प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
      
पानविभ्रम व पानासक्ति  पा न वि भ्र म.- हा चित्तभ्रम अट्टल दारूबाजांनां होतो व तो होण्याच्या अगोदर ते नेहमींपेक्षां फार दारू पीत असल्याची हकीकत ऐकू येते. अगर दारूची दोन तीन दिवस शिसारी येऊन अगर कांहीं अस्थिभंग वगैरे इजा फुप्फुसदाहादि मोठें दुखणें, मनास जबर धक्का या कारणांनीं (विशेष अपरिमित मद्यपानशिवाय) हा भ्रम होतो.

लक्षणें:- प्रथम, झोंप नीट न लागणें, सारखी चळवळ, चिडखोपरणा व तोंडास चव नसणें हीं लक्षणें सुरू होऊन झोपेंत भयंकर अगर वाईट साइट स्वप्नें पडतात व रोगी झोपेंत एकसारखा बरळतो. सकाळी रोगी थोडा बरा असतो पण रात्रीं चित्तभ्रम व बरळणें पुन:पुन: सुरू होतें.

त्या भ्रमाचा प्रकार येणेंप्रमाणें:- भोंवतालच्या वास्तविक अगर काल्पनिक व्यक्तींस उद्देशून रोगी एकसारखा बडबडत असतो. हें बोलणें त्याच्या गृहस्थितीविषयीं अगर कामधंद्याविषयीं असून त्यांत विषयांतर मनस्वी असतें. ''हें काय बडबडतां'' असें विचारल्यानें तो थोडा वेळ शुद्धीवर येतो पण पुन: भ्रम व बरळणें सुरू होतें. त्या भ्रांतींत अंथरुणातून उठून चिरगूट पांघरुणें तो अस्ताव्यस्त फेंकतो. असें करतांना कंपामुळें हातपाय लटपटतात व बोलतांना जीभ, ओंठ हीं अडखळतात. नंतर मन, नेत्र, कान वगैरे इंद्रियांस भ्रांति होऊन तेथें नसलेलें किडे कुत्रीं, मांजरें, उंदीर, झुरळें इत्यादि प्राणी त्यांस डोळ्यापुढें दिसूं लागून त्याच्या अंगावर व पांघरूणांत तीं आहेत असा त्यास भ्रम पडतो. अंथरूण, पलंग, कपाटें, पडदे, उभीं असलेलीं माणसें यांच्या मागें व खालीं पुन:पुन: तो पाहातो व सर्व तपासतो; व भोंवतलची मंडळी आपणांस मरणार अगर इजा करणार आहेत असें त्यास वाटतें. खोलींत असलेल्या निर्जीव वस्तू या त्यास जनावरें अगर प्राणी आहेत असें वाटूं लागतें व तो पराकाष्ठेचा संशयखोर बनून तेथें असणारांस मारहाणहि
करतो. पण जर कोणी दरडावलें तर मात्र तो भिऊन गप्प बसतो व त्याचें मन चालू भ्रमापासून दुसर्‍या विषयाकडे वळविणें कठिण नसतें. त्याचा चेहरा लाल, पापण्या फुगीर, जिभेस फार कोरड बुरशी, अशक्त व फार जलद नाडी व १०२ ते १०३ अगर अधिकहि ज्वर हीं लक्षणें असतात. घाम येतो, लघवी
थोडी व लाल आणि आलब्युमिनयुक्त असते. दृष्टिमज्जातंतूस कधीं कधीं दाह रोग होतो. भ्रमाच्या तिसर्‍या दिवशीं रात्रीं इतके दिवस नीट येत नसलेली झोंप आठ नऊ तास गाढ लागते व जागे झाल्यवर त्यास हुषारी वाटून भ्रम व कंप कमी होतो. व हळुं हळुं इतर बाबतींतहि सुधारणा होत जाते. असाध्यभ्रम असल्यास या सुधारणेंऐवजीं चेहरा फिका होऊन गुंगी वाढते व झटके, मोठा ज्वर, फुप्फुसदाह, हृदयक्रिया बंद पडणें इत्यादि निमित्तामुळें रोगी मरतो.

उपचार:- खोलींत इतरांस जाण्याची बंदी करून तींत अंधार राहीलसें करावें व तेथें गडबड करूं नये. दांडगाई बंद करण्यासाठीं पुरुष परिचारक असलेले बरे व त्यांनीं प्रसंगविशेषीं रोग्यास पटयांनीं खाटेस अगर पांघरुणांनीं मनगटें, घोटें, खांदे याठिकाणीं बांधून ठेवल्यानें त्याचें उठून पळणें व लोकांस मारणें बंद होतें. बांधतेवेळीं श्वासासाठीं छाती पोट व खुलें ठेवावें. हत्यारें, विषारी औषधें उचलून न्यावींत, उडी मारूं नये म्हणून खिडक्या बंद कराव्या,
दर दोन तीन तासांनीं त्यास थोडें गरम गरम दूध अगर मांसार्क अगर मांसकषाय देत जावा. इतर औषधें नकोत पण झोंप-गुंगी आणणारी क्लोलर, सल्फोनल, अफू, ब्रोमाईड, पराल्डिहाइड हीं औषधें चांगलीं आहेत. मात्र तीं वरचेवर देऊन शरीरांत सांचून विषबाधा न व्हावी १/४ ग्रेन मार्फिया व १/१५० ग्रेन हायोसीन टोंचून घालण्यास हायड्रीआयोडाइड अगर १५।२० ग्रेन क्लोरल पोटामध्यें देण्यास हरकत नाहीं. त्यांतील एक कोणतेतरी दर सहा तासांनीं द्यावें. जर ग्लानीचा अतिरेक झाला तर उत्तेजक औषधें हवींतच व त्यासाठीं प्रथम ईथर अमोनिया यांचा उपयोग करून पाहून नाइलाज झाल्यास अल्कोहोल द्यावा. फक्त अशा वेळीं अल्कोहोल त्यास उपयोगी पडतो.
     
पानासक्ति- (दारूबाजपणा) या विषयाचें विवेचन येथेंच करणें बरें. एखाद्या वेळींच फक्त खूप दारू प्याल्यानें मोठी गुंगी येते. कारण मद्यांत अल्कोहोल हें निशा आणणारें विष असतें. अतिमद्यपानाची संवय असलेले व नसलेले लोक कधीं कधीं मद्यपान करतात. परंतु कांहीं काळानें तें विष
शरीराबाहेर निघून गेले म्हणजे धुंदी उतरून तो मनुष्य सावध होतो. तथापि त्या मद्यपानाची कमाल झाली असल्यास बेशुद्धींतच हृदय व श्वसनक्रियांत शैथिल्य येऊन शेवटीं त्या बंद पडून प्राणोत्क्रमण होतें. त्याच्या अगोदर डोळ्याची बाहुली विस्तृत व अचल अगर संकोचित होऊन बारीक नाडी, चिकट घाम व घशांत श्वासाची घरघर, व कधीं कधीं आंचके, झटके व वातामुळें बडबड हीं लक्षणें होतात. असा बेशुद्ध मनुष्य मद्यपानामुळें गुंगी येऊन पडला आहे किंवा घुरें अगर फेंपरें येऊन नंतरच्या बेशुध्दींत आहे किंवा मस्तकाच्या कवटीस भयंकर इजा होऊन अगर अफूच्या विषारामुळें किंवा मूत्रपिंडदाहरोगाच्या असाध्यावस्थेंत युरिया क्षाराच्या विषारामुळें किंवा अतिथंड प्रदेशांत व देशांत केवळ अति थंडीनें गोठून पडला आहे याचा निर्णय डॉक्तरांच्या साहय्यानें केला पाहिजे.

अतिमद्यपानाचा तात्कालिक परिणाम:- हा सुरू होण्यास मनुष्याची प्रकृति व मद्याचें प्रमाण यांच्या मानानें कमी अधिक वेळ लागतो. पान केल्यानंतर आपण बहुत खुष आहों व आपणांस अत्यंत मजा वाटत आहे असें वेडें समाधान प्रथम मद्यप्यास वाटून त्याची बुद्धि व विचार यांस
एकदम चलन मिळून त्यास तरतरी व हुषारी वाटते व म्हणून त्याचें बोलणें बेफिकीरीचें येऊन व संभाषणांत विशेष चातुर्य नसलें तरी भाषण ओरडत व अडखळत व जोरानें होतें. नंतर हळूच जसें दृष्टीपुढें धुकें यावें तसें ही सर्व तरतरी हुषारी असून बोलण्यांत मधून मधून खंड पडतो व दृष्टीस नीट दिसेनासें होतें. आपलें डोकें ठिकाणावर नाहीं असें त्याचें त्यासच वाटतें व शरीराचा तोल सांभाळण्यास पंचाईत पडूं लागते. भोंवतालच्या वस्तू त्यास दुहेरी अगर धांवतांना दिसतात. विचारशक्ति नष्ट होते व ज्या गुप्त गोष्टी बोलूं नयेत त्या तो बोलत सुटतो; गुप्तपणा त्याजपाशी रहात नाहीं. नंतर त्याची दांडगाई व वेडेचार अगदींच उपहासास्पद होऊन केवळ पशूप्रमाणें तो वर्तन करतो. पण शेवटीं त्याचें त्यास भान नसून उलट आपणाभोंवतालच्या अखिल चराचर वस्तू मद्यपानानें धुंदींत असून मीच तेवढा सावध आहे असें त्यास वाटत असतें. आपलें वस्त्र, शरीर श्रेष्ठकनिष्ठ माणसें, लाजलज्जा, काळ, वेळ, स्थळ, घाण यांपैकीं कांहींच त्यास कळेनासें होऊन वेडयाप्रमाणें तो गुंगींत वर्तन करतो व शेवटीं गुंगीचा भर येऊन मुडद्यासारखा निचेष्ट असा गुंगून कांहीं बरेच तास तो पडतो. शुद्धीवर आल्यावर त्यास ज्वर आल्याप्रमाणें अंग मोडून येतें व ओकारी, भोंवळ, कानांत नाद, छाती धडधडणें, व भयंकर मस्तकशूळ हीं लक्षणें होऊन त्यास पराकाष्ठेची ग्लानि येते. या विषाचा प्रथम परिणाम बुद्धिस्थान जो मेंदु त्यावर होऊन नंतर तो पृष्ठवंश रज्जूवर हळू हळू होतो व पूर्ण लौल्य व बेशुद्धि सर्वांगास येते. फक्त रुधिराभिसरण व श्वसनक्रियासंयामक मज्जास्थानें पूर्ण नाहीं तरी बरींच शाबूत असतात. पण मद्यातिरेक झाल्यास त्यासहि लौल्य बाधा होऊन मरण येतें. हें विष शरीरांतून आपोआप निघून जाण्याची नैसर्गिक शक्ति असते. परंतु शुद्धीवर आल्यावर वर्णन केलेली ग्लानि, ओकारी, भोंवळ, मस्तकशूळ हीं लवकर जात नाहींत, तीं लक्षणें पुन:मद्य घेतलें म्हणजे चटकन नाहींशीं होतात हा चमत्कार अत्यंत घातुक होय. कारण यामुळें मद्यपानाची संवय सहज होऊन बसतेच बसते व या मद्यापानापासून धोका आहे. त्यामुळें थोडया काळांत इच्छाशक्ति व विचारशक्ति आणि नीति यांचा उत्तरोत्तर पूर्ण र्‍हास होऊन मनुष्य पूर्ण पागल बनतो. त्यास मोह आवरत नाहीं, कारण परिणामी ग्लानि येऊन क्लेश होतात, तरी पुन पान केल्यानें चटकन् तें सर्व थांबतें हेंहि त्यास कळल्यामुळें तो व्यसनाच्या पूर्ण ताब्यांत सांपडतो. त्यास मद्यपानाचा पूर्ण त्याग करणें याशिवाय खरोखरी एकहि खरा उपाय नाहीं. कारण कांहीं उपाय म्हणून व त्यांत टोंचण्याची लस यांसारखे सुद्धां निघाले आहेत.

दीर्घकालपर्यंत व्यसनाधीन झाल्याचे परिणाम:- या रोग्याची मज्जास्थानें, पचनशक्ति, यकृत, मूत्रपिंड हीं इंद्रियें जुनाट दाहामुळें बिघडतात व त्याच्या रक्तवाहिन्यांत काठिण्य येऊन त्या फुटून अनेक ठिकाणीं रोग उत्पन्न करतात. हा परिणाम बेशुद्धि येईपर्यंत दीर्घकाल मद्यपानानेंच
येतो असें नसतें तर नेहमीं व बराचकाळ मद्यपानामुळें होतो. हात आडवे स्थिर धरण्यास अगर तोंडाबाहेर जीभ काढण्यास रोग्यास सांगितलें तर हातास अगर जिभेस कंप सुटतो, हे मज्जास्थानविकृतीचें पहिलें लक्षण होय. रोग्याची एकसारखी चळवळ, झोंप न लागणें, जागें झाल्यावर ग्लानि
व त्यामुळें पुन: पान करण्याची प्रवृत्तिा त्याखेरीज जीव खचित जातो असें वाटून मद्यपानाचा मोह न आवरणें हीं लक्षणें आरंभीं होतात. नंतर कांहीं अगदीं साधें व सोपें कृत्य करणें झालें अगर अल्पस्वल्प कांहीं काळपर्यंत मानसिक श्रम करावे लागले तरी एक प्याला घेतल्यावांचून त्यास काहीं करतां येत नाहीं. कानांत घरघर, मस्तकांत भणभण, भोंवळ, कापरें, दचकणें, काजवे दिसणें व माथेशूळ हीं लक्षणें होऊन मज्जातंतुदाहाचें पूर्वचिन्ह म्हणून पायास कळा सुरू होतात, मन, बुद्धि, विचारनीति, इच्छाशक्ति, संयमशक्ति यांच्या ठायीं पराकाष्ठेचा कमकुवतपणा येऊन रोगी नादान व पाजी बनतो. मनाचा एकहि निश्चय करवत नाहीं, हातानें एकहि कृत्य धड होत नाहीं असें होऊन बर्‍यावाईट मार्गानें व हरप्रयत्‍नानें सदासर्वकाळीं मद्यपानानें शरीर व मन उत्तेजित केल्यावाचून मात्र तो सोडीत नाहीं. नंतर त्यास हातापायास कळा, फेपरें, अर्धांग अगर हात अगर पायांत लौल्य, सुनबहिरेपणा, वेड, मतिभ्रंश, भ्रम, औदासिन्यरोग, खूळ, म्हातारचळ यांपैकीं कांहीं रोग होतात. मज्जाविकृतीच्या आरंभापासून पचनविकृतीमुळें जागें होतांच वांति होऊन फराळ, जेवण रोग्यास जात नाहीं, भूक मंद असते. जिभेस बुरशी, तोंडास घाण, डोळे फुगीर व चेहरा पिंवळट व गालावर व नाकावर लाली असें स्वरूप असतें. यकृत वाढतें, लघवींत अलब्यूमिन व कधीं शर्करा सांपडते, हृदय व रक्ताभिसरण बिघडतें. मद्यपी मनुष्यास मुलें होण्याच्या वयाची स्त्री असल्यास मद्यपानारंभीं जें शरीर स्थूल झालेलें असतें तें पुढें कृश होऊन हातापायाच्या काडया व पोटाचा नगारा होतो. नंतर पोटांत पाणी जमून जलोदर होतें व पायांवर सूज येते; लघवी फार कमीं येते, कोणताहि फुप्फुसदाह व विषमज्वरासारखा मोठा रोग झाला असतां मद्यपी लोक इतर रोग्यांप्रमाणें दुखण्यांत टिकाव धरीत नाहींत.

उपचार.- कोणत्याहि सबबी पुढें न करतां मद्यपान पूर्ण बंद झालेंच पाहिजे, तें बंद झाल्यास क्वीनीन, सिंकोना, कुचला, कॉडलिव्हर तेल या पौष्टिक व पाचक औषधांनीं रोग्यास बरें वाटतें. झोंपेसाठीं अफू व मार्फिया खेरीज इतर औषध द्यावें. पाण्यांत बसणें, वाफारे वगैरे जलचिकित्सा रोग्यानें बंधनें व पथ्य पाळल्यास व मद्यपान वर्ज्य केल्यास फार उपयोगी आहे.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .