विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
पालदेव- मध्य हिंदुस्थान. बांधेलखंडामधील पोलिटिकल एजन्सीच्या ताब्यांत असलेली एक मध्य हिंदुस्थानांतील चौबे जहागीर. क्षेत्रफळ २८ चौरस मैल. १८१२ मध्यें कालिंजरच्या चोबेवंशाच्या मुख्यास (दर्यासिंग) ही जहागीर देण्यांत आली. लोकसंख्या सुमारें नऊ हजार. खेडीं २०. उत्पन्न २५००० रुपये. ह्या संस्थानांत हिरे सांपडतात. मुख्य ठिकाण-नवगांव हें कालिंजरच्या दक्षिणेस २४ मेलांवर आहे.