प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें 
     
पादांगुष्ठ वातरोग, रो गा चें स्व रू प- या रोगांत सांध्यामध्यें दाह उत्पन्न होतो; कारण रक्तामध्यें सोडियम बाय यूरेट नामक दाहोत्पादक क्षार जमत गेल्यामुळें त्या क्षाराचें कीट विशेषत: पाऊल व पायाचा आंगठा या ठिकाणी सूज उत्पन्न करतें. पण हात व इतर सांध्यांच्या ठायीं हा दाह व सृज होत नाहीं असें नव्हे. रोगास मधून मधून तीव्रपणाचा भर येतो व मध्यंतरी शरीरांत मूत्रपिंड व इतर ठिकाणीं विकृती होतात; यावरून हा केवळ संधिगत वात नसून सर्व शारीरिक रोग आहे असें हल्लीं मानतात.

कारणें.- आनुवंशिकता हे सबळ कारण असल्यामुळें मोठेसें कारण न घडतां साधारणपणें तरुणवयांत (२० व्या वर्षी) एखाद्या व त्यांत विशेषेकरून पुरुषांस कांहीं कुटुंबात हा रोग दिसून येतो. पण अशीं उदाहरणें वगळल्यास चाळिशी उलटल्यावर अगर त्यापुढील म्हातारपणाचा हा रोग आहे. याहूनहि चमत्कारिक व अपवादात्मक प्रकार हा कीं, आठ ते दहा वर्षांच्या मुलांत देखील हा रोग कधीं कधीं आढळतो. हा रोग श्रीमंतांनां तेवढा होतो असा समज आहे पण तो समज अगदीं सर्वस्वीं खरा नाहीं. नैट्रोजनयुक्त व मोठा आहार ज्यांचा आहे व त्यांत मदिरा सेवन बरेंचसें असल्यानें रक्तामध्यें व शरीरांतील सांधे, इंद्रियादि रचनेमध्यें विकृति घडविण्यास अनुकूल स्थिति तयार होते. मदिराप्रकारापैकीं फोर्ट, शेरी व माल्टपासून तयार झालेल्या दारूमुळें हा रोग विशेष होतो. व ब्रांडी व्हिस्की व  इतर प्रकारांमुळें कमी होतो असा अनुभव आहे. यांतच व्यायामाच्या अभावाची भर पडल्यास रोगवृद्धि विशेष जलद होते. सुखवस्तू अगर श्रीमंत रोगी जो व्यवसाय अगर धंदा करीत असेल त्यामुळें त्यास व्यायाम कमी घडून खाण्यापिण्याचे मोह अगर जरूरी विशेष असेल तर, किंवा टाईप पाडणारे, तेलाचे रंग देण्याचें काम करणारे अशा गरीब लोकांमध्यें शिशाच्या विषारामुळें हा रोग होण्यास फावतें. ज्यांनां एकदां हा रोग झाला आहे त्यास खाणें पिणें यांतील नियम जराहि मोढल्यास अगर काळजी, दु:ख, संकटें इजा वगैरे कारणांमुळें पुन:पुन: रोग उलटतो.
    
रोगलक्षणें.- हा रोग निरंतर जडल्यामुळें त्याच्या तीव्र व जुनाट अशा दोन अवस्था आहेत; त्यांपैकी तीव्रावस्थेचें वर्णन:- प्रथम पायाच्या आंगठयाच्या मागील हाडाच्या साध्याजवळ हा वात व ठणका प्रथम प्रगट होतो. त्याच्या अगोदर सूचक अशीं कांहीं अधिक लक्षणें कांहीं रोग्यांनां होतात तीं अशीं:- आपली प्रकृति फार उत्तम आहे असें वाटून भूक व आनंद वाढणें हेंहि एक लक्षण आहे. पण त्यापेक्षां औदासिन्य येऊन झोंप नीट न लागणें, अंग खाजणें, पेटके येणें, कानांत नाद, लाळ सुटणें, पोटशूळ, वांती, नळाश्रित वात हीं लक्षणें होतात. लघवींत बदल होऊन ती युरेट नामक क्षारामुळें गढूळ होणें हें लक्षण असतें व या लक्षणांनां आरंभ होऊन दोन दिवस होतात न होतात तोंच एके दिवशीं पहाटे सुमारें दोन तीन वाजतां पायाचा आंगठा दुखूं लागल्यामुळें रोगी जागा होऊन तें दु:ख व ठणका वाढल्यामुळें रोग्यास अगदी चैन पडत नाहीं. थोडी अगर जास्त थंडी वाजून थोडास ज्वरहि येतो. असह्य ठणका कांहीं तास टिकून नंतर आपोआप शमन होण्यास आरंभ होऊन त्यामुळें रोग्याचा डोळा लागतो. व जागा झाल्यानंतर पहातो तों दुखणारा आंगठा लाल होऊन सुजला आहे असें त्यास आढळतें दु:ख व सूज इतकी असतें कीं तीवर बोट लावूं देत नाहीं. व लावलें व जरा दाबलें तर तेथें किंचित् खळगा पडतो. सुजेवर तकाकी व टणकपणा असून त्यावर फुगलेल्या शिरा दिसतात. दिवसां हें दु:ख सह्य असतें पण संध्याकाळ व रात्र झाली कीं पहाटेप्रमाणें असह्य वेदना, थंडी, ताप, यातना, जाग्रण हीं लक्षणें पूर्ववत होऊन दुसरा दिवस उजाडून रात्रीं मागील लक्षणांची पुनरावृत्ति होते मात्र सूज अधिक वर चढते आणि हा क्रम पांच सहापासून तेरा चवदा दिवसांपर्यंतसुद्धां चालतो. त्या अवधींत सुजेचा रंग काळसर होऊन नंतर फिका होतो व शेवटीं सुजेवरील त्वचेचे जाडी पापुदरे व कोंडा निघून पडतो व नंतर पाय पूर्ववत् होतो. कधींकधीं हे पापुदरे गळत नाहींत व क्वचित् प्रसंगीं एक दोन नखें गळून पडतात. ज्वर बहुधां १०१० पेक्षां अधिक नसतो. परंतु त्यामुळें जिभेस बुरशी, अरुचि, तहान, मळमळणें, पोटास फुगवटी, शौचास साफ अगर मुळींच न होणें, पांढर्‍या अगर मातट रंगाचा मळ पडणें (पित्ताभावामुळें) इत्यादि लक्षणें होतात. क्वचित् रोग्यांमध्यें यकृतावर दाबल्यास दुखतें. लघवीची स्थिति वर सांगितली आहे. हल्लीं असें कळलें आहे कीं साध्या निरोगी माणसांपेक्षां यां वाताची खोड लागलेल्या रोग्यांच्या नेहमींच्या लघवींत रोजचें युरिक अ‍ॅसिड वाजवीपेक्षां कमी प्रमाणांत सापडतें व हा तीव्र रोगप्रकार घडण्याच्या अगोदर तर तें त्याहूनहि कमी होतें. पण सांध्यांच्या सुजेस आरंभ झाल्याबरोबर हें प्रमाण झपाटयानें वाढूं लागून त्याचा कळस दुसर्‍या अगर तिसर्‍या दिवशीं झाल्यावर पुन: लघवीचा रंग, रूप व घनता पूर्ववत् होऊं लागते तीव्र लक्षणांच्या वेळीं रक्तांतहि युरेटच्या रूपानें युरिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणांत सांपडतें. रक्तांतील पांढर्‍या पेशींचें प्रमाण
व व्यापार अधिक जोरानें चालतात. ही तीव्रावस्था संपल्यावर रोग्यास पूर्वी बरेच दिवस अननुभूत असा आराम व आनंद वाटतो. व कित्येक महिने अगर दोन तीन वर्षेंपर्यंत त्यास कोणत्याहि प्रकारची पीडा, त्रास पुन: होत नाहीं. अगर या रोगलक्षणांची आठवणहि होत नाहीं. नंतर अनपेक्षितपणें दुसर्‍यांदाहि अशाच तीव्र लक्षणांचा त्याच सांध्यांत अगर दुसर्‍या पायाच्या आंगठयांत आरंभ होतो. व  पूर्ववत् लक्षणें होतात. अगर मनगट, घोटा, हात या ठिकाणीं रोग प्रकट होतो. तिसर्‍या खेपेस तीव्र रोग पुन:प्रगट होतो. तो मात्र अंमळ पूर्वीपेक्षां लवकर होतो व यापुढें येणार्‍या दोन तीव्र रोगांतील अवधि कमी कमी होत जातो. व दर वेळीं कोणताना कोणता तरी नवा सांधा अगर दोन्ही सांधे धरले गेल्यामुळें ते विकृत होऊन शेवटीं रोगी सांधे जखडल्यामुळें अगदीं लुला, पांगळा होतो. या अवस्थेसच जुनाट रोग म्हणतात. अंगठे वगैरेंच्या सांध्यांतून प्रथम आरंभ होऊन हातापायाचे बारके सर्व सांधे क्रमाक्रमानें विकृत होतात. परंतु खांदा व जांघाड येथील सांध्यांत थोडयाच रोग्यांमध्यें अशा तर्‍हेनें विकृति उत्पन्न होते असें पाहण्यांत आलें आहे. हाताच्या बोटांचें सांधे उघडल्या अगर मिटल्या स्थितींत सुजून मोठे होऊन आंखडतात व हात आंतील बाजूकडे वक्र होऊन जखडतो. त्याचप्रमाणें विकृति होऊन बोटांवर माणूस उभें रहातें त्या स्थितींत पाऊल व घोटा आंखडतो. व गुडघा आणि कोपर अर्धवट अगर पूर्ण वांकडया स्थितींत आंखडतात. सांध्यावर टेंगळें उत्पन्न होतात. त्यांवरील चामडी प्रथम तुळतुळीत व फुगलेल्या शिरा दिसत असलेली दिसते. नंतर ती फाटून त्यांतील साईसारखा अगर खडूसारखा स्त्राव थोडथोडा वहातो. अगर त्यांत पू उत्पन्न झाल्यास तो त्वरीत वाहून जातो. हीं टेकाळें बोटें, खोबणी स्नायुबंधनें, कानाची कूर्चा वगैरे इतर ठिकाणीं सुद्धां असतात. हा स्त्राव सूक्ष्मदर्शक यंत्रांतून तपासल्यास त्यांत सोडियम बाय युरेटचे सुईच्या आकाराचे असंख्य स्फटिक कॅल्शिम युरेट अगर फास्फेट व सोडियम क्लोराइड (मीठ). याच्या स्फटिकाशीं मिश्रित असेलेले आढळतात. कधीं कधींच्या रोगाचा प्रारंभ वर वर्णिलेल्या व पुन: पुन: प्रगट होणार्‍या तीव्र स्वरूपांत न होतां त्यास एकदमच जुनाट अगर अर्धतीव्र स्वरूप येतें. अशा वेळीं साध्या संधिवाताप्रमाणें सांध्यांत पुष्कळ लसेचें पाणी जमल्यामुळें तो खूप सुजतो, परंतु लाली फार कमी असते. अनियमित प्रकारचा रोग हा या रोगाचा तिसरा प्रकार असून त्यामुळें शरीरांतील नाना इंद्रियांत प्रथम सूज व दाह होतो अगर त्यांचे व्यापार व त्यांच्या क्रिया अवरोधित होतात व म्हणून या कारणांमुळें जठर व आंत्राच्या ठायीं दाह होऊन वांती जुलाब, अजीर्ण, श्वासनलिक दाह, नेत्रपुटदाह, कनीनिकापटलदाह, मूत्रनलिकादाह, शिश्नमूलग्रंथिदाह, शिरादाह, मज्जादाह, व कोणी म्हणतात कीं, जुनाट यकृतदाह सुद्धां यामुळें होतो. तसेंच मूत्रपिंडदाह तर हटकून होतोच व त्या पिंडांत युरेट क्षाराचें कीट मनस्वी जमतें. तितकें तें सांध्यांत जमत नाहीं. त्या दाहामुळें इसब, धमनीकाठिण्य रोग व हृदय-स्नायूमध्यें मेदोवृद्धि हे रोग उत्पन्न होतात. इंद्रियव्यापार अवरोधित झाल्यामुळें माथे शूळ, अर्धशिशी, भोंवळ, दमा, श्वास छातींत व हृदयामध्यें वेदना, स्नायूमध्यें पेटके, उसण व लचक भरणें वगैरे रोग होतात. पण हे शेवटी सांगितलेले रोग स्वतंत्रपणेंहि (या पादांगुष्ठवाताचा उपद्रव नसतांहि) होतात.

संधिगत विकृतीचें स्वरूप.- सोडियम बाय युरेटच्या स्फटिकांचे कीट सांधे व तदनुषंगिक शिरा, स्नायु, स्नायुबंधनें व त्वचा या सर्व ठिकाणीं जमून दाहामुळें त्या रचना विरल व विकृत झाल्यामुळें सांध्यांच्या हाडांमधील कूर्चास्थि कुरतडून नष्ट होतात व सांधे आंखडतात. हें कीट मूत्रपिंड, मेंदूचा मागील भाग व पृष्ठवंशरज्जूचें आवरण या ठिकाणींहि जमतें.

रोगाच्या स्वरूपाची उपपत्ति:- वरील प्रकारचें कीट शरीरांतील सांध्यांत, इंद्रियांत व रक्तांत जमतें हें सांगितलेंच आहे. परंतु हें इतकें यूरिक अ‍ॅसिडचें कीट उत्पन्न कां होतें व तें स्वत: विषरूपी नसतांना अप्रत्यक्षपणें विषरूपी होऊन रोगोद्भव कसा करतें याविषयीं तज्झांनीं संयुक्तिक कल्पना बसविल्या आहेत. त्यापैकीं कांहीं पुढें दिल्या आहेत. शरीरांतील रचनांमध्यें न्यूक्लिओ प्रोटीड नामक नैट्रोजनयुक्त पदार्थ असतो. आहारामध्यें मांस वगैरे नैट्रोजनयुक्त पदार्थांचें पचन होतांना झँथिन हायपोझँथीन व एमिनो अ‍ॅसिड हे द्रवरूपी पदार्थ बनून त्यांवर शरीरांतील पाचक द्रव्याचें पचनकार्य घडल्यानें त्यांचें यूरिक अ‍ॅसिड बनतें व त्यावर शरीरांतील थायमिनिक अ‍ॅसिडांत मिळून आणखी पचनक्रिया होऊन त्याचें द्रवरूपी रूपांतर होतें. व ज्याचें असें रूपांतर होत नाहीं त्या युरिक अ‍ॅसिडचें कीट जमूं लागतें. आतां पाचक रसाच्या कमतरतेमुळें असें होतें किंवा मूत्रपिंडामार्गे विषात्सर्जन नीट न झाल्यामुळें कीट जमतें याविषयीं वाद चालू आहेत. पुष्कळांच्या मतें आंतडयांमध्यें अपवनामुळें जें आत्मविषशोपण पचनक्रियेच्या वेळीं पुष्कळ रोग्याच्या आंतडयांत चालूं असतें त्यामुळें या दोन्ही कारणांस उत्तेजन मिळतें अगर या आत्मविषशोषणाच्या योगें शरीरांतील पोषण व उत्सर्जन यासंबंधीं आय व व्यय या क्रियेंत बिघाड होऊन या सोडियम बाय युरेटचें कीट जमण्यास प्रारंभ होतो. या कीटाच्या स्फटिकाचे कण सांधा वगैरे रचनेच्या ठिकाणीं खपूं लागून त्या सांध्यांत दाह, सूज वगैरे उत्पन्न करून त्याच्या हालचाली व क्रियेंत व्यत्यय आणतात. हें सोडीयम बाय युरेट रक्तामध्यें मात्र द्रव स्थितींत असल्यामुळें सहजासहजीं मूत्रपिंडावाटे त्याचें उत्सर्जन होऊं शकत नाहीं. आणि म्हणून ठराविक मर्यादेपेक्षां तें रक्तांत अधिक जमलें कीं त्याचा सांखा जमून तें कीट सांधे व इतर इंद्रियांत सांठूं लागतें. अमक्याच ठिकाणीं कीट कां जमतें याचें उत्तर असें आहे कीं, जेथें रक्तवाहिन्या कमी व जेथें जोम व शक्ति कमी झालेली असते व ज्या ठिकाणीं इजा व धक्के अधिक बसण्याचा संभव असतो त्या ठिकाणीं तें जमतें व हीं सर्व कारणें पायाच्या आंगठयाच्या ठायीं संभवतात हें उघड आहे. याखेरीज असेंहि एका विद्वान शोधकाचें मत आहे कीं, कूर्चा, सांधे या ठिकाणीं सोडियम द्रव्य विपुल असल्यामुळें त्याशीं संयुक्त होऊन बाय युरेट सांठण्यास अनुकूल स्थिति असते व तशांत ओल, थंडी हीं कारणें असल्यानें या रोगास आरंभ होतो दुसरा शोधक म्हणतो कीं, या ठिकाणीं रचनाविकृति झाल्यामुळें तेथें बाय युरेट क्षार जमावा अशीच परिस्थिति आपोआप उत्पन्न होते.

रोगनिदान:- रात्रीच्या वेळेस सांधा ठणकून अशा तर्‍हेंनें एकाएकीं रोगास प्रारंभ झाल्यानें या रोगाविषयीं संदेह उरत नाहींच. पण तो तीव्र संधिवात आहे असें वाटण्याचें कारण नाहीं, कारण त्याच्या सुजेमध्यें अशी काळसर लाली नसते व ताप आणि घाम फार अधिक प्रमाणांत
असतो. अधिक सांधे धरले असले तरी या दोहोंमधील निदान करण्यास अडचण पडत नाहीं. हाताच्या मागें या रोगांमुळें लाली व सूज येते त्यावेळीं हें गळूं आहे असा भास होण्याचा संभव आहे. पण गळवांतील बिलबिलीतपणा चाचपतां येतो व दुखण्याच्या आरंभीची हकीकत विचारल्यानें अशी चूक होणार नाहीं. इतर कांहीं ज्वरांचे या रोगाशीं साम्य वाटण्याचा संभव आहे. रोगनिदान करण्यास ग्यारोडचा रक्तांतील असणारें युरिक अ‍ॅसिड ओळखण्याचा प्रयोग उपयोगी आहे. मात्र प्रयोग करण्याच्या अगोदर रोग्यानें पथ्याहारावर रहावें लागतें. निरोगी व बिन पथ्यावर राहणाराच्या रक्तांतहि युरिक अ‍ॅसिड असतें पण १०० क्यू. सें. रक्तामध्यें २ मिलिग्रामपेक्षां जर तें अधिक सांपडलें तर हा रोग आहे असें समजावें. हा रोग तीव्र स्वरूपांत नसल्यास या प्रयोगानें रोगनिदान सुकर होतें. अर्धशिशि, फुफ्फसदाह व मूत्रपिंडदाह या रोगांत मात्र हा रोग नसूनहि युरेट क्षार ६ मिलिग्रामपर्यंतहि सांपडतात. दुसरा प्रयोग असा आहे कीं नैट्रोजनयुक्त (ज्यास प्युरिन म्हणतात) पदार्थ आहारांत विशेषपणें आणल्यानें निरोगी माणसाच्या लघवींतील यूरिक अ‍ॅसिडचें प्रमाण जलद वाढतें, तसें या रोगानें ग्रस्त झालेल्या माणसाच्या लघवींत जलद वाढत नाहीं.

साध्यासाध्यविचार.- एकदां रोग स्थापित झाला कीं त्याचें बिर्‍हाड कायम होऊन तीव्र स्वरूपांत तो वारंवार प्रगट व्हावयाचा हें ठरलेलेंच असतें; मात्र आहार, पथ्य वगैरेंची व्यवस्था ठेवल्यास उपयोग होतो. रोगास आरंभ उतार वयांत झाल्यास त्यामुळेंच अयुष्य कमी होतें इतकी त्याची पीडा होत नाहीं व तो रोग, पथ्यानें साध्यं असतो. पण त्यामुळें मूत्रपिंडदाह, रक्तवाहिनीकाठिन्यरोग अर्धांगवायु यांपैकीं एखादा रोग जर फार सांधे धरले असतील तर होण्याचा संभव आहे. हा रोग तरुणपणीं झाल्यानें अगर तो अनुवंशिक असल्यास मात्र वार्धक्यदशेच्या अगोदरच बहुधां मृत्यु येतो.
     
रोगोपचार.- वरील युरिक ऍसिडाच्या उत्पत्तीसंबंधीं कल्पना प्रमाणभूत धरल्यास तें हरयत्‍नानें शरीरांत जमूं न देणें व जें कीट जमलें असेल त्याचें उत्सर्जन करणें प्राप्त आहे. योग्य पथ्याहार, व्यायाम व कांहीं थोडीं औषधें यांच्या योगें हें साध्य आहे. वरील कल्पना ज्यांनां मान्य नाहीं व ज्यांची रोगोत्पत्तीविषयी दुसरी उपपत्ति आहे त्यांच्या मतेंहि रोग्यास व्यायाम व पथ्याहार आवश्यक असतोच. अन्न थोडें खावें व त्यांत नैट्रोजन युक्त जड पदार्थ व शर्करायुक्त पदार्थ वर्जावेत. नवी कल्पना अशी आहे कीं नैट्रोजनयुक्त आहारासहि हरकत नाहीं पण त्यापैकीं ज्यांत प्यूरीन, नामक सत्त्व असतें तेवढे पदार्थ वर्जावे म्हणजे झालें. (१) ज्यांत सत्व नाहीं असे पदार्थ- दूध, अंडीं, लोणी, खवा, पाव, तांदूळ, साबूदाणा, फळें, कोबी, कॉलीफ्लावर, सालीट, वगैरे भाज्या, (२) ज्यांत तें माफक प्रमाणांत असतें असे पदार्थ कीं जे थोडे बहुत चालतात :- बटाटे, वाटाणे, ओटधान्य, घेवडे, ऍस्परेगस साल्मन, मासे, कॉडमासा कोंबडीचें पिलूं, मटन, (३) फार प्रमाण असल्यामुळें वर्ज्य पदार्थ-मटनखेरीज बहुतेक मांस, काळजाचें (यकृत) मांस, गोड पक्वान्नें वगैरे. या यादींत प्रत्येकाची आवडनिवड, संवय, धर्म समजुतींचा विचार करूनहि खाण्यास पुरेसे विविध पदार्थ सांपडतील. दारू वर्जावी हें उत्तम, परंतु उंची मद्यांत प्यूरिन नसतें; व बीयर, मद्य, चहा व काफी यांत तें माफक असतें. थोडी क्लारेट अगर शेरीमद्य अगर पुष्कळ पाण घालून ब्रांडी अगर व्हिस्की त्यांची संवय जडलेल्या रोग्यांनां चालतील. इतरांनीं त्यापासून अलिप्त असावें. साखरेऐवजीं दूध, चहा व काफींत साखरेचें सत्त्व (डांबरी सारख म्हणजे सॅचुरेटेड शुगर) वापरावे. व्यायामामुळें अन्नपचन होऊन तें अंगीं लागतें म्हणून तो आवश्यक आहे. प्रात:स्नान करून त्या वेळीं खरखरींत रुमालानें अंग खूप चोळावें. वाफारा घेणें, अंग रगडणें, चेपणें हेंहि या रोगांत प्रशस्त होय.

औषधोपचार:- या रोगावरील औषधामध्यें अन्नपचनाचा व मलोत्सर्जनाचा गुण विशेष पाहिजे. पोटशियम व लिथियम सायट्रेट व थायनितिक अ‍ॅसिड हीं तीं औषधें होत. तीं यथाप्रमाणांत दिलीं म्हणजे रक्तांतील युरिक अ‍ॅसिडाशीं संयुक्त होऊन तें द्रवरूपी बनल्यानें त्याचें कीट जमणें टळतें. हीं औषधें रोज ३ वेळां घ्यावीं. रोग जुनाट झाल्यावर फार रेचकें घेणें, रक्त काढणें, असे शक्तिपात होणारे इलाज करूं नयेत. कॉलचिकम हें औषध थोडया प्रमाणांत द्यावें. तसेंच, ग्वायाकम, पोटॅशियम आयोडाइड, अमोनिया बेंझोएट, बेंझाइक अ‍ॅसिड, सोडाकॅल्शिलेट, क्वीनीन हीं औषधें उपयुक्त आहेत. पोटांत सोडा लिथियम हें क्षारयुक्त रेचक व तसल्या झर्‍याचें पाणी, ताजी हवा व उत्तम वनश्रीमध्यें हवापालट करणें फायदेशीर आहे. तीव्र रोग असेल तेव्हां सुजलेला पाय घडवंचीवर अगर खुर्चीवर आडवां ठेवावा. त्याला वेदनाशामक बेलाडोना वगैरे तेल लावून कापसांत गुंडाळून ठेवावा. जळवा, शेक, पोटिसें, बर्फ हे उपचार करूं नयेत; दूध व पातळ पदार्थ फक्त द्यावेत. वृद्धांनां मात्र अंमळ अधिक पदार्थ द्यावेत. कॉलचिकम (१५-२५ थेंब) हें औषध यावेळीं फार उपयोगी आहे व तें पोटॅशियम अगर लिथियम सैट्रेटशीं मिश्रित करून द्यावें. त्याच क्षाराचीं रेचक औषधें द्यावीं. अतिवेदना असल्यास मार्फिया टोंचून घालावा.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .