प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
    
पक्षी, लक्षणें.- पक्षी हे सशीर्ष प्राणी असून त्यांच्या अंगावरील बाह्यकवच बाह्यत्वचेंतून झालेल्या पिसांचें बनलेलें असतें. तसेंच त्यांच्या चोंचींवरील शृंगमय आवरण व अंगुलीवरील नख्या हीं पण बाह्यकवचाच्या सदराखालीं येतात. पक्षी उभा राहिला असतां त्याच्या शरीराचा सर्व भार पश्चिमगात्रांवर पडून तोलला जातो व ह्या गात्रांचा संधिभाग शरीराच्या पूर्व दिशेस कललेला असतो. पूर्वगात्रांच्या जोडीचें पंखामध्यें रूपांतर झालेलें असतें. व पक्षी हवेंत उडत असतांना शरीर तोलण्यास त्यांनां मोठीं पिसें लावलेली असतात. ग्रीवाकशेरू व अलग अलग असलेले वक्ष:कशेरू (थोरॅसिक) यांचे घन (स्यूट्रम १ बॉडी) वेळेवर पूर्वखात (प्रोकॉक्लस) अथवा द्विखात (अँफिकॉक्लस) असूं शकतात. त्रिककशेरू (सॅक्रम) हे कटिकशेरूशीं संयोजित झालेले असतात, व ह्या एकत्र झालेल्या कशेरूशीं कांहीं शेवटचे वक्ष:कशेरू व कांहीं आदिम पुच्छकशेरूहि संयोग पावतात व ह्या सर्व एकत्र एकजीव झालेल्या कशेरूंपासून एक संयुक्तत्रिकास्थि (सिन्सॅक्रम) बनते, त्याला श्रोणिमंडला (पेल्व्हिक गर्डल) चे कटिकपाल (इलियम) जोडले जातात. शेवटचे पुच्छकशेरू एकत्र होऊन त्यांपासून एक हलास्थि (प्लाउशेअरबोन) बनते व त्याला अर्धवर्तुळाकाररीत्या पुच्छाचीं पिसें लागलेलीं असतात. करोटीचीं सर्व निरनिराळीं हाडें लवकरच एकमय होऊन जातात. पश्चिम कपालास्थी (अ‍ॅक्सिपिटल)ला एकच वाटोळें संध्यर्बुद बनलेलें असतें. दोन्ही बाजूंचे पूर्वमुखास्थी (प्रिमॅक्सिलॅक) मिळून वरचा जबडा झालेला असतो; खालच्या जबडयाची प्रत्येक बाजू पांच सहा अस्थी मिळून झालेली असते व तो जबडा करोटीशीं हनुसंधानास्थीच्यामुळें जुळलेला असतो (किंवा जोडला जातो). पृष्ठवंशीय पर्शुकांनां फांटे झालेले असतात व त्या उर:फलकाच्या (स्टर्नम) पर्शुकांबरोबर संयोग पावतात. उर:फलक फार रुंद झालेलें असतें व त्याला एक नौतलासारखी उभी धार उदरतलाच्या भागीं झालेली असते. अंसचंचू (कोरॅकॉइल) हे साधारण स्तंभासारखे बनलेले असतात. अंसफलक (स्केप्यूला) हे असिसमान झालेले असतात. व जत्रू (क्लॅव्हिकल) व अंतर्जुत्रू (इंटर क्लॅव्हिकल) हे जुळून त्यांची एक उलटी कमान झालेली असते. विद्यमान पक्ष्यांमध्यें अंतिमकूर्चशिरोस्थि (डिस्टलकार्पल्स) व करभास्थि (मेटाकपिल्स) मिळून एक संयुक्तहाड ज्याला कूर्चशिरकरभास्थि (कार्पोमेटाकार्पल) म्हणतात तें झालेलें असतें. पक्ष्यांच्या पूर्वगात्राला बहुतकरून तीनच अंगुली झालेल्या असतात. त्यांचे कटिकपाल (इलिअम) आकारानें मोठें असतें. कुकुंदरास्थि (इलिअम) व भगास्थि (प्यूबिस) हे शरीराच्या पश्चिम दिशेकडे वळलेले असतात, व एक अपवादाखेरीजकरून ह्यांच्या जोडअस्थींचा एकमेकांशीं कधींच संधि होत नाहीं. उर्वस्थीचें (फर्मर) शीर्ष त्याच्या दांडयाबरोबर समकोनी असें बनलेलें असतें. आदिमपादकूर्चशिरोस्थी (प्रॅक्झिमल टॉर्सल) हे जंघास्थीच्या (टिबिअर.) अंतिम टोंकाशीं संयुक्त झालेले असून त्यांच्यापासून जो एक अस्थि बनतो त्याला जंघकूर्चशिरोस्थि (टिबिओ टार्सल) म्हणतात. बहिर्जंघास्थि (फिब्यूला) अगदींच खिरटें बनलेलें असतें. अंतिम पादकूर्चशिरोस्थि व द्वितीय, तृतीय व चतुर्थ पादकरभास्थि (मेटाटार्सल्स) ह्या सर्व अस्थींचा संयोग होऊन त्यांचा एकच अस्थि बनलेला असतो. त्याला पादकूर्चशिरकरभास्थि (टूर्सोमेटाटार्सस) म्हणतात. प्रथम पादकरभास्थि सुटा अथवा स्वतंत्र असतो व पांचवा पादांगुलीय अस्थि बनलेलीच नसते.

तृतीय कालांतील (टर्शिअर पीरिअड) व विद्यमानकालीं सर्व पक्ष्यांत तोंडाच्या जबडयांना हांत लागलेले नसतात. त्यांच्या अन्ननलिकेला बहुश: एक फुगारा बनलेला असतो त्यास अन्नकोश (क्रॉप) म्हणतात व आमाशया (स्टमक) चे दोन भाग झालेले असून, पहिला भाग पिंडयुक्त (ग्लँडयूलर) असून त्यास पूर्वअमाशय (प्रोव्हेट्रिकल्स) म्हणतात. त्याच्या पुढचा भाग अतिशय जाड मांसल किंवा स्नायंचा बनलेला असून त्याला मंथनिका (गिझर्ड) म्हणतात. तन्वांत्राच्या व बृहदांत्राच्या संयोगाच्या भागाला दोन अघोत्र (कोएका) लागलेले असतात. पक्ष्यांचे फुप्फुस आंतून फार जाळीदार असतात परंतु ते स्थितिस्थापक नसल्यामुळें फुगले जात नाहींत. त्यांच्या आंत जाणार्‍या श्वासनलिकांच्या शाखा त्यांच्या पृष्ठावर येऊन पातळ निराळ्या वायुकोशां(एअरसेक्स)मध्यें उघडतात, व ह्या वायुकोशांचा कांही अस्थींमधील पोकळ्‍यांशी संयोग झालेला असतो. पक्ष्यांमध्यें ध्वनिमंजूषा (सायरिंक्स), त्यांची महाश्वासनलिका जेथें तिच्या दोन शाखांमध्यें दुभागली जाते तेथें बनलेली असते व तेथून पक्ष्यांमध्ये ध्वनि उत्पन्न होतो. हृदय हें दोन संचयकर्ण (ऑरिकल्स) व दोन नि:सारकर्ण मिळून (व्हेंट्रिकल्स) चार कर्णांचें बनलेलें असतें. उजवीकडील संचयकर्ण व नि:सारकर्ण यांच्यामधील पडदा स्नायूंचा झालेला असतो. प्रौढदशेंत महाधमनीची कमान (एओर्टिक आर्च) एकच असून जी उजवीकडे गेलेली असते. पक्ष्यांत वृक्कोन्मुखी शिरा (रेनलपोर्टल) नामशेष झालेल्या असतात. त्यांच्यांत रुधिररक्तपेशी अंडाकार व चैतन्यकेंदयुक्त (न्यूक्लिएटेड) असतात. रूधिराचें उष्णमान जास्त असतें. पूर्वमस्तिष्क (फोअर ब्रेन) व अनुमस्तिष्क (हाइडब्रेन, सेरिबेलिन) हीं विस्तृत असून एकमेकाला जोडलीं जातात त्यामुळें चक्षुमस्तिष्कशकले बाहेरच्या अंगाला कलली जातात. पक्ष्यांत घ्राणमस्तिष्क (अलफॅक्टरीलोब्स) फारच थोडया प्रमाणावर विकास पावतात. नेत्र विशाळ असतात व त्यांच्या आंत कांहीं एका प्रकारचे तमट बनलेले असतात. कर्णेंद्रियाच्या सुळक्याचा भाग मोठा व वळलेला असा झालेला असतो. प्रत्येक वृक्क (किडने) तीन भागांचें बनलेलें असून तें परिपूर्तितावस्थेंतील अंतिम वृक्कनलिका समूहा (मेटॅनेफॉस) पासून झालेलें असतें, कारण मध्यमवृक्कनलिकासमूह विनाश पावतो. पक्ष्यांत मूत्राशय बनलेलें नसतें. उजवीकडील अंडकोश (ओव्हरी) व अंडस्त्रोतस (ओव्हिडक्ट) हीं बहुतकरून अगदीं खिरटीं बनून दिसेंनाशीं होतात.

पक्षी अंडज आहेत व त्यांचें अंडें मोठें असतें व त्यांत अन्नमय बलक पुष्कळ सांठतो. अंडें अंडस्त्रोतसांतून बाहेर पडत असतांना त्याला पांढर्‍या निवळ बलकाचें वेष्टन मिळतें व या बलकाच्या सभोंवतीं एक दुहेरी पापुद्य्राप्रमाणें अंतर्कवचावरण तयार होतें, आणि या अंत:कवचावरणाच्या सभोंवती कवच बनतें. बरिपूर्तितावस्थेंत अंडें विकास पावत असतांना त्याच्यांत भ्रूणउदककोश (अ‍ॅमिअन) व नाल (अटॅन्टवी) ही तयार होतात व एक बलककोश (झोल्कसॅक) हि बनतो. अंडें उबवून नुकतेंच बाहेर निघालेलें पक्ष्याचें पिल्लू कांहीं पक्ष्यांमध्यें पिसांनीं आच्छादित असतें व त्याला चालतां किंवा पोहतां येतें व तें स्वत: चारा खातें; तर कांहीं पक्ष्यांमध्यें पिल्लाला पिसें आलेली नसतात, त्याची त्वचा उघडी असते व त्याला स्वत: चारा खातां येत नसून त्याला नर किंवा मादी चारा घालीत असते. पहिल्या प्रकारच्या पिल्लाला बालपक्क (प्रिकोशिअस) असें म्हणतात तर दुसर्‍या प्रकारच्या पिल्लाला अबालपक्क म्हणतात. वरील विवेचनावरून तुलनात्मक रीत्या पाहिलें असतां सशीर्ष प्राण्यांपैकीं पक्ष्यांमध्यें पुष्कळ बाबतींत विशिष्टपणा आढळून येतो. या वर्गांतील सर्व प्राणी हवेंत राहण्याला योग्य असे बनलेले आहेत आणि यांच्या शरीररचनेंतील प्रत्येक भागांत या असामान्य परिस्थितीला अनुकूल असे फरक झालेले आहेत; ते असे कीं उष्णताप्रवाहप्रतिरोध असें पंखांचें आच्छादन; पूर्वगात्रांचें पंखांमध्यें रूपांतर; पंखांची हालचाल घडवून आणणार्‍या स्नायूंचें उगमस्थान बनतील अशा प्रकारची उर:फलक व अंसमंडल यांची संघटना; भूतलावर उभें राहिलें असतां शरीराचा सर्व भार सहन केला जाईल अशा प्रकारची श्रोणिमंडलें व पश्चिमगात्रें यांची रचना; हे सर्व विशिष्ट गुण म्हटले म्हणजे हवेंत उडण्याला अनुकूल असे फेरबदल होत. याशिवाय दुसरे मोठे विशिष्ट गुण म्हटले म्हणजे विद्यमान पक्ष्यांमधील दंतविहीनता, प्रधान अथवा महाधमनीच्या डाव्या बाजूच्या कमानीचा आणि उजव्या अंडकोशाचा व अंडस्त्रोतसाचा लोप, मस्तिष्काची विशिष्ट रचना, घ्राणमस्तिष्काचा खिरटेपणा, डोळ्यांच्‍या वाढीचें परिणत स्‍वरुप व त्‍यांचा असामान्‍य मोठेपणा हे होत. असले विशिष्ट गुण इतर कोणत्याहि वर्गांत आढळून येत नाहींत.

दुसरी लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे कीं मत्स्य, स्थलजलचर व उरग या वर्गांच्या गणांतील व्यक्तिव्‍यक्तीमध्यें ते शरीररचनेचे फरक आढळून येतात ते विद्यमान सबंध पक्षिवर्गांतील व्यक्तींमध्यें फारसे आढळून येत नाहींत. कारण यांच्यांत फारशी भिन्नता दिसून येत नाहीं. यामुळें वर्गीकरण करतांना इतर प्राण्यांचे गणविभाग करण्यास भिन्नतादर्शक ठळक गुणांचा उपयोग करतां येतो तसे ठळक गुण या वर्गांतील प्राण्यांत आढळून येत नसल्यामुळें यांचे गणविभाग करतांना अगदीं क्षुद्र भेदांचा उपयोग करणें प्राप्त होतें. तथापि जे कांहीं फरक दिसून येतात त्यांच्या साहाय्यानें पक्ष्यांचें वर्गीकरण करतांना त्यांचे दोन उपवर्ग करतात ते येणेंप्रमाणें:- (१) मध्ययुगीनपक्षी (आर्चीओर्निथम = दंतधारी); व (२) नवयुगी पक्षी (निओओर्निथस = निर्दंत). या दुसर्‍या उपवर्गाचे दोन भाग होतात ते (अ) निर्नौंतलोर:फलक व (ब) नौतलोर:फलक हे होत. निनौंतलोर:फलकांत सात गण मोडतात व नौतलोर:फलकांत एकवीस गण मोडतात. निर्नौतलोर:फलकांत शहामृग व दुसरे पक्षी येतात. यांच्या उर:फलकाला नौतलासारखी उभी धार उदरतलाच्या भागीं झालेली नाहीं, म्हणून हे पक्षी वर हवेंत उडण्याच्या कामीं निरुपयोगी बनतात. नौतलोर:फलकामध्यें बहुतेक पक्षी हवेंत उडणारे आहेत. उदाहरणार्थ, बगळे, गरुड, घार, कपोत, पोपट, घुबड, बदक, पानकोळी, कोंबडीं इत्यादि.

नैसर्गिक वांटणी किंवा फैलावा अथवा विस्तार ह्या दृष्टीनें पाहिलें असतां कांहीं जातींचे पक्षी कांही विविक्षित भागांतच आढळून येतात. पक्षीं नानातर्‍हेचीं घरटीं बनवितात व ते आपल्या पिल्लांची जोपासना किती आस्थापूर्वक व कळकळीनें करतात ह्याविषयीं सर्वसाधारण माहिती सर्वांनां विदित आहेच. कांहीं पक्षी कालमानानें व ऋतुमानानें देशपर्यटण करतात ही गोष्ट पुष्कळांनां माहीत आहेच तेव्हां विस्तारभयास्तव त्याचें वर्णन देण्याचें कारण नाहीं.

कपोत खबुतर किंवा पारवा:- पक्षीवर्गांतील कपोत, खबुतर अथवा पारवा हा प्राणि प्रतिरूप कल्पून त्याचे सर्वसाधारण शास्त्रीय वर्णन खालीं दिलें आहे. बाळगिलेल्या खबूतरांचे प्रकार पुष्कळ आहेत, जसें लक्का, गिरेबाज इत्यादि; परंतु ज्या मूळ जातिविशेषापासून हे प्रकार विस्तार पावले तो एकच असून सर्वत्र आढळण्यांत येतो व त्याला पारवा अथवा जंगली खबूतर म्हणतात व बहुतेक त्यालाच अनुसरून खालील वर्णन आहे.

कपोताच्या कबंधाचा भाग पूर्वशेवटीं निमुळता होत जाऊन चंचलशीर्षामध्यें शेवट पावतो व त्या शीर्षाचा मस्तिष्कावरणाचा भाग वाटोळा झालेला असून त्याला ठळक चोंच असते व ही चोंच शृंगमय वेष्टनानें आच्छादित अशा वरच्या व खालच्या जबडयांनी बनलेली आहे. शीर्ष, ग्रीवा व कबंध हीं सर्व पिसांनीं गर्द आच्छादिलीं असून त्या पिसांची गति शरीराच्या पश्चिम शेवटाप्रत असते व तीं पिसें एकमेकांवर मढवलेलीं असतात. कबंधाच्या पश्चिम शेवटीं कांहीं विभक्त असलेलीं परंतु एकवटून लागलेलीं पिसें असतात त्यांनांच पुच्छ असें म्हणतात. कबंधाच्या पूर्वभागापासून पूर्वगात्रांची जोडी पिसांनीं आच्छांदित अशी पंखरूपानें बनलेली असते व हे पंख पक्षी विश्रांति घेत असतांना मिटले जाऊन त्यांच्या शरीराच्या पार्श्वभागीं चिकटून राहतात. कबंधाच्या पश्चिमशेवटच्या भागापासून पश्चिम गात्रांची जोडी झालेली असते, परंतु पिसांच्या आच्छादनामुळें जिवंतपणांत फक्त गात्राचा शेवटच्या पायाचा भागच दिसण्यांत येतो. या पायाच्या भागावर खवले लागलेले असतात व त्याला एकंदर चार बोटें असून त्यांतील तीन पुढल्या अंगाला वाढलेलीं असतात व चवथे एकच पाठीमागच्या दिशेस वळलेलें असतें.

ग्रीवा किंवा मान हिच्या आकाराची खरी कल्पना कपोताच्या अंगावरील सर्व पिसें काढून टाकल्याशिवाय होत नाहीं. ती लांबलचक, फार चंचल व लंबवर्तुळाकार असून शीर्ष व कबंध ह्यांच्यापेक्षां अगदी निराळीच दिसते. पुच्छ म्हणजे कबंधाचा अगदीं थोडासा निमुळता पश्चिमशेवटाचा भाग होय व त्यालाच पुच्छपिसें लागलेलीं असतात. त्याच्या पृष्ठभागीं एक तैलपिंड (ऑइल ग्लँड) बनलेला असतो त्यांतून तेलासारखें द्रव्य निघतें तें पक्षी आपल्या चोंचीनें पिसें गुळगुळीत करण्याकडे उपयोगांत आणतात.

पूर्वगात्राचें प्रगंड, प्रकोष्ट व हस्त हे मुख्य भाग तीन असून ते पंखामध्यें बनलेले दिसतात तरी हस्ताचा भाग कातडीनें अगदीं आवळला जाऊन त्याच्यांत फक्त प्रथम, द्वितीय व तृतीय अंगुलीचें भाग अस्पष्टरीतीनें झालेले दिसतात. प्रगंड व प्रकोष्ट या भागांवरसुद्धां कातडीचें वेष्टन पसरलेलें असतें. पक्षि उडतांना हे पंख उघडले जातात व त्यावेळीं त्यांची अक्षरेषा कबंधाच्या मध्यरेषेशीं समकोनावर असते. पश्चिम गात्रांतील ऊरूचा भाग तोकडा असून शरीराला लागूनच असतो, परंतु तो उदरतलीं व पूर्व दिशेस वळलेला असतो. जंघा गुडघ्याच्या खालच्याबाजूस व पश्चिम दिशेस वळलेली असून तिच्या पुढचा भाग म्हणजे पायाच्या तळाचा भाग अथवा पाद हा होय. या भागाचे दोन विभाग स्पष्ट दिसतात ते एक आदिम पादकूर्चशीर्षकरभा (टार्सो मेटाटार्सल) चा भाग व दुसरा अंतिम चार पादागुलींचा होय. या चार पादांगुलीपैंकीं पायाचा आंगठा वर सांगितल्याप्रमाणें पाठीमागच्या दिशेस वळलेला असतो. चारी पादांगुलींनां शेवटी नख्या असतात.
    
मुखाचा भाग शीर्षाच्या एका शेवटाला असून त्याला वर सांगितल्याप्रमाणें चोंचरूपीं दोन जबडे असतात; ते उघडले असतां मुखाचा आ विस्तृत असा पसरला जातो. चोंचीच्या वरच्या भागाच्या तलपृष्टावर नासाद्वाराला लागून एक कातडीचा मृदु भाग झालेला असतो त्याला 'सिरी' असें म्हणतात. नेत्र मोठे असून प्रत्येकाला तीन पापण्या असतात. एक वरची, दुसरी खालची व तिसरी पारदर्शक चंचल मध्य पापणी होय. नेत्रांच्या पश्चिम भागी थोडयाशा अंतरावर कर्णरंध्र असतें तें पिसांनीं झांकून गेलेलें असतें. त्यापासून बाह्यकर्णविवराचा (एक्सटर्नल ऑडिटरी मिआटस) मार्ग सुरू होऊन तो विवराच्या आंत खालीं कर्णपटला (टिंपॅनम) च्या योगेंकरून कुंठित होतो. गुदद्वार अथवा पश्चिमबाह्यत्वचाविवरमुख (क्लोअ‍ॅकल अ‍ॅपरच) पक्ष्यांमध्यें आडवें झालेलें असून पुच्छाच्या व कबंधाच्या संयोगभागीं उदरतलावर असतें.

बाह्यकवच (स्केलेटन) हें बाह्यत्वचे (एपिडॉमिस) पासून बनलेलें असून पिसांच्या रूपानें झालेलें असतें; तसेंच त्याचा कांही भाग शृंगमय झालेला असून तो चोंचीवर व पादांगुलींच्या शेवटीं नख्यांच्या रूपानें दिसते. तसाच खवल्याच्या रूपानें पादकूर्चशीर्षकरभाच्या भागावर व पादांगुलींवर पसरलेला असतो. ह्या शेवटच्या लक्षणावरून उरगवर्गाशी थोडी साम्यता दिसते. पिसें शरीराच्या सर्व एकंदर पृष्ठभागापासून उत्पन्न झालेलीं नसून त्यांची उत्पत्ति कांहीं नेमक्या पृष्ठाच्या भागांवरून होत असते; तरी त्यांची रचना एकमेकांवर पसरून झालेली असल्याकारणानें सर्व शरीराचा सबंध पृष्ठभाग त्याच्यामुळें आच्छादिला जातो. ह्याप्रमाणें शरीराभोंवतीं एक अति हलकें परंतु गच्च व उष्णताप्रवाह प्रतिरोधक (नॉनकंडक्टिग) असें हें वेष्टन झालेलें आहे.

अस्थिपंजर:- इतर सर्व सशीर्ष प्राण्यांच्या पृष्ठवंशा(व्हर्टिव्रलकॉलम)पेक्षां ह्या प्राण्यांच्या पृष्ठवंशांत मुख्य लक्षणें दिसून येतात ती हीं कीं मानेचा भाग फार लांब व सहज हालणारा असा बनलेला असतो, व कबंधाचा भाग ताठर झालेला असून पुच्छाचा भाग अगदींच थोडा राहिलेला असतो. वक्ष:कशेरू (थोरॅसिक व्हर्टिब्री) हे ओळखण्याची रीति म्हटली म्हणजे त्यांन पर्शुका (रिब्‍स) लागलेल्या असतात. व त्या उर:फलका (स्टर्नम) शीं संयोग पावतात. शेवटले दोन ग्रीवाकशेरू (नेक व्हर्टिब्री) यांना आंखुड पर्शुका लागलेल्या असतात परंतु या उर:फलकाशीं सयोग पावत नाहीतं. चवथ्या किंवा पाचव्या वक्ष:केशरूनंतर पुढें बहुतेक बारा केशरू एकमेकांनां संलग्न होऊन त्यांचा एकजीव बनलेला असतो व ह्या संयुक्तकशेरूंच्यामुळें झालेल्या भागाला दोहो बाजूंवर विशेष वाढ झालेलें श्रोणिमंडल (पेलोइक गर्डल) जोडलें जातें. ह्या पृष्टवंशाच्या संयुक्त भागाला संयुक्तत्रिकास्थि (सिन्सॅचम) हें नांव दिलें जातें, कारण हा भाग श्रोणिमंडल जोडण्यास उपयोगी पडतो. ह्याच्या पुढें सहा पुच्छकशेरू आहेत. व त्यांच्या पुढें म्हणजे पृष्ठवंशाच्या शेवटीं एक वरच्या अंगाला कललेला व चपटलेला असा अस्थि बनलेला असतो त्याला हलास्थि (प्लाऊशेअर बोन) म्हणतात. बहुश: हा चार अथवा अधिक शेवटचे पुच्छकशेरू मिळून झालेला असतो. उर:फलक हा पक्ष्यांमध्यें सर्वांत लाक्षणिक अस्थि होय. तें हाड एका रुंद तगटाप्रमाणें झालेलें असून त्याच्या उदरतलीं ऊर्ध्व मध्याक्षरेषेवर एक उभी नौतल (कील) रूपी धार झालेली असते. तिच्या पश्चिम कडेवर दोन कात्रे झालेले असतात व पूर्व कडेवर दोन खांचण्या बनून त्यांत अंसचंचू (कोरेकॉइड) जोडले जातात.

करोटी (स्कल)चा मस्तिष्कावरणा (क्रॉनिअल केव्हिटी)चा भाग वाटोळा असून तिचा अक्षिकोशा(आयपिट)चा भाग विशाल असतो व तिला पुढच्या अंगाला निमुळती होऊन शेवट पावलेली चोंच लागलेली असते. कपालमहाविवर (फोरमॅन मॅग्नम) पश्चिम भागीं खालच्या बाजूस वळलेलें असतें म्हणून तें करोटीच्या उदरतलीं दिसतें व त्याच्या पूर्व कांठावर एकच वाटोळें संध्यर्बुद (कॉन्डाइल) झालेलें असतें. करोटीला नेहमींप्रमाणें बहुतेक अस्थी लागलेले असतात. परंतु ते अशा रीतीनें संयोग पावलेले असतात कीं त्यांच्यामधील संधिरेषा (सुचर) दिसून येत नाहींत. चोंचीचा वरचा भाग बहुतेक पूर्वमुखास्थी (प्रिमॅक्सिली)चा झालेला असतो व मुखास्थी (मॅक्सिली) अगदीं खिरटे बनलेले असतात. चोंचीचा खालचा भाग म्हणजे खालचा जबडा पांच अस्थींचा मिळून झालेला असतो व तो हनुसंधानास्थी (क्वाड्रेट) च्या योगेंकरून वर करोटीशीं जोडला जातो. सशीर्षांच्या अंसमंडला (पेक्टारेल गर्डल)च्या घटनेपेक्षां पक्ष्यांच्या अंसमंडलाची घटना निराळी असते. अंसचंचूची जोडी बनलेली असून ते स्तंभासारखे असतात व त्यांची दिशा पूर्वबाह्य व ऊर्ध्व अशी असून ते उर:फलकाच्या पूर्व कांठावरील खांचण्याशी संयोग पावतात. अंसफलक (स्कॅप्युला) हें असिसमान बनलेलें असून त्याची दिशा पश्चिम भागीं वळलेली असते. तें पर्शुकांवर पसरलेलें असतें व एका संधिबंधनानें (लिगॅमेंट) अंसचंचूच्या पृष्ठाकडील शेवटास जोडलें जातें. अंसचंचू व अंसफलक यांच्या ह्या संयोगानें एक अंसगर्त (ग्लेनॉइड कॅव्हिटी) तयार होते. त्याला प्रगंडास्थी (ह्युमरस)चें शीर्ष जोडलें जातें. अंसफलकाला आंतल्या बाजूस त्याच्याशेवटीं एक खिरटें अंसकूट (अ‍ॅक्रोमिअम) असतें व त्याला एका संधिबंधनानें पातळ उलट कमानदार जत्रु व अंतर्जत्रु (क्लॅव्हिकल व इंटर क्लॅव्हिकल) मिळून बनलेला एक अस्थि जोडलेला असतो; तो पश्चिमशेवटीं उर:फलकाला जवळ जवळ जाऊन मिळतो.

पूर्वगात्रांतील हाडें सुद्धां विशेष लाक्षणिक आहेत. प्रगंडास्थीचें शीर्ष पसरट असतें व त्याला ठळक धार असते. तिला अंसस्नायु (पेक्टोरल मसल्स) जोडलेले असतात. अक्षक (रेडिअस) पातळ व सारखें सरळ असतें व कूर्परास्थि (उलना) जाड असून थोडा कमानदार असतो. दोन कूर्चशिरोस्थी (कार्पल) सुटे असून त्यांनां पुढें कूर्चशिर-करभास्थि (कार्पो-मेटाकार्पल) नांवाचें एक द्वित्त हाड लागलेलें असते.

विद्यमान सपृष्टपूर्णवंशीय प्राण्यांच्या श्रोणिमंडलाशी पक्ष्यांच्या श्रोणीमंडलाचें साम्य मुळींच दिसून येत नाहीं. कटिकपाल (इलिअम) लांबलचक असून त्याचा पूर्व भाग ऊर्वस्थिसंधिविवरा (असेटाब्युलम)च्या पूर्वभागीं वाढलेला असून तेवढाच मोठा दुसरा भाग पश्चिम भागीं वाढलेला असतो. कटिकपाल संयुक्तत्रिकास्थीशीं जोडलें जातें. नेहमींप्रमाणें ऊर्वस्थिसंधिविवराच्या उदरतलाचा भाग कुकुंदरास्थि (इस्क्लिअम) व भगास्थि (प्यूबिस) ह्यांच्यापासून झालेला आहे व ह्या दोन्ही अस्थींची वाढ ऊर्वस्थिसंधिविवरापासून पश्चिम दिशेस झालेली असते.

कुकुंदरास्थि रुंद असून त्याचें पश्चिम शेवट कटिकपालाच्या पश्चिम शेवटीं जुळलेलें असतें त्यामुळें कटिकपाल व कुकुंदरास्थि ह्यांच्यामध्यें पूर्वभागीं थोडीं रिकामी जागा रहाते त्याला कुकुंदरास्थिछिद्र असें म्हणतात. भगास्थि ही वांकडयादांडयाप्रमाणें असून कुकुंदरास्थीच्या उदरतलाच्या कांठाबरोबर समांतर रहाते. कुकुंदरास्थि किंवा भगास्थि हे आपल्या जोडीदाराबरोबर अथवा जोडअस्थीबरोबर कधींच संयोग पावत नाहींत.

पश्चिम गात्राचे उर्वस्थी हे तुलनात्मकरीत्या पाहिले असतां तें बरेंच आंखूड हाड आहे व त्याचें शीर्ष त्याच्या दांडयाबरोबर समकोनी असें बनलेलें असतें. त्याच्यापुढें त्याच्याशीं संयोग पावलेलें लांब संयुक्त हाड ही जंघकूर्चशिरोस्थि (टिबिओ-टार्सस) होय. बहिर्जंघास्थि लहान असतो व तो पश्चिम शेवटीं निमुळता होत जातो. ह्या जंघकूर्चशिरोस्थीच्या पुढें त्याच्या शेवटी असेंच दुसरें संयुक्त हाड बनलेलें असतें त्याला पादकूर्चशिरकरभास्थि म्हणतात. तो अंतिम पादकूर्चशिरोस्थि व द्वितीय, तृतीय व चतुर्थ पादकरभास्थि मिळून झालेला आहे. तेव्हां उरगवर्गांतील प्राण्यांच्या प्रमाणें पक्षांमध्यें सुद्धां पायाचा खुबा हा आदिम व अंतिम पादकुर्चशिरोस्थीच्या मध्यें त्यांचा संधि होऊन झालेला आहे. वरील एकंदर अस्थिपंचराच्या वर्णनावरून सहज दिसून येतें कीं पक्षांच्या अस्थिपंजराच्या सर्व भागांत कांहींना काहीं तर्‍हेचा विशिष्टपणा भरलेला आहे. दुसरी गोष्ट ही कीं ह्यांच्या हाडांमध्यें अस्थिभेद नसून त्यांच्या पोकळींत जिवंतपणीं हवा भरलेली असते व त्यामुळें तीं हलकीं बनतात. कपोतामध्यें मात्र प्रकोष्ट. हस्त व उरु ह्या भागांतील हाडांमध्यें हवा नसते.

स्नायूंची रचना.- पूर्वगात्रांनां लागलेल्या स्नायूंच्या नेहमीच्या रचनेमध्यें पक्ष्यांत पुष्कळ फरक झालेला आहे. हवेमध्यें पक्षी वर उडतो व पुढें मार्ग आक्रमण करतो ही क्रिया तो पंखाचा जबर प्रहार खालच्या दिशेस करतो तेव्हां घडून येते व पंखाचा खालच्या दिशेस हा प्रहार होण्यास अंसस्नायू कारणीभूत होतात व हे स्नायू उर:फलकाच्या नौतलाला लागून विकास पावतात व ते नौतलाच्या प्रत्येक बाजूस इतके वाढलेले असतात कीं पक्ष्याचा उदरतलाचा बहुतेक भाग ह्यांचाच झालेला असतो व ह्यांचें वजन सुमारें एकपंचमांश शरीराच्या वजनाइतकें भरतें. पंख वर उचलून घेणारे स्नाये सकृद्दर्शनी वाटतात तसे शरीराच्या पृष्ठभागावर झालेले नसून ते अघोजत्रुस्नायूं (सबक्लेव्हिअस)च्या योगानें उचलले जातात व हे स्नायू उर:फलकाच्या तबकडीच्या पूर्वकांठी लागलेले असतात. शरीराचा पृष्ठभाग साधारणत: ताठर बनलेला असल्यामुळें त्या भागावरचे स्नाये विशेष खिरटे बनलेले असतात. परंतु मानेच्या व पुच्छाच्या भागांवर स्नायू चांगले वाढलेले असतात.

पश्चिम गात्रांतील कांही स्नायूंची रचना पक्ष्याला सहजगत्या झाडांच्या फांद्यांवर किंवा अशाच दुसर्‍या आधारावर बोटें मिटून बसतां येईल अशी झालेली आहे. एका स्नायुबंधना (टेंडन)ला ताण पडला असतां सर्व बोटें मिटलीं जातात. वर सांगितल्याप्रमाणें ह्या गात्राच्या भागांच्या वळणामुळें ह्या स्नायुबंधनाला पक्षी बसला असतां त्याच्या वजनानेंच ताण पडतो व अशा रीतीनें पक्षी निर्धास्त झाडांच्या फांद्यांवर झोपीं जातात.

पचनेंद्रिये:- तोंडाच्या खालच्या व वरच्या बाजूला शृंगमय चोंचीचें आवरण असून दांतांचा मागमूसहि नसतो. जिव्हा मोठी असून तिचा शेवटचा भाग अणकुचीदार असतो. गलविवरा (फरिंक्स)च्या पुढच्या बाजूला विस्तृत होऊं शकेल अशी अन्ननलिका (ओइसोफॅगस) असते व तिला पुढें थोडया अंतरावर एक फुगारा बनलेला असतो त्यास अन्नकोश म्हणतात. हा मानेच्या तळाजवळ त्वचा व मांस यांच्यामध्यें, उर:फलकाच्या अगदीं पूर्वेस झालेला असतो. याच्या विवरामध्यें अन्न पचण्यास सुरवात होते. अन्नकोशापासून पश्चिमेस अन्ननलिका जठरापर्यंत गेलेली असते. जठर (स्टमक) अथवा आमाशय (प्रोव्हेंट्रिक्यूलस) याचे दाने भाग झालेले असतात. पहिला भाग पूर्व आमाशय आणि दुसरा भाग मंथनकर्ण (गिझर्ड) अथवा मंथनिका होय. पूर्व आमाशय हा बाहेरून अन्ननलिकेचा थोडा वृद्धि पावलेला भाग आहे असें दिसतें. पण त्याच्या आंतील श्लेष्मकला (म्यूकसमेंब्रेन) ही फार जाड असून तिच्यामध्यें बरेच आम्लपिंड (पेप्टीक ग्लँडस्) बनलेले असतात. ते इतके ठळक असतात कीं नुसत्या डोळ्यांनीं ते दिसूं शकतात. मंथनिका ही द्विबहिर्गोल असते. हिच्या मांसल भित्ती फार जाड असून तिच्या आंतील विवर आगदीं लहान असतें. तिची अंतर्कला (एपिथेलिअम) ही फार जाड व श्रृंगमय असून तिचा रंग पिंवळा अथवा हिरवा असतो. तिच्या विवरामध्यें नेहमीं लहान लहान वाटोळे दगड असतात. हे दगड पक्षी गिळीत असतो. ते अशासाठीं कीं अन्नाचें चूर्ण करण्याच्या कामीं त्यांची मंथनिकेला मदत व्हावी म्हणून. पक्वाशयाचा (मोडेनम) उगम पूर्व आमाशय ज्या ठिकाणीं मंथनिकेला मिळतो त्या ठिकाणीं जवळच होतो व त्याची एक स्वतंत्र मुदन झालेली असते व या मुदनींतच पक्वपिंड बसलेलें असतें. तन्वात्रांचे (स्मॉल इंटेस्टाइन) तीन भाग आहेत. प्रथम एक ज्याची मुदन झाली आहे तो, नंतर दुसरा चक्रव्यूहाकार वळणें झाली आहेत तो व शेवटीं तिसरा दुसरी एक मदन होऊन झाला आहे तो. हीच पुढें सरळ होऊन तिचें ऋज्वांत्र (लार्ज इन्टेंस्टाइन) बनतें. या दोहोंच्या संयोगाच्या ठिकाणीं दोन लहान अंधनलिका असतात त्यांनां अंधांत्र म्हणतात. पश्चिमबाह्यत्वचाविवराचें (क्लोएका) मुख मोठें असतें. या विवराचें तीन भाग होतात व त्यांत गुदद्वार (अ‍ॅनस) वृक्कस्त्रोतसांचीं (युरेब्र) बाह्यछिद्रें व जननेंद्रियांच्या स्त्रोतसाचीं बाह्य छिद्रें स्थापित झालेलीं आहेत.

मुखक्रोडांमध्यें उघडणारे कांहीं लहान पिंड आहेत पण ह्यांतील एकाला सुद्धां लालापिंड म्हणतां येणार नाहीं. यकृत मोठें असून त्याचे दोन भाग झालेले आहेत. ते आपआपल्या स्त्रोतसानें पक्वाशयांत उघडतात. पित्तशय बनलेलें नाहीं. पक्वपिंड हें आटपशीर व तांबूस असून पक्वाशयाच्या मुदनींत असतें. याला तीन स्त्रोतसें आहेत त्यांच्या द्वारानें तें आपला रस पक्वशयांत सोडतें.

प्लीहा:- ही तांबडी व लांब गोलाकार आहे. हिचें आकारमान लहान आहे. ही पूर्व आमाशयाच्या उजव्या बाजूस उदरगुहाकले (पेविटोनिअम) च्या योगेंकरून लागलेली आहे.

श्वसनेंद्रियें आणि स्वरोत्पादक इंद्रियें:- ध्वनिमंजूषाद्वार (ग्लोटिस) जिव्हेच्या उगमस्थानाच्या पाठीमागें असतें व ध्वनिमंजूषें (लारिक्स)त जाणारा मार्ग त्या वाटेनें आहे. ध्वनिमंजूषेला तरुणास्थी (कार्टिलेजिस)चा आधार झालेला आहे. इतर सपृष्टवंशांप्रमाणें या ध्वनिमंजूषेच्यामुळें पक्ष्यांत ध्वनि उत्पन्न होत नाहीं. महाश्वासनलिकेचा (ट्राकिआ) पूर्व भाग नेहमींप्रमाणें अन्ननलिकेच्या उदरतलीं असतो परंतु त्याच्या पुढचा भाग अन्नकोशामुळें डाव्या बाजूस सारला जातो व पुढें ती महाश्वासनलिका शरीरगुहेमध्यें जेव्हां शिरते तेव्हां तिला फिरून नेहमीचें ठिकाण प्राप्त होतें. या ठिकाणीं तिला डावी व उजवी अशा दोन शाखा फुटतात. श्वासनलिकेला आधार देणारी घटककंकणें (रिंग्ज) तरुणास्थीचीं बनलेलीं नसून अस्थिमय आहेत. महाश्वासनलिका व तिच्या शाखा यांच्या संयोगाच्या ठिकाणी एक स्वरसंदूक (सिरिंक्स) झालेली असून ती खरी ध्वनिमंजुषा होय. असल्या प्रकारची विलक्षण ध्वनिमंजुषा दुसर्‍या कोणत्याहि वर्गांत आढळत नाहीं. महाश्वासनलिकेची शेवटचीं तीन अथवा चार घटककंकणें आणि प्रत्येक श्वासनलिकाशाखेचें पहिलें घटक-कंकण यांच्यांत आकारभेद उत्पन्न होऊन किंचित् विस्तृत अशी ती स्वरसंदूक बनली आहे. हिला ''टिंपेनम'' हें नांव आहे. हिच्या आंतील श्लेष्मकला दोन्ही बाजूंला जाड झालेली असते व तिच्या पोकळींत ही जाड श्लेष्मकला अर्धचंद्राकाररीत्या पुढें आलेली असते व ह्यापुढें आलेल्या भागाला एका तरुणास्थीच्या दांडयाचा आधार असतो. त्या अर्धचंद्राकार भागांच्या थरारानें पक्ष्यांचा स्वर उत्पन्न होतो व या स्वरासंदूकेला लागलेल्या स्नायूंच्या संकोचविकासामुळें स्वराचा नाद बदलतो.

शरीराच्या आकारमानानें फुप्फुसें फार लहान आहेत व तीं फारच कमी प्रसरणशील असतात. स्थलजलचर (ऑंफिबिआ) व उरग ह्यांच्यामधील फुप्फुसांप्रमाणें हीं घडया पडलेल्या पिशव्यांसारखीं नाहींत. यांचा पृष्ठभाग पर्शुकांच्या मधील जागेंत अगदीं चिकटूल बसलेला असतो व त्यावर कलेचें (मेंब्रेन) आच्छादन नाहीं. ह्यांचा उदरतलाचा भाग तंतुमय धातूच्या (फायब्रस टिशूज) मजबूत पटानें आच्छादित झालेला असतो त्याला फुप्फुसकला (प्लूरल मेंब्रेन) म्हणतात.

महाश्वासनलिका शाखा (ब्रांकस) फुप्फुसांत शिरून त्याच्या शेवटापर्यंत जाते व तेथें तिचे दोन भाग होतात. प्रत्येक फुग्याच्या आकाराच्या वायुकोशांत (एअर सॅक) शेवट पावतो. हा वायुकोश म्हटला म्हणजे श्वासनलिकेच्या आंतील कलेचा विस्तार होऊन बनलेला फुगा होय. पहिला वायुकोश आंत्राच्या वेटोळ्यामध्यें गुरफटलेला आहे. त्याला आंत्रवायुकोश (अब्डॉमिनल) म्हणतात. दुसरा शरीरभित्तीला लागून आहे, त्याला पश्चिमवक्षवायुकोश (पोस्टीरिअर थोरॅसिक) म्हणतात. श्वासनलिकाशाखा फुप्फसांत शिरते त्या भागीं तिला आणखी तीन फांटे फुटतात ते सर्व वायुकोशांशीं जोडले जातात. त्यांपैकीं एक पूर्ववक्षवायुकोश (अँटिरिअर थोरॅसिक) पश्चिमवक्षवायुकोशाच्या पुढच्या अंगाला असतो तो होय. दुसरा अंतर्जात्रववायुकोश (इंटर क्लॅव्हिक्युलर) होय; हा मध्यरेषेंत असून एकटाच आहे व याचा संबंध दोन्ही फुप्फुसांशीं असतो. तिसरा ग्रीवावायुकोश होय. अंतर्जात्रवाच्या दोन्ही बाजूंपासून एकएक वायुकोश निघून खांकेच्या खांचींत बसलेला असतो. अंतर्जात्रववायु कोशाशिवाय बाकीचे सर्व वायुकोश डाव्या व उजव्या बाजूस जोडीनें झालेले आहेत. या वायुकोशांचा अस्थिगत वातपोकळ्‍यांशीं संबंध असतो.

कपोत उभा असतांना उर:फलकाच्या खालीं वर होण्यानें शरीरगुहा (कॉक्लोम) लहान मोठी होते; यामुळें फुप्फुसांतील हवा बाहेर व आंत येते. उर:फलकाचें हें खालीं वर होणें अंत:पर्शुकस्नायु यांच्या संकोचविकासानें घडून येतें. जेव्हा पक्षि उडत असतो तेव्हां त्याच्या शरीराचा सर्व भार पंखावर असतो यामुळें उर:फलक चलनहीन होतो. या स्थितींत कबंधाचा पृष्ठभाग खालीं वर होऊन फुप्फुसांत हवेचें चलनवलन घडवून आणतो. या दोन्हीही स्थितींत आंत घेतलेली हवा फुप्फुसांमधून वायुकोशांत शिरते व तेथून अस्थिगतवातपोकळ्यांत प्रसरण पावते. या कारणास्तव इतर प्राण्यांच्या फुप्फुसामध्यें उच्छ्वासानंतर फेरबदल न झालेली हवा जशी शिल्लक राहते तशी पक्ष्यांत फेरबदल न झालेली हवा फक्त वायुकोशांत व श्वासनलिकेच्या उपशाखांत राहते. याचा परिणाम असा होतो कीं रक्ताचें प्राणवायूशीं संमिश्रण अगदीं पूर्णपणें होतें व त्यामुळें त्याचें उष्णमानहि त्याच प्रमाणांत चढतें. या अर्थी एक लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे कीं हवेंत उडणारा दुसरा प्राण्यांचा वर्ग म्हणजे कीटकवर्ग; याच्याशीं पक्ष्याचें या बाबतींत साम्य आहे. कारण या दोन्ही वर्गांत प्राणवायूचें रुधिराशीं संमिश्रण होणें ही क्रिया नुसत्या श्वसनेंद्रियासारख्या अकुंचित जागेंतच न होतां ती सर्व शरीरभर होते.

रुधिराभिसरण:- पक्ष्यांचें हृदय नकाच्या हृदयाप्रमाणें चार कर्णांचें (चेंबर्स) झालेलें असून त्याला डावा व उजवा असे दोन संचयकर्ण (आरिकल्स) व डावा आणि उजवा असे दोन नि:सारकर्ण (व्हेंट्रिकल्स) असतात. उजवा नि:सारकर्णा डाव्या नि:सारकर्णाभोवतीं थोडा वळसा घेतो व त्याच्या आडवा छंद केल्यानें त्याचें विवर अर्धचंद्राकार दिसतें. डावा संचयकर्ण व डावा नि:सारकर्ण यांच्या मध्यंतरातील पडदा (व्हॉल्व) कलेचा बनलेला असून त्याला दोन दळें आहेत व त्यांचे काठ नि:सारकर्णांतील विवराच्या पृष्ठभित्तीशीं तंतुबंधनांच्या योगेंकरून जोडलेले असतात. परंतु हृदयाच्या उजवीकडील बाजूवरचा असा पडदा हा स्नायूचा झालेला आहे व तो पक्ष्यामध्येंच बनलेला असतो. उजव्या संचयकर्णामध्यें उजवी व डावी पूर्वमहाशिरा (प्रीकॅव्हल किंवा सुपीरिअर व्हॅना केव्हा) व पश्चिम महाशिरा (पोस्टकेव्हल किंवा इन्फि. व्हेक्के) उघडतात. डाव्या  संचयकर्णांत चार फुप्फुसशिरा उघडतात. उजव्या नि:सारकर्णापासून फुप्फुसधमनी (पल्मनरी आर्टरी) निघते व तिचे लगेच दोन फाटे होऊन त्यापासून उजवी व डावी अशा फुप्फुसधमन्या बनतात. डाव्या नि:सारकर्णापासून महाधमनीची (एरोर्टा) उजवी कमान बनलेली असते. पक्ष्यांत महाधमनीची डावी कमान बनलेली नसते. सर्व शरीराच्या धमन्या या महाधमनीच्या उजव्या कमानीपासूनच उगम पावतात व त्यांच्यामधून शुद्ध रक्ताभिसरण पावते. अशा प्रकारें शुद्ध रक्त सर्व शरीरभर धमन्यांच्या वाटें पसरणें ही रुधिराभिसरणाची मोठी वरची पायरी होय. महाधमनीची कमान उजव्या श्वासनलिकेवरून कमान घेऊन कबंधाच्या पृष्ठभागाकडे वळते व नंतर ती पश्चिम दिशेस गति घेत महाधमनी या नांवानें ओळखिली जाते. महाधमनीच्या कमानीपासून एक उजवी व दुसरी डावी अशा दोन अनामिक धमन्या (इनॉमिनेट) निघतात व त्यापासून प्रत्येक बाजूवरील ग्रीवाधमनी (कॅरोडिट), जत्रुधमनी (सवक्लेव्हन) व अंसधमनी (पेक्टोरल) ह्या उगम पावतात. अंसस्नायू वर सांगितल्याप्रमाणें विशेष प्रमाणानें विकास पावलेले असतात म्हणून ह्या अनामिकधमन्या- ज्याच्यापासून अंसधमन्याची उत्पत्ति झालेली असते त्या विशेष जाड बनलेल्या असतात; त्या इतक्या कीं त्यांच्या उगमानंतर पुढें महाधमनी ही बारीक बनते. बहिरूरु (फेमोरल) धमनी व अंतरूरु (सियाटिक) धमनी ह्या पश्चिम गात्राच्या रचनेप्रमाणें फार पूर्व दिशेस उगम पावलेल्या असतात. पुच्छधमनी (कॅंडल) ही निसर्गत: फारच लहान असते. रुधिराभिसरणातील एक मुख्य लाक्षणिक गोष्ट आहे ती ही कीं, वृक्कोन्मुखी शिराची रचना झालेली नाहीं. तशा दोन वृक्कोन्मुखीशिरा पुच्छशिरा दुभागून जाऊन झालेल्या आहेत, परंतु त्या तशाच मुख्यत: वृक्कांमध्यें केशवाहिन्यांत अंतर्भूत न होतां त्यांच्यातून बाहेर निघून पडतात व त्याच्या बाजूवरील बहिरूरुशिराशीं संयोग पावून उभयोरुगामी (कॉमन इलिऍक) शिरा बसतात व नंतर या दोन्ही उभयांरुगामी शिरा एकमेकांशी संयोग पावतात व ह्या संयोगापासून वर जाणारी एक शिरा बनते तिला अधोमहाशिरा (इनफिरिअर व्‍हेनाकेरा) अथवा पश्चिम महाशिरा म्हणतात. पुच्छशिरा जेथें दुभागली जाते त्याच ठिकाणाहून एक जाणती शिरा उगम पावून वर गति घेत यकृतोन्मुखीशिरेला मिळते तिला पुच्छकलाशिर म्हणतात. मासे, स्थलजलचर व उरग ह्या तिन्ही वर्गांतून दिसून येणारी रुधिराभिसरणाची योजना म्हणजे पुच्छ व श्रोणी या भागांतून अभिसरण पावणारें रुधिर पहिल्या प्रथम वृक्कांमध्यें जाऊन नंतर वृक्कशिरांच्या योगेंकरून वर हृदयाकडे जाणें, हिचा पक्ष्यांमध्यें लोप होऊन या भागांतून अभिसरण पावणारें रुधिर एकदम वर हृदयाकडे वळतें. रक्तरुधिरपेशी सकेंद्र असून अंडाकृति आहेत. रुधिर जास्त उष्ण असून त्याचें उष्णमान ३८ सेंटिग्रेड असतें.

ज्ञानेंदियव्यूह:- मेंदु मरितष्ककोशांत गच्च भरून राहिलेला असतो व तो आकृतीनें विशेष रुंद व वाटोळा असा असतो. सुषुम्नाशीर्षाला (मेडयुला ऑब्लाँगाटा) उदरतलभागीं बराच बाक असतो. अनुमस्तिष्क (सेरिबेलम) बरेंच मोठें असतें व त्याचा प्रथम भाग मोठा झालेला असून त्याच्या प्रत्येक बाजूला एक एक लहान पार्श्वभाग बनलेला असतो. अनुमस्तिष्क चतुर्थमस्तिष्कविवराला (फोर्थ व्हेन्ट्रिकल) झांकून टाकतें. गुरुमस्तिष्क (सेरिब्रम) पाठीमागें पसरलेलें असून अनुमस्तिष्काला मिळतें. त्यामुळें चक्षुष्मस्तिष्क शकलें बाहेरच्या अंगाला कललीं जातात व ती जीं पृष्ठभागीं असावयाची तीं पार्श्वभागी असतात व प्रत्येक खंड आकृतीने वाटोळें असतें. घ्राणमस्तिष्क (ओलफॅक्टरी लोब्स) फारच थोडया प्रमाणानें झालेलें असतें, कारण पक्ष्यांमध्यें घ्राणेंदिय फारसें विकास पावत नाहीं.

वृक्क (किडने) जननेंद्रियें:- प्रत्येक बाजूवर एक एक वृक्क असून तें चपटलेले असतें व त्याचे तीन भाग दिसतात व ते तीन्ही भाग कबंधाच्या श्रोणिविभागांतील खळग्यांत अगदी बरोबर बसलेले असतात. वृक्काची उत्पत्ति परिपूर्तितावस्थेंतील पश्चिम वृक्कनलिकासमूहातून (मेटॅनि फेरॉस) झालेली असते. प्रत्येक वृक्कस्त्रोतस (युरेटर) अगदीं अरुंद नलिकेप्रमाणें असून पश्चिमशेवटीं सरळ गति घेत पश्चिम बाह्यत्वचाविवराच्या मधल्या भागांत उघडतें.

मुष्क:- मुष्क दोन आहेत प्रत्येक मुष्क (टेस्टीज) अंडाकृति असून वृक्काच्या उदरतलीं पूर्वशेवटी कलंनें लागलें आहे. त्याच्या वाढीचे प्रमाण परिणत दशेवर अवलंबून असतें. प्रत्येक मुष्काच्या अंत:कांठापासून नागमोडी असलेलें शुक्रस्त्रोतस (व्हासडेफरन्स) वृक्कस्त्रोतसाच्या समांतरी राहून पश्चिम शेवटीं गति घेत पश्चिम बाह्यत्वचाविवराच्या मधल्या भागांत एका उंचवटयाच्या टोंकाला उघडतें. शुक्रस्त्रोतसाचें पश्चिमशेवट थोडेसें फुगरट बनलेलें असतें. त्याला शुक्राशय (सेमिनल व्हेसिकल) म्हणतात. शिश्नासारखें इंद्रिय कपोतामध्यें नसतें व तें बर्‍याच पक्ष्यांमध्यें झालेलें नसतें. कांहीं पक्षी- जसें बदक, शहामृग इत्यादि-यांच्यांत शिश्नरूपीं एक घन अवयव पश्चिम बाह्यत्वचाविवराच्या उदरतलाच्या भागापासून झालेलें असते.

स्त्रीजननेंद्रियापैकीं उजव्या बाजूवरील अंडकोश (ओव्हरी) व अंडस्त्रोतस (ओव्हिडक्ट) यांचा लोप होतो व ही गोष्ट यांत विशेष होय. परिणत दशेमध्यें डावीकडील अंडकोश मोठा असून त्याच्या पृष्ठभागावर लहान लहान व निरनिराळ्या आकाराच्या अंडोत्पादक पिशव्यांचा समूह (फोलिक्लस) बनलेला दिसतो व त्या प्रत्येक अंडोत्पादक पिशवींत एक अंडें तयार होतें. तसेंच डावीकडील अंडस्त्रोतस लांब व नागमोडी रीतीनें वळलेला असतो. त्याचा पूर्व शेवट रुंद गळणीच्या तोंडासारखा असतो व त्यांत अंडोत्पादक पिशव्यांतून अंडी बाहेर पडलीं कीं, प्रवेश करतात. बाकीचा भाग स्नायुयुक्त जाडया नलिकेप्रमाणें असून त्याच्या आंतील विवराला पिंडपेशीयुक्त कलेचें (ग्लँडयुलर मेंब्रेन) आच्छादन झालेलें असतें. हा अंडस्त्रोतस पश्चिम बाह्यत्वचाविवराच्या मधल्या भागांत उघडतो.

उजवीकडील अंडकोशाचा व अंडस्त्रोतसाचा जरी लोप झालेला असतो तरी एखाद्या वेळीं क्वचित खिरटया रूपानें तीं दिसतात.

अंडीं अंडस्त्रोतसांत असतांना फलद्रूप होतात. फलद्रूप झालेली अंडी अंडस्त्रोतसांतून बाहेर पडत असतांना त्यांच्या पिंडपेशीयुक्त कलेच्या योगेंकरून त्यांच्यावर आवरणरूपीं कांही पुटें लागलीं जातात. प्रथम सभोंवती पांढर्‍या शुभ्र बलकाचें वेष्टण तयार होतें; नंतर त्याच्यावर पापुद्य्राप्रमाणें अंत:कवचावरण (शेलमेंब्रेन) बनतें व या अंत:कवचावरणाच्या भोंवतीं शेवटीं चुनखडीक्षारयुक्त असें कवच बनले जातें. कपोतामध्यें मादी एका वेळी दोन अंडी, घरटें करून त्यांत घालते व त्याच्यावर नर व मादी हीं दोघेंहि बसून तीं उबवितात. चवदा दिवसांत अंडें उबून पिलूं तयार होतें. पिलूं पक्कें तयार झाल्यावर तें आपणच कवच फोडून बाहेर निघतें. प्रथम त्याच्या अंगावर मऊ पिसें असतात व त्याला उभयतां नर मादी आपल्या पूर्व आमाशयांतील दुधासारख्या रसानें पोशितात. ह्या पूर्व आमाशयांतील पांढर्‍या रसाला ''कपोताचें दूध'' असें नांव देतात.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .