प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
           
पोर्तुगीज वाङ्‌मय, प्रास्ताविक.– प्राचीन काळापासून पोर्तुगालमध्ये चांगल्या प्रकारचे वाङ्‌मय निर्माण होत होते. त्याजवळच्या स्पेनमधील वाङ्‌मयापेक्षा ग्रंथसंख्येच्या द्दष्टीने ते जरी कदाचित कमी भरत असले तरी गुणद्दष्टया स्पेनमधील वाङ्‌मयाच्या तोडीचे पोर्तुगीज वाङ्‌मय होते असे बिनधोक म्हणता येते. प्राचीन काळची पोर्तुगीज भाषेमधील जी `कॉन्सिओनीरॉस’या नांवाने प्रसिद्ध असलेली प्रणयगीते आहेत, ती पाहिली असता वरील म्हणण्याची सत्यता पटेल. कादंबर्‍यांच्या बाबतीत, अगर प्रवासवर्णनात्मक ग्रंथांच्याहि बाबतीत पोर्तुगालने आघाडी मारलेली दिसून येते, नाटयवाङ्‌मय मात्र पोर्तुगालमध्ये व्हावे तितक्या उच्च दर्जाचे निर्माण झाले नाही.

पोर्तुगीज वाङ्‌मयाचे विहंगमद्दष्टीने अवलोकन केल्यास एक गोष्ट प्रामुख्याने नजरेस आल्याशिवाय रहात नाही व ती म्हणजे पोर्तुगालमधील वाङ्‌मयविषयक चळवळी; या परकीय राष्ट्रांतील वाङ्‌मयविषयात्मक चळवळीचे अनुकरण होय. पोर्तुगीज भाषेतील स्वतंत्र वाङ्‌मय निर्माण झाले नाही तथापि पोर्तुगीज भाषेतील वाङ्‌मयावर परराष्ट्रीय वाङ्‌मयाची बरीच छाप पडलेली दिसते. पोर्तुगालमधील पहिली वाङ्‌मयविषयक चळवळ, प्रॉव्हेन्समधील वाङ्‌मयविषयक चळवळीपासून निघाली व त्या काळच्या वाङ्‌मयावर प्राव्हेन्समधील वाङ्‌मयाच्या वळणाची छाप पडलेली नजरेस येते. १५ व्या शतकातील पोर्तुगीज वाङ्‌मयावर कॅस्टीलन वाङ्‌मयाचा ठसा उमटलेला दिसतो. १६ व्या शतकातील वाङ्‌मयाला इटालियन वाङ्‌मयाची दिशा लागलेली आढळते. १७ व १८ व्या शतकात अनुक्रमे स्पेन, फ्रान्स व इंग्लंड, यांमधील वाङ्‌मयाची छाप पोर्तुगीज वाङ्‌मयावर पडलेली दिसते तर १९ व्या शतकातील पोर्तुगीज वाङ्‌मयाला इंग्लंड, जर्मनी व फ्रान्स यांमधील वाङ्‌मयाचे वळण लागलेले आढळून येते.

प्राचीन काळ.– ख्रिस्ती शतकाच्या पहिल्या शतकापासूनच पोर्तुगालमध्ये बरेच वाङ्‌मय निर्माण होत होते. पण त्यापैकी आज काहीच उपलब्ध नाही. १२ व्या शतकापूर्वीपासून पोर्तुगालमध्ये भावगीतांची अकल्पित वाढ झालेली होती. ही भावगीते रचणार्‍या कवीमध्ये डॉ. गिलसांचेरू हा पहिला होय. याचा `कँटर डे अमीगो’या नांवाखाली बराच काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. यांतील भावगीते पहिल्या सांचेने आपल्या वेश्येला उद्देशून लिहिली आहेत असे दाखविले आहे. कांहीच्या मते सांचो हाच या काव्यसंग्रहाचा कर्ता होय. स. १२४८ पासून म्हणजे तिसरा आल्फान्सो हा राज्यावर बसल्यानंतर पोर्तुगालमध्ये बरेच वाङ्‌मय निर्माण झाले. त्या वेळच्या कवितांचा कॅन्सीओनीरो डि अयूड या ग्रंथात संग्रह करण्यात आला आहे. आल्फान्सोचा मुलगा दिनिझ याने आपल्या भोंवती तत्कालीन उत्कृष्ट कवींचा घोळका जमविला होता. दिनिझ हा स्वत:हि विद्वान असल्याने व त्याला कविता करण्याचा नाद असल्याने त्याने पुष्कळच कविता लिहिल्या. याशिवाय त्याच्या पदरच्या कवीपैकी डी. आल्फान्सो, मांचेरू व डी पेद्रो यांच्याहि कविता बर्‍यापैकी आहेत. सांचेरू याची कविता प्रमविषयक आहे व ती उदात्तहि आहे. पण पेद्रो याची प्रेमविषयक कविता, हीन दर्जाची असून त्यांतील प्रणयकल्पनाहि उदात्त नाही. स्वत: दिनिझ याने प्रेमविषयक बरीच गीते रचिली आहेत. पण ती ठरीव वळणाची आहेत. त्यात विचारांचे नाविन्य दिसून येत नाही. प्रणयगीतांशिवाय त्याने इतर विषयांवर जी कविता केली आहे, ती चांगली आहे. या काळच्या कवींनी वीर-काव्ये लिहिण्याचा प्रयत्‍न केलेला आढळत नाही. दिनिझच्या मरणानंतर चवथा आल्फान्सो हा गादीवर बसला. त्याच्या कारकीर्दीत पोर्तुगीज वाङ्‌मय फारसे निर्माण झाले नाही.

पोर्तुगालमध्ये महाकाव्ये लिहिण्याला उशीराने आरंभ झाला. ख्रिस्ती लोकांनी एकत्र जमून मूर लोकांचा १३४० साली सॅलाडो येथे जो पराभव केला त्या प्रसंगावर गिरालेस याने जे महाकाव्य रचिले ते पोर्तुगीज भाषेतील पहिले महाकाव्य होय असे म्हणावयास हरकत नाही.

महाकाव्याप्रमाणेच गद्य वाङ्‌मय लिहिण्याची प्रवृत्ति पोर्तुगीज लोकांत १४ व्या शतकात निर्माण झाली. या कालच्या गद्य वाङ्‌मयात साधूंची चरित्रे, बखरी इत्यादिकांचा अंतर्भाव होतो. गद्यग्रंथापैकी महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे क्रॉनिका ब्रेव्हे डो आर्चिव्हो नाशिनल, क्रॉनिकाज डो आल्गाव्हे, लिव्हारस डॉस लिनहागेन्स हे होत. रोमानिया नांवाखाली तत्कालीन गद्यवाङ्‌मयसंग्रह प्रसिद्ध आहे; त्यामध्ये विदा डे यूफ्रोसिना, विदा डे मारिया इजिप्शिया, विदा डे सँवटो अमारो, विदा डे सांटो इलॉय इत्यादि ग्रंथांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याशिवाय इतर गद्यग्रंथहि बरेच आढळून येतात.

१५ वे शतक:- पहिल्या जॉन राजाच्या कारकीर्दीत राजदरबारी अनेक ग्रंथकार एकत्र झाले होते. स्वत: जॉन हाहि ग्रंथकार असून त्याचा `लिव्हो डि मोंटेरिया’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. एडवर्ड राजाने अनेक जुन्या पुस्तकांचा संग्रह केला व त्याने स्वत: `लियल कोमसिल्हेरो’ हा एन्सिनान्सा डि बेम कॅव्हल्गार टोदा सेला हा अश्वविद्येवरील ग्रंथहि प्रसिद्ध आहे. एडवर्डचा भाऊ डी पेद्रो याने `डा व्हर्च्युओसा बेंफीटोरिया’ हा नीतिपर ग्रंथ लिहिला व वेगेटियस याचा `डि रे मिलिटारी’ व सिसरोचा `डि ऑफिसिस’ या ग्रंथाचे पोर्तुगीजमध्ये भाषांतर करविले. १५ व्या शतकात पोर्तुगालमध्ये जे राजे होऊन गेले ते सर्वच विद्यासंपन्न व गुणिजनांचे भोक्ते होते. या शतकात पुष्कळ बखरी लिहिल्या गेल्या, त्यापैकी फेर्नाओ लोपेस हा अतिशय प्रसिद्ध बखरकार होय. याने पोर्तुगालचा इतिहास लिहिला व पेद्रो, फर्डिनांड व पहिला जॉन यांची चरित्रे लिहिली आहेत. याची सौदे या इंग्लिश कवीने फार स्तुति केली आहे. गोमेस अझूरारा यानेहि डि पेद्रो डि मेन्झेस, डि दुआर्टे डि मेन्झेस यांची चरित्रे लिहिली आहेत. राय डि पिना याने एडवर्ड व पांचवा आल्फान्सो यांनी चरित्रे लिहिली असून त्यातील भाषा साधी व सुंदर आहे. ऐतिहासिक द्दष्टयाहि या चरित्रांची योग्यता मोठी आहे. बखरी व चरित्रे याप्रमाणे अद्भतवाङ्‌मयहि १५ व्या शतकात बरेच निर्माण झाले. त्यापैकी `एस्टोरिया डो इम्परेडोर वेस्पारी यानो’हा ग्रंथच तेवढा उपलब्ध आहे.

१५ व्या शतकात काव्यवाङ्‌मयहि पुष्कळ निर्माण झाले. डि पेद्रो याचा मुलगा कॉन्स्टेबल हा उत्तम कवि होता. याच्या `सॅटीरा डि फेलिसे ए इनफेलिसे विदा’, `ट्रॅजेडिया डि ला रीना इसाबेल’` `कोप्लास डेल कँटेप्टो डेल मंडो’ इत्यादि कविता फार प्रसिद्ध आहेत. या सर्व कविता कॅस्टीलीयन भाषते आहेत. या काव्यावर स्पॅनिश काव्याची छाप पडलेली दिसते. पांचव्या आल्फान्सो राजाच्या व दुसर्‍या जॉन राजाच्या कारकीर्दीत जी काव्ये निर्माण झाली त्यांचा संग्रह `कॅन्शी ओनीरी गेरल’ या काव्यसंग्रहात केला आहे. यात जवळ जवळ तीनशे कवींच्या कविता आहेत. या कवीमध्ये डि जोआ मॅन्युअल, डि जोआ डि मेनेझेस, डायागो ब्रँडाओ, डू आर्टे डि ब्रिटो, फर्नाओ डा सिल्व्हीरा इत्यादि कवींच्या कविता आहेत. पण या शतकातील काव्यात एक प्रकारचा कृत्रिमपणा आढळून येतो. महाकाव्ये या शतकात निर्माण झालीच नाहीत असे म्हटले तरी चालेल.

नाटय वाङ्‌मय.– पोर्तुगालमधील नाटयाचा जनल गिल विसेंटे हा होय. त्याने प्रथमत: `बार्का डो इनफर्नो’ यासारखी केवळ धार्मिक नाटके लिहिण्यास सुरवात केली पण पुढे या धार्मिक नाटकांतहि विनोदी पात्रे घालण्याचा त्याने प्रघात पाडला. या नाटयाच्या बाबतीत त्याचे अनुकरण बर्‍याच लेखकांनी केले; त्यापैकी अ‍ॅफान्सो अल्वारेझ, अँटोनियो रीबीरो, जेरोनिमो रीबीरो, अँटोनियो प्रियोस्टीस, बाल्थाझार डियॉस सीमाओ मकाडो व कॅमोडान्स हे होत. डियॉस याची औटो ऑफ सेंट अ‍ॅटेक्सिस व औटो ऑफ सेंट कॅथेराइन ही नाटके प्रसिद्ध आहेत. या नाटकांतील भाषा साधी, पण प्रासादिक अशी आहे. मकॅडोची `कॉमेडी ऑफ डियू’ व `एनचँटमेंटस ऑफ आल्फिया’ ही नाटके प्रसिद्ध आहेत. ही स्पॅनिश भाषेत आहेत. पण या सर्व नाटककारात विसेंटेची बरोबरी करणारा नाटककार केमोडान्स हाच होय. याचे अँफीक्ट्रियॉन्स हे नाटक लोकप्रिय आहे. याशिवाय `किंग सेल्युकस’ व `फिलोडेमो’ हीहि नाटके चांगली आहेत. गिल विसेंटी याच्या मरणानंतर नाटयवाङ्‌मयाला दरबारकडून उत्तेजन मिळेनासे झाले व त्यातच धार्मिक जुलमी निर्बंध नाटयवाङ्‌मयावर घालण्यात येऊ लागल्यामुळे नाटयवाङ्‌मयाला ओहोटी लागली.

रेनाइसन्स उर्फ पुनुरुज्जीवन काल:- इटलीमध्ये निर्माण झालेल्या पुनुरुज्जीवनाच्या चळवळीची लाट पोर्तुगालवर येऊन आदळली व त्यामुळे पोर्तुगीज वाङ्‌मयावरहि त्या चळवळीचे परिणाम झाल्याशिवाय राहिले नाहीत. पांचव्या आल्फान्सो राजाने यूस्टस बाल्डिनस यास पोर्तुगालचा इतिहास लॅटिनमध्ये लिहिण्यासाठी मुद्दाम पाचारण केले होते. १६ व्या शतकात इटलीतील पुष्कळ विद्वान गृहस्थ पोर्तुगालमध्ये येऊन राहिले होते व त्यांनी इटलीतील वाङ्‌मयाला लागलेल्या नव्या वळणाबरहुकूम पोर्तुगीज वाङ्‌मय निर्माण करण्यास सुरवात केली. या कामी पोर्तुगीज स्त्रियांनी महत्त्वाचा भाग घेतला होता. लुइसा, अँजेला, पौलाविसेंटे, जोआन्नावझ इत्यादिकांनी मॅनुअल राजाच्या मुलीच्या उदाराश्रयाखाली स्त्रियांचे विद्यापिठ स्थापन केले. लुइसा ही स्वत: उत्तम कवयित्री होती, शिवाय तिला प्राच्य भाषांचे उत्तम ज्ञान होते.

इटलीतील पुनुरुज्जीवनाच्या चळवळीच्या आधारे पोर्तुगीज वाङ्‌मयात क्रांति घडवून आणणार्‍यांमध्ये सा डि मिरांडा हा होय. हा सहा वर्षे इटलीत राहिला होता व त्यामुळे त्याला इटलीतील वाङ्‌मयविषयक चळवळीचे पूर्ण ज्ञान झाले होते. त्यामुळे पोर्तुगालमध्ये आल्याबरोबर अनेक विद्वानांच्या साहाय्याने त्याने इटालियन वाङ्‌मयशाखेची स्थापना केली. काव्यवाङ्‌मयामध्ये सुनीते, स्तोत्रे, पत्रिका. इत्यादि काव्याचे प्रकार आणून त्याने पोर्तुगीज काव्याला नवीनच वळण दिले. रिकाँडिल्ला नामक पोर्तुगीज वृत्तांत त्याने सुधारणा केली. त्याची `सटीरा’ व `एक्लोग्स’ ही फार प्रसिद्ध आहेत. त्याला पुष्कळ अनुयायीवर्ग मिळाला. त्यात अँटोनियो फेरीआरा, डि मॅनुअल, डायगो बर्माडीस, आंड्रे फालकाओ डि रेसेंडे, फ्रे आगस्टिनो, लुइझ डि कॅमोडान्स हे प्रमुख होत. फेरीआराची सुनीते फार सुंदर आहेत. बर्नाडीसचे लिमा हे काव्य त्यातील भावगीतांमुळे फार लोकप्रिय झाले आहे. फ्रे आगस्टिनोची स्तोत्रे ही गूढ व सुंदर आहेत. पण सर्वांवर ताण करणारा व इटालियन शाखा यशस्वी करुन दाखविणारा कवि केमोडान्स हा होय. त्याचे लूसिडास हे काव्य व्हर्जिलच्या काव्याच्या धर्तीवर असून, त्यात ईश्वरविषयक श्रद्धा व देशाभिमान यांची शिकवण आहे. वास्को डि गामाच्या धाडसी प्रवासाच्या प्रसंगावरून हे काव्य लिहिले गेले आहे. हे काव्य प्रसिद्ध होताच त्याची लोकप्रियता तत्काळ प्रस्थापित झाली व त्याची पोर्तुगालच्या प्रमुख राष्ट्रीय काव्यांत गणना होऊ लागली. महाकाव्याप्रमाणेच भावगीते लिहिण्यातहि केमोडान्सचा हातखंडा होता. भावगीतांच्या द्वारांहि गंभीर विचार त्याने प्रकट केलेले आहेत. केमोडान्सचे अनुकरण करणार्‍यांमध्ये जेरोनिमो कोर्टे रीयल याची प्रामुख्याने गणना होते.

सा डि मिरांडाने पोर्तुगीज काव्याला ज्याप्रमाणे इटालियन वळण लावले त्याचप्राणे नाटयकलेत व नाटयवाङ्‌मयातहि त्याने सुधारणा घडवून आणिली. त्याच्यापूर्वी धार्मिक नाटके निर्माण करण्याची जी प्रबळ वृत्ति दिसून येत होती ती नाहीशी करून सामाजिक, राष्ट्रीय, या प्रकारची नाटके लिहिण्याची पद्धत त्याने सुरू केली. शिवाय पूर्वीची नाटके केवळ पद्यमय असत. त्याबदली रोमन व ग्रीक धर्तीवर नाटकात गद्यभाषा घालण्यात येऊ लागली. तथापि मिरांडाने ही जी नाटयविषयक सुधारणा घडवून आणली ती इटालियन नाटयाची केवळ प्रतिकृति असल्याने ती विशेषशी लोकप्रिय झाली नाही. मिरांडालाहि नाटककार या नात्याने मागे टाकणारा लेखक अँटोनोयो फेरॉय हा होय. याची ब्रिस्टो, ओ सीयोसो व इग्नेस डी कॅस्ट्रो ही नाटके प्रसिद्ध आहेत.

१६ व्या शतकातील गद्य बहुतेक ऐतिहासिक स्वरूपाचे होते. या शतकात पोर्तुगालमध्ये पुष्कळ संशोधक निर्माण झाल्यामुळे त्यांच्या संशोधनाच्या वर्णनपर ग्रंथ लिहिले जावेत यात आश्चर्य नाही. पोर्तुगीज संशोधकांनी पौरस्त्य देशासंबंधी जे शोध लावले त्यासंबंधी जो आडे वॅरॉस याने `आशिया’ हा प्रचंड ग्रंथ लिहिला. याला पोर्तुगालचा लिव्ही अशी संज्ञा देण्यात येते. `आशिया’ या अपूर्ण ग्रंथाची समाप्ति डायोगो डि कौटो याने केली असून हाहि ग्रंथ फारच उत्कृष्ठ आहे.

डामिया ओडे गोएरू हा मोठा पंडित होऊन गेला. त्याने मॅनुअल राजाचे चरित्र व इतर ऐतिहासिक ग्रंथ लिहिले आहेत. गोवा येथे वीस वर्षे संशोधन करून फर्नोओ लोपेज याने हिस्टेरिया डो डीस्न्कोब्रिमेंटो ए काँक्यूइस्टा इंडिया पेलोस पोर्तुगीएझे, हा अमूल्य ऐतिहासिक ग्रंथ लिहिला. गास्पर कोरिया याचा `लेडस डा इंडिया’ हा ग्रंथहि हिंदुस्थानविषयक माहितीने भरलेला आहे. याशिवाय पौरस्त्य देशासंबंधी पुष्कळ ऐतिहासिक ग्रंथ प्रसिद्ध झाले. खास पोर्तुगालच्या इतिहासावरहि फान्सिको डि अंड्राडे, बर्नोडो डाक्रुझ, बिशप ओसोरियो इत्यादिकानी ग्रंथ लिहिले. यूरोपविषयक माहिती देणार्‍या ग्रंथापैकी डेस्कोब्रिमेटो डि फ्लॉलिडा, इटिनरेरियो, वर्दादीरा इन्फरमॅशियो, दसटेरास डो प्रेस्टो जोआओ, एथियोपिया ओरिएंटल, इटिनरेरुयो ड तेरा संटा, हिस्टोरिया द विदा डो पाद्रे फ्रान्सिको झेव्हियर, हिस्टोरिया ट्रेजीको मरीटिमा, इत्यादि प्रमुख होत.

अद्भुतकथावाङ्‌मयामध्ये रीबीरोचे मेनीना ए मोका, मोरेसचा अत्यंत महत्त्वाचा पाल्मीरिम डा इंग्लटेरा हा ग्रंथ, फर्नांडिसचा डि डूआर्डोस, लोबॅटोचा डि क्लारिसेल डि ब्रेटन, फेरीराचा झाग्रमोर इत्यादि ग्रंथ प्रमुख होत. सॅम्युएल यूस्कुडो याचा कान्सोलोसम आस ट्रिब्यूलाकोएस डि इस्त्रायल हा संवादपर ग्रंथ असून त्यात प्रत्येक शतकात पोर्तुगीज लोकांचा कसा छळ झाला याचे वर्णन आहे. पोर्तुगीज धर्मगुरुंनी जी महत्त्वाची कामगिरी बहावली तिची माहिती बार्थोलोम्यू डॉस मार्टिरेसच्या `कॅथेलिस्को डा डौट्रिना’ या ग्रंथात व लुइझडि ग्रानडाच्या `काँपेडियो डि डौट्रिना ख्रिस्ता’ व `सर्मोज’ या ग्रंथात आढळते.

नीतिपर ग्रंथात पिंटो याचा इमाजेन्स द विदा ख्रिस्ता, बिशप अ‍ॅराएझचा डायलोगस, थोमे डि जोरूरूचा ट्रबल्हास डि जोसस हे ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत.

१७ वे शतक:- १६ व्या शतकात पोर्तुगालमध्ये उत्कृष्ट वाङ्‌मय निर्माण झाले पण १७ व्या शतकात वाङ्‌मयाच्या उत्पत्तीला उतरती कळा लागली. १७ व्या शतकात जे वाङ्‌मय निर्माण झाले ते कमी दर्जाचे होते. १६ व्या शतकातील वाङ्‌मयात जे नावीन्य, जी कल्पकता, जे विचारगांभीर्य दिसून येते ते १७ व्या शतकातील वाङ्‌मयात दिसून येत नाही; याला अनेक कारणे होती. त्यापैकी प्रमुख म्हटले म्हणजे धर्मगुरुंची सत्ता प्रबळ झाल्यामुळे त्यांनी वाङ्‌मयावर कडक निर्बंध घातले. या शतकातील राजेलोकांनीहि धर्मगुरुंचीच री ओढली. त्यामुळे उदात्त व खर्‍या वाङ्‌मयाला थारा मिळेनासा झाला.

अशा परिस्थितीतहि थोडेफार मोठे कवी निर्माण झालेच; त्यापैकी, सोरार व्हायेलेंट डोसीह्यो, बर्नाडा फीरीरा, डि थॉमस डि नोरोव्हा, अँटोनियो सेरा डि कॅस्टो हे होत. महाकाव्ये लिहिणार्‍यांमध्ये गोब्रियल पौरयडे केस्टो, फ्रॉन्सिस्को डि सा मेंझेस यांची नांवे घेण्यासारखी आहेत. ऐतिहासिक ग्रंथात बर्नाडो डि ब्रिटोचे मॉनर्किया लुस्टियाना व क्रॉनिका डि सिस्टर हे ग्रंथ बर्‍यापैकी आहेत. मॅनोएल डि फारिया यानेहि पोर्तुगीज इतिहासावर पुष्कळ पुस्तके लिहिली आहेत. नाटककारांमध्ये मेल्लो हा प्रमुख असून त्याचे औटो डि फिदाल्मो हे नाटक फार लोकप्रिय आहे. मेरियाचा अल्को, फेरोडोचा लेटर्स ऑफ डा पोर्तुगीज नन हा ग्रंथ सुंदर असून त्यातील भाषा व विचार उदात्त आहेत.

१८ वे शतक:- १८ व्या शतकातील पहिली काही वर्षे वाङ्‌मयांत सुधारणा झाली नाही. पण पुढे तो मनु पालटत चालला. पोर्तुगीज ग्रंथकार व लेखक यूरोपमधील स्वतंत्र वातावरणात जाऊन राहू लागल्यामुळे यूरोपमधील वाङ्‌मयविषयक परिस्थितीचा त्यांच्या मनावर परिणाम झाल्याविना राहिला नाही; व त्यामुळे पोर्तुगीज वाङ्‌मयाला पुन्हां नवीन व व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले. वाङ्‌मयाचे पुनुरुज्जीवन होण्यास सुरवात झाली. या चळवळीत पोर्तुगालमधील विद्यामंदिरांनीहि भाग घेण्यास सुरवात केली; व अशा रीतीने पुन्हां १६ व्या शतकातील वाङ्‌मयाप्रमाणे १८ व्या शतकातील वाङ्‌मयाला तेजस्वी स्वरुप येऊ लागले.

१७२० साली पांचव्या जॉनच्या आश्रयाखाली इतिहास विद्यामंदिर स्थापन झाले व त्या विद्यामंदिरातर्फे मेमोरियास हा ऐतिहासिक ग्रंथ १५ भागात प्रसिद्ध झाला. १७८० साली रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस ही संस्था स्थापन झाली व या संस्थेमार्फत डिक्शनरीयो डा लिंग्वा हा अपूर्ण ग्रंथ व मेमोरियास हे ग्रंथ प्रसिद्ध झाले. १७५६ त क्रुएझ डे सिल्हा याने अर्केडिया यूलिसीपोनेन्से ही काव्यसंस्था स्थापन केली. या संस्थेचा एक सभासद गासी याने कँटाटा डे हा दिदो पद्यसंग्रह लिहिला; व त्याशिवाय पुष्कळ सुनीते लिहिली. क्किटा नांवाच्या एका न्हाव्याची कविता शृंगारिक पण मधुर आहे. १७९० साली अर्केडिया म्हणून नवीन संस्था पुन्हां स्थापन झाली. त्या संस्थेपैकी बोकेज, आगस्टिनो डे मॅसेडो व कर्व्हो सेमेडो हे तीन प्रमुख कवी होत. पण या काळातील उत्तम कवि म्हणजे टोलॅटिनो हा होय. याने आपल्या काव्यांत तत्कालीन आचरट आचारविचारांचे सुंदर भाषते पथार्थ चित्र रेखाटले आहे. फ्रॅन्सिस्को मॅनोएल यानेहि पुष्कळ पद्ये व गद्यग्रंथ लिहिले आहेत. याची भाषा साधी पण सुंदर आहे. पोर्तुगीज भाषेला याने वैभव प्राप्त करून दिले.

पोर्तुगालमधील एकतंत्री जुलमी राजशाहीविरुद्ध या काळात चळवळ सुरू झाल्यामुळे या चळवळीला रंगभूमीवर तोंड फुटले. तत्कालीन परिस्थितीसंबंधीची पुष्कळ नाटके भराभर बाहेर पडू लागली. पण या नाटकांतील भाषा खालच्या वर्गासाठी लिहिली असल्याकारणाने व त्यात उदात्त विचारांचा अभाव असल्याने ती नाटके फारशी यशस्वी ठरली नाहीत. अशी नाटके म्हणजे अँटोनियो सिल्व्हाचे ऑपेराज पोर्तुगेझाझ, लुइझचे ओस मेरीडोस, पेराल्टस इत्यादि होत. अर्केडिया काही विद्वानांनी नाटके लिहिली पण ती फ्रेंच नाटकांची प्रतिकृति असल्याने तीहि फारशी लोकप्रिय झाली नाहीत. गार्साची थिएट्रो नोव्हो व असेंब्लिया औपोर्लिडा ही नाटके मात्र नांव घेण्यासारखी आहेत.

१९ वे शतक:- १९ व्या शतकात `अद्भुत’ उर्फ रोमँटिक वाङ्‌मयाची प्राण प्रतिष्ठा झाली. या वाङ्‌मयाचा जनक गॅरेट हा होय. याने कॅमोएस या कवितेत जुन्या कवितांच्या बाबतीतील नियमांना पार झुगारून दिले आहे. त्याच्या कवितेत साधेपणाबरोबरच मधुरता आणि प्रसाद यांचा मिलाफ झालेला आढळतो. अद्भुताची ही कल्पना कॅस्टिल्हो याच्या ग्रंथात पराकोटीला गेलेली आढळते. कॉस्टिल्होला पुष्कळच अनुयायी मिळाले; त्यापैकी लेमॉस, पॅसॉस, रीबीरो, लीअल इत्यादि प्रमुख होत.

१८६५ मध्ये एक नवीनच प्रकरण उपस्थित झाले. कॅस्टिल्हो याने चगास याच्या `मोडीडाडे’ याच्या कवितेला प्रस्तावना लिहून तीत काव्याचा व तत्त्वज्ञानाचा निकट संबंध आहे असे प्रतिपादन केले. या प्रश्नावर भयंकर रण माजले व शेवटी कॅस्टिल्होच्या मताचा पराजय झाला. या वादाने पुष्कळच वाङ्‌मय निर्माण झाले. कॅस्टिल्होच्या अनुयायी वर्गात जोआओडयूअस हा प्रमुख होय. याची कविता नितांत सुंदर अशी आहे. अँथेरो हे क्केटल याचे `ओडस मॉडर्नास’ हे काव्यहि प्रतिभाशाली आहे. तसेच त्याचे गद्यहि साधे पण तात्त्विक विचारपरिप्लुत आहे. या शतकात बरीच सुंदर कविता निर्माण झाली असे म्हणावयास हरकत नाही. यूनक्कीरोची ए मोर्टे डे डी जोआओ पॅट्रिया, ओस सिंप्लेस ही काव्ये मनोरम आहेत. लीअलच्या `क्लॅरिएडस डे सुल’ या काव्यांत प्रतिभा वारंवार चमकताना दिसते. नोब्रे याची कविता तेजस्वी, मधुर, व भावनाप्रधान आहे. याशिवाय या काळात वर्दे कार्व्हलो, फीनो, माँटीर, आलीव्हिरा, वीइरा इत्यादि कवी होऊन गेले.

गॅरेटने रंगभूमीतहि बरीच सुधारणा घडवून आणिली. पोर्तुगालमधील राष्ट्रीय प्रसंगावर त्याने नाटके रचून रंगभूमि दणाणून सोडली. त्याची औटो डे गिल विसेंटे, अलफागेम डे संतारेम, फ्री लुइझ दे सौसा ही नाटके सर्वोत्कृष्ट आहेत. गॅरेटची परंपरा लीयल, अमोरिम व चगास यांनी सुरू ठेवली. सामाजिक नाटके लिहिणार्‍यांत बीस्टर, व हास्योस्पादक नाटकांत काल्डीरा हे प्रमुख होत. लोबॅटोची नाटकेहि चांगल्यापैकी आहेत.

अद्भुत कादंबरीवाङ्‌मयात हर्क्यूलोनो याच्या कादंबर्‍यांना पहिले स्थान दिले पाहिजे. त्याच्या लेंडस व नॅरेटिव्हास ओ मोनेस्टीकॉन इत्यादि कादंबर्‍या चित्ताकर्षक आहेत. सिल्व्हा अँडा्राडे ब्रँको, कोएल्हो यांच्या कादंबर्‍याहि श्रेष्ठ दर्जाच्या आहेत.

हर्क्यूलोनो हा इतिहासकार म्हणूनहि अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचा हिस्टोरिया डे पोर्तुगाल हा ग्रंथ लोकमान्य आहे. संतारेम व वायकर यांची भूगोलविषयक पुस्तके प्रमाण मानण्यात येतात. याशिवाय बॅरॉस, लोबो, मार्टिन्स, इत्यादि अनेक उत्कृष्ट इतिहासकार या शतकात निर्माण झाले.

टीकाशास्त्राच्या बाबतीतहि या सरकाने बरीच आघाडी मारली. यासंबंधात ओर्टिगाओ, मकॅडो, फियाल्हो, सिल्व्हा, पिंटो इत्यादिकांची नांवे घेण्यासारखी आहेत. शास्त्रीय वाङ्‌मयांतहि पोर्तुगालने पुष्कळ ग्रंथकार निर्माण केले. अँटोनियो संपैओ, अँटोनियो आगस्टो व नवरो हे उत्कृष्ट वर्तमानपत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .