प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें   
 
परशुरामभाऊ पटवर्धन- हा सवाईमाधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीतील मराठी सेनापति होता. त्याचें मूळचें गांव रत्‍नागिरी जिल्ह्यांतील कोतवडें. मूळ पुरुष हरिभट असून यानें पुण्याच्या गणपतीजवळ १२ वर्षें दूर्वारस पिऊन अनुष्ठान केलें. त्यास ७ पुत्र झाले; त्यांचाच विस्तार सांप्रतच्या दक्षिणमहाराष्ट्रांतील पटवर्धन संस्थानिकांचा होय. हरिभट हे घाटावर आल्यानंतर इचलकरंजीकरांचे उपाध्याय बनले. हरिभटाचा सहावा पुत्र रामचंद्रपंत व त्यांचे पुत्र परशुरामभाऊ होत. रामचंद्रपंत हे पुण्यास पेशव्यांजवळ असत व स्वार्‍याशिकारीस त्यांच्याबरोबर जात. त्यांचा पराक्रम पाहून थोरल्या बाजीरावानें त्यानां अडीच हजार स्वारांचे पथके केले. माळव्याची स्वारी (१७३५) व वसईची मोहीम (१७३९) यांत पंतानें पराक्रम गाजविला होता. त्यामुळें वसई किल्ल्याची फडणविशी त्यांना मिळाली. पुढें उत्तरेकडील एका स्वारींत भागिरथीकांठीं शिवपुरास पंत वारले (१७४३). परशुरामभाऊचा जन्म १७३९ सालीं झाला. बाप वारल्यावर मग भाऊंची मुंज झाली; बापाचे पथक त्यांच्यामागें भाऊकडे आलें. तेव्हां भाऊ लहान म्हणून पुरुषोत्तम दाजी पटवर्धन हे कारभार पहात असत. दमाजी गायकवाडाच्या सातार्‍यावरील स्वारींत हें पथक होतें (१७५१). सावनूर (१७५५-५६) च्या मोहिमेंत भाऊ प्रथम लढाइवर गेले. मुख्य सरदारी गोपाळराव पटवर्धन करीत असत. ते निजगलच्या लढाईनंतर (१७७०) थोडयाच दिवसांनीं वारले; मरणापूर्वीं त्यानीं भाऊंस माझें नांव तूंच रक्षण कर असें सांगितलें होतें. त्यानंतर भाऊंस सरकारचाकरी करण्यासाठीं नेहमीं पुण्यास राहावें लागे व मोहिमेवर जावें लागे. हैदरावरील एका स्वारींत भाऊंची एकामागून एक अशीं तीन घोडीं मेलीं, तरीहि भाऊंनीं शौर्य गाजवून हैदराचा पराभव केला. त्यामुळें पेशव्यानीं त्यांना वीस हजारांची तैनात दिली. पुढें १७७६ सालच्या पावसाळ्यानंतर पुन्हां भाऊंस हैदरावर पाठविलें होतें; परंतु त्यावेळीं त्यांचा मदतनीस निजामाचा सरदार धौशा यानें हैदराकडून लांच खाऊन लढाईचा मामला बिघडविला, त्यामुळें भाऊ परत फिरले. बारभाईचें कारस्थान सुरू होण्यापूर्वी दादासाहेबांच्या निजामावरील स्वारींत भाऊ दाखल होते. गंगाबाईस पुण्याहून काढून मिरजेस नेण्याचा भाऊंचा बेत होता पण तें जुळलें नाहीं (१७७३). पटवर्धनी फौजेवर भाऊंची मुख्य सरदारी १७७७ सालीं सुरू झालीं. १७८० सालचा दसरा झाल्यावर, कोकणप्रातांचें इंग्रजांपासून संरक्षण करण्याकरितां ज्या सरदारांची रवानगी झाली, तींत भाऊहि होते. १७८१ सालच्या आरंभीं इंग्रज सेनापति गॉडर्ड यानें बोरघाट काबीज करून मुख्य सैनास खंडाळा येथें पाठविलें व तो स्वत: खोपवली येथें राहिला. तेव्हां भाऊंनी कोकणांत उतरून गॉडर्डच्या सैन्यास अतिशय त्रास देऊन व त्याचें मुंबईशीं असलेलें दळणवळण बंद पाडून त्याचा पुरा पराभव केला, व त्यास पिटाळून लाविलें. याबद्दलची बरीचशी माहिती नाना फडणवीस या नांवाखालीं आली आहे. १७८५ सालीं टिप्पूनें नरगुंदकर देसायावर आपलें सैन्य पाठविलें, तेव्हां भाऊ व गणेशपंत बेहरे हे देसायास कुमक करण्याकरितां गेले. देसाई हा पटवर्धनांच्या आप्तांपैकींच असल्याकारणानें भाऊ त्याला मदत करण्यास विशेष उत्सुक होते. परंतु नाना फडणविसाची तूर्त टिप्पूशीं लढण्याची इच्छा नसल्यामुळें मराठयांची टिप्पूशीं तडजोड झाली व भाऊं पुण्याकडे परतले परंतु तिकडे टिप्पूनें लगेच तह मोडून नरगुंदकराचें पारिपत्य केलें.

या प्रकरणी नानानीं आपणांस देसायास कुमक करण्याच्या कामी अडथळा केल्यामुळें देसाई टिप्पूच्या विश्वासघातास बळी पडून सर्वस्वीं नागावला गेला या गोष्टीचा भाऊंस फार राग आला, म्हणून त्यानीं टिप्पूवरील पुढील मोहिमेच्या प्रसंगीं उदासीनपणा धरला व कांहीं तरी सबब काढून ते स्वत: मोहिमेंत हजर राहिले नाहींत. दोस्तांच्या श्रीरंगपट्टणावरील स्वारींत २५००० सैन्यासह टिप्पूच्या उत्तरेकडील मुलुखावर चालून जाण्यासाठीं तारीख ५ मे सन १७९० रोजीं भाऊ पुण्याहून निघाले. या मोहिमेची साग्र हकीकत ज्ञा.को. च्या १४ व्या भागांत टिप्पू सुलतान या नांवाखाली आली आहे. पुढें टिप्पूशीं तह होऊन (१७९२ मार्च) दोस्तांची लष्करें आपापल्या मुलुखाकडे जावयास निघालीं, तेव्हां इंग्रजांनीं मराठयांनां नजर केलेल्या १७ मोठमोठया तोफा भाऊंबरोबर देण्यांत आल्या होत्या. खडर्याच्या (१७९५) लढाईंत पटवर्धनांचें ७ हजार सैन्य होतें, व स्वत: पटवर्धन मराठयांच्या सर्व लष्कराचे मुख्य सेनापति होते. या लढाईंत एके प्रसंगी भाऊ जखम लागून खालीं पडले असतां त्यांचा वडील पुत्र हरिपंत यानें मोठया शौर्यानें लढून बापाचा जीव वाचविला (खडर्याची लढाई पहा). सवाईमाधवरावास अपघात होतांच नानानीं पुण्यास ताबडतोब निघून येण्याविषयीं भाऊंस निरोप पाठविला (१७९५). आपण ठरविलेला दत्तकाचा बेत हाणून पाडून रावबाजीस मसनदीवर बसविण्याचा दौलतराव शिंद्याचा विचार आहे असें नानांस समजतांच त्यानीं पुन्हां निकडीनें बोलावणें पाठविलें. भाऊहि अवघ्या ४८ तासांत १२० मैलांची मजल करून फौजेसह पुण्यास येऊन दाखल झालें. तेथें नानांच्या व त्यांच्या विचारें शिंद्यापूर्वीं आपणच रावबाजीस गादीवर बसवावें असें ठरल्यामुळें ते जुन्नरास गेले, व रावबाजीस पुण्यास घेऊन आले (१७९६). या व पुढील प्रसंगांची विस्तृत हकीकत नाना फडणवीस यांच्या नांवाखालीं पहावी.

रावबाजीस नानानीं आणल्यावर शिंदा सैन्य घेऊन पुण्याकडे यावयास निघाला. तेव्हां भाऊनीं शिंद्यांशीं लढाई देण्याचा नानांस सल्ला दिला. पण नाना घाबरले व भाऊंस रावबाजीजवळ ठेवून आपण पुण्याहून चालते झाले (१७९६). धाकटया चिमाजीआप्पास यशोदाबाईस दत्तक देऊन कारभार तुम्हीं करावा असें बाळोवा तात्यानें भाऊंस म्हटलें, तेव्हां त्यानीं नानांचा सल्ला विचारला. रावबाजीस आपल्या ताब्यांत घेऊन मग ही गोष्ट करावी असें नानानीं मत दिलें. परंतु भाऊंनी नानाचें ऐकलें नाहीं व चिमणाजीस मसनदीवर बसवून रावबाजीस मात्र आपल्या ताब्यांत घेतलें नाहीं. चिमणाजीकरितां पेशवाईचीं वस्त्रें स्वत: नानानींच छत्रपतीपासून मिळविलीं व तीं घेऊन ते स्वत: पुण्यास आले असते, परंतु भाऊनीं रावबाजीस आपल्या ताब्यांत घेतलें नाहीं असें पाहून त्यांचें मन भाऊविषयीं साशंक झालें.

इकडे भाऊहि नानांच्या विरुद्ध गेले. ज्या नानानीं भाऊंस योग्यतेस चढविलें तेच भाऊ अखेर नानांवर उलटले. त्यांच्या चरित्रावर हा एक मोठा कलंक आहे. भाऊनीं नानानां धरण्याकरितां सातार्‍यास धरणें पाठविलें. तेव्हां नाना वाईस गेले. तेथेंहि फौज गेल्यानें ते महाडास गेले. पावसाळ्यामुळें भाऊंच्या फौजेचा लाग लागला नाहीं. इकडे भाऊनीं नानांची सर्व जहागीर व वाडे जप्त केले. पुढें नानांचें महाडचें कारस्थान फलद्रूप होऊन भाऊ कैद झाले व नाना पुण्यास येऊन कारभारी होऊन रावबाजी पेशवे (१७९६) झाले. (नाना फडणवीस पहा). भाऊंस आनंदराव रास्त्यानें सांभाळण्याची हमी घेतली व त्यानां नगर व मांडवगण येथील किल्ल्यांत कैदेंत ठेविलें (१७९८). माधवराव रास्त्यास सातारच्या महाराजांच्या लोकांनीं सातार्‍याजवळून हांकून लाविलें, व कोल्हापूरकराशीं मिसळून दंगा उभारला. तेव्हां १५ लक्ष रुपयांचा जबर दंड घेण्याचें ठरवून पेशव्यानीं भाऊंस कैदेतून सोडविलें व दंगा मोडण्यावर त्यांची नेमणूक केली (१६ जून). तेव्हां भाऊनीं रास्त्यांच्या मदतीने १० हजार फौज उभी केली; व भर पावसाळ्यांत महाराजांच्या सैन्यावर वेणा नदी उतरून अचानक हल्ला केला व पुन्हां पूर्वीप्रमाणें किल्ला काबीज करून सर्व स्थिरस्थावर केलें. यानंतर रावबाजीनें फौज कमी करण्याची गोष्ट काढली. परंतु फौजेचा पगार द्यावयास पैसा नाहीं अशा सबबीवर भाऊंनी टाळाटाळ केली. पुढें १७९९ सालीं उन्हाळ्यांत इंग्रजांचें टिप्पूशीं जें युद्ध झालें त्यांत इंग्रजांनां मदत करण्याकरितां मराठी सैन्यावर भाऊंची नेमणूक झाली. तेव्हां नाना व भाऊ यांचा सलोखा होऊन असें ठरलें कीं, भाऊंस दंडाची रक्कम माफ करून धारवाड व दुसरी कर्नाटकांतील कित्येक ठिकाणें जहागीर द्यावीं व भाऊनीं धोंडोपंत गोखले, रास्ते, विंचूरकर व दुसरे ब्राह्मण यांच्या फौजा घेऊन इंग्रजांच्या तुकडीसह टिप्पूशीं लढण्यास जावें. पण पुढें रावबाजी दौलतरावाच्या सल्ल्याप्रमाणें चालल्याकारणानें लढाईवर जाण्याचें कारण पडलें नाहीं. यापुढें भाऊनीं बाळोबा तात्याचा व नानांना समेट करून दिला.

याच सालच्या (१७९९) पावसाळ्यांत भाऊंस कोल्हापुरकरांचा पुंडावा थोपवून धरण्याचें काम सांगण्यांत आलें. कोल्हापुरकर भाऊंच्या मुलुखास अलीकडे बराच उपद्रव देत होते. कांहीं दिवसांपूर्वी तर त्यांनीं तासगांव लुटून, तेथें भाऊनीं बराच खर्च करून बांधलेला नवीन वाडा जाळून फस्त केला होता. भाऊंचें व त्याचें पुष्कळ दिवसांचें हाडवैर होतें. वरील कृत्यांनीं भाऊंस इतका त्वेष आला होता कीं, वृद्धापकाळामुळें त्यांची शक्ति क्षीण होत चालली होती, तरी त्यानीं सर्व पावसाळाभर कोल्हापूरकरांशीं युद्ध चालूं ठेवून घटप्रभा व मलप्रभा ह्या नद्यांमधील ठाणीं परत घेतलीं.

या सुमारास पटवर्धन घराण्यांत गृहकलहास प्रारंभ झाला (जून). गंगाधरराव मिरजकर व चिंतामणराव सांगलीकर यांचें भांडण जोरांत सुरू झालें. भाऊनीं केलेली मध्यस्थी गंगाधररावानें मान्य केली नाहीं, म्हणून चिंतामणरावानें आपलें पथक घेऊन भाऊंचा गोट सोडला (जुलै) व तो मिरजकरांचीं ठाणीं घेत चालला. कुरुंदवाडकर व मिरजकर हे आंतून करवीरकरांशीं सामील झाले होते. त्यामुळें त्यांनीं कोणीहि भाऊंस मदत केली नाहीं. यावेळीं भाऊंच्या फौजेची फार हलाखी झाली होती; सार्‍या दोन तोफा त्यांच्याबरोबर होत्या. खुद्द भाऊंची प्रकृतीहि बरी नव्हती व सैन्याच्या हालचाली बहुधां त्यांचा मुलगाच करी. त्याला अद्यापि लष्करी धोरण चांगलेसें समजलें नव्हतें. शेवटीं पट्टणकुडी येथें भाऊंचा मुक्काम पडला असतां त्यांच्यावर कोल्हापूरकर एकदम चालून आले. भाऊनीं त्यांनां अंगावर घेऊन मग हल्ला करण्याचें ठरविलें, परंतु पुढें गोंधळ उडाला. रामचंद्र आप्पा यानें लढाईंत आघाडीवर चांगला पराक्रम गाजविला. पण तो जखमी झाल्यानें फौज फुटली. तेव्हां कोल्हापुरकरांनीं तिचा पाठलाग केला. त्यावेळीं भाऊ आजारी असताहि त्यानीं शत्रूस अडथळा केला. त्यांत त्यानां तीन जखमा होऊन ते एकाएकी घोडयाखाली आले व शत्रूच्या हाती लागले. अशा वेळीं त्यांच्या सोबतीचे सर्व लोक पळून गेले होते. आसन्नमरणावस्थेंत भाऊनां कोल्हापूरच्या महाराजांपुढें नेलें असतां, त्यानीं भाऊंस ठार मारण्यास सांगितलें व त्याप्रमाणें भाऊंचा शेवट झाला. खरेशास्त्री म्हणतात ''भाऊ जखमांनीं घायाळ होऊन आपोआपच मृत्युपंथास लागले होते, असें असतां महाराजानीं त्यांस मुद्दाम मारवून दुष्कीर्ति संपादन केली'' (१७ सप्टेंबर, १७९९). [खरे-ऐ.ले. संग्रह, भा.७-११; हरिवंशबखर; सवाई माधवरावांची रोजनिशी; डफ; पेशव्यांची बखर; नाना फडणविसांचें चरित्र.]

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .