प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें

न्यूफाउंडलंड– उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्वकिनार्‍यापासून बरेंच वर असलेलें महत्त्वाचें व उंचीवर वसलेलें एक मोठें बेट. ही ब्रिटिश वसाहत आहे. हें बेट उत्तर अक्षांत ४६३६’ ५०” ते ५१३०’ आणि पश्चिम रेखांश ५२३७’ व ५९, २४’, ५०” यांवर आहे. दक्षिणोत्तर केप रेपासून केप नॉर्मनपर्यंत याची लांबी अंदाजें ३१७ मैल असून पूर्वपश्चिम रुंदी सरासरी ३१६ मैल आहे. याचें एकंदर क्षेत्रफळ ४०२०० चौरस मैल आहे. हें बेट तीन मोठ्या द्वीपकल्पांचें बनलेलें असून उत्तरेस “पेरिट नॉर्ड” द्वीपकल्प व आग्नेयीस अ‍ॅव्हालॉन द्वीपकल्प आहे. अ‍ॅव्हालॉन द्वीपकल्पांत लोकवस्ती दाट असून दोन उपसागरांनीं हें विभागलें गेलें आहे. “सेंट जॉन” ही याची राजधानी असून ती द्वीपकल्पाच्या पूर्व बाजूस वसलेली आहे.

पर्वत.– हें बेट बर्‍याच लहानमोठ्या पर्वत ओळींनी व्यापलेलें असून त्यांपैकीं, केप रेपासून पश्चिमेकडे वर २०० मैल लांब पसरणारी पर्वतश्रेणी (लाँग रेंज) व त्याचप्रमाणें “अँग्विलारेंज” व “ब्लॉमिडॉनरेंज” या पर्वतश्रेणी महत्त्वाच्या आहेत. लांगरेंजवर बरींच शिखरें असून तीं २००० फूट उंचीवर आहेत. ब्लामिडॉनरेंज या पर्वतश्रेणीची उंची २०८४ फूट आहे. अ‍ॅव्हालॉन द्वीपकल्प डोंगराळ असून त्यापैकीं ईशान्येकडील डोंगर नमूद करण्यासारखा आहे. अंतर्भागीं बरींच सुळकेवजा शिखरें असून त्यांनां टोलटस हें स्थानिक नांव आहे.

नद्या.– आकारमानानें या बेटांत फारशा नद्या नाहींत. एक्स्प्लॉइट, हंबर, व गँडर ह्या तीन नद्या महत्त्वाच्या आहेत. एक्स्प्लॉइट नदी २०० मैल वहात जाऊन एक्स्प्लॉइटच्या उपसागरास मिळते. हिच्या कांठीं बरींच बेटें आहेत. त्यांपैकीं थ्वॉर्ट नांवाचें बेट महत्त्वाचें आहे. नदी एकंदर ३-४ हजार मुलूख धुवून काढते. नदीमुखापासून चवदा मैलांवर धबधब्यांची मालिका आहे. त्यांपैकीं, बिशप व ग्रँड या नांवाचे धबधबे प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणें हंबर नदी आयलंडच्या उपसागराला व गँडर नदी हॅमिलटन साउंडच्या उपसागराला मिळते. यांशिवाय, सेंट लॉरेन्सच्या आखातास मिळणारी कॉड्राय नदी नमूद करण्यासारखी आहे.

सरोवरें.– या बेटांत बरींच सरोवरें व तळीं आहेत ही गोष्ट ह्या बेटासंबंधीं विशिष्ट अशी आहे. त्यांपैकीं ग्रँडलेक हें सरोवर ५६ मैल लांब व ५ मैल रुंद असून त्याचें एंकदर क्षेत्रफळ १९२ चौरस मैल आहे. या सरोवराच्या कांठीं एक बेट आहे. त्याचप्रमाणें रेडइंडियन लेक, ग्रँडर लेक, डीयर लेक ही सरोवरें महत्त्वाची आहेत. यांखेरीज मिचेल सँडी, व्हिक्टोरिया, हिडस्, टेरा नोव्हा वगैरे लहान सरोवरें आहेत.

उपसागर.– बेटाचा किनारा बर्‍याच उपसागरांनीं विच्छेदलेला आहे. प्ल्यासेन्शिया बे, नोटर डेम, फॉर्चुन, कन्सेप्शन, आयलंड व सेंट जॉर्ज हे उपसागर महत्त्वाचे आहेत. कन्सेप्शन उपसागर हा सर्वांत मोठा व महत्त्वाचा उपसागर असून याच्या किनार्‍यावर बरीच लोकवस्ती आहे.

लोकवस्ती.– इ.स. १९०१ च्या खानेसुमारीप्रमाणें या बेटाची एकंदर लोकसंख्या २१७०३७ होती. बेटाची राजधानी सेंट जॉन शहर असून त्याची लोकसंख्या १९५९४ आहे. १९१९ सालीं लोकसंख्या २६४०५६९ होती. येथें निरनिराळे ख्रिस्ती धर्मपंथ आहेत.

शेतकी.– या बाबतींत अलीकडे सुधारणा होऊं लागली आहे. कॉड्रायची थडी व सेंट जॉर्ज उपसागरालगतचा मुलूख विशेष सुपीक आहे. १९०१ सालीं ८५५३३ एकर जमीन लागवडीखालीं होती. ओट, बटाटे, टरनिप वगैरे भाजीपाला व गवत वगैरे माल पिकतो. बेटांत गुरेंढोरें पाळण्याच्या धंद्याला बरेंच महत्त्व येऊं लागलें आहे.   

खनिविषयक.– तांबे, लोखंड, जस्त वगैरेंच्या खाणी बेटांत आढळतात. तांब्याच्या खाणीसंबंधीं नॉटरडॅम उपसागरांतील टिलट कोव्ह व बेटस् कोव्ह ह्या दोन खाणी व लोखंडाच्या खाणीसंबंधीं कन्सेप्शन उपसागरांतील बेल नामक बेट येथील खाणी प्रसिद्ध आहेत. १९०५ सालीं ६३५३५० टन लोखंड परदेशीं रवाना झालें. याखेरीज कांही ठिकाणीं अल्प प्रमाणांत, जस्त, सोनें, रुपें, अन्टिमनी वगैरे धातू आढळतात. १९१९ सालीं तांबें काढण्याचें काम सुरू झालें. १९२१ सालीं दि-आंग्लो पर्शियन ऑईल कंपनीनें तेलाच्या खाणी शोधण्याची परवानगी मिळविली. खुद्द सरकारतर्फे कोळशाच्या खाणी खणण्याचें काम सुरू झालें आहे.

उद्योगधंदे.– औद्योगिक बाबींत हें बेट फारसें पुढें आलेलें नाही. इ.स. १९०१ सालच्या खानेसुमारीप्रमाणें एकंदर १९५ करवतकामाच्या गिरण्या चालू होत्या. याखेरीज कागद, साबण, बूट व जोडे, सिगारेट वगैरे जिनसा तयार होतात. स. १९१०-२० या अवधींत, न्यूफाउंडलंडची फार भरभराट झाली. न्यूफाऊंडलंडमध्यें, मासे धरण्याचा धंदा फार भरभराटीचा असल्यामुळें त्यावर या राष्ट्रानें फार फायदा मिळविला. तसेंच, मुरंबा तयार करणें, कागद तयार करणें व लोखंडाच्या खाणी खणणें हे धंदेहि मोठ्या प्रमाणांत चालले होते. पण १९२० सालानंतर या धंद्यानां उतरती कळा लागली, याचें कारण सरकारनें उद्योगधंद्यांवर आपला ताबा सुरू केला हें होय असें पुष्कळ लोकांचे म्हणणें आहे. १९१९-२० सालीं न्यूफाऊंडलंडमध्यें ४०५३३३८७ डॉ. किंमतीचा माल आला व ३४८५४४७ डॉलर्सचा परदेशीं गेला. १९१९-२० साली जवळ जवळ तीन कोटी डॉलर्सच्या किंमतीचे मासे येथून बाहेरगांवी नेण्यांत आले. न्यूफाउंडलंडमधील जंगलाचें क्षेत्रफळ १५०० चौ.मै. आहे. येथें स्प्रूस झाडांची समृद्धि असल्यामुळें त्या झाडापासून कागद तयार करण्याचा धंदा येथें मोठ्या प्रमाणावर चालतो. या ठिकाणीं लॉर्ड नॉर्थक्लिफनें कागद तयार करण्याचा प्रचंड कारखाना काढला. याशिवाय देवदार वगैरे निरनिराळ्या झाडांचीहि येथें समृद्धि आहे.

१९१७ सालीं न्यूफाउंडलंडमध्यें निरनिराळ्या ठिकाणीं रेल्वे सुरू करण्यांत आली. पण अद्यापिहि सर्व ठिकाणीं रेल्वे झालेली नाहीं, व महायुद्धामुळें, न्यूफाउंडलंडची सांपत्तिक स्थिति खालावल्यामुळें ती लवकर होण्याचा संभव दिसत नाही. समुद्राच्या कांठानें सर्वत्र तारायंत्राचें दळणवळण सुरू करण्यांत आलें आहे. त्याचप्रमाणें प्रमुख ठिकाणीं बिनतारी विद्युत्संदेशगृहें स्थापन करण्यांत आलीं आहेत. महायुद्धाच्या अमदानींत ब्रिटिश आरमारखात्यानें माऊंट पर्ल येथें एक बिनतारी विद्युत्संदेशगृह उभारलें. टेलिफोनची सोयहि येथें नुकतीच करण्यांत आली आहे. महायुद्ध चालू असतांना, जलमार्गानें ब्रिटन, कानडा, व अमेरिकेशीं चालू असलेलें दळणवळण बंद पडलें होतें पण तें नुकतेंच सुरू करण्यांत आलें आहे.

१९१४ सालीं महायुद्ध सुरू झालें त्या वेळीं मॉरिश हा न्यूफाउंडलंडचा प्रधान होता. त्यानें ५०० लोकांचें सैन्य इंग्लंडच्या मदतीला पाठवण्याचें कबूल केलें. आरमारांतहि त्यानें पुष्कळ वाढ केली. महायुद्धांत न्यूफाउंडलंडनें एकंदरीत ६५०० सैन्य व आरमारी सैन्य रवाना केलें. त्यापैकीं सुमारें १३०० लोक मृत्युमुखीं पडले.  

राज्यपद्धति.– न्यूफाउंडलंड ही एक ब्रिटिश वसाहत असून पूर्णपणें बादशहाच्या अमलाखालीं आहे. १८५५ सालापासून येथें “जबाबदार राज्यपद्धति” सुरू करण्यांत आली. मुख्य अधिकारी “गव्हर्नर” असून याची नेमणूक बादशहाकडून होते. “हाऊस ऑफ असेम्ब्ली” व “कायदेकौन्सिल” अशीं दोन कार्यकारी मंडळें आहेत.  हाऊस ऑफ असेम्ब्लीचे सभासद लोकनियुक्त असतात. मताधिकार युक्त असे एकंदर १७ जिल्हे आहेत. वरिष्ठ न्यायकोर्टहि आहे. मुख्य न्यायाधिशाची नेमणूक बादशहाकडून होते.  

इतिहास.– इ.स. १९१३ मध्यें ज्या नवीन निवडणुकी झाल्या त्यामध्यें पॅरिसचें मंत्रिमंडळ पुन्हां निवडून आलें. विरोधक पक्षाचे पुढारी सर रॉबर्ट बाँड, व विल्यम कोकर हे होते. पुढें रॉबर्ट बाँडचें व कोकरचें न पटल्यामुळें बाँडनें राजीनामा दिला व त्याच्या बदली केंट हा पुढारी झाला. महायुद्ध सुरू होतांच दोन्ही पक्षांनीं एकमतानें दोस्तसरकारला मदत देण्याचें ठरविलें. केंटमागून लॉइड हा विरोधक पक्षाचा पुढारी झाला. १९१७ सालीं राष्ट्रीय सरकार स्थापण्यांत आलें व प्रधानमंडळामध्येंहि ६ सरकारी व ६ विरोधी पक्षांची भरती करण्यांत आली. पार्लमेंटची मुदत वाढविण्यासंबंधीचा ठराव पास करण्यांत आला. स. १९१७ च्या अखेरीस मॉरिस हा पीयर झाल्यानें त्यानें आपल्या जागेचा राजीनामा दिला व त्याच्या बदली लॉइड हा प्रथम निवडून आला. पुढें लवकरच (स.१९१९ मध्यें) ज्या निवडणूकी झाल्या त्यांत फिशरमेन्स पक्षाची सरशी होऊन स्क्वायर हा मुख्य प्रधान झाला. कोकर हा फिशरी (मत्स्यखात्याचा) मंत्रि झाला. स्क्वायरच्या अमदानींत, आरोग्यासंबंधीचें ठराव पास करण्यांत आले. सेंट जॉन येथें मजूरांसीठीं चाळी बांधण्यांत आल्या. क्षयरोगाविरुद्ध मोहीम सुरू करण्यांत आली. शिक्षणामध्यें इष्ट फेरफार करण्यांत आले. व्यापारी वर्गांत संघटणा झाली. रेल्वे, टेलिग्राफ इत्यादि दळणवळणाचीं साधनें बनविण्यांत आली. खाणीकायद्यांत लोकांनां पाहिजे त्या दुरुस्त्या करण्यांत आल्या. मद्यपानप्रतिबंधासंबंधीच्या कायद्यांमधील व्यंगें नाहीशीं करण्यांत आलीं, व कर कमी करण्यांत आला.

[ संदर्भग्रंथ:-- इयरबुक ऑफ न्यूफाउंडलंड (१९२१) ; न्यूफाउंडलंड गाइड बुक; पी. टी. मॅकक्राप-न्यूफाउंडलंड इन १९२१; जेम्स पी हौले-मिनरल रिसोर्सेस ऑफ न्यूफाउंडलंड (सेंटजॉन्स १९०५) .]

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .