प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें    
   
पीतज्वर- कांही विवक्षित प्रदेशांत आढळून येणारा हा सांथीचा, थोडे दिवस टिकणारा ज्वर असून त्यांत अंग पिंवळसर दिसणें, जठर व आंतडीं यांच्या ठिकाणीं दाहक्रियेमुळें विकार होणें, अलब्यूमिनमेह व मूत्राघात म्हणजे मूत्रबंद होणें हीं प्रमुख लक्षणें असतात. उत्तर व दक्षिण अमेरिका आणि पश्चिम आफ्रिकेचा किनारा या ठिकाणीं हा रोग प्रचलित असून यूरोपियन वैद्यांनां त्याचा शोध १६४७ सालीं लागला. वरील प्रदेश ४८ अक्षांश आणि ३५ अक्षांशांच्या दरम्यान आहेत व हा रोग बहुधां येथेंच आढळतो. पण क्वचित् काळीं तो अन्य देशांतहि जातो. उदाहरणार्थ, इंग्लंडांत स्वानसी येथें १८६५ त ही सांथ आली होती. पण अन्य ठिकाणी ही सांथ फार टिकून रहात नाहीं. वरील देशांत समुद्रालगतच्या प्रांतांतील शहरांतील विशेष गर्दी व गलिच्छतेच्या वस्तींत हा ज्वर आढळतो. बहुतकरुन समुद्रसपाटीवर- निदान त्याहून एक हजार ते दोन हजार फुटांपेक्षां अधिक उंचावर नाहीं अशा ठिकाणीं- हा रोग असतो. पण अपवादात्मक थोडीं उदाहरणें ११ व १४ हजार फूट उंचीवरील शहरांतहि घडलेलीं आहेत. हवेचें ७० ते ७२ उष्णमान या सांथीस अनुकूल आहे. तथापि ६५ वर पारा असतांहि सांथ आलेली आहे. कडक उन्हाळा, मेपासून आगष्ट महिन्यांची गरम हवा व अति थंड बर्फमय हवेमुळें सांथ थांबते. सर्व प्रकारच्या स्त्री, पुरुष, मुलें वगैरे लोकांनां हा ज्वर येतो. पण त्यांतल्या त्यांत मुलापेक्षां मोठ्या माणसांनांच विशेषेंकरुन जास्त येतो. तद्देशीय काळ्या शिद्दी लोकांनां ही सांथ अगदींच पछाडीत नाहीं असें नाहीं; केव्हां केव्हां त्या जातींत साथीचा खूप जोर दिसला तरी एकंदरीनें बहुधा त्या लोकांमध्यें ही सांथ जरा सौम्यच असते. ही नैसर्गिक प्रतिबंधनशक्ति, जाति व वर्णविशिष्टत्वामुळें आलेली नसून तो रोग कायमच रुळल्यानें व त्याच्या दीर्घ सान्निध्यानें त्या लोकांनां आलेली आहे असें येथील अनुभविक डॉक्टरांचें मत आहे. एकदां ज्वर येऊन गेल्यावर त्याच माणसास बहुधा पुन्हां तो ज्वर येत नाहीं. ज्याप्रमाणें हिंवताप व निद्रारोग विषारी डांसांच्या दंशामुळें मनुष्याच्या शरीरांत प्रवेश करतो त्याचप्रमाणें या ज्वराचा विषारी डांस असून तो शहरांत आढळतो व ओल, दलदल, घाणेरी डबकीं यांत त्याची वाढ न होतां त्याची वाढ स्वच्छ पाण्यांत होते. तळीं, पिपें, जुन्या उघडया बाटल्या, डबे, झाडांच्या कुंडया इत्यादींत पाणी सांठून तेथें याची वाढ होते. या डांसाच्या जातीस व्याघ्रमशक म्हणतात. या रोगाचे प्राणिज जंतू दोन प्रकारचे शोधून काढले, परंतु स. १९१५ सालीं इंग्रज सरकारनें पीतज्वरसंशोधक कमिशन नेमलें होतें. त्याच्या मतें वरील जंतू हें ज्वराचें कारण नसून खर्‍या रोगजंतूंचा अद्याप शोध लागला नाहीं.

लक्षणें.-  ज्वर सुमारें पांच दिवस सुप्तावस्थेमध्यें असतो, म्हणजे विषारी डांसाचा दंश झाल्यापासून सुमारें पांचव्या दिवशीं, कधीं सावकाशपणें मरगळ येऊन, तर कधीं एकाएकीं डोके दुखून व अंग मोडून येऊन बारीक अगर मोठी थंडी वाजून येऊन बराच ज्वर येतो व तो दोन दिवसांत १०५० अगर त्याहून जास्त होतो. कपाळ, कमर व सांधे मनस्वी दुखतात, तापाच्या मानानें नाडीचा वेग १०० ते १२० हून अधिक वाढत नाहीं. जिभेच्या कडा लाल असून जिभेवर चिकट, दाट व पांढरी बुरशी येते, पोटांत दाबल्यास आपोआप देखील थोडें दुखतें; मळमळणें, कोरडी ओकारी व वांती हीं लक्षणें असतात. ज्वराच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशीं डोळ्यांस पिंवळेपणा येऊन नंतर सर्वांगभर कावीळ पसरते. युरिआ व युरिक अ‍ॅसिडचें प्रमाण फार कमी असलेली अशी थोडी लघवी होते व तींत दुसर्‍या- तिसर्‍या दिवसापासून अलब्यूमिन सांपडू लागतें व नंतर लघवींत पित्तक्षार व पिंवळा रंग येतो. चौथ्या दिवशीं ज्वर बराच कमी होऊन इतर लक्षणें व वेदना कमी होतात व बहुधा येथपासून रोगास उतार पडत जाऊन कावीळ, लघवींतील अलब्यूमिन, वगैरे लक्षणें हळू हळू कमी होऊन दोन तीन आठवडयांत रोगी बरा होतो. परंतु असें नेहमीं न होतां पुष्कळ रोग्यांमध्यें पहिलीच तीव्र लक्षणें व वेदना व ज्वर तसाच चालू राहून अगर कमी झालेला ज्वर पुन: वाढून १०३० अगर १०४० पर्यंत पुन: चढतो. नाडीचा वेग मात्र वाढत नाहीं, परंतु लक्षणें जास्त तीव्र व भयंकर होत चाललीं तर नाडीचा वेग पूर्वीहून सावकाश होतो. हें लक्षण एका शोधक डॉक्टरानें नजरेस आणलें आहे. कावीळ जाऊन त्त्वचेवंर फुटल्याप्रमाणें लाल डाग दिसतात. लघवी आणखी कमी होऊन तींतील अलब्यूमिनचें प्रमाण वाढतें व तींत मूत्रपिडांतील कोंडा वाहून येतो; युरिआक्षार  कमी होतो व नंतर कांही दिवस लघवीची उत्पत्ति बंद होते. ओकारी वाढून तींत प्रथम अन्न, नंतर पित्तमिश्रित व नंतर काळें रक्तमिश्रित अशी काळी वांती होते व तीस, कॉफी शिजविल्यावर खालीं गाळ रहातो तसा रंग येतो. या वांतीच्या अगोदर केव्हां केव्हां तार असलेल्या चिकट पाण्यासारखी वांती होते. काळी वांती होऊं लागली म्हणजे रक्तमिश्रित काळी मळशुद्धि होते. नाक, तोंड, हिरडया यांतून रक्तस्त्राव होतो. जिभेची बुरशी पार नाहींशी होऊन ती काळी, पिंगट, सोललेली, वर कीट कोंडा व खपल्या जमलेली दिसते. वात होऊन रोगी बडबडूं लागतो व शक्तिपातामुळें ग्लानि, गुंगी, बेशद्धि येऊन रोगी मरतो. सांथीच्या सौम्यतेच्या अगर तीव्रतेच्या मानानें मरणार्‍या रोग्यांचें शेंकडा प्रमाण ५ पासून ७५ असतें. अति कडक ज्वर येऊन आरंभापासून थोड्या तासांत रोगी मेल्याचीं कांहीं उदाहरणें घडतात; पण बहुधा प्रास्ताविक ताप कमी झाल्यावर शक्तिपात, विपुल रक्तस्त्राव, बेशुद्धि, मूत्रपिंडाची लघवी उत्पन्न करण्याची शक्ति नाहींशी होणें या कारणांमुळें मृत्यु येतो. मृत्यूनंतर लागलीच पाहिलें तर ज्वर १०८ ते ११० पर्यंत असल्याचें आढळतें.

रोगामुळें शरीरांत होणारे फरक:- मृत रोग्याच्या यकृतांत रुधिर कमी असून त्यांत वसावृद्धि फाजील होते. जठरांत दाह, लाली, सूज व जठर, फुफ्फुस व फुफ्फुसावरणामध्यें रक्तस्त्राव; हृदयस्नायूंत फिकटपणा व पिंवळट पिंगटपणा, बसावृद्धि, रक्तस्त्राव व तशीच स्थिती मूत्रपिंडांचीं होते. प्लीहेंत विकृति, हिंवतापांत होते तशी होत नाहीं हा चमत्कार आहे. रक्तांतील लाल रंग कमी होतो पण त्यांत युरिआक्षाराचें फाजील प्रमाण होतें. पांढरे रोगरक्षक रक्तांतील पेशी कमी होतात. रोगनिदान करण्यास सांथ असली म्हणजे अडचण पडत नाहीं. आरंभी सांथ नसली म्हणजे हा फुफ्फुसदाहरोग अगर देवींचा ज्वर आहे कीं काय असें वाटण्याचा संभव आहे. नंतर तो हिंवताप आहे कीं, काय असेंहि वाटणें साहाजिक आहे. हिंवतापांत पाणथरी मोठी होते, तापाचा कमी जास्त होण्याचा अगर साफ निघण्याचा ठराविक क्रम असतो व ताप नसला म्हणजे रोगी आजारी देखील दिसत नाहीं, हिंवताप येऊन गेला तरी तो पुन्हां येणें संभवनीय असतें, तसें या ज्वराचें नसतें. हा 'सप्तदिन पुनरावर्ती' ज्वर आहे काय असें काविळीमुळें वाटणें बरोबर आहे. पण त्यांत पाणथरी वाढते. ज्वर येऊन गेल्यावर सात दिवसपर्यंत पुन्हां ताप उलटेपर्यंत रोगी चांगला बरा असतो तसें या ज्वराचें नसतें. यकृताच्या पीताकुंचनरोगास काविळीनेंच आरंभ अति सावकाशपणें होतो, तसा या ज्वरांत होत नाही.

उपचार.-  ज्वरशमनाच्या कामीं क्किनाईनचा उपयोग हिंवतापांत होतो तसा तेथें होत नाहीं; ताप उतरल्यावर पौष्टिक औषध म्हणून तें उपयोगी पडतें. आरंभी रोग्यास रेचक औषध द्यावें; अगर वस्ती देऊन कोठा साफ करावा व नंतर सौम्य क्षारयुक्त मल- मूत्र- स्वेदोत्सर्जक औषधें द्यावींत. ज्वर मोठा असल्यास सर्वांग थंडगार पाण्याच्या बोळ्यानें वरच्यावर चोळावें अगर अशा प्रकारचे शीत उपचार करावे, वांतीशमनार्थ बर्फाचे बारीक तुकडे चघळण्यास द्यावे किंवा पोटांत क्लोरोडाइन अगर मार्फिया किंवा चुन्याची निवळ देतात. ऊन पाण्यांत बसणें व वाफारा अशा उपयांनीं मूत्रपिंडाची क्रिया जागृत ठेवतात. खाण्यास पातळ पदार्थ थोडे पण वरचेवर द्यावे. अल्कोहोल नामक ब्रांडी (पुष्कळ पाणी घालून)  अगर शांपेन हा मद्यार्क देण्याची जरुरी लागणें साहजिक आहे. त्यामुळें ग्लानि व शक्तिपात टळतो. वांति, लघवी बंद होणें ही वाईट लक्षणें टाळण्यासाठीं पुढील पुष्कळदां अनुभव घेतलेलें मिश्रण दिल्यानें पुष्कळ रोगी बरे झाले आहेत:- चाळीस औंस स्वच्छ पाण्यांत १५० ग्रेन सोडाबाय कार्बोनेट व १- ३ ग्रेन रसकापूर विरघळवून तें मिश्रण दर तासातासानें बर्फाच्या पाण्याइतके थंड करुन द्यावें. प्रतिबंधक

उपाय:- हिंवतापाप्रमाणें शक्य त्या विविध साधनांनीं डांस कमी व नाहीसें करुन त्यांचे माणसांनां दंश न होतीलसें करावें. म्हणजे गंधक, फार्मालीन, कापूर, कॅर्बालिक-  अ‍ॅसिड, चंदन वगैरे पदार्थ जाळून त्यांच्या धुरानें डांस जातील असें करावें. याचा उपयोग अमेरिकन शहरांत उत्तम झाला. निजतांना निरोग्यांनीं मच्छरदाण्या वापराव्या, दंशित माणसें पांच दिवस क्वारंटाईनमध्यें वेगळीं ठेवावीं व रोग्याची वर्दी आरोग्यखात्यांत द्यावी. पूर्वी ताप येऊन गेला असल्यास त्या दंशित माणसास वेगळे ठेऊं नये. ज्वराच्या पहिल्या तीन दिवसांत डांस रोग्यास चावून ते डांस नंतर दहा दिवसांनीं पूर्ण विकारी बनून निरोगी माणसांत दंश करुन ज्वर पसरवितात. व त्यांच्यांत ही शक्ति कित्येक आठवडेपर्यंत टिकून असते.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .