प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
    
पहलवी- किंवा पेह्लवी. झोरोआस्टरचे अनुयायी आपल्या पवित्र ग्रंथांचीं जुनीं भाषांतरें ज्या लिपींत लिहिलीं आहेत तिला पेह्लवी अशी संज्ञा देतात. हि संज्ञा फार जुन्या काळापासूनची आहे. फरदौसी (१० वें शतक) वारंवार आपल्या इतिहासांत पेह्लवी ग्रंथ आधारभूत झाले असा उल्लेख करतो व पहिल्या खुश्रू (इ.स. ५३१-५७९) च्या कारकीर्दीत इराणांत पेह्लवी-लिपीखेरीज दुसरी लिपीच नव्हती असें सांगतो. आठव्या शतकांतील विद्वान इब्नमोकाफा, इराणांत पेह्लवी ही राजभाषा होती असें प्रतिपादन करतो. अरबी काळापूर्वी कोणत्या अक्षरमालांनां पह्लवी म्हणत असत हें ठरवितां येत नाहीं. कदाचित पह्लवीं हें नांव कांहीं भाषांना त्या काळीं असेल असेंहि निश्चित सांगतां येत नाहीं. तरी पण एका विशिष्ट तर्‍हेच्या लिपीलाच ही संज्ञा असावी असें वाटतें. हल्लीं पह्लवी ग्रंथांतील लिपीला व या ग्रंथासारखेच लिहिलेले जे शिलालेख व धातुलेख आहेत त्यांतील लिपीला पह्लवी ही संज्ञा लावतात.

पह्लवी ग्रंथांकडे नजर टाकल्याबरोबर त्यांतील भाषेची चमत्कारिक भेसळ कळून येते. शुद्ध सेमिटिक शब्द फारसी शब्दांशी जोडलेले आहेत. बर्‍याच ठिकाणीं सेमिटिक शब्दांचे संधी नियमबाह्य आहेत व कांही सेमिटिक शब्दांनां फारसी प्रत्यय जोडण्यांत आलेले आहेत. सध्यांचे झोरोआस्ट्रियन लोक वाचतात त्यांतील कांहीं शब्द सेमिटिकहि नाहींत व फारसीहि नाहींत. त्यांची उच्चारपरंपरा विश्वसनीय नाहीं हे लगेच कळून येतें. लिपि तर फर्डेशाही (भरभर लिहिलेली) व अनेकार्थी आहे. 'न', 'व' आणि 'र' करितां एकच सेमिटिक चिन्ह आहे, तसेंच य, ड आणि ग ह्या वर्णांबद्दल बरेच दोष घडून येतात. पहलवी सेमिटिक आहे ह्याबद्दलचा वाद आतां मिटला व असें सिद्ध झालें कीं पर्शियन सेमिटिक लिपीमध्यें लिहितात; डोळ्‍यांना फक्त सेमिटिक शब्द दिसतात पण कानांनां ते फारसी ऐकूं येतात. तेव्हां ही एक पर्शियन शब्द कांहीं अंशी सन्मानार्थ सेमिटिक शब्दांमध्यें दर्शवणारीं पर्शियन लोकांची लिहिण्याची पद्धत आहे. इब्न मोकाफा यानें पुष्कळ पह्लवी ग्रंथ अरबींत लिहिलेले आहेत. तो म्हणतो कीं, ज्याचा पर्शियनमध्यें उच्चार करीत पण निराळ्या तर्‍हेनें लिहीत असे, एक हजार शब्द पर्शियन लोक वापरीत असत. भाकरी म्हणावयाची असल्यास ते 'नॉन्' असा उच्चार करीत पण 'ल्ह्मा' असें लिहीत. तसेंच मांसाला गोष्त असें म्हणत पण 'ब्स्रा' असें लिहीत. इंग्लिश भाषेमध्यें ज्याप्रमाणें एल् (लिब्रा) चिन्हाचा 'पौंड' असा उच्चार करतात किंवा 'आय इ' अक्षरें लिहून 'दॅट इज' असें वाचतात त्याचप्रमाणें पर्शियन लोक अशा तर्‍हेचा उपयोग फार मोठया प्रमाणावर करीत. पर्शियनमध्यें समानार्थी अशीं सेमिटिक शब्दाची रूपें करतांनां फार घोंटाळा दृष्टीस पडतो. एक क्रियापद पूर्णभूतकाळांत तर दुसरें अपूर्णभूतकाळांत! कधीं पर्शियन समानार्थी शब्दांकरितां सेमिटिक चिन्ह जें वापरावयाचें तें वाटेल तें दडपून दिलें आहे. जसें, पर्शियनमध्यें 'ख्वेश' आणि 'ख्वत' ह्या दोहोंचा अर्थ स्वत: असा आहे; पण पहिलें 'न् फ् श् ह्' व दुसरें 'ब् न् फ् श् ह्' असें लिहितात. पुरुषवाचक सर्वनामें 'ल' हा उपसर्ग लावून चतुर्थी विभक्तींत योजीत असत; जसें: 'तू'† तूं बद्दल 'ल्क्;' अमा = आम्ही बद्दल 'ल् न् ह्'. कधीं कधीं दोन निरनिराळ्या परंतु सारख्या ध्वनीच्या फारसी शब्दांबद्दल तेंच सेमिटिक चिन्ह वापरतात. एका सेमिटिक शब्दानें दोन फारसी शब्द दाखविले जातात, अशा प्रसंगीं केव्हां केव्हां लेखकाचा इच्छित चटकन् लक्षांत येण्यासाठीं सेमिटिक फारसी प्रत्यय लावतात.

पह्लवी वाचतांना ह्या ज्या अडचणी येतात त्या कांहीं पह्लवी अक्षरें जीं १, २, ३, +,- यासारखीं कल्पनाबोधक चिन्हें आहेत तीं समजून घेतल्यास कमी होतील. संदिग्ध व अनेकार्थी अक्षरांच्या संघाला कोणता सेमिटिक शब्द वापरावा हें जरी कळलें नाहीं तरी त्यांचा फारसी शब्द बनतो हें ओळखण्याला कधींहि अडचण पडत नाहीं; मात्र नेहमींच त्या वेळच्या ग्रंथकारांनीं केलेला उच्चार व आतां होत असलेला उच्चार जमतीलच असें नाहीं. ज्यांतील वाङ्मय फार जुनें आहे अशा पुष्कळ भाषांमध्यें शब्दांचें रूप जुनें, पण उच्चार नवे असा चमत्कार दृष्टीस पडतो. इंग्रजींत 'थ्रू' ह्या शब्दांतील 'ग' ह्या कंठयावर्णाचा उच्चार करीत नाहींत; तसेंच ह्या एल् ए यू जी एच् या अक्षरसमुच्चयाचा 'लाफ' असा उच्चार होतो. अक्षरें भराभर लिहिण्याच्या पद्धतीपासून फारच घोंटाळे उडाले आहेत. कांही अक्षरसंघ असे आहेत कीं ते शेंकडों रीतीनें वाचतां येतील. हल्ली एकच दिसणार्‍या अक्षरांत पूर्वीच्या काळीं कांहीं तरी थोडा फरक होता. ज्यांनां ही भाषा समजे, त्यांनां आपणाला आतां वाटतात तितक्या अडचणी भासत नव्हत्या. अरब लोकांनीं अशाच तर्‍हेच्या संदिग्ध व अनेकार्थी लिपीचा पुष्कळ दिवस उपयोग केला पण त्यांच्याहि पूर्वी तयार केलेल्या उच्चारभेददर्शक खुणा त्यांनीं घेतल्या नाहींत हें विशेष आहे.

सध्यांच्या हस्तलिखित ग्रंथांतून वेळोवेळीं कांहीं उच्चारभेददर्शक खुणा केलेल्या आढळतात. पण यांपेक्षां पह्लवी मूलग्रंथांतून अवेस्ता हा धर्मग्रंथ ज्या लिपींत लिहिला आहे त्या सुबोध लिपीत उतरलेल्या पाझंद ग्रंथाचा फार उपयोग होतो. हा ग्रंथ (हा उतारा) भाषाशास्त्रदृष्टया निर्दोष नसेल व नाहीं, पण पह्लवीची कल्पना येण्यास पाझंदची फार जरूरी आहे. ग्रंथकर्त्याचे स्वत:चे उच्चार (त्याच्या लिखाणाचे) कांहीं अंशीं जसेच्या तसे देण्यास आणखी गुणदोषविवेचनासंबंधीं परिश्रम केले पाहिजेत.

मागाहून गादीवर आलेले सस्सानिद राजे, तबरिस्तानचे अधिपती आणि प्राचीन अरबांच्या काळांतील सुभेदार ह्यांनी पाडलेल्या नाण्यांवरील लिपी व पह्लवी हस्तलिखितांतील लिपी जवळ जवळ सारखीच आहे. अगदीं जुन्या नाण्यांवरील अक्षरें स्पष्ट वाचतां येतात. हीच गोष्ट जुन्या सस्सानियन कारकीर्दीतल्या रत्‍नांवरील व इतर लहान आठवणीकरितां केलेल्या जिन्नसांवरील कोरीव लेखांविषयीं आहे. पण सुबोध व सुवाच्य म्हटलें तर तिसर्‍या आणि चवथ्या शतकांतील सस्सानियन शिलालेख. हीं नाणीं, रत्नें व शिला ह्यांवरील भाषेंतील अक्षरें व लिहिण्याचें वळण आणि हस्तलिखितांतील लिपि व वळण, हीं दोन्हीं मुळांत एकच आहेत. भाषा शुद्ध फारसी व कांहींशीं सेमिटिक भाषेमध्यें गुरफटलेली आहे. सविस्तर रीतीनें पाहिलें असतां खोदीव लेखांतील पह्लवी व ग्रंथांतील पह्लवी ह्यांमध्यें पुष्कळ फरक आहेत; तथापि पह्लवी इतिहासांतील बर्‍याच लहान मोठया मुद्दयांवर ह्या खोदीव लेखांनीं चांगला प्रकाश पाडला आहे.

कांहीं अति प्राचीन सस्सानियन खोदीव लेखांबरोबर एक लिखाण सांपडतें. त्यांतील लिपि कांहींशी निराळी आहे. ही लिपि सुद्धां कांहीं रत्‍नांवर व शिक्कयांवर आढळते. हिला खाल्डिओ पह्लवी म्हणतात. ही मीडियांतील लिहिण्याची पद्धत व दुसरी अरेमाईक पह्लवी ही इराणची पद्धत आहे असें ओलशॉसेन म्हणतो.

पह्लव हें नांव जुन्या पार्थव शब्दाचें पर्शियनमधील रूपांतर होय; तेव्हां पह्लवी म्हणजे पार्थियन. ह्यावरून असें सिद्ध होतें कीं, ह्या लिहिण्याच्या पद्धतीची वाढ पार्थियन काळामध्यें झाली असावी; ह्याला इतर पुरावेहि आहेत; पण तिची वाढ कशी झाली हें अद्यापि गूढच आहे. एवढें निश्चित आहे कीं, हखामणी राज्यांत अरेमाईक लिहिणें व वाचणें राज्यकारभारांत सुद्धां, अरेमाइक प्रदेशांबाहेर चालत असे. तेव्हां इराणी लोकांनां स्वत:ची उपयुक्त लिपि नसल्याकारणानें, जशी त्यांनीं पुढें अरबी लिपि उसनवार घेतली, त्याचप्रमाणें सहजगत्या हीं अरेमाइक वर्णाक्षरें घेतलीं असण्याचा संभव आहे. पण ह्यावरून, फारसी शब्दांच्या जागीं सेमिटिक शब्द लिहून तें फारसी म्हणून वाचावयाचे, ही चमत्कारिक चाल कशी पडली ह्याचा उलगडा होत नाहीं. ही एकाच व्यक्तीनें काढलेली कल्पना होऊं शकणार नाहीं, कारण तसें असतें तर त्यांत विसंगतता राहूं शकली नसती, व पह्लवी भाषेंत दोन किंवा अधिक प्रकार दिसले नसते. खालच्या टायग्रिस आणि युफ्रोटिस प्रदेशांत, लेखनाची चांगली व सुबोध तर्‍हा निघाल्यावर सुद्धा पुष्कळ दिवसपर्यंत गुंतागुतीची कीलाकृति अरेमाइक वर्णमाला चालू होती व ती तेथेंच अस्तित्वांत पण आली होती व तेथून इराणी लोकांनीं ती आणली. प्राचीन काळच्या अखेरीस देखील, बहुधां थोडयाच पर्शियन लोकांस लिहितां वाचतां येत असे. झोरोआस्टियनांची, बहुधां सहाव्या शतकांतील पवित्र धर्मग्रंथांचीं भाषांतरें, मुख्यत: मिनोई-खिर्द आणि बुंदाहिश हे ग्रंथ पह्लवी वाङ्मयांत येतात.

नवीन राज्य, नवीन धर्म, नवीन (फारशी) भाषा आणि नवीन लिपि अस्तित्वांत आल्यावर सुद्धां पुष्कळ दिवसपर्यंत झोरोआस्टियन धर्मगुरु जुन्या (पह्लवी) लिपीचा व भाषेचा उपयोग करीत. एके काळीं भ्रष्ट, धर्मबाह्य वाङ्मय फार असे; त्यापैकीं पुष्कळसें, अरबी व नवीन पर्शियन भाषेमध्यें उतरून घेतलें आहे. अद्याप कांहीं थोडें वाङ्मय पह्लवीमध्यें शिल्लक आहे.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .