प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें 
        
पेन्सिली (लकडी)- यांना शिसपेन्सिली असेहि म्हणण्यात येते. पण आज आपण जीस काळी शिसपेन म्हणतो तिचा शिसे या धातूशी मुळीच काही संबंध नसून ती ग्रॅफाइट व माती यांची बनविलेली असते. प्राचीन ग्रीक व रोमन लोक कठिण लांकडाचा अथवा धातूचा तुकडा (स्टायलस) घेऊन मेणाच्या पाटीवर लिहीत असत. जेव्हां शिसे ही धातु सांपडली तेव्हां ते तिच्या पट्टया करून वापरू लागले. परंतु नेहमीच्या उपयोगासाठी ते अति त्रासदायी होई. एलिझाबेथ राणीच्या कालापूर्वी चितार्‍याच्या कुंचल्यासहि पेन्सिल म्हणत. ते कसेहि असले तरी इतके मात्र खास की ग्रॅफाइट किंवा प्लंबेगो एलिझाबेथ राणीच्या वेळीच पहिल्याने उपयोगात आले. ग्रॅफाइटची पहिली खाण तिच्या राज्यात इंग्लंडात कंबरलंड येथे सापडली आणि ते ग्रॅफाइट इतके शुद्ध होते की, त्यास शुद्ध केल्याशिवाय त्याच्या पाहिजे तशा कांडया कापता येऊन लिहिण्याच्या कामी उपयोगात आणता येत असत. नंतर एका मनुष्यास, त्याच्या बारीक चिपा करुन लाकडाच्या घरात बसविण्याची युक्ति सुचली. परंतु त्यामुळे शुद्ध ग्रॅफाइट लवकरच संपले व खाली त्याचा निव्वळ भुगा शिल्लक राहिला आणि त्या भुग्याचा उपयोग केल्यापासूनच आजच्या पेन्सिली बनविण्याच्या कृतीस सुरवात झाली. जेव्हां इ.स. १६६३त बरो डेलच्या खाणी सापडल्या तेव्हांपासूनच स्वाभाविकपणे इंग्लंडने बराच काळ पर्यंत ह्या धंद्याचा मक्ता भोगला. नंतर इ.स. १७६१ त जर्मनीतील प्रसिद्ध फेबर कुटुंबाने हा धंदा नूर्नबर्ग येथे आणिला. मि. कासपर फेबर नांवाच्या मनुष्याने प्रथम हा धंदा सुरू केला. ग्रॅफाइटचे कण गोळा होण्यासाठी तो एक चिक्कण पदार्थ वापरीत असे असे म्हणतात. जेव्हां त्याने प्रथम आपला कारखाना सुरू केला तेव्हां फक्त पंधराच मजूर कामास लावले होते. आज मात्र फेबर कुटुंबाने सर्व जगातील या धंद्याच्या बर्‍याचशा मोठ्या भागाचा मक्ता घेतला आहे. जर्मनीत पेन्सिलीचा पहिला कारखाना सुरू झाल्यानंतर वीस वर्षांनी प्रसिद्ध फ्रॅन रासायनिक शास्त्रज्ञ निकोलस जे कोन्ट (१७५५-१८०५) याने ह्या धंद्यात एक क्रान्ति घडवून आणिली. इंग्लंडशी युद्ध झाल्यामुळे फ्रान्सला प्लंबेगो मिळेना. त्याने ग्रॅफाइट व माती यांचे मिश्रण करुन प्लंबेगोच्या जागी उपयोगात आणून १७९५ साली आपले पेटंट काढले. बव्हेरियन सरकारनेहि आपला स्वत:चा एक कारखाना काढला आणि या धंद्याचा पाया बव्हेरियांत चांगला खोल घातला. ते संस्थान आजहि पेन्सिलींच्या कारखान्याचे जगातील केंद्र आहे. नूर्नबर्ग हे आजहि त्या धंद्याचे माहेरघर आहे ते तसेंच गेल्या शंभर वर्षांपासून चालत आले आहे. हल्ली जर्मनीत सव्वीसपेक्षा जास्त कारखाने असून जवळ जवळ पांच हजार लोक या कामी लागतात व निरनिराळ्या जातीच्या साठ लक्ष रुपयांच्या पेन्सिली बनवितात त्यापैकी एकटया हिंदुस्थानात एकषष्ठांश खपतात. जपान नुकतेच या क्षेत्रात येत आहे. परंतु स्वस्त पेन्सिली बनविण्यात नि:संशय त्याने आपले कौशल्य दाखविले आहे.

कृति.– सदरहू धंद्यास लागणारा माल म्हणजे (१) ग्रॅफाइट, (२) लांकूड व (३) माती. वर दर्शविल्याप्रमाणे शिसे ह्या धातूचा पेन्सिलीतील शिश्याशी काही संबंध नाही. ग्रॅफाइटला प्लंबेगो म्हणतात. त्यात शिसे (धातू) आहे अशी पुष्कळ दिवस समजूत होती व त्यामुळे हा घोटाळा नेहमी होत असतो. ग्रॅफाइट नैसर्गिकपणेच उत्पन्न होते. कंबरलंड येथे बरोडेलच्या खाणीत उत्तम ग्रॅफाइट हिरव्या रंगाच्या स्लेटसमधून सापडले होते. जर्मनीत पासान येथे बोहेमियात व स्टीरियात ते सापडते त्याचप्रमाणे ते युनायटेडस्टेस्टसमध्ये सापडते.

कोरियातील ग्रॅफाइट बर्‍याच अंशी हलक्या प्रकारचे आहे. हिंदुस्थानात ग्रॅफाइट त्रावणकोर, तिनेवेल्ली, कृष्णा, गोदावरी व विजगापट्टमच्या भागात, तसेच सिलोनमध्येहि सापडते. सिलोनमधील ग्रॅफाइट जगांतील उत्तमांत मोडते अशी ख्याति आहे. हिंदुस्थानांतून निर्गत होणारे ग्रॅफाइट शुद्ध करतात, कारण की ज्या धंद्यात ग्रॅफाइटचा उपयोग होतो त्या धंद्याविषयी हिंदुस्थानात अज्ञान आहे म्हणूनच जर हिंदुस्थानातीलच ग्रॅफाइट पेन्सिलीसाठी उपयोगांत घ्यावयाचे असेल तर ते परदेशांतूनच साध्या रीतीने शुद्ध करून आणले पाहिजे. याचा निर्गत व्यापार बराच मंदावला आहे व पुढे तर तो विशेषच मंदावेल, कारण की जगातील भिन्न भिन्न भागी ग्रॅफाइटच्या नवीन खाणी खोदण्याचे काम चालू आहे आणि कृत्रिम ग्रॅफाइट त्याच्याशी स्पर्धा करु पहात आहे.

आता मातीच्या प्रश्नासंबंधी विचार करताना हे लक्षांत ठेवले पाहिजे की, मातीची अचुक जात शोधून काढणे, ही कित्येक प्रयोजकांस व कारखानदारांस मोठी अडचण येऊन पडली आहे. खरोखरीच असे म्हणता येईल की मातीची जात व तिच्या मिश्रणाचे प्रमाण हे सदरहू धंद्याचे गुप्तांग समजले जाईल. त्याशिवाय इतर सर्व काही कृति केवळ यांत्रिक तर्‍हेची आहे. पूर्वी वर दर्शविल्याप्रमाणे मि. एम. कोन्ट याने १७९५ साली पेटंट काढीपर्यंत पेन्सिलीतील शिसे करण्यास मातीचा मुळीच उपयोग करीत नसत. या कृतीत सर्वांत मोठा फायदा हा आहे की, ग्रॅफाइट खडे किंवा भुगा कसेहि असो उपयोगात घेता येते आणि त्यात योग्य प्रमाणात माती मिसळल्यानंतर दाबाच्या साहाय्याने पाहिजे त्या आकाराच्या गोल, चौकोनी किंवा त्रिकोनी कांडया काढता येतात. मुख्यत: जास्त किंवा कमी माती घालून पाहिजे तितके कठिण किंवा मऊ शिसे करता येते. बाजारांत निरनिराळ्या प्रमाणात कठिण किंवा नरम अशा चाळीस प्रकारच्या पेन्सिली, निरनिराठया प्रमाणात माती मिसळून बनविलेल्या मिळू शकतात. मऊ माती म्हणजे उत्तम प्रकारची माती होय. भडोच व कलकत्ता येथील कारखानदारांनी निरनिराळ्या जातीच्या प्रयोगात पुष्कळ पैसे खर्च करुन उत्तम जात शोधून काढली आहे. उत्तम जातीची पाहिजे तसली माती हिंदुस्थानात विपुल आहे. कोन्ट याच्या पेन्सिली बनविण्याच्या कृतीचे पुढीलप्रमाणे साग्र वर्णन करिता येईल.

चुना किंवा रेती अगदीच नसलेली किंवा अगदीच थोड्या प्रमाणात असलेली अशी काळी किंवा पांढरी चिकट माती प्लंबंगो किंवा रंगदार पदार्थांना चिकाटी व मजबूती आणण्याकरिता वापरली जाते. ही माती शुद्ध करण्याकरिता पाण्याचा चांगला साठा असावा लागतो. लाकडी पिपांतून पाणी भरुन त्यात माती चांगल्या रीतीने कालविली असता थोड्या वेळानंतर जड असलेले कण खाली बसतात व शुद्ध व हलकी माती पाण्यावर काही वेळ तरंगत रहाते. ही माती पहिल्यातून दुसर्‍या पिपांत व दुसर्‍यांतून तिसर्‍यात अशा रीतीने सैफन नळीतून काढून घेतात, व ती त्यात रात्रभर राहू देतात. त्यानंतर पाणी व माती वेगळी झाल्यावर पाणी काढून टाकतात, व माती वेगळी करतात. ही माती पुढे मिश्रण करण्याकडे वापरतात. प्लंबेगो एका लोखंडी खलांत घालून ते चांगले बारीक केले पाहिजे. नंतर मुशीत ओतून ते चांगले पांढरे होईपर्यंत त्यास उष्णता दिली पाहिजे म्हणजे ते चांगले चकाकीत व मऊ होते. प्लंबेगोत माती कमी प्रमाणात मिश्र करुन मिश्रणास जर भट्टीत थोडी उष्णता दिली तर पेन्सिली नरम होतात व माती अधिक घातली तर त्या कठिण होतात. कोन्टने बनविलेल्या कित्येक उत्तम पेन्सिलीत दोन भाग प्लंबेगो व तीन भाग माती असे आणि इतर पेन्सिलीत दोन्ही भाग सारखेच असत. या मिश्रणामुळे पेन्सिलीच्या काळेपणात व काठिण्यात पाहिजे तसा बदल करता येतो. याप्रमाणे प्लंबेगो व माती यांचे मिश्रण तयार झाल्यावर त्याचा एक गोळा करून त्यास स्कुप्रेसमधील एका छिद्रातून दाबून काढले असता त्याच्या पेन्सिलीच्या आंतील कांडया तयार होतात. ह्या कांडया वाळवून नंतर त्यास भट्टीत घालून निरनराळ्या प्रमाणात पाहिजे तितकी उष्णता देतात. ह्या शिशाच्या कांडया निरनिराळ्या आकाराच्या व लांबीच्या लाकडी कांडयांत बसवून विकण्याकरिता पाहिजे तशी पेन्सिल तयार होते.

रंगीत पेन्सिली.– रंगीत पेन्सिली बनविण्याची कृति बहुतांशी वरील सारखीच आहे. फक्त ग्रॅफाइटच्या जागी एखादा चांगला एनीलीन रंग पाहिजे तितका भडक घ्यावा, आणि त्यात मेण व सरस किंवा लईसारखा एखादा चिकट पदार्थ वापरावा. काळ्या पेन्सिलीस भट्टीत उष्णता द्यावी लागते. परंतु हीस तसे काहीच करावे लागत नाही. जर हे मिश्रण बरेच तापवून काढले तर एनीलीन रंग, मेण व लई किंवा सरस यांसारखी यातील रासायनिक द्रव्ये एकदम जळून जातील, हाच या रंगाच्या पेन्सिलीत कमीपणा आहे. कारण त्या काळ्या पेन्सिलीतील शिश्याप्रमाणे कणखर व मजबूत राहू शकत नाहीत. साधारणपणे ७ रत्तल मेण व धुतलेली माती, एक रत्तल रंग आणि एकचतुर्थांश रत्तल सरस या प्रमाणांत घ्यावे. सर्व जिन्नस एका लोखंडी कढईत वितळवावे आणि ते वितळताना त्यास बारीक लाकडाच्या काडीने सारखे हलवीत राहिले पाहिजे. हे मिश्रण चांगले वितळून त्या रसाचा चांगला एकजीव होऊन गोळा झाला म्हणजे त्या मिश्रणास साधारण गाळ्यांत ठेवून वाळवावे आणि त्याच्या बारीक कांडया करून लाकडाच्या घरात बसवाव्या. इतर सर्व कृति पूर्वीप्रमाणेच आहे. हिंदुस्थानात आतापर्यंत रंगाच्या पेन्सिली करण्याचा कोणीहि प्रयत्‍न केल्याचे दिसत नाही. मात्र ग्रॅफाइटच्या पेन्सिली बनविण्याचे कारखाने बरेच निघाले असून अजूनहि निघत आहेत.

या धंद्यास लागणारा तिसरा व अतिशय आवश्यक पदार्थ म्हणजे लाकूड होय. हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांत लाकडाच्या बर्‍याच जाती पेन्सिलीस उपयुक्त अशा आहेत. परदेशांत विशेषत: जपान व जर्मनीत कनिष्ठ प्रकारच्या लाकडास मऊ करण्याची व रंग देण्याची स्वतंत्र कृति अशी आहे की जीमुळे ते रेड-सिडरसारखे दिसते.

पेन्सिली करण्यास लागणारी यंत्रसामुग्री दोन प्रकारची असते; एक शिसकांडया बनविण्याची व दुसरी पेन्सिली बनविण्याची. ग्रॅफाईट व माती ही दोन्ही चांगली शुद्ध झाल्यावर दोहोंचे योग्य प्रमाणात मिश्रण करावयाचे असते. त्यास शुद्ध व चकचकीत करणे या दोन्ही गोष्टी पाण्याच्या साहाय्याने कराव्या लागतात. ग्रॅफाईट व माती यांचे मिश्रण भट्टीत घालून तापविले असता बोरॅक्स वितळून निघतो व त्या मिश्रणात एकसारखा पसरतो आणि त्याचा पारदर्शक कांचेसारखा पदार्थ बनतो आणि शिश्यास एक प्रकारे काठिण्य व बळ देतो. मिश्रण पूर्णपणे करुन नंतर ते एका मळण्याच्या यंत्रात घालून मळतात आणि नंतर सर्व मिश्रण प्रवाही स्थितीतच फिल्टर प्रेसमध्ये घालवितात, त्यायोगे त्यातील पाणी निघून जाऊन बिनपाण्याचा ओला गोळा तयार होतो. नंतर या गोळ्याचे लहान लहान भाग करुन शिसे बनविण्याच्या (लेडप्रेस) यंत्रामध्ये ठेवितात. हे एक पोलादी वर्तुळाकार भांडे असून त्याच्या खाली किंवा बाजूस ज्या आकाराचे शिसे पाहिजे असेल त्या आकाराचे छिद्र असते; वरुन बर्‍याच जोराने शिशास दाब दिला असता खालील छिद्रांतून सापासारखे वाकडे बारीक शिसे निघू लागते. ते काळजीपूर्वक संभाळून, सरळ करून, पाहिजे त्या लांबीचे तुकडे तयार करितात. चांगले वाळल्यावर त्यास भट्टीत घालून ज्यामानाने काठिण्य पाहिजे असेल तितकी उष्णता देतात. त्यास लागणारी यंत्रे:- (१) दळणारे अथवा पीठ करणारे यंत्र, (२) गाळणारे यंत्र (फिल्टर प्रेस), (३) शिसे दाबण्याचे यंत्र अथवा ग्रॅफाइटचा दोरा काढणारे यंत्र (हैड्रोलिक प्रेस) व (४) झाकणांची भट्टी व मुशी, इत्यादि.

लाकूडखात्यात पहिले काम म्हणजे लाकडे कापून त्याच्या फळ्या करुन नंतर त्यांच्या चिपा करणे हे होय. जपानी पद्धत अशी आहे की, पेन्सिलीच्या लांबीइतके व तिच्या परिघापेक्षा किंचित अधिक जाड असे दोन चौकोनी लाकडाचे तुकडे घेऊन एका बाजूस मधोमध शिसे राहण्यास छिद्रे पाडतात. छिद्रे पाडण्याचे काम हाताने किंवा यंत्राने होते. शिसे घातल्यानंतर सरस लावून दोन्ही भाग जोडतात आणि सरस वाळेपर्यंत काही तास त्यास प्रेसमध्ये दाबून ठेवितात. नंतर पेन्सिली अर्धवर्तुळाकार चाकूने गोल करतात. नंतर त्यास काचकागदाच्या यंत्रात घातल्यामुळे गुळगुळीतपणा येतो. येथेच त्याची दोन्ही टोके कापून जरूर असल्यास पॉलिश करतात आणि शेवटी शिक्का मारतात. जर्मन कृतीत एका चिपेऐवजी सहा पेन्सिलीइतकी रुंद चीप घेऊन तिची लांबी व जाडी जपानी पद्धतीप्रमाणेच घेतात. एका ऐवजी सहा सारखी छिद्रे छिद्र पाडण्याच्या यंत्रात पडतात. सहा शिश्याचे तुकडे ठेवून दोन चिपा उत्तम प्रकारे बनविलेल्या सरसाने चिकटवून बांधतात व त्या बांधलेल्या चिपा मजबूत प्रेसमध्ये दाबून काढतात. नंतर त्यास मोल्डींग किंवा आकार (शेपिंग) देणार्‍या यंत्रात घालतात. तेथे प्रथम त्यांची एक बाजू जलद फिरणार्‍या चाकूने अर्धवर्तुळाकार होते. नंतर ती बाजू उलट फिरवून सहा पेन्सिली यंत्रातून बाहेर येतात. स्वस्त पेन्सिली वॉर्निशवाचूनच विकतात कारण एक तर त्यांना सहा पुटे दिली तरी सुद्ध उत्तम वार्निश होत नाही व दुसरे उत्तम उत्तम वॉर्निश करणे ही मोठ्या खर्चाची बाब होय. येथे याविषयी हे लक्ष्यात ठेविले पाहिजे की रेडसिडारला फक्त दोन किंवा तीन पुटे दिली असता उत्तम पॉलिश होते. शिक्के मारण्याचे काम उष्ण पोलादी ठशाने होते आणि स्वस्त रूपेरी व सोनेरी भुकटया (ज्या स्वस्त धातूपैकी शिल्लक राहिलेल्या असतात) यांचा उपयोग करतात. ह्या कृतीस लागणारी यंत्रसाधने येणेप्रमाणे:- (१) लाकूड कापणारे यंत्र (लहान किंवा मोठ्या लागतील तशा करवती), (२) छिद्रे पाटणारे यंत्र, (३) गोलाकार देणारे यंत्र, (४) कांचकागदाचे यंत्र, (५) टोके गुळगुळीत करणारे यंत्र, (६) रंग किंवा वॉर्निश करणारे यंत्र व (७)  शिक्के मारणारा दाब.

आतापर्यंत पेन्सिली बनविण्यासाठी मिरज, सातारा, पुणे, अनकपल्ली, विम्लीपट्टम (मद्रास), मुंबई, धारवाड, वगैरे ठिकाणी कारखाने सुरू करण्यात आले. हिंदुस्थानात दरसाल अजमासे तीस लक्ष ग्रोस पेन्सिली खपतात. त्याकरिता अजमासे १० लक्ष रुपये परदेशी जातात. पुढील पंचवीस वर्षात सरकारच्या प्राथमिक सक्तीच्या शिक्षणाच्या धोरणामुळे तर हा खप अतिशयच वाढेल. तेव्हां रोज १०० ग्रोस पेन्सिली बनविणारे असे चाळीस कारखाने चालण्यास तरी मुळीच काही हरकत नाही. [ ले. एन. एन. गोडबोले. ]

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .