प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें   

पॅराग्वे- दक्षिण अमेरिकेंतील एक प्रजासत्ताक राज्य. हें द.अ. २० १६' ते २६ ३१' आणि प.रे. ५४ ३७' ते ६२० यांच्या दरम्यान आहे. याच्या वायव्येस बोलिव्हिया; उत्तरेस व पूर्वेस ब्राझिल, आग्नेय, दक्षिण व पश्चिम या बाजूंस अर्जेन्टिना आहे. लोकसंख्या सुमारें दहा लाख असून तींत ग्वारानी इंडियन अधिक आहेत. क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मैल आहे.

स्वाभाविकरचना- पॅराग्वे नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वहात जाऊन या देशाचे तिनें दोन भाग केले आहेत; पैकीं पूर्वेकडचा अथवा पूर्व पॅराग्वे हा फार महत्त्वाचा आहे. पश्चिमेकडीड भाग ग्रॅन चाको नांवाच्या मोठया मैदानाचा विभाग असून याचा बर्‍याच अंशीं शोध लागलेला नाहीं. मुख्य पॅराग्वे अथवा पॅराग्वे व पाराना या नद्यांमधील प्रदेशांतून कॉर्डिलेरा अम्बाया, कॉर्डिलेरा युरुकरी, वगैरे उंचवटयाची पट्टी गेली आहे व ब्राझिलमधील डोंगरपठाराचाच हा एक भाग आहे. असन्शन डोंगरपठारापासून दक्षिणेस पॅराग्वे व पाराना नद्यांच्या संगमापर्यंत दलदलीचा विस्तीर्ण प्रदेश आहे. दलदलीचे प्रदेश व नदीकांठचा प्रदेश खेरीजकरून जमीन कोरडी, निचर्‍याची व वालुकामय आहे.

भूस्तरवर्णन- या देशाची भूस्तरविषयक माहिती फार थोडी आहे. या देशाचा बराच भाग क्वाटेर्नरी थरांनीं आच्छादिलेला आहे. टेंकडया व डोंगरपठार गारेच्या दगडांचे बनलेले आहेत.

खनिजपदार्थ- सोन्याच्या खाणी जेसुईट लोकांनीं बुजवून टाकल्या असें म्हणतात पण त्या अजिबात नसाव्यात हेंच खरें दिसतें. लोखंड लोपेझला इबिकुई येथे सांपडले होतें. तांबे, मँगेनीज आक्सॉइड, संगमरवरी दगड, चुना व मीठ सांपडतें; परंतु या देशाची खरी संपत्ति म्हटली म्हणजे येथे उत्पन्न होणार्‍या वनस्पती होत.

हवा व प्राणी- या देशांत वर्षांतून उन्हाळा व हिंवाळा असे दोनच ऋतू येतात. उन्हाळा आक्टोबरपासून मार्चपर्यंत, व हिवाळा एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत असतो. सरासरी ४६ इंच पाऊस दरवर्षी पडून सर्व वर्षभर सारखा पडत असतो. उत्तरेकडून व दक्षिणेकडून वारे वाहत असतात. वादळें दक्षिणेकडून बहुश: वाहत असतात.

या देशांत ब्राझिलप्रमाणेंच प्राणी सांपडतात. कायमन, वॉटरहॉग, निरनिराळ्या प्रकारचीं हरिणें, औंस, ओपोसम, आर्माडिलो, व्हाम्पायर, अमेरिकन शहामृग, इबिस, जाबिरु, पार्ट्रीज, बदक, पोपट वगैरे प्राणी येथें आढळतात. येथें किडे विपुल आहेत. या देशांत तांबडी मुंगी विशेषेंकरून आढळते, व मधमाशा खेडयांतून पाळलेल्या असतात.

लोकसंख्या.- येथील बरेच लोक इंडियन (ग्वारानी) लोकांचे वंशज आहेत. त्यांच्यांत सुधारणा फार झालेली नाहीं. साधारणपणें पॅराग्वेचे लोक विशेषत: पुरुष आळशी असतात. हवामानाप्रमाणें विशेष कपडे घालण्याची गरज नसते. कापसाच्या कापडाचा सदरा (चेमिस) व पांढरा फेटा (मांटा) मूर लोकांप्रमाणें गुंडाळलेला असतो. हाच बायकांचा पोषाख होय; कापसाच्या कापडाचे शर्ट व पायजमा हा पुरुषांचा पेहराव आहे. फक्त वरिष्ठ प्रतीचे लोक जोडे व बूट वापरतात. गळ्यांतील ढालेसारख्या गांठीची वाढ व रक्तपिती हे मुख्य रोग आहेत; परंतु एतद्देशीयांनां हगवण व अपचन हे रोग होतात. या देशांतील भाषा ग्वारानी आहे, तरी कांहीं भागांत टुपी भाषा बोलतात. येथील व्यापाराच्या ठिकाणाजवळ राहणार्‍या लोकांनां थोडीशी स्पॅनिश भाषा समजते. असन्शन (राजधानी), व्हिलारिका, कन्सेप्शन, व व्हिलाडेलपिलर हीं मोठीं शहरें आहेत. पाराना नदीवरील एन्कारनॅशन या शहरीं ने आणीचा व्यापार चालतो.

राज्यव्यवस्था.- कायदे करण्याची सत्ता कार्यकारीसभा (सिनेट) व प्रतिनिधिसभा (चेंबर ऑफ डेप्युटीज) यांच्या बनलेल्या एका शासनसंस्थेच्या हातीं असते. प्रत्येक १२००० लोकांस एक सिनेटर व प्रत्येक ६००० लोकांस एक डेप्युटी निवडतात. काँग्रेसच्या प्रत्येक मेंबरला दरमहा ३००० डॉलर पगार मिळतो. कार्यकारीमंडळाचा मुख्य अध्यक्ष असतो. याला मतदारसंघ चार वर्षांपुरतें निवडतें. याच्या मदतीस काँग्रेसला जबाबदार अशा पांच मंत्र्यांचें एक मंडळ असतें. जर अध्यक्ष मुदत संपण्याच्या अगोदर मेला अगर अन्य कारणांमुळें काम करूं शकत नसला तर त्याच्या जागीं उपाध्यक्ष निवडतात. न्यायखात्यांतील मुख्य सत्ता वरिष्ट कोर्टाकडे आहे. या कोर्टाला काँग्रेसनें पास केलेले कायदे सनदशीर आहेत किंवा नाहींत याचा निर्णय करण्याचा अधिकार असतो. या कोर्टाचे तीन सभासद अध्यक्षाच्या संमतीनें काँग्रेसनें चार वर्षांकरितां नेमलेले असतात. पांच अपील कोर्टें व शहरांतून हलक्या प्रतीची कोर्टें आहेत. अर्जेन्टिनाचे दिवाणी व फौजदारी कायदे कांहीं एक फरक न करतां उपयोगांत आणतात. राज्यकारभाराच्या सोईकरितां या देशाचे तेवीस विभाग (कौंटी) व पोटविभाग (कॉम्यून) केलेले आहेत.

धर्म व शिक्षण.- रोमन कॅथोलिक पंथ हा येथील धर्म आहे. परंतु कायद्यानें सर्व धर्मपंथांनां स्वातंत्र्य मिळालें आहे. येथील शिक्षण मागसलेलें आहे; याकडे फार दिवसांचें दुर्लक्ष्य होतें. कायद्यानें शिक्षण मोफत व सक्तीचें आहे; परंतु बर्‍याच जिल्ह्यांतून मुलें शाळेंत येत नाहींत. स. १९१७ मध्यें प्राथमिक शिक्षणाच्या शाळा १०४६ असून शाळेंत जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ६२६५७ होती. येथें एक विश्वविद्यालय व पांच कॉलेजें आहेत. राष्ट्रीय ग्रंथालय, राष्ट्रीय दप्तर, पदार्थसंग्रहालय, वनस्पति-प्राणि-संग्रहालय ही सरकारच्या देखरेखांखालीं आहेत.

राज्यशिक्षण.- धोडदळ, पायदळ, व तोफखाना मिळून २५०० लोकांचें सैन्य असून आरमारहि आहे.

जमाबंदी.- या देशाला इंग्लंड, ब्राझिल, अर्जेन्टिना वगैरे देशांचें कर्ज देणें आहे, शिवाय देशांतर्गत कर्जहि आहे. आयात मालावरील जकात हीच उत्पन्नाची बाब आहे, व सरकारी, लष्करी, शाळाखात्यांतील लोकांचे पगार देणें व कर्ज फेडणें या खर्चाच्या बाबी आहेत. १९१५ सालची जमा ११०५९११ पौंड असून खर्च १०७१३३२ पौंड होता.

उद्योगधंदे.- शेती, येर्बाम टी (पॅराग्वे-चहा) बनवणें, गुरें पोसणें, फळें पिकविणें, तंबाखू लावणें व इमारती लांकूड तोडणें हे मुख्य धंदे आहेत. ब्युनॉस आरीस, रोझॅरिओ व माँटेव्हिडिओ या शहरीं नारिंगें पुष्कळ पाठवितात. येथील जंगलांत क्केब्रॅचो, सिडर, कुरुपे, लॅपॅचो व उरुंडे वगैरे झाडें विपुल आहेत. पंधरा वनस्पतींपासून रंग तयार होतात व आठांपासून सूत निघतें. रम, साखर, विटा, कमावलेलें कातडे, सामान व मांसाचा अर्क येथें तयार करतात.

व्यापार.- विणलेलें कापड, लोखंडी सामान, दारू, तांदूळ, कणीक, टीनच्या डब्यांत घातलेले पदार्थ व इतर खाण्याचे जिन्नस बाहेर देशांतून येथें येतात; व येर्बाम टी, चामडें, केंस, सुकविलेलें मांस, लांकूड, नारिगें व तंबाखू हीं बाहेरदेशीं रवाना होतात.

दळणवळणाचे मार्ग.- महासागरांत चालणार्‍या असंख्य बोटी ब्राझिल व अर्जेन्टिना या देशाच्या आहेत. नद्यांतून लहान जहाजें जातात. पॅराग्वे "सेंट्रल रेल्वे" हीच मुख्य रेल्वे आहे. या रेल्वेनें असन्शन शहर एन्कारनॅशनला जोडलें आहे. पॅराग्वे युनिव्हर्सल पोस्टल यूनिअनमध्यें १८८४ सालीं सामील झालें. या संस्थानांत पांच मोठया बँका आहेत. सोन्याचें किंवा चांदीचें चलन प्रचारांत नाहीं. मात्र कांही निकल नाणीं आहेत. नोटा हेंच सार्वत्रिक चलन आहे.

इतिहास.- १५२७ सालीं सेबास्टियन कॅबट पॅराग्वेला आला व त्यानें येथें सँटो इस्पिरिटु नांवाचा किल्ला बांधला. सं. १५३५ मध्यें असन्शन वसविण्यांत आलें, येथून स्पॅनिश लोक पॅराग्वेच्या पूर्वेस पाराना नदीच्या पलीकडे गेले. स. १७७६ पर्यंत ब्युनॉसआरीस आणि पॅराग्वे हे एका व्हाइसरायाच्या हातीं देण्यांत आले. १५४२ ते १५६० या काळांत येथें पांच ख्रिस्ती मिशनें स्थापन करण्यांत आलीं. १७५० मध्यें स्पेनच्या सहाव्या फर्डिनंड राजानें लाग्वेरा जिल्हां पोर्तुगीज लोकांना दिला. जेसुइट लोकांनीं या गोष्टीस प्रतिकार केला पण स्पेन व पोर्तुगॉल यांच्या संयुक्त सैन्यानें जेसुइटांचा पराभव केला, व स. १७६९ मध्यें त्यांनां हांकून लाविलें. १८११ मध्यें पॅराग्वे स्पेनपासून स्वतंत्र झालें. स. १८१४ त डॉ. फ्रँकिआच्या हाताखालीं हा प्रांत होता. याच्या मागून याचा पुतण्या कार्लास अन्टोनिओ लोपेझ व नंतर त्याचा मुलगा फ्रान्सिस्को लोपेझ हे एकतंत्री अधिकारी झाले. सं. १८६४ त लोपेझ व ब्राझिल सरकार यांच्यांत भांडण उपस्थित झालें. ही लढाई पांच वर्षेपर्यंत चालली. या लढाईंत पॅराग्वेचे बरेच लोक मारले गेले.

लोपेझच्या मरणानंतर येथील राज्यकारभार सिरिलो रिव्हॅरोला, कार्लस लोइशागा, जोसेडिआझ डेबेडोझा या त्रयीनें चालविला; अखेरीस स. १८७० त सध्यांची राज्यपद्धति स्थापित झाली. पॅराग्वे खालसा करण्याचें ब्राझिलचें कांही कालपर्यंत धोरण होतें, परंतु ब्राझिल व अर्जेन्टिना यांच्यामधील मत्सरानें पॅराग्वेला स्वतंत्र राहतां आलें. स. १८७० नंतर कांहींच घडामोड झाली नाहीं. फक्त १८८१, १८९४ व १८९८ त कांहीं राज्यक्रांतिकारक बंडें झालीं होतीं. परंतु देशाच्या भरभराटीला धोका पोंचला नाहीं. प्रेसिडेंट इमुस्क्लिझा (१८९४-१८९८)च्या कारकीर्दींत बोलिव्हिआच्या सरहद्दीचा प्रश्न उपस्थित झाला, परंतु राज्यक्रांति झाल्यामुळें लढाई झाली नाहीं व प्रेसिडेंटला राजिनामा द्यावा लागला. पॅराग्वेचा अर्वाचीन इतिहास राजकारणाचा नसून आर्थिक महत्त्वाचा आहे. व्यापाराची हळू हळूवृद्धि झाली, १८९५ त जमाबंदीसुधारणा झाल्‍य व  १९०६ नंतर "पॅराग्‍वे सेंट्रल रेल्‍वे" वाढविण्यांत आली. ह्याच महत्त्वाच्या गोष्टी १८७० पासून १९१० पर्यंतच्या काळांत घडून आल्या.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .