प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें    
       
पोर्तुगाल– पश्चिम यूरोपांतील एक लोकसत्ताक राज्य. उत्तरेस व पूर्वेस स्पेनदेश आणि दक्षिणेस व पश्चिमेस अटलांटिक महासागर. क्षेत्रफळ ३५४९० चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ५७५७९८५. याची लांबी साधारण ३६२ मैल व रुंदी १४० मैल. मिन्हो, हौरो, तेगस, गादी आजा या चार मोठ्या नद्यांनी या देशाचे चार मोठमोठे प्रांत पडले आहेत. एकंदर सहा प्रांत आहेत. मिन्हो ही उत्तरेकडील पोर्तुगाल व स्पेन यांच्यामधील व गादीआना ही पूर्वेकडील मर्यादा आहे. उत्तेकडे डोंगराच्या ओळी बर्‍याच आहेत. स्पेन व पोर्तुगाल यांच्या सरहद्दीवरील पोर्तुगालचे परगणे कमी उत्पन्नाचे व जंगलमय असल्याने त्यांच्याबद्दल तंटे वगैरे होत नाहीत. या देशाचा किनारा वेडावाकडा असून जवळ जवळ ५०० मैलांचा व पुष्कळ बंदरांचा आहे. त्यात मान्डेगो, कॉरव्होएरो, रोका, एस्पीचेल, सेंट व्हिन्सेन्ट, सेंट मराया वगैरे बंदरे आहेत.

पोर्तुगालमध्ये नैसर्गिक सौंदर्य जसे आहे तसे इतर त्याच्या सारख्या छोटया देशात फारच थोडे आढळेल. शेरा द एस्ट्रेला या पर्वताची शिखरे व पायथ्याची दरीखोरी पाहण्यालायक आहेत. शिखराची जास्तीत जास्त उंची ७ हजार फूट आहे. मैदाने फारशी नाहीत. येथील नानाप्रकारची फुले सार्‍या यूरोपमध्ये प्रख्यात आहेत. या देशात उन्हाळी व औषधीपाण्याचे झरे फार आहेत. येथील काही खडक आद्यप्राणिविशिष्टकालीन आहेत. ते बहुतेक सर्व डोंगरांच्या माथ्यावर आढळतात. टेगसच्या काठी ह्यापुढील काळचे दगड आढळतात. उत्तरेकडे ज्वलामुखी खडक आहेत, त्याच्या आसपास चुनखडीचेहि आहेत. ग्रेनाईटहि थोडा फार आढळतो. या देशाची हवा समशीतोष्ण व उत्तम आहे. लिजबोय (लिस्बन) येथे ६०० ते ६१.५० अंश पर्यंत उष्णमान असते. अटलांटिक महासागरास खेटून असल्याने येथे पाऊस अतिशय पडतो. सालीना २०० इंचापर्यंत त्याची मजल जाते, १९१० मध्ये पूर येऊन फार नुकसान झाले. किनार्‍यावर अतिशय दाट धुके असते. त्यामुळे जहाजांना प्रवासास अडचण पडते. पर्वतशिखरांवरील बर्फ अनेक महिने तसेच असते. देशांतील जास्त उन्हाळ्याचे गांव लागॉस (६३०) व जास्त थंडाईचे ठिकाण सेरा द एस्ट्रेला (४४.७०) आहे. पावसाळ्यात दरीखोर्‍यांतून दलदल सांचते. वादळे अगदी क्वचित होतात, पण भूकंप नेहमी होतात. लिजबोयचा प्रख्यात धरणीकंप १७५५ मध्ये झाला. लांडगे व रानटी अस्वले बरीच आहेत. उत्तर यूरोपमधील भाजीपाला व फळफळावळ येथेहि होते. जमीन सुपीक आहे. जंगलाचे उत्पन्नहि चांगले येते. बुचाच्या झाडांची च ओक झाडांची लागवड करतात.

पोर्तुगालमधून दर वर्षी पुष्कळसे गरीब लोक अमेरिकेत व ब्राझिल देशात कामधंद्यासाठी जातात. बालमृत्यूची संख्या यांच्यांत जास्त आढळते. सर्वांत जास्त लोकवस्ती (दर चौरस मैली ४७९.५) मदैरा येथे आहे व सर्वांत कमी (४५.१) अलेमतेजो येथे आहे. पोर्तुगाज लोकांत पुष्कळ लोकांच्या रक्ताची भेसळ झाली आहे. यांचे मूळ पूर्वज इब्रेरियन जातीचे होते. सांप्रत उत्तरेकडील शेतकर्‍यांत गॅलिशियन, आस्ट्रियन व स्पेनिअर्ड बीजाचे लोक आहेत. कार्थोजियन हे मध्य देशात रहात होते. त्यांची व यांची प्रथम सोयरीक झाली. रोमन लोकांपासून या लोकांनी भाषा व सुधारणा उचलली. इ.स. ७११ नंतर मूर (अरब, बर्बर) लोकांची धाड आली. त्यांची छाप तेगसच्या दक्षिणेकडे जास्त बसली व ती अद्यापीहि बांधकाम, नक्षीकाम, लहान सहान धंदे व शेतकर्‍यांची भाषा यात थोडीफार दिसून येते. एकदा अरबांचे प्रस्थ इतके माजले होते की मोझारेबिक ही एक स्वतंत्र जात उत्पन्न झाली. ती रक्ताने पोर्तुगीज व धर्माने ख्रिस्ती असे पण भाषा व चालीरीती मात्र अरबी वापरी. अद्यापि सुद्धा काही मोझारब लोक सुंता करतात. मुसुलमानी अंमलात फिरंगी ज्यू सार्‍या यूरोपात श्रीमान म्हणून नांवाजले होते. इ. स. १४५० नंतर देशात नीग्रो लोकांची गुलाम म्हणून आयात होत चालल्याने त्यांच्या रक्ताची भेसळ फिरंग्यात झाली. सांप्रत मध्य व दक्षिण पोर्तुगालमध्ये या निग्रोइड पोर्तुगीजांची वसति फार आहे. सार्‍या यूरोपमध्ये पोर्तुगीज लोकांसारखी अनेक जातीच्या रक्ताच्या भेसळीची दुसरी जात नाही. मात्र ही प्रजा, दुसर्‍या इतर भेसळ जातीपेक्षा जास्त हुषार आहे.

श्रीमंत लोकांपेक्षा शेतकरी हे जास्त धिप्पाड व सुरेख दिसतात. देशातील मुख्य खाद्य वाळलेले कॉडमासे, भात, वाटाणा, मक्याची भाकर, आलिव्ह तेल, अंजिरे, द्राक्षे वगैरे फळे व कांदे, भोपळा, कोबी वगैरे भाज्या हे आहे. मेजवानी खेरीज सागूती खात नाहीत. दारू अगदी क्वचित पितात. राष्ट्रीय असा एक ठराविक पोषाख नसून त्यात विविधता आहे. सोन्याचे दागिने बायका वापरतात. बैलांच्या टकरा लावण्याची चाल इकडे फार आहे. हे लोक जनावरांचे फार शोकी आहेत. येथील शेतकरी हे पश्चिमयूरोपमधील सर्व शेतकर्‍यांपेक्षा जास्त अक्षरशत्रू आहेत. यांचे पोषाख व भांडीकुंडी काही ठिकाणी अद्यापि रोमन व मूरकालीन आहेत. यांची गाणी व पोवाडेहि त्या वेळचे जुने आहेत. नाच सुद्धा मूरीश धर्तीचे असून, चेटक्या, पर्‍या, मंत्र, जादूटोणे यांवर यांचा पुष्कळ भरंवसा आहे.

देशांत १८५१ पर्यंत लिजबोय ते सिंट्रा याशिवाय एकहि खडीचा रस्ता नव्हता. सांप्रत सरकारी, जिल्हालोकलबोर्ड व म्युनिसिपालिटी यांच्या ताब्यात, त्यांनी केलेले रस्ते आहेत. आगगाडी प्रथम १८५३ त सुरू झाली. मुख्य मुख्य शहरी विजेच्या ट्रामगाडया आहेत, या देशाच्या मालकीची व्यापारी जहाजे थोडी असून बाकीची बहुतेक इंग्रजांचीच आहेत.

शेतसार्‍याचे जमीनदारी, रयतवारी वगैरे चार प्रकार आहेत. जमीनदारास थकलेल्या बाकीसाठी कुळाकडून जमीन कायमची जप्त करता येत नाही. रोमन व मूरीश जुन्या पद्धतीच्या बैलांच्या नांगरानेच अद्यापि नांगरट होते. या बैलांची शिंगे अतिशय लांब असतात. पाटबंधार्‍याचे काम मूरीश पद्धतीचेच अद्यापीहि आहे. शेकडा अद्यापीहि ४५ जमीन नाकीर्द पडलेली आहे.

मच्छिमारीच्या धंद्यांत ५० हजार लोक असून ते १० हजार नावांतून हा धंदा करतात. सालीना ८ लक्ष पौंड किंमतीचे मासे परदेशी रवाना होतात. या देशात तांब्याच्या खाणी फार आहेत. परंतु मजुरी, वाहतूक व भांडवल यांच्या अभावी खाणी तशाच पडल्या आहेत. मीठ, संगमरवरी दगड, ग्रेनाईट दगड, लोखंड, जस्त, शिसे, शिरगोळा, लिग्नाईट, गंधक, पेट्रोलियम वगैरे खनिज बरेच सापडते. सोने दुर्मिळ आहे. इ. स. १७०३ च्या तहान्वये या देशात इंग्रजांशिवाय खुद्द फिरंग्यांनाहि काही धंदे काढण्याची बंदी होती. पुढे (१८९२) कापडाच्या गिरण्या झाल्या. दारू, बुचे, मासे, आलिव्हतेल, कमावलेली कातडी, तंबाखू, औषधी झर्‍यांचे पाणी, भरतकाम, लोकर, मातीची भांडी, (हे काम ते हिंदी लोकांपासून शिकले), चिनीमातीची नकशीदार भांडी, मूरीश पद्धतीची धातूंची भांडी वगैरे वस्तूंचा परदेशाशी व्यापार चालतो. हा सालीना अजमासे १९०००००० पौंडांचा असतो. यापैकी ९००००० पौंडांची दारू एकटे इंग्लंडच खरदी करते.

इ. स. १९१९ च्या सुमारास सरकारी बँक ऑफ पोर्तुगालचे भांडवल व शिल्लक १६९८८००० एसक्यूडो (हे सोन्याचे चालू नाणे असून त्याची किंमत ४ शिलींग ५.१/२ पेन्स असते) होती. सोन्याचे नाणे मुख्य असून, चांदी, निकल, कांसे यांची नाणी आहेत. इ.स. १९१८ साली देशाचे एकंदर उत्पन्न १,०२,४७,४४१ पौंड होते. राष्ट्रीय कर्ज १९१८ साली १९,६७,४३,३०४ पौंड होते.

सन १९१०च्या ऑक्टोबरपर्यंत येथे राजसत्ता होती. तिला मुख्य आधार चौथ्या पेड्रो राजाने १८२६ त केलेली नियमावली व त्यानंतर १८५२, १८८५ व १८९५ मध्ये झालेले फेरफार यांच होता. हाउस ऑफ कॉमन्स व हाउस ऑफ पीअर्स अशा दोन सभा असत. त्यांनी दोनदा पसार केलेल्या कायद्याला व्हेटोने हाणून पाडण्याचा अधिकार राजास नव्हता. चार वर्षांनी निवडणूक होई. पीअर होण्यास ४० च्यावर वय असावे लागे.

सहा प्रांतावर सहा सुभेदार व त्यांना एक सल्लामसलतगार मंडळ असे, जिल्ह्यावर व तालुक्यावर मेयर व मोठमोठ्या गांवी ग्राममंडळ असे. त्याच्या मुख्यास रेजिदोर म्हणत.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी इंग्लंड व स्पेन यांच्या शिवाय कोणत्याहि यूरोपियन राष्ट्रापेक्षा पोर्तुगाल वसाहती जास्त होत्या. पुढे ब्राझिल त्याच्या हातून गेला तरी आफ्रिकेत केप व्हर्डे सेंट थॉमस व प्रिन्सेस ही बेटे पो. गिनी, अंगोला, पो. पूर्व आफ्रिका व मोंझाबिक हे प्रांत; हिंदुस्थानात दीव दमण, गोवे; चीनमध्ये मकाउ; मलाया द्वीपकल्पात तिमोर इतक्या वसाहती अद्यापि त्यांच्या आहेत. या वसाहतींपासून व्यापारी फायदा पोर्तुगालला फारसा मिळत नाही. उलट कारभार चालविण्यास त्यांना पैका परवावा लागतो.

इ. स. १९१० पर्यंत राजाचा धर्म रोमन कॅथोलिक होता. परंतु इतर धर्मभेदास मोकळीक असे. चर्चची सत्ता १८३४ त काढून टाकली. ब्रागा, लिजबोय व इव्होरा असे देशाचे तीन धार्मिक प्रांत केले होते. त्यांचे उत्पन्न ६५००० पौंड येई. प्राथमिक शिक्षण सक्तीचे १८४४ त केले, पण १९०० त शे. ७८.६ लोक निरक्षर होते. औद्योगिक, वैय्यापारिक शाळा नुकत्याच उघडल्या आहेत. कोइंब्रा येथे राष्ट्रीय विद्यापीठ आहे. इ. स. १९१० पूर्वी सक्तीची व खुषीची लष्करभरती असे. प्रत्येक २१ वर्षावरील माणसास १५ वर्षे लष्करी नोकरी करावी लागे. लिजबोयचा किल्ला फार बळकट आहे. महायुद्धाच्या काळी खडें सैन्य १ लाख ८० हजार असून निरनिराळ्या प्रकारची ७० लढाऊ जहाजे होती.

इतिहास– खिस्तापूर्वीच्या ३ र्‍या शतकापासून १७२ सालापर्यंत पोर्तुगाल देशावर व विशेषेकरुन पोर्तुगाल देशाच्या समुद्रकिनार्‍यावरील प्रदेशावर कार्थेज येथील लोकांची सत्ता होती. पुढे १३८-७२ सालांच्या दरम्यान हा देश रोमन लोकांनी काबीज केला. ख्रिस्तानंतरच्या ५ व्या शतकात या देशावर आलन स्यूव्ही व व्हीसीगॉथ या लोकांच्या स्वार्‍या झाल्या व ७११ साली अरब लोकांनी हा देश काबीज केला. यानंतर कॅस्टाईलच्या फर्डिनांडने (१०३३-१०६५) अरब लोकांपासून या देशाचा बराच भाग परत घेतला व पुढे याचा नातू ऑलफोन्झो याला आपल्या बापापासून पोर्तुगाल परगणा मिळाला. याच परगण्याची मर्यादा जास्त विस्तृत करून याने त्याच्यावर राज्य स्थापिले. ११४७ साली इंग्रजी धर्मयोध्यांच्या मदतीने मूर लोकांपासून याने लिसबन शहर काबीज केले व तेव्हांपासून ते शहर पोर्तुगाल देशाची राजधानी आहे. पहिल्या ऑलफांझोनंतर पहिला सँक (११८५-१२११) याची `नगरे रचणारा’ अशी ख्याति होती. हा तिसर्‍या इनोसंट पोपचा विरोध करी, परंतु शेवटी याला पोपचे वर्चस्व कबूल करावे लागले. पुढील राजा दुसरा ऑलफोंझो (१२११-१२२३) याच्याच कारकीर्दीत पोर्तुगाल देशाच्या प्रतिनिधिसभागृहाची स्थापना झाली. याच्यानंतर दुसरा सँको (१२२३-१२४८), पुढे तिसरा ऑलफोंझो (१२४८-१२७९) याच्या कारकीर्दीत पोर्तुगाल देशाची फार झपाटयाने प्रगति झाली. याने मूर लोकांचा अलग्रेव्ह नांवाचा किल्ला घेतला. यामुळे कस्टाईलचा १० वा आलफोंझो व पोर्तुगालचा राजा यांच्यामध्ये वितुष्ट येऊन लढाई सुरू झाली. पोर्तुगाल व कॅस्टाईल यांच्यामधील लढाई, पोर्तुगालच्या ऑलफोंझोचा कॅस्टाईलच्या १० व्या ऑलफोंझोच्या मुलीबरोबर झालेल्या विवाहाने बंद झाली. याच्या मरणानंतर पोर्तुगाल देशाच्या इतिहासास नवीन वळण लागले. याच सुमारास या देशात कोंईब्रा येथे एका विद्यापीठाची स्थापना झाली व या देशाचे इंग्लंड देशाशी वुपारद्दष्टया दळणवळण सुरू झाले.

१४ व्या शतकात पोर्तुगाल व कॅस्टाईल यांच्यात वारंवार लढाया होत. १३८५ साली पोर्तुगीज लोकांनी अल्जुबरोटाची लढाई जिंकली व यानंतर लवकरच पोर्तुगालच्या जॉनचे गाँटचा जॉन याची मुलगी फिलिप्पा हिच्याशी लग्न झाले. याच्या कारकीर्दीत (१३८५-१४३३) याचा मुलगा प्रसिद्ध खलाशी हेनरी याने १४१५ साली आफ्रिकेच्या उत्तर किनार्‍यावरील स्यूटा काबीज केले व भूगोलविषयक पुष्कळ शोध लावून आपल्या देशाचे नाव वाढविले. याच्या शोधामुळे पोर्तुगीज सत्तेचा बराच विस्तार झाला. १४४२ साली मदीरा व अझोर बेटांचा शोध लागला. आफ्रिकेतील अंतर्गत प्रदेशाशी पोर्तुगाल लोकांचे दळणवळण वाढत जाऊन तेथील गुलामांच्या व्यापारात त्यांना फार फायदा होऊ लागला. दुसर्‍या जॉनच्या कारकीर्दीत (१४८१-९५) बार्थोलोम्यू डाएझ याने १४८६ साली केप ऑफ गुडहोपला वळसा घालून हिंदुस्थानास येण्यास एक नवीन मार्ग शोधून काढला. पुढे एमॅनुअल गादीवर आल्यावर (१४९५-१५२१) बास्को ड गामा १४९८ साली लिस्बनहून कालीकत येथे जलमार्गोने येऊन पोहोचला, व इ. स. १५०० मध्ये पोर्तुगीज खलाशी ब्राझील देशास जाऊन पोहोचले. १५१० साली अल्बुकर्कने गोवा शहर घेऊन सर्व पौरस्त्य व्यापाराची सूत्रे हाती घेतली. यानंतर याने सीलोन, सुंडा, मलाका व इराणी आखातातील ओरमज ही बेटे घेतली. तिसर्‍या जॉनच्या कारकीर्दीत (१५२१-२७) पोर्तुगाल देशाच्या उत्कर्षाचा कळस झाला. त्या देशात जेसुईट लोकांचा प्रवेश होऊन इन्क्रीझीशनसारख्या न्यायसभा स्थापन झाल्या. ज्यू लोकांच्या छळास प्रारंभ झाल्यावर त्या देशाच्या प्रगतीची वाढ खुंटून र्‍हास होण्यास सुरवात झाली. अगोदरच पोर्तुगाल देशाचे लोक परदेशात वसाहतीस गेल्यामुळे त्या देशाचे बरेच नुकसान झाले होते. १५७८ त तिसर्‍या जॉनचा नातू सेबॅशियन हा अलके-केबिर येथे मोरोक्कोच्या सुलतानाविरुद्ध लढत असता मरण पावला. पुढे कार्डिनल हेनरी याने थोडे दिवस राज्य केल्यावर स्पेनचा दुसरा फिलिप हा पोर्तुगालच्या गादीवर बसला. स्पेनचा व पोर्तुगालचा संयोग झाल्यामुळे स्पेनच्या इंग्लंड व हॉलंड देशांशी झालेल्या लढायांनी पोर्तुगाल देशाचे फार नुकसान झाले. स्पेन देशाचा जुलमी व कडक अम्मल पोर्तुगीज लोकांस सहन न होऊन त्यांनी १६४० त बंड केले व १६४१ त पोर्तुगालने स्पेनची सत्ता झुगारून दिली. याच वर्षी ब्रॅगँझाचा डयूक चवथा जॉन हा पोर्तुगालच्या गादीवर बसला. यानंतर पोर्तुगालने स. १६६८ पर्यंत मोठे युद्ध करून स्पेन देशास आपले स्वातंत्र्य कबूल करावयास लाविले. या युद्धत पोर्तुगाल देशास इंग्रजांची मदत होती.

स्पेनच्या गादीच्या वारसासंबंधी झालेल्या युद्धांत पोर्तुगाल देशास बरेच महत्त्व प्राप्त झाले होते. कारण या देशातून स्पेनवर स्वारी करता येत होती. १७०१ साली फ्रान्सच्या १४ व्या लुईने पोर्तुगालशी तह केला होता, परंतु १७०२ मध्ये इंग्रजांनी व्हीगो आखातांत स्पेन व फ्रान्सच्या जहाजांचा पराभव केल्यावर पोर्तुगालच्या राजाने, फ्रान्सने केलेला तह रद्द केला व तो १४ व्या लुईच्या विरुद्द उत्पन्न झालेल्या संघास जाऊन मिळाला. याच वेळेस त्याने इंग्रजांशी मेथुएन येथे तह करुन इंग्रजी माल पोर्तुगाल देशांत बिन जकातीने येऊ देण्याचे कबूल केले. याप्रमाणे इंग्लंड व पोर्तुगाल यांचा सलोखा होऊन तो उत्तरोत्तर द्दढ होत चालला. १८ व्या शतकात जोसेफ याच्या कारकीर्दीत (१७५०-७७) याचा मुख्य प्रधान पोम्बल याने पोर्तुगाल देशात पुष्कळ सुधारणा घडवून आणल्या. याने जेसूइट लोकांस हाकलून दिले. शिक्षणखात्यात सुधारणा केल्या. शेती व व्यापार यांस उत्तेजन दिले व सरकारात नवा जोम उत्पन्न केला. परंतु जोसेफ मेल्यावर पोम्बल याची सत्ता नाहीशी झाली व पोर्तुगाल देशास पुन्हां उदासीनता प्राप्त झाली.

१८०७ च्या टिलसिटच्या तहानंतर नेपोलियनने पोर्तुगाल देशांस कान्टिनेंटल पद्धतीत (इंग्लंडच्या व्यापारावर बहिष्कार घालण्याच्या कटांत) सामील होण्यास भाग पडण्याकरिता जुनोट याला लिस्बन शहर काबीज करण्याचा हुकूम केला. पुढें जुनोट याने सर्व पोर्तुगाल देश काबीज केल्यावर रीजंट जॉन हा राजघराण्यासह ब्राझिल देशास पळून गेला. यानंतर पोर्तुगाल देश फ्रान्सच्या राज्यास जोडला जाऊन १८०८ साली जोसेफ बोनापार्ट याची स्पेनचा राजा म्हणून द्वाही फिरली. पुढे फ्रेंच सत्तेविरुद्ध स्पेनच्या लोकांनी बंड केले व आर्थर वेलस्ली हा त्यांच्या मदतीकरिता पोर्तुगालमध्ये दाखल झाला. याप्रमाणे पेनिन्शुलर युद्धास सुरवात होऊन ते युद्ध १८१४ पर्यंत चालले. स. १८१६ त रीजंट जॉन हा पोर्तुगाल व ब्राझिल या देशांचा राजा होऊन, याची सहावा जॉन या नांवाने द्वाही फिरली. याने मार्शल बेरेसफोर्ड या इंग्रज कामगारावर पोर्तुगाल देशाचा राज्यकारभार सोपविला. ही व्यवस्था पोर्तुगीज लोकांस न आवडून त्यांनी स. १८२० त ओपोर्टो येथे बंड केले. यानंतर पोर्तुगाल देशात लोकनियंत्रित अशी जंटो नांवाची राज्यपद्धति स्थापन करण्यात आली. तारीख ३ जुलै १८२१ रोजी जॉन पोर्तुगाल देशात येऊन दाखला झाला. या वेळेस या देशात लोकसत्ताक राज्यपद्धति अमलांत असून तीच पुढे चालू ठेवण्याचे जॉन याने वचन दिले. स. १८२२ त जॉन याचा मुलगा पेड्रो याने ब्राझिल येथे एक स्वतंत्र राज्य स्थापिले. खुद्द पोर्तुगाल देशात जॉन याचा भाऊ मिग्युएल याने लष्कर आपलेसे करून स्पेन व फ्रान्स यांच्या मदतीने पोर्तुगाल देशांतील लोकसत्ताक राज्यपद्धति मोडून टाकली, पण याच्या विरुद्ध चळवळ सुरू होऊन सहाव्या जॉनला एका नवीन नियमितसत्ताक राज्यपद्धतीचा स्वीकार करावा लागला. रशिया, व ऑस्ट्रिया यांना ही पद्धत न आवडून ते तिच्या विेरुद्ध उठले. यावे पोर्तुगालातील नियमितसत्तावाद्यांनी इंग्लंड देशास आपल्याकडे वळविले. कॅनिंग या ब्रिटिश मंत्र्याने १८२६ साली लिस्बन येथे एक फौज पाठवून पोर्तुगालातील अंतस्थ राजनीतीत जर परराष्ट्रे ढवळाढवळ करतील तर आम्ही त्यांस अडथळा करू असे जाहीर केले.

१८२६ साली सहावा जॉन मरण पावला. याच्या नंतर पेड्रो याने पोर्तुगाल देशांस इंग्रजी पद्धतीच्या नमुन्यावर नियमितसत्ताक राज्यपद्धति स्थापून त्या देशाच्या राज्यावरील हक्क सोडला. पुढे याची मुलगी मराया ला ग्लेरिया ही पोर्तुगाल देशाची राणी झाली व ही लहान असल्यामुळे तिच्या वतीने तिचा चुलता मिग्युएल हा राज्यकारभार पाहू लागला. यानंतर १८२८ साली मिग्युएल यानेच राज्य बळकाविले. मिग्युएल याचा समाचा घेण्यासाठी पेड्रो याने आपले ब्राझीलचे राज्य आपला मुलगा दुसरा पेड्रो याच्यावर सोपवून स्वत: सैन्यासह पोर्तुगाल देशास प्रयाण केले. पुढे १८३३ साली इंग्रजी आरमाराने मिग्युएलच्या आरमाराचा पराजय केल्यावर मिग्युएलने पोर्तुगाल देशाच्या राज्यावरील आपले सर्व हक्क सोडून दिले. १८३४ सालापर्यंत पेड्रोने, नंतर १८५३ पर्यंत मरायाने व नंतर हिचा मुलगा पांचवा पेड्रो याने १८६१ पर्यंत राज्य केले व याच्या मागून याचा भाऊ पहिला लुइझ हा गादीवर बसला. स. १८८०-१८९० च्या दरम्यान आफ्रिकेविषयी चढाओढ सुरू होऊन तेथील पोर्तुगाल देशाच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाचे महत्त्व वाढू लागले. १८८४ साली ग्रेटब्रिटनने पोर्तुगालचे कांगो नदीवरील वर्चस्व कबूल केले. परंतु बर्लिन काँग्रेसने काँगोफ्रीस्टेटची सत्ता आंतरराष्ट्रीय कमिशनच्या हातांत दिली. १८८९ साली पहिला कार्लोस हा पोर्तुगालचा राजा झाला. ता. १ फ्रेब्रुवारी १९०८ रोजी याचा, याच्या गादीचा वारस होणार्‍या मुलांसह खून झाला. यानंतर याचा दुसरा मुलगा एमॅनुअल याची दुसरा एमॅनुअल या नांवाने द्वाही फिरली. ता. ४ आक्टोबर १९१० रोजी लिस्बन शहरी बंड होऊन राजा व इतर राजघराण्यातील मंडळीनी पळ काढिला. ता. ५ आक्टोबर रोजी बंडवाल्यांनी प्रजासत्ताक राज्य स्थापण्याचे जाहीर केले. या बंडाचा पुढारी अ‍ॅडमिरल कँडीडोराईस हा होता. राजा-राणी जिब्राल्टर येथे इंग्रजांच्या आश्रयास जाऊन राहिले. हे बंड लिस्बन शहराच्या मर्यादेच्या बाहेर पसरले नाही व त्यात फारशी प्राणहानीहि झाली नाही. १८९१ साली इंग्लंड व पोर्तुगाल यांच्यामध्ये तह होऊन एकमेकांनी पूर्व-पश्चिम आफ्रिकेतील आपापल्या वर्चस्वाखालील प्रदेशांची मर्यादा निश्चित केली. मॅविका लँड व त्यावरील बेइरा बंदर व डेलागोआ आखात यांची पोर्तुगालच्या ताब्यातील उत्तम वसाहतीत गणना होते.

१९१० ते १९२०:- १९१० च्या क्रांतीनंतर तात्पुरते सरकार स्थपन झाले. या क्रांतीनंतर धर्मसंस्थाच्या साहाय्याने जगणार्‍या गरीब लोकांचे फार हाल झाल्यामुळे त्यापैकी पुष्कळांना परदेशगमन करावे लागले. मजूरवर्गामध्ये असंतोष पसरून वारंवार संप होऊ लागले. स. १९११ च्या जून महिन्याच्या १९ व्या तारखेस नवे सरकार निवडण्यात येऊन पोर्तुगालमधील राजसत्तेचा कायमचा शेवट झाला. या नवीन राज्यघटनेने डेप्युटीसभा व सिनेटसभा अस्तित्वात येऊन त्यांमार्फत निवडून आलेल्या अध्यक्षाने या सभांच्या साहाय्याने राज्यकारभार चालवावा असे ठरविण्यांत आले. या घटनेप्रमाणे निवडून आलेला पोर्तुगालचा पहिला अध्यक्ष डॉ. मॅन्युएल डे अ‍ॅरीगा हा होय.

तात्पुरते सरकार प्रस्थापित झाल्यापासून रोमन कॅथॉलिक धर्मावर अनेक संकटे येत होती. चर्च व संस्थान यांच्यामधील संबंध नष्ट करण्यात आला होता. धर्मस्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला देण्यात आले होते. यामुळे पोर्तुगालमध्ये रोमन कॅथॉलिक धर्माची सत्ता काही काळपर्यंत अजिबात नाहीशी झाली होती. पण स. १९१७ मध्ये पीआस हा पोर्तुगालचा अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हां रोमनकॅथॉलिक धर्माचे डोके वर निघू लागले.

पोर्तुगालमध्ये १९११ सालापासून राजशाही नष्ट झाली. तथापि राजशाहीच्या पुरस्कर्त्यांनी पुन्हां राजशाही प्रस्थापित करण्याचे अटोकाट प्रयत्‍न चालविले होते. स. १९१२ मध्ये खुद्द मॅनुअल राजा व डॉम मिग्युएल यांनी मिळून रिपब्लिकविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या सैन्यासह कूच केले होते. तथापि त्यात यश आले नाही. पुढे १९१९ सालीहि राजपक्षीयांनी उचल खाऊन पुन्हां काही ठिकाणी राजसत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला पण तोहि थोडक्याच दिवसानंतर अयशस्वी ठरला.

महायुद्धामध्ये, पोर्तुगालने दोस्तराष्ट्रांच्या वतीने युद्धांत भाग घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे जर्मनी व ऑस्ट्रिया यांनी पोर्तुगालवर एक दोनदां सैन्यहि पाठविले. तथापि त्यात त्यांना यश आले नाही. शांततापरिषदेला डॉ. एगास मोनीझ हा प्रतिनिधि म्हणून हजर होता. या परिषदेत, पोर्तुगालला जर्मनीपासून नुकसानभरपाई व कियाँगो हे शहर मिळाले.

१९२१ ते १९२५- या काळात तीनदा राजक्रांति झाली व सांपत्तिक स्थिति फारच खालावली. १९२१ च्या आक्टोबरमधील क्रांतीत क्रांतिकारकांनी लिस्बन काबीज करुन ग्रँजो (मुख्य प्रधान) मॅकेडो, मैआ व सिल्व्हा या प्रधानांचे खून केले. गेली दहा वर्षे देशाच्या बजेटात दरसाल तूट येत असून धान्य व इतर जिन्नस परदेशाहून येत, त्यांच्या किंमती वाढल्या व लोकांत असंतोष माजला. ब्रेड (भाकर) स्वस्त दराने विकून सरकारने १५,००,००० पौंड तूट एक वर्षात सोसली. कार्लो राजा, त्याचा मुलगा व प्रेसिडेंट पैस यांच्या खून करणारांस शिक्षा झाल्या नाहीत. या क्रांतीचा पुढारी कर्नल कोएल्हो याचे प्रधानमंडळ डिसेंबरात मोडले; नंतरचे कर्नल पिंटोचे प्रधानमंडळ त्याच महिन्यात मोडून सेनॉर लीलचे स्थापन झाले. १९२२ च्या फेब्रुवारीत नव्या निवडणूकी होऊन डेमोक्रॅट पक्षाच्या सेनॉर डा सिल्व्हा याचे प्रधानमंडळ अधिकारारूढ झाले. स. १९२३ च्या आगष्टमध्ये सेनॉर टेक्सीरा गोमेस हा डेमोक्रॅटिक पक्षाचा इसम पोर्तुगीज रिपब्लिक प्रेसिडेंट निवडून आला. १९२३ च्या डिसेंबर मध्ये, १९२४ च्या आगष्टमध्ये व १९२५ एप्रिलमध्ये राज्यक्रांतीचे प्रयत्‍न झाले, पण ते हाणून पाडून ताबडतोब शांतता प्रस्थापिण्यात आली.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .