प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें

नौकानयन— नौकानयनाचा महत्वाचा भाग जो आरमार त्याचें स्वतंत्र विवेचन त्या नांवाखालीं सांपडेल या ठिकाणीं नौकानयनाचा इतिहास देण्याचें योजिलें आहे.

पौरस्त्य नौकानयन

भारतीय.— भारतीय नौकानयनाचा थोडक्यांत इतिहास “ आरमार ”  या लेखांत (वि. ८. पृ. २५३-५४) दिला आहे.

पाश्चात्य नौकानयन

प्रारंभीचा इतिहास— व्यापारी जहाजांच्या दळणवळणाचा धंदा आज जो जगभर अवाढव्य वाढला आहे त्याला मूळ आरंभ अगदीं रानटी स्थितींतल्या मासेमार्‍यांच्या लांकडाचा ओंडा व वल्हें अशा साधनांपासून झाला असला पाहिजे. पुढें असलाच ओंडा पोखरून त्याचें लहानसें होडगें व त्यालाच एक कातड्याचें लहानसें शीड करण्याची युक्ति निघाली. अशा होडग्यांतून भूमध्यसमुद्राकांठच्या गांवीं समुद्रावरून जा ये करणार्‍यास व पुढें दूरवर पूर्वेकडील देशांतल्या बंदरांत जाण्यास सुरवात झाली. समुद्रकांठच्या रहिवाशांनीं स्वत:जवळचे मासे किवा मीठ देऊन त्याऐवजीं स्वत:ला लागणार्‍या दगडी सुर्‍या, थंडींत पांघरण्याकरितां कातड्यांची वस्त्रें वगैरे जिनसांची नेआण चालविली होती. समुद्रकांठीं वसाहत करून राहिलेल्या निरनिराळ्या ठिकाणच्या रहिवाश्यांमध्यें समुद्रकांठच्या वेड्यावांकड्या जमिनीवरून दळणवळण करण्यापेक्षां समुद्रांतून सरळ जहाजांतून जाणें सोईचें वाटूं लागलें; यामुळें असा जहाजांतून जा ये करणार्‍या नाविक लोकांचा एक वर्ग तयार झाला. ते स्वत: जहाजें तयार करीत असत किंवा लोकांपासून विकत घेत; लोकसंख्या वाढून त्यांच्या गरजा जसजशा वाढत गेल्या त्याबरोबर या समुद्रावरील जहाजांतून व्यापार करणार्‍या नावाड्यांची संख्याहि वाढली. अनुभवानुभवानें ते मोठमोठ्या बोटी बांधूं लागले आणि समुद्रावर दूरदूरच्या सफरी करणार्‍या मंडळ्या बनवूं लागले, व पौरस्त्य देशांपैकीं हिंदुस्थानांत अशा प्रकारच्या नौकानयनाची किती प्रगति झाली होती, याची माहिती पूर्वी दिली आहे. चिनी लोकहि प्राचीन कालापासून दर्यावरील व्यापारांत पडलेले आढळतात परंतु ते मलबार किनार्‍यापर्यंतच येत. त्यापुढील दूरच्या पश्र्चिमेकडील देशाशीं त्यांचें दळणवळण नव्हतें. मलाया व्दीपकल्पांतील लोक अगदीं प्राचीन काळापासून हिंदुस्थानाशीं व्यापार करीत असत. इतकेंच नव्हे तर आफ्रिकेच्या किनार्‍यापर्यंतहि ते जात असत. हिंदी महासागरांतून सफरी करणार्‍या लोकांमध्यें अरब हे एकेकाळीं प्रमुख होते. यूरोपांतील देशांनां नजीक असे प्राचीन काळचे अत्यंत सुप्रसिद्ध दर्यावर्दी लोक म्हटले म्हणजे फिनिशियन होत. हे बहुधा टायर व सीडॉन या दोन सुप्रसिद्ध शहरीं राहाणारे धाडसी रहिवाशी होते. २७ वा टायर एझेकील याचें समुद्रावरचें असलेलें वर्चस्व फिनिशियन लोकांच्या दर्यावर्दीपणांतील प्राविण्याची उत्तम साक्ष देतें. सालोमन राजानें जें मोठें देवालय बांधण्याचें काम हातीं घेतलें, तें फिनिशियन हिराम ह्याच्या साहाय्यामुळेंच होय. त्यानंतर बर्‍याच वर्षांनीं म्हणजे सुमारें २ हजार वर्षांपूर्वी व्यापारी दळणवळणाकरितां जहाजें सर्रास उपयोगांत येऊं लागलीं होतीं; व त्यांचा आकारहि अगदीं लहान नसे, हें पुढील गोष्टीवरून सिद्ध होतें— सेंटपॉलला रोमकडे नेणारे शभंर सैनिक मॉयरा येथें आले तेव्हां तेथें एक अलेक्झांड्रियन जहाज गहूं भरून इटलिला जावयास निघालें होतें. त्या जहाजांत गव्हासुद्धां हे सैनिक व इतर प्रवासी मिळून २७६ मनष्यें बसून गेली. समुद्रमार्गानें व्यापारी दळणवळण इतकें वाढलें होतें तरी जमिनीवरून चालणार्‍या व्यापाररूपी सांखळीचे हे केवळ कांहीं थोडेसे दुवे होते. पौरस्त्य आणि पाश्चात्य देश यांच्यामध्यें निरनिराळ्या प्राचीन काळांत निरनिराळ्या खुष्कीच्या मार्गानें हिंदुस्थानांत आणि यूरोपांत उत्पन्न होणार्‍या मालाची जी एकंदर देवघेव चालू असे, त्यासंबंधींची माहिती पूर्णपणें भारतीय आणि यूरोपीय या दोघांनांहि नव्हती. शिवाय प्राचीन काळीं बहुधा दर्यावरील जा - ये उन्हाळा संपतांच बंद पडत असे.

प्राचीन काळीं फिनिशियन लोकांनीं दर्यावरील व्यापार अधिकाधिक वाढवून अनेक बंदरांशीं संबंध जोडला, व तेथें वखारी घातल्या. केडिज उर्फ प्राचीन गेदिर हे अशापैकींच एक बंदर असून तेथून फिनिशियन लोक पुढें ब्रिटनपर्यंत जात असत. फिनिशियन लोकांचे अनुकरण करून यूरोपखंडाच्या दक्षिणेकडील बरेच देश व्यापारांत पुढें सरसावले त्यांत र्‍होडेशियन्स हे प्रमुख होते. त्यांनीं दर्यावरील व्यापारासंबंधाचें एक कायद्यांचें कोडहि तयार केलें होतें. हेच कायदे पुढें रोमन लोकांनीं आपल्या कायद्यांत अंतर्भूत केले व रोमन कायद्यांतून ते अलीकडील यूरोपीय कायद्यांत थोड्याफार प्रमाणांत समाविष्ट झाले आहेत. भूमध्यसमुद्र आणि अ‍ॅड्रियाटिक समुद्र यांमधून व्यापार करणार्‍यांत व्हेनेशियन, जिनोई आणि पिसन हे लोक पुढें भरभराटीस आले. त्यांनीं जहाजें बांधण्याच्या धंद्यांत बराच नांवलौकिक मिळविला आणि त्यांचीं जहाजें उत्तरसमुद्राकडील ब्रिटन वगैरे देशांत खपत असत. इटलीच्या मार्गानें समुद्रांतून यरुशलेमला जाणार्‍या अनेक ख्रिस्ती यात्रेकरूंमुळेंहि या नौकानयनाच्या धंद्याला पुष्कळ उत्तेजन मिळत असे.

प्राचीन काळीं उत्तर यूरोपकड़ील देशांचा परस्पर व्यापार बहुतेक खुष्कीच्याच मार्गानें चालत असे. परंतु ते लोक रानटी स्थितींतून निघून जसजसे सुधारत गेले तसतसे नद्या आणि समुद्र यांच्या मार्गानें व्यापार करण्याचे फायदे त्यांनां अधिकाधिक पटूं लागले आणि त्यांनीं निरनिराळे जलमार्ग सुधारून काढले. समुद्रावरून जाणार्‍या परस्परांच्या व्यापारी जहाजांवर शत्रुराष्ट्रांतील लोक हल्ले करीत असल्यामुळें अशा व्यापारी जहाजांवरील लोकांनां संरक्षणाकरितां युद्धसामुग्री बाळगावी लागत असे. अशा प्रकारच्या दर्यावरील व्यापारांत स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड व नेदरर्लंड हे देश प्रमुख होते. या देशांनीं हिंदुस्थान आणि नवीन शोधून काढलेलें अमेरिकाखंड येथील अनेक बंदरांशीं व्यापार सुरू केला, व हे लोक वाटेंत जातां येतांना परस्परांचीं व्यापारी जहाजें हल्ला करून लुटीत असत, व एकमेकांचे लोक कैद करीत असत. अशा कैद्यांकडून पैसे घेऊन त्यांनां सोडून देणें हा त्यावेळीं एक धंदाच होऊन बसला होता.

इंग्रजांच्या व्यापाराची वाढ:-- इंग्रजी जहाजें तांडे बनवून सफरी करीत असत. प्रत्येक ताड्यांवर अ‍ॅडमिरल नांवाचा मुख्य अधिकारी असे. जहाजांत व्यापारी मालाबरोबर युद्धसामुग्रीहि असे. त्यावेळीं इंग्लंडांत लोंकर पुष्कळ तयार होत असे व तिला दूरदूरची मागणी येत असे.  या लोंकरीच्या व्यापारानिमित्तानें इंग्रज व्यापार्‍यांचा दूरदूरच्या बंदरांशीं संबंध जडला. उलट दूरदूरचे व्यापारीहि व्यापाराकरितां इंग्लंडच्या बंदरांत येऊं लागले. लिव्हरपूल, ब्रिस्टल साउथदँप्टन व लंडन हीं त्यावेळीं प्रसिद्ध बंदरें होतीं. स्पॅनिश पोर्तुगीज लोकांनीं नवे देश व नवे जलमार्ग शोधून काढल्यावर इंग्रजांचेंहि तिकडे लक्ष गेलें, आणि इंग्लंडांतील ट्यूडर घराण्याच्या वेळीं धाडसी इंग्रज समुद्रावर दूरदूरच्या सफरी करूं लागले. इंग्लंडच्या आठव्या हेन्‍रीनें स्पेनच्या फर्डीनंड बादशहाबरोबर फ्रान्सविरुद्ध तह करून जिब्राल्टरपर्यंत जहाजांचे सरंक्षण करण्याचें काम आपल्याकडे घेतलें, आणि भूमध्यसमुद्रांतील सरंक्षणाचें काम स्पेनकडे दिलें. याप्रमाणें इंग्रजांचा दर्यावरील व्याप वाढत चालला, तथापि प्रत्यक्ष जहाजें बांधण्याचें काम इंग्लंडमध्यें होत नसल्यामुळें बाल्टिक समुद्रांतील प्रसिद्ध बंदरांतून इंग्रज व्यापारी जहाजें विकत आणीत असत. यामुळें इंग्रजांचा बहुतेक व्यापार हॅन्स शहरच्या ताब्यांत होता. परंतु एलिझाबेथच्या कारकीर्दीपासून ही स्थिती बदलून जहाजें बांधण्याच्या धंद्यास इंग्लंडनें स्वत: आरंभ केला. एलिझाबेथ राणीनें या धंद्यास उत्तेजन देण्याकरितां पुष्कळ द्रव्यसहाय्य केलें, व हॅन्सियाटिक संघाला विरोध केला. दूरदूरच्या परकी देशांत व्यापार करण्यास  सुलभ जावें म्हणून धाडसी व्यापारी मोठमोठ्या कंपन्या बनवीत आणि स्वत: राजाजवळून व्यापारासंबंधीच्या हक्कसनदा मिळवीत. इंग्लंडमध्यें अशा कंपन्यांपैकीं रशियन व्यापारी कंपनी, टर्की व्यापारी कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनी ह्या होत्या.

१६ व्या शतकाच्या मध्याच्या सुमारास अँटपर्व शहर भरभराटीच्या शिखरास पोहोंचलें होतें. तेथील बंदरांत एकेका वेळीं २५०० पर्यत जहाजें नांगरलेलीं असत. पण याच शतकाच्या अखेरीस स्पेननें हल्ला करून हें शहर उध्वस्त करून टाकलें तेव्हां तेथील बरेचसे रहिवाशी अ‍ॅमस्टरडॅम येथें रहावयास गेले. जहाजें बांधणें व दर्यावरील व्यापार, या कामांत हॉलंड देश पुढें सरसावला, पण दक्षिणेकडील दोन्ही भूशिर-मार्ग (केप रूट्स) शत्रुराष्ट्रांच्या कबजांत असल्यामुळें इंग्रज व हॉलंड या दोन्ही लोकांनीं हिंदुस्थानादि पौरस्त्य देशांस जाण्याचा जलमार्ग शोधून काढण्याचे फार धाडसाचे प्रयत्‍न केले. ध्रुवप्रदेशानजीकच्या नैसर्गिक अशक्यतेमुळें असले जलमार्ग सांपडले नाहींत, पण या प्रयत्‍नामुळें अनेक नवे प्रदेश व समुद्र यांची माहिती या लोकांना झाली व तिकडे वसाहती करण्यास त्यांनीं सुरवात केली. या वसाहतींकडे लवकरच फ्रेंचांचें लक्ष गेलें. पोर्तुगीज लोक डच लोकांनां वारंवार अडथळे करीत, व स्पॅनिश लोकांचीं जहाजें इंग्रज खलाशी लुटून फार नुकसान करीत. तथापि या सर्व दर्यावर्दी राष्ट्रांमध्यें हॉलंड सर्वात अधिक भरभराटींत होतें. अ‍ॅमस्टरडॅम येथें फार मोठा व्यापार चालत असे; १५७१ ते १६५० एवढ्या अवधींत या शहराचा विस्तार पूर्वीपेक्षा तिप्पट वाढला. पुष्कळ माल राहाणारीं मोठालीं डच जहाजें थोड्या खलाशांनां नेतां येत असत, त्यामुळें त्यांचे भाड्याचे दर हलके असत, त्यामुळें इंग्रज व्यापारी सुद्धां डच जहाजांतून आपल्या मालाची ने-आण करीत. त्यांमुळें इंग्लंडचीं स्वत:चीं जहाजें फारच कमी झालीं व इंग्रज खलाशी डच जहाजांवर नोकर्‍या करूं लागले. याप्रमाणें स. १६५० च्या सुमारास इंग्लंड नौकायनाच्या धंद्यांत फार खालावलें होतें.

नॅव्हिगेशन अ‍ॅक्ट (१६५१):-- ही स्थिति सुधारण्याकरितां नॅव्हिगेशन अ‍ॅक्ट नांवाचा कायदा पास केला. या कायद्यानें असा निर्बध घातला कीं, इंग्लंडचा किनारा व इंग्लंडच्या दूरदूरच्या वसाहती यांमध्यें चालणारा सर्व व्यापार इंग्रजांच्या मालकीच्या इंग्लिश जहाजांतून व इंग्रज खलाशांनीं चालविला पाहिजे. याशिवाय दुसरेहि कांहीं निर्बध या कायद्यानें घातले व ते हॉलंडचा व्यापार बसविण्याच्या हेतूनें घातले होते यांत शंका नाहीं. डच लोकांनींहि या गोष्टीस जोराचा विरोध केल्यामुळें उभयतांत प्रत्यक्ष युद्धें झालीं, पण त्यांत इंग्लंडच अखेर विजयी झालें. तथापि इंग्लंडला दुसरा प्रतिस्पर्धी फ्रान्स पुढें आला. रिचेल्यू व नंतर कोलबर या दोन फ्रेंच प्रधानांच्या उत्तेजनामुळें फ्रेंच लोक अटलांटिक समुद्र ओलांडून अमेरिकेंत व दूरच्या हिंदुस्थानांत व्यापाराकरितां जाऊन वसाहतीहि करूं लागले होते. स्पॅनिश राष्ट्राच्या वर्चस्वाला मात्र या सुमारास उतरती कळा लागली होती. नॅव्हिगशन अ‍ॅक्टामुळें इंग्लंडच्या जहाजांचें टनेज १६६६ पेक्षां १६८८ सालीं दुप्पट वाढलें. तथापि ही वाढ फ्रान्सला फायद्याची झाली; ती अशी कीं फ्रान्स व इंग्लंड यांच्यामधील पुढील युद्धांत फ्रान्सनें डच जहाजांच्या मदतीनें इंग्लंडचीं ३००० जहाजें कैद केलीं व उलट इंग्लंडनें फक्त ६७ फ्रेंच जहाजें पकडलीं. यावेळी इनव्हर्नेस हें शहर जहाजें बांधण्याच्या धंद्यांत फार प्रसिद्धीस आलें होतें.

१७०१ सालीं इंग्लंडचीं ३२८१ जहाजें २६१२२२ टन भरताडाचीं असून त्यांवर ५६६० तोफा होत्या. एकट्या लंडन शहराचीं ५६०, ब्रिस्टलचीं १६५ आणि लिव्हरपूलचीं फक्त १०२ जहाजें होतीं. यानंतर केवळ तीस वर्षांनीं लंडनच्या जहाजांची संख्या १४१७ वर गेली, त्यांचें भरताड १५ ते ७५० टनपर्यंत होतें, तथापि त्यांपैकीं निम्म्याहून अधिक २०० टनांहून कमी वहनशक्तीचीं होतीं. १७६५ च्या एका लेखांत असा उल्लेख आहे कीं डच, डॅनिश व स्वीडिश हीं जहाजें इंग्लिश जहाजांपेक्षां मोठीं असून त्यांनीं लिस्बनचा भूमध्यसमुद्रांतील सर्व व्यापार इंग्रजांच्या हातून आपल्या हातीं घेतला. स. १७१४ पासून समुद्रावरून पर्यटन करीत असतां रेखांश बरोबर समजण्याची युक्ति काढणारास बक्षिसें देण्याचें जाहीर करण्यांत होतें, त्यांपैकीं २० हजार पौडांचें एक बक्षीस जॉन हॅरिसन यानें क्रॉनॉमीटर यंत्र तयार करून मिळविलें. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धांत इंग्लंडांत उत्तरेकडील मोठाल्या सरोवरांच्या कांठच्या प्रदेशांत जहाजें बांधण्याच्या धंद्याचा मूळ पाया घातला गेला. परंतु जहाजांनां लागणार्‍या ओक नांवाच्या लांकडांचा पुरवठा भरपूर होईना. शिवाय ब्रिटिश जहाजांची संख्या वाढल्यामुळें इंग्रज खलाशीहि पुरेसे मिळेनात म्हणून नॅव्हिगेशन अ‍ॅक्ट दुरुस्त करून इंग्रज खलाशांच्या संख्येच्या तीन चतुर्थांशपर्यंत परकी खलाशी ब्रिटिश जहाजांवर नोकर ठेवण्यास परवानगी देण्यांत आली. निग्रोंनां गुलाम बनवून अमेरिकेंत नेण्याचा व्यापार सुरू झाल्यामुळें त्यांपैकीं बरेंच काम ब्रिटिश जहाजांना मिळूं लागलें. पुढें युनायटेड स्टेट्सच्या बरोबरच्या युद्धांत ब्रिटीश व्यापारी जहाजांस अमेरिकन जहाजांनीं बराच त्रास दिला आणि युद्धसामुग्रीच्या वाहतुकींत पुष्कळ जहाजें गुंतल्यामुळें लंडन बंदरांत मालाची ने-आण करणारीं बरींच परकी जहाजें दिसूं लागलीं. याच सुमारास दूरदूरच्या वसाहतींबरोबरचा व्यापार हातीं रहावा म्हणून निरनिराळ्या राष्ट्रांच्या जहाजांची परस्परांत मोठी झटापट होत असे. अशा उद्देशानें युद्धसामुग्री जवळ बाळगून संचार करणारीं त्यावेळीं खाजगी व्यापार्‍यांचीं पुष्कळ जहाजें असत. त्यांत फ्रेंचांचें ‘ बोर्डेले ’ नांवाचें एक जहाज प्रसिद्ध असून त्यानें चार वर्षात १६४ परकी जहाजें हस्तगत केलीं होतीं. नेपोलियनबरोबरच्या युद्धाच्या वेळीं हें प्रमाण फारच वाढलें व सन १८१५ सालच्या सुमारास लिव्हरपूल, ग्लासगो इ.ठिकाणच्या व्यापार्‍यांनीं ब्रिटीश आरमारखातें व सरकार यांच्याकडे व्यापारी जहाजांच्या संरक्षणाविषयी अधिक तजवीज करण्यासंबंधानें जोराची मागणी सुरू केली. उलटपक्षीं चोरटा व्यापार फार चालू असल्यामुळें सरकारचें आर्थिक नुकसान होतें अशी सरकारतर्फे १७६० सालापासून पुष्कळ वर्षे मोठी तक्रार होती.

लांकडी जहाजांऐवजीं लोखंडी जहाजें होऊं लागल्यापासून जहाजांत माल पूर्वीपेक्षां दुप्पट जाऊं लागला. जहाजांची वहनशक्ति मोजण्याचा ट्रेडबोर्डानें नवा नियम ठरविला. एक टन म्हणजे १०० घनफूट इतकी कायमचें आच्छादन केलेली जहाजांतील जागा अशी व्याख्या केली जहाजांत किती टन माल राहातो त्यावरून जहाजांचे टनेज ठरवीत नाहींत तथापि अजमासें हिशोब असा आहे कीं, १०० घनफूट म्हणजे एक टन या हिशोबानें जहाज जितक्या टनांचें असतें त्याच्या दुप्पट टन माल जहाजांत राहातो. असें टनेज ठरविण्याचें एक कारण जहाजावरील जकातीची आकारणी करण्याची सोय व दुसरें कारण विमा उतरलेल्या जहाजांची नुकसानभरपाई ठरविण्याचें साधन हीं आहेत तथापि रजिस्टर्ड टनेजपेक्षां पुष्कळ अधिक माल नेतां यावा म्हणून विशेष प्रकारच्या आकाराचीं जहाजें बांधण्याच्या युक्त्या निघाल्या आहेत.
    
१९ वें शतक:-- १८ व्या शतकाच्या अखेरीस वाफेच्या यंत्राच्या साहाय्यानें बोटी व जहाजें चालविण्याची युक्ती निघाल्यापासून नौकानयनाच्या बाबतींत पूर्ण मन्वंतर घडून आलें लहान नद्यासरोवरांपासून तों मोठाल्या महासागरांतून वाफेच्या बोटी वावरूं लागल्या. १८३३ सालीं  ‘ रॉयल  विल्यम ’ नांवाचें एक कॅनेडियन जहाज क्विबेकहून लंडनला १७ दिवसांत आलें. १८३८ सालीं ‘दि ग्रट वेस्टन’, ‘सिरियस’ वगैरे आगबोटी पंधरा ते अठरा दिवसांत अटलांटिक महासागराची सफर करूं लागल्या. १८४० सालीं ‘कुनार्ड स्टीमशिप कंपनी’ स्थापन झाली. या कंपनीच्या आगबोटी २०६ फूट लांबीच्या व ११४५ टन भरताडाच्या होत्या. याप्रमाणें लवकरच अटलांटिक महासागरावरील बराचसा व्यापार अमेरिकेनें आपल्या हातांत घेऊन नंतर चीनबरोबरचा व्यापारहि आपल्या ताब्यांत घेण्याचा यत्‍न सुरू केला. त्याकरितां अभूतपूर्व वेगानें चालणार्‍या आगबोटी अमेरिकेनें बांधल्या. तथापि आगबोटींत जळणाचा खर्च फार लागत असल्यामुळें शिडांच्या साहाय्यानें वार्‍याबरोबर झपाट्यानें चालणारीं साधीं जहाजें या वेळीं पॅसिफिक महासागरांत पुष्कळ होतीं आणि लांकडाऐवजीं लोखंडाचीं जहाजें बांधण्यांत अमेरिका मागें पडून इंग्लंड पुढें गेल्यामुळें पृथ्वीच्या पाठीवरील बराचसा व्यापार ब्रिटिश जहाजांच्याच हातीं राहिला.

वाफेच्या जहाजांची रहदारी फार वाढल्यावर दूरदूरच्या सफरी करणार्‍या बोटींच्या सोयीकरितां कोळसा पुरविणारी बंदरें जागजागीं बांधण्यांत आली. १८५० सालच्या सुमारास नॅव्हिगेशन अ‍ॅक्ट ब्रिटिश जहाजवाल्या मालकांच्या विरोधाकडे लक्ष न देतां रद्द करण्यांत येऊन १८५४ सालीं ब्रिटिश बंदरांत सर्व परकी जहाजांनां येण्याची परवानगी मिळाली. १८५६ सालीं पॅरिसचा तह होऊन खाजगी जहाजांवर लढाऊ सामुग्री ठेवून युद्धकालांत लुटालूट करण्याची त्यांनां असलेली परवानगी काढून घेण्यांत आली, व लवकरच फ्रान्स-इंग्लंमधील या तहावर इतर राष्ट्रांनी सह्या केल्या.

१८५८ सालीं ब्रुनेलची फारच मोठी ‘दि ग्रेट ईस्टर्न’ नांवाची आगबोट तयार झाली. हिची लांबी ६७९ फूट व वहनशक्ति १३,३४४ टन होती. या नमुन्याचीं मोठमोठीं व्यापारी जहाजें पुष्कळ तयार होऊ लागलीं. १८७३ सालीं डर्बीतर्फेचा पार्लमेंटचा सभासद सॅम्युअल प्लिमसोल याच्या मागणीवरून, जहाजांच्या नालायक स्थितीमुळें अनेक माणसें मृत्युमुखीं पडतात या तक्रारीसंबंधाची चौकशी करण्याकरितां एक सरकारी कमिशन नेमण्यांत आलें. १८७६ सालीं प्लिमसोलनें सुचविलेली दुरुस्ती मर्चंट शिपिंग अ‍ॅक्टमध्यें करण्यांत आली, यांत नालायक जहाजें सफरीवर पाठविणें फौजदारी गुन्हा ठरवून शिवाय जहाजांत ओझें किती भरावें याबद्दल प्रत्येक जहाजावर प्लिमसोल मार्क या नांवाची रेषा सरकारतर्फे मारण्यांत येऊं लागली.

१८६९ सालीं सुवेझ कालव्याचा मार्ग सुरू होऊन पौरस्त्य देशांबरोबर व्यापारी दळणवळणांत क्रांती घडून आली. या सुमारास मोठमोठ्या किंमतीचा माल बोटींतून जाऊं लागून बोटीला आग लागल्यास विमा कंपन्यांनां फार नुकसान येऊं लागलें. त्यामुळें ताबडतोब आग विझविण्याकरितां बोटीवर अग्निनाशक वायु भरून ठेवण्याच्या युक्त्या निघाल्या. गोठविलेलें मांस व नासणारा कुजणारा माल चांगल्या स्थितींत नेण्याकरितां बर्फाच्या खोल्या व उष्णतारोधक जागा वगैरे सोयी बोटीवर करण्यांत येऊं लागल्या.

जर्मनी व जपानी व्यापारी जहाजांची वाढ:-- फ्रँकोप्रशियन युद्धांत विजयी झाल्यापासून जर्मनींत उद्योगधंदे फार वाढून जगाबरोबरचा व्यापार आपल्या हातीं घेण्याची महत्वाकांक्षा जर्मन लोकांनीं धरली. निरनिराळ्या देशांतला माल स्वत: परस्पर आणवून त्याचा पक्का बनवून ते जिन्नस इतर देशांत पाटविण्याचा मोठा उद्योग जर्मनीनें सुरू केला. या व्यापारी नेआणीकरितां स्वत:च्या मोठमोठ्या बोटी बांधण्याचे कारखाने काढले. पक्क्या मालाच्या किंमती परदेशांत कमी ठेवून व मालाच्या वाहतुकीचे दर हलके ठेवून ब्रिटीश जहाजांबरोबर व ब्रिटीश मालाबरोबर मोठी स्पर्धा सुरू केली. या कामीं सरकारी आगगाड्यांचे मालावरील भाडें कमी करून तसेंच जहाजें बांधणार्‍या व माल तयार करणार्‍या कारखान्यांनां द्रव्यसाहाय्य देऊन जर्मन सरकारनें लोकांस या चढाओढींत फार मदत केली. तसेंच या सुमारास पूर्वेकडील जपान हें राष्ट्रहि व्यापारांत पुढें आले. जपानी लोकांनीं बोटी बांधण्याचे मोठमोठे कारखाने काढले व जपानसरकारनें स्वत:चें आरमार पुष्कळ वाढविलें.

यापुढें फ्रान्सनें दर्यावरील व्यापार वाढविण्याच्या बुद्धीनें व्यापारी जहाजांनां दूरदूरच्या प्रवासाच्या मानानें आर्थिक देणग्या देण्याचें ठरविलें. यामुळें फ्रेंच जहाजें वहातुकीचे दर कमी करून दूरदूरच्या सफरी करूं लागलीं. पण यामुळें परदेशी व्यपार्‍यांचें नुकसान होऊं लागल्यामुळें १९०३ सालीं पॅरिस येथें आंतरराष्ट्रीय जहाजवाल्या मालकांची सभा स्थापन होऊन तिनें पूर्वीचे वाहतुकीचे दर कायम ठेवण्याचा ठराव केला व फ्रेंच जहाजवाल्या मालकांनीं त्याला मान्यता दिली, पण देशान्तर्गत जलमार्गांवर वहातुकीच्या दरांत सवलती ठेवण्याचें त्यांनीं ठरविलें.

आगबोटीमधील चढाओढ:-- शिडांचीं जहाजें पूर्णपणें मागे पडून वाफेच्या जहाजांची रहदारी सर्वत्र सुरु झाल्यावर आगबोटींचे दोन प्रकार झाले. पहिला प्रकार ‘लायनर्सचा’ म्हणजे टपाल व पहिल्या वर्गाचे उतारू, तसेंच व्यापारी माल यांची ने-आण ठराविक ठिकाणांमध्यें नियमितपणानें करणार्‍या बोटींचा; आणि दुसरा प्रकार म्हणजे पुष्कळ भाडें मिळेल तिकडे कोळसा, लांकूड, गहूं, नायट्रेट, ज्यूट वगैरे वाटेल त्या जिन्नसांची नेआण करणार्‍या ‘सीकर्स’ किंवा ‘ट्रँप’ बोटींचा. या दुसर्‍या प्रकारच्या बोटी फार मोठाल्या असून त्यांची पहिल्या प्रकारच्या बोटींशीं नेहमीं चढाओढ चालू असे. वेळेस या ‘सीकर’ बोटी भाड्याचे दर कमीहि करीत असत, व ‘लायनर्स’ बोटीवाल्या कंपन्यांनां नुकसान सोसावें लागे. याकरितां सदरहू ‘लायनर्स’ कंपन्यांनीं व्यापार्‍यांचा मालहि सवलतीनें व नियमितपणें नेण्याचें कबूल केलें व व्यापार्‍यांनीं या कंपन्यांच्या बोटींतूनच फक्त माल पाठविण्याबद्दल बांधून घेतलें. असे करार व कट होऊं लागल्यामुळें कित्येक ‘सीकर’ बोटींनां काम मिळेनासें होऊन तक्ररी उत्पन्न झाल्या; व त्यासंबंधानें चौकशी करण्याकरितां १९०६ सालीं कमिशनहि बसलें होतें.

मोठाल्या बोटी व बंदरें:-- दुसरी गोष्ट अशी कीं, अलीकडे सर्व खंडांत लोकसंख्या जिकडे तिकडे पुष्कळ वाढून जलस्थलवाहनांचाहि प्रसार पुष्कळ झाल्यापासून मालाची उत्पत्ती व खप पुष्कळ वाढून जगावरील मोठमोठ्या बाजारपेठांत विलक्षण चढाओढ सुरू झाली आहे. जपान, जर्मनी व अमेरिका या देशांच्या मालाची हरएक देशांतील बाजारपेठा काबीज करण्याकरितां परस्परांत झटापट चालू आहे. अशा स्थितींत वहातुकीच्या कमजास्त खर्चामुळें मालाच्या किंमतींत आणा-पावआणा फेर पडला तरी तेवढ्यानें स्वस्त मालाकडे गिर्‍हाईक वळून महाग माल पडून पुकट जाण्याची वेळ येते. यामुळें दोन महत्त्वाचे परिणाम घडून आले. पहिला परिणाम अर्थशास्त्रांतील उत्पत्तीसंबंधानें असा झाला कीं, लहान प्रमाणावर उद्यागधंदे चालवून थोडक्या भांडवलावर पुष्कळ नफा मारण्याची जुनी पद्धति मागे पडून मोठ्या प्रमाणावर थोडे टक्के नफा घेऊन चालणारे मोठमोठे कारखाने सुरू झाले. शिवाय माल स्वस्त विकतां यावा म्हणून वाहतुकींचा खर्च कमींत कमी पाडण्याकरितां नव्या नव्या कल्पना काढण्यांत आल्या. त्यांपैकीं एक कल्पना, थेटच्या भरवणचिठ्यांची (‘थ्रू’ बिल्स ऑफ लोडिंग) होय; म्हणजे एकच बोट-कंपनी किंवा रेल्वेकंपनी उत्पत्तिस्थानापासून थेट दूर देशच्या बाजारपेठेंत माल नेऊन पोंचविण्याचें पत्करूं लागली. मध्यंतरीच्या अनेक कंपन्यांच्या बोटींतून किंवा आगगाड्यांतून माल नेण्याची  व्यवस्था मूळ करारबद्ध कंपनीच करते; यामुळें एकंदरीनें कमी भाडेखर्चांत माल जाऊं शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे एका खेपेंत पुष्कळ माल नेतां यावा म्हणून बोटी मोठमोठ्या बांधणें ही होय. दोन लहान बोटींतल्या इतका माल एका मोठ्या बोटींत जाऊं लागल्यास खलाशी व इतर अधिकारी थोडे पुरून कोळसा व इतर सामुग्रीहि कमी पुरते व त्यामुळें भाडें कमी होऊन मालाची किंमत कमी करतां येते. शिवाय दोन लहान बोटींपेक्षां दुप्पट माल नेणारी एक मोठीं बोट बांधण्यास खर्च कमी लागतो. उदाहरणार्थ, दोहोंमिळून २००० टन माल नेणार्‍या दोन बोटी बांधण्यास जर ४०,००० पौंड लागतात तर तितकाच माल नेणारी एक बोट बांधण्यास ३५००० पौंड खर्च पुरतो. यामुळें उत्तरोत्तर मोठमोठ्या बोटी बांधण्याचा तडाका चालू आहे, व मोठाल्या बोटी जाव्या म्हणून सुवेझसारखे लहान उथळ कालवे रुंद व अधिकाधिक खोल करण्याकरितां अवाढव्य खननयंत्रें (ममॉथ ड्रेजर्स)  तयार होत आहेत. मोठाल्या बोटी निघाल्यापासून तिसरा महत्वाचा प्रश्न म्हटला म्हणजे माल लवकर उतरविण्याचढविण्याच्या सोयीसंबंधीचा होय. कारण मोठाल्या बोटी बंदरांत फार वेळ कुचंबून राहिल्यास त्याचा रोजखर्च अंगावर पडतो. हल्लीं एकेक बोट १०००० टन माल नेऊं शकते, तेवढा माल बंदरांत नेण्याआणण्याकरितां जुन्या पद्धतीचे मालगाडीचे, प्रत्येकी ८ टन माल नेणारे डबे वापरल्यास ३० डब्यांची एक मालगाडी या हिशोबानें ४०/४५ मालगाड्या किंवा १०००/१२०० डबे लागतील. याकरितां आगगाड्यांचे मालडबेहि मोठमोठे करण्याचें काम चालू आहे. शिवाय बंदरें व गोद्या मोठमोठ्या बांधून रेल्वेचा फांटा थेट धक्क्यापर्यत नेणें जरूर असतें, आणि या दृष्टीनें विचार करतां ज्या बंदरांत अशा सोयी नाहींत तीं बंदरें जरा जवळ असलीं तरी मागें पडून जेथें मालाची चढउतार झटपट करण्याच्या सर्व सोयी आहेत अशा बंदरांची उत्तरोत्तर भरभराट होत आहे यांत आश्चर्य नाहीं.

मजबूत व सुखसोयीच्या बोटी:-- दूरदूर देशांत वसाहती झाल्यापासून प्रवाशांची रहदारी फार वाढली असून सणासुट्टीच्या निमित्तानें केवळ मौजेकरतां प्रवास करणारे लोकहि पुष्कळ असतात. त्यामुळें अशा हौशी प्रवाशांची नेआण करणार्‍या अशाच कामाकरितां स्वतंत्र बोटी असतात. अशा बोटींतून जेवण्यानिजण्यापासून हिंडण्याखेळण्यापर्यत सर्व प्रकारच्या सुखसोयी अगदीं श्रीमंताच्या घरच्याप्रमाणें केलेल्या असतात. बोटींमध्यें सुधारणा होण्याचें दुसरें कारण विमाकंपन्या होय. बोटी भक्कम नसल्यास विम्याचे दर जबर पडतात. त्यामुळें व्यापारी आपला माल चांगल्या भक्कम बोटींतूनच पाठवितात. जहाजांची तपासणी करून त्यांची वर्गवारीनें नोंदणी करणारी एक ‘लॉईडस रजिस्टर’ नांवाची सोसायटी आहे. या सोसायटीनें जहाजांच्या बांधणीसंबंधानें नियम केलेले आहेत, व त्यांत नेहमीं शिल्पशास्त्र प्रगत्यनुरूप सुधारणा होत असते. त्यामुळें बोटीहि सुधारलेल्या नमुण्याप्रमाणें बांधणें मालकास भाग पडतें याप्रमाणें नौकाशिल्पांत सुधारणा करण्याच्या कामीं लॉईडस रजिस्टरनें फार महत्वाची कामगिरी चालविलेली आहे.

येणेंप्रमाणें विम्याचे दर व भाड्याच्या दरांतील चढाओढ या दोन कारणांनीं बोटी बांधण्याच्या कामांत फार सुधारणा घडवून आणली आहे. शिवाय श्रीमंत प्रवाशांच्या हौशी हेंहि आणखी एक महत्वाचें कारण होय. निरनिराळ्या राष्ट्रांच्या बोटी वहनशक्तीसह दर्शविणारें कोष्टक येथें देतों.

देशाचे नांव १९०८ साल १९२२ साल
जहाजे टनेज जहाजे टनेज
युनायटेड किंगडम ९५४२ १७३१८३५१ ८८४९ १९२९५६३७
युनायटेड किंगडम, वसाहती ११५६३ १८७०९५३७ ११३२१ २२०४२५२०
युनायटेड स्टेटस् ३४८० ४८१०२६८ ५४८१ १४०६२४६०
जर्मनी २१७८ ४२३२१४५ १७२३ १८८७४०८
नार्वे २१४८ १९८२८७८ १८५२ २६००८६१
फ्रान्स १५१७ १८८३८९४ २०९४ ३८४५७९२
इटली १०९८ १२८५२२५ १४१३ २८६६३३५
जपान ८६५ ११४०१७७ २०२६ ३५८६९१८
रशिया १३८१ ९७४५१७ ... ...
स्वीडन १५४२ ९०४१५५ १३४५ १११५३७५
स्पेन ५५१ ७०१२७८ ९७३ १२८२७५७
हॉलंड ५६५ ८७६६२० ११६४ २६३२७१३
डेन्मार्क ८७० ७३३७९० ८२२ १०३८१३८

         
‘आगबोट व आरमार पहा’.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .