प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
       
पितृपूजा- मृत पितरांच्या संबंधीच्या विधिसमूहाला पितृपूजा म्हणतात. पितृपूजा ही धर्माच्या अनेक शाखांपैकीं एक महत्त्वाची शाखा आहे. पृथ्वीवरील सर्व प्राचीन व अर्वाचीन राष्ट्रांत थोडया फार फरकानें हिचें अस्तित्व आढळतें. मनुष्य मेला म्हणजे त्याचें पुढें काय होतें यासंबंधींच्या कल्पना निरनिराळ्या लोकांमध्यें निरनिराळ्या तर्‍हेनें आढळून येतात. मृत मनुष्य हा पृथ्वीवरुन जरी नाहींसा झाला तरी दुसर्‍या एखाद्या लोकांत वास करतो अशी कल्पना बहुतेक लोकांत आढळते. मृत मनुष्यासंबंधींची वरील कल्पना मान्य केल्यावर साहाजिकच असा प्रश्न अद्भवतो कीं या मृत मनुष्यांचा उर्फ पितरांचा, पृथ्वीवरील जिवंत प्राण्यांशीं व त्यांतल्यात्यांत आपल्या आप्तेष्टांशीं संबंध येऊं शकतो किंवा नाहीं; व संबंध असला तर तो कोणत्या प्रकारचा असूं शकेल. पुष्कळ लोकांत अशी समजूत आढळते कीं पितर हे मृत्यूनंतर आपल्या घराण्याशीं चांगल्या रीतीचा संबंध ठेवतात, आपल्या घराण्यांतील माणसांचें अगर आप्तेष्टांचें कल्याण करण्यासाठीं झटतात व आपल्या माणसांच्या शत्रूंचा नाश करण्याचा प्रयत्‍न करतात. तथापि याच्या उलट कांहीं जातींमध्यें व राष्ट्रांमध्यें अशीहि कल्पना प्रचलित असलेली आढळते कीं पितर हे आप्तेष्टांशीं व आपल्या माणसांशींहि चांगल्या तर्‍हेनें वागत नाहींत. त्यामुळें ज्या ज्या जातींचीं पितरांसंबंधींची जशी चांगली अगर वाईट कल्पना असेल त्या त्याप्रमाणें त्यांच्यामध्यें पितृपूजेच्या विधींमध्यें फरक आढळून येतात. पितर हे आपल्या आप्तेष्टांचें कल्याण करण्याविषयीं झटतात ही कल्पना रानटी लोकांत बहुतेक सर्वत्र आढळून येते; व त्यामुळें पितरांशीं चांगल्या रीतीनें संबंध ठेवण्याची, त्यांची स्मृति ठेवण्याची, त्यांचा परलोकवास सुखाचा जावा यासाठीं अन्नपाणी अगर मृतांनां आवडतील ते पदार्थ अर्पण करण्याची चाल अशा लोकांत आढळून येते. पितरांसंबंधीची ज्यांच्यामध्यें भयोत्पादक कल्पना आहे त्यांच्यांत पितरांनां येन केन प्रकारें संतुष्ट ठेवून त्यांचा पृथ्वीवरील माणसांशीं संसर्ग न होण्याची तजबीज करण्याची चाल आहे. तात्पर्य कोणत्याहि दृष्टीनें पाहिलें तरी पितृपूजेचें अस्तित्व सर्व राष्ट्रांमध्यें आहे असेंच दिसून येतें याबद्दल संशय नाहीं. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, टास्मानिया इत्यादि देशांत पितृपूजा अगदीं अस्फुट स्वरुपांत आढळते. तर पॉलिनेशिया, मेलॅनेशिया इत्यादि देशांत ती चांगली प्रस्थापित झालेली दिसते. सेमिटिक राष्ट्रांमध्यें पितृपूजा अस्तित्वांत होती किंवा नाहीं यासंबंधी निश्चयात्मक सांगतां येत नाहीं. आफ्रिकेंत बंटु लोकांमध्यें व विशेषत: पश्चिम आफ्रिकेंत पितृपूजा राजमान्य झालेली आढळते. ईजिप्तमध्येंहि व मलायाद्वीपकल्पांतहि हिचें अस्तित्व दिसून येतें. पण हिंदुस्थान, चीन व जपान यांत या पितृपूजेचें महात्म्य सर्वांत अधिक आढळून येतें. मृत पितरांच्या आत्म्यांनां संतुष्ट ठेवणें हें पवित्र कर्तव्य आहे असें चिनी लोक मानतात. आपण चांगलीं कृत्यें केलीं तर आपल्या पूर्वजांचा पारलौकिक  दर्जा वाढतो अशी यांच्यांत समजूत असलेली दिसते. आपले पितर आपण पृथ्वीच्या पाठीवर कोणकोणतीं कृत्यें करतों हें पहातात अशी कल्पना जपानी लोकांत आहे. १९०४-०५ च्या रुसो-जपानी युद्धांत या भावनेनेंच जपानी लोकांनी अद्भुत पराक्रम गाजविला. हिंदुस्थानांतहि पितृपूजेची चीन प्रमाणेंच महती असलेली आढळते. आपल्या पितरांची स्मृति बाळगणें व त्यांनां संतुष्ट ठेवणें हें प्रत्येक हिंदूचें कर्तव्य आहे अशी हिंदूंचीं भावना असते. पितरांनां संतुष्ट ठेवण्याचें काम मुख्यत: मुलाकडे असतें व जर एखाद्याला मुलगा नसेल तर तो दुसर्‍याचा मुलगा दत्तक घेतो. दत्तकाच्या चालीचें मुख्य कारण या पितृपूजेंस सांपडतें. दत्तविधानाचा हेतु पिण्डोदकक्रियादान आहे असें शास्त्रांत म्हटलेलें आहे. तात्पर्य, हिंदूमध्यें पितृपूजेचें माहात्म्य फार आहे असें आपल्याला दिसून येतें (विशेष माहितीकरितां 'श्राद्ध' यावरील लेख पहा).

रोममध्यें देखील पितृपूजा सर्रास अस्तित्त्वांत असलेली आढळतें. प्राचीन रोममध्यें प्रसिद्ध मृत माणसांचीं मेणाचीं चित्रें त्यांच्यावर मृतांचीं माहिती लिहून सार्वजनिक अगर खाजगी दिवाणखान्यांत ठेवण्याची पद्धत असे. या चित्रामध्यें मृत पितरांचा वास असतो अशी चिनी लोकांप्रमाणेंच रोमन लोकांचीहि समजूत होती किंवा कसे यासंबंधी निश्चयात्मक सांगतां येत नाहीं. प्रत्येक रोमन कुटुंबांतील पुरुषांवर पितरांची स्मृति ठेवण्याची व त्यांनां संतुष्ट राखण्याची पवित्र जबाबदारी असे. त्याचप्रमाणें रोमन लोकांतील निरनिराळ्या जातीहि आपल्या जातींतील प्रसिद्ध मृत माणसांचे वार्षिक स्मृतिदिन पाळीत असत. 'ज्याला पितरांनां पिंड देण्याचा अधिकार त्यालाच दाय हक्काचा अधिकार' हें जें हिंदूधर्मांतील एक तत्त्व आहे तशाच प्रकारचें तत्त्व रोमन कायद्यांतहि आढळतें.

जगांतील सर्व धर्मांच्या मुळाशीं पितृपूजा होती असें हर्बर्ट स्पेन्सरनें प्रतिपादन केलें आहे. त्याच्या मतें प्राचीनकाळच्या पितरांनांच पुढें देवतास्वरुप प्राप्त झालें आहे. पण हें मत बरोबर नाहीं असें आतां सिद्ध झालें आहे. संकटसमयीं पितरांनां कौल लावला असतां ते आपल्या वंशजांनां भविष्य सांगतात अशी समजूत पूर्वी पुष्कळ राष्ट्रांत रुढ असे. ग्रीस, इटली, मेलॅनेशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका इत्यादि ठिकाणीं ही चाल होती असें इतिहासावरुन दिसून येतें. पितरांची पूजा योग्य तर्‍हेनें करण्यांत आली नाहीं तर ते नाना संकटें उत्पन्न करतात अशी समजूतहि कित्येक लोकांत प्रचलित आहे. अशा प्रकारचे लोक आपल्यावर कोणतेंहि संकट प्राप्त झालें असतां त्याचा संबंध पितरांच्या कोपाशीं जोडतात. सेलेबिस, नाताळ, युगांडा इत्यादि ठिकाणी ही कल्पना अद्यापि आढळून येते.

देवकपूजा व पितृपूजा यांचाहि परस्परसंबंध आहे असें कांही विद्वानांचें म्हणणें आहे. कांहीं जातींत विशिष्ट प्राण्यांमध्यें पितर वास करतात अशी समजूत असून ते त्या प्राण्यांची पूजा करतात. उदाहरणार्थ, सुमात्रामधील रहिवाशी वाघांमध्यें पितर राहतात असें मानतात, व त्यांची पूजा करतात. आफ्रिका, मेलॅनेशिया इत्यादि देशांतील खालच्या जातींत ही चाल अद्यापि आढळून येते. देवकपूजेची पुढची पायरी पितृपूजा होय असें कांही विद्वानांचें म्हणणें आहे. पितृपूजेचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे मूर्तिपूजा होय. पितृपूजेचें अस्तित्व ज्या ज्या लोकांत रुढ होतें त्या त्या लोकांनीं पितरांच्या सन्मानार्थ इमारती अगर मंदिरें बांधावींत यांत आश्चर्य नाहीं. या चालीवरुन पुढें देवतांच्या मूर्ती करुन देवालयांत ठेवण्याची पद्धत पडली असावी.

वरील विवेचनावरुन आपल्याला असें आढळून येईल की, पितृपूजेचें तत्त्व फार प्राचीन काळापासून अस्तित्वांत आहे. कुटुंबपद्धति ज्या राष्ट्रांमध्यें जास्त आहे त्या राष्ट्रांत पितृपूजेला बरेंच महत्त्व आहे. पितृपूजेच्या मुळाशीं पितरांशी चांगला संबंध ठेवण्याची वृत्ति अगर मृत पितरांचें भय अगर क्वचित ठिकाणीं संकटसमयीं पितरांनां कौल लावून भविष्य विचारण्याची पद्धत हीं तीन तत्त्वें असलेलीं आढळून येतात. पितृपूजेनें मृत व जिवंत माणसांचा संबंध जोडतात. पितृपूजेनें कुटुंबीयांमध्यें व राष्ट्रांतील लोकांमध्यें सलोखा नांदतो, त्यामुळें अनेक इष्ट असे सामाजिक परिणाम घडून येतात.

[संदर्भ ग्रंथ:--स्पेन्सर-प्रिन्सिपल्स ऑफ सोशियालजी; टेलर प्रिमिटिव्ह कल्चर; जेव्हॉन्स--इंट्रोडक्शन टु दि हिस्टरी ऑफ रिलिजन्स (१८९६). ]

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .