप्राणें) कमी अगर अधिक दीर्घवर्तुलाकार कक्षेंत फिरत असतात व त्यामुळें ते प्रतिक्षणीं आपणांस त्यांच्या खर्‍या स्थितीहून निराळ्याच स्थितींत गेलेसे वाटतात. ही द्दश्य गति, प्रकाशाची तारा पाहाणार्‍याकडे येण्याची गति व पृथ्वी सूर्याभोवतीं फिरत असल्याकारणानें त्या तार्‍याकडे पाहाणार्‍यास मिळणारी गति ह्या दोन्हींच्या परिणामाची निदर्शक आहे.

ब्रॅडेल यानें जहाजाच्या डोलकाठीवरील वातकुक्कुटास जहाजाची गति बदलल्यास एक कलती मिळतें हें पाहिलें व वार्‍याची गति तीच असतांना वातकुक्कुटावरील परिणाम हा जहाजाच्या बदललेल्या स्थितीमुळें दिसुन येतो अशी कल्पना करून हा परिणाम म्हणजे वायूची गति व जहाजाच्या नवीन स्थितींतील गति ह्या दोहोंच्या गतींचा परीणाम आहे असें त्यानें ठरविलें व त्याप्रमाणें त्यानें स. १७२७ मध्यें प्रकाशच्युतीची उपपत्ति प्रस्थापित केलीं. मनुष्य स्थिर असून तारा जर त्याच्या डोक्यावर असेल तर त्यास तो तारा, त्याचें डोकें वर तारा यांनां सांधणार्‍या रेषेंत दिसेल पण जर तार्‍यापासून निघणारा प्रकाश त्यास रेषेंत दिसेल पण जर तार्‍यापासून निघणारा प्रकाश त्यास पोंचावयास लागणार्‍या वेळामध्यें कांहीं अंतराच्या टोंकापासून निघून तार्‍यास मिळणार्‍या रेषेमध्यें दिसेल. आतां पृथ्वी ही आपल्या कक्षेंत सूर्याभोवतीं फिरत असल्याकारणानें पाहाणार्‍याची स्थिति बदलत असते व त्यामुळेंच तार्‍याची च्युति पहाणार्‍याच्या गतींशीं समांतर अशी रेषेंतच द्दष्टोत्पतीस येते. ही प्रत्येक वेळीं द्दष्टोत्पत्तीस येणारी गति सूर्य व तारा यांना सांधणारी रेषा पृथ्वीच्या कक्षेच्या पताळीस लंब असेल तर पृथ्वीच्या कक्षेस समांतर अशा दीर्घवर्तुळानें दर्शवितां येते. ह्या च्युत-स्थिति-निदर्शक-दीर्घ-वुर्तळाचा महत्तमक्ष पृथ्वीच्या क्रांतिवृत्तास समांतर असून याची किंमत तो प्रकाशगति व पृथ्वीची गति ह्यांच्या गुणोत्तराचें निदर्शक असल्यामुळें स्थिर असतें. ह्या अक्षाची लांबी पृथ्वीशीं ४०० कोन अंतरित करीत असल्याकारणानें च्युति-सातत्य याच्या निम्में म्हणजे २०० असतें. ह्या दीर्घ वर्तुळांतील लघुत्तनाक्ष तार्‍याच्या अक्षांशावर अवलंबून असल्याकारणानें स्थिर नसतो. च्युतिसातत्य प्रायोगिक रीत्या शोधून काढल्यास हें प्रकाश व पृथ्वी यांच्या गतीचें गुणोत्तर असल्यामुळें, पृथ्वीची गति माहीत असेल तर प्रकाशगति ताबडतोब काढतां येईल. द्दकशास्त्रामध्यें पदार्थामधून बाहेर पडलेले किरण एकत्र न होतां वेगवेगळे आल्यास प्रकाश च्युति झाली असें म्हणतात.

प्रकाशपरिवर्तन.- एखाद्या समजातीय पदार्थातून प्रकाश जात असतांना तो जर एखाद्या पदार्थाच्या पृष्टभागावर पडला तर बहुधां त्यापैकीं कांहीं किरण परावृत्त होतात, कांहीं इतस्ततः विखुरतात व कांहीं त्या पदार्थात शिरतात. जर पृष्ठभाग खडबडीत असेल तर विखुरणार्‍या किरणांचें प्रमाण फारच असतें; व पदार्थ अत्यंत गुळगुळीत असेल तर विखुरणार्‍या किरणांचें प्रमाण फारच कमी असतें. या विखुरणार्‍या किरणांचा व्यवहारांत अत्यंत उपयोग होतो. अशा प्रकारें किरण विखरल्यामुळेंच प्रकाशाचें पूर्णपणें परावर्तन करणार्‍या पदार्थाखेरीज बाकीचे सर्व पदार्थ दिसूं शकतात.

प्रकाशाचें परावर्तन खाली दिलेल्या दोन नियमांनीं घडतें.
(१) परावर्तन- कोन नेहमीं कोनाबरोबर असतो.
(२) पतित आणि परावृत्त किरण हे दोन्ही परावर्तक पृष्ठभागाशीं लंब असणार्‍या अशा एकाच पातळींत असतात.

पहिला नियम पुढें दिल्याप्रमाणें प्रयोग करून सिद्ध करतां येतो. एखाद्या भांडयांत स्वच्छ पारा ओतावा आणि त्या भांडयांत एखाद्या तार्‍याचें प्रतिबिंब दुबिणीनें पहावे, व त्याचा भूपृष्ठाशीं म्हणजेच पारदपृष्ठाशीं किती अंशाचा कोन होतो हेंहि त्याच क्षणीं अवलोकन करावें. हे दोन्ही कोन सारखेच असतात. कितीहि सूक्ष्मता दशविणारें यंत्र घेतल्यास त्याच्या योगानें या दोन कोनांत यत्किंचितहि फरक सांपडत नाहीं.

आतां एखाद्या पदार्थापासून निघणारे किरण दुसर्‍या पदार्थावर पडल्यामुळें परावृत होऊन आपणांकडे येतील तर आपणांस ते किरण त्या पदार्थापासूनच निघत आहेत असा भास होतो व मूळचा पदार्थ आपणांस त्या किरणमार्गाच्या सरळ रेषेंतच कांहीं अंतरावर दिसतो. वास्तविक त्या ठिकाणीं तो मूळ पदार्थ नसून त्याचें प्रतिबिंब असतें. आरशाच्या साहाय्यानें हें आपण नेहमीं पाहतोंच. धातूच्या आरशांस एकच परावर्तक पृष्ठभाग असल्यामुळें त्यापासुन एकच प्रतिबिंब उत्पन्न होतें. परंतु कांचेच्या आरशापासून दोन प्रतिबिंब उत्पन्न होतात. एक प्रतिबिंब कांचेच्या पृष्ठभागास लावलेल्या धातूच्या थरापासून परावर्तन होऊन उत्पन्ना होते व हें प्रतिबिंब स्पष्ट असतें; दुसरें प्रतिबिंब आरशाच्या वरील कांचेच्या पृष्ठभागापासून परावर्तन होऊन उत्पन्न होतें, हें प्रतिबिंब वरील प्रतिबिंबाइतकें स्पष्ट असत नाहीं. कांचेच्या आरशापासून जें हें द्विगुणित परावर्तन होतें, त्यामुळें प्रतिबिंबांची स्पष्टता कमी होते; म्हणून प्रतिबिंबें पाहाण्याचे शास्त्रीय प्रयोग करण्यास कांचेच्या आरशांच्या ऐवजीं धातूच्या आरशांचाच नेहमीं उपयोग करितात.

वर्तुलाकृति आरसेः-  पुष्कळ जातीचे वक्र आरसे असतात; त्या सर्वांत गोलाच्या आकाराचें व परवलय (पॅराबोला)च्या आकाराचे आरसे फार उपयोगांत आहेत. ते कांचेचे किंवा धातूचे करतात व त्यांच्या आंतील बाजूनें किंवा बाहेरील बाजूनें जसें परावर्तन घडेल तसें त्यास अंतगोल किंवा बाह्यगोल आरसे म्हणतात.

अत्यंत लहान लहान असे सपाट आरसे एकमेकांशीं सारखे कलते ठेवून एकाजवळ एक जोडून गोल आरसा बनविलेला आहे असें कल्पिलें म्हणजे सपाट आरशापासून परावर्तन पावण्याचे जे नियम बसविले आहेत त्यांचाच उपयोग करून गोल आरशाविषयीं नियम बसवितां येतात. म्हणून गोल आरशाच्या कोणत्याहि एका बिंदूवर जेव्हां प्रकाशाचे किरण पडतात तेव्हां ते वास्तविक एका लहान सपाट आरशावर पडतात व त्यापासून परावर्तन पावतात. अर्थात त्याविषयीचे नियम बसविण्यास वर्तुलाच्या किंवा गोलाच्या गुणधर्माचा उपयोग करतात. जर वर्तुळाच्या एखाद्या बिंदूवर एखादा किरण पडला तर त्या ठिकाणीं स्पर्शरेषा काढून त्या स्पर्शरेषेस परावर्तक पृष्ठभाग समजून त्याप्रमाणें परावर्तन होतें असें समजण्याची रीत आहे व प्रत्यक्ष व्यवहारांत त्याप्रमाणें अनुभव येतो. वर्तुलाकृति आरशांत प्रतिबिंब अथवा भ्रामक प्रतिमा व खरी प्रतिमा अशीं मूळ पदार्थाचीं दोन रूपें दिसतात. वर्तुलाकृति आरशासंबंधी पदार्थ, प्रतिमा व केंद्र यांच्या अंतरास नियम-

१/प + १/प्र =१/क असा आहे.

येथें प = पदार्थाचें आरशापासून अंतर.
 प्र = प्रतिमेचें आरशापासून अंतर.
 कें = आरशाचें केंद्रांतर.

जर पदार्थाचें अंतर अनंत असेल तर प्रतिमा र/२ अंतरावर पडेल; म्हणजे आरशाच्या त्रिज्येच्या निम्या अंतरावर प्रतिमा असेल. या अंतरास ''मुख्य केंद्र'' असा पारिभाषिक शब्द आहे. जर पदार्थ त्याहून अलीकडे असेल, पण त्रिज्येपेक्षां जास्त जवळ नसेल तर प्रतिमा मुख्यकेंद्र आणि आरशाच्या गोलाचा मध्यबिंदु यांच्या दरम्यान असेल; तर गोलाच्या मथ्यबिंदुपाशीं पदार्थ असेल तर प्रतिमा ही मध्यबिंदूंत येईल. पदार्थ जर मध्यबिंदु आणि मुख्य केंद्र यांच्या दरम्यान असेल तर प्रतिमा त्यामानानें दूर दूर अंतरावर पडेल. पदार्थ मुख्य केंद्रांत असतांना आरशापासून समांतर किरण निघतात आणि त्याहिपेक्षां जवळ पदार्थ असल्यास प्रतिमा केंद्राच्या पलीकडे दिसते व भ्रामक प्रतिमा अथवा प्रतिबिंब आरशांत दिसूं शकतें.

वरील सर्व विेवेचनांत असें गृहीत धरलें आहे कीं, परावर्तक आरसा हा गोलाचा बराचसा लहान भाग आहे. परंतु जर परावर्तन करणारा भाग बराच मोठा असेल तर प्रकाश एका बिंदूंत न मिळाल्याकारणानें प्रतिबिंब नीट उठत नाहीं.

दीर्घवर्तुलाकृति आरसे- या प्रकाच्या आरशास दोन केंद्रें असतात. त्यांपैकीं एक केंद्रांत पदार्थ अगर प्रकाशमान बिंदु असल्यास त्याचा प्रकाश दुसर्‍या केंद्रांत एकवटेल.

प्रवलयात्मक आरसेः- वरील दीर्घवर्तुलाकृति आरशापेक्षां जास्त उपयुक्त असे आरसे म्हटले म्हणजे परवलया (पॅरबोला)च्या आकाराचे आरसे होत. अशा प्रकारच्या आरशाच्या अंगीं एक महत्त्वाचा असा धर्म आहे कीं, समान्तर किरणशलाका जर अशा प्रकारच्या आरशावर पडली तर ती एकवटून एका बिंदूंत आणतां येते. हा गुण वर्तुलाकृति किंवा दीर्घवर्तुलाकृति आरशांच्या अंगीं असत नाहीं. उलट प्रकारें असेंहि दिसून येतें कीं, जर प्रकाशमान बिन्दु परवलयाच्या आरशांत ठेविला तर त्यायोगानें आरशापासून समांतर प्रकाशकिरणांची शलाका निघते. या महत्त्वाच्या गुणामुळें सर्चलाईटसारख्या ठिकाणीं परवलयाच्या आरशांचा नेहमीं उपयोग करतात.

प्रकाशाचें पृथक्करण- सूर्याचा पांढरा स्वच्छ प्रकाश जर त्रिपार्श्व भिंगातून पाठविला तर तो प्रकाश भिंगांतून बाहेर येतांनां पांढरा स्वच्छ असा न येतां पृथग्भूत होऊन बाहेर येतो; म्हणजे पांढरा स्वच्छ प्रकाश हा निसर्गसिद्ध अमिश्र असा नसून तो निरनिराळ्या सात रंगांपासून झालेला आहे हें यावरून सिद्ध होतें.

याप्रमाणें त्रिपार्श्व भिंगातून पांढर्‍या किरणाची एक शलाका पाठविली तर त्याचें पृथक्करण होऊन जांभळा, पारवा, निळा, हिरवा, नारंगी, आणि तांबडा असे रंग द्दष्टोप्तत्तीस येतात. त्यांत जांभळा हा अत्यंत वक्रीभवनीय असतो म्हणून तो त्रिकोणाच्या पायाच्या बाजूस वळतो; व तांबडा हा अत्यंत कमी प्रमाणावर वक्रीभवन पावतो म्हणून तो दुसर्‍या टोंकाकडे दिसतो; मध्यंतरीचे रंग त्याच्या दरम्यानच्या अनुक्रमानें वक्रीभवन पावतात. एकवार पृथग्भूत झालेल्या किरणांचा पुन्हां विच्छेद होत नाहीं. यास्तव पृथग्भूत झालेले ७ रंग एकदम किंवा स्वतःसिद्ध असतात; म्हणजे त्यांचें त्रिपार्श्व भिंगानें पुन्हां पृथक्करण होत नाहीं. दीप-सूर्यआदिकरून स्वयंप्रकाशित पदार्थापासून जो प्रकाश पडतो तो कधीं एकदम शुद्ध असा असत नाहीं. त्याची त्रिपार्श्व भिंगानें परीक्षा केली तर त्यांत एकाहून जास्त रंग असतात असें नेहमीं अनुभवास येतें.

पृथग्भूत किरणांच्या निरनिराळ्या भागांचें निरनिराळ्या रंगाच्या रूपानें आपणांस ज्ञान होतें. याचें कारण या निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशलहरींचीं निरनिराळीं आंदोलनें होतात. उदाहरणार्थः- अगदीं कडेचा लाल रंग दिसण्यास ४५८ ² १०१९ आंदोलनें दर सेकंदास व्हावीं लागतात, आणि जांभळा रंग दिसण्यास ७२० ² १०१२ आदोलनें व्हावीं लागता. वरील सर्व रंगाच्या प्रकाशाचा वेग सारखाच असतो; परंतु आंदोलन संख्या भिन्न असतात. यामुळें निरनिराळ्या रंगांप्रमाणें या आंदोलनांची दीर्घता भिन्न भिन्न असली पाहिजे. कांहीं शास्त्रज्ञांनीं असा अंदाज केला. आहे कीं, लाल रंगाच्या आंदोलानाची लांबी ०००६२ मि. मीटर इतकी असावी आणि जांभळ्या रंगाच्या आम्दोलनाची लांबी ००००४२५ मिलिमीटर इतकी असावी.

प्रकाशजनक, उष्णताजनक व रासायनिक परिणामः- कांचेच्या त्रिपार्श्वाच्या योगानें शुभ्र प्रकाशाचें पृथक्करण होतें. या पृथग्भूत प्रकाश किरणांच्या अंगीं निरनिराळ्या प्रमाणांत उष्णता, प्रकाश, आणि रासायनिक क्रिया हीं असतात व हीं निरनिराळ्या रंगांच्या अंगीं भिन्न भिन्न प्रमाणांत वास करतात.

उष्णताजनक शक्ति लाल रंगाच्या किरणांच्या अंगीं जास्त प्रमाणांत वास करते; लाल रंगाच्या शेजारीच पलीकडे अद्दश्य किरण असतात; त्यांच्या अंगीं उष्णता उत्पन्न करण्याची शक्ति असल्याचें दिसून येतें. हे अद्दश्य किरण इतर किरणांपेक्षां कमी प्रमाणांत वक्रीभवन पावतात; हे हर्शल या ज्योतिषवेत्त्यानें शोधून काढलें, म्हणून या किरणास हर्शलचे किरण असें म्हणतात.

कित्येक किरणांच्या अंगीं रासायनिक क्रिया घडवून आणण्याचा धर्म प्रामुख्यानें असतो. या प्रकारचे किरण म्हटले म्हणजे जांभळ्या रंगाचे होत. या जांभळ्या रंगाच्या अंगीं उद्भिज्ज रंग नाहीसें करण्याची शक्ति सर्वांत जास्त प्रमाणांत असते. यामुळें भिंतीस चिकटविण्याचें रंगीत कापड आणि रंगविलेलें कपडे हे तीव्र प्रकाशांत ठेविल्यास जलदरीतीनें फिक्के पडत जातात. कित्येक रासायनिक पदार्थ स्वभावतः पांढरे असतात ते प्रकाशानें काळे पडतात; याच धर्माचा उपयोग करून प्रकाशलेखनपद्धति उर्फ फोटोग्राफी निघाली आहे. कित्येक वायूंची मिश्रणें अशीं असतात कीं, त्यावर सूर्यप्रकाश पडल्याबरोबर त्यांचा संयोग होऊन आवाज होतो. उदाहरणार्थ, हायड्रोजन आणि क्लोरिन यांचें मिश्रण करून तें एका कांचेच्या पंचपात्रांत भरून ठेवावें व नंतर आरशाच्या कवडाशानें त्यावर सूर्यप्रकाश पाडावा अगर सूर्य-प्रकाश नसल्यास त्या कांचपात्राच्या जवळपास म्याग्नेशियमची तार जाळावी म्हणजे हायड्रोजन व क्लोरिन या दोन वायूंचा संयोग होतो. हे रासायनिक परिणाम पृथग्भूत किरणाच्या सर्व भागीं सारखेच घडत नाहींत; जांभळ्या भागीं किंवा किंचित त्याच्या पलीकडे सर्वात जास्त प्रमाणांत रासायनिक कार्य घडतें.

पृथग्भूत किरणांतील काळ्या रेषाः- पृथग्भूत सौरकिरणांचे रंग एकमेकांस लागलेले नसतात; कारण पृथग्भूत किरणांच्या पट्टयांत अगदीं अरूंद अशा काळ्या रेषा दिसतात. एखाद्या अंधार असलेल्या खोलींत अत्यंत बारीक फटींतून सूर्यप्रकाश घेऊन तो त्रिपार्श्व भिंगावर पडूं द्यावा; नंतर या भिंगांतून जो प्रकाश बाहेर निघतो तर पुष्कळशा फार नाजुस काळ्या रेषा दिसतात. या काळ्या रेषांचें अस्तित्त्व १८०२ सालीं उल्यास्टन यानें प्रथमतः शोधून काढलें; परंतु जर्मनींतींल म्युनिच नांवाच्या शहरांतील प्रसिद्ध शास्त्रवेत्ता फ्रान हाफर यानें या रेषांविषयीं चांगलीं महिती करून घेऊन त्यांचें उत्तम वर्णन प्रसिद्ध केलें; त्यानें या रेषांनां निरनिराळीं नांवें दिलीं, म्हणून या रेषांनां फ्रान हाफरच्या रेषा असें पारिभाषिक नांव पडलें आहे.

विच्छिन्न किरणाच्या साहाय्यानें पृथक्करणः- हर्शल या शास्त्रज्ञानें असें दाखवून दिलें कीं, भिन्न पदार्थ प्रकाशहीन व अत्यंत उष्ण अशा ज्योतींत धरलें तर त्यांपासून जो प्रकाश निघेल तो त्रिपार्श्वभिंगांतून पाहिल्यास निरनिराळ्या अंतरावर निरनिराळ्या रंगाच्या तेजस्वी रेषा दिसतात; पदाथाचें अति सूक्ष्म भाग शोधून काढण्यास या रीतींचें पृथक्करण उपयोगीं पडेल असें फॉक्स टॅलबट यानें १८३४ सालीं सुचविलें. यानंतर किर्चाफ आणि बनसेन या शास्त्रज्ञद्वयांनीं प्रयोग करून प्रकाशाच्या सहाय्यानें पृथक्करण करण्याची युक्ति बसविलीं. त्यांनीं असें दाखवून दिलें कीं एकाच धातूचा क्षार ज्योतींत धरल्यास पृथग्भूत-किरणांत ज्या रेषा दिसतात त्यां सर्वदा रंगानें व स्थानाने सारख्याच असतात, परंतु निरनिराळे धातू घेतल्यास या रेषांचीं स्थानें व संख्या भिन्न भिन्न असतात; व धातूच्या अत्यंत सूक्ष्म अंशांवरून ह्या रेषा स्पष्टपणें ओळखतां येतात.

विच्छिन्न किरणदर्शक (स्पेक्ट्रास्कोप)- व्यवहारांत या यंत्राच्या पुष्कळशा तर्‍हा प्रचारांत आहेत; त्यांपैकीं एका साध्या प्रकारच्या यंत्राचें पुढें वर्णन दिलें आहे- दोन पत्रे (धातूचे) अगदी जवळ जवळ ठेवून त्याच्या योगानें एक अत्यंत सूक्ष्म अशी फट तयार करतात; या पत्र्यांनां एक मलसूत्र जोडलेलें असतें; त्यायोगानें ही फट लहान मोठी करतां येते. हे पत्रे एका नळीच्या तोंडावर बसविलेले असतात व त्या नळींत एक बाह्यगोलभिंग बसविलेलें असतें, त्या योगानें या फटीतून येणार्‍या किरणांस समान्तर करतां येतें. याप्रमाणें किरण समान्तर करून नंतर ते एका त्रिपार्श्व भिंगांतून पाठवितात; यायोगानें त्या समान्तर किरणांचें पृथक्करण होतें. याप्रमाणें किरणांचें पृथक्करण केल्यानंतर ते किरण एका दुर्बिणींतून पहातात. दुर्बिणींतून पहातात. दुर्बिणींतून या किरणांचें निरीक्षण करण्याचें कारण असें आहे कीं दुर्बिणीच्या साहाय्यानें फ्रान हाफरच्या (काळ्या किंवा तेजस्वी) रेषा अत्यंत सुलभतेनें पाहतां येतात.

या प्रकारच्या यंत्रासमोर बुन्सेनचा प्रकाशरहित दिवा ठेवून त्याच्या ज्वालेंत मिठाच्या पाण्यांत बुडविलेली अशी एक प्लाटिनमची तार धरावी; या तारेचा प्रकाश जर विच्छिन्नदर्शकांतून पाहिला तर त्यांत एक पिंवळ्या रंगाची तेजस्वी रेषा दिसते. या प्रकारची रेषा दुसर्‍या धातूंत दिसत नाहीं; अर्थात या पिंवळ्या रेषेच्या साहाय्यानें मिठाशीं रासायनिक द्दष्टया संयुक्त असलेले सर्व पदार्थ ओळखतां येतात; म्हणजे याचा अर्थ असा कीं, सोडियम् नांवाचा धातु असलेल्या कोणत्याहि रासायनिक पदार्थापासून असल्याच प्रकारची रेषा दिसेलः अर्थात् सोडियम्संबंधानें ही एक कसोटीच (टेस्ट) झाली. याप्रमाणेंच प्रत्येक धातूंसंबंधानें ठराविक रंगाच्या विशिष्ट रेषा आहेत व त्यावरून प्रत्येक धातूचेंहि अस्तित्त्व (त्या त्या धातूच्या संयुक्त पदार्थातून) जाणतां येतें.

या प्रकारच्या यंत्रांत जे किरण त्रिपार्श्व भिंगांतून बाहेर पडतात, त्यांचें वक्रीभवन होतें. परंतु कित्येक वेळां वक्रीभवन न होतां त्याचें फक्त पृथक्करण व्हावें अशी जरूरी असते. अर्थात अशा प्रकारची कार्यसिद्धी होण्याकरितां त्रिपार्श्व भिंगांची उलट-सुलट रचना करितात. यामुळें वक्रीभवन न होतां फक्त पृथग्भवन मात्र तेवढें होतें. अशा प्रकारचें यंत्र कित्येक वेळां फारच सोईचें असतें. पतन पावणार्‍या तार्‍यासारख्या स्थलान्तर पावणार्‍या प्रकाशमान पदार्थाचीं पृथग्भूत किरणें पाहण्यास असलीं यंत्रें अवश्य लागतात.

वर सांगितलेच आहे कीं, सोडियमची एक तेजस्वी पिंवळी रेषा दिसते. एका गुंजेच्या २०,००,००,००० अंशाइतक्या सूक्ष्म प्रमाणांत साध्या मिठाचें अस्तित्त्व एखाद्या पदार्थात असेल तर तेवढया सूक्ष्म मिठानें सुद्धां ही पिंवळी रेषा दिसूं शकते. यावरून या प्रकारच्या यंत्रानें किती सूक्ष्मता आली आहे याची खात्री पटेल.

मूळ द्रव्यांचे शोधः- बुनसेन आणि किर्चाफ या प्रसिद्ध शास्त्रवेत्त्यांनीं या यंत्राच्या साहाय्यानें सीझियम आणि रूबीडियम या दोन धातू शोधून काढल्या. थालियम, इंडियम आणि ग्यालियम या धातूंचा शोध याच यंत्राच्या साहाय्यानें लागला आहे. अगदीं अलीकडे म्याडम कुरी आणि मि. कुरी यांनीं देखील या यंत्राच्या साहाय्याने रेडियम नांवाच्या जगविख्यात धातूचा शोध लावला. हा धातु साध्या मातींतच काय परंतु या धातूच्या मृत्तिकेंत सुद्धां इतक्या अल्प प्रमाणांत असतो कीं, या यंत्राशिवाय त्याच्या अस्तित्वाचें ज्ञान झालेंच नसतें. परंतु या प्रकारचें बलवत्तर यंत्र मनुष्यप्राण्याच्या हातीं लागल्यामुळेंच हा धातु याच्या मृत्तिकेपासून निराळा करतां आला आहे.

प्रकाशजन्य शक्ति मापक.- या यंत्रास इंग्रजींत ऑक्टिनोमीटर हें नांव आहे. या यंत्रानें प्रकाशकिरणांची शक्ति मोजतां येते. प्रकाशकिरणांमध्यें दोन प्रकारच्या शक्ती सामान्यतः वास्तव्य करीत असतात. एकीनें उष्णता उत्पन्न होते, आणि दुसरीनें रासायनिक क्रिया घडते. सर जॉन हर्शल यानें या प्रकारचें यंत्र प्रथमतः तयार केलें. परंतु अलीकडे असल्या प्रकाच्या यंत्रानें प्रकाशजन्य रासायनिक क्रियेची शक्तीच मापण्यांत येते. या कामीं फोटोग्राफीच्या रासायनिक क्रियेचा बहुधां उपयोग करण्यांत येतो. हें यंत्र विशेषसें प्रसिद्ध नसल्याकारणानें याचें फारसें वर्णन दिलें नाहीं.

प्रकाशमापक यंत्र.- असल्यास यंत्राच्या योगानें दोन प्रकारच्या प्रकाशांची तुलना करून मापन करतां येतें. ज्या शास्त्रांत या विषयींचे नियम दिलेले असतात त्याला प्रकाशमापनशास्त्र अशी संज्ञा आहे. या कामीं एका ठराविक मेणबत्तीचा प्रकाश एक या परिणामाचा गणला गेला आहे.
प्रकाशाचे दोन नियमः- (१) प्रकाश देणार्‍या पदार्थापासून प्रकाशित अंतराच्या वर्गाच्या व्युत्क्रम प्रमाणांत प्रकाशाची तीव्रता कम जास्त होते. हें एका प्रकाशबिंदूपुढें विशिष्ट अंतरावर एक विशिष्ट आकाराची तबकडी धरली असतां त्या अंताच्या दुप्पट अंतरावर तिची छाया चौपट क्षेत्र व्यापिते या प्रयोगावरून सहज सिद्ध करतां येतें.

(२) प्रकाशकिरणांनीं, ज्या कोनांत एखादा प्रकाशित भाग असेल त्या कोनाच्या कोटिज्येच्या प्रमाणांत तो भाग प्रकाशित झालेला असतो. ही गोष्ट प्रकाशकिरणापुढें एक लंबाकृति व एक तिरपा असे दोन फलक उभे केले असतां व्यापलेल्या क्षेत्रावरून दिसून येतें.

प्रकाशाचे परिणामः- दोन प्रकारच्या प्रकाशांची तुलना करतां येण्यास एक ठराविक माप सर्वसामान्य असें गणलें गेलें आहे. या प्रकारच्या मापास ''मेणबत्ती'' असें नांव दिलें. आहे व्हेल माशाची चरबी १/६ पौंड घेऊन तिची मेणबत्ती दर तासास १२० ग्रेनप्रमाणें जाळली असतां जो प्रकाश पडेल तो प्रकाश एक परिमाणाचा गणला आहे. या प्रकारची मेणबत्ती सतत सारखा प्रकाश देत देत जळावयास लावणें जरा कठिणच आहे. परंतु असल्या प्रकारच्या मेणबत्तीचा साधारणपणें व्यवहारांत प्रकाश मपण्याकडे उपयोग करतां येतो. कित्येक ठिकाणीं विजेच्या दिव्याच्या प्रकाशाचें एक ठराविक परिमाण योजण्याचा उपक्रम झाला आहे. या कामीं फ्लेमिंग, हेफनर इत्यादि अनेक शास्त्रवेत्त्यांनीं अत्यंत परिश्रम केले आहेत.

प्रकाशाची तुलना करण्याकरितां पुढीलप्रमाणें युक्त्या योजतात. याकरितां पहिल्यानें पी. भोगर आणि डब्ल्यू रिट्ची यांनीं पुढील युक्ति योजिली. अतिशय लघुकोन असलेली पाचर दोन दिव्यांमध्यें ठेवितात व त्या पाचरीच्या टोंकाकडून त्याच्या दोन बाजू अवलोकन करतात. जर त्या दोन्ही बाजू समप्रमाणांत प्रकाशमान न दिसल्यास तर ती पाचर त्या दोन दिव्यांमध्यें हलवितात किंवा दिवे हलवितात. दिव्यांचें पाचरांच्या पृष्ठभागापासून जें अंतर असेल त्याच्या वर्गाच्या प्रमाणांत प्रकाशाची तीव्रता असते. कौंट रंमफोर्ड यानें पुढील प्रकारची योजना केली आहे. एखाद्या ग्रौंडग्लासावर किंवा दुसर्‍या एखाद्या अर्ध-पारदर्शक पडद्यावर एखाद्या वस्तूची (बहुधां एखाद्या लोहशलाकेची) सावली दोन ठिकाणीं शेजारी शेजारीं पाडून तींत किती साम्य आहे तें पाहतात. हें साम्य पूर्णपणें जमल्यास त्या दिव्याच्या पडद्यापासून असणार्‍या अंतराच्या वर्गाच्या प्रमाणावर प्रकाशमान गणतात. बन्सेननें दोन बाजूस दोन दिवे ठेवून मध्यें तेलाचा डाग पडलेला एक कागद ठेवून त्याच्या दोन्ही बाजूंवर दोन्ही बाजूंच्या दिव्यांचा सारखा प्रकाश पडला असतां दिव्यांचें अंतर मोजून प्रकाशतीव्रता अंतराच्या वर्गाच्या व्युत्क्रमप्रमणांत असते हें दाखविलें आहे.

विद्युद्दीपाचें प्रकाशमानः- विजेच्या दिव्याच्या प्रकाशाचें मापन करणें हें वरील पद्धतीइतकें सोपे नाहीं. विजेच्या दिव्यांतून निरनिराळ्या दिशेनें निरनिराळ्या तीव्रतेचा प्रकाश निघतो. तेव्हां एकाच दिशेनें प्रकाशाचें मापन केल्यास बरोबर मापन होणार नाहीं, याकरितां फिरत्या दिव्याचा उपयोग करतात. एका सेकंदास तीन फेरे या प्रमाणांत दिवा फिरता ठेवितात. परंतु दिव्यास या प्रमाणांत गति दिल्यास विद्युत्प्रवाह जाऊं देणारे दिव्यांतील तंतु कमी जास्त प्रमाणांत फाकतात; व त्या योगानें दिव्याचा प्रकाश-केंद्र बदलतो. अशा प्रकारें प्रकाशमापनांत अंतर पडूं नये म्हणत दुसरी युक्ति योजतात. दिव्याच्या सभोंवार सुमारें बारा आरसे लावून त्या दिव्याचा प्रकाश एका विशिष्ट स्थळीं पाडतात. या ठिकाणीं प्रकाशाची ''ठराविक मेणबत्ती'' च्या प्रकाशाशीं तुलना करतात. ही युक्ति म्याथ्यु यानें शोधून काढली म्हणून या युक्तीला म्याथ्यूची ''एकत्रीभावकरण युक्ति'' असें नांव आहे.

रंगीत प्रकाशाचें मापनः- वरील प्रकारच्यः पद्धतींचा उपयोग जेव्हां एकच प्रकारचा प्रकाश असेल तेव्हां चांगला होतो; परंतु निरनिरळ्या प्रकारच्या रंगांचे प्रकाश असले तर वरील पद्धतीनें उत्तम काम करतां येत नाहीं. तरी पण वरील पद्धतींनीं जें उत्तर येईल तें फारसें चुकीचें ठरत नाहीं.

पृथग्भूत प्रकाशमापनः- असल्या प्रकारच्या यंत्रानें प्रकाशाचें पृथक्करण करून त्यांतील निरनिराळ्या रंगांची तुलना करतां येण्यासारखी आहे; यानें एकाच प्रकाशाच्या पृथग्भूत अंगांची तुलना करतात; किंवा दोन प्रकाशांच्या निरनिराळ्या अंगांची तुलना करतात.

स्वस्थ प्रकाशमापनः- या प्रकारच्या प्रकाशमापनास फार प्राचीन काळापासून सुरवात झाली आहे. सुमारें इ.स. १५० च्या सुमारास टॉलेमी यानें स्वस्थ तारकांचीं यादी प्रसिद्ध केली. तांत सुमारें १२०० तारकांचीं नांवें दिलीं आहेत. त्या यादींत तारकांचे ६ भेद सांगितले आहेत. हे भेद तारकांच्या प्रकाशानुरूप केले आहेत. विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे कीं, ह्या यादींत गेल्या १५०० वर्षांत फरक करतां आला नाहीं. जेव्हां यांत्रिक मदत घेण्यास सुरवात झाली तेव्हांच या यादींत सुधारणा करतां आली. यावरून ग्रीक लोकांच्या तारतम्यज्ञानाची कल्पना करतां येईल. दुर्बिणीच्या शोधाच्या योगानें मनुष्याच्या नेत्रेंद्रियांच्या शक्तीत वाढ झाली. दुर्बिणीखेरीज अनेक साधनें यानंतर उपलब्ध झालीं व त्यायोगानें या विषयांत मनुष्याची अत्यंत प्रगति झाली. प्रथमतः कित्येकांनीं सूर्यप्रकाशाची ''मेणबत्ती'' शीं तुलना करण्याचा प्रयत्‍न केला, कित्येकांनीं चंद्राच्या प्रकाशाची ''मेणबत्ती'' शीं तुलना करण्याचा प्रयत्‍न केला, तर कित्येकांनीं चंद्र आणि सूर्य यांच्या प्रकाशाची तुलना करण्यास आरंभ केला. साधारणपणें असें आढळून आलें आहे कीं चंद्राच्या ३००००० ते ४७०००० पट सूर्याचा प्रकाश आहे. शुक्राच्या ६२ कोटी आणि गुरूच्या ३० कोटीपट प्रकाश सूर्य देतो. व्याघ्र नांवाच्या तार्‍याच्या ५९७ कोटीपट सूर्यप्रकाश आहे असें सिद्ध झालें आहे.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .