विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
पोटंगी– मद्रास, विझागापट्टम जिल्ह्यांतील जमीनदारी तहशील. पूर्वघाटाच्या उतरणीवर पोटंगी वसलेले आहे. बहुतेक भाग पहाडी असून आसपास जंगल आहे. क्षेत्रफळ ६२५ चौ. मै. लो. सं. (१९०१) ७३०१३. खेडयांची संख्या ९२० असून जमीनदारीचे मुख्य ठाणे पोटंगी येथे आहे.