प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
        
पुराणें- यासंबंधी बरेंचसें तात्त्विक विवेचन सूतसंस्कृति (ज्ञानकोश विभाग ३)  या प्रकरणांत केलें आहे. कालनिर्णयाच्या व माहितीच्यां दृष्टीनें भारतीय वाङ्‌मयांत पुराणांची योग्यता काय आहे हें ठरविणें कठिण आहे. खरोखर पुराणांची धार्मिक वाङ्‌मयांतच गणना केली पाहिजे. अत्यंत पुरातन जो ब्राह्मणी धर्म त्यांत जसे 'वेद' तसा बहुतेक शिव आणि विष्णु यांच्या पूजनांत विराम पावणारा अलीकडील जो हिंदुधर्म त्याला पुराणें हींच आधार होत. वस्तुत: महाभारताचा बराच भाग व बहुतेक सबंध हरिवंश म्हणजे पुराणच होय, दुसरें कांहीं नाहीं. तसेंच रामायणांतील अध्याय व कांडें पुराणांसारखींच दिसतात. तसेंच पुराणें नि:संशय फार प्राचीन असून त्यांचें मूळ वैदिक वाङ्‌मयांतच आहे. तथापि 'पुराण' म्हणून आजचे उपलब्ध ग्रंथ हे अलीकडील आहेत हेंहि निर्विवाद आहे; इतकेच नव्हे तर, अगदीं चालू काळापर्यंत 'पुराण' असें मोठें नांव देऊन कांही बनावट ग्रंथहि झालेले आहेत; किंवा जुन्या पुराणांचेच भाग म्हणून कांही म्हणवीत आहेत, अशा वाङ्‌मयांतील अगदीं अलीकडील ग्रंथांतहि जुन्या पुराणंतील परिचित भाषा व त्यांचें बाह्यस्वरुप दृष्टीस पडतें.

'पुराण'. या शब्दाचा मूळ अर्थ ''जुनी कथा'' हाच असावा. ब्राह्मणें, उपनिषदें व जुने बौद्धसंप्रदायी ग्रंथ अशा जुन्या वाङ्‌मयांत पुराण हा शब्द इतिहासासंबंधानें बहुतकरुन आलेला आढळतो. ('इतिहासशास्त्र' पहा) . प्राचीन काळीं अनेक वेळां उल्लेख केलेल्या 'इतिहास व पुराण' किंवा 'इतिहासपुराण' या शब्दावरुन, तसे प्रत्यक्ष ग्रंथ होते किंवा आज आपणांस उपलब्ध असलेलीं पुराणें व महाकाव्यें हेच ते ग्रंथ असें मानतां येत नाहीं. उलट, अथर्ववेदांत चार वेदांखेरीज पुराणांचाहि उल्लेख आला आहे त्यावरुन मात्र तसले ग्रंथ असावे असें वाटतें. 'सूत्र' ग्रंथावरुन मात्र खर्‍या पुराणांचें अस्तित्त्व नि:संशय सिद्ध होतें; कारण त्या ग्रंथांतील विषय व आपणांस उपलब्ध असलेल्या पुराणग्रंथांतील विषयांमध्यें बरेंच साम्य आहे. आज अस्तित्वांत असलेल्या कायदेग्रंथांपैकी सर्वांत जुना ग्रंथ जो 'गौतम धर्मसूत्र' त्यांत असें सांगितलें आहे की, वेद, धर्मशास्त्र, वेदांग व 'पुराणें' यांच्या आधारानें राजानें न्याय द्यावा. या वाक्यांत 'पुराण' शब्दानें, 'वेद' शब्दाप्रमाणें वाङ्‌मयाचा एक प्रकार दर्शविला जात असला पाहिजे. आणखी अधिक महत्त्वाची गोष्ट अशी कीं, इसवी सनापूर्वी ४ थ्या किंवा ५ व्या शतकांतील 'आपस्तंब धर्मसूत्र' या धर्मग्रंथांत पुराणंतील दोन उतारे दिले आहेत, इतकेच नव्हे तर त्यांत प्रत्यक्ष 'भविष्यत्' पुराणांतील एक उतारा दिलेला आहे. आतां हें खरें कीं हा तिसरा उतारा आजच्या उपलब्ध भविष्यपुराण नांवाच्या ग्रंथांत सांपडत नाहीं. व दुसरेहि दोन्ही उतारे आजच्या कोणत्याहि उपलब्ध पुराणांत शब्दश: सांपडत नाहींत. तथापि तत्सदृश वाक्यें पुराणांत आहेत. ज्यांत जगदुत्पत्तीबद्दलच्या जुन्या दंत्तकथा, देव, योद्धे, संत आणि मानवजातीचे प्राचीन पूर्वज यांचीं कृत्यें, प्रसिद्ध राजवंशाचे आरंभ इत्यादि माहिती भरलेली आहे असे जे जुने धर्मोपदेशपर ग्रंथ त्यांचेंच संशोधन व दुरुस्ती करुन केलेली अशीं हल्लींचीं पुराणें होत.

तसेंच महाभारत आणि पुराणें यांच्या परस्पर संबंधावरुनहि असें दिसतें कीं, पुराणें फार पूर्वकालीन असावीं आणि महाभारताच्या समाप्तीपूर्वी बराच काल ती अस्तित्वांत खास होती. महाभारताला पुराण असेंच म्हटलें आहे इतकेच नव्हें तर त्याचा आरंभहि अगदीं पुराणाप्रमाणें म्हटजे सूत लोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवस् हाच तें सांगणारा असा केला आहे. या उग्रश्रवसला पुराणांचा पूर्ण माहितगार असें म्हटलें असून शौनकानें त्याला कथा सांगण्याकरितां बोलावतेवेळेस असें म्हटलें आहे कीं, ''तुझ्या पित्यानें एकदां सर्व पुराणांचें अध्ययन केलें. त्या पुराणांत देवांच्या गोष्टी व ॠषींच्या वंशावळी सांगितल्या आहेत, त्या तुझ्या पित्याच्या तोंडून फार पूर्वी एकदां आम्ही ऐकल्या होत्या''.

अनेक वेळां महाभारतांतील दंतकथांचा आरंभ पुढील शब्दांनीं केलेला आहे; ''असें पुराणांत ऐकलेलें आहे.'' गाथा, श्लोक आणि विशेषत: पुराणज्ञात्यांच्या तोंडच्या वंशावळी विषयींचें श्लोक दिले आहेत; गद्यांत केलेल्या उत्पत्तीच्या वर्णनाला पुराण म्हटलें आहे; जनमेजयाचा सर्पयज्ञ पुराणांत सांगितला आहे, आणि पुराणज्ञात्यांनीं त्याची शिफारस केली आहे; वायूनें सांगितलेल्या पुराणाच्या स्मरणार्थ जगाच्या भूतभविष्य युगांचें वर्णन दिलें आहे आणि हरिवंशांत वायुपुराणाचा उल्लेख आहे, इतकेंच नव्हे तर आजच्या उपलब्ध वायुपुराणाशीं पुष्कळ ठिकाणीं शब्दश: साम्य आहे. पुराणें आणि महाकाव्यें यांतील पुष्कळ दंतकथा आणि बोधपर मजकूर सारखा आहे.

महाभारतांत असलेल्या जुन्या तर्‍हेवर ॠष्यश्रृंगाची दंतकथा पद्मपुराणांत आहे. महाभारतांत अगदीं अलीकडे घातलेल्या अशा एका श्लोकांत अठरा पुराणांचीं नावें दिलीं आहेत. या सर्व गोष्टीवरुन असें दिसतें कीं, पुराणांच्या जातीचें वाङ्‌मय हें महाभारत पुरें होण्याच्या बरेंच पूर्वी अस्तित्वांत होतें, व आजच्या उपलब्ध पुराणांतील पुष्कळसा भाग महाभारताहून जुना आहे.

आतां पुराणांपेक्षां महाभारत जुनें आणि महाभारतापोक्षां पुराणें जुनीं, असें जें आपण म्हणतों त्यांत दिसावयास विरोध दिसतो, पण तो खरा नाहीं. कारण महाभारताप्रमाणेंच पुराणांचेंहि एकीकरण थोडेंच झालेलें आहें; आणि पुराणांमध्येंहि जुना आणि नवा भाग शेजारीं शेजारीं आढळतो, आणि ज्या पुष्कळ ठिकाणीं पुराणांचें एकमेकांशीं व महाभारताशीं साम्य आहे, त्या बाबतींत एक ग्रंथ दुसर्‍याच्या आधारानें लिहिला गेला असें म्हणण्यापेक्षां, सर्वच ग्रंथांनां निराळाच असा अत्यंत जुना एक मूळ आधार होतो असें मानणें जास्त सयुक्तिक होईल. परंतु आजचीं उपलब्ध पुराणें आणि याच नांवाचें प्राचीन ग्रंथ, ही दोन्ही एक नव्हत असेंहि निश्चित ठरवितां येतें; याचें कारण असें कीं, पुराणांतील विषयांवरुन पाहतां, 'पुराण' शब्दाची व्याख्या म्हणून पुराणांतच जी दिली आहे त्या व्याख्येबरहुकूम लिहिलेलें एकहि पुराण नाहीं. अत्यंत जुन्या अशा या व्याख्येप्रमाणें प्रत्येक पुराणांत पांच लक्षणें म्हणजे पांच मख्य विषय असावयास पाहिजेत, ते असे:-  (१) सर्ग, (२) प्रतिसर्ग, (३) वंश, (४) मन्वन्तरें,व (५) वंशानुचरित (ज्या वंशाचा आरंभ सूर्यापासून (सूर्यवंश)  आणि चंद्रापासून (सोमवंश) होतो तें). आजच्या उपलब्ध पुराणांत अंशत: या पांच गोष्टीचें वर्णन सांपडतें; कांही पुराणांत या पांच विषयांशिवाय इतर पुष्कळच हकीकत आहे; आणि इतर पुराणांत या पांच गोष्टींचा उल्लेख क्वचितच असून दुसरे निराळेच विषय दिलेले आहेत, परंतु बहुतेक सर्व पुराणांचें विशेष लक्षण असें आहे कीं, ती विशिष्ट पंथनिदर्शक आहेत. शिव किंवा विष्णु, यांपैकीं कोणत्या तरी देवाच्या पूजेला ती वाहिलेली आहेत. या बहुतेक ग्रंथांत आश्रम आणि जाती यांचे नियमधर्म सांगणारा बराच भाग आहे. शिवाय ब्राह्मणांचे सामान्य संस्कार, विशेषत: श्राद्धकर्मे, शिव किंवा विष्णूचीं व्रर्ते, समारंभ, आणि सांख्य व योगशास्त्रांविषयीं वगैरे माहिती दिलेली आढळते.

आजच्या स्थितींतील पुराणांचा काल ठरविण्यास त्यांच्यामध्यें दिलेल्या राजांच्या नामावली फार उपयोगी आहेत. बहुतकरुन, जगाच्या आगामि युगांतील होणार्‍या गोष्टींची भविष्यरुपानें माहिती दिलेली असून सर्वांच्या शेवटीं अनर्थकाल जें कलियुग त्याचें वर्णन करुन त्या युगांत क्रूर रानटी लोक राज्य करतील, आणि सर्व धर्म व नीति लयास जाईल असें वर्णन असतें. तसेंच त्यांत इतिहासप्रसिद्ध नंद, मौर्य, आंध्र आणि गुप्त हीं घराणीं आपणांस आढळतात; आणि अगदीं अलीकडील संशोधनावरुन असें ठरतें कीं, दिलेल्या राजांच्या कारकीर्दीबद्दलची माहिती पूर्वी मानीत असत तितकी अविश्वसनीय खास नाहीं. व्ही. ए. स्मिथच्या मर्ते, मौर्यघराण्यासंबंधानें विष्णुपुराण, (इसवी सनापूर्वी ३२६- १८४) व आंध्रघराण्याला (शेवट इ.स. २३६) मत्स्यपुराण हा उत्तम आधार आहे. आणि गुप्तघराण्यांतील चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीचें (इ.स.३२०- ३२६) वर्णन वायुपुराणांत आहे. कांही असलें तरी, हें लक्ष्यांत ठेवण्यासारखें आहे कीं, गुप्तघराण्यानंतर कोणत्याहि घराण्याचा उल्लेख नसून निरनिराळ्या राजांची नांवेंच यादीवार दिलीं आहेत. इ.स.४८० च्या सुमारास स्कंदगुप्त मरण पावला; आणि जरी त्याच्याबरोबरच गुप्तघराणें लयास गेलें नाहीं, तरी श्वेत हूण लोकांच्या स्वार्‍यांमुळें गुप्तांचें राज्य नष्ट झालें.इ.स.५०० च्या सुमारास हूणांचा पुढारी तोरमाण हा मध्यहिंदुस्थानांत राज्य करीत होता. स.५१५ मध्यें त्याच्या मागून त्याचा मुलगा मिहिरकुल राजा झाला. कल्हण या इतिहासकारानें लिहिल्याप्रमाणें, या मिहिरकुलानें आपल्या रानटी लोकांनीं पूर्णपणें व्यापिलेल्या राज्यावर यमाप्रमाणें राज्य केलें; हजारों खुनी लोकांचा गराडा रात्रंदिवस त्याच्या भोंवतीं असे; आणि प्रत्यक्ष बायकामुलांबद्दलहि त्याला दया येत नसे. आणि यावरुन अशी कल्पना होते कीं, पुराणांतील कलियुगाचीं वर्णनें हूण लोकांच्या या क्रूर अम्मलावरुनच दिलेलीं असावीं. यावरुन हेंहि सिद्ध होतें कीं, आपलीं मुख्य पुराणें आजच्या स्वरुपाचीं इ. सनाच्या ६ व्या शतकांत बनलीं असावीं. पण यामुळें ६ व्या शतकापूर्वीच कांही शतके, पुराणें प्रथम रचिलीं असावीं, आणि त्यांतील चालीरीती आणखी कित्येक शतकांच्या जुन्या असाव्या या म्हणण्यास बाध येत नाहीं. उलट, कांही पुराणें अगदींच अलीकडील आहेत, व जुन्या पुराणांतहि पुढील शतकांत कमजास्त फेरबदल केले आहेत हें नाकबूल करतां कामा नये.

परंतु कांहीं असलें तरी, आपलीं पुराणें हीं संस्कृत वाड्मयाचीं सर्वांत धाकटीं अपत्यें होत, व ती गेल्या हजार वर्षांत जन्मास आलीं, असें पूर्वी सार्वत्रिक असलेलें व आतांहि बरेंच प्रचलित असलेलें मत मात्र मुळीच टिकण्यासारखें नाहीं. कारण बाण कवीस (इ.स.६२५ च्या सुमारास)  हीं पुराणें चांगलीं अवगत होतीं, आणि त्यानें आपल्या 'हर्षचरित' नांवाच्या ऐतिहासिक अद्भुत गोष्टींत लिहिलें आहे कीं, मी आपल्या मूळच्या गांवांत वायुपुराण ऐकण्यास जात असे. कुमारिलभट्टानें (इ. स. ७५० च्या सुमारास)  पुराणांनांच धर्मशास्त्रांचा- कायद्याचा- आधार म्हणून मानलें आहे. शंकराचार्य (९ व्या शतकांत)  व रामानुज (१२ व्या शतकांत)  यांनीं आपल्या तात्त्विक मतांनां पूज्य आधार म्हणून पुराणांचाच उल्लेख केला आहे. तसेंच अरबी प्रवासी अल्बेरूणी (इ.स.१०३० च्या सुमारास)  यास पुराणांची बरीच माहिती होतीसें दिसतें. त्यानें अठरा पुराणांची यादी व आदित्य, वायु, मत्स्य आणि विष्णुपुराणांतील उतारे दिले असून, अगदीं अलीकडील विष्णु- धर्मोत्तर (विष्णुपुराणाचा उत्तरार्ध)  पुराणाचा तर त्यानें अगदीं बारकाईनें अभ्यास केला आहे असें दिसतें. पुराणें अगदीं अलीकडचीं आहेत असें चुकीचें मत होण्यास आणखी असें कारण दिसतें कीं, शिव आणि विष्णु यांच्या उपासनांचे पुराणांतील धर्मपंथ हे अलीकडील नवे आहेत, असें पूर्वी एक मत होतें. परंतु नव्या संशोधनावरुन असें सिद्ध झालें आहे कीं, वैष्णव आणि शैव पंथ हे ख्रि.पूर्वी कदाचित् बुद्धाच्याहि पूर्वी- पासून निघालेले आहेत.

पुराणें अत्यंत जुनीं आहेत असें धर्मनिष्ठ हिंदू मानतात. ज्या व्यासानीं वेद व महाभारत लिहिलें त्यानींच चालू कलियुगाच्या आरंभीं अठरा पुराणें लिहिलीं. हे व्यास म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर विष्णूचाच अवतार होत; 'कारण महाभारत ग्रंथ दुसरा कोण करुं शकणार?' असें विष्णुपुराणांत म्हटलें आहे. त्याचा शिष्य सूत लोमहर्षण; त्याला त्यानीं पुराणें सांगितलीं. याप्रमाणें पुराणांचा उगम दैवी आहे. आणि वेदान्तज्ञानी शंकराचार्य यानींहिं देवांचें व्यक्तिश: अस्तित्त्व सिद्ध करण्याकरितां जेव्हां इतिहास व पुराणें यांचा निर्देश केला, तेव्हां असें म्हटलें आहे कीं, पुराणांनां वेदांचा आधार आहे इतकेच नव्हे तर समक्ष ईश्वराजवळ बोलणार्‍या व्यासांसारख्या लोकांनीं आपल्या इंद्रियजन्य ज्ञानाच्या आधारानें पुराणें लिहिलीं आहेत.

वेदांइतकीं पुराणें प्रमाण मानीत नाहींत खास.तरी इतिहास आणि पुराणें हीं वेदांनां कांहीं अंशी पुरवणीप्रमाणें आहेत. प्रत्यक्ष वेदांचा अभ्यास करण्याचा ज्यांनां अधिकार नाही असे शूद्र व स्त्रिया यांच्या उपयोगाकरतां विशेषत: ती आहेत. एका जुन्या श्लोकांत म्हटलें आहे कीं, ''इतिहास व पुराणांनीं वेदांनां बळकटी आणतां येते; कारण अज्ञानी माणसांची वेदांनां भीति असते कीं, ते अज्ञ लोक वेदांनां उपद्रव करतील.'' रामानुजांनीं म्हटलें आहे कीं, 'सर्वांत उच्च जें ब्राह्मणांचें ज्ञान तें फक्त वेदाभ्यासानें होतें; आणि इतिहास व पुराणें यांच्यांमुळें फक्त पापशुद्धि होते.' याप्रमाणें पुराणांचा पूज्य- ग्रंथांमध्यें दुसरा नंबर आहे, व याचा उलगडा सोपा आहे. कारण आरंभीं पुराणें हें हिंदु धर्माचार्यांचें वाङ्‌मय नव्हतें. महाकाव्याप्रमाणेंच, जुनें पुराण- काव्य हें सूतांनीं दंतकथांच्या आधारें तयार केलें व संभाळलें आहे. असें म्हणण्याचें कारण असें कीं, बहुतेक सर्व पुराणांत, सूत- लोमहर्षण किंवा त्याचा मुलगा उग्रश्रवस् सौति हा पुराण सांगणारा, असें वर्णन आहे. असें इतक्या वेळां आढळतें कीं, सूत व सौति हीं विशेषनामांप्रमाणें पुराणांत उपयोगांत आणलीं आहेत. पण सूत हा नि:संशय ब्राह्मण नव्हता आणि वेदांशीं त्याचा कांहीं संबंध नव्हता, पण जेव्हां ही पौराणिकांचीं जुनी परंपरा नष्ट झाली तेव्हां (त्याचा कालनिर्णय झाला नाही)  हे पुराण- ग्रंथ वेदसंपन्न ब्राह्मणांच्या हातीं गेले नाहींत, तर कमी दर्जाच्या क्षेत्रांतील जो उपाध्यायवर्ग त्यानें पुराणें कबज्यांत घेतलीं; आणि हे अल्पशिक्षित देवळांतलें पूजारी आपापल्या देवळांतल्या देवांची महति गाण्याकडे त्यांचा उपयोग करुं लागले, आणि पुढें पुढें ज्या ठिकाणीं त्यांचा यावर उदरनिर्वाह चाले आणि पुष्कळ वेळां त्यावर ते श्रीमंत बनत अशा त्यांच्या क्षेत्रांची व देवालयांचीच विशेष शिफारस करण्याला या पुराणांचा उपयोग झाला. तरी सुद्धां अगदीं आजपर्यंत पुराणांबद्दल हिंदु लोकांची किती पूज्यबुद्धि आहे, याचें उत्तम उदाहरण म्हणजे मणिलाल एन्. द्विवेदी यानीं सन १८८९ मध्यें स्टॉकहोम येथें भरलेल्या पौरस्त्य विद्वानांच्या काँग्रेसमध्यें दिलेलें व्याख्यान होय. यूरोपीय ज्ञानसंपन्न या नात्यानें त्यांनीं डार्विन, हेकेल, स्पेन्सर आणि क्काटरफेगीज यांच्या भूस्तरशास्त्र आणि मानुषशास्त्र या विषयांवर भाषण केलें, पण तें असें सिद्ध करण्याकरितां कीं, पुराणांतील जीवाविषयींच्या कल्पना व सुष्टयुत्पत्तीविषयींचें विवेचन हीं शास्त्रीय तत्त्वें आहेत; त्यांत पूर्ण खरेपणा आणि अगाध बुद्धिमत्ता दिसून येते; फक्त मनुष्याला त्याचा बरोबर अर्थ समजला पाहिजे, म्हणजे त्याचा लाक्षणिक अर्थ घेतला पाहिजे.

इतिहासाचीं, विशेषत: धर्माच्या इतिहासाची साधनें या दृष्टीनें आपणांस पुराणांचा अत्यंत उपयोग आहे; आणि तो आजपर्यंत झाला आहे त्यापेक्षां अधिक पूर्णपणें अभ्यास झाला पाहिजे. वाङ्‌मयाच्या दृष्टीनें, पुराणें हे मोठे आल्हाददायक ग्रंथ झालेले नाहींत. ते प्रत्येक बाबतींत बेडौल व बेशिस्त असे झाले आहेत. भाषेविषयीं अत्यंत निष्काळजीपणा आणि काव्य- कला- हीनता, तसेंच पद्यरचना साधण्याकरितां केलेले व्याकरण- दोष, हे पुराण- ग्रंथांतील ठळक ठळक दोष आहेत; त्याप्रमाणें असंख्य अतिशयोक्तीचीं वर्णनें व अव्यवस्थित सरमिसळ माहिती त्यांत आहे. अतिशयोक्तीची कांही उदाहरणें अशीं:- (१)  पुरूरवसबरोबर उर्वशी चार वर्षे सुखविलासांत होती असें खरोखर असतां, विष्णुपुराणांत वर्णन आहे कीं, या प्रणयी जोडप्यानें सुखविलासांत ६१००० वर्षे घालविली. (२)  जुन्या पुराणांतून फक्त (सातच)  सप्तपाताळच दिलेले असतां, भागवत- पुराणांत शेकडों- हजारों पाताळ लोक आहेत असें दिलें आहेत; आणि गरुडपुराणांत चौर्‍यांशी लक्ष पातांळाची संख्या आहे. जितके पुराण मोठें,-  बहुतेक पुराण म्हटलें कीं तें मोठें असणारच-  तितक्या त्यांत अतिशयोक्तिपूर्ण गोष्टी अधिक असावयाच्या. यावरुन असेंच ठरतें कीं अशिक्षित भटभिक्षुक लोकांसारख्या हलक्या दर्ज्याच्या लेखकवर्गाच्या हातून ती लिहिली गेलीं असलीं पाहिजेत. तथापि राजांच्या जुन्या पुष्कळ दंतकथा आणि कांही फार जुने वंशावळींचे श्लोक आणि गाथा मूळच्या पुराण- काव्यांत न सांपडतां अलीकडच्या ग्रंथांतून आपणांस उपलब्ध झाल्या आहेत. आणि सुदैवानें पुराण- कारांनीं, मुळींच निवडानिवड करीत न बसतां कोठेंहि चांगलें दिसेल त्याचा अनादर केला नाहीं आणि उपनिषदांतील पुष्कळ वाक्यें जशींच्या तशींच त्यांनीं पुराणांत घेतलीं आहेत; तसेंच जुन्या ॠषींच्या काव्यांतून महत्त्वाच्या काहीं दंतकथा घेतल्या आहेत. पुराणवाङ्‌मयाच्या या ओसाड मैदानांत सुद्धा जलमय विश्रांतिस्थानें नाहींत असें नाहीं. आज असलेल्या पुराणांत व्यासकृत पुराणांची एकंदर संख्या अठरा, असे एकमतानें सर्व पुराणांत उल्लेखिलें आहे; तसें त्यांच्या नांवाबद्दलहि बहुतेक पूर्ण एकमत आहे. विशेष गोष्ट अशी कीं. प्रत्येक पुराणांत अठरा पुराणांची तीच तीच यादी दिलेली आहे; जणूं काय पहिलें व शेवटलें असें कोणतेंच नव्हे व प्रत्येक पुराण लिहिलें गेलें तेव्हां बाकीचीं सर्व अगोदर तयारच होतीं; तेव्हां यावरूनहि असेंच सिद्ध होतें कीं, त्यांच्या मूळच्या स्वरुपांत आज आपणांस एकहि पुराण उपलब्ध नाहीं, ('अठरा पुराणें' पहा)  याशिवाय कांही पुराणांत ज्यांस उपपुराणें म्हणतात तींहि उल्लेखिलीं असून त्यांचीं संख्या अठरा म्हणून कांही ठिकाणीं दिली आहे. पण पुराणांच्या नांवांच्या बाबतींत जशी बहुतेक पूर्ण एकवाक्यता आहे, तशी उपपुराणांच्या नांवांबद्दल मात्र नाहीं. अठरा मुख्य पुराणें असल्याबद्दल स्पष्ट परंपरा राहिली; परंतु अलीकडील एखाद्या धार्मिक ग्रंथाच्या लेखकास, त्याचा तो ग्रंथ जुन्या अठरा पुराणांपैकीं एखाद्या पुराणाचा भाग आहे असें म्हणणें पसंत वाटलें नाहीं, म्हणजे अशा त्याच्या ग्रंथाची उपपुराणांत गणना होण्यासारखी आहे. पवित्र तीर्थक्षेत्रांचीं माहात्म्यें म्हणून जे विशेषत: पुष्कळ ग्रंथ झालेले आहेत त्यांची अशीच गोष्ट आहे. याशिवाय शिव, विष्णु वगैरे देवतांची पुष्कळ स्तोत्रें, कल्प (धार्मिक विधी) , आख्यान, उपाख्यान (दन्तकथा) , हीं सर्व एखाद्या मुख्य किंवा उपपुराणांतीलच आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. अठरा पुराणांतील विषयाचा थोडक्यांत सारांश त्या त्या पुराणांच्या नांवाखालीं दिला आहे; उदा. अग्निपुराण, गरुडपुराण इत्यादि या ठिकाणीं विंटरनिट्झच्या 'हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर' या ग्रंथाच्या आधारें पुराणांचें बाह्य विवेचन थोडक्यांत केलेलें आहे.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .