प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें    
       
पोलंड- या देशाचे पोलीश नांव पोलस्क असून पोलेन हे जर्मन नांव आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत हे एक स्वतंत्र राज्य होते.  सांप्रत याचे रशियन व जर्मन पोलंड असे दोन भाग आहेत. रशियन पोलंडच्या उत्तरेस व पश्चिमेस जर्मनी, दक्षिणेस आस्ट्रिया व पूर्वेस रशिया असून या प्रदेशाचे दहा प्रांत आहेत. हा देश साधारण ३००-४०० फूट उंचीच्या मैदानाचा आहे. परंतु त्यात लहान लहान टेंकडया, ओढे, जंगले, तलाव, दरीखोरी दलदलीच्या जागा वगैरे प्रकार इतके आहेत की, जणू काय त्यांचे हे जाळेच बनले आहे. जमीनीत सुपीकपणा जास्त आहे. दक्षिणेकडे प्रदेश उंच उंच होत गेला आहे. जंगलात ओक, बीच, पाईन वगैरे झाडे फार आहेत. विश्चुला नदीने देशाचे साधारण दोन भाग पडले आहेत. टेंकडयांच्या रांगा या नदीच्या पूर्व पश्चिम भागी असून त्यांची सर्वांत जास्त उंची २०१० फूट आहे. पैकी बेस्काईड टेकडयांत पोलंडची मुख्य खनिज संपत्ति आहे. पाणी पुष्कळ असल्याने भाजीपाला व फळफळावळ चांगली पिकते. नद्या उथळ असून त्यांच्या पाटांपासूनहि बागाईत पिकवितात. प्राचीन काळी या नद्यांच्या जाळ्याच्या प्रदेशात मोठमोठी सरोवरे होती असे दिसते. सांप्रत या भागात त्यावेळच्या गाळाच्या जमीनीमुळे शेती उत्तम पिकते. नद्या उथळ (कांही तर २ ते ५ फूट खोलीच्या) असल्याने पावसाळ्यात पुरामुळे या प्रदेशाची फार खराबी होते. विश्चुलेचे पात्र १००० यार्ड रुंद असून तिच्या पुराने दीडशे मैल आसपासचा प्रांत जलमय होतो. म्हणून तिच्या कांठावर २४ फूट उंचीचे व ६० मैल लांबीचे बंधारे बांधले आहेत. तरी पण एखाद्या वेळी त्यावरूनहि पलीकडे पूर पसरतो व क्रॅको-ओपोलो या सारख्या शहरांनाहि धक्का बसतो. मात्र यामुळे या नद्यांच्या जलमार्गाने व्यापार चांगला चालतो. व्यापारात धन्य, लोकर, इमारती लाकूड, लाकडी खेळणी, ताग वगैरे जिन्नस असतात. पूर्वी यात्रांच्या ठिकाणी हा व्यापार चाले. सांप्रत तो आगगाडीने रशिया व जर्मनी यांच्याशी साधारण सालीना ३०,००,००० पौंडांचा चालतो. वीपर, बग, नार्यू, वार्ता, मेमल वगैरे इतर नद्या आहेत. सुवालकी प्रांतात सर्वांत जास्ती तलाव आहेत. सर्वांत मोठा तलाव गोप्लो नांवाचा १८ मैल लांबीचा आहे. देशाची हवा समशीतोष्ण असून पावसाची सरासरी २३ इंच असते. मात्र दक्षिणेकडे कार्पेथियन पर्वत असल्याने तिकडे ही ३० पर्यंत जाते. बर्फ थोडे पडते. धुके मात्र बरेच असते. उत्तर यूरोपमधील फळफळावळ व फुले (विशेषत: जर्मनीतील) येथे उत्पन्न होतात. प्राचीन काळी येथे आद्ययुगीन पशू होते. हल्ली काळवीट, घोडा, पिंगट अस्वल, रानडुक्कर, ससे वगैरे पशू आणि सर्व तर्‍हेचे पक्षी (विशेषत: गाणारे पक्षी) येथे आढळतात. सर्व रशियात हा देश जास्त वस्तीचा आहे. दर चौ. मैली १९० असे वस्तीचे प्रमाण आहे. एकंदर पोलंडची लोकसंख्या व क्षेत्रफळ नक्की समजणे कठिण आहे. कारण महायुद्धामुळे पोलंडचे तीन तुकडे पडले आहेत. इ. सन १७७२ पूर्वी जेव्हां ते एकत्र होते तेव्हां त्याचे क्षेत्रफळ २७४०१८ चौ. मै. होते. सांप्रत (१९२५) लोकसत्ताक पोलंडचा जो भाग आहे त्याचे क्षेत्रफळ ३६७०२२ चौ. किलो असून लोकसंख्या ३६२३४७२७ आहे. त्यात वार्सा शहर ७॥ लक्ष लोकवस्तीचे आहे. शुद्ध पोल लोक व्हिश्चुला व पोसेन नद्यांच्या मधील प्रदेशात आहेत. बाकीच्या पोल लोकांत स्लाव, रशियन, ज्यू. लिथूनियन वगैरे रत्तचंचे मिश्रण झालेले आहे. प्रदेशभिन्नत्वाने पोल लोकांना निरनिराळी नांवे मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या भाषा व पोशाख वगैरेहि भिन्नभिन्न आहेत. त्यांच्यावर इतरांपेक्षा सर्वांत जास्त जर्मन संस्कृतीची छाप हळु हळु बसत चालली आहे. त्यांच्या व्यापारांतहि जर्मनांचा हात जास्त शिरकला आहे. लोडझ (व्यापाराची अतिशय मोठी पेठ) शहरी सारा त्यांचाच भरणा आहे. तसेच ज्यू लोकांच्या हाती बहुतेक व्यापार व शेती आहे. पूर्वी जमीनदारी पद्धत असल्याने शेतकरी हा नुसता भाडोत्री असे. पुढे निरनिराळ्या वेळी कायदे होऊन व पुष्कळ जमीनदारांच्या जमीनी सरकारने शेतकर्‍यांत वाटून दिल्यामुळे सांप्रत शेतकरी जमीनीचा मालक झाला आहे. पोलंड हा देश अति प्राचीन काळापासून शेतकीप्रधान (यूरोपचे धान्याचे कोठार) म्हणून प्रख्यात आहे. शेतीच्या सुधारणेच्या बाबतीत रशियापेक्षाहि पोलंड पुढे गेले आहे. या देशाची अर्धी जमीन शेतीखाली असून हल्ली तीत बीटरुट (साखरेसाठी), बटाटे, गहूं, ओट, तंबाखू यांची लागवड जोराने होत आहे. तसेच मधमाशा पाळून मधाची निपज व उत्तम अवलादीची जनावरे तयार करणे हाहि धंदा चालू आहे.

सन १८७५ पासून उद्योगधंद्याच्या भरभराटीस प्रारंभ झाला. सूत व कापडाच्या गिरण्या बर्‍याच चालू करण्यात आल्या. शन १८६४ त १५ लाख पौंडांचे, तर १९०५ त ५ कोटी ३० लाखांचे उत्पन्न उद्योगधंद्यांपासून झाले. साखर, कमावलेली कातडी, कागद, सीमेंट, साबू, मेणबत्या, वगैरे धंदे सुरू आहेत. सरकारी कारखान्यातून दरसाल १० लाख टन साखर निघते. पोलिश बूट फार प्रसिद्ध आहेत. सन १९११ त ७३ कोटी फ्रँक किंमतीचा माल निर्गत झाला व १ अब्ज २२ कोटीची आयात झाली.

दक्षिण भागात खाणी पुष्कळ असून त्यांतून खालील पदार्थ व धातू सालीना पुढील प्रमाणात बाहेर जातात– दगडी कोळसा ६० लाख टन, जस्त १२ हजार टन, लोखंड व पोलाद ५ लक्ष टन, शिवाय तांबे, कथील, गंधक, वगैरे. खाणीच्या जवळून आगगाडयांचे रस्ते नेले आहेत.

इतिहास, प्राचीन:- १० व्या शतकापर्यंत पोलंडबद्दल विश्वसनीय माहिती सांपडत नाही. परंतु पोल लोक पूर्वी डान्यूब नदीतीरी रहात असावेत व त्यास रोमन लोकांनी हांकून दिल्यावर ते ओडर आणि विश्चुला नद्यांच्या कांठी रहावयास गेले असावेत. या ठिकाणी लिचिसी लोक रहात असत. त्यांचा उद्योग म्हणजे शिकार करून उदरपोषण करणे हा होता. ग्रीक लोकांनी येथे प्रथम ख्रिस्ती धर्म सुरू केला. बोलेस्लास पहिला (१०२५) हा पोलंडचा पहिला राजा झाला.

पोलंड देशावर ख्रिस्तेतर लोकांनी स्वार्‍या केल्यामुळे तेथील ख्रिस्ती संस्कृति सर्व लयास गेली. तिसर्‍या बोलेस्लास राजाच्या कारकीर्दीत जर्मन लोकांच्या विरुद्ध आपले स्वातंत्र्य राखण्याचे सामर्थ्य पोल लोकांच्या अंगी आले व याच राजाने ख्रिस्तेतर धर्माच्या लोकांस ख्रिस्ती बनविण्याचा धडाका लावला.

११३८ ते १३०५:- या काळात पोलंड देशाचे लहान लहान तुकडे झाले होते. १२४१ साली बतूच्या नायकत्वाखाली तार्तर लोकांनी पोलंडवर स्वारी केली व सर्व प्रदेश निर्जन वन करुन सोडला.

बतूच्या या स्वारीचा पोलंडच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर फार चांगला परिणाम झाला. यामुळे दुसरीकडे लोक पोलंडच्या ओसाड प्रदेशात वस्ती करण्यास येऊ लागले. व्यापारी, उदभी, व चांगले सुसंस्कृत लोक येथे आल्यामुळे येथे मोठमोठी शहरे वसू लागली. हे व्यापारी बहुधा जर्मन असत. नाइट्स ऑफ दि सोर्ड व कोनरॅड डयूकने बोलाविलेले जर्मन यांच्यामुळे पोलंडला पुढे फार त्रास झाला. स. १२५९ मध्ये तार्तार लोकांची पुन्हां एकदा वावटळ पोलंडमध्ये आली व याच सुमारास लिथुआनियन नांवाचे आणखी एक शत्रू उपस्थित झाले, आणि तार्तार, जर्मन व लिथुआनियन यांमध्ये पोलंड देश विभागला गेला.

१३०५ ते १३८६:- परंतु पहिला व्लाडिस्लास याने लहान आणि मोठे पोलंड याचे ऐक्य घडवून आणले. तसेच पोलंडचा मोठा मुत्सद्दी तिसरा कॅसिमियर याने मोठ्या खुबीने लग्नसंबंध जुळवून आणून पुनश्च पोलंड देश एक केला. याने राज्यव्यवस्थेत पुष्कळ सुधारणा केल्या. त्याच्या पश्चात त्याचा भाचा हंगेरीचा लुई दि ग्रेट (१३७०-१३८२) आणि नंतर २ रा व्लाडिस्लास यांनी पोलंड व लिथुआनिया यांचा एकजीव करून टयुटॅनिक नाइट्सचा चांगला समाचार घेण्याचा विचार केला. मध्यंतरी भिक्षुकवर्गाने आपले हक्क हळू हळू मिळविले होते व १३७४ मध्ये झ्लाचटा म्हणजे कुलीन लोकांनी बरेच हक्क मिळविले व त्यांच्या मोबदल्याप्रीत्यर्थ त्यांना राजास लष्करी मदत करावी लागे. यावेळच्या धार्मिक चळवळीमुळे बरेच राष्ट्रीय ऐक्य घडून आले व भिक्षुक मंडळीने खालच्या गरीब लोकांवरील बराच जुलूम कमी केला. लहान पोलंडमधील क्रॅको हे राजधानीचे शहर होऊन यूरोपमधील अत्यंत सधन असे शहर झाले. १४ व्या शतकात पौल नगरास राजकीय हक्कहि प्राप्त झाले. तसेच इतर दुसर्‍या खालच्या लोकांनाहि काही काही हक्क प्राप्त झाले होते. मात्र ज्यू लोकांना एखादा देखील हक्क मिळाला नव्हता. तरी पण त्यांना पोलंडमध्ये इतर देशापेक्षा फार चांगले वागविण्यात येई.

जॅगिएलोनिक काल (१३८६-१५७२):- ब्लाडस्लिासला जर्मन नाइटसना चोपायचे होते. यासाठी लिथुनिया आणि पोलंड यांचा संघ स्थापण्यात आला (१४०१), व १४१० या वर्षी या दोन्ही देशांच्या फौजा एकवटून त्यांनी सॅमोगिटिआची सुटका करण्यासाठी कंबर कसली. टॅनेनबर्गच्या लढाईत नाइट लोकांची हाडे खिळखिळी झाल्यामुळे त्यांचे राजकीय ऐक्य विस्खळित झाले.

दुसरा ब्लाडिस्लास हा फार राजकारणकुशल असल्यामुळे याच्या कारकीर्दीत पोलंड हे यूरोपच्या इतिहासात प्रमुख राष्ट्र म्हणून गणले जाऊ लागले. त्यानंतर ब्लाडिस्लास तिसरा याने पोलंड देशाच्या राज्यास आणखी बळकटी आणली. १४४७ मध्ये चवथा कॉसिमीर हा पोलंड आणि लिथुआनियाचा राजा झाला. लिथुआनिया हा पोलंडप्रमाणे नीट सुसंघटीत देश नव्हता. निरनिराळे धर्मपंथ व निरनिराळ्या भाषा या देशात चालू होत्या. कॉसिमीर हा स्वत: लिथुआनियन होता. यामुळे पोलिश लोकांस तो अप्रिय झाला व त्यांना कॉसिमीरची अत्यंत दूरद्दष्टीची देशाभिमानपूर्ण राजकीय संघटना संशयास्पद वाटली.

इकडे टयुटॉनिक आर्डर या संघाची राजकीय बाबतीतहि पिछेहाट होत होती. अखेरीस १४१४ मध्ये नाइट्स लोकांनी डायट (राजसभा) निर्माण केली व स. १४३० मध्ये ती उमरावशाहीच्या हातात देण्यात आली. या सभेमुळे जुन्या तक्रारी मिटण्याऐवजी वाढतच चालल्यामुळे प्रशियन संघ स्थापन झाला व त्याने राजकारणात आपणास समान हक्क मिळावेत अशी मागणी केली. ह्या संघावर पोपने बहिष्कार घातला. तेव्हां संघाने पोलिश राजाचा आश्रय घेतला. पोलिश राजाने सर्व प्रशियन प्रांत आपल्या राज्यास जोडले व त्यांना स्थानिक स्वायत्तता (लोकल ऑटॉनमी) देऊन त्यांचा व्यापार खुला केला. यामुळे कॉसिमीर याची आणि नाइट लोकांची लढाई जुंपली. १४६२ मध्ये पक येथे नाइट लोकांचा पराजय झाला व स. १४६६ मध्ये त्यांना थॉर्नचा तह करणे भाग पडले. नाइट्सचा देश खास प्रशियाखाली मोडू लागला व प्रशियन राजे पोलराजास कारभार देऊ लागले. याप्रमाणे प्रशिया आणि पोलंड ह्यांचा एक संघ निर्माण झाला व नाईट लोकांस विश्चुलापार हांकून लावण्यात आले.

१४८४ मध्ये पोलंडला तुर्कांपासून खराखुरा त्रास पोहचू लागला. यावर्षी टर्कीने किलिया आणि अक्करमन हे डान्यूब आणि नीस्टर नदीवरील मोठे किल्ले सर केले. यामुळे पोलांच्या व्यापारावर जबरदस्त धाड आली. स. १४९२ आणि १५०६ पर्यंत चवथ्या कासिमीर आणि सिगिस्मंड (पहिला) यांची राज्ये विभक्त झाली. पण लिथुआनियन यांनी मस्कोवी झारकडून मार खाल्यामुळे १४९५ साली ते पुन्हां पोलांना येऊन मिळाले. पहिला जॉन अल्बर्ट याच्या वेळी पोलराजवंशाच्या सत्तेची परमावधी झाली होती. यामुळे जॉन अलबर्टने तुर्कांविरुद्ध असलेल्या संघाचा पुढाकार घेतला, परंतु त्यात त्याला अपयश आले. याच्यामागून अलेक्झांडर हा दुर्बल राजा आल्यामुळे लिथुआनियामध्ये तार्तार आणि मस्कोव्ही लोकांनी धुमाकूळ घातला. सर्व सत्ता श्रीमंत लोकांच्या हातात गेल्यामुळे गरीब लोक पिळले जात होते. त्याच्या पश्चात पहिला सिगिस्मंड (१५०५-१५४८) याने एक चांगले सैन्य उभारले. या वेळी तार्तारांच्या स्वार्‍या पोलंड साम्राज्याच्या थेट मध्यापर्यंत होऊ लागल्या.

कील आणि काळासमुद्र यांमधील मैदानाची चांगली मोर्चेबंदी करणे हे या प्रजासत्ताक राज्याचे कर्तव्य होते पण ते तसेच राहिले होते. १५२६ त झालेल्या हंगेरीच्या राज्याच्या पिछेहाटीमुळे पोलंडच्या परिस्थितीवर फार परिणाम झाला. लवकरच ऑस्ट्रिया व पोलंडचा स्नेहसंबंध सिगिस्मंडच्या मुलाच्या लग्नाने जस्त द्दढतर झाला व याच्याच राज्यात मॅसोव्हियाची डची पोलंडला जोडण्यात आली. दुसर्‍या सिगिस्मंडचे २४ वर्षांचे राज्य पोलंडच्या इतिहासात परकीयांच्या स्वार्‍या आणि अंतस्थ असंतोष ह्या दोन्ही गोष्टीमुळे अत्यंत बिकट परिस्थितीच्या पेचात सापडले होते. पोलंड देशात नवीन लूथर पंथास मज्जाव होता. तरी पण हा नवीन पंथ आपले पाऊल पुढे टाकीत होताच.

इकडे लूथरचा पंथ याप्रमाणे प्रगति करीत असता कॅल्व्हिनिझमने (कॅल्व्हिनच्या पंथाने) आपले बोट पोलंडमध्ये शिरकविलेच होते. कॅल्व्हिनपंथ जर्मन नसल्यामुळे तो वाढू लागला परंतु या सर्वांवर बोहेमियन भावंडांच्या पंथाने ताण केली. या पंथाचा प्रसार प्रशियात फार झाला. पोल लोकांना हे धर्मपंथी लोक आवडत असत. कारण त्यांना मोठमोठ्या जमिनी मिळून पुष्कळ सवलती सहज प्राप्त होत असत. कॅथॉलिक धर्माची स्थिति ह्यावेळी पोलंडमध्ये अगदी वाईट होती. कारण धर्मगुरू हे अगदी भोंदू असत. त्यांची धर्मतत्त्वे अशी कांहीच नसत; त्यांच्यापैकी कांहीची वर्तणूक अत्यंत निंद्य असे.

दुसर्‍या सिगिस्मंडच्या कारकीर्दीत (१५४८-१५७२) सर्व पंथास पूर्ण मोकळीक मिळाली. यामुळे सर्व प्रकारचे धर्मसुधारक या देशात वावरू लागले. १५५८-१५५९ या वर्षी प्रॉटेस्टंट पंथाची सत्ता परमावधीस पोचली. पण पुढे तीस र्‍हास लागला. याचे कारण यापुढे कॅल्व्हिनपंथी व लुथेरिन पंथी हे शत्रूप्रमाणे वागू लागले. शिवाय कॅथॉलिक पंथातहि याच सुमारास चेतना उत्पन्न झाली. १५६५ साली देवत्रयीवर विश्वास न ठेवणार्‍या अधर्मी लोकांस हांकून देण्याचे फर्मान दुसर्‍या सिगिस्मंडने काढले व त्याने पोलंडमध्ये धर्मसुधारणेच्या कट्टया शत्रूंस (जेसुइटपंथी लोकांस) आपल्या राज्यात घेतले व याप्रमाणे पुनश्च कॅथॉलिक पंथाची घडी बसविण्यात आली.

१६ व्या शतकामध्ये नाइट लोकांचे राज्य डळमळू लागले. इव्हॅन दि टेरिबलने लिव्होनियावर स्वारी केली. तेव्हां दुसर्‍या सिगिस्मंडला या प्रकरणात हात घालावा लागला व त्याने १५६१ साली लिव्होनिया घेतला व तो लिथुआनियाला जोडण्यात आला. सिगिस्मंड हा धोरणी राजा असल्यामुळे त्याने हळू हळू पोलंड आणि लिथुआनियम या दोन देशांचा एकजीव करण्याचा प्रयत्‍न केला. हे देश १५६९ साली अगदी पुरतेपणी एक जीव झाले. १५७२ साली दुसरा सिगिस्मंड वारला.

याप्रमाणे या अ‍ॅगिएलोनिक वंशाचा इतिहास (१३८२-१५७२) म्हणजे पोलंडचे एकराष्ट्र निर्माण करण्याचा इतिहास होय. हे बहुतेक सारे जॅगिएलोनिक राजे मुत्सद्दी आणि धोरणी होते. एवढेच नव्हे तर ते सर्व सारखेच तरतरीत, हुषार आणि राजकारणपटु असून त्यांनी मोठ्या आणीबाणीच्या वेळी या घराण्याने पोलंडदेशाचे तारू मोठ्या शिताफीने हांकून या देशास नांवालौकिकास चढविले.

१५७२-१७७२:- दुसर्‍या सिगिस्मंडनंतर वारसाबद्दल प्रश्न उपस्थित झाला. शेवटी हेनरी; अँडयूचा डयूक याने बडया लोकांना पैसा देऊन आपली निवडणूक करून घेतली. सर्व धर्मीयांस आपापल्या मतानुसार वागण्यास मुभा देण्यात आली. शेवटी १५७३ मध्ये व्हॅलाइसचा हेनरी हा पोलंडचा राजा निवडला गेला.

नंतर लवकरच राज्यव्यवस्थेत सुधारणा करण्यात येऊन नियंत्रित राजसत्तेऐवजी निवडलेल्या अधिकार्‍यांनी राज्य करावे असे ठरले. आता राजाला पुढील वारसाबद्दल बोण्याचा अधिकार नव्हता. कारण हे राज्य वंशपरंरागत नव्हते. सीनेट सांगेल त्या स्त्रीसमवेत राजाने लग्न केले पाहिजे. इतकी राजाची परावलंबी स्थिति झाली, व प्रजासत्ताक राज्यास उतरती कळा लागली.

व्हॅलाइसचा हेनरी व नंतर ट्रनसिल्व्हानियाचा राजा स्टिफन यांनी काही काळ राज्य केले. पुढे स्वीडनच्या राजाचा मुलगा सिगिस्मंड (तिसरा) यास पोलंडचा राजा करण्यात आले (१५८७– १६३२). मस्कोव्हीच्या झार घराण्याचा र्‍हास आणि जर्मनीमधील ३० वर्षांचे युद्ध यामुळे पोलंडला पुन्हां आपले स्थिरस्थावर करण्यास सापडले, व या देशाच्या सुदैवाने झोल्कीवस्की, चोडवकीवस्की आणि कोनिकपोल्सकी हे अत्यंत शूर असे आरमाराधिपती या देशास लाभले. पुढे ५० वर्षांनी पोलंडच्या प्रचंड सत्तेचा र्‍हास झाला. त्याचे मूळ कारण पोल लोकांचा शिस्तीविषयीचा तिटकारा हेच होय. यावेळी स्झ्लाचटा आणि डायट (सभा) यांतील सभासदांमध्ये राष्ट्रीयत्वाचा अणुरेणुसुद्ध वास करीत नव्हता. होता होईल तो पैसा खर्च करावयाचा नाही असा त्यांचा हेतु होता. मध्यंतरी बरीच बंडे झाली. स. १६०७ मध्ये मुझौ येथे बंडखोरांचा पराभव करण्यात आला व १६०९ मध्ये लोकांची मने पुन्हां शांत करण्यात आली.

चवथा क्लाडिस्लास (१५३२-१६४८) याने लोकांना बरेच हक्क दिले. स. १६३४ मध्ये याने मस्कोव्ही लोकांकडून स्मोलोन्स्क आणि पूर्वेकडील प्रदेश परत मिळविले. पार्ट म्हणजे टर्कीला याने धाक घातला; आणि स्वीडनपासून बाल्टिक प्रांत आणि समुद्रालगतचा प्रदेश परत मिळविला.

पोलिश आणि मस्कोव्ही राजकारणात कोसॅक लोकांनी सतराव्या शतकात फार मोठा भाग घेतला. यूरोपच्या नैर्ॠत्येस नीपर नदीपासून उरल पर्वतापर्यंतच्या प्रदेशात राहणार्‍या लोकांना तार्तार लोक कझाकी किंवा कोसॅक असे म्हणत असत व त्यावरूनच या लोकांस कोसॅक हे नांव पडले. हळू हळू या कोसॅकांचा उपद्रव टर्की आणि पोलंड या दोहोंस होऊ लागला व त्यामुळेच टर्की आणि पोलंड यांमध्ये लढे उद्भवू लागले. स. १६२० मधील सेकोडाची चाल आणि स. १६२१ मधील खोतिन युद्ध यास मूळ कारण कोसॅक लोकांचा टर्कीवरील हल्लाच होय.

मध्यंतरी कोसॅक लोकांनी अर्धवट स्वतंत्र राज्य स्थापिले. पुढे त्यांनी नीपर नदीमधील बेटांतून आपल्या वसाहती करण्यास सुरवात केली. कोसॅक पोलंडच्या सरहद्दीवर राहून तार्तार लोकांचा बंदोबस्त करीत. परंतु १७ व्या शतकाच्या सुरवातीस धार्मिक कारणावाचून कोसॅक लोक पोल लोकांचा द्वेष करु लागले. १६१९ मध्ये काळ्या समुद्रावरील कोसॅकांच्या चाचेगिरीस आळा घालण्यात आला. यामुळे कोसॅक जास्तच चवताळले व त्यांनी १६३५ व १६३६ मध्ये बंडे केली. यामुळे स. १६३८ मध्ये डॉमटने (राजसभेने) कोसॅक लोकांचे सर्व हक्क काढून घेतले.

१६४८ मध्ये डोहडन चिलनिकी या कोसॅक गृहस्थाने बंड पुकारुन पोलंड राज्य हादरून सोडले व पोलंडच्या खाशा सैन्याची या कोसॅक वीराने चांदी उडविली, व १,००,००,००० गुल्डन किंमतीची लूट लुटली. तेव्हां क्लाडिस्लासचा भाऊ जॉन कॅसिमीर याने चिलनिकी याला कोसॅक लोकांच्या मुख्य अधिकार्‍याची वस्त्रे देऊन लोकांस परत सर्व पूर्वीचे हक्क देण्याचे अभिवचन दिले. परंतु चिलनिकीच्या अटी फारच बेताल असल्यामुळे पोलंडला त्या कबूल होईनात. तेव्हां पुन्हां युद्ध सुरू झाले. परंतु झ्बोरोच्या तहाने पुन: दोन्ही देशात शांतता स्थापन झाली. पण पुन्हां स. १६५१ मध्ये पोलंड आणि बोहडन यांमध्ये युद्ध जुंपले आणि यावेळी कोसॅक लोकांची स्वतंत्र राज्य स्थापण्याची प्रबल इच्छा झारनीकी याने मिळविलेल्या कोसॅकविरुद्ध जयात गाडली गेली. परंतु या झारनीकीच्या जयाचा लाभ पोलंडच्या ऐवजी मस्कोव्हीनेंच करून घेतला. मस्कोव्हीला पोलंडच्या झांकल्या मूठीतील गौप्य पूर्णपणे कळल्यामुळे, १६६२ मध्ये चलनिकी याने मस्कोच्या झारशी सूत बांधले व पोलंडवर रशियाची स्वारी झाली. हे युद्ध १३ वर्षांचे युद्ध म्हणून रशियाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. रशियन सैन्याने पोलंड देश उजाड करून टाकला. स. १६५५ मध्ये कांही क्षुल्लक सबबीवर स्वीडन देशाने पोलंडविरुद्ध युद्ध पुकारले व एक वर्षात स्वीडनच्या सैन्याने राजधानी सर करून अर्धा मुलूख पादाक्रांत केला. इकडे जॉन कॅसिमीर हा राज्य सोडून पळून गेला व मस्कोव्ही लोकांनी स्वीडनने न घेतलेला मुलूख बळकावण्यास सुरवात केली.

परंतु इकडे दुसर्‍या काही गोष्टी पोलंडला अनुकूल अशा घडून येऊ लागल्या. एक जॉन कॅसिमीर आणि आस्ट्रियाचा बादशहा यांमधील नवीन सख्य. दुसरी, लोकांमध्ये धार्मिक जागृति, व तिसरी, स्वीडनच्या सेनेचा पराजय. १६६० मध्ये ऑलीव्हाचा तह होऊन त्या तहान्वये लिव्होनिया प्रांतावरील हक्क आणि त्याचप्रमाणे स्वीडनवरील हक्क जॉन कॅसिमीरने सोडले. स. १६६१ मध्ये रशियन सेनेचा झेरोमस्क येथे पराजय करुन पुनरपि स्वकीय प्रांत परत मिळविण्यात आले. १६६७ मध्ये मस्कोव्हीबरोबर पोलंडचा तह होऊन काही प्रांत मस्कोव्हीस देणे पोलंडला भाग पडले व या तहान्वये नीपर नदीलगतचे कोसॅक आणि रशिया हे पोलंडच्या हुकुमाखाली आले व कीब शहर रशियाला मिळाले. उत्तरोत्तर रशियाचे वजन पोलंड देशावर सारखे वाढतच चालले.

१६४८-१६६७ च्या भयंकर धक्क्यापासून पोलंड कसेबसे वाचले व अजूनहि यूरोपच्या द्दष्टीने पोलंड हे एक मोठे राष्ट्र म्हणूनच गणले जाऊ लागले. हळू हळू पोलंडमध्ये अनीति पसरू लागली. स. १५७३ मध्ये प्रथम पोलिश राज्याचा लिलाव होऊन व्हॅलाइचा हेनरी हा राजा निवडण्यात आला. १५८७ मध्ये पुन्हां त्याचा लिलाव झाला. स. १६६९ मध्ये मायकेल विष्णीओविली हा, पोलिश लोकांकडून सर्वांनुमते राजा निवडला गेला. पण पोलिश सेनापतीने १४ व्या लुईबरोबर सूत बांधले, व राजास हांकून देण्याचा घाट घातला आणि स. १६७४ मध्ये तिसरा जॉन म्हणून गादीवर बसला. त्यानंतर स. १६९१ मध्ये दुसर्‍या आगस्टसला गादी देण्यात आली. १६९९ मध्ये तुर्कांबरोबर सुरू असलेले युद्ध थांबले व पोलंडने आपला बराच मुलूख पुन्हां परत मिळविला. श. १७००-१७२० पर्यंत उत्तरेकडील (दि ग्रेट नार्दर्नवॉर) युद्ध स्वीडनच्या राजाबरोबर सुरू झाले. या युद्धत स्वीडिश, सॅक्सन आणि रशियन लोकांनी पोलंड लुटण्याचा तडाखा लावला होता. लिथुआनियन लोकांनी १२ व्या चार्लसला उचलून धरले व पोलंडमध्ये दोन तट होऊन एकाने आगस्टसची बाजू घेतली, तर दुसर्‍याने स्टॅनिस्लासची बाजू घेतली. शेवटी ह्या स्टॅनिस्लासला १७०४ मध्ये गादीवर बसविण्यात आले. इकडे आगस्टसने एक अगदी नीचपणाचा घाट घातला. तो असा की चारहि गरुडचिन्हांकित राजांनी (उ. जर्मनी, पोलंड) पोलंडच्या साम्राज्यावर चैन मारावी. परंतु १७३३ मध्ये आगस्टस मेल्यामुळे हा घाट सिद्धीस गेला नाही. स्टॅनिस्लास हा पुन्हां १७३३ मध्ये राजा निवडला गेला परंतु लिथुआनियन लोकांस ही निवड पसंत न पडून त्यांनी रशियाची मदत घेऊन आगस्टस (तिसरा) यास गादीवर बसविले.

याच्या कारकीर्दीत कौंट हेनरिच ब्रुहल याच्या साहाय्याने झारटोरिस्की घराणे फार नांवालौकिकास चढले. याच्या मनात “लिबरम व्हेटो” (म्हणजे प्रत्येक सभासदास कोणत्याहि मसुद्यास–जर तो त्याला नापसंत असेल तर– हाणून पाडण्याचा अधिकार असे. त्याने `मला हा मसुदा नको’ म्हटले म्हणजे बिल नापास होई!) ची घातकी आणि वाईट चाल दंब करावयाची होती. पण पोलंडमधील लोक त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास तयार नव्हते.

यावेळी पोलंडमध्ये सर्वत्र अव्यवस्था माजली होती. कोणी रशियाला पोलंडमध्ये बोलावीत होते. दुसरी कॅथेराइन आणि दुसरा फ्रेडरिक यांनी असे ठरविले की, पोलंडमधील सांप्रतची स्थिति ही अशीच चालू ठेवली पाहिजे व म्हणून त्यांनी स्टॅनिस्लास पॉनि अ‍ॅटोस्की यास १७६४ साली राजा केले. हा दुसरा स्टॅनिस्लास झाटोरिस्कीचा भाचा असल्यामुळे त्याच्या हाती सर्व सत्ता आली. त्याने बर्‍याच चांगल्या सुधारणा घडवून आणल्या. पुढे रेपनिनने डिसेंटर्स म्हणजे रोमन कॅथॉलिक पंथापासून फटकून राहणारे लोक यांच्याकरिता एक मसुदा आणला. हा मसुदा अर्थात सर्वांस अप्रिय असाच होता. परंतु मूळ आणण्याचा हेतू एवढाच की यायोगे तरी झारटोरिस्कच्या सुधारणा हाणून पाडल्या जाव्यात. आणि हा रेपनीनचा उद्देश सफलहि झाला. जिकडे तिकडे असंतोष माजला व शेवटी रशियाच्या कॅथेराइनकडे पोलंडात पुन्हां नवीन राज्यपद्धति निर्माण करण्याकरिता विनंति करण्यात आली. हा विनंतीअर्ज खिशात टाकून पोलंडची राज्यपद्धषत आपल्या मताप्रमाणे सुरू करण्याकरिता रेपनिन हा बार्सा येथे आला. परंतु सभासदमंडळीनी रेपनिन यास मज्जाव केल्यामुळे रेपनिनने आपला शिरकाव सैन्याच्या मदतीने करून “लिबरम व्हेटो” व इतर दुसर्‍या जुन्या अनिष्ट चाली जबरदस्तीने पास करवून घेतल्या व “डिसेंटर्से” विरुद्ध काढलेले फर्मान रद्द करण्यात आले.

पोलंडच्या वाटण्या (१७७२-१८१३):- या जबरदस्तीमुळे कॅथॉलिकपंथीय देशभत्तचंनी `कॉनफिडरेशन ऑफ वार’ नांवाचा एक संघ निर्माण केला (१७६८). या कानफिडरेटचा पक्ष घेऊन टर्कीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. याच वेळी ऑस्ट्रिया व प्रशिया यांनीहि पोलंड राष्ट्राचे लचके तोडून आपला देह पुष्ट करण्यास ही संधि चांगली आहे असे ठरविले आणि पोलंडच्या वाटणीबद्दल स. १७०२ मध्ये एक तह करून त्यांनी आपापसात पोलंडचा जवळ जवळ १/४ मुलुख वांटून घेतला आणि या सर्व मुलुखाबद्दल त्यांनी पोलंडला उत्तम राज्यव्यवस्था दिली. परंतु `लिबरम व्हेटो’ सारख्या राष्ट्रविघातक चाली मुद्दाम ठेवण्याची त्यांनी काळजी घेतलीच. सर्व राज्यसूत्रे ३६ सभासद, १८ सीनेटर्स व १८ डेप्युटींच्या एका कायमच्या सभामंडळाच्या हाती देण्यांत आली. राजाची सत्ता बरीच कमी करण्यात आली. याप्रमाणे या पहिल्या वाटणीने पोलंडमधील ताज्या दमाच्या लोकांत एक देशाभिमानाची लाट उसळली. १७८७ साली रशिया आणि ऑस्ट्रिया यांनी टर्कीशी लढाई केली. हे पाहून प्रशियाने रशियाचा संबंध तोडून टाकण्यास पोलंडला भर दिली.

स. १७८८ मध्ये “चार वर्षांची डायट” भरविण्यात आली. तिचे पुढारी फार कर्तृत्त्ववान आणि नीतिमान होते. त्यांनी कायमचे सभामंडळ काढून टाकले व राजसत्ता वाढविली. सैन्याची संख्या ६५००० केली, पश्चिम यूरोपशी प्रत्यक्ष व्यवहार सुरू केला, रशियाची मैत्री झिडकारून दिली व पोलंडचे व प्रशियाचे सख्य जमवून आणले. परंतु ही बाह्य मदत अंतर्गत अराजकतेला काही आळा घालू शकेना. शेवटी मोठ्या शिताफीने एकदांची राजव्यवस्था ठरविण्यात आली.

स. १७९१ च्या क्रांतीने पोलंडमधील वंशपरंपरेने चालणारी राजसत्ता स्थापण्यात आली. “लिबेरम व्हेटो” व इतर दुसरे व्यत्यय आणणारे कायदे काढून टाकण्यात आले, शहरांना बरेच हक्क देण्यात आले. लोकांतील वर्गभेद मोडण्याचा प्रयत्‍न करण्यांत आला, खालच्या हलक्या लोकांची स्थिति सुधारण्यात आली. धार्मिक मोकळीक सर्वांस देण्यात आली आणि प्रत्येक नागरिकास कायद्याच्या कोर्टात समान हक्क मिळाला. याबदद्दल दुसर्‍या फ्रेडरिक विल्यमने स्टॅनिस्लासचे अभिनंदन केले. परंतु ही सुव्यवस्था कांही बडया पोलिश गृहस्थांस मानवली नाही. त्यांनी रशियाकडे धांव घेतली व १७९२ मध्ये काही थोड्या लोकांनी स. १७९१ ची राज्यघटना जुलमाची आहे असा पुकारा केला व हे निमित्त पुरेसे होऊन रशियाने पोलंडशी लढाई पुकारली. अखेर पोलंडास मागे घेणे भाग पडले व स. १७९१ ची नूतन राज्यघटना झुगारून देण्यात आली व १७९३ मध्ये पोलंड देशाची दुसर्‍यांदा वाटणी झाली. या वाटणीत रशियाला लिव्होनियापासून माल्डेव्हियापर्यंतचा पूर्वेकडील मुलूख मिळाला. प्रशियाने थॉर्न आणि डाँन्झिग व डोब्रझिन, कुजाविया व ग्रेटपोलंडचा बराच भाग गिळंकृत केला. याप्रमाणे आता पोलंड देश मूळच्या १/३ हि शिल्लक राहिला नाही.

आता पोलिश राष्ट्राचे केंद्र लिपझिक हे करण्यात आले. या ठिकाणी पोलिश राष्ट्रभक्त इग्नॅटी पोटोकी, कोलोन्टांज, कोशुइस्को व इतर राष्ट्रहितचिंतक जमले, लौकरच पोलंडमध्ये बंड झाले. रशियाचा पुष्कळ ठिकाणी पराभव झाला. पूर्वीच्या ३/४ प्रांत मिळविण्यात आले व वार्सा व्हिल्ना यांचे पारतंत्र्य विमोचन करण्यात आले. कोशिउस्को याला पोलंड देशाचा शास्ता नेमण्यात आले. परंतु पुढे पोल लोकांतच आपापसात भांडणे लागली व शेवटी ऑस्ट्रिया, रशिया व प्रशिया या त्रिकूटाने सर्व पोलंडचे राज्य गिळंकृत केले.

या पोलंडच्या तिसर्‍या वाटणीमुळे चिडून गेलेले पोल राष्ट्रभक्त नेपोलियनच्या सैन्यात भरती होऊन प्रशिया, रशिया आणि ऑस्ट्रिया यांच्याबरोबर १० वर्षे लढत होते.

१८१५-१८६३:- स. १८१५ च्या व्हिएन्नाच्या काँग्रेसने क्रॅको शहरास स्वातंत्र्य दिले व बाकीचे प्रांत पूर्वीप्रमाणे रशिया, ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्याकडे राहू दिले.

रशियाचा बादशहा अलेक्झांडर यास स्वातंत्र्याची चाड असल्यामुळे त्याने स. १८१५ मध्ये पोलंडला नवीन राज्यव्यवस्था दिली. तो स्वत: पोलंडचा राजा झाला व पोलंडला पोल राजवंशीय लेफ्टनंट नेमण्यात येऊ लागला. रोमन कॅथोलिक पंथ हा या देशाचा धर्म समजण्यात आला व दुसर्‍या धर्मांस स्वातंत्र्य देण्यात आले. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य राखण्यात येऊन व्यक्तिस्वातंत्र्य, व पोल भाषा ही राखण्यात आली. येथे एक राष्ट्रमंडळ स्थापण्यात आले. डायटचे सीनेट वे प्रतिनिधिसभा असे दोन भाग केले व पोलंडचे निशाण कायम ठेवण्यात आले.

स. १८२६ मध्ये कान्स्टंटाईन (अलेक्झांडरचा भाऊ) हा लेफ्टनंट झाला. पोलंडमधील देशभक्तमंडळाचे दोन भाग होते. एक पांढरा किंवा मवाळ व दुसरा लाला किंवा जहाल.

स. १८३० मधील फ्रेंच राज्यक्रांतीनंतर पोलांनी बंड केले. परंतु शिस्तीचा अभाव, अंदाधुंदी, अव्यवस्था इत्यादि दुर्गुणामुळे त्यांना हार खावी लागली. यामुळे हा पोलंडचा भाग आता रशियाचा एक देश बनला. १८४८ मध्ये क्रॅको शहर ऑस्ट्रियाने आपल्या राज्यास जोडले. वार्सा व व्हिल्नाची पोलिश विश्वविद्यालये बंद पाडून पोलिश मुलांना सेंटपीटर्सबर्ग व कीव्ह येथे विद्याभ्यासाप्रीत्यर्थ जाणे भाग झाले. रशियन भाषा ही पोलंडात दरबारी भाषा करण्यात आली. यामुळे पोल लोक अगदी गाय बनले. पण यामुळे राष्ट्रीय अभिमान नष्ट न होता प्रदीप्त मात्र झाला. स. १८६३ मध्ये पोलंडच्या लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शेवटचा प्रयत्‍न केला.

याप्रसंगी पोल लोकांनी नि:शस्त्रप्रतिकाराचे हत्यार उपसले. याचा प्रतिकार रशिया जेव्हां जुलमाने करू लागला तेव्हां साहजिकच यूरोपला या जुलुमाची चीड येई. स. १८६१ मध्ये वार्सा येथे लोकांनी जागा सोडून निघून जाण्याचे नाकारल्यामुळे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गुप्तकट, चिथावण्या, राजकीय खून यांच्यायोगाने स. १८६३ त बंड झाले. परंतु त्यात कांही दम नव्हता.

यामुळे निकोलसने पोल राष्ट्रभक्तांचा नायनाट करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु पोलंडमधील आणि लिथुआनियामधील जनतेस पूर्ण स्वातंत्र्य दिले. याप्रमाणे पोलंडच्या राष्ट्रीय इतिहासाचा शेवट १८६३ सालच्या बंडाने झाला.

रशियन पोलंड (१८६३ ते १९२०):- १८६३ सालचे पोलिश बंड चिरडून टाकल्यावर रशियन सरकारने पोलिश लोकांवर आपली अनियंत्रिक सत्ता प्रस्थापित केली. पोलंडवर लष्करी गव्हर्नर नेमून रशियाविरुद्ध चाललेल्या सर्व चळवळीची पाळेंमुळे खणून काढण्याची पूर्ण सत्ता या गव्हर्नरला देण्यात आली. रशियन ही दरबार-भाषा करण्यांत आली व पोलंडमधील प्राथमिक शाळांमध्ये रशियन भाषा सक्तीने शिकवण्यात येऊ लागली. सर्व खात्यांतील अधिकाराच्या जागा रशियन लोकांना देण्यात आल्या. पोलंडमधील लोकांचा धर्म रोमन कॅथॉलिक होता. त्यावरहि रशियन अधिकार्‍यांनी आपली नजर ठेवण्यास सुरवात केली. धार्मिक बाबीसाठी देण्यात आलेल्या स्थावर मिळकती जप्त करण्यात आल्या व मठांची विल्हेवाट लावण्यात आली. हा धार्मिक छळ स. १९०५ पर्यंत चालू होता. पण त्यानंतर धर्मस्वातंत्र्याचे तत्त्व रशियन सरकारने मान्य केले.

पोलंडच्या रूसीकरणार्थ रशियाने जे प्रयत्‍न केले त्यात मुख्यत: पोलंडमधील इतिहासप्रसिद्ध घराण्यांचे वर्चस्व कमी करणे शेतकरीवर्गाला चढेल करून ठेवणे हे होत. या प्रयत्‍नांच्या मुळाशी जमीनदार व रयत यांच्यामध्ये स्पर्धा सुरू करणे हे तत्त्व होते. पण सुदैवाने हा प्रयत्‍न सिद्धिस गेला नाही. तथापि शेतकरीवर्गाला चढेल करून ठेवण्याचा पोलंडमधील द्दष्टीने जो फायदा झाला तो हा की त्यायोगाने पोलंडमधील मध्यम वर्गाची जी उणीव भासत असे ती नाहीशी होऊन या शेतकरीवर्गांमधून उत्तम मध्यम वर्ग उदयास आला व या वर्गाने औद्योगिक चळवळ हाती घेऊन ती यशस्वी केली. त्याचप्रमाणे रशियन सैन्यांतून पोलांचे उच्चाटन करण्यात आल्यामुळे सैन्यांतून निघालेल्या पोलांपैकी महत्त्वाकांक्षी व कर्तृत्त्ववान अशा पोलांनीहि या औद्योगिक चळवळीला हातभार लावल्यामुळे या चळवळीला चांगला रंग चढला. या चळवळीला प्रथम प्रथम राजकीय स्वरूप नवहते तरी पुढे तिला राजकीय स्वरूप प्राप्त होऊन त्यातून सोशियालिस्ट व डेमोक्रॅटिक संस्था निर्माण झाल्या. या संस्थांपैकी नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी ही प्रमुख संस्था होय. या संस्थेने पोलंडच्या रूसीकरणार्थ चाललेल्या प्रयत्‍नांच्या विरुद्ध चळवळ केली. रूसो-जपानी युद्धानंतर खुद्द रशियन डयूमामध्येहि या पक्षाचे अतिशय वर्चस्व होते. त्याचप्रमाणे रशियाच्या बाहेर नूतन स्लाव्ह पक्षाने जी चळवळ सुरू केली होती तीतील एक हेतु रशिया व पोलंड यांच्यामध्ये सख्य घडवून आणण्याचा होता. पण ऑस्ट्रियन पार्लमेंटमधील पोलिश पक्षाने ऑस्ट्रियाला बोस्निया व हर्झेगोव्हिना हे प्रांत जोडण्यात यावे अशी चळवळ सुरू केल्याने वरील दोन्ही पक्षांचे बेत फिसकटले व त्यामुळे पोलंडला स्वातंत्र्य मिळण्याचे दिवस लांबणीवर पडले.

जर्मन पोलंड:- रशियन पोलंडप्रमाणेच बिस्मार्कच्या कारकीर्दीत पोलंडच्या जर्मनीकरणासाठी प्रयत्‍न करण्यात आले. स्वत: बिस्मार्कने या कामी बराच पुढाकार घेतला. पोलंडमधील कॅथॉलिक लोकांची धार्मिक वतने जप्त करून शिक्षणसंस्थातून पोल लोकांच्या मातृभाषेचे उच्चाटण करून, व इतर अनेक युक्त्याप्रयुक्त्यांनी पोलंडमधील राष्ट्रीय चळवळ हाणून पाडण्याच्या बिस्मार्कने प्रयत्‍न केला. पोलंडमधील बरेचसे मजूर जर्मनीत धंद्यासाठी येत असत. त्यांना जर्मनीत काम मिळू नये अशीहि खटपट बिस्मार्कने करून पहिली पण तीत यश येण्याची चिन्हे देसेनात, तेव्हां त्याने पोलंडमध्ये मोठमोठ्या जागा खरेदी करून जर्मन वसाहत स्थापण्याचा उद्योग आरंभिला. १९०८ साली तर पोलिश भाषेतून जाहीर सभेत व्याख्याने देण्याची देखील बंदी करण्यात आली. पण या जर्मन लोकांच्याच तालमीत शिकून तयार झालेल्या पोलांनी बिस्मार्कचे हे सर्व प्रयत्‍न निष्फळ करून टाकले. पोल लोकांनी आपल्यामध्ये एकी करून निरनिराळ्या शैक्षणिक, औद्योगिक संस्थांकडून जर्मनीच्या या राष्ट्रविषयक प्रयत्‍नाला मोठ्या नेटाने तोंड दिले. जर्मन मालावर त्यांनी बहिष्कार टाकला व पोलिश व्यापाराला उत्तेजन दिले. त्यामुळे जर्मन लोकांची डाळ पोलंडमध्ये फारशी शिजली नाही.

ऑस्ट्रियन पोलंड:- पण जर्मन अगर रशियन पोलंडमधील पोल लोकांच्या स्थितीपेक्षा ऑस्ट्रियन पोलंडमधील पोलांची स्थिति थोडी फार बरी होती. ऑस्ट्रियामध्ये पोल लोकांचा फरसा छळ होत नव्हता. पोलिश क्लवाचे ऑस्ट्रियाच्या राजकारणात बरेच वर्चस्व होते. या वर्चस्वाचा फायदा घेऊन पोलिश क्लबांनी गॅलिशियाला बरेच हक्क संपादन करून घेतले. गॅलिशियासाठी स्वतंत्र प्रधान नेमण्यात आला. गॅलिशियांतील पोल लोकांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षणमंडल निर्माण करण्यात आले. पोलिश भाषेचा गॅलिशियांतील कचेर्‍यांमध्ये सरसहा उपयोग करण्यात येऊ लागला. क्रॅकोच्या युनिव्हर्सिटीमध्ये पोलांशिवाय दुसरे कोणतेहि शिक्षक न ठेवण्याचे ठरविण्यात आले. अशा रीतीने ऑस्ट्रियामधील पोलिश क्लबाने गॅलिशियांतील पोल लोकांस पुष्कळच स्वातंत्र्य मिळवून दिले. तथापि गॅलिशियांत रूथेनियम व ज्यू लोकांचेहि प्राबल्य होते व ते नाहीसे झाल्याशिवाय पोल लोकांचे वर्चस्व अबाधित राहणे शक्य नव्हते. त्यामुळे पोल लोकांनी या ज्यू व रुथेनियन लोकांना त्रास देण्यास सुरवात केली. रूथेनियन लोकांनीहि आपली संघटना करून आपले स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याची चळवळ सुरू केली. या चळवळीला ऑस्ट्रियन सरकार विरुद्ध नवहते. त्यामुळे रूथेनियनांना बरेच उत्तेजन मिळाल्यासारखे झाले. अशी स्थिति पहाताच गॅलिशियांतील पोल लोकांनी रशियाशी संधान बांधून रूथेनियन लोकांना रशियाच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्‍न केला. ऑस्ट्रियाचे व रशियाचे स. १९१० च्या सुमारास बिनसले असल्यामुळे ऑस्ट्रियनांनी या रूथेनियनांना मदत करण्यास सुरवात केली. त्यामुळे गॅलिशियांतील पोल लोक ऑस्ट्रियन सरकारकडे साशंक द्दष्टीने पाहू लागले. पुढे थोडक्याच दिवसांत ऑस्ट्रियाच्या आर्चडयूकचा खून झाला. या गोष्टीबद्दल पोलांनी दु:ख व्यक्त न करता उलट समाधान व्यक्त केले कारण हा आर्चडयूक रूथेनियन लोकांना अनुकूल होता. त्यामुळे ऑस्ट्रियन सरकारमध्ये व गॅलिशियांतील पोल लोकांमध्ये बेबनाव उत्पन्न झाला.

महायुद्ध सुरू झाले त्यावेळी पोलंडने कोणाच्या बाजूने युद्धांत भाग ध्यावा याबद्दल सर्व पोलंडपुढे प्रश्न उभा राहिला. खुद्द पोलंडमधील लोकांमध्ये काहीजण रशियाच्या बाजूने तर काहीजण जर्मनी व ऑस्ट्रियाच्या बाजूने पोलंडने युद्धांत पडावे या मताचे होते. एकीकडे ऑस्ट्रिया व जर्मनी व दुसरीकडे रशिया, पोलंडला स्वातंत्र्य देण्याचे आमिष दाखवीत होते. ऑस्ट्रिया व जर्मनीने पोलंडला मर्यादित स्वातंत्र्य देखील स. १९१६ मध्ये देऊन टाकले. पण ते मर्यादित असल्यामुळे पोलंडला त्यापासून फारसा फायदा झाला नाही. तथापि पोल लोकांचा एक प्रसिद्ध पुढारी पिल्सुडस्की याने या संधीचा फायदा घेऊन पोलंडमध्ये एक मोठे लष्कर उभारण्याचा प्रयत्‍न केला; व त्यात त्याला यशहि आले. या लष्कराच्या जोरावर पिल्सुडस्कीने पोलंडची सर्व सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. लगेच त्याने पॅडेरवस्कीच्या आधिपत्याखाली एक मंत्रिमंडळ बनविले. पण पुढे थोडक्याच दिवसात पॅडेरवस्कीला आपल्या जागेचा राजीनामा देणे भाग पडले. स. १९१९ मध्ये पिल्सुडस्कीला चेकोस्लाव्हाकियाशी व युक्रेनियाशी युद्ध करणे भाग पडले. तथापि त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. याहिपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिल्सुडस्कीचे बोल्शेविक लोकांशी झालेले युद्ध होय. या युद्धांत बोल्शेव्हिकांना हार खावी लागून पोलंडशी पोलंडने घातलेल्या अटींवर तह करण्यास बोल्शेव्हिक तयार झाले. तथापि त्यांनी आपली मते प्रसार करण्याचे काम चालू ठेवलेच होते. त्यामुळे पोलंडने पुन्हां बोल्शेव्हिकांचा मोड करण्यासाठी कंबर बांधली. पुष्कळ ठिकाणी पोल सैन्य व बोल्शेव्हिक सैन्य यांमध्ये चकमकी झडल्या व शेवटी बर्‍याच काळानंतर पोलंड व बोल्शेव्हिक यांच्यामध्ये तह घडून आला. नंतर पुन्हां पोलंड व लिथुआनियन यांमध्ये कलह उपस्थित होऊन लढईची चिन्हे दिसू लागली तथापि ती लवकरच मावळली.

अशा रीतीने अनेक राजकारणे करून व अलोट स्वार्थत्यागानंतर पोलंडने आपले स्वातंत्र्य प्राप्त करुन घेतले. पोलंडच्या सरहद्दी निश्चित करण्यासाठी राष्ट्रसंघाने कांवनच्या अध्यक्षत्वाखाली एक कमिशन नेमले. या कमिशनने जो निकाल दिला त्यात बरेच पेच्रफार होऊन शेवटी पोलंडच्या सरहद्दी कशाबशा निश्चित झाल्या. हल्ली पोलंडच्या सरहद्दी पुढीलप्रमाणे आहेत– पोलंडच्या दक्षिणेस गॅलिशिया, पूर्वेस लेटव्हीयाच्या सरहद्दीपासून डिस्ना, डोक्झित्सि, मिन्स, पिन्स्क; ऑस्ट्राग या गांवाच्या सरहद्दीवरून झेब्रुझ नदीच्या किनार्‍याने नीस्टरपर्यंत, ईशान्येस लिथुआनियाची राजधानी जी व्हिल्ना तेथपर्यंत; या इशान्येकडील सरहद्दीबद्दल मात्र अद्यापि वाद चालू आहे.

पोलंडमध्यें ज्यू लोकांची बरीच वस्ती आहे. स्थूलमानानें पोलंडच्या लोकसंख्येच्या १/७ लोकसंख्या ज्यू लोकांची आहे. सुमारें स. १९०० सालानंतर या ज्यू लोकांनीं पोलंडच्या स्वातंत्र्याच्या चळवळीविरूद्ध आपली चळवळ सुरू केली. व महायुद्धानंतरहि ती अद्यापि चालू होती. अर्थात पोलंडला स्वातंत्रय मिळाल्यामुळें ज्यू लेकांबद्दल पोलंडचें धोरण कसें राहील व तें पोलंडनें कसें ठेवावें यासंबंधी बरेच तर्कवितर्क चालू आहेत. खुद्द पोलिश सरकारनें आपलें धोरण अद्यापिहि जाहीर केलेलें नाहीं.

१९२१ ते १९२५:- स. १९२२ डिसंबरच्या निवडणुकींत नरूटोबिझ नांवाचा लिथुनियन इसम ज्यू लोकांच्या मदतीनें प्रेसिडेंट निवडून आला. पण तो पोलंडांतील कोणत्याहि राजकीय पक्षाला प्रिय नसल्यामुळें प्रधानंमडळानें राजीनामा दिला व तो स्वतः वार्सा येथें ठार मारला गेला. १९२४ सालच्या आरंभापासून एम्.विटॉस (मुख्य प्रधान), एम्. डमोवस्की (परराष्ट्र मंत्री)  व एम्. कोर्फटी (व्हाइस प्रेसिडेंट) या तीन इसमांच्या हातीं सर्व सत्ता गेली. १९२५ च्या आरंभीं पोलिस मॉनर्किस्ट पक्षानें उचल केली पण तिला यश येणें शक्य नाहीं. महायुद्धकाळांत जर्मनी व ऑस्ट्रिया यांनींहि पोलंडांत मॉनर्किस्ट पक्षास पाठिंबा दिला होता. १९२३ ऑगस्टमध्यें सरकारनें प्रॉपर्टी टॅक्स (संपत्तीवरील कर) बसवून त्याचें उत्पन्न आरोग्य व पोलंड सरकाची सांपत्तिक स्थिति सुधारण्याकडे खर्च करण्याचें ठरविलें. १९२४ च्या मार्चमध्यें एम्. ग्रॅबस्की या मुख्य प्रधानानें सोन्याचें नाणें सुरू करून चलनपद्धतीला स्थैर्य आणलें, सरकारचा खर्च कमी केला, मजूरवर्गाची स्थिती सुधारली, ८ तासांचा दिवस असें कामाचें प्रमाण ठरविलें. १९२५ च्य मेमध्यें ३ कोटी लोकसंख्यपैकीं फक्त १,५०,५००० इसम बेकार होते. १९२४ सालीं रेल्वेचे दोन मुख्ये रस्ते बांधण्याचें ठरून त्याकरितां ९ कोटी रूबल (सोन्याचें नाणें)  खर्चण्याचें ठरलें. हें काम सरकारी देखरेखीखालीं सहा वर्षानीं पुरे व्हावयाचें आहे. पोलंडांत सर्वत्र शिक्षण मोफत आहे, व प्राथमिक शिक्षण सक्तीचें असून प्राथमिक शाळांत विद्यार्थी १९१४ सालीं, ४,३०,००० होते ते १९२५ सालीं १२,००,००० झाले आणि दुय्यम शिक्षणाच्या शाळेंत ८० हजारांचे ११७ हजार झाले आहेत. सध्यां पांच युनिव्हर्सिटया असून त्यांत २०,००० विद्यार्थी शिकत आहेत, व त्यांपैकीं, बरेच बाहेर काम करून पोट भरणारे आहेत. त्यांत एकपंचमांश विद्यार्थिनी आहेत. शिक्षकांकरितां १७५ ट्रेनिंग कॉलेंजें असून ४७६ टेक्निकल स्कुलें आहेत. सैन्याची संख्या २,५०,००० आहे. ताप, देवी वगैरे सांथीच्या रोगांचा उपद्रव कमी करण्याकरितां ३५ लक्ष पौंड पोलंड सरकारनें खर्च केलें. पोलिस सरहद्द व आयातनिर्गताच्या जकाती याबद्दल तंटे रशिया, जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया या देशांबरोबर चालू आहेत.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .