प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें

न्यू झीलंड– ही एक ब्रटिश वसाहत आहे. दक्षिण अक्षांश ३४२५’ ते ४७१७’ व पूर्वरेखांश १६६२६’ ते १७८३६’ यांवर दक्षिण पॅसिफिक महासागरांत असलेल्या बेटांचा हा समूह आहे. हा द्वीपसमूह टास्मानिया व व्हिक्टोरिया यांच्या पूर्वेस आहे. याची राजधानी वेलिंग्टन सिड्नेहून १२०४ मैल दूर आहे. दूर असलेल्या कांहीं बेटांपैकीं चॅथॅम, ऑकलंड व कँबेल बेटें फक्त महत्त्वाचीं आहेत. ही सर्व गवतानें आच्छादित आहेत, व चॅथॅम बेटांत शेळ्या पाळणारे वसाहतवाले आहेत. ऑकलंड बेटांत पॅसिफिक महासागरांतील दोन छानदार बंदरें आहेत. न्यूझीलंडच्या उत्तरेस ६०० मैलांवर कर्मेडेक्सवर फार सुंदर  वनस्पती आहेत. पॉल्मेशिया १८९३ साली न्यूझीलंडच्या ताब्यांत आला. कुक समूहांतील रॅटोंगा, मॅनगैआ व निये हीं मोठी बंदरें आहेत; पेनर्‍हीन व सुवारो लहान आहेत. न्यूझीलंड नॉर्थ (उत्तर) आणि साऊथ (दक्षिण) बेटें व रॅकिडरा बेटें यांचे बनलेलें आहे. नॉर्थ व साऊथ बेटें यांच्यामध्यें कुक सामुद्रधुनी आहे व साऊथ बेट आणि रॅकिडरा यांच्यामध्यें फोव्होन सामुद्रधुनी आहे. नॉर्थ व साऊथ बेटांचें एकंदर क्षेत्रफळ १०४४७१ चौरस मैल व रॅकिडराचें ६२१ चौरस मैल आहे.

याचें मुख्य नैसर्गिक वैशिष्ट्य म्हटलें म्हणजे ईशान्येस कुक सामुद्रधुनीपासून ईस्ट केपपर्यंत जाणार्‍या अखंड पर्वतश्रेणी या होत. या सर्वांत उंच शिखर इकुरँगी आहे. रुआपेहू ज्वालामुखी केव्हां केव्हां जळत असतो, गारुहोमधून धूर व वाफ नेहमी निघते. एगमाँट फार प्रेक्षणीय आहे. पहिल्या दोन ज्वालामुखी पर्वतांच्या उत्तरेस टॉपो सरोवर (क्षे.फ.२३८ चौरस मैल) आहे. या सरोवरापासून ५००० चौरस मैल उष्णोदकाच्या झर्‍यांचा प्रदेश माऊंट रॅपिहूपासून व्हाइट आयलंडपर्यंत पसरलेला आहे. या झर्‍यांच्या पाण्याचा रोगनाशकत्वाबद्दल फार ख्याति आहे. सुंदर सरोवरें, धबधबे, थंड, समशीतोष्ण व उकळणार्‍या पाण्याचीं डबकीं, कढत पाण्याचे झरे (गेशर) व चिखलाचे ज्वालामुखीपर्यंत हीं पाहण्यासाठीं पुष्कळ प्रवासी येथें येतात. रोटोरुआ सरोवरावर सरकारी आरोग्यमंदिर आहे व टॉपो सरोवराजवळ व इतर ठिकाणीं खाजगी स्नानगृहें आहेत. दक्षिण बेटांत उष्णोदकांचीं सरोवरें आहेत व हॅन्मर मैदानांत सरकारी आरोग्यमंदिर आहे. संधिवात, कातडीचे रोग यासारख्या रोगांवर या उष्णोदकानें गुण येतात असा अनुभव आहे. बायकोटो व वायहू उत्तरेस वाहतात. रँगिटैकी ईशान्येस व मोकौ, वंगानुइ व रंगिटिकी या नद्या पश्चिमेस अथवा नैर्ऋत्येस वाहतात. बायकोटो ७० मैल नाव्य आहे. वैकारेमोना हें सुंदर, खोल व मोठें सरोवर आहे. वायकोटोच्या मुखापासून केप टेराव्हिटीपर्यंत २० ते ४० मैल रुंदीचा पश्चिम किनार्‍यावरील प्रदेश चराऊ व दुधदुभत्याच्या धंद्यांकरितां चांगला आहे. पूर्वकिनारा असाच सुपीक आहे. दक्षिणेस चारा व गळिताचीं धान्यें यांनां योग्य हवा आहे. बेटाच्या टोंकाचा प्रदेश निकस आहे. येथें पोर्ट निकोल्सन नांवाचें छानदार बंदर आहे. जरी कांहीं भागाची जमीन निकस व दुभागलेली आहे तरी बेटाचा फारच थोडा भाग लागवडीस किफायतशीर होणार नाहीं. डोंगरपठार व पर्वतांचा उंच प्रदेश खेरीजकरून सर्वत्र पुरेसा पाऊस, सौम्य हिंवाळे व मजेदार उन्हाळे अनुभवास येतात. दक्षिण बेटाचा किनारा उंच व अडचणीचा आहे, यावर चांगलीं बंदरें नाहींत. दक्षिण बेटाचा प्रदेश डोंगराळ आहे. नद्या लहान असून त्या दळणवळणाला निरुपयोगी आहेत. परंतु त्या पाटबंधार्‍यांच्या उपयोगी पडूं शकतात. सर्वांत मोठी नदी क्लुथा ८० मैल लांब आहे. पश्चिमेस बुल्लर व ग्रे या नद्या आहेत. टे अ‍ॅनाव व वाकाटिपु हीं मुख्य सरोवरें आहेत. मॅनापौरी हें फार मनोवेधक सरोवर आहे. आवरंगी हें उंच शिखर आहे, या बेटांत धबधबे व बर्फाच्या नद्या आहेत. टास्सान (१८ मैल लांब)  व मुर्चिसोन (१० मैल लांब)  या बर्फाच्या नद्या आहेत. सदरलंड धबधबा १९०४ फूट उंच आहे. ओटिरा नांवाचा सुंदर बोगदा असून यांतून पूर्व किनार्‍याहून पश्चिम किनार्‍याला जातां येतें. पश्चिम व मध्यभागांत सोनें व कोळसा सांपडतो. येथील हवा आरोग्यकारक आहे. पर्जन्यवृष्टि सालीना ३०-५० इंच होतें.

वनस्पती.— फुलें येणार्‍या सुमारें १००० वनस्पतींच्या जाती येथें आहेत. फर्न वगैरे झाडें विपुल व निरनिराळ्या प्रकारचीं आहेत.

प्राणी.— टुइ, मॅकोमॅको हे गाणारे पक्षी, अप्टेरिक्सेस, काकापो, वेका आणि स्टिच हे जंगली पक्षी आहेत जंगलाच्या बाहेर पंख नसलेला वेका पक्षी आढळतो तर आल्पसमध्यें की नांवाचा ससाण्यासारखा हिरवा पोपट शेळ्या राखतो. पुकेको असंख्य आहेत; रानटी बदकें आहेत; ऑस्टर, शार्क वगैरे जातीचे मासे सांपडतात. रानटी कुत्रे व जंगली डुकरें आहेत. रॅबिट, चिमण्या वगैरे विनाशक प्राणीहि आहेत.

लोकसंख्या.— १९२० सालच्या खानेसुमारींत न्यूझीलंडची लोकसंख्या १२५७४१७ भरली. येथें यूरोपियन व मेओरी लोकांची वस्ती जास्त आहे. शिवाय चिनी, सीरियन व हिंदु लोक आहेत. १९१६ त १८१ हिंदु होते. १९०५ सालीं येथील संपत्ति माणशीं २९२ पौंड होती. खाजगी आणि सार्वजनिक संपत्ति २७ पौंड आहे.

व्यापार.— आस्ट्रेलिया, संयुक्तराज्य, संयुक्तसंस्थानें, हिंदुस्थान, फिजी बेटें वगेरेंशीं व्यापार चालतो. १९२१ सालीं आयात-निर्गतीचे आंकडे अनुक्रमें १५६५८५०२ आणि १३१९६५१४ पौंड असे आहेत. लोंकर, शेळ्या, व गोठलेलें मांस बाहेर देशीं पाठवितात. ताग देखील बाहेर जातो.

खनिजपदार्थ.— सोनें, कौरीडिंक, कोळसा, रुपें, पेट्रोलियम, संगमरवरी (मार्बल) , व इतर इमारती दगड, तांबें, लोखंड, शिसें, जस्त, अँटिमनी, क्रोम व मँगनीज हीं खनिज द्रव्यें येथें सांपडतात.

उद्योगधंदे.— मांस गोठणें; कातडें कमावणे, व लोंकर कातणें व ताग बनविणें, बूट व जोडे तयार करणें, लोंकरीचें कापड व कपडे बनविणें; लोणी व चक्का दहीं काढणें, दारूच्या भट्ट्या लावणें, छापखाने; लोखंडाचे कारखाने; शेतकीचीं आउतें; व यंत्रांचीं दुकानें; साबण व मेणबत्त्या यांचे कारखाने; गाड्या बांधणें व सामान बनविणें हे येथील धंदे आहेत. १९०६ ते १६ च्या दरम्यान सुमारें ४६७० कारखाने होते व त्यांतून ६० हजार लोक कामाला होते.

राज्यव्यवस्था.— न्यूझीलंडची वसाहत प्रथमपासून एका मध्यवर्ती सत्तेच्या ताब्यांत नव्हती. सहा निरनिराळ्या वसाहती (ऑकलंड, वेलिंग्टन, नेल्सन, न्यूप्लायमाऊथ, कँटरबरी, व ओटागो)  येथें होत्या. १८५२ सालच्या कायद्यान्वयें यांचे निरनिराळे प्रांत बनविण्यांत आलें. प्रत्येक प्रांतांत कौन्सिल व सुपरिन्टेंडेन्ट नेमण्यांत आले व सर्वांत एकच वसाहतीकायदा सुरू केला. १८७६ सालीं ही पद्धति रद्द करण्यांत आली. सार्वजनिक सभा, गव्हर्नर, कायदे करणारें कौन्सिल व प्रतिनिधि मंडळ यांची बनलेली असते.गव्हर्नरची नेमणूक स्वत:राजा करतो; परंतु त्याचा पगार वसाहतीस द्यावा लागतो. कायदेकौन्सिलच्या सभासदांची नेमणूक सात वर्षाकरितां गव्हर्नर कौन्सिलच्या मदतीनें करतो; यांची संख्या ४५ असते. मतदार लोकांनीं निवडलेल्या ८० सभासदांचें प्रतिनिधिमंडळ बनलेलें असतें. दोन्ही मंडळांच्या सभासदांनां पगार मिळतो. या मंडळाची मुदत तीन वर्षांची असते. गव्हर्नर जेव्हां ही सभा बरखास्त करतो तेव्हां पुन्हां निवडणूक होते. प्रतिनिधिमंडळाचे चार सभासद मेओरी लोकांनीं निवडलेले त्यांच्या जातीचे असले पाहिजेत. राज्यकारभार पार्लमेंटरी राज्यव्यवस्थेच्या धोरणावर चालतो इंग्लंडमध्यें येथील एक प्रतिनिधि हायकमिशनर असतो. स्थानिक कारभार स्थानिक लोकनियुक्त संस्था पाहतात. यांनां कर बसविण्याचा अधिकार असतो. जकात, स्टँप, जमीनमहसूल, प्राप्तीवरील व दारूवरील कर, टपाल व तारखातें यांचें उत्पन्न, रेल्वे-उत्पन्न, सरकारी जमिनीच्या विक्रीचें उत्पन्न व त्यांचा महसूल या उत्पन्नाच्या बाबी आहेत.

शिक्षण.— १८७७ च्या शिक्षणाच्या कायद्यानें शिक्षण सात व तेरा वर्षांच्या दरम्यान वयाच्या मुलांकरितां मोफत, व सक्तीचें केलें आहे. शाळांत हजर असलेल्या मुलांच्या सरासरींतील प्रत्येक मुलामागें कांहीं ग्रँट देण्यांत येते, प्राथमिक शाळांतून दुय्यम शिक्षणाच्या शाळेकरितां व शिक्षक तयार करण्याच्या शाळांत, शिष्यवृत्त्या देण्याकरितां देणग्या ठेविल्या आहेत. सार्वजनिक जमिनी मोठ्या प्रमाणावर प्राथमिक व दुय्यम प्रतीच्या, व विश्वविद्यालयांतील शिक्षणाकरितां राखून ठेविल्या आहेत. विद्यार्थ्याच्या पालकांच्या स्कूलकमिट्यांनीं निवडलेल्या प्रांतिक शिक्षणबोर्डाच्या ताब्यांत सर्व प्राथमिक शिक्षणाच्या व कांहीं दुय्यम प्रतीच्या शिक्षणसंस्था असतात. एतद्देशीय खेड्यांत सुद्धां शाळा स्थापिल्या आहेत. शिवाय धंदेशिक्षण अनाथाश्रम, बहिरे, मुके व आंधळे यांच्याकरितां शाळा आहेत. न्यू-झीलंडचें विश्वविद्यालय परीक्षा घेतें आणि पदव्या देतें. या पदव्या ब्रिटिश साम्राज्यांतील विश्वविद्यालयांच्या पदव्यांप्रमाणें ब्रिटिश राज्यांत मानल्या जातात. ऑक्लंड, वेलिंग्टन, ख्राइस्टचर्च, ड्युनेडिन व नेल्सन येथें विद्यालयें आहेत. धर्मासंबंधीं ढवळाढवळ सरकार करीत नाहीं. मुलें आपआपल्या पंथाच्या धार्मिक शाळांत रविवारच्या शाळांतून धर्मशिक्षण घेतात. सरकार सालींना सुमारें ३५०० पौंड हस्तकला व धंद्यांच्या शिक्षणाकरितां खर्च करतें. इंजिनियंरिग व कृषिकर्म यांचीं दोन विद्यालयें युनिव्हर्सिटी कॉलेजला जोडलीं आहेत, व खाणीचें काम शिकविण्याच्या शाळा इतर कित्येक आहेत. खाजगी शाळा देखील आहेत व त्यांमधून शेंकडा १० मुलांनां शिक्षण मिळतें.

कारखान्यांत काम करणार्‍याचें वयोमान चवदा वर्षे ठरविल्यामुळें मुलांच्या शिक्षणाची सोय उत्तम झाली आहे. १९१६ सालच्या खानेसुमारीवरून पहातां शेंकडा ८३ लोक साक्षर आहेत असें दिसतें. १९१९-२० सालीं शिक्षणाप्रीत्यर्थ २५४४००० पौंड खर्च करण्यांत आले.

वृद्धवेतन.– वसाहतींत पंचवीस वर्षे राहिलेल्या व पासष्ट किंवा त्यांहून जास्त वयाच्या इसमांस सालीना १८ पौंड पेन्शन देण्याचा कायदा स. १८१८ मध्यें करण्यांत आला. पेन्शनर, गरीब ब्रिटिश रहिवाशी असून गुन्हेगार अथवा इतर कोणत्याहि प्रकारें वाईट चालीचा इसम नसला पाहिजे. पुढें हे पेन्शन सालीना २५ पौंड झालें.

इतिहास.– न्यूझीलंडमध्यें मनुष्यांची वसाहत केव्हां झाली हें निश्चित नाहीं. चवदाव्या शतकांत पॉलिनेशियन नावाडी याच्या उत्तर किनार्‍यावर कित्येकदां आले. १६४२ त हे लोक साउथ बेटांत पसरले होते. १३७ वर्षांनी कुक यानें या किनार्‍याची बरीच माहिती मिळविली. हा देश ब्रिटिश राज्यांत समाविष्ट केला; परंतु ब्रिटिश सरकारनें हें कृत्य मान्य केलें नाहीं. यानंतर फ्रेंच, रशियन, स्पॅनिश व अमेरिकन नाविक सील, देवमासे पकडणारे व ताग व सागवान यांचा शोध करणारे व्यापारी आले. स. १८१४ मध्यें इंग्लिश मिशनरी आले. परंतु स. १८३९ पर्यंत शांतता व ख्रिस्ती धर्म यांची भरभराट झाली नाहीं. वेकफील्ड यानें न्यूझीलंड ब्रिटिश राज्यास जोडलें जाण्याबद्दल निष्फळ प्रयत्‍न केला व अखेरीस पैसे देऊन जमिनी खरेदी करण्याचा व वसाहतवाल्यांस एका जहाजांत न्यूझीलंडमध्यें पाठविण्याचा बेत केला. फ्रेंच सरकार फ्रेंच कंपनी न्यूझीलंडला पाठविणार आहे हें वर्तमान ऐकल्यावर ब्रिटिश सरकारनें नाइलाजानें कॅप्टन हॉबसनला न्यूझीलंड शांततेनें खालसा करण्याकरितां पाठविलें. १८४० सालीं येथें येऊन हॉबसननें एतद्देशीय नायकांनां त्यांचें राज्य त्यांच्याकडे कायम ठेवण्याचें आश्वासन देऊन ब्रिटिश वर्चस्वाखालीं आणिलें. त्या बेटांवर युनियन जॅक उभारलें. फ्रेंच कंपनी मागाहून आली. परंतु नाइलाजानें ते ब्रिटिश प्रजाजन बनले. वेकफील्डचे वसाहतवाले न्यूझीलंड कंपनीपासून जमिनी विकत घेतल्या म्हणून स्वामित्वाचा हक्क सांगूं लागले. परंतु त्यांचे हक्क ब्रिटिश सरकारनें कबूल केले नाहीत. ऑकलंड वसविल्यानंतर हॉब्सन मेला. याच्या मागून फिड्झरॉय आला व एका एतद्देशीय लढाईंत गुंतला. अखेरीस ग्रेला पाठविण्यांत आलें. यानें गोरे व एतद्देशीय पिंगट वर्णाच्या लोकांमध्यें समतोलपणा राखला व वसाहत करण्याकरितां साउथ बेट व इतर पुष्कळ जमीन विकत घेतली.

१८५२ सालीं इंग्लंडनें याला स्वराज्य दिलें व बरीच ओरड झाल्यावर स. १८५६ मध्यें पूर्ण पार्लमेंटरी पद्धत व जबाबदार मंत्रिमंडळें स्थापण्यांत आलीं. यानंतर वीस वर्षांच्या राजकीय इतिहासांत दोन मुख्य गोष्टी घडून आल्या. पहिली, ऑकलंड अथवा वेलिंग्टन येथील मध्यवर्ती सरकार व प्रातिक सरकार यांच्यामधील लढे व दुसरी, जातिविषयक लढाई या होत. एतद्देसीय लोक हुषार व शूर होते व जमिनी विकण्याच्या विरुद्ध त्यांनीं एक संघ करून उरलेला साउथ बेटाचा भाग आपणाकरितां राखण्याचा व आपला एक राजा स्थापण्याचा निश्चय केला. स.१८७१ नंतर मेओरी लोकांनीं लढाई थांबविली व वसाहतवाले सुद्धां लढाईला कंटाळून जाऊन समेट करण्याचे उपाय योजूं लागले, व त्यांनीं मेओरी लोकांचे प्रतिनिधी पार्लमेंटात घेतले. बाकीचा समेट एतद्देशीय धोरणी मंत्री सर डोनाल्ड मॅक्लीन यानें घडवून आणला. बारा वर्षांनंतर रस्ते बांधणें, हत्यारें काढून घेणें वगैरे उपायांनीं उत्तर बेटांतील वसाहतीचें काम पुन्हां सुरू झालें. ग्रे वसाहतीच्या प्रधानाशीं भांडला. त्याची नोकरी स.१८६८ मध्यें संपली. याच्या मागून बोवेन, फर्ग्युसन, रॉबिनसन हे आले व यांनीं शांततेनें व पद्धतशीरपणें गव्हर्नरचें काम केलें. देशांतील हवा चराईस अनुकूल असल्यामुळें वसाहतवाले जंगल जाळून त्या जमिनींत इंग्लिश गवताची लागवड करीत व शेळ्या पाळीत. हा धंदा फार किफायतशीर ठरला. पुढें सोन्याच्या खाणी सापडल्या. लोंकर, सोनें उत्पन्न करणें हेच प्रमुख धंदे बनले. सोनें सांपडल्यामुळें पुष्कळ लोक खाणीच्या कामाकरितां आले व येथेंच कायम राहिले. स. १८७० मध्यें शांतता पूर्णपणें स्थापित झाली नव्हती; धंदे ऊर्जितावस्थेला आले नव्हते. याच वेळेस व्हेगेल नांवाच्या फडणविसानें १० लक्ष पौंडाचें कर्ज काढून रेल्वे बांधणें व जमिनी खरेदी करून नवीन वसाहतवाल्यांस  देणें या कामीं खर्च करण्याचें सुचविलें. प्रथम या धोरणानें कांहीं भरभराट झाली. परंतु स. १८७९ मध्यें लोंकर व गहूं याचे भाव कमी झाले व सोळा वर्षेपर्यत आपत्ति ओढविली. यानंतर भरभराटीचीं आठ वर्षे गेली शांतता, रेल्वे, तारायंत्रे (यूरोपशीं तारेचें दळणवळण)  शेतकी यंत्रें व मोठी लोकसंख्या यांमुळें न्यूझीलंडची मूळची स्थिती अजीबात पालटली. १८७६ सालीं प्रांतिक सरकार व लहान सत्ताहीन स्थानिक संस्था यांच्यामध्यें विभागण्यांत आली. मेओरी लोकांची लढाईहि थांबली होती. यामुळें संपत्ति व उदारमतवाद्यांचें राजकारण यांमध्यें लढे सुरू झाले. ग्रे हा उदारमतवादी मुत्सदी होता. इ. सन १८७७ मध्यें मोफत, सक्तीचें आणि धर्मसंबंधीं ढवळाढवळ न करणार्‍या शिक्षणाची व्यवस्था करण्यांत आली. राष्ट्रसंपत्ति ही सरकारी अधिकार्‍यांच्या हातांत दिलेली सार्वजनिक ठेव आहे. जनतेला चौकशी करण्याचा अधिकार देणारा कायदा व सरकारनें काढलेली सार्वजनिक आयुष्यांच्या विम्याची संस्था, या दोन गोष्टींवरून येथील समाजसुधारणावाद्यांच्या मतांचा कल कोणीकडे होता हें स्पष्ट दिसत होतें. ग्रे चांगला फडणवीस व लोकनायक ठरला नाहीं. व त्यानें बसविलेल्या जमीनीवरील करानें शेतकरी घाबरले. स. १८७९ च्या सांपत्तिक आपत्तीमुळें खजिना रिक्त झाला. ग्रेला जागा सोडावी लागली व जॉन हॉल व हॅरी एटकिन्सन यांनीं कारभार हातीं घेतला.ठोकळमानानें स. १८७९ ते १९०८ पर्यतच्या या वसाहतीच्या औद्योगिक व राजकारणाच्या इतिहासाचे दोन भाग करतां येतील. सोळा वर्षाच्या आपत्तीनंतर स. १८९५-१९०८ पर्यत समृद्धतेचीं तेरा वर्षे गेलीं. पुराणमतवादीपक्षाच्या हातीं बारा वर्षे सत्ता राहिल्यानंतर उदारमतवाद्यांनीं सतरा वर्षे सत्ता धारण केली. १८८० मध्यें राष्ट्रीय कर्ज २५०००००० पौंड होतें. प्राप्तीवरील जबर कर व स. १८७९ मध्यें कांहीं काळपर्यत जकातीचे वाढविलेले कर या उपायांनीं सापत्तिक समता कायम ठेवण्यांत आली. याशिवाय पगार व रोजमुरे १/१० नें कमी करण्यांत आले होते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर देखील वाढविण्यांत आले स. १८८९-१८९० मध्यें मुख्य राजकारणी पुरुष सर हॅरी एटकिन्सन हा होता. जॉन बॅलन्स याच्या अधिपत्त्याखालीं प्रागतिक पक्षानें एटकिन्सनची पिच्छेहाट केली. १८९३ पर्यत (या सालीं बॅलन्स मेला)  एटकिन्सनचें दूरदर्शी सांपत्तिक धोरण चालविलें मजूरसंघांनीं स. १८९० च्या सार्वजनिक निवडणूकींत मजूरपक्षाचे मेंबर निवडून दिले. बॅलन्सनें कांहीं राजकारणसुधारणा व सामाजिक प्रयोग केले. बॅलन्सच्या नंतर रिचर्ड सेडन स्थानापन्न झाला. बायकांनां मत देण्याचा अधिकार देणारा कायदा यानें स. १८९३ मध्यें पास केला. शिवाय, १८९३ मध्यें दारूच्या नियंत्रणाचा कायदा स. १८९४ मध्यें वसाहतवाल्यांस आगाऊ कर्ज देण्यासंबंधीं कायदा व भांडवलवाले व मजूर यांसंबंधीं कायदे पास करण्यांत आले. १८९५ त नोकरनोंदणीच्या कचेर्‍यांसंबंधीं कायदा करण्यांत आला व वसाहतीच्या किनार्‍यावरील व्यापार करणार्‍या जहाजांच्या मालकांस स. १८९७ त वसाहतींतील मजुरीच्या दराप्रमाणें मजुरी द्यावयास लावली. इतक्यांत औद्योगिक समेट व मध्यस्थितीचा कायदा करण्यांत आला. स. १८९८ मध्यें म्हातार्‍या लोकांनां पेन्शनें देण्याचा कायदा पास झाला. स. १८९९ मध्यें अपघाताच्या विम्यांचीं व आगीच्या विम्यांचीं सरकारी ऑफिसे स्थापण्यांत आलीं. स. १८९९ मध्यें बोअर लढाई उपस्थित झाल्यामुळें न्यू-झीलंड रहिवाश्यांनीं मातृदेशाला सैन्याची मदत केली. १८९५ सालीं व्यापाराची अभिवृद्धि होऊं लागली. गुरें पाळणें, सोनें खणून काढणें, गोठलेलें मांस व दुभतें यांची नीट व्यवस्था हीं व्यापारवृद्धचीं कारणें होतीं. स. १८७९-१९०८ या काळांत सात गव्हर्नर व दोन प्रधानमंडळें झालीं. देशांत, बाहेर देशाच्या लोकांनां येण्याची मनाई करणारा कायदा राजानं पास केला नाहीं.
  
१८९७, १९०३ व १९०७ या सालीं लंडन येथें भरलेल्या साम्राज्य-परिषदेंत न्यू-झीलंडचे मुख्य प्रधान हजर असल्यामुळें वसाहतीचा साम्राज्याशीं फारच निकट संबंध जडला.

अर्वाचीनइतिहास.— १९०६-१२ सालीं वॉर्डचें प्रधान मंडळ अधिकारारूढ होतें. या प्रधानमंडळाच्या अमदानींत लँडसेटलमेंट, फायनॅन्स अ‍ॅक्ट, पब्लिकडेट एक्सिंक्शन अ‍ॅक्ट, नॅशनल प्रॉव्हिडंट अ‍ॅक्ट, लायसेन्सिंग अ‍ॅमेंडमेंट अ‍ॅक्ट, वुइडोज पेन्शन अ‍ॅक्ट इत्यादि लोकोपयोगी कायदे पसार झाले. पण या सर्वांत प्रमुख कायदा म्हणजे सक्तीचें लष्करी शिक्षण सुरू करण्याचा होय. जर्मनीनें आपलें आरमार वाढविण्यास सुरवात केल्यामुळें इंग्लंडला आपल्या आरमारी वर्चस्वाच्या शाश्वतीबद्दल भीति वाटूं लागली होती, व त्यामुळें इंग्लंडला आपले आरमार वाढविण्याची काळजी उत्पन्न झाली. न्यूझीलंडनें, वसाहतीसाठीं एक क्रूझर बांधण्यासाठीं परवानगी मिळविली व १९१२ सालीं हें काम सुरू झालें. सक्तीच्या लष्करी शिक्षणाची एक योजना तयार करण्यांत येऊन ती १९१० सालीं पसार झाली. याच सुमारास लॉर्ड किचनेर हा न्यूझीलंडमध्यें आला होता. त्यानें २० हजार सैन्य उभारण्याची न्यूझीलंडला शिफारस केल्यामुळे त्या अर्थाचा नवीन कायदा पसार करण्यांत आला. १९१३-१४ सालीं खडे सैन्य ५७८, टेरिटोरियल्स २५९०२, सीनीयर कॅडेटस् २५६५९ व लष्करी खात्यावरील खर्च ५१९२९४ पौंड होता.

१९११ सालीं नवीन निवडणुकीला सुरवात झाली. यावेळीं देशांत लिबरल, लेबर, रिफॉर्मर व इंडिपेंडन्ट असे चार पक्ष होते. लिबरल पक्षाच्या लोकांनां मान्य होण्यासारखा कोणताच कार्यक्रम नसल्यानें व त्यांच्या २१ वर्षांच्या राज्यकारभारांत पक्षपातीपणा दिसून येऊं लागल्यानें लोकांनां रिफॉर्मर पक्षाची सरशी व्हावी असें वाटूं लागलें होतें. लेबर उर्फ मजूरपक्षहि लिबरल पक्षापासून स्वतंत्र झालेला होता. व लिबरल पक्षाविरुद्ध त्यानें मोहीम चालविली होती. यामुळें नव्या निवडणुकींत लिबरल पक्षाचा जरी पराभव झाला नाहीं तरी सरशीहि झाली नाहीं. लिबरल व रिफॉर्म पक्षाचे सारखेच लोक निवडून आले. त्यामुळें अद्यापिहि लिबरल पक्षच अधिकारुढ राहिला. वॉर्डनें मात्र प्रधानकीचा राजीनामा दिला व त्याच्या जागीं मॅकेंझी हा प्रधान निवडून आला. पण पार्लमेंटच्या पहिल्या बैठकींतच लिबरल पक्षाचा पराभव होऊन प्रधानमंडळाला राजीनामा देणें भाग पडलें व त्यामुळें मॅसी या रिफॉर्म पक्षाच्य पुढार्‍यानें आपलें प्रधानमंडळ बनविलें.

रिफॉर्म पक्षाच्या अमदानींत शासनघटनेंत बरेच फेरफार करण्यांत आले. मतदानपद्धतीचें संकुचित स्वरूप नाहींसे करून तिला व्यापक स्वरूप देण्यांत आलें पण सर्वांत महत्त्वाचा जो जमिनीचा प्रश्न तोहि या प्रधानमंडळानें चांगल्या तर्‍हेनें निकालांत काढला. वॉर्डच्या प्रधानमंडळानें पूर्वीची कायमधारापद्धति नाहींशी करून त्या जागीं मुदतबंदीची पद्धत अंमलात आणली होतीं ६६ अगर ९६ वर्षाच्या करारानें शेतकर्‍यांनां जमीन द्यावयाची व तेवढी मुदत संपल्यानंतर जमिनीला जो तत्कालीन दर येईल त्याप्रमाणें खंडानें द्यावयाची पद्धत वॉर्डच्या प्रधानमंडळानें पाडली. पण ही पद्धत सरकारी जमिनीला लागू नव्हती, हा त्यांतील दोष होता. तो मॅसीच्या प्रधानमंडळानें काढून टाकला.

पण याच सुमारास मजूरपक्षामध्यें असंतोष माजला होता. मजुरांची गार्‍हाणीं ऐकून ती दूर करण्यासाठीं १८९४ सालीं जें लवादकोर्ट नेमण्यांत आलें होतें त्याचा पक्षपात मजुरांच्या नजरेस येऊं लागल्यामुळें हें लवादकोर्ट मोडण्यांत यावें अशा प्रकारचें गार्‍हाणें मजुरांनीं गाण्यास सुरवात केली होती. न्यूझीलंड ‘फेडरेशन ऑफ लेबर’ ही संस्था या मजुरांच्या मागणीला विरुद्ध होती. त्यामुळें तींतील काहीं मंडळी फुटली. वैही येथील खाणीवाल्या लोकांच्या संघानें आपली स्वतंत्र संस्था स्थापून ती रजिस्टर करून घेण्याचा या सरकारजवळ हट्ट धरला व तो पुरा करून घेतला. त्यामुळें फेडरेशन ऑफ लेबर संस्थेनें संप पुकारला, पण तो यशस्वी झाला नाहीं. पण १९१३ च्या आक्टोबर महिन्यांत पुन्हां दि वेलिंग्टन वॉटर साईड वर्क्स यूनियननें संप केला; पण तोहि थोड्याशा प्रयासानें कां होईना मिटविण्यांत आला.

महायुद्ध:-- इंग्लंडनें जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारल्याची बातमी न्यूझीलंडमध्यें पसरतांच न्यूझीलंडमध्यें सर्वत्र उत्साहच दिसून आला. स्वयंसेवकांचीं पथकेंच्या पथकें उभारलीं गेलीं. पार्लमेंटनें महायुद्धासंबंधीचीं १३ बिलें मंजूर केलीं. त्यांपैकीं महत्वाचीं बिलें म्हणजे बँक नोट्सनां मान्यता देणें, निर्गतीला बंदी करणें, मजूरविषयक कायद्यामध्यें फेरफार करणें, हीं होत. याशिवाय वॉर रेझोल्यूशन अ‍ॅक्ट नांवाच्या बिलान्वयें, गव्हर्नर जनरलला न्यूझीलंडच्या संरक्षणार्थ व महायुद्ध चालू ठेवण्यास लागेल ते उपाय योजण्याची परवानगी मिळाली. महायुद्धाच्या गडबडीमुळें, पक्षभेदाला ओहोटी लागली. पुढें थोडक्याच दिवसांनीं जी पार्लमेंटरी निवडणूक झाली तींत रिफार्म पार्टीचा अवघ्या एका मतानें जय झाला.

महायुद्धासंबंधीची जी एक स्वतंत्र कमिटी नेमण्यांत आली होती तिच्या कामकाजामध्यें गैरव्यवस्था आढळून आल्यामुळें कमिटीविरुद्ध फार गवगवा झाला पण उभय पक्षांच्या समंजसपणामुळें तो मिटविण्यांत आला. रिफार्म पक्षाचा कारभार जनतेला समाधानकारक वाटत नव्हता तरी पण सर्वांचें लक्ष महायुद्धाकडे लागल्यामुळें तिकडे लोकांनीं फारसें लक्ष पुरविलें नाहीं. महायुद्धामध्यें जवळ जवळ ६३००० लोकांनीं स्वयंसेवक म्हणून नांवें नोंदविली होतीं. याशिवाय सक्तीनें सैन्य उभारण्याचें बिलहि मंजूर करून घेण्यांत आलें होतें. जेम्स अ‍ॅलन याच्याकडे युद्धविषयक जबाबदारीचें कार्य सोंपविण्यांत आलें होतें. त्यानें सक्तीची लष्करभरती करण्यास सुरवात करतांच मजूर चवताळले व कोळशाच्या खाणींतील मजूरांनीं १९१७ सालीं संप पुकारला. त्यामुळें या सक्तीच्या लष्करभरतीच्या बिलांत थोडासा फरक करणें भाग पडलें. युद्धापायीं जो अतोनात खर्च होत होता. त्यामुळें न्यूझीलंडवर नवीन कर लादणें भाग पडल्यामुळें वॉर्डनें कोणते कर लादण्यांत यावेत यासंबंधीचें एक बिल पुढें आणलें. जमीनीवर कर वाढविण्यांत आला. सालीना ३०० पौडांवर ज्यांचें उत्पन्न होतें त्यांच्यावर इन्कमटॅक्स बसविण्यांत आला. जकात, पोष्ट, रेल्वे यांचे दर वाढवण्यांत आले. अशा रीतीनें १९१८-१९ सालीं न्यूझीलंडचें वार्षिक उत्पन्न १,३८,०१,६४३ पौंड होतें. याशिवाय खास, लडाईला लागणारा खर्च भागविण्यासाठी निरनिराळ्या राष्ट्रांतून कर्ज काढण्यांत आलें. १९२० सालीं न्यूझीलंडचें राष्ट्रीय कर्ज २०१,१७०,७५५ पौंड होतें.

१९२१ सालीं न्यूझीलंडमधील आयात-निर्गतीचे आंकडे अनुक्रमें १५६५८५०२ व १३१९६५१४ पौंड होते.

महायुद्धाच्या अमदानीमध्यें, वॉरपेन्शन्स अ‍ॅक्ट, डिश्चार्ज्ड सोल्जर्स सेटंलमेंट अ‍ॅक्ट्स इत्यादि कायदे करण्यांत येऊन युद्धामधील जखमी व नालायक झालेल्या माणसांची तरतूद करण्यांत आली. धान्यासंबंधीचे नियमहि करण्यांत आले.

शांततापरिषदेच्या बैठकीला हजर राहण्याकरितां मॅसी व वॉर्ड हे गेले होते ते १९१९ सालीं परत आले. न्यूझालंडमध्यें येतांच वॉर्ड यानें राजीनामा दिला. त्यामुळें मॅसीला नवीन निवडणूक होईपावेतों आपलें मंत्रिमंडळ बनवावे लागलें. मॅसीपुढें अनेक अडचणी उभ्या होत्या. लिबरल पक्ष त्याच्यामागें हात धुवून लागला होता. मजूरपक्षानें आपली स्वतंत्र संघटना केली होती तरी पण मॅसीनें या सर्वांनांहि तोंड दिलें १९१९ सालीं जी निवडणूक झाली तींत रिफार्म पक्षालाच सर्वांत अधिक मतें मिळालीं. त्यामुळें पुन्हां मॅसी हाच प्रधान झाला. पण मजूरपक्ष हा मजूरपक्ष हा पराभवामुळें चिडून जाऊन मॅसीच्या कारभाराला अधिकाधिक विरोध करूं लागला. निरनिराळ्या मजूरसंस्थांनीं संप पुकारल्यामुळें. न्यूझीलंडमध्यें माल कमी तयार होऊं लागला. व त्याचा विपरीत परिणाम होऊं लागला. तेव्हां मॅसीनें सर्वपक्षीय परिषद बोलावून, कसाबसा समेट घडवून आणला. मजूरांचें दैनिक वेतन वाढविण्यांत आले, व त्यांनां बर्‍याच सवलती देण्यांत आल्या.

याच सुमारास प्रिन्स ऑफ वेल्सनें न्यूझीलंडला भेट दिली. त्यामुळें इंग्लंड व न्यूझीलंड यांमधील संबंध दृढतर झाला. १९२० सालीं मॅसीनें आपलें नवीन मंत्रिमंडळ बनविलें. त्यानें आरमारीखात्यांत सुधारणा करण्याचें ठरविलें. याच संधीस ग्रेटब्रिटनच्या आरमारीखात्याचा सेनापति जेलीको यानें न्यूझीलंडला भेट दिली, व त्यानें इंग्लंड व ऑस्ट्रेलेशिया या राष्ट्रांनीं मिळून पूर्वेकडील भागांत मोठें आरमार ठेवावें अशी एक योजना प्रसिद्ध केली. त्या योजनेप्रमाणें ‘न्यूझीलंड डिव्हिजन ऑफ दि रॉयल नेव्ही’ नांवाचें आरमारी सैन्य उभारण्यांत आलें.

[ संदर्भग्रंथ:-- राईट अँड रीव्हज-न्यूझीलंड (१९०८); रॉबर्ट मॅकनव– हिस्टोरिकल रेकार्डस् ऑफ न्यूझीलंड; शोले फील्ड– न्यूझीलंड इन एव्होल्यूशन (१९०९); कोवन– दि मेओरिस ऑफ न्यूझीलंड (१९११); पार्क– दि जीओलजी ऑफ न्यूझीलंड (१९१०); कॉकेन– न्यूझीलंड प्लँट्स अँड देअर स्टोरीज (१९१०); बाँफोर्ड दि कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी अँड लॉ ऑफ न्यूझीलंड (१९१४); रसेल– न्यूझीलंड टुडे (१९१९); रॉसीग्नॉल अँड स्टेवर्ट– स्टेट सोशियालिझम इन न्यूझीलंड (१९११). ]

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .