प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें  
     
पिकांचें रोग- मनुष्यप्राण्यास व त्यानें पाळलेल्या जनावरांस जसे अनेक प्रकारचे रोग होतात तसेंच वनस्पतींनांहि पुष्कळ प्रकारचे रोग होतात. त्या रोगांपासून कित्येक वेळां पिकाचें पुष्कळच नुकसान होतें हें शेतकर्‍यांस पुष्कळ दिवसांपासून माहीत आहे. तथापि वनस्पतींच्या रोगांची कारणें व व त्यांवरील उपाय यांविषयीं नात्र लोकांनां अद्यापि फारच कमी माहिती आहे. युरोपमध्यें देखील वनस्पतींच्या जीवनव्यापारांचा अभ्यास सुरु होऊन चार शतकेंहि लोटलीं नाहींत. त्यापूर्वी वनस्पतींचा विचार केवळ व्यवहारिक दृष्टीनें त्यांच्या कृषिविषयक व औषधीगुणांकडेच लक्ष्य देऊन होत असे. पण जसजसें वनस्पतींच्या जीवनव्यापारांचें ज्ञान वाढत गेलें तसतसें वनस्पती या प्राण्यांप्रमाणेंच सजीव असून त्या उभयतांच्या जीवनव्यापारामध्येंहि विलक्षण साम्य आहे हें स्पष्ट दिसूं लागलें ('जीवनकार्यविचार' पहा), व पुढें स्वाभाविकपणेंच वनस्पतींच्या ग्रकृतीप्रमाणेंच वनस्पतींच्या विकृतींचा अभ्यास शास्त्रीय पद्धातीनें होऊं लागला. हा अभ्यास सुरु होऊन अद्यापि पुरीं पाऊणशें वर्षेहि झाली नाहींत हें ध्यानांत ठेविलें असतां त्याविषयी आपलें ज्ञान फारच थोडें आहे याबद्दल आश्चर्य वाटावयास नको. तथापि या थोडया ज्ञानानेंहि शेतकरी वर्गास बराच फायदा झालेला आहे व पुढें जसजसे अधिक शोध लागत जातील तसतसा अधिक फायदा होत जाईल असा भरंवसा आहे. म्हणून पिकांच्या रोगांसंबंधी आज उपलब्ध असलेल्या माहितीचा सारांश येथें द्यावयाचा आहे.

पिकांच्या रोगांचें वर्गीकरण.- प्राण्यांच्या रोगांचें वर्गीकरण सामान्यत: रोगांच्या लक्षणाप्रमाणें करण्यांत येतें पण वनस्पतींच्या रोगांच्या लक्षणांवरुन वर्गीकरण करणें सोयीचें होत नाही. कारण एकच लक्षण अत्यंत भिन्न अशा अनेक कारणांपासून उद्भवूं शकतें. लक्षणांमधील सूक्ष्म भेद ध्यानांत येण्याइतकी या विषयाच्या ज्ञानाची प्रगति अद्यापि झालेली नाहीं; उदाहरणार्थ पानें पिवळीं होणें हें एक झाडाच्या रोगाचें सामान्य लक्षण आहे. पण हें लक्षण पाणी फार कमी किंवा फार जास्त होणें, प्रकाश अति मंद किंवा अति प्रखर असणें, कीटकांनीं झाडांच्या मुळ्या खाऊन टाकणें, जमिनींत लोह नामक द्रव्याचा अभाव असणें, जमिनीत किंवा हवेंत कांही विवक्षित स्थितींत कांही विषारी वायु उत्पन्न होणें, व परोपजीवी वनस्पतींपासून उपद्रव होणें वगैरे एकमेकांपासून अगदीं भिन्न अशा अनेक प्रकारच्या कारणांनीं उत्पन्न होऊं शकतें. शिवाय कमी पाण्यानें आलेला पानांचा पिंवळेपणाहून दिसण्यांत भिन्न नसल्यामुळें वनस्पतींच्या रोंगाचें वर्गीकरण त्या रोगांच्या कारणांवरुन करणें जास्त सोयीचें आहे. हीं रोगांची कारणें व ह्यांचे प्रकार खालील कोष्टकावरुन ध्यानांत येतील.

                    वनस्पतीचे रोग.

 या कारणांपैकीं ''आंतर (अंत:स्थ) कारणजन्य'' म्हणून ज्यांचा उलेख केला आहे त्या संबंधानें वस्तुत: कांहीच ज्ञान झालेलें नाहीं. ज्या लक्षणांचा कोणत्याहि कारणाशीं स्पष्ट संबंध जोडसां येत नाहीं ती लक्षणें त्या वनस्पतींच्या प्रकृतिगुणामुळेंच उत्पन्न झालीं असेंच म्हणणें सध्यांच्या स्थितींत शक्य आहे. कांही वनस्पतींमध्यें नेहमींचा हिरवा रंग कांही कारणामुळें तयार होत नाहीं किंवा कमी प्रमाणांत तयार होतो. त्यामुळें अशा झाडांच्या पानांचा रंग पांढरा किंवा पांढरट होतो. मनुष्यप्राण्यास कोडरोग होतो त्या स्वरुपाचाच हा एक वनस्पतींचा रोग आहे व तो अंतस्थ कारणांनीं होतो. अशा रोगासंबंधी आपलें ज्ञान अत्यंत अल्प आहे. तथापि पिकांच्या निरनिराळ्या जातींत रोग होणें किंवा न होणें हें कित्येक वेळां केवळ त्या जातींच्या प्रकृतिगुणावर अवलंबून असतें. म्हणजे रोगांचें बाह्य कारण हजर असूनहि कित्येक वनस्पतींनां त्यापासून रोग होत नाहीं. अशा रोगांवर उपाययोजना करतांना ज्या प्रकृतिगुणांवर ते अवलंबून असतात त्यांचा विचार करावा लागतो. बर्‍याचवेळां हे प्रकुतिगुण आनुवंशिक असतात व अलीकडे आनुवंशिक गुण एका पिढींतून दुसर्‍या पिढींत कसे उतरतात यासंबंधानें बराच सप्रयोग अभ्यास असंख्य शास्त्रज्ञांकडून होत असून आजपर्यंत याविषयी महत्वाचें शोधहि लागलेले आहेत. या शोधांपैकीं अत्यंत महत्त्वाचे शोधहि लागलेले आहेत. या शोधांपैकीं अत्यंत महत्त्वाचा शोध ग्रेगर मेडेल नामक आस्ट्रियन जोगी होता त्यानें १८६५ त लावला. मेंडेलच्या प्रयोगावरुन असें अनुमान निघतें कीं एका पिढींतून दुसर्‍या पिढींत जे गुण उतरतात ते उगाच कसे तरी उतरत नसून नियमबद्ध रीतीनें उतरत असतात. व योग्य प्रयोग करुन कोणता गुण कसा उतरेल हें बर्‍याच निश्चयानें सांगतां येतें. या ज्ञानाच्या योगानें दोन किंवा अनेक पोटजातींचा संकर करुन रोगाच्या बाह्य कारणांनां न जुमानतां आनुवंशिकत्वानें आलेल्या केवळ प्रकृतिगुणांमुळेंच निरोगी राहणार्‍या पिकांच्या जाती निर्माण करणें आतां शक्य झालें आहे. याखेरीज या अंत:कारणांविषयीं जास्त कांही सांगतां येत नाहीं.

आतां बाह्य कारणांचा विचार करतांना प्रथम हें सहज लक्षांत येतें कीं एखाद्या झाडाची वाढ तें ज्या जमिनींत व हवेंत वाढतें त्यावर अवलंबून असते. वनस्पतीचें पोषण जमिनींतील निरनिराळे क्षार व हवेंतील कार्बन डाय ऑक्साइड वायु याजवर होतें. हें क्षार जमिनींतील पाण्यांत विरघळलेले असतात व ह्या पाण्याबरोबर मुळांवाटे वनस्पतींकडून शोषिले जातात. कॅर्बालिक अ‍ॅसिड वायूमधील कार्बन हें द्रव्य वनस्पतीच्या मुख्य घटकांपैकीं एक आहे. व तें हवेंतून मिळविण्याच्या कामीं एका विशिष्ट प्रखरतेच्या प्रकाशाची जरुर असते. तसेंच वनस्पतींचे जीवनव्यापार उष्णतेच्या एका विशिष्ट मर्यादेंतच उत्तम रीतीनें चालतात. यावरुन असें दिसून येईल कीं वनस्पतींची प्रकृति चांगली किंवा वाईट असणें हें बहुतांशीं जमीन, पाणी, प्रकाश, उष्णता, या निर्जीव परिस्थितीवरच अवलंबून आहे.

अनेक विद्यांच्या अनुभवानें सर्व देशांतील शेतकरीवर्गास आपल्या पिकांनां कोणत्या प्रकारची जमीन लागते, व पाणी, प्रकाश वगैरे बाबतींत त्यांच्या आवश्यकता काय असतात याचें बरेंच ज्ञान प्रत्यक्ष झालेलें असतें. जमिनीची मशागत, खतांची योजना, पाणी देणें, पिकांची निवड व निरनिराळ्या ॠतूंमध्यें निरनिराळ्या पिकांची योजना या सर्व गोष्टी चांगले शेतकरी सामान्यत: जाणतात. पीीक चांगलें किंवा वाईट येणें हें या बाबतींत असलेल्या ज्ञानावर व घेतलेल्या काळजीवर अवलंबून असतें. निरनिराळ्या पिकांनां या निर्जीव परिस्थितीपैकी कोणता भाग अनुकून व कोणता प्रतिकूल असतो व त्याचे इष्ट व अनिष्ट परिणाम काय होतात हें कृषिकर्मविद्या या विषयाखालीं येत असल्यानें त्याचा विस्तार येथें करण्याची जरुरी नाहीं. येथें येवढेंच सांगितलें पाहिजे कीं, जसजशी वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र व भूगर्भशास्त्र या विषयांमध्यें प्रगति होत आहे तसतसें वनस्पती कोणत्या जमिनींत चांगल्या वाढतांत, निरनिराळ्या वनस्पतींस त्यांची उत्तम वाढ होण्यास कोणत्या द्रव्यांची जरुरी लागते, उष्णता व प्रकाश यांचा परिणाम निरनिराळ्या वनस्पतींवर कशा प्रकारचा होतो इत्यादि विषयांसंबंधी ज्ञान वाढत जाऊन निरोगी पिके उत्पन्न करण्याचें काम अधिकाधिक सोपें होत चाललें आहे. या कामांत अलीकडील सूक्ष्मजीविशास्त्रांतील शोधांचा फारच उपयोग झालेला आहे व होणार आहे. या शोधांवरुन जमिनींचा सुपीकपणा केवळ तींतील क्षारांवर अवलंबून नसून तींत असणार्‍या सूक्ष्म जांवांवरहि (प्राणी व वनस्पती) अवलंबून असतो ही गोष्ट अलीकडे नजरेस आली आहे व या शोधाचें व्यवहारिक महत्व फार आहे.

आतां सजीव परिस्थितीमुळें प्राप्त होणार्‍या वनस्पतींच्या रोगांचा विचार करुं. हा विचार करतांना एक गोष्ट विशेष लक्ष्यांत ठेवली पाहिजे ती ही कीं, सुष्टीमध्यें जे असंख्य जीव (प्राणी व वनस्पती) आहेत त्या सर्वांमध्यें मोठया प्रमाणावर जीवनार्थ कलह अहर्निश चाललेला आहे. या पृथ्वीवर कांही विशिष्ट संख्येपर्यंतच जीव राहूं शकतील; त्यापेक्षां अधिक जीव उत्पन्न झालें कीं त्यांची उपासमारीची पाळी येणार. जगामध्यें जनन व मरण यांचें प्रमाण पाहिलें तर थोडया हिशोबानें असें लक्षांत येईल कीं केवळ स्वाभाविक कारणाखेरीज इतर कोणत्याहि कारणानें जगांतील जीवांनां मरण न येतें तर थोडयाच वेळांत पृथ्वीवरील सर्व जागा प्राण्यांनीं व वनस्पतींनीं गच्च भरुन गेली असती. पण अशी स्थिति प्रत्यक्ष प्राप्त होत नाहीं याचें कारण प्रत्येक जीवजातीचा थोडया फार वेळानें इतर जीवजातींशीं जीवनार्थ कलह सुरु होतो, व अशा परिस्थितींत राहाण्यास योग्य अशा जातींची सरशी होऊन इतर जाती मागें पडतात. या ''जीवनार्थकलहा'' संबंधी विशेष खुलासा डार्विनच्या उत्क्रांतितत्वाची माहिती देणार्‍या भागांत अन्यत्र केला आहे. येथें एवढेंच सांगितलें म्हणजे पुरें कीं, कलहाचा परिणाम ''जीवो जीवस्य जीवनम्'' या सूत्रांत फारच थोडक्यांत दर्शविला आहे. म्हणजे जगांतील जीव खरोखरीच एकमेकांस खावयास बसले आहेत, हें लक्ष्यांत ठेविलें असतां वनस्पतींचा इतर जीवांशी (प्राण्यांशी व वनस्पतींशीं) जो प्रत्यही संबंध येतो त्यावर त्यांची चांगली किंवा वाईट स्थिति बर्‍याच अंशांनीं अवलंबून असते हें सहज समजेल. येथें आपण पिकांच्या रोगांसंबंधी मुख्यत: विचार करीत असल्यानें पिकांचा इतर जीवांशीं संबंध येऊन त्याचें त्यांवर स्वास्थ कसें अवलंबून असतें हें एका उदाहरणानें सिद्ध करुन दाखवूं. एखादें गव्हाचें शेत घ्या. त्यामध्यें असंख्य गव्हाचीं काडें असतात. त्यांतील प्रत्येक काडाला कांही विशिष्ट प्रमाणांत पोषक द्रव्यें, पाणी, प्रकाश इत्यादि गोष्टींची जरुर असते. याकरितां प्रत्येक काडाला त्या शेतांतील थोडी थोडी जागा आपल्या स्वतंत्र उपयोगाकरितां मिळणें जरुर आहे. ती मिळाली तर त्या काडांची वाढ उत्तम व निरोगी होते. पण ती न मिळाली तर तें काड खुरटलेलें व रोगट होतें. शेतकर्‍यास हें अनुभवानें कळलेंच आहे म्हणूनच ते पिकाकरितां जमीन कसतांना एवढी मेहनत करतात. खताचा पुरवठा करतात, व बीं पेरतांना गर्दी न होतां व प्रत्येक मोडाला पुरेशी जागा व उजेड मिळेल अशी योजना करतात. पण येवढयानेंच भागत नाहीं. जी जमीन शेतकरी मोठया मेहनतीनें आपल्या गव्हाच्या पिकांकरितां तयार करतो ती साहजिक इतर रानटी झाडें, झुडुपें, तणें, व रानगवेंत यांनांहि आपली वाढ करण्यास सोयीची असते व त्यांनां थोडी संधि मिळाली तर ती आपला तळ त्या शेतावर ठेवून दिल्याशिवाय रहात नाहींत. शेतकर्‍यांचा असा नित्य अनुभव आहे कीं वरच्यावर खुरपणी केली नाहीं तर लवकरच हीं आंगतुक रानगवतें आपल्या पिकाचें अन्न लुबाडून घेऊन त्याच्या जागीं आपणच शेताचे धनी होऊन बसतात. बरें, आतां जमिनीची मशागत चांगली केली आहे व रानगवतेंहि वाढूं दिलीं नाहींत तर निश्चितपणें आपला गहूं चांगला येईल म्हणून स्वस्थ बसावें म्हटलें तर तसें होत नाहीं. कारण मनुष्यप्राण्यास जसें गव्हांचें पीक पाहिजे असतें तसेंच तें इतर बर्‍याच लहान मोठया जनावरांसहि पाहिजे असतें. म्हणून योग्य तजवीज केली नाही तर पिकाला (खाण्यास) गुरें, पक्षी, उंदीर, कीटक या अनेक जातींच्या प्राण्यांपासून वरच्यावर त्रास होईल व शेताची वाढ चांगली होणार नाहीं. बरें, असल्या प्राण्यांचा बंदोबस्त करुन भागेल म्हणावें तर तेंहि नाही. कारण नुसत्या खुरपणीनें न मरणार्‍या अशा कांहीं चोरटया, परोपजीवी वनस्पती त्या गव्हाच्या पिकांवर आपला निर्वाह करावयास तयार असतात. गव्हांवरील 'तांबेरा' व 'काजळी' किंवा ''कायणी'' हे रोग असल्या परोपजीवी सूक्ष्म वनस्पतींपासून होतात ही गोष्ट अलीकडे सिद्ध झाली आहे. सारांश, कोणत्याहि वनस्पतीची वाढ तिच्याशीं निरनिराळ्या रीतीनें असलेल्या जड उपाधीप्रमाणें अनेक प्राण्यांवर व वनस्पतींवर अवलंबून असते.

वरील उदाहरणावरुन वनस्पतींच्या सचेतन उपाधींचा प्रकृतिस्वास्थ्यावर परिणाम होणें कसें शक्य आहे हें लक्ष्यांत आलें असेल. आतां पिकांमध्यें नासधूस करणार्‍या व त्यांवर निरनिराळे रोग पाडणार्‍या प्राण्यांचा व वनस्पतींचा विचार करुं.

पिकांची नासाडी करणारीं लहान मोठीं जनावरें.- गवत खाणारीं रानटी व पाळीव जनावरें, हरणें, रानडुकरें, हत्ती, उंदीर, ससे वगैरे प्राणी या सदराखालीं येतात. यांच्या पासून होणार्‍या पीडेला रोग ही संज्ञा साधारणपणें देण्यांत येत नाहीं हें खरें, पण पिकांच्या दृष्टीनें पाहिलें असतां एखादें झाड अशा जनावरांनीं तुडवून, मोडून, चावून किंवा कुरतडून कोणत्याहि रीतीनें दुखविलें असतां त्याची प्रकृति बिघडते ही गोष्ट निर्विवाद आहे.

तृणधान्यांच्या पिकांत जेथें असंख्य झाडें एकेका शेतांत असतात तेथें व्यक्तिश: कांही झाडांचें अशा कारणानें नुकसान झालें तर शेतकरी तें जुमानीत नाहींत. पण जेथें फळझाडें किंवा इमारती लांकडाचीं झाडें यासारखी व्यक्तिश: महत्वाचीं झाडें लावण्यांत येतात तेथें अशा लहानमोठया जनावरांनीं उत्पन्न केलेल्या जखमा, मोडतोड वगैरे विकृतींनां विशेष महत्व येतें व त्यांचा ''रोग'' या दृष्टीनें विचार करुन त्यांवर उपाययोजना करणें जरुर पडतें. अशा जखमा केवळ जखमा म्हणूनच वाईट नसतात, कारण जखमा भरुन काढण्याचें सामर्थ्य वनस्पतींच्या अंगी प्राण्यांप्रमाणेंच स्वाभाविक असतें, परंतु त्या जखमांवाटे रोगजनक जंतू शिरण्याचा फार संभव असतो, म्हणून अशा जखमांची योग्य काळजी घेणें हें फळझाडाच्या वगैरे लागवडीत अत्यंत महत्वाचें आहे.

कीटक.- या प्राण्यांचा स्वतंत्रपणें उल्लेख करण्याचें कारण ते साधारणपणें बरेच सूक्ष्म असतात. पण त्यांची वाढ इतकी जलद होते, आणि त्यांची संख्या इतकी मोठी असते कीं, हां हां म्हणतां सर्व पीक उध्वस्त होतें, व त्यामुळें वर सांगितलेल्या मोठया प्राण्यांच्या पेक्षांहि शेतावर पडलेल्या किडीकडे शेतकर्‍याचें अधिक लक्ष जातें. शिवाय बर्‍याच कीटकांचा जीवनक्रम मोठा गूढ असतो. त्यांचीं अनेक रुपांतरें होत असतात व ते अंडीं केव्हां घालतात, कोठें घालतात, त्यांतून आळ्या केव्हां होतात, त्यांचीं पाखरें केव्हां होतात व या अनेक स्थित्यंतरांपैकीं कोणत्या स्थितींत ते पिकास हानिकारक होतात हें पुष्कळ वेळां समजण्यास फार कठिण असते व त्यामुळें कीटक व त्यांनी केलेली इजा यांचा कार्यकारण संबंध सहसा लक्ष्यांत येत नाही. ''रोग'' या नांवानें उल्लेखिलेले पिकांचे बरेच विकार किटकांपासून होतात असें सिद्ध झालें आहे व त्यांचा अभ्यास करण्याचें एक स्वतंत्र कीटकशास्त्रच उत्पन्न झालें आहे.

रोगोत्पादक वनस्पती:- या दोन प्रकारच्या असतात. कांहीं स्वतंत्र रीतीनें निर्वाह करणार्‍या व कांही परोपजीवी, पहिल्या प्रकारांत तणें, व अनिष्ट झाडेंझुडपें, जी आपल्या वाढीनें पिकांच्या वाढींत व्यत्यय आणतात त्यांचा समावेश होतो. तणाविषयीं येथें विशेष लिहिण्याची जरुरी नाहीं पण मोठया झाडापासून केव्हां केव्हां पिकांनां इजा होते याविषयी येथें थोडा उल्लेख केला पाहिजे. शेताभोंवती किंवा शेतामध्यें मोठीं झाडें असली तर त्यांच्या छायेपासून पिकांनां त्रास होतो ही गोष्ट पुष्कळांनां माहीत आहेच पण कांही कांही झाडांच्या मुळांच्या टापूंत इतर कोणत्याहि वनस्पती वाढूं शकत नाहींत. हा केवळ त्यांच्या छायेचा परिणाम नसून त्यांच्या मुळांतून निघालेल्या विषारी द्रव्यांचा परिणाम होय हें अलीकडे समजलें आहे. चिंच, बाभूळ, कळकीचें बेट यांच्या आसपास कांही अंतरापर्यंत कोणतेंच झाड वाढत नाही तें अशा कारणामुळेंच होय. शेजारीं शेजारीं वाढणार्‍या वनस्पतींचे एकमेकांवर होणारे परिणाम हा अलीकडे एक महत्वाचा विषय होऊन बसला आहे व बरेच रसायनशास्त्रज्ञ व वनस्पतिशास्त्रज्ञ याविषयीं शोध करण्यांत गुंतले आहेत.

आतां दुसर्‍या प्रकारच्या म्हणजे परोपजीवी वनस्पतींविषयी विचार करुं. प्रथमत: परोपजीवी वनस्पती म्हणजे काय हें थोडक्यांत सांगितलें पाहिजे. आपण साधारणपणें ज्या वनस्पती पाहतों त्या जमिनींत स्वतंत्रपणें उगवतात व वाढतात व आपल्यास लागणारीं पोषक द्रव्यें जमिनींतून पाण्यावाटें आपल्या मुळांनीं शोषून घेतात. शिवाय त्यांच्या पानामध्यें किंवा इतर कोणत्या तरी भागांत हिरव्या रंगाचे कण असतात. त्या कणांत असणार्‍या हरिद्रव्याच्या योगानें या वनस्पतींनां हवेंतील कॅर्बानिक अ‍ॅसिड पृथक्करण सूर्यप्रकाशाच्या साहाय्यानें करतां येतें. कॅर्बानिक अ‍ॅसिडमध्यें कार्बन व ऑक्सिजन अशीं दोन मूलद्रव्यें असतात. तीं या पृथक्करणामुळें निरनिराळीं होतात. ऑक्सिजन हवेंत परत जातो व कार्बन वनस्पतींच्या शरीरांत घेतला जातो. तेथें मुळ्‍यांवाटे शोषून घेतलेल्या अनेक द्रव्यांशी ह्यांचे निरनिराळे रासायनिक संयोग होऊन शर्करा, पिष्ट, तैल इत्यादि पदार्थ तयार होतात व या पदार्थांचा अन्नाप्रमाणें उपयोग करुन या वनस्पती आपली वाढ करतात. परोपजीवी वनस्पती आपलें अन्न वरील प्रकारानें तयार न करतां थोडयाफार प्रमाणांत तें इतर जीवांकडून (प्राणी किंवा वनस्पती यांजकडून) आयतेंच तयार असलेलें मिळवून आपली उपजीविका करतात. परोपजीवी झाडांची परिचित अशीं उदाहरणें म्हटलीं म्हणजे आंब्यावर वगैरे वाढणारें ''बांडगुळ'' किंवा ऊंस, ज्वारी वगैरेंच्या मुळ्‍यांवर वाढणारा ''टारफुला'' अथवा ''टवळी'' हीं होत. बांडगुळाचें बीं दुसर्‍या कोणत्या तरी झाडाच्या फांदीवर रुजतें व इतर झाडें ज्याप्रमाणें जमिनींतून आपलें अन्नसाहित्य शोषून घेतात त्याप्रमाणें बांडगूळ हे या फांदीतून आयतें तयार झालेलें अन्न चोरुन घेतें. बांडगुळामध्यें किंवा टारफुल्यामंध्यें ही परोपजीवी वृत्ति अद्यापि पूर्णपणें आली नाहीं असें म्हटलें पाहिजे, कारण त्यांचीं पानें कांहीशीं हिरवीं असतात व त्यांतील हरित्कणांच्या योगानें त्यास आपल्या अन्नाचे कांही घटकपदार्थ तयार करतां येतात. पण परोपजीवित्वाच्या पुढच्या पायरीस पोंचलेल्या दुसर्‍या पुष्कळ वनस्पती आहेत. ह्या सर्वस्वीच परावलंबी असतात, त्यांच्यामध्यें हिरवा रंग मुळींच नसतो किंवा नष्टप्राय असतो. याचें उदाहरण लसुणघांसावर वाढणारी अमरवेल किंवा निमाळी (आकाशवेल); हिचा रंग पिवळसर असतो, पानें अगदींच खुरटलेलीं असतात व त्यामध्यें हिरवा रंग नसतो. ही वेल दुसर्‍या वनस्पतीस वेढून टाकते व जेथें जेथें या दोघांचां संबंध येतो तेथें तेथें या वेलीस लहान लहान शोषणेंद्रियें फुटतात व त्यांच्या योगानें तिला दुसर्‍या वनस्पतीनें तयार केलेलें अन्न शोषून घेतां येतें. असलेंच आणखी एक उदाहरण म्हणजे तंबाखूच्या मूळांवर उगवणारा ''बंबाखू'' याचें होय.

आपल्या डोळ्‍यांस स्पष्ट दिसणार्‍या मोठया सपुष्प वनस्पतींपैकीं परावलंबी वनस्पतींचींहि उदाहरणें वर दिलीं व आणखीहि कांही देतां येतील पण परोपजीवित्व ज्यांमध्यें पूर्णत्वास चाऊन पोंचलें आहे असे दोन मोठे वनस्पतिवर्ग आहेत. त्यांतील वनस्पती सामान्यत: नुसत्या डोळ्‍यांपुढें सहसा न दिसणार्‍या अशा अति सूक्ष्म आकाराच्या असतात, या वर्गांतील अति मोठया वनस्पती म्हणजे ज्यांस आपण ''कुत्र्याच्या मुताची छत्री'' किंवा ''अलिंबें'' म्हणतों त्या होत. आपण ''बुरा अथवा बुरशी'' म्हणतों तो तर या वनस्पतिवर्गांतील एका वनस्पतीचें एक अरण्यच होय. यावरुन त्यांच्या आपणास सूक्ष्मत्वाची कल्पना होईल. या दोन परावलंबी वनस्पतिवर्गांपैकीं एकास ''अलिंब वर्ग'' असें नांव दिलें आहे व दुसर्‍यास ''जंतुवर्ग'' ही संज्ञा आहे. या जंतुवर्गांतील कित्येक जाती प्लेग, महामारी, विषम, क्षय वगैरेंसारख्या भयंकर रोगांचीं कारणें म्हणून हल्लीं प्रसिद्ध आहेत. या दोन वर्गांतील कोणत्याहि वनस्पतींत वर सांगितलेलें हरित्द्रव्य असत नाहीं व त्यामुळें त्यांचा निर्वाह अन्य प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शरीरापासून आयत्या तयार मिळालेल्या अन्नावरच होतो, अलिंबवर्ग व जंतुवर्ग यांच्याविषयीं स्वतंत्र माहिती पुढें दिली असल्यामुळें येथेंच त्यांच्या शरीरचनेविषयीं विस्तृत विवेचन करावयास नको. एवढेंच सांगितलें म्हणजे पुरें आहे कीं, हे दोनहि वर्ग अपुष्प वनस्पतींपैकी आहेत व त्यांची शरीररचना अत्यंत साधी असते. त्यांचा आकार अति सूक्ष्म असतो, पण त्यांची पुनरुत्पत्ति फारच झपाटयानें होत असल्याकारणानें त्यांच्या आकाराचा कमीपणा त्यांच्या संख्येंनें भरुन काढला जातो. यापैकीं कांही मृत जीवावर आपली उपजीविका करतात; त्यांस शवोपजीवी म्हणतात आणि बाकीच्या जिवंत जीवांवर निर्वाह करतात त्यांस जीवोपजीवी म्हणावें. शवोपजीवी अलिंब व जंतू मृतावर उपजीविका करणारे असल्यामुळें वनस्पतींच्या रोगाच्या दृष्टीनें त्यांचें महत्व नाहीं. पण जीवोपजीवी अलिंब व जंतू हे वनस्पतींमध्यें अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतात. शेतकर्‍यांच्या परिचयाचे अलिंबजन्य रोग म्हटले म्हणजे गव्हांवरील ''तांबेरा,'' ज्वारी-बाजरी वगैरेंवरील ''काजळी'' किंवा ''काणी'' व द्राक्षांवरील ''भुरी'' हे होत. जंतुजन्य रोगांचें उदाहरण म्हणजे बटाटयावरील ''चक्री'' किंवा ''बांगडी'' हा रोग होय. असले रोग फार पुरातन कालापासून माहीत आहेत व त्यांच्यापासून कित्येक वेळां पिकें फारच थोडया अवधींत साफ बुडालेलीं आहेत. पण हा दैवी क्षोभाचा परिणाम, अशीच केवळ हिंदुस्थानांत नव्हे तर इतर देशांतहि सुमारें पाउणशें वर्षांपूर्वीपर्यंत कल्पना होती. सन १८५० च्या सुमारास या रोगाचा अभ्यास शास्त्रीयपद्धतीनें करण्यास सुरवात झाली. ड बारी या प्रसिद्ध जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञानें १८६६ या वर्षी अलिंब व जंतुवर्गांविषयीं एक जगप्रसिद्ध ग्रंथ प्रसिद्ध केला व ह्या ग्रंथानेंच वनस्पतींच्या रोगांचा व अलिंब वर्गाचा कार्यकारणसंबंध प्रथम दाखविला. त्यानंतर गेल्या ६०।७० वर्षांत पिकांचे बरेच रोग काळजीपूर्वक तपासले जाऊन त्यांचा विवक्षित अलिंबांशीं संबंध प्रयोगानें सिद्ध करुन दाखविण्यांत आला आहे. 'वनस्पतिरोगविचार' असें एक नवीन शास्त्रच अलीकडे निर्माण झालें आहे व सर्व देशांत या विषयांत शोध चालू आहेत. पिकांच्या रोगांचीं निरनिराळीं कारणें जी वर सांगितलीं आहेत त्या सर्वांत कांहीअंशीं जास्त महत्त्वाचें कारण हे जीवोपजीवी अलिंब व जंतू होत असें म्हणण्यास हरकत नाहीं, कारण हें फार सूक्ष्म असल्यानें त्यांचें स्वरुप लवकर लक्ष्यांत येत नाहीं व त्यांनीं उत्पन्न केलेले रोग इतके नकळत येतात व इतक्या झपाटयानें फैलावतात कीं त्यापुढें मनुष्याची मति गुंग होऊन जाते. या रोगापासून नुकसानहि अतोनात होत असतें हें खालील आंकडयावरुन दिसून येईल.

रोगाचें नांव देशस्थान वार्षिक नुकसान रु.
गव्हांवरील तांबेरा हिंदुस्थान ४ कोटी
''    '' ऑस्ट्रेलिया ४॥कोटी
ज्वारीवरील काजळी मुंबई इलाखा २ कोटी
सुपारीवरील ''गळ'' कारवार व  १० लाख
किंवा ''कोळेरोग'' रत्‍नागिरी
द्राक्षावरील ''भुरी'' नाशिक २ लाख
ओटवरील ''काजळी'' अमेरिका १९ कोटी
बटाटयावरील रोग '' १० कोटी


असेच आणखी पुष्कळ रोग आहेत व त्यांपासून नुकसानहि पुष्कळ होतें. हे रोग बहुधां सांथीच्या स्वरुपाचे (सांसर्गिक) असतात व थोडयाच वेळांत पिकांचा पूर्ण नाश करतात. जमिनीची मशागत उत्तम झालेली असतां खत, खुरपणी, वगैरे योग्य वेळीं दिली असतांहि असे रोग उत्पन्न होतात व त्यांचें कारणहि सहसा लक्षांत येत नाहीं. तेव्हां इतर कारणांपासून झालेल्या विकारांपेक्षां याच कारणांपासून झालेल्या विकारांनां रोग ही संज्ञा प्रामुख्यानें लाविली जाते, व वनस्पतिरोगविचार या शास्त्रास प्रत्यक्ष व्यवहारांत पुष्कळ वेळां अलिंबविचार आणि वनस्पतिरोगचिकित्सक यांस अलिंबशास्त्रज्ञ असें कां म्हणतात त्याचा उलगडा होईल. आतां कांहीं सुप्रसिद्ध अलिंबजन्य रोगांचें थोडक्यांत वर्णन देतो.

''तांबेरा रोग'':-- हा ज्वारी, बाजरी, गहूं विलायती गवत लसूण घांस, एरंडी वगैरे निरनिराळ्या जातींच्या पिकांवर व जंगली झाडांवर होतो. पानांवर, देंठावर किंवा झाडाच्या दुसर्‍या कोणत्याहि भागावर तांबूस, पिंवळसर किंवा उदी रंगाचे ठिपके पडतात. या निरनिराळ्या पोषक वनस्पतींवरचा तांबेरा निरनिराळ्या जातीचा असतो व एकीवरचा तांबेरा दुसरीवर सहसा होत नाहीं. पण रोगांचीं लक्षणें व शिलिंघ्राचा जीवनक्रम साधारणपणें सर्वांमध्यें सारखाच आहे. म्हणजे तें पोषक वनस्पतीच्या शरीराच्या आंत राहून त्यांचे रेणू मात्र बाहेर दृष्टीस पडतात. हे रेणू वायु व कृमिकीटक वगैरेंकडून जिकडे तिकडे पसरले जातात व त्यांपासून रोगाची पुनरुत्पत्ति होते. तांबेर्‍याचे ठिपके या रेणूनेंच बनलेले असतात त्यांचे निरनिराळे रंग हे कालमानाप्रमाणें भिन्नजातींचे रेणू तयार होतात त्यामुळें प्राप्त झालेले असतात. या रोगानें कांही पिकांचें फार नुकसान होतें. गव्हाचें दाणे सुरकुतलेले हलके होतात. या रोगामुळें हिंदुस्थानांत दरवर्षी ४ कोटी रुपयांचें नुकसान होतें म्हणून मागें कोष्टकांत सांगितलेंच आहे. निरोगी जाती शोधून काढणें याशिवाय या रोगावर उपाय नाहीं.

''काजळी'' अथवा ''काणी'' रोग:-- हा ज्वारी, बाजरी, राळा, मका, ऊंस इत्यादि पिकांवर होतो, रोगजनक शिलिंध्रक रोगी झाडाच्या आंत वाढून फुलें यावयाच्या सुमारास फुलांत दिसूं लागतें. व दाण्यांतील सत्वांश खाऊन त्यांच्या जागीं आपले असंख्य रेणू उत्पन्न करतें. ''काजळीं'' ची काळी पूड या रेणूंचीच असते. या रेणूपासून रोंगाची पुनरुत्पत्ति होते. वरील सर्व पिकांवरील ''काजळीवर'' उपाय अद्यापि सिद्ध झाले नाहींत, तरी ज्वारीवरील रोगावर मात्र एक चांगला उपाय आहे तो हा-पेरण्यापूर्वी बीं मोर्चुताच्या पाण्यांत भिजवून वाळवून पेरणें. सोलापूर, सातारा व बेळगांव या जिल्ह्यांत काजळीपासून बरेंच नुकसान होतें. वरील सोपा उपाय केला असतां तें वांचेल.

द्राक्षांवरील ''भुरी'' रोग:-- या रोगापासून मुंबई इलाख्यांत बरेंच नुकसान होतें. द्राक्षांच्या पानांवर व फळांवर राखेसारखी भुकटी पडते. ती भुकटी ह्या रोगाच्या रेणूंनीं झालेली असते. हे रेणू एका वेलीवरुन दुसरीवर जातात व तेथें त्यांच्यापासून पुन्हां रोग होतो. द्राक्षांवर मोरचूत, कळीचा चुना, व साबण यांचें मिश्रण शिंपडलें असतां हा रोग बराच कमी होतो. गुलाबवरहि एक भुरीरोग होतो त्यावर वरील मिश्रण शिंपडलें असतां उपयोग होईल.

ऊस गाभ्यांत रंगणें:- हाहि एक शिलिंध्रकजन्य रोग आहे. उंसाचा गाभा लाल होतो व त्यांत मध्यें मध्यें पांढुरके ठिपके लंबवर्तुलाकार व आडवे असे दिसतात व बाहेरुन ऊंस हलके हलके वाळू लागतो अशीं या रोगाचीं लक्षणें आहेत. हा रोग मुंबई इलाख्यांत पुष्कळ ठिकाणीं आढळतो. हा जर मोठया प्रमाणावर झाला तर पिकाची फार नासाडी होते. रोगट बियाण्यापासूनच हा रोग मुख्यत्वें पिकास होतो. या करतां रोगट बीं न लावण्याची खबरदारी घेतली पाहिजे. जेथें रोग मुळींच नाहीं अशा ठिकाणाहून बीं मिळविलें पाहिजे. लावणीच्या वेळीं ऊंस सबंध न लावतां कांडीं कांडींच लावावीं व ज्या कांडयाच्या टोकांमध्यें यत्किंचित लाल रंग दिसेल तें लावूं नये. त्यांत रोग असण्याचा संभव असतो.

''केवडया'' किंवा ''गोसावी'' रोग.- हा बाजरी, ज्वारी, राळा वगैरे पिकांवर होतो. बाजरीचीं पानें प्रथम केवडयाच्या रंगाचीं होतात. व नंतर ती वाळून उभीं चिरलीं जाऊन त्यांचे धागे धागे सुटतात. कणसामध्यें दाण्याच्या जागीं लहान लहान हिरवीं सुरळी झालेलीं पानें येतात. हा रोग उत्पन्न करणार्‍या अलिंबाचा जीवनवृत्तांत अद्यापि पूर्ण समजलेला नाहीं व यावर अद्यापि उपायहि निश्चित झाला नाहीं.

सुपारीवरील 'कोळे'' रोग.- हा कारवार व म्हैसूरकडे पुष्कळ होतो यासच रत्‍नागिरीकडे ''गळ'' असें म्हणतात. हा मुख्यत: फळांवर पावसाळ्याच्या आरंभीं होतो. रोगजनक अलिंब फळाच्या त्वचेंत शिरुन फळें कुजून खालीं पडतात. अशा कुजलेल्या फळांचे ढीगच्याढीग रोग झालेल्या बागेंत दृष्टीस पडतात. या रोगानें फक्त कारवार जिल्ह्यांतच कमींत कमी ९ लाख रुपयांचें दरसाल नुकसान होतें. या रोगावर, म्हैसूर संस्थानांतील डॉक्टर कोलमन म्हणून एक तज्ज्ञ कामदार आहेत त्यांनीं मोरचुताचें एक विशिष्ट मिश्रण फळांवर शिंपडण्याकरतां शोधून काढलें आहे व गेलीं चार वर्षें त्याचा त्यानीं तिकडे उपयोग करुन पहिला आहे. त्यानें रोगजन्य नुकसान बरेंच कमी होतें असें सिद्ध झालें आहे. मुंबई इलाख्यांत आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत हा उपाय करुन पाहिला आहे. व त्यापासून फायदाहि झालेला आहे.

बटाटयावरील ''चक्री'' किंवा ''बांगडी'' रोग.-- ह्या रोगाचें प्रथम चिन्ह म्हटलें म्हणजे झाडें एकाएकीं वाळून मरुं लागतात. रोगी झाडापासून झालेला एखादा बटाटा मधोमध चिरला असतां सालीच्या आंत सुमारें पाव किंवा अर्ध्या इंचावर एक तपकिरी रंगाची किंवा काळसर अशी वर्तुळाकार रेषा दिसून येते. व चिरलेला बटाटा चिमटींत धरुन दाबला असतां या रेषेंतून एक पिंवळसर रंगाचा चिकचिकीत सूक्ष्म पदार्थ निघतो. हा जंतूंचा बनलेला असतो. रोगी बटाटयाच्या झाडांतील जलवाहिन्या या जंतूंनीं गच्च भरुन गेलेल्या आढळतात. व त्यामुळेंच पानांकडे पाणी जावयाचें बंद होऊन झाड मरतें. या रोगाचा प्रसार मुख्यत: रोगी बियाण्यापासून होतो, म्हणून रोग होऊं लागला असतां बटाटे सबंध न लावतां कापून लावणें चांगलें; म्हणजे रोगदर्शक रेषा असलेले बटाटे लावले जाणार नाहींत. शिवाय हा रोग उत्पन्न करणारे जंतू जमिनींत २ । ३ वर्षे तरी सहज जिवंत राहूं शकतात असें मानण्यास जागा आहे. म्हणून एखाद्या शेतांत ''चक्री'' रोग झाला असतां त्याच जमिनींत पुन्हां बटाटयाचें पीक ३ वर्षेंपर्यंत तरी घेऊं नये. बटाटयाच्या वर्गांतीलच वांगीं, टोम्याटो वगैरे पिकांनांहि असलाच रोग होत असतो. तेव्हां हीं पिकेंहि रोग झालेल्या जमिनींत न घेण्याची खबरदारी घेतली पाहिजे. आतां सांगितलेल्या रोगाखेरीज दुसरे अनेक अलिंबजन्य रोग पिकांवर होतात. त्यांपैकीं कांही परदेशांत होतात व कांही या देशांत होतात. ते फारसे महत्त्वाचे नाहींत. कांहीविषयीं अद्यापि बरीच माहिती मिळवावयाची आहे, म्हणून त्यांचा उल्लेख येथें केलेला नाहीं. आतांपर्यंत पिकांच्या रोगांच्या कारणांचा विचार  झाला. विवेचनाच्या सोयीसाठीं जरी हीं कारणें भिन्न म्हणून दर्शविली आहेत तरी प्रत्यक्ष व्यवहारांत हीं निराळीं कारणें पुष्कळ वेळां परस्परांस पोषक होऊन एक किंवा अधिक रोग उत्पन्न करतात हें येथें सांगितलें पाहिजे. उदहरणार्थ, पुष्कळ अलिंबजन्य रोगांचा फैलाव हवेमधील ओलाव्यावर व उष्णतेवर अवलंबून असतो व म्हणून यापैकीं बरेच रोग पावसाळ्‍यांतच होतात किंत्येक अलिंबजन्य रोग कांहीं किडयांच्या मागोमागच नेहमीं येतात. नाहींतर येतच नाहींत. उदाहरणार्थ, पेरु संत्रीं, जांभूळ वगैरे फळझाडांच्या पानांवर काजळासारखी काळी भुरी ''मावा'' नांवाच्या किडयापासून निघालेल्या गोड द्रव्यावर येते. या ठिकाणीं रोगांचें मूळ कारण अलिंब नसून ''मावा'' हें होय व ह्‍यावर उपाय करणें जरुर असतें. या उदाहरणावरुन उपाययोजना करतांना रोगांच्या कारणांचा किती खोल विचार करणें जरुर आहे हें लक्ष्यांत येईल.

आतां वनस्पतींच्या रोगांचीं लक्षणें कशीं असतात हें सांगितलें पाहिजे. हीं लक्षणें बहुधा सामान्य स्वरुपाचीं असतात व त्यांमुळें निरनिराळ्या कारणांपासून एकच लक्षण किंवा लक्षण-समुच्चय उद्भवतो असें पुष्कळ वेळां घडतें.

झाड पिंवळें पडणें.- झाडांचा नेहमींचा तजेलदार हिरव्या रंगाऐवजीं पिंवळसर किंवा फिका रंग येणें हें नेहमीं आढळणारें रोगाचें लक्षण आहे. गर्दीमुळें किंवा छायेमुळें मिळालेला अपुरा प्रकाश, श्रपुरी उष्णता, जमिनीमध्यें लोह द्रव्याचा अभाव, मुळांभोंवतीं सांचलेलें पाणी, अतिशय कोरडी हवा, हवेंमध्यें मोठमोठया शहरांत विशेषत: कारखान्यांच्या शेजारी आढळणारे दूषित किंवा विषारी वायु, मुळांस किंवा इतर भागावर लागलेले कीटक किंवा परोपजीवी वनस्पती, हीं झाड पिंवळें पडण्याचीं मुख्य कारणें होत.

कोड किंवा चित्रविचित्र रंग.- या लक्षणाचें कारण किंवा कारणें अद्यापि निश्चित नाहींत; ती बहुधा अंतस्थ असतात. असलीं लक्षणें दाखविण्याच्या झाडांमध्यें व साध्या झाडांमध्यें रासायनिक दृष्टया बरेंच अंतर दिसून येतें. कलमें किंवा डोळे बांधतांना कित्येक वेळां असें आढळलें आहे कीं, ही लक्षणें कलमांतून खुंटावर जातात. कांही शोधकांच्या मतें ही लक्षणें कांही टिकाणी तरी विवक्षित जंतूंमुळें होतात. (वरील दोनहि लक्षणांचा परिणाम एकच होतो. तो हा:- झाडांमध्यें हरित्द्रव्य कमी होतें व त्यामुळें शर्करा, पिष्ट इत्यादि पदार्थ कमी तयार होतात व झाडांची उपासमार होते)

पानावरील निरनिराळ्या रंगांचे ठिपके व भोंके- यांपैकीं बरेचसे अलिंबजन्य असतात. कित्येक कीटकांमुळें उत्पन्न होतात. प्रत्येक अलिंब किंवा कीटक कांही विशिष्ट तर्‍हेचे ठिपके उत्पन्न करीत असतात. या ठिपक्यांच्या रंगरुपाचें सूक्ष्म निरीक्षण केलें असतां त्यांचें कारण निश्चित करणें सोपें होतें. उदाहरणार्थ, ठिपक्यांवर पांढरट किंवा करडया रंगाची पूड असेल तर तें भुरी रोगाचें लक्षण आहे (अलिंबजन्य), पिंवळ्या, शेंदरीं तांबडया किंवा काळ्या रंगाचे ठिपके बहुधां ''तांबेरा'' नामक अलिंबजन्य रोगाचें लक्षण असतात. पुष्कळ पानांवर खवले पडल्यासारखे दिसतात ते एक जातीचे किडे आहेत. कित्येक वेळां पानांवर पडलेल्या पाण्याच्या थेंबांतून सूर्यकिरणांचें केंद्रीभवन होऊन तेवढाच भाग जळला जाऊन ठिपके पडतात.

वाळून जाणें.- पुष्कळ पिकांमध्यें कांही झाडें हलके हलके किंवा एकदम वाळून गेलेलीं दिसतात. याचें कारण पाण्याची कमतरता असें सकृत्दर्शनी वाटतें पण बारीक नजरेनें पाहिलें असतां पाणी भरपूर असूनहि हें लक्षण प्राप्त झालेलें दिसतें. अशा ठिकाणीं बहुतकरुन त्या झाडांच्या मुळ्‍यांस किडे किंवा अलिंब यांनीं उपद्रव केलेला असतो. कापूस, तूर वगैरे पिकांमध्यें हा रोग फार आढळतो. त्यास कांहीं ठिकाणीं ''मूळखाई'' हें अन्वर्थक नांव दिलें जातें. हा एक अलिंबजन्य रोग आहे. वाटाण्यावर ''बांगडी'' म्हणून रोग असतो तो झाडांवर झाला म्हणजे झाडें अशींच अकालीं मरतात. हा रोग जंतुजन्य आहे.

पानें जळणें.- या लक्षणाचें कारण बहुधां पाण्याचा अभाव हें असतें. यांत पानें जळून गेल्यासारखीं दिसतात. याशिवाय पांढरा, तपकिरी, लाल किंवा तांब्यासारखा असे निरनिराळे रंग केव्हां केव्हां येतात. त्या सर्वांचीं कारणें अद्यापि निश्चित झालेलीं नाहींत. या सर्वांचा परिणाम मात्र एकच होतो कीं, हरित्द्रव्याचें काम ह्यांच्या योगें मंदावतें व त्यामुळें रोगी झाडांची उपासमार होते.

कृत्रिम व स्वाभाविक जखमा.- जंगलाच्या व फळझाडांच्या लागवडींत कापणी किंवा छाटणी करतांना झाडांनां कृत्रिम जखमा करण्यांत येतात. त्याशिवाय जंगली व पाळीव जनावरें, झंझावत, वीज व गारा पडणें वगैरेंच्यामुळेहि झाडांस लहानमोठया जखमा होतात. या जखमा भरुन काढण्याची योजना वनस्पतींच्या अंतररचनेंत केलेली असते. तथापि जखमा मोठया असल्या तर त्या भरुन येण्यापूर्वींच त्यांमध्यें निरनिराळे दोष उत्पन्न करणारे किडे, जंतु व अलिंब प्रवेश करतात व पुष्कळ वेळां झाडांवर वाहतीं गळवें, टेंगळे व दुष्ट (कितीहि प्रयत्‍न केले तरी बरे न होणारे व्रण) असे उत्पन्न करतात म्हणून जखामांची जोपासना हे जंगलाच्‍या व फळझाडांच्‍या लागवडींत विशेष महत्त्‍वाचें काम आहे.

फोड व गांठी– खपल्‍या वगैरे लक्षणें बहुतकरुन कीटक किंवा इतर ल‍हान प्राणी किंवा अलिंब व जंतू यांच्‍यामुळें उद्भवनात. उंबराच्‍या पानावरील फोड, बटाटयावरील फोड (देवी), वांगी, मिरच्‍या वगैरे झाडांच्‍या मुळ्‍यांवरील गांठी, संत्री, द्राक्षें वगैरेंच्‍या पानांवर, किंवा फळांवर तपकिरी रंगाच्‍या खपल्‍या पुष्‍कळांच्या पहाण्‍यांत आल्‍या असतील. यांपासून झाडाच्‍या पोषणांत कमी अधिक व्‍यत्‍यय येऊन त्‍या मानानें नुकसान होतें. कित्‍येक वेळां या गांठी किंवा फोड पुष्‍कळ मोठे होतात. खैराच्‍या फांद्यांवर सुपारीपासून तो नारळाएवढया मोठाल्‍या असंख्‍य गांठी दिसतात. त्‍या एक जातीच्‍या अलिंबापासून होतात. हें लक्षण उत्‍पन्‍न करणारे किडे किंवा अलिंब जर फुलांवर किंवा कोंवळ्‍या पानांवर किंवा पानांच्‍या कळ्‍यांवर किंवा मुळांवर लागले तर झाडांचे अतोनात नुकसान करतात म्‍हणून ह्यांच्‍यापासून सावध राहिलें पाहिजे.    

स्‍त्राव व कुजणें– या सदराखालीं अनेक भिन्न कारणांपासून वनस्‍पतीच्‍या निरनिराळ्या भागांमध्‍यें उत्‍पन्न होणार्‍या लक्षणांचा समावेश केला आहे झाडांच्‍या मुळ्या किंवा फळें कुजणें हें कीटक, अलिंब किंवा जंतु या तिन्ही कारणांनी (एकत्र किंवा स्‍वतंत्रपणें असतांना) संभवते. उघडया जखमांमधून निरनिराळ्या तर्‍हेचे डिंकासारखे चिकट व बुळबुळीत पदार्थ निघतात ते याच कारणानें. शेवग्याच्‍या झाडावर एक प्रकारचा किडा असतो, तो जेथें जेथें पोखरतो तेथून मांसासारखा दिसणारा चीक किंवा गोंद निघतो, तो पुष्‍कळांनी पाहिला असेल. तो लक्ष्‍यांत आणला असतां या लक्षणाचें साधारण स्‍वरुप लक्षांत येईल. तसेंच सांठविलेले बटाटे, त्‍यांत आळ्या झाल्‍यावर किंवा झाल्‍या नसल्‍या तरी निरनिराळ्या कारणांनी कुजतात. या कुजण्‍यांत दोन प्रकार आहेत; एकांत कुजणार्‍या पदार्थाला पाणी (ओलें कुजणें) सुटतें. व दुसर्‍यांत पाणी सुटत नाही (कोरडे कुजणें). लक्षणांचा बारीक रीतीनें तपास करुन त्‍यांचें मुख्‍य कारण कोणतें व आनु‍षंगिक कारणें कोणी यांचा विचार करुन उपायायोजना करणें जरुर असतें.

वठणें- सबंध झाड किंवा झाडाच्‍या कांही फांद्या वठतात. हें या प्रकरणाच्‍या आरंभी सांगितलेल्‍या सर्व तर्‍हेच्‍या कारणांनी संभवते. स्‍वाभाविक अंतस्‍थ कारणांपैकी झाडाच्‍या जुनेंपणामुळें हा परिणाम दृष्‍टीस पडतो. किंवा आग, वीज, पाण्‍याचा अभवा, प्रखर ऊन, कडक थंडी इत्‍यादी अचेतन उपाधी, किंवा बांडगुळ किंवा इतर परोपजीवी वनस्‍पती (अलिंब वगैरे), टोळधाडी वगैरे सजीव परिस्थितीचे प्रकार यांमुळे हीं झाडें वठून जातात.

विद्रूपता- ही पुष्‍कळ निरनिराळ्या कारणांनी संभवते व या लक्षणांत प्रत्‍येक झाडाच्‍या विवक्षित आकारामध्‍यें व रुपांमध्यें जे कांहीं विशेष बदल होतात व ज्यांच्या योगानें त्या झाडाला इजा होऊन तें मरण्याचा संभव असतो, त्या सर्वांचा समावेश केला आहे. बाजरीच्या ताटाला कणीस येण्याच्या ऐवजीं लहान लहान पानांचाच एक गुच्छ पुष्कळदां येतो (त्याला गोसावी रोग असें म्हणतात). पुष्कळ झाडांच्या फांद्याफांद्यामधील अंतर स्वाभाविकपणें असांवयाचें त्याऐवजीं पुष्कळच कमी होऊन पुष्कळसा फांद्यांचा एक झुबकाच तयार होतो (उदाहरणार्थ, पिंपरीच्या झाडावर); व झाडाचा आकार अगदी खुरटलेला होतो, पानांचा आकार फार लहान होतो व पानें चुरमुडल्यासारखीं दिसतात (उदाहरणार्थ, वांगी व मिरच्या यांचा ''गोजा'' किंवा ''बोकडया'' रोग) हे विद्रूपतेचेच प्रकार होत. विद्रुपतेचीं कारणें देखील आरंभीं दर्शविलेल्या सर्व प्रकारचीं असूं शकतील.

फुलें व फळें अकालीं गळून पडणें, दाणे न भरणें.- पिकाच्या संबंधानें या लक्षणांबद्दल वारंवार तक्रारी येतात. याचीं सुद्धां अत्यंत भिन्न भिन्न कारणें असतात व कोणतें कारण किंवा कारणें लागूं पडतील याचा फार बारकाईनें विचार करावा लागतो. पुष्कळदां हीं कारणें अत्यंत गूढ असतात. जसजसा या विषयाचा अधिकाधिक अभ्यास होईल तसतसा त्यावर जास्त प्रकाश पडत जाईल. सध्यां याविषयीं फारच कमी माहितीं आहे.

आतां वनस्पतिविषयक रोगनिवारणाच्या सामान्य तत्त्वांचें थोडें दिग्दर्शन करुं. रोगनिवारणाचीं दोन मुख्य अंगें आहेत; एक प्रतिबंधन व दुसरें औषधोपचार. इंग्रजींत एक म्‍हण आहे तिचा अर्थ ''औषधोपचारानें रोग बरा करण्यापेक्षां रोग मुळींच होऊं न देणें हें अधिक चांगलें'' असा आहे. ही म्हण वनस्पतींच्या रोगांनां तर फारच लागू आहे. कारण या रोगांचें-विशेषत: अलिंबजन्य रोगांचें-अस्तित्वच आधीं रोगानें सर्व काम करुन टाकल्याशिवाय उघडकीस येत नाहीं. पुष्कळ अलिंबाचें तंतुमय शरीर, ज्यानें पोषकापासून अन्नरस चोरला जातो तें-आंत गुप्त असतें. व सर्व अन्नसंचय फस्त झाल्यानंतर संततिकार्यासाठी जेव्हां त्यापासून रेणू (बीज) उत्पन्न व्हावयाचे असतात तेव्हांच कायतीं ती अलिंबें बाहेर नजरेस पडतात. म्हणून त्यांनीं उत्पन्न केलेल्या रोगांवर औषधोपचार करुन ते बरे करणें फार कठिण, जवळ जवळ अशक्यच असतें. पण रोगाचें कारण व त्याच्या सांद्यत क्रमाची माहिती झाल्यावर मग तो रोग होऊं न देण्याबद्दल प्रतिबंधक उपायांची योजना करणें अधिक सोपें आणि उपयोगाचें होतें.

वनस्पतींच्या रोगासंबंधानें आणखी एक गोष्ट लक्ष्यांत ठेविली पाहिजे की, व्यक्तिश: कांही झाडांनां रोग झाला तर त्याचें विशेष महत्त्व शेतकर्‍यास वाटत नाहीं व जोंपर्यंत एकंदर पिकांवर त्याचा फारसा परिणाम होत नाहीं तोंपर्यंत व्यक्तिश: होणार्‍या झाडांच्या व्याधींनां ते रोग हें नांवच देत नाहींत. पण मुनष्यप्राण्याच्या रोगाप्रमाणेंच वनस्पतींच्या रोगांनां सुद्धां वेळोवेळीं सांथीचें स्वरुप येतें. तें येणें किंवा न येणें हें पुष्कळ कारणांवर अवलंबून असतें, व रोगनिवारण करतांना त्या कारणांचा विचार करणें जरुर असतें. कोणत्याहि रोगास सांसर्गिक किंवा सांथीचें स्वरुप यावयास पुढें सांगितलेल्या गोष्टींची आवश्यकता असते--(१) रोग ज्यामध्यें होईल अशा पुष्कळ व्यक्ती जवळ किंवा एके ठिकाणीं असाव्या लागतात. (२) संसर्गाचीं साधनें असावीं लागतात व (३) रोगजनक कारणांस अनुकूल परिस्थिति असावी लागते.

यांपैकीं पहिली स्थिति शेतकीच्या व्यवहारांत सहजच प्राप्त होते. एकाच जातीचीं असंख्य झाडें एके ठिकाणीं वाढविणें हेंच शेतकर्‍यास सोयीचें वाटतें, कारण एकाच जातीच्या झाडांनां एकाच प्रकारची जमीन व मशागत लागते पण रोगाच्या दृष्टीनें असें करणें वाईट आहे. कारण एका झाडावरचा रोग शेजारच्या सजातीयांवर सहज जातो. दुसरी गोष्ट संसर्गाचीं साधनें; यांचाहि फार बारीक रीतीनें विचार केला पाहिजे. विशेषत: कीटकजन्य व अलिंबजन्य किंवा जंतुजन्य रोगासंबंधानें त्यांचा प्रसार कसा होतो हें नीट ओळखिलें पाहिजे. कीटकजन्य रोगासंबंधानें स्वतंत्र माहिती येणार आहेच. येथें फक्त अलिंबजन्य व जंतुजन्य रोगांचा प्रसार कोणत्या रीतीनें होतो तें थोडक्यांत सांगितलें पाहिजे.

अलिंबजन्य व जंतुजन्य रोगांचा प्रसार कसा होतो हें लक्षांत यावयास रोगजनक अलिंब व जंतू यांच्या जीवनक्रमाची पूर्ण माहिती करुन घेणें जरुर आहे. या वनस्पतींची पुनरुत्पत्ति सूक्ष्म बीजापासून होते व ती फार झपाटयानें होते. हीं बीजें एका झाडावरुन दुसर्‍यावर जातात. तेथें योग्य परिस्थिति असेल तर तीं रुजतात व रोग उत्पन्न करतात. कित्येक वेळां बीजांची सुद्धां जरुर नसते. पुष्कळ अलिंबांच्या तंतुमय शरीराची वाढ जवळजवळ अमर्याद असते. म्हणजे त्यांतील एखादा जंतु तुटून दुसरीकडे जाऊन त्याला योग्य परिस्थिति मिळाली तर त्याची स्वतंत्रच वाढ होते. मोठया झाडांचीं कलमें लावून त्यांची पुनरुत्पत्ति बीजाशिवाय होते ह्यापैकींच हा प्रकार आहे. अलिंबाचीं बीजें किंवा बीजाप्रमाणें काम करणारे इतर अवयव हीं एका झाडावरुन दुसर्‍या झाडावर कशीं नेलीं जातात याचा विचार केला असतां रोगसंसर्गाचीं साधनें कोणतीं याचा खुलासा होईल. प्रथमत: रोगी झाडाशीं संबंध येणारे हवेचे व पाण्याचे प्रवाह, लहानमोठे प्राणी (किडे, गोगलगायी, माशा, ससे वगैरे) हे बीजवहनाच्या कामीं मदत करतात. त्यांत मनुष्यप्राण्याच्या आगगाडया, आगबोटी वगैरे प्रवासाचीं साधनें व पोष्ट ऑफिसचा व्यवहार यानें मोठीच भर पडते. म्हणजे या साधनांनीं हजारों मैलांवरचे रोग एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जातात. पिकांचे कांही भयंकर रोग याप्रमाणें एका देशांतून दुसर्‍या देशांतहि गेले आहेत व हें समजल्याचा एक परिणाम हल्लीं असा झाला आहे कीं, पुष्कळ राष्ट्रांनीं आपल्या देशांत अनिष्ट रोग अशा रीतीनें येऊं नयेत म्हणून वनस्पतिरोग- प्रतिबंधक कायदे केले आहेत. या कायद्यांमुळें एका देशांतून दुसरीकडे झाडें, बीं, कंद वगैरे कांहीं पाठवावयाचें असल्यास त्या देशांत नसलेले रोग या परकी झाडांबरोबर न जातील अशाबद्दल दोनहि देशांतील झाडें, बीं, कंद वगैरेंच्या व्यापार्‍यांनीं योग्य तजवीज केलीच पाहिजे, अशी सक्ति केली जाते. हिंदुस्थनांतहि या तर्‍हेचे कांहीं कायदे झाले आहेत.

अलिंबजन्य रोगांच्या प्रसाराचा दुसरा मार्ग म्हणजे अलिंबाचीं बीजें किंवा इतर अवयव, रोगी झाडाच्या बियाबरोबर किंवा इतर भागाबरोबर एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जातात. ज्वारीवरील ''कांजळी'' किंवा ''कायणी'' रोगाचें बीं, किंवा बटाटयावरील ''बांगडीचें'' बीं याच तर्‍हेनें एका पिकावरुन दुसर्‍या पिकावर जातें. कित्येक रोगजनक अलिंब व जंतु यांनां रोग उत्पन्न करण्यासारखीं झाडें नसलीं तरी त्यांच्याशिवाय जमिनींत मृत जीवांपासून प्राप्त होणार्‍या अन्नावर शवोपजीवी वृत्तीनें राहतां येतें. अशा जमिनींत पुढें एखाद्या वेळीं त्यांनां योग्य अशीं झाडें मिळालीं कीं हींच अलिंबें शवोपजीवित्व टाकून जीवोपजीवी वृत्ति धारण करतात, व त्या झाडांनां पछाडून त्यांमध्यें रोग उत्पन्न करतात. या वृत्तीच्या अलिंबापासून होणार्‍या रोगावर प्रत्यक्ष रीतीनें उपाययोजना करणें अशक्य असतें. बरींच अलिंबें प्रसंगानुसार निरनिराळ्या जातींचीं बीजें उत्पन्न करतात व यांचा परस्परसंबंध प्रथम सहसा लक्ष्यांत येत नाहीं. ज्या अवस्थेंत एखादें अलिंब रोगजनक असतें त्याकडेच आपलें लक्ष्य जातें, पण त्यांचें भक्ष्य ज्या वेळेस त्यास मिळेनासें होतें त्यावेळीं त्या अलिंबास रुपांतर करुन भक्ष्याशिवाय राहण्याची शक्ति प्राप्त होते असें पुष्कळदां घडतें एवढेंच नव्हे तर कांहीं अलिंबांची या बहुरुपतेच्याहि पुढें मजल गेलेली असते. म्हणजे ती आपल्या निरनिराळ्या अवस्थेंत निरनिराळ्या जातींच्या वनस्पतींचा आश्रय करतात व त्यामुळें त्या अवस्थांचा परस्पर संबंध लक्ष्यांत येणें फार कठिण होतें. गव्हांवरील ''तांबेरा'' उत्पन्न करणार्‍या अलिंबामध्यें ही बहुरुपता (अवस्थांतर) व ही आश्रयांतर करण्याची शक्ति ही उत्कृष्टपणें दृष्टोत्पत्तीस येते. संसर्गाच्या साधनांचा विचार करतांना अलिंबांच्या स्थित्यंतरांत त्यांनां आश्रय देणार्‍या झाडांचा विचार करणें अवश्य आहे.

रोगाला सांथीचें स्वरुप येण्यास आवश्यक अशी तिसरी गोष्ट म्हणजे रोगजनक अलिंबास व जंतूस अनुकूल अशी परिस्थिति. जरी भिन्न भिन्न अलिंब व जंतू यांच्यामध्यें या बाबतींत थोडाबहुत फरक दिसून येतो तरी साधारणपणें असें म्हणतां येईल कीं रोगजनक अलिंबांनां थोडयाबहुत ओलाव्याची व उष्णतेची जरुर असते. पावसाळ्‍यांतहि अनुकूल स्थिति स्वाभाविकपणेंच प्राप्त होते. याशिवाय कोणत्याहि जमिनींतील व हवेंतील दोषानें वनस्पतीची प्रकृति अशक्त झाली असतां त्यांच्यावर उपजीविका करणार्‍या कीटक व परोपजीवी वनस्पतींचा त्यांच्यावर अधिक जोर होतो. उदाहरणार्थ, पाणी अधिक झाल्यामुळें व रोपामध्यें गर्दी झाल्यामुळें किंवा अन्य कारणांनीं प्रकाश कमी झाल्यामुळें ज्या पिकांचे तरवे किवा रोपे करण्याचा प्रघात आहे त्यांमध्यें असा नेहमीं अनुभव येतो कीं, रोपे उंचच्या उंच व पिंवळसर रंगाचे व अशक्त असे होतात, व लवकरच त्यांचा ताठपणा जाऊन ते पडतात व कुजून जातात. कांही जातीचीं अलिंबें व जंतू त्या अशक्त झाडावर सहज जाऊं शकतात व त्यांच्यामुळेंच ही कुजण्याची क्रिया सुरु होते. दुसरीं कित्येक अलिंबे तीं ज्या वनस्पतींचा आश्रय घेतात त्या वनस्पतींच्या विवक्षित वयोमर्यादेंत त्यामध्यें प्रवेश करुं शकतात. उदाहरणार्थ, कोंवळ्या पानांवर किंवा फळांवर पुष्कळ अलिंबें फार लवकर जोर करुं शकतात. कोंवळेपणा एकदां सुरक्षितपणे निभावून गेला कीं, मग अशा रोगाची फारशी भीति नसतें. यामुळें केव्हां केव्हां औषधयोजना जरी शक्य नसली तरी रोगाची नेहमीची वेळ टाळण्याकरितां लवकर किंवा उशीरां तयार होणार्‍या पिकांच्या जाती पसंत करुन रोगापासून होणारें नुकसान वांचवितां येतें. मुंबई इलाख्यांत देशी भूईमुगावर एक ''टिका'' नांवाचा अलिंबजन्य रोग सुमारें १५ वर्षांपूर्वी (१९००-०४) पुष्कळच होत असे व त्यामुळें पीक मुळींच येईनासें झालें होतें. हा रोग पीक सरासरी ३॥ ते ४ महिन्यांचें झाल्यावर होत असे. त्यामुळें दाणे भरावयाच्या वेळेसच सर्व पानें गळून जाऊन पिकाचा नाश व्हावयाचा. यावेळीं मुंबई इलाख्यांतील शेतकीखात्यानें अमेरिकन व जपांनी भूईमुगाचें बीं आणविलें. या जाती ३॥ महिन्यांत तयार होतात व त्यामुळें त्यांच्यावर ''टिका'' रोग पडत नाही असें जरी नाहीं तरी तो पडावयाच्या वेळीं पीक जवळ जवळ तयार होत असल्यानें ह्या रोगाला सांथीचें स्वरुप येण्यापूर्वीच तें काढलें जातें, व त्यामुळें रोगापासून होणारें नुकसान वांचतें. या उदाहरणावरुन व वरील एकंदर विवेचनावरुन रोगनिवारण्याच्या कामीं रोगाचीं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कारणें, त्याच्या प्रसाराची साधनें व त्याच्या प्रसारास अनुकूल परिस्थिति कोणती वगैरेबद्दल किती बारीक रीतीनें चौकशी करणें जरुर आहे हें ध्यानांत येईल. आतां रोगप्रतिबंधनाचें मुख्य मार्ग खालीं सांगितलें आहेत.

झाडांत अंतर ठेवणें:-- झाडें दाटीनें लाविलीं असतां त्यांनां प्रकाश पाहिजे तितका मिळत नाहीं, त्यांची उपासमार होते, त्यांच्यामध्यें हवा चांगली खेळत नाहीं व त्यामुळें त्यांस अशक्तता प्राप्त होते. अशा अशक्त अवस्थेंत रोगजनक अलिंबांचा त्यांच्यामध्यें सहज शिरकाव होतो, व त्यांच्या वाढीस झाडांस प्रतिबंध करतां येंत नाहीं.

पाण्याचा निचरा व जमिनीची मशागत:- पाणी सांचल्यानें मुळामध्यें हवा खेळण्याचें बंद होतें व अलिंबाच्या रेणूंस (बीजांस) रुजण्यास आवश्यक असा ओलावा त्यास सहजच मिळतो, व रोग पसरण्यास मदत होते. नांगरणें, कुळवणें, कुळपणें, वगैरे शेतीच्या नेहमींच्या कामांनीं जमीन चांगली तयार झाली म्हणजे तींत जी झाडें येतात तीं चांगलीं सशक्त व सदृढ अशीं होतात, त्यांच्यामध्यें रोगप्रतिकार करण्याचें सहजच सामर्थ्य येतें. तेव्हां या कामांत मुळींच हलगर्जीपणा उपयोगी नाहीं. रानझाडें, रोगी पिकांचे अवशिष्ट भाग वगैरे सर्व काढून जाळून त्यांचा नाश केला पाहिजे, नाहीं तर रोगजनक अलिंबांचीं बींजें, कीटकाचीं अंडीं वगैरे त्यांवर राहून पुढच्या पिकास उपाय होण्याचा संभव असतो.

पिकांत फेरबदल करणें:- एकच पीक वर्षानुवर्ष एकाच जमिनींत घेऊं नये. पुष्कळ अलिंब किंवा कीटक कांही विशिष्ट जातीच्याच पिकांवर वाढतात व पिकांमध्यें बदल केला असतां त्यांस त्यांच्या पोषक वनस्पती न मिळाल्यामुळें नाश होतो. याच कारणाकरितां सर्रास एक जातीचें पीक न घेतां मिश्र पिक घेणें चांगलें. भिन्न जातींच्या वनस्पतींमध्यें अलिंबांची व कीटकांची गति खुंटते.

बियाण्याची तपासणी आणि रोगनिवारण- बीं लावतांना तें चांगलें तपासून लावावें. पुष्कळ रोग बियांमधून रोप्यास लागतात. रोगी पिकांपासून आलेलें मी होतां होईतों लावूं नये. अलिंबनाशक किंवा कृमिनाशक विषारी पदार्थांचें मिश्रण पिकांवर योग्य वेळीं शिंपडावें. यापासूनहि पुष्कळ रोगांचें निवारण होतें. या विषारी पदार्थांत मोरचूद, गंधक व चुना, केरोसीन, तंबाखूचें पाणी वगैरे आहेत. यांचा व दुसर्‍या कांही द्रव्यांचा उपयोग परदेशांत पुष्कळ होत असून पुष्कळ रोग त्यानें हटविले जात आहेत. जखमांस व व्रणांस रोगप्रतिबंधक औषधें लावावींत. कांहीं पिकांची, विशेषत: फळझाडांची मधून मधून छाटणी करावयाची असते. छाटणीनें झाडास पुष्कळ व्रण होऊन अलिंबाचीं बीजें जेथें रुजतील अशीं पुष्कळ मर्मस्थानें तयार होतात. अशा ठिकाणीं डांबर, मेण वगैरे रोगप्रतिबंधक पदार्थ लावावेत. जेथें मुळीच औषधोपचार लागूं पडत नाहीं अशा ठिकाणीं आणखी एक इलाज उपयोगी पडण्यासारखा असतो. पुष्कळ वनस्पतींच्या अनेक पोटजाती असतात. त्यांमध्यें एखादा रोग सर्वांनांच सारखा होतो असें नाहीं. कांहींनां पुष्कळ होतो, कांहींनांकमी होतो, तर कांहींनां मुळींच होत नाहीं. हा भेद त्यांच्या प्रकृतींतच असतो व हा आनुवंशिक असतो. म्हणजे तो जनकापासून संततींत उतरतो. आनुवंशिक गुण कोणत्या नियमांनीं संततीमध्यें उतरतात याविषयीं हल्लीं यूरोपमध्यें अनेक विद्वान मोठया काळजीनें व परिश्रमानें शोध करीत आहेत व आजपर्यंत त्यांनां त्यांत यशहि पुष्कळ मिळालें आहे. त्यावरुन अपत्यामध्यें जे गुण उतरतात ते उगीच कसे तरी उतरत नसून नियमबद्धरीतीनें उतरत असतात व प्रयोगानें कोणता गुण कसा उतरेल हें बर्‍याच निश्चयानें सांगतां येते. या ज्ञानाच्या प्रयोगानें दोन किंवा अनेक पोटजातींचा संकर करुन जीमध्यें आपल्यास इष्ट तेवढेच गुण आहेत अशी प्रजा प्रयोगाअंती निर्माण करणें शक्य झालें आहे. तेव्हां एखाद्या रोगावर सर्व उपाय थकले असतां अशी निरोगी जात प्रयोग करुन, उत्पन्न करुन तिचेंच बीं पुढें आणतां येईल. गव्हावरील 'तांबेरा', कापसावरील 'मूळखाई' ह्या रोगांवर याच प्रकारचा इलाज इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांत यशस्वी झालेला आहे.

अलिंबनाशक द्रव्यें, बोर्डो नामक मिश्रण:-- हें सर्वांत अधिक उपयोगी व महत्वाचें आहे. यांतींल द्रव्यें व प्रमाणें पुढें लिहिल्याप्रमाणें असतात. अच्छेर मोरचूद, अच्छेर कळीचा चुना, एक ग्यालन किंवा ५० शेर पाणी. मोरचुदाची पूड करुन ती एका खादीच्या पिशवींत घालून तिचें तोंंड बांधावें व ती एका लांकडाच्या टिपांत किंवा मातीच्या भांडयांत ठेवावी व तीवर सुमारें १० शेर गरम पाणी ओतावें. मोरचुत चांगला विरघळेपर्यंत ती पिशवी वरचेवर काडीनें किंवा दोरीनें हालवावी.

दुसर्‍या टिपांत कळीचा चुना अच्छेर होऊन त्यावरहि सुमारें १० शेर पाणी ओतावें व नंतर मोरचुताच्या पाण्यांत हें चुन्याचें पाणी ओतून काठीनें हालवून चांगलें मिश्रण करावें व मग बाकी राहिलेलें पाणी (३० शेर) त्यामध्यें घालावें म्हणजे मिश्रण तयार झालें. हें मिश्रण पावसानें धुवून जाऊं नये म्हणून त्यांत साबण, गूळ किंवा राळ यांसारखे चिकट पदार्थ केव्हां केव्हां घालावे लागतात. मिश्रणांत असतो तितकाच साबण अथवा गूळ घ्यावा. द्राक्षांवरील ''भुरी'' रोगावर साबणमिश्रित बोर्डो मिश्रणाचा उपयोग होतो. राळेचा उपयोग करावयाचा असल्यास मोरचुताच्या निम्यानें राळ व पावपट सोडा (पापडखार) घेऊन हे दोनहि पदार्थ एक तासभर थोडया-मोजून घेतलेल्या-पाण्यांत कढवावे. कढवितांना काठीनें एकसारखे ढवळावें, व नंतर मोरचुताच्या व चुन्याच्या मिश्रणांत तें मिळवावें. एकंदर पाणी साध्या बोर्डोमिश्रणाच्याच प्रमाणांत असावें. सुपारीवरील ''कोळे'' रोगावर या मिश्रणाचा उपयोग होतो.

मोरचुतानें पाणी:- नुसत्या मोरचुताच्या पाण्याचा बाजरीवरील ''काजळी'' या रोगावर उपयोग होतो. तो उपाय करण्याची कृति पुढें लिहिल्याप्रमाणें:-- १० तोळे मोरचुत घेऊन तो पक्क्या १२ ॥ शेर पाण्यांत विरघळावा. या पाण्यांत ज्वारीचें बीं एका पिशवींत घालून १० मिनिटें भिजूं द्यावें, नंतर तें सावलींत वाळवून पेरावें. पाणी संपेपर्यंत जितके बीं भिजेल तितके भिजवावें. मोरचुताचें पाणी किंवा मिश्रण करावयाचें असल्यास लांकडी किंवा मातीच्याच भांडयाचा उपयोग करावा. लोखंडी भांडयाचा करुं नये. याखेरीज कॉपरकार्बोनेट, गंधक, सब्लिमेंट फॉर्मलीन इत्यादि द्रव्यें सुद्धां शिलिंध्रघातक आहेत व त्यांचा विशिष्ट प्रसंगीं उपयोग होतो.

हीं द्रव्यें शिंपडण्याकरितां निरनिराळ्या प्रकारच्या पिचकार्‍या किंवा शिंपडण्याचीं यंत्रें यूरोप व अमेरिकेत तयार झालीं आहेत व त्यांमध्यें नवीन नवीन सुधारणा होऊन औषधें शिंपडयाचें काम लहान किंवा मोठया प्रमाणावर करणें सोपें होत चाललें आहे. मुंबई इलाख्यांत द्राक्षांच्या लागवडींत व कारवार व ह्मैसूर इकडे सुपारीच्या लागवडींत अशा सुधारलेल्या पिचकार्‍यांचा उपयोग हल्लीं शेतकरी करुं लागले आहेत.

[संदर्भ ग्रंथ:- या विषयावर मराठींत ग्रंथ किंवा लेख म्हणण्यासारखे नाहींतच. 'शेतकी व शेतकरी' या मुंबई इलाख्यांत निघणार्‍या मासिकांत व शेतकीखात्याच्या हस्तपत्रकांत व बुलेटिन्समध्यें पिकांच्या कांही रोगांविषयीं माहिती मिळेल. याखेरीज इंग्रजींत हिंदुस्थानांतील कांही पिकांच्या रोगांविषयीं स. १९१८ पर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीचें एक पुस्तक आहे. याशिवाय अ‍ॅग्रिकल्चर रिचर्स इन्स्टिटयूट (डॉ.ई.जे. बट्लेस-फंगी अँड डिसीज इन् प्लॅन्ट्स), पुसा व निरनिराळ्या प्रांतांच्या शेतकीखात्यातर्फे प्रसिद्ध होणार्‍या शेतकीविषयक लेखामध्येंहि हिंदुस्थानांतील पिकांच्या रोगाविषयीं माहिती प्रसिद्ध झाली आहे. यूरोप व अमेरिका खंडांत गेल्या पन्नास वर्षांत या विषयावर बरेच लेख व ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची यादी इंग्रजी भाषेंतील कोणत्याहि ज्ञानकोशांत पहावयास सांपडेल] [ले. प्रो. आजरेकर]

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .