प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें

पंच– पंचांचे दोन प्रकार आहेत; एक न्यायपंच (ज्यूरी) व दुसरा व्यवस्थापंच (ट्रस्टी). हिंदु न्यायपद्धतींत प्राचीन काळापासून लवाद किंवा पंचायत कोर्टे आलेलीं आहेत (न्यायपद्धदि पहा.). पाश्चात्त्य देशांत ‘ज्यूरी’ (पंच) च्या मदतीनें न्याय देण्याची पद्धति १३ व्या शतकानंतर रुढ झाली. तीच पद्धति अल्पांशानें ब्रिटिश अमदानींत हिंदुस्थानांत चालू करण्यांत आली.                                                                            

न्यायपंच उर्फ ज्यूरी.– दिवाणी किंवा फौजदारी खटल्यामध्यें पुराव्याच्या गोष्टींतील खरेपणा ठरविण्याकरितां बोलावलेले व शपथ केलेले इसम, अशी इंग्रजी कायद्यांत ज्यूरी शब्दाची व्याख्या आहे. ज्यूरीची निकालपद्धति ही इंग्रजी कायदेशास्त्रानें केलेली फार मोठी कामगिरी असें मानतात, आणि हीच ज्यूरीपद्धति पुष्कळ देशांत अलीकडे सुरु केली आहे. फ्रान्समधील पद्धतीवरून नॉर्मन राजांनीं इंग्लंडमध्यें ज्यूरीपद्धति सुरु केली, असें बहुतेक कायदेपंडित व इतिहासकारांचें आतां एकमत झालें आहे. शिवाय अलीकडील एकंदर ऐतिहासिक संशोधनाचा निष्कर्ष असा निघतो कीं, सर्व देशांतच ज्यूरीपद्धतीशीं बरेंच साम्य असलेली निकालपद्धति मूळ होती.  

ज्यूरीचे प्रकार– इंग्लंडमध्यें ज्यूरीचे तीन प्रकार आहेत:-- (१) थोरली ज्यूरी, (२) लहान ज्यूरी व     (३) मयताची ज्यूरी.

(१) थोरली ज्यूरी:-- यामध्यें १२ पासून २३ पर्यंत इसम असतात. फौजदारी कोर्टांत फिर्याद दिली म्हणजे ती खरी असल्याचें ठरविण्याकरितां  या ज्यूरीकडे पाठवितात. तें ठरवितांना हे लोक फिर्यादी पक्षाचे साक्षीदार मात्र तपासतात. वकिलांनां काम चालविण्याची परवानगी नसते; किंवा आरोपीचाहि साक्षीपुरावा घ्यावयाचा नसतो. फक्त फिर्यादीच्या साक्षीपुराव्यावरून फिर्याद खरी आहे कीं नाही एवढा निकाल देण्याचें या ज्यूरीचें काम असतें.

पूर्वी इंग्लंडांतील जुलूमी राजे व त्याच्या अंकित न्यायाधीश असत. तेव्हां या थोरल्या ज्यूरीपद्धतीमुळें लोकांचा फार बचाव होत असे. हल्लींच्या सुधारलेल्या चौकशीच्या कायद्याप्रमाणें जज्जांनांच फिर्याद खरी करून घेणयाचें काम प्रथम करावें लागतें. पण न्यायधिशांवर राज्यकर्त्यांचें दडपण पडण्याचा जेथें संभव असतो तेथें तेथें ही पद्धति असणेच जरूर आहे. इंग्लंडमध्येंहि ती अद्याप चालू आहे.

(२) धाकटी ज्यूरी:-- थोरल्या ज्यूरीनें फिर्याद खरी आहे असें ठरविल्यास आरोपी इसमावर फिर्याद अर्जांतील गुन्हा कायद्याप्रमाणें बरोबर शाबित होतो कीं नाहीं हें ठरविण्याचें काम धाकट्या ज्यूरीकडे असतें. इंग्लंडमध्यें दिवाणी दाव्यांतहि ही ज्यूरीची पद्धति आहे. हिंदुस्थानांत फौजदारी कामांतच आणि सेशनकोर्टांत व हायकोर्टांमधील खटल्यांत मात्र ज्यूरी बोलतात. शिवाय सेशनकोर्टासंबंधानें सर्व जिल्ह्यांतील लोकांनांहि ज्यूरीपद्धतीचा हक्क दिलेला नाहीं. थोरल्या ज्यूरीची पद्धत तर हिंदुस्थानांत कोठेंच नाहीं. धाकट्या ज्यूरीमध्यें ८ ते १२ पर्यंत इसम असतात आणि ते गुन्हा घडलेल्या ठिकाणचें किंवा त्या कौंटींतील रहिवाशी असतात. त्यामुळें गुन्ह्याविषयीं खरी माहिती त्यांनां बहुतकरून असते.

(३) मयताची ज्यूरी:-- आकस्मित किंवा अपघातानें मृत्यु आला असल्यास, किंवा तुरुंगांतील किंवा वेड्यांच्या इस्पितळांतील इसम मयत झाल्यास, किंवा गुप्तद्रव्य कोणास सांपडलें असेल अशा वेळीं पंच बोलावून पंचनामा करतात व ते मृत्युचें कारण नमूद करतात.

ज्यूरीच्या पद्धतीचा विशेष फायदा अनियंत्रित व जुलमी राज्यपद्धतींत होतो. इंग्लंडमध्यें अलीकडें बर्‍याच दिवाणी व फौजदारी कामांतून ज्यूरीचीं पद्धत काढून टाकिली आहे.

व्यवस्थापंच उर्फ ट्रस्टी.– हिंदूंच्या जुन्या परंपरेंत व्यवस्थापंच ही संस्था फार जुनी आहे. गांवोगांव देवस्थानांची व त्यांच्या उत्पन्नाची व्यवस्था पाहण्याचें काम गांवांतील पंचांकडे असें व हल्लीहिं पुष्कळ ठिकाणीं आहे. शिवाय मयत इसमाच्या इस्टेटीचा वारस अल्पवयी असल्यास त्या इस्टेटीची व्यवस्थाहि गांवचे पंच पहात असत. ब्रिटिश अमदानींत ‘प्रायव्हेट ट्रस्ट’ अ‍ॅक्टाप्रमाणें ट्रस्टी नेमण्याची पद्धत रूढ झाल्यामुळें जुनी ‘गावपंच’ ही संस्था खाजगी मिळकतीच्या व्यवस्थेंत हात घालूं शकत नाहीं. तथापि भाऊबंदकीच्या वांटण्या गांवपंचामार्फत करून घेण्याची पद्धत अद्यापहि खेडेगांवांतून खालच्या जातीच्या लोकांत रूढ आहे.

रोमन व इंग्रज लोकांत वरील विषयावरील कायदा फार उशीरां उदयास आला. इंग्रजांचा कायदा म्हणजे अर्थात रोमन लोकांच्या कायद्याची पुनरावृत्ति होय. एकाच्या पारिभाषिक शब्दसमूहांत व तन्निर्दिष्ट कल्पनेंत दुसर्‍या कायद्याच्या त्या त्या शब्दांचा व कल्पनांचा अनुवाद केलेला आहे. इंग्रजींत या कायद्यास ट्रस्टचा कायदा म्हणतात.

ट्रस्ट म्हणजे काय:-- ट्रस्ट म्हणजे जिनगी व तिचें उत्पन्न यांचें सुरक्षण व्हावें असा भावी भोक्त्याचा हक्क. अशा तर्‍हेनें सुरक्षण करण्याचें काम जो आपल्याकडे घेतो त्यास त्या जिनगींतून स्वत:चा फायदा करून घेण्याची अपेक्षा असतां कामा नयें. असा ट्रस्ट मृत्युलेखानें किंवा हयातींत करता येतो. या ट्रस्टचें निरनिराळ्या मुद्यावर निरनिराळ्या तर्‍हेचें वर्गीकरण करतात. उदा. सामान्य व सार्वजनिक किंवा वाच्य, व्यंग व कायदानिर्मित इ.

पंच व भावी भोक्ता कोणास होता येतें:-- ‘अज्ञान’ अवस्थेंत असणारे, वेडे, तसेंच परमुलुखांत वसाहत केलेले, अघोर गुन्हां करणारे किंवा किंवा राजद्रोही किंवा कर्जबाजारी व भावी भोक्ते इतके वजा करून कोणासहि पंच होतां येते. फक्त सार्वजनिक संस्थेस राजाज्ञेवांचून होता येत नाही.

ट्रस्टची उत्पत्ती व अंत:-- ट्रस्ट हा एखाद्या व्यक्तीच्या कृतीनें किंवा कायद्याच्या व्यापारानें अस्तित्वांत येतो. तो करतांना पूर्वी लेख करण्याची आवश्यकता नसे. परंतु “स्टॅच्यूट ऑफ फ्रॉड्स” यानें त्यांत असा फरक केला कीं ज्या कोणास ट्रस्ट करण्याच्या कायद्यानें अधिकार असेल त्यानें स्थावर जिनगीबद्दल तरी अवश्य लेख करून त्यावर सही केली पाहिजे किंवा मृत्युपत्र केलें पाहिजे, एरव्ही तो ट्रस्ट रद्द समजला जाईल. यावरून जंगम जिनगीबद्दल केलेला ट्रस्ट तोंडी असला तरी चालतो. धर्मादायविषयक ट्रस्टखेरीज इतर ट्रस्टच्या बाबतींत भावी भोक्ता म्हणजे कोणी तरी विशिष्ट व्यक्ति असली पाहिजे. इ.सन १८६० पूर्वी पंचांत एखादा नवीन इसम दाखल करून घ्यावयाचा झाल्यास मूळ ट्रस्ट लेखांत तसा अधिकार दिल्याबद्दल निर्देश किंवा कोर्टाचा हुकूम लागत असे. परंतु १८९३ सालच्या ट्रस्टी अ‍ॅक्टच्या १० व्या कलमाप्रमाणें अवशिष्ट पंच किंवा पूर्वीच्या अवशिष्ट पंचाचा वारसदार यांनीं एक किंवा अनेक नवीन पंच लेखी ठरावानें दाखल करून घ्यावेत. पंचाच्या कामगिरींतून आपली सुटका करून घेण्याची इच्छा करणार्‍या पंचास अधिकारावर असलेल्या पंचांनीं लेखी रुकार देऊन मुक्त करावे. ट्रस्ट कायदेशीर पाहिजेत म्हणजे प्रचलित कायद्याच्या किंवा नीतिनियमाच्या विरुद्ध असून उपयोगाचे नाहींत. सावकारांस फसविण्याकरितां केलेले ट्रस्ट रद्द होतात. व्यक्तिविषयक ट्रस्ट इतके धर्मादायविषयक ट्रस्टांस कडक नियम लावीत नाहींत. त्यांच्या बाबतींत धर्माचा मुख्य निर्दिष्ट हेतु साधत नसला तरी त्याच्या जवळजवळ साध्य होण्यासारख्या विषयाकडे ट्रस्टविषयक जिनगीचा उपयोग करतात. याप्रमाणे मूळांत केवळ धर्मादायाकडे लावण्यास सांगितलेल्या देणग्यांचा शैक्षणिक बाबतींत उपयोग केल्याचीं उदाहरणें आहेत. धर्मादाय ट्रस्टच्या बाबतींत मताधिक्याच्या जोरावर पंचांस एखादी गोष्ट करतां येते परंतु खाजगी किंवा व्यक्तिविषयक ट्रस्टमध्यें बहुसंख्यांकांचा निर्णय अल्पसंख्यांकांस किंवा ट्रस्ट जिनगीस बंधनकारक होत नाहीं. इतर जिनगीसंबंधाचे सामान्य कायदे ट्रस्ट जिनगीसहि साधारणपणें लागू पडतात. ट्रस्टच्या उत्पत्तीप्रमाणें त्यांचा अंत वैयक्तिक कृतीनें किंवा कायद्याच्या व्यापारानें घडून येतो.  

पंचांचे हक्क व कर्तव्य:-- (१) पंचानें एक वेळ काम करण्याचें पत्करलें म्हणजे त्यास आपलें काम सोडून देतां येत नाहीं किंवा दुसर्‍यावर सोपवितां येत नाहीं कारण आपल्या विश्वासास पात्र म्हणून देणार्‍यानें तो अधिकार त्याच्याकडे दिलेला असतो. त्यानें पाहिजे तर आपल्या कामाचा राजिनामा द्यावा व तसें करतांना कायद्यानें त्यास आपला प्रतिनिधि निवडून देण्यास बराच अधिकार दिला आहे. (२) पंचास आपला अधिकार किंवा जबाबदारी दुसर्‍यावर टाकता येत नाहीं या तत्वाच्या बाबतींत इ. सन १८९३ च्या ट्रस्टी अ‍ॅक्टचें कलम १७, यानें असा अधिकार एखाद्या पंचास सॉलिसिटरकडे कांही गोष्टींत देतां येतो याप्रमाणें बदल केला आहे. (३) ट्रस्टचें काम सर्व पंच मिळून संगनमतानें केलें पाहिजे. (४) एखादा पंच मयत झाला तर त्याच्या जागीं त्याचे वारस (एक किंवा अनेक) येतात. (५) एक पंच तदितर कृतीबद्दल जबाबदार नाहीं. पैसे पावल्याबद्दल जरी आपण पावतीवर सही केली तरी पैसे खरोखर दुसर्‍या पंचानें घेतले अशाबद्दल पुरावा देण्याचा पंचास अधिकार आहे. (६) ट्रस्ट– जिनगीमधून पंचानें स्वत:चा फायदा करून घेतां कामा नये. परंतु जर ट्रस्ट-रोख्यांत त्यास कांही वेतन देण्याबद्दल स्पष्ट उल्लेख असेल तर त्यास तें घेता येईल. (७) पंचाचें मुख्य कर्तव्य महटलें म्हणजे ट्रस्ट-जिनगीची व्यवस्था लावणें हें होय. त्यानें आपला स्वार्थ आपल्या कर्तव्याच्या आड येऊं देऊं नये. पंच आपल्या पदावर असतां भावी भोक्त्यापासून ट्रस्ट-जिनगी किंवा तिचा अंश विकत घेतां कामा नये. कायद्यानें निर्दिष्ट केलेल्या जागींच तेवढी त्यानें जिनगी गहाण टाकावी किंवा व्याजीं लावावी. इ.

भावी भोक्ता आणि त्याचे हक्क व कर्तव्यें:-- हे हक्क व कर्तव्यें काय असावींत हें पंचांचे वर दिलेले हक्क व कर्तव्यें यांवरून सहज कळून येईल. ट्रस्टचे-जिनगीची योग्य रीतीनें व्यवस्था ठेवण्यांत यावी, हिशोब नीट रीतीनें ठेवण्यांत यावेत व जिनगीवरील उत्पन्नाचा नीट उपभोग मिळावा असा भावी भोक्त्याचा हक्क आहे. भावी भोक्ता यानें पंचांच्या सल्ल्यानें चालावें. जेव्हां पंचावरच विरुद्ध काम चालविणें असेल तेव्हां गोष्ट निराळी.

कोर्टमार्फत पंचव्यवस्था:-- जेव्हां ट्रस्ट करणाराकडून किंवा ट्रस्ट करण्याची असणार्‍याकडून किंवा त्यांच्या तर्फे पंचाची नेमणूक करण्याबद्दल न्यायकोर्टास अर्ज केला जाईल तेव्हां कोर्टानें आपल्यास योग्य वाटेल त्याप्रमाणें दुसर्‍या पंचाबरोबर किंवा स्वतंत्रपणें किंवा पूर्वीचे पंच रद्द करून एक किंवा अनेक पंचांची नेमणूक करावी. अशा रीतीनें नेमलेल्या पंचांच्या कामावर कोर्टाच्या इतर कामगारांप्रमाणे कोर्टाची देखरेख असते. त्यांच्या कामाबद्दल ट्रस्ट-जिनगीमधून त्यास वेतन देण्यांत येतें. वर्षांतून त्यांचा हिशोब तपासतात. पंचाला आपल्या जागेबद्दलचा जामीन द्यावा लागतो. कोर्टानें पसंत केलेल्या पेढीवरच त्यानें व्यवहार करावा. जिनगीसंबंधीचे कागदपत्र जेथें ठेवण्याबद्दल कोर्टाचा हुकूम होईल तेथेंच ठेवावेत.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .