प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें 
        
पेंढ्या आणि पत– पेढीवाला म्हणजे पैशाचा किंवा भांडवलाचा व्यापारी. पैशाची देवघेव करणारा सराफ म्हणजेच पेढीवाला. सावकार व पेढीवाला यांमध्ये मोठा फरक आहे. सावकार स्त:चा पैसा लोकांस व्याजाने देण्याचा फक्त एकतर्फीच व्यवहार करतो. परंतु पेढीवाला लोकांपासून ठेवी हलक्या व्याजाने घेतो, उलट भारी व्याजाने लोकांना कर्जाऊ रकमा देतो; व शिवाय हुंडया पोहोचविण्याचे काम करतो, तात्पर्य, हुंडीवाल्याची सचोटी व पत फारच असावी लागते. पेढीवाल्यांचा धंदा सावकारीपेक्षा फार व्यापक स्वरूपाचा असल्यामुळे पेढीवाले सावकारापेक्षा फार मोठाल्या रकमा कर्जाऊ देऊ शकतात. प्रत्यक्ष सरकारला लागणारे अवाढव्य कर्ज पेढीवाले देऊ शकतात म्हणून या वर्गाला समाजामध्यें वजन व प्रतिष्ठा चांगली असते. खुद्द पेशवे सरकारला अशा पेढीवाल्यांचे अतोनात कर्ज झालेले होते, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.

अलीकडे पेढयांचे तीन प्रकार अस्तित्वांत आले आहेत:- (१) खाजगी, (२) संयुक्त भांडवलाच्या, व (३) सरकारी. खाजगी असलेच तर फार थोडे भागीदार असतात व या भागीदारांच्या हातात सर्व व्यवस्था असते. संयुक्त भांडवलाच्या पेढीचे पुष्कळ भागीदार असतात ते सर्व स्वत: पेढीची व्यवस्था पाहात नाहीत; तर आपल्यांतील थोड्या जणांस पेढीचे डायरेक्टर नेमतात व डायरेक्टरांच्या हाती सर्व व्यवस्था असते. तिसरा प्रकार सरकारी पेढयांचा, अशा पेढया शेतकर्‍यांच्या फायद्याकरिता सरकार स्वत: काढते, किंवा सामान्य जनतेच्या उपयोगाकरिता सरकारी पोष्टखात्यामार्फत पेढीचे काम करते.

अर्वाचीन काळी पेढी ही मुख्यत: चार प्रकारची कामे करते:- (१) लोकांच्या ठेवी ठेवणे, (२) गिर्‍हाईकांस व्याजाने पैसे देणे, (३) चलनी नोटा काढणे, आणि (४) लोकांचे पैसे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचते करणे, यासच हुंडीचा व्यापार म्हणतात. आपल्याकडे वरच्यापैकी चवथे हेच पेढीचे मुख्य कर्तव्य समजले जाते, व `पेढी’ शब्द उच्चारल्याबरोबर हुंडीचा व्यापार करणारी संस्था हा अर्थ प्रथमत: मनात येतो. पेढीच्या या कर्तव्याचे स्वरुप अगदी उघड आहे. पुष्कळ माणसांस केव्हांना केव्हां तरी दुसर्‍या दूरच्या ठिकाणी किंवा परदेशासहि पैसा पाठविण्याची गरज पडते. खाजगीरीत्या पैसा पाठविण्यास तितका विश्वासू माणूस मिळणे कठिण आणि मिळाला तरी प्रवासखर्चहि फार येतो. तसेच आपण काशी, बनारस या दूर गांवी किंवा जपान, अमेरिका, इंग्लंड वगैरे परदेशी प्रवासास निघालो असता खर्चाकरिता लागणारी मोठी रक्कम प्रवासात बरोबर घेणे त्रासाचे व धोक्याचेहि असते. अशा वेळी पेढीमार्फत पैसे पाठविता येतात. येथे पेढीवाल्याकडे पैसे भरले म्हणजे तो दर्शनी हुंडी देतो व ती हुंडी परगांवच्या किंवा परदेशातील त्या पेडीच्या शाखेकडे किंवा दुसर्‍या ज्या पेढीवर हुंडी दिली असेल त्या पेढीवर नेऊन दिली की, हुंडीत लिहिलेले पैसे रोख मिळतात. पेढीवाला या कामगिरीबद्दल थोडीशी हुंडणावळ घेतो. हा हुंडणावळीचा दर पोस्टाने किंवा य्माणसाबरोबर पैसे पाठविण्याच्या खर्चापेक्षा कमी असला पाहिजे व असतोहि. अशा रीतीने पेढीवाल्यांनी एकमेकांच्या हुंडया स्वीकारल्या म्हणजे पैसे रोख न पाठविता पैशाची देवघेव नुसत्या कागदपत्राने होते. पेढीवाल्यांनी फक्त वर्षअखेर एकदा एकमेकांकडे कमजास्त बाकी निघेल तेवढी रक्कम रोख पाठविली म्हणजे झाले.

पेढीचे दुसरे कर्तव्य म्हणजे सोनेरुपे किंवा स्थावर मिळकत गहाण घेऊन, किंवा नुसत्या पतीवर कर्जाऊ पैसे देणे. शिवाय मुदतीची हुंडी किंवा प्रॉमिसरी नोटीबद्दल कसर कापून घेऊन रोख पैसे देणे व नंतर मुदत भरल्यावर पैसे वसूल करणे. यालाहि गहाण घेऊन पैसे देण्याचाच एक प्रकार म्हणता येईल. तिसरे पेढीचे कर्तव्य ठेवी ठेवण्याचे. अशा ठेवी चालू खात्यावर (करंट डिपॉझिट) किंवा ठराविक मुदतीच्या (फिक्स्ड डिपॉझिट) असतात, व त्यांवरील व्याजाचे दर निरनिराळे असतात. हे ठेवीचे पैसे पेढीवाले दुसर्‍यांना व्याजाने कर्जाऊ देतात. ठेवीवर व्याज कमी देऊन कर्जावर व्याज अधिक घेतात. व्यापाराच्या द्दष्टीने हे पेढीचे काम फार महत्वाचे होय.

पेढीचे चवथे काम चलनी नोटा काढणे. यूरोपांतील सर्व सुधारलेल्या राष्ट्रांतील पेढयांस हा नोटा काढण्याचा अधिकार दिलेला असतो. हा अधिकार फार महत्वाचा असल्यामुळे त्यावर सरकारची देखरेख असते; व पेढयांनी कोणत्या अटीवर कितीपर्यंत नोटा काढाव्या याबद्दल सक्त नियम असतात. हिंदुस्थानांतील पेढयांस हा अधिकार नसून चलनी नोटा काढण्याचा सर्व अधिकार सरकारने आपल्या हातांत ठेवला आहे. येथे सरकारचें चलनी नोटांचे एक स्वतंत्र खाते आहे. परंतु दुसर्‍या देशात चलनी नोटा काढणे हे पेढीचे एक महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी असते. त्यामुळे पेढयांस देशातील व्यापारधंद्यास वाटेल तितके भांडवल पुरविण्याचे सामर्थ्य येते. येथे सरकारी चलनी नोटा व बँक-नोटा यांच्यामधील फरक लक्षात ठेवणे जरूर आहे, तो येणेप्रमाणे– (१) तत्त्वत: व व्यवहारत: बँक- नोटीचे रोख पैसे केव्हांहि मिळण्यासारखे असतात. सरकारी नोटांचे तसे नसते. सरकार धातूच्या नाण्यापेक्षा कागदी नोटा अधिक काढते, त्यामुळे सर्व नोटांचे एकदम पैसे मिळणे शक्य नसते, पण तसा प्रसंगहि सहसा येत नाही. (२) बँक-नोटा फक्त व्यापारी देवघेवीपुरत्याच काढतात. परंतु सरकारी नोटा खर्च चालविण्याकरिता व पैशाच्या टंचाईच्या मानाने वाटेल तितक्या सरकार काढते. (३)  बँक- नोटा या, नांवाप्रमाणे, विशिष्ट बँकेच्या नांवाच्या असतात, पण चलनी नोटा सरकारच्या नांवाच्या असून त्या सर्व प्रकारच्या खाजगी व सार्वजनिक व्यवहारात चालतात, तथापि बँक-नोटांवर सरकारी कायद्याचे नियंत्रण असल्यामुळे त्यांची किंमत कमी होण्याचा कधीच संभव नसतो. असा बर्‍याच वर्षांचा अनुभव आल्यामुळे यूरोपातील पुष्कळ सरकारे स्वत: चलनी नोटा न पाडता बँकाच्या मार्फत नोटा पाडवितात. लोकहि बँकानी नोटा पाडण्याला संमति देतात; कारण बँकेची पत जाऊन दिवाळे नेघेल या भीतीने पेढीवाले प्रमाणाबाहेर नोटा सरकारने आग्रह केला तरी पाडणार नाहीत अशी खात्री असते.

पाश्चात्त्य पेढया चाइतिहास:- पेढीवाला हा शब्द आपल्याकडे फार जुना आहे; परंतु सर्व पेढीवाले खाजगी लोक असत; त्यात भागीदार केव्हां केव्हां असत; पण ते फार थोडे असत. पहिल्या प्रथम यूरोपमध्येहि असाच प्रकार झाला. परंतु खाजगी कामात कर्ता मनुष्य मेला म्हणजे त्याचा मुलगा कर्ता निघेलच असा नेम नसतो, म्हणून धंदा बुडण्याचा फार संभव असतो. संयुक्त भांडवलाच्या उद्योगाचे तसे नसते. एक मॅनेजर मेला तर दुसरा चांगला नेमता येतो; व अशा तर्‍हेने उद्योगाच्या कायमपणास धक्का येत नाही. तसेच संयुक्त भांडवलाच्या तत्त्वामुळे भांडवल पुष्कळ जमा होऊ शकते व त्यावर देखरेख अनेक जणांची राहिल्यामुळे लबाडीस फारशी जागा राहात नाही. असे अनेक फायदे असल्यामुळे पेढीचा धंदा संयुक्त भांडवलाच्या तत्त्वावर चालविणे जास्त सोईस्कर असते.

१६ व्या शतकामध्ये अमेरिका व हिंदुस्थान यांचा शोध लागल्यापासून यूरोपातील स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड व इंग्लंड या देशांस फार महत्त्व आले. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया वगैरे खंडात वसाहती स्थापन होऊ लागल्यामुळे मालाची ने-आण व पैशाची देवघेव मोठ्या प्रमाणावर सुरू झाली व पेढया काढण्यास फार अनुकूल काल आला. आमस्टरडाम येथे १६०९ साली एक मोठी पेढी सरकारच्या आश्रयाखाली निघाली. इंग्लंडमध्ये पेढयांची उत्पत्ति निराळ्या कारणांनी झाली. पूर्वीच्या काळी लोक आपला पैसाअडका व सोन्यारूप्याची शिल्लक सुरक्षितपणाकरिता लंडन येथील सरकारी तिजोरीत ठेवीत असत; परंतु १६४० साली पहिल्या चार्लस राजाने लोकांचे पैसे बळजबरीने तिजोरीतून काढून आपल्या कामास लावले. त्यामुळे प्रजेचा राजावरील विश्वास उडाला; व लोक खाजगी रीतीने सराफाजवळ आपली शिल्लक ठेवू लागले. तेव्हां ठेवीवाल्यांस व्याज देऊन ठेवीची रक्कम सराफ व्यापार्‍यांस कर्जाऊ देऊ लागले व अशा रीतीने पेढयांचा धंदा सुरु झाला. पुढे काही वर्षानंतरचा इंग्लंडचा राजा तिसरा विल्यम हा मूळ हॉलंडचा रहिवाशी असल्यामुळे त्याला पेढीच्या धंद्याची चांगली माहिती होती. त्याला यूरोपातील लढायांकरिता कर्जाची जरूरी लागली तेव्हां लोकांस सवलती देऊन व पार्लमेंटची मंजूरी मिळवून त्याने बँक ऑफ लंडन नावाची पेढी १६९४ साली स्थापन करविली. या बँकेचे मूळ भांडवल बारा लक्षांचे होते. पुढे ते कोटीपर्यंत गेले. नंतर सरकारने या बँकेस चलनी नोटा काढण्याचाहि अधिकार दिला. या बँकेच्या मदतीमुळे व पतीमुळेच सरकारला मोठमोठ्या खर्चाच्या चालविता आल्या. संयुक्त भांडवलाच्या तत्त्वावर निघालेली ही पहिलीच पेढी असल्यामुळे तिजबद्दल लोकांमध्ये पुष्कळ गैरसमज होता. अ‍ॅडाम स्मिथसारखा अर्थशास्त्रवेत्तासुद्धा या संयुक्त भांडवलाच्या तत्त्वास अनुकूल नव्हता. खाजगी पेढीवाले या निमसरकारी पेढीचा हेवा करीत असत. या बँकेच्या पुष्कळशा चलनी नोटा समवून त्या बँकेकडे एकदम नेऊन बँकेची फजीती करण्याचेहि त्यांनी प्रयत्‍न केले. परंतु बँकेच्या चोख व्यवहारामुळे सर्व गैरसमज दूर होत गेले. बँकेचे सर्व हिशेब आठवडयाच्या आठवडयास प्रसिद्ध होत असत. बँकेचे येणे किती, देणे किती व शिल्लक किती याचे आढावा दर आठवडयास निघत असल्यामुळे लबाडी होण्याचा मुळीच संभव नव्हता. बँक ऑफ इंग्लंडचे हे उत्तम उदाहरण डोळ्यापुढे असल्यामुळे संयुक्त भांडवलाच्या पेढया पुढे पुष्कळ निघाल्या व त्या पिढयानुपिढया टिकल्या.

हिंदी पेढयांचा इतिहास.– हिंदुस्थानात, ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यापूर्वी, व्यापाराला व शेतकीला भांडवल पुरविण्याचा धंदा आणि सामान्य सावकारीचा धंदा बनिया, मारवाडी, मद्रासेकडील चेट्टी, मुंबईमधील पारशी व भाटे लोक यांच्या हाती होता; हुंडीचा व्यापारहि यांच्यापैकी पेढीवाले लोक करीत असत. हे आपल्या हुंडया महाजनी नांवाच्या लिपीत लिहीत असत. ही लिपी इतरांना वाचता येत नसे. हुंडी नाकारल्याची उदाहरणे फार क्वचित घडत. अलीकडे संयुक्त भांडवलाच्या पेढया निघाल्या आहेत तरी या खाजगी पेढीवाल्यांचा धंदा कमी झालेला नाही.

वरिल खाजगी पेढयांखेरीज अलीकडे हिंदुस्थानात (१) इंपीरियल बँक, (२) हिंदुस्थानात व परदेशात धंदा करणार्‍या एक्सचेंज बँका व (३)  इंडियन जॉईंट स्टॉक बँका, अशा तीन प्रकारच्या पेढया निघाल्या आहेत. हिंदुस्थानात ईस्ट इंडिया कंपनीने व इतर यूरोपीय कंपन्यांनी व्यापार सुरू केल्यापासून त्यांना या देशात पेढया काढण्याची जरुरी भासू लागली. कंपनी सरकारचे राज्यकारभार येथे सुरु झाल्यापासून तिला अशा पेढयांची जरूरी फारच लागू लागली. त्यामुळे लवकरच १८०९ साली बँक ऑफ बंगाल स्थापन झाली. या बँकेच्या मूळ पाच लाख पौंडापैकी एक लाख पौंड भांडवल सरकारचे होते, व बँकेच्या व्यवस्थेत सरकारचा प्रत्यक्ष हात असे. बँक ऑफ बाँबे १८४० साली व बँक ऑफ मद्रास १८४३ साली निघाल्या.

प्रेसिडेंन्सी बँका:- स. १८७६ मध्ये प्रेसिडेन्सी बँक्स अ‍ॅक्ट नांवाचा कायदा पास होऊन या बँकांच्या कामकाजावर अधिक नियंत्रण घालण्यात आले व त्याबरोबर त्यांना फायदेशीर सवलती देण्यात आल्या. श. १८७६ पर्यंत सरकारची शिल्लक याचा बँकांत ठेवीत असत. पण ती व्यापारात गुंतविल्यामुळे वाटेल त्यावेळी सरकारला पैसा मिळण्यास पंचाईत पडे. त्याबद्दल हिंदुस्थान सरकारने स्टेट सेक्रेटरीकडे तक्रारी करुन प्रत्येक प्रांतात स्वतंत्र सरकारी खजिने काढण्याची परवानगी मिळविली. परंतु प्रेसिडेन्सी बँकांना सवलत म्हणून बिनव्याजी सरकारी शिल्लक कमीत कमी किती ठेवलीच पाहिजे ते ठरविले. शिवाय स. १८७६ च्या कायद्याने बँकेच्या डायरेक्टरांची संख्या व त्यांची लायकी काय असावी, बँकेने कोणत्या प्रकारचे व्यवहार करावे व कोणते करू नये, कोणत्या हद्दीत व्यवहार करावा वगैरे गोष्टीहि ठरविल्या. वरील नियंत्रणे पडल्यावर सवलत म्हणून प्रेसिडेन्सी बँकांनी इंग्लंडमध्ये शाखा काढून ठेवी घेण्याचा धंदा सुरू करुन आपले भांडवल वाढविण्याची परवानगी सरकारकडे मागितली. परंतु त्याविरुद्ध स्टेट सेक्रेटरीकडे एक्सचेंज बँकांनी तक्रारी केल्यामुळे सदरहू प्रेसिडेन्सी बँकांना मिळाली नाही. तथापि सरकारचा प्रत्यक्ष आश्रय व देखरेख त्यांच्यावर असल्यामुळे त्यांचा धंदा उत्कृष्ट चालला आहे व देशातील बहुतेक व्यापारात त्यांचेच भांडवल गुंतलेले असते. शिवाय सरकारी शिल्लक ठरलेल्या मर्यादेपेक्षा पुष्कळ अधिक त्यांच्या जवळ असते. बँक ऑफ इंग्लंडप्रमाणे प्रत्यक्ष सरकारी बँक हिंदुस्थानात नसल्यामुळे या प्रेसिडेन्सी बँकांनाच सरकारच्या आश्रयाचा सर्व फायदा मिळत असतो.

इंपीरियल बँक:- या तिन्ही प्रेसिडेन्सी बँका एकत्र करुन (जानेवारी १९२१ पासून) इंपीरियल बँक ऑफ इंडिया नांवाच्या कायद्याअन्वये एक इंपीरियल बँक बनविण्यात आली असून तिच्या शाखा मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद, अहमदनगर, वसई, भडोच, धुळे, हुबळी, हैद्राबाद, इंदूर, जळगांव, कराची, नाशीक, पुणे, सोलापूर, सुरत, अलाहाबाद, बंगलोर, बनारस, भोपाल, कोलंबो, दिल्ली, ग्वालेर, लाहोर, नागपूर, पाटणा, पेशावर, क्वेटा, रंगून, सिमला, वगैरे १५० ठिकाणी काढण्यात आल्या आहेत. पूर्वी तीन प्रेसिडेन्सी बँका मिळून ३.३/४ कोटी रु. भांडवल (५०० रु. एकेक मिळून) होते. आता नव्या कायद्याने इंपीरियल बँकेला आणखी ७.१/२ कोटीचे भांडवल वाढविण्याची परवानगी मिळाली आहे. या बँकेचे नवे शेअरहि प्रत्येकी ५०० रुपयांचा असून त्यापैकी १२५ रुपये भागीदाराकडून वसूल केलेले आहेत. बँकेचा रिझर्व्ह फंड ४,५७,५०,५०० असून १९२४ जूनच्या बँलन्स शीटमध्ये सरकारी शिल्लक २,०८,२२,०९८ रु. असून इतर ठेवी ७६,६२,४४,८०७ रुपयांच्या आहेत. इंपीरियल बँकेच्या कायद्याची कलमे बहुतेक प्रेसिडेन्सी बँकेच्या कायद्याप्रमाणेच आहेत. मात्र इंपीरियल बँकेचे ऑफिस लंडनला ठेवून इंग्लंडात कर्ज काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय या बँकेशी इंडियाच्या स्टेट सेक्रेटरीने पुढीलप्रमाणे व्यवहार करण्याचे ठरविले आहे. (१) सरकारचे सर्व बँकविषयक व्यवहार इंपीरियल बँकेशी करावे. (२) सरकारच्या मुख्य ठाण्यामध्ये रिझर्व्ह ट्रेझरींची पद्धत बंद करुन सरकारी खजिन्याची शिल्लक इंपीरियल बँकेत ठेवावी. (३) सरकारी कर्जा (पब्लिक डेट) संबंधी व्यवस्था या बँकेने करावी; वगैरे.

एक्सचेंज बँका (सराफी पेढया):- या मोठाल्या यूरोपीयन पेढया असून त्यांचा धंदा हिंदुस्थानात व इतर पौर्वात्य देशात फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. या संस्था सुमारे साठ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या असून हिंदुस्थानचा परदेशाबरोबर चालणारा व्यापार यांनी पुरविलेल्या भांडवलावर चालतो. पण येथील एक्सचेंज बँका या केवळ शाखा असून या बँकांच्या मूळ मुख्य कचेर्‍या लंडन येथे आहेत. आरंभी या बँकांचे भांडवल परदेशातल्या विशेषत: लंडनमधील लोकांच्या ठेवीवर उभारलेले असे. परंतु अलीकडे खुद्द हिंदुस्थानातहि ठेवीच्या द्वारे त्यांना पुष्कळ भांडवल मिळू लागले असून ही रक्कम स. १८९५ = १०३० लाख, १९०५ = १७०४ लाख, १९१५ = ३३५४ लाख, १९२२ = ७३३८ लाख अशी झपाटयाने वाढली आहे. तथापि या बँकांचे मुख्य काम हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यामधील आयातनिर्गत व्यापारी मालाच्या किंमतीची देवघेव करण्याचे असते.

एक्सचेंज बँका किंवा त्यांच्या शाखा पुढील आहेत:- चार्टर्ड बँक आॉफ इंडिया, आस्टे्लिया व चायना; नॅशनल बँक ऑफ इंडिया, मर्कंटाईल बँक ऑफ इंडिया, ईस्टर्न बँक, हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन, इंटर नॅशनल बँकिंग कार्पोरेशन, याकोहामा स्पीशी बँक, रुसो एशियाटिक बँक वगैरे. या पेढया आयातनिर्गत मालाच्या व्यापार्‍यांना आर्थिक मदत करतात. निर्गत मालाच्या हुंडया या बँका विकत घेऊन त्या इंग्लंडात व इतर देशात वटावतात. तसेच आयात मालासंबंधी हुंडया विलायतेतील व्यापार्‍यांजवळून विकत घेतात. पण हिंदुस्थानचा निर्गत माल आयात मालापेक्षा नेहमी जास्त असल्यामुळे विलायती व्यापार्‍यांच्या हुंडया कमी पडतात व ती तूट स्टेट सेक्रेटरीने हिंदुस्थान सरकारवर काढलेल्या हुंडया विकत घेऊन भरुन काढतात. पण सरकारी हुंडयावर केवळ अवलंबून राहिल्यास स्टेट सेक्रेटरी हुंडयांचा दर वाढवील म्हणून या पेढया साव्हरिन नाणे किंवा सोन्यारुप्याच्या लगडी हिंदुस्थानात पाठवितात.

जॉईंट स्टॉक बँका.– स. १९०६ पूर्वी या प्रकारच्या देशी भांडवलाच्या बँका फार थोड्या होत्या. पुढे या बँकाची संख्या ३७६ झाली. त्यानंतर स्वदेशीच्या तत्त्वास उत्तेजन मिळाल्यापासून १९१० सालपर्यंत चार वर्षांतच या बँकांपैकी बर्‍याच बँका फक्त बँकेचे व्यवहार करीत असत. पण कित्येक बँका इतर अनेक प्रकारच्या व्यवहारातहि शिरत. त्यामुळे कांही बँकांच्या व्यवहारांबद्दल तज्ज्ञ लोकांच्या मनात शंका उत्पन्न झाली होती. पुढे स. १९१३ त पीपल्स बँक ऑफ इंडिया हिचे प्रथम दिवाळे वाजले आणि त्यामुळे जनतेचा विश्वास उडून लवकरच ४७६ पेढयांपैकी लहानमोठ्या मिळून २४ बँकांची दिवाळी निघाली, पण त्यानंतर लवकर पुन्हां विश्वास उत्पन्न होऊन असल्या बँकांचे व्यवहार सुरळीत चालू लागले. पण पुन्हां स. १९२३ च्या एप्रिलमध्ये अलायन्स बँक ऑफ सिमला हिने दिवाळे काढले. या फार जुन्या बँकेच्या दिवाळ्याचा इतर बँकांवर अनिष्ट परणिाम झाला असता; पण सरकारने इंपीरियल बँकेमार्फत अलायन्स बँकेच्या ठेवीवाल्यांना शे. ५० इतकी रक्कम परत देवविण्याची व्यवस्था केली, त्यामुळे दिवाळ्याचे अरिष्ट अधिक फैलावले नाही. हल्ली या प्रकारच्या बँका आहेत; त्या:- अलाहाबाद बँक हीच (पी. अँड ओ. बँकिंग कार्पोरेशन); (भांडवल ३५ लाख), बरोडा बँक (२९ लाख), इंडिया बँक (१०० लाख), मोर्वी बँक (५५), म्हैसूर बँक (२०), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (१६८), कराची बँक (२), औंध अँड कमर्शियल बँक (५), पंजाब नॅशनल बँक (३०), यूनियन बँक ऑफ इंडिया (५९)  इत्यादि. १९१८ साली टाटा इंडस्ट्रियल बँक स्थापन झाली होती ती १९२३ साली सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अंतर्भूत करण्यात आली.

पोस्टल सोव्हिंग बँका.- १८३३ साली कांही व्यापारी पेढया बुडाल्या, तेव्हां मध्यम व गरीब स्थितीतल्या लोकांना बिनधोक्याने पैसे ठेवता यावे म्हणून सरकारने या बँका काढल्या. त्यांची व्यवस्था प्रेसिडेन्सी बँकांकडे बराच काल होती, ती पुढे पोस्टऑफिसांकडे देण्यात आली. याप्रमाणे सरकार बडे सावकार बनले असून युद्धाच्या वेळच्या वारबाँडसारखे रोखे काढून विशेष सवलतीने लोकांना ठेवी ठेवण्यास उत्तेजन देते. सरकारवर विश्वास पूर्ण असून मध्यंतरी देशी बँकांनी दिवाळी काढल्यामुळे तर पोस्टल सोव्हिंग बँकांत हलके व्याज मिळते तरी पैसे ठेवण्याची लोकांची प्रवृत्ति फार आहे.

कोऑपरेटिव्ह सोसायटया (सहकारी पतपेढया).– हिंदुस्थानात शेकडा ६० लोक शेतकीवर उपजीविका करणारे असून साधारणत: कंगाल स्थितीत आहेत. शिक्षण व दूरद्दष्टि नसल्यामुळे हा वर्ग बहुतेक कर्जबाजारी आहे व दुष्काळाच्या सालीच नव्हे तर सामान्य पिकाच्या सालीहि शेतकीला बैल, पेरणीला बी वगैरे विकत घेण्याकरिता या वर्गाला सावकार पहावा लागतो. सावकार जबर व्याज आकारुन व्याजमुद्दल मिळून देण्याच्या पायी शेतकर्‍यांचे घरदार, गुरेढोरे, यांची वाट लावतो. हा सामान्य प्रकार टळावा म्हणून शेतकर्‍यांचा कायदा (डेक्कन अ‍ॅग्रिकल्चरिस्ट रिलिफ अ‍ॅक्ट) सरकारने केला. तसेच शेतकी बँका काढून हलक्या व्याजाने कर्ज देण्याची योजना सर डब्ल्यू. वेडरबर्न व कै. रानडे यांनी उपस्थित करुन त्याला व्हाइसराय लॉर्डरिपन याने सम्मति दर्शविली; पण तत्कालीन स्टेटसेक्रेटरीने ती नापसंत ठरविली. पुढे स. १९०० च्या सुमारास लागोपाठ दोन दुष्काळ पडून शेतकर्‍यांची स्थिति फार खालावल्यामुळे व्हॉइसराय लार्ड़ कर्झनने एकदोन कमिशने नेमून त्यांच्या रिपोर्टानुसार १९०४ साली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटयांचा कायदा पास केला. त्यांची कलमे : (१) लहान किंवा मोठ्या गांवातील एकाच वर्गातील किंवा जातीतील कोणाहि दहा इसमांची कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून रजिस्टर करुन घेता येईल. (२) सोसायटीने सभासदांच्या ठेवी सभासदेतरांचे, सरकारचे व इतर कोऑपरेटिव्ह सोसायटयांचे कर्ज घेऊन फंड जमवावा व त्यांतून सभासदांना किंवा रजिस्ट्रारच्या परवानगीने इतर कोऑपरेटिव्ह सोसायटयांना कर्ज द्यावे. (३) अशा सोसायटया स्थापून त्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता सरकारने प्रत्येक इलाख्यात एक रजिस्ट्रार नेमावा. (४) खेडयांतील सोसायटयांनी सभासदांना डिाव्हिंडंड न देता दरसाल फायदा होईल त्याचा रिझर्व्ह फंड जमवावा, व हा फंड विशिष्ट रकमेवर गेल्यावर दरसालच्या फायद्यातून बोनस वाटावा. (५) शहरातील सोसायटयांनी फायद्यापैकी एकचतुर्थांश रिझर्व्ह फंडात टाकून मग डिव्हिडंड द्यावा. वगैरे. याप्रमाणे रजिस्ट्रार नेमले जाऊन सोसायटया चालविण्यात आलेला अनुभव लक्ष्यांत घेऊन १९१२ साली या कायद्यात काही दुरुस्त्या झाल्या. अशा सोसायटयांचे काम करणारी एक ५ ते ९ इसमांची मॅनेजिंग कमिटी व सेक्रेटरी असते. शेतकर्‍यांशिवाय इतर धंद्याच्या लोकांच्याहि सहकारी पतपेढया निघालेल्या आहेत. उदाहरणार्थ, पुण्याची कॉसमॉस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी; ही बहुतेक सरकारी नोकरांची आहे. स. १९१९च्या सुधारणाकायद्याने हा विषय प्रांतिक व दिवाणांच्या अधिकारातला बनल्यानंतर आतापर्यंतचा अनुभव लक्ष्यांत घेऊन मुंबई कायदेकौन्सिलमध्ये स. १९२५त कोऑपरेटिव्ह सोसायटयांच्या नवीन कायद्यावर वादविवाद चालू आहे [ गो. चि भाटे– अर्थशास्त्र; शं. रा. खांडेकर– पेढीचे व्यवहार व इतिहास. ]

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .