प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें      
 
पूर्वआफ्रिका, जर्मन पूर्व आफ्रिका (महायुद्धापूर्वीची)- हल्लीं याला टांगनिका म्हणतात. या वसाहतीची दक्षिणोत्तर लांबी १ आणि ११ दक्षिण अक्षांशाच्या दरम्यान आहे व पूर्वपश्चिम लांबी ३० आणि ४० रेखांश यांच्या दरम्यान आहे. पूर्वेस हिंदी महासागर, उत्तरेस व ईशान्येस ब्रिटिश ईस्ट आफ्रिका व युगांडा, पश्चिमेस बेलजम कांगो, नैर्ॠत्येस ब्रिटिश सेंट्रल आफ्रिका, व दक्षिणेस पोर्तुगीज ईस्ट आफ्रिका आहे. या वसाहतीचें क्षेत्रफळ सुमारें ३८४१८० चोरस मैल आहे. लोकसंख्या अजमासें ८० लक्ष आहे. हिंदी महासागरावरुन वाहणारे उष्ण वारे ओलावा व उष्णतां ह्यांनीं पूर्ण असल्यामुळें किनार्‍यावर उष्णता व पर्जन्यवृष्टि जरा जास्तीच असते. पश्चिम व पूर्व किनार्‍यावरील साधारण उष्णमान अनुक्रमें ७२ व ८० अंश असतें. किनार्‍यावर देवीच्या सांथीचा उपद्रव फार असतो.

लोक:- किनार्‍यावर व आंत मुख्य मुख्य ठिकाणीं अरब लोकांची वस्ती आहे. हे लोक व्यापार किंवा शेती करतात. समद्रकांठीं स्वाहिली लोक राहतात. अन्तर्भागांत राहणारे लोक बांटु व हॅमिटिक वंशांचे आहेत. मसाई ही जात युद्धविशारद आहे. वासांबरा, वारुंडी व बाहिमा ह्या जातीहि येथें राहतात. यांपैकीं शेवटची जात राज्यकर्ती आहे. सरकारी व मिशनरी शाळांच्या द्वारें एतद्देशीयांत जर्मन भाषेचें शिक्षण देण्यांत येते. न्याय- इनसाफाच्या कामांत सल्ला देण्याची अन्तर्भागांतील एतद्देशीय मुख्यांस परवानगी आहे. देशाच्या संपत्तीचा मुख्य उगम शेती व जंगल यांत आहे.

उत्पन्न:- देशाची सांपत्तिक स्थिति सुधारण्याकरितां अनेक कंपन्या गुंतल्या आहेत. शिवाय याच कार्याकरितां खाजगी व्यक्तींचेहि प्रयत्‍न चालू आहेत. रबर, कॉफी, भुइमूग, कापूस ह्या निर्गत व्यापाराच्या मुख्य वस्तु होत. खाद्य वस्तू, कापड, धातू, लोखंडी सामान, हा आयात माल आहे. बंदरापासून व्यापारी पेठांपर्यंत उत्तम पायरस्ते तयार केलेले आहेत. टांगापासून उझांबराच्या डोंगरापर्यंत एक रेल्वे फांटा गेलेला आहे. शिवाय आगबोटी, संदेशवाहक यंत्रें वगैरे दळणवळणाचीं साधनें आहेतच.

राज्यव्यवस्था:- राज्यकारभाराच्या सोयीकरितां देशाचे डिस्ट्रिक्ट व स्टेशन असे विभाग केले आहेत. प्रत्येक स्टेशनवर एक मुख्य असून तो डिस्ट्रिक्टच्या अधिकार्‍यास जबाबदार असतो. हे डिस्ट्रिक्टचे अधिकारी गव्हर्नरास जबाबदार असतात. गव्हर्नर हा वसाहत सैन्यावरील मुख्य असतो.
इतिहास:- १६ व्या शतकाच्या सुरवातीस पोर्तुगीजांनीं ईस्ट आफ्रिकेच्या किनार्‍यावरील शहरें काबीज केलीं. १८ व्या शतकाच्या सुरवातीस पोतुगीज लोक येथून निघून गेले आणि किनार्‍यावरचीं केप डेलगॅडोच्या उत्तरेकडचीं शहरें मस्कत अरबांनीं घेतलीं. त्यांच्यापासून ती झांझीबारच्या सुलतानाकडे गेलीं. स. १८५०च्या सुमारास झांझीबार येथील अरबांनीं टांगानिका सरोवराच्या पूर्व तीरावर असलेल्या युजीजी येथें आपलें बस्तान बसविलें. १८७७ सालीं झांझीबारच्या सुलतानानें आपला सबंध मुलूख ब्रिटिशांस पट्टयानें लिहून देण्याचा विचार केला पण ब्रिटिशांनीं तो घेण्याचें नाकारलें. स. १८८४ त 'जर्मन कालनायझेशन सोसायटीनें' पूर्व आफ्रिकन किनार्‍यावरील मुलूख जर्मनीकरितां मिळण्याची खटपट सुरु केली. हा हेतु तडीस जावा म्हणून कांहीं जर्मन तरुण अन्तर्भागांत पाठविण्यांत आले व त्यांनीं उसांबरा येथील सरदारांबरोबर तह केला. त्याचप्रमाणें दुसर्‍या इतर सरदारांबरोबर त्यांनीं तह केले. झांझीबारचा सुलतान ते तह प्रथम मान्य करीना पण शेवटीं निरुपाय होऊन त्याला ते मान्य करणें भाग पडलें. इतकेच नव्हे तर एका जर्मन कंपनीला उंबा नदीच्या दक्षिण मुखाकडील प्रदेश पट्टयानें द्यावा लागला. स. १८८४, १८८६, १८९० व ९४ या वर्षी ग्रेटब्रिटन, जर्मनी, पोर्तुगाल, व कांगोफ्रीस्टेट येथील सरकारांमध्यें परस्परांत झालेल्या तहांनीं जर्मनीला सध्यांचा जर्मन ईस्टआफ्रिका देश मिळाला. स. १८८८ च्या आगष्ट महिन्यांत जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीनें झांझीबारच्या सुलतानानें दिलेल्या मुलुखांतील अरबांवर राज्य करण्यास सुरवात केली. तेव्हां कांही बंडें झालीं पण ती लवकरच मोडण्यांत आलीं. राजघराणीं जशीं होतीं तशींच कायम ठेविलीं. महायुद्धाच्या अमदानींत १९१८ सालीं ही सारी वसाहत जर्मनीपासून दोस्तराष्ट्रांनीं जिंकून घेतली व ती ब्रिटिशांनां दिली तेव्हां यापुढील इतिहासाकरितां 'टांगानिका' पहा.

पोर्तुगीज पूर्व आफ्रिका.- हिचेंच दुसरें नांव मोझांबिक असें आहे. या पोर्तुगीज मुलुखाच्या पूर्वेस हिंदीमहासागर; उत्तरेस (पूर्वीची)  जर्मन ईस्ट आफ्रिका; पश्चिमेस न्यासालँड प्रोटेक्टोरेट, र्‍होडेशिया व ट्रान्सव्हाल, व दक्षिणेस टोगो लँड (नाताल) आहे. याचें क्षेत्रफळ; २९,३५,००० चौरस मैल आहे. झांबेझी नदीमुळें या मुलुखाचे दोन भाग झाले आहेत. या एकंदर प्रांताच्या समुद्रकिनार्‍याची लांबी १४३० मैल आहे. झांबेझी शिवाय दुसरी महत्त्वाची नदी म्हणजे लिंपोपो ही होय. ही डेलागोआबेच्या उत्तरेस सुमारें १०० मैलांवरुन येऊन हिंदीमहासागरास मिळते. किनार्‍यावरील हवा फार रोगट आहे. झांबेझीच्या कांठची हवाहि दूषित असून हिंवतापाचा उपद्रव त्या ठिकाणीं फार असतो. डोंगर पठारावर व उंच भागावर हवा बरी असते. नोव्हेंबर महिन्यांत अतिशय उन्हाळा असतो. एप्रिलपासून आगष्ट पावेतों थंडीचा मोसम असतो. दिसेंबर ते मार्च पावेतों पावसाळा असतो.

पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेची लोकवस्ती फार पातळ आहे. लोकसंख्या सुमारें ३० लाख आहे. शेंकडा ९० लोक बांटु राष्ट्रजातीचे आहेत प्रांताच्या उत्तरार्धांतील महत्त्वाची राष्ट्रजात म्हणजे माका ही होय. या जातींत अद्यापपावेतों भेसळ झालेली नाहीं. या जातीचे चार पोटविभाग आहेत. झांबेझी व माझो नद्यांमधील महत्त्वाची जात टाव्हाला ही होय. पुंग्वे नदीच्या दक्षिणेस झुलुवंशोद्भव राज्यकर्त्या जाती आहेत. गौरकाय लोकांची संख्या सुमारें दहा हजार होती. या लोकांत मुख्यत: पोर्तुगीज व ब्रिटिशांचा समावेश होतो. लांरेकी माट्क्वीस, मोझांबिक, क्विलिमेन इनहॅबेक बैरा, चिंदे, व सोफाला हीं पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेंतील मुख्य शहरें होत. नद्या, रेल्वे, व तारायंत्रे हीं दळणवळणाचीं साधनें आहेत.

शेती:- रोव्हमा ते झांबेझा- पर्यंतचा प्रदेश फार सुपीक. आहे. झांबेझीच्या कांठची जमीन तर पहिल्या प्रतीची आहे. देशाचा बराच मोठा भाग ऊस, गहूं, भुईमुग, कॉफी व तंबाखू यांच्या लागवडीस योग्य आहे. झांबेझीच्या खोर्‍यांत गहूं पुष्कळ होतो. क्किलिमेनलगतच्या भागांत नारळाचें पीक चांगलें येतें.

व्यापार:- कोळसा, लोखंड, तांबें, आणि सोनें व रॉकेल तेल ही खनिज द्रव्यें सांपडतात रबर, साखर, कोळसा, नारळ, भुईमुंग, हस्तिदंत इत्यादि निर्गत व्यापाराच्या मुख्य वस्तू असून कापसाचें कपड, खाद्यवस्तू, व लोखडी सामान ह्या आयात व्यापाराच्या वस्तू होत. काफीर लोक घोंगडया, टोप्या, जोडे, पितळी सामान इत्यादि वस्तूंचा व्यापार करतात. पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेचा बहुतेक व्यापार ग्रेटब्रिटन, हिंदुस्थान, जर्मनी व पोर्तुगालशीं आहे.

शासनव्यवस्था:- पूर्वी पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेस मोझांबिक म्हणत असत पण १८९१ पासून त्याला 'स्टेट ऑफ ईस्ट आफ्रिका' हें नांव प्राप्त झालें. या प्रांताचा कारभार गव्हर्नर जनरल पहात असून त्यांची मुदत तीन वर्षांपर्यंत असतें. राज्यकारभाराच्या सोयीकरितां पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेचे जिल्हे पाडले आहेत. सरकारी सभासदांचें व ज्यांत, व्यापारी, औद्योगिक व शेतकी मंडळांचे प्रतिनिधी आहेत अशांचे एक सल्लागार मंडळ आहे व एक प्रांतिक सल्लागार मंडळहि आहे. कांहीं भागांची शासनव्यवस्था झांबेझीकंपनीकडे सोंपविली आहे. शिक्षण हें मुख्यत: रोमनकॅथॉलिक मिशनर्‍यांच्या हातीं आहे.

इतिहास:- इ. स. च्या १० व्या शतकांत अरबांनीं सोफाला पर्यंतचा दक्षिणसमुद्रकिनारा काबीज केला. परंतु ते अन्तर्भागांत मात्र फारसें गेलेले नाहीत; किनार्‍यावरच वखारी घालून ते बांटु लोकांबरोबर व्यापार करीत. १५व्या शतकच्या अखेर पर्यंत त्यांची समुद्रकिनार्‍यावरील सत्ता अबाधित होती. १४९८त वास्को ड गामा क्विलिमेन नदीच्या मुखांत शिरला व तेथून तो मोझांबिक व मोंबासा येथें उतरला. १५०२ मध्यें तो सोफाला येथें गेला व त्यानें केलेल्या तेथील सांपत्तिक स्थितीच्या रसभरित वर्णनानें पोर्तुगीजांच्या तोंडांस पाणी सुटून पीड्रो डान्टाया याला १५०५ मध्यें सोफाला येथें पाठविण्यांत आलें. डान्टाया यानें अरब शहरानजीकच एक किल्ला बांधिला व अरबांनां पोर्तुगीज सत्ता मान्य करण्यास भाग पाडलें. १५०७ मध्यें मोझांबिक बळकावण्यांत येऊन त्या ठिकाणीं तटबंदी करण्यांत आली. १५१०च्या सुमारास पूर्व आफ्रिकेचा सर्व किनारा पोर्तुगीजांच्या ताब्यांत आला. १५०४ त 'रिव्हर ऑफ गुड टोकनस' या नदीवर एक वखार घालण्यांत आली. याच सुमारास पोर्तुगीज झांबेझीच्या कांठाकांठानें जाऊन आंत घुसले व सेना व टेटी या ठिकाणी त्यांनीं बंदरें स्थापन केलीं. शिवाय याच वेळीं लॉरेन्सो मार्क्किन डेलागोआबेमध्यें शिरला व त्यानें तेथून एतद्देशीयांशी व्यापार सुरु केला. १५६९ त ईस्ट आफ्रिकन मुलुख हिंदुस्थानच्या व्हाइसरॉयच्या शासनसत्तेखालीं न ठेवतां निराळ्या स्वतंत्र शासनसत्तेखालीं देण्यांत आला. १५६९- ७० या वर्षी पोर्तुगीजांनीं सोन्याच्या खाणींच्या शोधार्थ अन्तर्भागांत शिरण्याची शिकस्त केली पण त्यांत त्यांनां यश आलें नाहीं.

१६ व्या शतकाच्या अखेरी अखेरीस झांबेझी नदीवरील पोर्तुगीज ठाण्यांवर मुंझिंबा नांवाच्या रानटी टोळीनें हल्ला केला, व टेटी व सेना हीं दोन ठाणीं जमीनदोस्त केलीं. हिंदुस्थान व त्याच्या पूर्वेकडील मुलुखांतील संपत्तीच्या मागें लागल्यामुळें व पूर्वआफ्रिकेंतील एतद्देशीयांनां बाटविण्याच्या बेसुमार लालसेमुळें, पोर्तुगीजांचा ईस्ट आफ्रिकन मुलुखांत केव्हांच नीट जम बसला नाहीं. दोन जातींत भांडणें लावून आपला फायदा करुन घेण्याची युक्ति पोर्तुगीजांनां साधलीच नाहीं. केप डेलगॅडोच्या उत्तरेकडील मुलुख त्यांच्या जवळून अरबांनीं हिरावून घेतला. लासेर डा नांवाच्या पोर्तुगीज मुत्सद्दयानें राज्यव्यवस्थेंत सुधारणा करण्याचा बराच प्रयत्‍न केला. व तो कांही अंशी फलद्रूपहि झाला. पण त्याच्या मरणांनतर पुन्हां पूर्वीचीच स्थिति आली. १८७५ सालीं डेलागोआबेचें पूर्ण स्वामित्त्व पोर्तुगालला मिळालें.

अर्वाचीन इतिहास:- १९१९ सालच्या शांततापरिषदेनें व्हर्सेलिसच्या तहान्वर्ये, महायुद्धाच्या पूर्वी जर्मनीच्या ताब्यांत असलेला रोव्हमाच्या दक्षिणेकडचा किर्योगा ट्रँगल' नांवाचा मुलुख पोर्तुगालला दिला. त्यामुळें पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेच्या मर्यादा आता बदलल्या आहेत. पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेचे हल्लीं तीन स्वतंत्र भाग पाडण्यांत आलेले आहेत. ते म्हणजे-  (१)  मोझांबिकचा प्रांत, (२) कंपानिया डे मोझंबिक व (३)  कंपानिया डो न्यास. १९१८ सालीं पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेची लोकसंख्या अंदाजें तीस लाख होती व क्षेत्रफळ ४२८१३२ चौरस मैल होतें.

१९११-२१ सालच्या दरम्यान या वसाहतींमधील उत्पन्नाच्या बाबतींत वाढ करण्यासाठीं पुष्कळ प्रयत्‍न करण्यांत आले. साखरेचें उत्पन्न पूर्वीपेक्षां तिपटीनें वाढलें. सिसलची वाढ करण्यांत आली. ताडाच्या वाढीकडे विशेष लक्ष पुरविण्यांत आलें. १९२३ सालीं २३०४१४१५४ एसक्यूडो किंमतीच्या मालाची आयात व ११७०८२२३४ एसक्यूडो किंमतीच्या निर्गत या वसाहतींत झाली. १९२३-२४ सालीं या वसाहतीचें उत्पन्न ३३०३६२९६ एसक्यूडो होतें. १९१०-२० सालांच्या अमदानींत छोटया अशा पुष्कळ रेल्वे उघडण्यांत आल्या. सर्वांत मोठी रेल्वे म्हणजे डेलॅगोआबे आणि इनहँबनें यांच्यामधील होय. १९२२ सालापासून एसक्यूडो हें मुख्य चलन स्वीकारण्यांत आलें. १९२० सालपर्यंत पोर्तुगीज ईस्ट आफ्रिकेमधील वित्तोत्पादक अशा साधनांकडे अधिकार्‍यांचें लक्षच गेलें नाहीं. आपल्या वसाहतीची बाह्य वाढ करण्याकरतांच सारखी धडपड चाललेली असे. शिवाय पोर्तुगालजवळ भांडवलाची उणीव असल्यानेंहि या वित्तोत्पादक साधनांकडे त्यांचे लक्ष जाणें शक्य नव्हतें. १९२० सालीं या वसाहतीचा गव्हर्नर जनरल सेनार डे मागेल्हास यानें मोझांबिक प्रांताला स्वायत्ततेचे हक्क संपादन करुन घेतले व त्या ठिकाणीं पोर्तुगीज वर्चस्व प्रस्थापित केलें. त्याचप्रमाणें पोर्तुगीज न्यासालंडमध्यें पोर्तुगीज अंमल पूर्णपणें स्थापन करण्याची चळवळ १९०९ सालापासून सुरु होऊन अनेक अडथळ्यांनां तोंड दिल्यानंतर ती पूर्ण यशस्वी झाली. १९१५ सालीं झांबेझी खोर्‍यांत बंडाचा वणवा पेटला, पण तो तीन चार वर्षांच्या प्रयत्‍नानें शांत करण्यांत आला. १९१७ सालीं जर्मन सशस्त्र टोळ्यांनीं पोर्तुगीज प्रदेशांत शिरुन बराच धुमाकूळ माजविला.

ब्रिटिशपूर्व आफ्रिका.- 'केनिया' पहा.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .