प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें

नेपोलियन, पहिला (१७६९-१८२१).- (नेपोलियन = रानचा सिंह)  फ्रेंचांचा बादशहा कॉर्सिका बेटांतील अजेशिओ गांवीं १५ ऑगस्ट १७६९ सालीं जन्मला. त्याचा बाप कारलो उर्फ चार्लस बोनापार्ट व आई मेरिया लेटिझिया रामोलिनो यांनां एकंदर तेरा मुलें झालीं, त्यांपैकीं जोसेफ, नेपोलियन, लुसीन, लुई, जेरोम हे पांच मुलगे आणि एलिझा, कारोलाईन व पालीन या तीन मुली होत्या; इतर मुलें अल्पायुषी झालीं. पूर्वी इटलींतील जिनोव्हा संस्थानच्या ताब्यांत असलेलें कॉर्सिका बेट फ्रान्सनें विकत घेऊन नेपोलियनच्या जन्मापूर्वी फक्त सहा महिनेच ताब्यांत घेतलें होतें; त्यामुळें नेपोलियन जन्मत:च फ्रेंच प्रजाजन बनला. नेपोलियनचीं आईबाप दोघेहि सरदार घराण्यांतलीं होतीं. वाङमयाची आवड, चौकसबुद्धि, कारस्थानकुशलता त्याच्या बापाच्या अंगचे गुण, आणि निश्चयी स्वभाव त्वरित निर्णयबुद्धि व कोणत्याहि विरोधाला व अडचणींनांन जुमानतां स्वत:चे निर्णय तडीस नेण्याचा हिमती स्वभाव हे आईचे गुण उतरले होते ते इतके कीं पुढें युद्धांत व राजकारणांत नेपोलियन सर्वांनां अत्यंत जबरदस्त प्रतिस्पर्धी होऊन बसला. नेपोलियनचें शरीर मूळ सडपातळ पण बांधेसूद, चेहरा जरा लांबट, डोकें मोठें, कान लहान, कपाळ भव्य, डोळे पाणीदार, दंड पिळदार व छाती रुंद होती. अंगावर केंस कमी व छातीवर मुळीच नव्हते. हृदयाची गति मंद असून नाडीचे ठोके मिनीटास अवघे चाळीस पडत. उंची पांच फूट पांच इंच होती. ओंठ घट्ट आवळून धरण्याची त्याची लकब असल्यामुळें मुद्रा उग्र दिसे, त्याला नेहमीं उजवा खांदा उडविण्याची संवय असे, त्याला आजन्म तपकीर ओढण्याचा फार नाद होता. जगांत अद्वितीय योद्धा म्हणून नांवाजलेल्या नेपोलियनला घोड्यावर बसण्याची मांड कधीहि नीट साधली नव्हती व बंदुकीचा नेमहि अचुक मारतां येत नसे.

शिक्षण:-- नेपोलियनला लहान वयांतच ड्रम वाजविणें, तलवार फिरविणे वगैरे खेळांची आवड असे व त्याचा वडील भाऊ जोसेफ हा सौम्य स्वभावाचा होता. या फरकामुळें थोरल्याला भिक्षुकी धंद्यात (चर्च) व दुसर्‍याला म्हणजे नेपोलियनला शिपाईगिरींत घालण्याचें बापानें ठरविलें. नेपोलियनचा बाप चैनी व खर्चिक होता व त्याला दारूचें व्यसनहि जास्त जडत गेलें. त्यामुळें कर्ज झालें, व कुटुंबाला कठिण काळ आला. तथापि नेपोलियनची आई मॅडम मेरिया मोठी धीराची बाई होती. तिनें मुलांची चांगली काळजी घेऊन त्यांनां कडक शिस्त लावली. नेपोलियन फार व्रात्य असल्यमुळें त्याच्यावर तिला फार लक्ष द्यावें लागे. नऊ वर्षांचा होईपर्यंत कॉर्सिका येथें शिक्षण झाल्यावर नेपोलियनला त्याच्या बापानें फ्रान्समध्यें आणून तेथीलं शाळेंत चार महिने ठेवून नंतर ब्रीन येथील लष्करी शाळेंत घातलें. या शाळेंत फ्रेंच, लॅटिन वगैरे भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित व शिवाय नर्तन, गायन, वादन, चित्रकला वगैरे विषय शिकवित. शाळेवर देखरेख व शिस्त धर्मगुरूंची असे, व शाळेची कीर्ति चांगली नव्हती. शाळेंत नेपोलियन इतरांशीं मिसळत नसे. त्याचा अभ्यास बरा असे. त्या वेळच्या त्याच्या चोपड्या अद्याप आहेत. त्यावरून तो फार पुस्तकें वाची व त्यांचा गोषवारा काढी असें दिसतें. गणितांत त्याची मति विशेष चाले, इतिहास व विशेषत: फ्लुटार्ककृत चरित्रें त्याला फार आवडत असत. ब्रीन येथील अभ्यासक्रम संपल्यावर १७८४ सालीं पॅरिस येथील ‘ईकोल मिलिटेयर’ नांवाच्या लष्करी शाळेंत तो गेला. तोफखान्यांत जागा मिळावी म्हणून त्यानें चांगला अभ्यास केला. तथापि त्याला फ्रेंच भाषा शुद्ध लिहितां येत नव्हती व अक्षरहि फार वाईट होतें, त्यामुळें त्याचा नंबर परीक्षेंत वर आला नाही. कविता करण्याचा नादहि त्याला तेव्हापासून होता.

नोकरी:--१७८५ च्या आक्टोबरात नेपोलियननें येथील परीक्षा देऊन तोफखान्याच्या पलटणींत नौकरी धरली. तेथें त्यानें प्रायव्हेट, कार्पोरल व सार्जंट यांचीं कामें केल्यावर १७८६ सालीं त्याला ज्युनियर लेफ्टनंटची जागा मिळाली. १७८५ सालीं त्याचा बाप वारला, त्यावेळीं त्याच्या आईचें वय तीस वर्षांचे होतें; यावेळीं कुटुंबाचा भार नेपोलियनवर पडला. दुसरें उत्पन्न विशेष नव्हतें, शिवाय एक जुना वतनाचा दावा नेपोलियनच्या बापानें लावाला होता त्यांतहि नेपोलियन हरला तेव्हां सांपत्तिक स्थिति आणखी वाईट झाली. तथापि मॅडम मेरियानें दक्षतेनें व काटकसरीनें दिवस काढलें. आईचें हे काटकसरीचें वळण नेपोलियनला पुढें फार उपयोगी पडलें. त्यानें अनेक लढाया केल्या पण कधी त्याला कर्ज काढावें लागलें नाहीं किंवा कागदाचें नाणें पाडावें लागलें नाहीं. नौकरींत असतां तो रजा घेऊन वारंवार कॉर्सिकांत येई. कॉर्सिकाबेट फ्रेंचांच्या ताब्यांतून सोडवून स्वतंत्र करावें हा विचार त्याच्या डोक्यांत होता. नोकरीवर व रजेवर असतांनाहि त्याचें वाचन व अभ्यास चालूच असे. या वेळच्याहि चोपड्या व टिपणें अद्याप आहेत. विशेषत: पारतंत्र्यांतून स्वातंत्र्य मिळवलेल्या लोकांचा इतिहास तो बारकाईनें अभ्यासी. ग्रीस, रोमन, कार्थेज, इंग्लंड, फ्रान्स, पर्शिया, चीन अरबस्तान, वगैरे देशांचा इतिहास त्यानें लक्षपूर्वक वाचला. फ्लुटार्क, सीझर, कार्नेली, व्होल्टेअर, रूसो यांचे ग्रंथ त्याला फार आवडत. इंग्लंडच्या इतिहासाचा अभ्यास, विशेषेंकरून १६८८ सालच्या राज्यक्रांतीपर्यंत त्यानें स्वत:चीं टिपणें लिहिलीं आहेत. त्यांत क्रॉमवेलबद्दल तो लिहितो: “धीर, हुषार, कपटी, व ढोंगी असून त्याची पूर्व वयांतील लोकशाहीचीं उच्च तत्त्वें पुढें त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या सर्वभक्षक ज्वाळांनां बळी पडलीं; आणि सत्तेचीं मधुर फळें चाखल्यावर एकट्यानें अनियंत्रित राज्यकारभार करण्याच्या सुखाची त्याचती लालसा प्रबळ झाली.” नेपोलियननें राजकारण, समाजव्यवस्था, न्याय, वगैरे  वरील अनेक ग्रंथ व शिवाय काव्य व नाटकेंहि वाचलीं. शिवाय द्रव्यार्जनाच्या इच्छेनें निबंध, इतिहास व कादंब-या लिहिल्या.

रजेवरून परत आल्यावर १७८८-८९ सालीं आक्झोन येथील बंडाळी मोडण्याच्या कामावर त्याच्या सैन्याची तुकडी नेमली गेली. त्याच सुमारास फ्रेंच राज्यक्रांतीचा स्फोट झाला (सप्टेंबर १७८९). त्याचा फायदा घेऊन स्वतंत्र व्हावें म्हणून कार्सिकांतल्या लोकांनीं दांडगाईचे प्रकार सुरू केले. तथापि लढाई न करतां कार्सिकाचा पूर्वां हद्दपार केलेला पुढारी पेआली यालाच परत बोलावून त्याच्याकडे कार्सिकाच्या बंदोबस्ताचें काम फ्रेंच सरकारनें दिलें. पण फ्रान्सशीं राजनिष्ठ न राहतां इंग्लंडच्या मदतीनें कार्सिका स्वंतत्र करण्याचीं कारस्थानें पेआलीनें सुरू केली. उलटपक्षीं लहान कार्सिका बेट पूर्ण स्वतंत्र न राहूं शकतां बलाढ्य राष्ट्राच्या भक्ष्यस्थानीं पडेल हें जाणून तें फ्रान्सच्या अमलाखालीं राहणेंच इष्ट आहे असें नेपोलियननें विचारपूर्वक ठरवून पेआलीला उघड विरोध केला. स. १८९१ मध्यें सैन्याची पुनर्रचना झाली, तींत नेपोलियनची व्हलेन्स येथें लेफ्टनंटच्या जागीं नेमणूक झाली. येथेंहि एक राजकीय क्लब होता. तेथील लायब्रेरियन नेपोलियन झाला. तेथेंच “सुखप्राप्तीसाठीं मनुष्यामध्यें कोणतीं अत्यंत महत्वाचीं सत्यें व मनोविकार बिंबविलें पाहिजेत” ह्या, बक्षिसाकरितां नेमलेल्या विषयावर त्यानें निबंध लिहिला. त्यांत त्यानें स्पार्टन लोकांच्या समाजरचनेची स्तुति केली होती. स. १८९१ मध्यें तो रजा घेऊन कार्सिकांत गेला. त्या वेळीं पेआलीबरोबरचें त्याचें भांडण वाढतच गेलें. पुढें फ्रेंच सरकारनें पेआली व त्याचा दोस्त पोझोडीबर्गो या दोघांनां हद्दपार केल्यामुळें ते अनुक्रमें इंग्लंड व रशियांत जाऊन राहिले; व अखेरपर्यंत पोझोडीबर्गोनें झारचें मन नेपोलियनविरूद्ध कलुषित करून वैर वाढविलें. कार्सिकन लोकहि नेपोलियनविरूद्ध विडून त्यांनीं त्याच्या घरावर हल्ला करण्याचें ठरविलें. त्यामुळें १७९३ फेब्रुवारी ता. १ रोजीं नेपोलियन आपल्या सर्व कुटुंबीयांसह पळून फ्रान्समध्यें येऊन राहिला व त्यानें सर्वस्वी फ्रेंच रिपब्लिक सरकारच्या नोकरील वाहून घेतलें.

टूलोनचा विजय.- फ्रेंच राज्यक्रांतिकारकांनीं राजाराणीला पदच्युत केल्यामुळें व पुढें ठार मारल्यामुळें आस्ट्रिया, प्रशिया, इंग्लंड, हॉलंड, स्पेन, वगैरे देश प्रान्सवर चालून आले. खुद्द फ्रान्समध्येंहि राजशाहीचा पुरस्कर्ता असा एक पक्ष होता. या परिस्थितीचें बारकाईनें निरीक्षण करून आपलीं तें प्रश्नोत्तर रूपानें सोप्या भाषेंत लिहिलेलें एक लहानसें पुस्तक नेपोलियननें प्रसिद्ध केलें; त्यांत नव्या सरकारास मान्यता देऊन सर्व फ्रेंचांनीं चालून आलेल्या आस्ट्रियादि शत्रूंनां तोंड देण्याकरितां एकी केली पाहिजे असें प्रतिपादिलें. याच सुमारास टूलोनच्या राजपक्षीयांनीं तें बंदर इंग्रजांच्या ताब्यांत दिल्यामुळें त्यांनां तेथून हांकून लावण्याकरितां कार्टो, डॉपेट, व डुगोमीर या तीन नालायक सरदारांची अनुक्रमें नेमणून झाली व त्यांच्या हाताखालीं नेपोलियनला नेमलें. नेपोलियननें टूलोनची नीट पाहणी करून तोफांच्या मा-याकरितां जागा नक्की केली. प्रथम लएग्युलेट या महत्त्तवाच्या ठिकाणचा किल्ला मोठ्या निकराचा हल्ला करून सर केला. त्यावर लवकरच (ता. १९ डिसेंबर, १७९३) टूलोन हस्तगत झालें. या सर्वाचें श्रेय इतर वरिष्ठ व कनिष्ठ फ्रेंच अधिका-यांनीं मन:पूर्वक नेपोलियनला दिलें; पॉरिसमध्यें त्याचा लौकिक वाढला.

कैद:- वरील विजयानंतर दक्षिण फ्रान्सच्या किना-याची लष्करी दृष्ट्या मजबुती करण्याच्या कामावर नेपोलियनची नेमणूक होऊन तो तिकडे गेला. इकडे पॅरीसमध्यें कन्व्हेन्शन म्हणून तात्पुरी राज्यकारभार पहाणारी सभा होती तिचा मुख्य राबिसपिअर व बारस यांच्याशींहि नेपोलियनचें विशेष सख्य झालें. पण राबिसपिअर मोठा क्रूर असून त्यानें केवळ संशयावरून अनेक फ्रेंच स्त्रीपुरूषांनां वघाची शिक्षा ‘कमिटी ऑफ पब्लिक सेफ्टी’ नांवाच्या लष्कीर न्यायसभेमार्फत देवविली. या जुलुमामुळें चिडून कांहीं कटवाल्यांनीं राबिसपिअर व तत्पक्षीय आणखी एकवीस जणांस ठार मारलें. त्यावेळीं नेपोलियनविरूद्ध देशद्रोहाचा आरोप करून त्याला कैदेंत टाकलें; पण पुढें न्यायाधीशांनीं त्याचा जबाब ऐकून त्याला पूर्ण निर्दोषी ठरवून सोडून दिले. तथापि नेपोलियनची नोकरी गेली व त्याच्या सर्व कुटुंबाला कांहीं दिवस मोठ्या दारिद्यांत व संकटांत काढावे लागले. त्यावेळीं द्रव्याकरितां त्यानें पुस्तकें लिहिलीं, नोकरीकरितां अर्ज केले व मॅडम परमान नांवाच्या संपत्तिमान पण वयानें ब-याच  अधिक असलेल्या विधवेशीं विवाह करण्याचाहि प्रयत्न केला. पण कांहींच जमलें नाहीं.

पॅरिसमधील बंडाचा मोड व विवाह.- अशा वेळीं कन्व्हेन्शन सरकारला नेपोलियनची गरज लागली. पॅरिसमध्यें कन्व्हेन्शनविरूद्ध दुस-या पक्षानें लढाईची बरीच तयारी केली. तें बंड मोडण्याकरितां बारसच्या सूचनेवरून नेपोलियनची नेमणूक झाली. त्यानें पॅरिस शहरांत नाक्यानाक्यांवर तोफा गाडून ५ आक्टोबर १६९५ च्या बंडाळींतील ३०००० लोकांनां २०० हून अधिक प्राणहानि होऊं न देतां थोडक्या वेळांत उधळून लावलें, व सर्व शहरांत चांगला वचक बसविला. या विजयामुळें नेपोलियनला चांगला अधिकार प्राप्त झाला, पैसा मिळूं लागला, व त्याच्या भावांनांहि सरकारी नोक-या मिळाल्या व कुटुंबाचें दैन्य कायमचें नाहीसें झालें. कन्व्हेन्शननें ठरविलेल्या नव्या राज्यघटनेप्रमाणें नेमलेलया बारस, रूबेल, कार्नो वगैरे डायरेक्टरांत नेपोलियनचें वजन फार वाढलें. मुलकी सत्तेवर लष्करी सत्तेचा पगडा बसण्यास सुरवात झाली. याच संधीस बारसच्या मध्यस्थीनें नेपोलियनचा विवाह जोसेफाईन नांवाच्या विधवेशीं १७९६ मार्च ता. ९ रोजीं झाला. तिला पहिल्या संबंधाचा मुलगा व मुलगी अशीं दोन मुलें होतीं. पॅरिसमध्यें चैनी लोकांचे क्लब होते त्यांपैकीं बारसच्या क्लबांत विधवा जोसेफाईनचें जाणेंयेणें असे. नेपोलियन त्या क्लबांत जाऊं लागून विवाहाच्या गोष्टी निघाल्या तेव्हां प्रथम गरीब नेपोलियनला वरण्यास ती तयार नव्हती, पण पुढें इटलीच्या मोहिमेवर नेपोलियनची नेमणूक झाल्यावर तिनें विवाहास रूकार दिला.

इटलींतील मोहीम:- वर सांगितलेल्या फ्रान्सच्या नव्या डायरेक्टरांनां नेपोलियननें इटलीवर स्वारी करून आस्ट्रियाचा मोड करण्याची व देशांत पैसा आणण्याची कल्पना व योजना सुचविली होती. ती डायरेक्टरांनीं पसंत करून नेपोलियनला हुकूम दिला. तिच्या खर्चाकरितां सरकारी खजिन्यांतून पैसा मात्र देण्यास शिल्लक नव्हता. तेव्हां नेपोलियननें स्वत:कर्जन काढून सैन्याची जमवाजमव केली, व इटलीवर चाल केली. या मोहिमेंत नेपोलियन सर्वस्वी विजयी झाला. शूर, धाडसी शिपाई, युद्धकलाप्रवीण सेनापति व चतुर राजकारणी व मुत्सद्दी, असे त्याच्या अंगचे तिन्ही प्रकारचे गुण प्रत्ययास येऊन त्याचें नांव यूरोपभर पसरलें. फ्रेंच लोकांच्या प्रेमास तर तो फारच पात्र झाला, पण डायरेक्टरांनां मात्र त्याचा मत्सर व भीति वाटूं लागल्यामुळें त्यांनीं त्याच्या मार्गांत अनेक अडचणी आणल्या. पण प्रत्येक बाबतींत अखेर नेपोलियनच यशस्वी झाला. लोदीच्या पुलावर मिळालेल्या विजयानें (१० मे १७९६) सेनापतीपेक्षां अधिक महत्त्वाच्या पदीं चढण्याचीं स्वप्नें त्याला दिसूं लागलीं आणि आरकोलाच्या पुलावरील अकल्पित बचावामूळें आपला भविष्यकाळ विशेष उज्ज्वल होणार असा दैववाद त्याच्या डोक्यांत घोळूं लागला. जनरल बोलू, वूर्मझर, आलबिंझी वगैरे कसलेल्या आस्ट्रियन बादशाहाला शरण येऊन कँपोफोर्मियाचा तह करण्यास भाग पाडलें, व आस्ट्रियाची इटलींतील सत्ता नष्ट केली. सर्डिनिया, नेपल्स वगैरे इतटालियन संस्थानिकांनां पराभूत करून त्यांच्या सैन्याची मदत मिळविली. इटालींतील अनेक लहान लहान संस्थानें मोडून तेथें लोकसत्ताक राज्यें स्थापून त्या सर्वांचें एक संयुक्त ‘सिस आल्पाईन रिपब्लिक’ स्थापलें (१६ आक्टोबर १७९६). उलटपक्षीं रोम येथील पोपचें राज्य डायरेक्टरांचा आग्रह असतांहि सामान्य लोकांची धर्मबुद्धि न दुखवावी म्हणून मोठ्या अदबीनें तह करून कायम राखलें, आणि पॅरिस येथील डायरेक्टरांनां खुष राखण्याकरितां मीलन येथून सुमारें दहा कोटी रूपये व पोपजवळून वीस लक्ष डॉलर खंडणी, व शिवाय खासगीरीत्या डायरेक्टरांनां गाडीकरितां दोनशें उत्तम घोडे, पॅरिस येथील विद्वानांनां ग्रंथ, पुराणवस्तुसंशोधकांनां इटलींतील प्राचीन कालच्या अनेक वस्तू, शोकी मित्रांनां सुंदर चित्रें, वगैरे अनेकांनां अनेक प्रकारच्या देणग्या धाडल्या. इतर ठिकाणच्या फ्रेंच फौजेलाहि त्यानें लक्षावधि रूपये धाडले. यामुळें सर्व दर्जाच्या व प्रकारच्या लोकांनीं नेपोलियनची स्तुतिस्तोत्रें गाण्यास सुरवात केली.

ईजिप्तवरील मोहीम:- स. १७९५ पासून फ्रान्समध्यं पांच डायरेक्टर सर्व सत्ताधारी बनले होते. त्यांच्या अरेरावीमुळें लोकमत विरूद्बनून एक मॉडरेटपक्ष निर्माण झाला, व त्यानें आपल्या मतांचा बार्थिलेमी नांवाचा इसम पांचवा डायरेक्टर निवडला. त्याच्या बाजूला कार्नो मिळून डायरेक्टरांत दुफळी झाली. तेव्हां बारसपक्षानें नेपोलियनला वश करून त्यानें पाठविलेल्या जनरल आगेरोच्या मदतीनें मॉडरेटपक्षाचा पराभव केला. स. १७९७ च्या डिसेंबरांत तो पॅरिसला परतल्यावर डिरेक्टर होण्यास, लायक आहे असें कित्येकांनीं सुचविलें; पण त्यानें तें नाकारलें. डायरेक्टरांनीं डोईजड होऊं लागलेल्या नेपोलियनला इंग्लंडवर स्वारी करण्याची कामगिरी सांगितली व त्याकरितां फ्रान्सच्या उत्तर किना-यावर चाललेल्या आरमारी तयारीची, नेपोलियन पहाणी करून आला व ती फार अपुरी असल्याचें मत देऊन जर्मनीचा उत्तर किनारा किंवा ईजिप्त वगैरे पौरस्त्य देश जिंकून ब्रिटिश व्यापार बंद पाडण्याची योजना त्यानें सुचविली. नेपोलियन दूर देशी गेलेला बरा, असं डायरेक्टरांस वाट असल्यामुळें त्यांनां ईजिप्तच्या मोहिमेस रूकार दिला. ईजिप्तच्या मोहिमेचा बेत नेपोलियनच्या मनांत फार दिवस घोळत होता. ईजिप्त जिंकला कीं आशि सहज जिंकतां येईल व हिंदुस्थानावर चाल करून टिप्पू व मराठे यांच्या मदतीनें इंग्रजांनां घालवून लावतां येईल आणि अलेक्झांडर दि ग्रेटलाहि साधलें नाहीं तें सर्व हिंदुस्थान जिंकून हस्तगत करण्याचें श्रेय मिळेल असलें मनोराज्य नेपोलियननें उभारिलें होतें. डायरेक्टारांचा हुकुम मिळतांच त्यानें जय्यत तयारी केली. तेरा मोठीं, चवदा मध्यम व बरींचशीं लहान लढाऊ जहाजें आणि सामान भरलेलीं ३०० जहाजें, शिवाय ईजिप्तमधील पुराणवस्तुसंशोधनाकरितां चांगले शास्त्रज्ञ, कलाभिज्ञ, इंजिनियर वगैरे विद्वान इसम, यंत्रसामुग्री व छापण्याचें सामान बरोबर घेऊन तो १९ मे १७९८ रोजीं टूलोन बंदरांतून निघाला. भूमध्यसमुद्रांत ब्रिटीश आरमाराचा अडथळा होऊं नये म्हणून त्यानें इंग्लंडवरच्या मोहिमेची हूल उठविली होती. नेपोलियननें वाटेंत माल्टा हस्तगत करून २ जुलै रोजीं आलेक्झंड्रिया शहर घेतलें. पुढें मनोर्‍यानजीकच्या (पिरॅमिड) लढाईंत अरबांचा पूर्ण पराभव करून लवकर कायरो शहर हस्तगत केलें व तेथें नवी राज्यव्यवस्था सुरू केली. अरब व इंग्रज ह्यांनीं पुन्हां लढाईची तयारी केली. तेव्हां एकर येथें पराभव झाल्यामुळें व विशेषत: फ्रान्समध्यें अव्यवस्था माजल्यामुळें नेपोलियन ९ आक्टोबर १७९९ रोजीं फ्रान्सला परत आला. सुवेझ कालवा व इतर शेतकीचे कालवे तयार करण्याचे बेत तसेच राहिले. मात्र या मोहिमेमुळें आरमारी सामर्थ्य असलेल्या पाश्चात्त्य राष्ट्राला ईजिप्तवर सहज सत्ता बसवितां येईलसें ठरलें. माल्टा बेट इंग्रजांनीं घेतलें व हिंदुस्थानांत ब्रटिश सरकारनें नेपोलियनच्या भीतीनें टिप्पूचा पूर्ण नाश केला. ईजिप्तमध्यें रोझेटास्टोन हस्तगत होऊन ईजिप्शियन लिपीचें वाचन सुबोध झालें व पुराणवस्तुशोधांत इतर भर पडली.

नवीन राज्यघटनेचा फर्स्ट कॉन्सल:-- नेपोलियन दूर ईजिप्तमध्यें असतां इंग्लंडच्या उत्तेजनानें आस्ट्रियानें बराच इटली फ्रान्सच्या हातून परत जिंकून घेतला. डायरेक्टरांमध्यें बारसखेरीज साईंस, रांजर ड्यूकास, गोहीयखुम्यूलिन हे चार नवे डायरेक्टर आले होते. त्यांपैकीं साईस हा विशेष नांवाजलेला होता. या डायरेक्टरांत, राज्यकारभारांत कर्तबगार कोणीच नव्हता, उलट संशयावरून त्यांनीं अनेकांनां हद्दपार केलें, त्यामुळें देशांत अस्वस्थता माजली होती.याप्रमाणें अन्तर्बाह्य हलाखीच्या स्थितींत लोकांनां नेपोलियन हा एकच त्राता आहे असें वाटत होतें. नेपोलिननेंहि तें जाणून सर्व राजकीय सत्ता आपल्या हातीं घेण्याचा अचाट कट केला. बारस, साईस व ड्यूकास या तिघांनां त्यानें कटांत घेतलें. शिवाय कावेबाज टालेरांड, पॅरीसचा कोतवाल फूशे, आणि एन्शंटसचें कौन्सिल (शिष्टांची सभा)  व ज्यूनियरांचें कौन्सिल (पांचशें तरुणांची सभा)  या दोन कायदेमंडळांपैकीं  बर्‍याच लोकांस अनुकूल करून घेऊन त्यांनीं, देशांत अराजकांचा मोठा कट आहे, त्याकरितां नेपोलियनला सैन्याचा मुख्य नेमावा, व पूर्वीची राज्यघटना बदलून टाकावी व डायरेक्टरांनी राजीनामे देऊन त्यांच्या ऐवजीं तिघांचें कौन्सिलेट नेमावें त्यांनीं नवीन राज्यघटना बनवावी असे ठराव करावे असा व्यूह रचला. त्याप्रमाणें १८ नोव्हेंबर १७९९ रोजीं शिष्टांची सभा भरून त्यांनी ठराव पास केल्यावर तरूणांच्या सभेपुढें ते ठराव आले, त्यावेळीं  “ अराजकांच्या कटाला पुरावा कोठें आहे; नेपोलियननेंच कायद्याची बंधनें तोडलीं आहेत; त्याला ‘आऊट लॉ’ ठरवावा ” अशा सूचना येऊं लागल्या. तेथें हजर असलेला नेपोलियन त्या सूचना ऐकून इतका घाबरला कीं जरा मूर्च्छितहि झाला पण सभेचा अध्यक्ष नेपोलियनचाच भाऊ लुसीन बोनापार्ट हा होता; मोठ्या धैर्यानें व युक्तीनें आऊटला करण्याच्या सूचना, नेपोलियनचें म्हणणें ऐकल्याशिवाय मतास घालण्याचें नाकारून तो अध्यक्षस्थान सोडून बाहेर आला आणि ‘ सभेंत इंग्लंडच्या लांचानें फितूर बनलेले कांही लोक आहेत ’ असें बाहेरच्या सैन्यास सांगतांच सैन्यानें सभा उधळून लावली. नंतर रात्री पुन्हां सभा भरली, तींत नेपोलियनविरोधी इसम हजर न राहिल्यामुळें डायरेक्टरांऐवजी ड्यूकास, साईस व नेपोलियन हे तीन कॉन्सल नेमण्याचे ठराव पास झाले. त्यांत नेपोलियन फर्स्ट कॉन्सल नेमला गेला व त्यानें सर्व राज्यसूत्रें हातीं घेऊन देशाचा कारभार सुरू केला. साईसनें नवी राज्यघटना तयार केली तींत नेपोलियननें अनेक दुरुस्त्या केल्या. या नव्या राज्यघटनेंत चार मुख्य संस्था होत्या त्यांपैकीं ‘ कौन्सिल ऑफ  स्टेट ’ नें फक्त नव्या कायद्यांची सूचना करावी, ‘ ट्रायब्यूनेट ’ नें त्यांवर फक्त वादविवादात्मक भाषणें करावी, ‘ लेजिस्लेटर ’ नें नुसतीं मतें द्यावीं व  ‘ सीनेट ’ नें अखेरची मंजूरी किंवा नामंजूरी द्यावी, अशी योजना होती. याप्रमाणें घोटाळ्यांची राज्यघटना करून नेपोलियननें सर्व अधिकार फर्स्ट कॉन्सलच्या हातीं राहतीलसें केलें. तरी वरून लोकसत्ताक दिसणारी ही राज्यपद्धति फ्रान्सच्या मतदारांनीं १५६२ प्रतिकूल विरूद्ध ३०११००७ अनुकूल मतें देऊन प्रचंड बहुमतानें पास केली. याप्रमाणें अधिकार हातीं आल्यावर नेपोलियननें चांगले लायख इसम निवडून मंत्रिमंडळ बनविलें; आणि इंग्लंड, प्रशिया, स्पेन, रशिया वगैरे देशांशी फ्रेंच सरकारचा मुख्य सत्ताधीश म्हणून बोलणें सुरू केलें. पण फक्त रशियाचा झार पॉल नेपोलियननें पूर्वीचे रशियन कैदी सोडल्यामुळें व आशिया जिंकून आपसांत वांटून घेण्याच्या आमिषानें दोस्त बनला. उलट इंग्लंडनें नेपोलियनचा अधिकार अमान्य करून पुन्हां आस्ट्रियाला मदत देऊन युद्ध करण्याचें ठरविलें.

आस्ट्रियाशीं दुसरें युद्ध:-- ही परिस्थिति पाहून नेपोलियननेंच आस्ट्रियावर चालून जाण्याचें ठरविलें, व मोरेयू या सेनापतीस तिकडे रवाना केलें व स्वत: अत्यंत गुप्तपणानें दुसरे सैन्य तयार करून व अत्यंत बिकट असा आल्प्स पर्वत ओलांडून त्यानें आस्ट्रियन सैन्याला अचानक गाठलें व मारेंगो येथें आस्ट्रियन सरदार डिमेलो याच्या सैन्याचा पूर्ण मोड केला. डिमेलोनें तात्पुरता तह केला. तो नाकारून आस्ट्रियन सरकारनें युद्ध चालविलें, तेव्हां होहेनलिडन  येथें पुन्हां पराभव झाल्यामुळे अखेर आस्ट्रियानें तह केला आणि इटलीचा पूर्वी फ्रान्सनें जिंकलेला प्रदेश मध्यंतरी आस्ट्रियानें घेतला होता तो फ्रान्सला पुन्हां परत मिळाला.  

तहाहयात कॉन्सल, अन्त:सुधारणा, कट व सम्राटपद:-- मारेंगोच्या विजयानंतर लगेच नेपोलियन पॅरिसला परत आला. एके दिवशीं नेपोलियन नाटकाला गेला असता त्याच्या गाडीला राजपक्षाच्या कटवाल्यांनी स्फोटक द्रव्यांनी अपघात करण्याचें टरविलें. पण नेपोलियनच्या गाडीला इजा न होतां इतर इसम मरण पावले. या कटाचा शोध लावून त्यानें अनेकांना फाशीच्या व हद्दपारीच्या शिक्षा दिल्या. या राजपक्षाच्या कटामुळें व आस्ट्रियावरील विजयामुळें लोकमत नेपोलियनला फार अनुकूल बनलें आणि कॉन्सलच्या जागेची तीन वर्षांची मुदत संपल्यानंतर त्याला कायदेमंडळांनीं व सर्व फ्रेंच नागरिकांपैकीं ३५६८८८५ अनुकूल व ८३७४ प्रतिकूल मतांनीं तहाहयातचा फर्स्ट कॉन्सल नेमलें. आस्ट्रियाचा पराभव झाल्यामुळें व झार नेपोलियनमला मिळाल्यामुळें इंग्लंडनेंहि नमतें घेऊन नेपोलियनशीं अमीन्सचा तह २७ मार्च १८०२ साली केला. नेपोलियननें फर्स्ट कॉन्सल झाल्यापासून फ्रन्सच्या अन्तर्गत सुधारणेकडे फार बारकाईनें लक्ष दिलें. फ्रेंच राज्यक्रांतीकारकांनी जुने कॅलेंडर बदलून, धर्म नाहींसा करून, पिढीजाद अमीरउमरावांचीं घराणीं उध्वस्त केली होतीं. नेपोलियननें पुन्हां जुनें कॅलेंडर, धर्मखातें, पोपची सत्ता वगैरे प्रस्थापित करून परदेशीं पळालेल्या राजपक्षाच्या अनेक श्रीमंत सरदारांनां देशांत परत येऊं दिलें. पूर्वी डायरेक्टरांनीं कैदेंत टाकलेल्या अनेक राजकीय पुढार्‍यांनां सोडून देऊन त्यांनां मोठाल्या नोकर्‍याहि दिल्या. कायद्याचीं कोडें नवीन तयार केलीं तीं इतकीं चांगली आहेत कीं, हल्लीं बर्‍याच यूरोपीय देशांतील कायदे त्या नमुन्याचे आहेत. त्यानें शिक्षण, शेती, कालवे, व्यापार, वगैरे सर्व खातीं सुधारलीं. पदव्या देण्याची पद्धत पुन्हां सुरू करून ‘ लीजन ऑफ ऑनर ’ नांवाचें पदक देण्याची नवीन योजना केली. कोणत्याहि धंद्यांत किंवा पेषांत उत्कृष्ट ठरेल त्याला हें पदक व त्याबरोबर जमीन किंवा देणगीहि मिळे. याप्रमाणें समानतेचीं तत्वें राखून सर्व लोक व सर्व राजकीय पक्षांनां त्यानें खुष केलें; बोरबोन राजघराणयाचा वारस अठरावा लुई यानेंहि नेपोलियनला      ‘ मला तुम्ही फ्रन्सच्या गादीवर बसवावें ’ वगैरे मजकुराचें पत्र लिहिलें! त्याला मात्र ‘ तुम्ही या भानगडींत पडूं नये ’ असें उत्तर नेपोलियननें निक्षून लिहिलें. या निराशेमुळें बोरबोन घराण्याच्या वतीनें एक मोठा कट, नेपोलियनला ठार मारण्याकरितां १८०४ सालीं झाला. त्याचा पुढारी जॉर्ज काडोडल असून त्याला इंग्लंडांतून पैशाची मदत होती. या मोठ्या कटाचा सुगावा दुसर्‍या एका बारक्या कटातील आरोपीकडून नेपोलियनला कळला. मोरेयू, पिशेग्रू, बोरबोन घराण्यांतला ड्यूक-डी-एन-गार्डन, कौंट आर्टाय वगैरे बडे इसम कटांत सामील असल्याचें शाबीत झालें. पुष्कळांनां देहांतशासन झालें. या कटामुळें फ्रान्सच्या जनतेला बोरबोन घराण्याची पुन्हां भीति वाटूं लागून नेपोलियनलाच राजपद देण्याकडे लोकमत वळलें. १८ मे १८०४ रोजी फ्रेंच साम्राज्याचा नेपोलियनला हादशहा करण्याची सूचना सीनेटनें मान्य केली. पुढें सर्व फ्रेंच नागरिकांचीहि मतें घेतलीं तेव्हां ३५७२३२९ अनुकूल मतें पडलीं तदनुसार नेपोलियनला जोसेफाईन राणीसह राज्याभिषेक नॉटरडॅम येथें खुद्द पोपच्या हस्तें होऊन त्यांनां राजमुकूट अर्पण करण्यांत आले. नंतर २० मे १८०५ रोजी  ‘ इटलीचा राजा ’ हें पद व राजमुकूट धारण केला. शिवाय तहाहयात कॉन्सल झाल्यापासून नेपोलियननें सर्व सत्ता आपल्या एकट्याच्या हातीं ठेवण्यासाठी राज्यघटनेंत हळू हळू अनेक फरक केले होते.

इंग्लंडवरच्या स्वारीची तयारी:-- इटली, ईजिप्त, आस्ट्रियादि देशांतील उघड युद्ध व फ्रान्समधील गुप्त कटांत जेथें तेथें इंग्रजांचा हात असल्यामुळें आणि आमीन्सच्या तहाप्रमाणें माल्टा बेट इंग्रजांनी फ्रेंचांना न दिल्यामुळें खुद्द इंग्लंडवर स्वारी करण्याच्या इराद्यानें फ्रान्सच्या उत्तर किनार्‍यावर बोलोन येथें २४०० जहाजांच्या जंगी आरमाराची तयारी करविली. इंग्लंडनेंहि, सतरा वर्षांवरील व बावन वर्षांच्या आंतील प्रत्येक इसमानें लढाईत सामील झालेंच पाहिजे असा कायदा करून दहा कोट रुपयांचे नवे कर्जरोखे काढून नवे कर बसवून संरक्षणाची तयारी केली. १८ मे १८०३ रोजीं आरमारी युद्ध सुरू होऊन तें १८०५ अगस्टपर्यंत चाललें. इंग्लिश खाडींत एक संबंध जहाजांचा पूल बनवून सहा तासांत एकदम दीड लक्ष सैन्य इंग्लिश किनार्‍यावर उतरवून इंग्रजांशीं जमिनीवरच लढाई द्यावी असा त्यांचा बेत होता. असा पूल न होऊं देण्याकरितां इंग्लंडनें सर्व आरमार इंग्लिश खाडींत जमविलें. केडिझ, ब्रेस्ट व टूलोन येथील फ्रेंच जहाजें इंग्लिश खाडींत आणण्याचा नेपोलियननें प्रयत्‍न केला पण ब्रिटीश जहाजांनी त्यांना अडविलें. उभय आरमारांच्या चार दोन लहान चकमकीहि झाल्या, इंग्रज आरमारास तोंड देण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें त्याला फसवून इंग्लिश खाडीतून दूर नेण्याकरीतां नेपोलियननें वेस्ट इंडिजबेटांवर स्वारी करण्याची हूल दाखविली; त्याप्रमाणें इंग्रज अधिकारी नेल्सन यानें कांहीं जहाजांसह पाठलागासहिगेला. व त्यासंधींत आरमारी स्वारीचा प्रयत्‍न फ्रेंच सरदारानें केला पण त्याच्या भित्रेपणामुळें तोहि फसला. शिवाय मध्यंतरी इंग्लंडनें आस्ट्रिया, प्रशिया, रशिया व स्वीडन, यांच्याशीं एकमत करून फ्रान्सवर आस्ट्रिया, प्रशिया व रशिया याजकडून स्वारी करविली. यामुळें नेपोलियननें इंग्लंडवरील स्वारीचा बेत रहित करून आस्ट्रियावर एकदम चाल केली. अखेर समुद्रावर फ्रेंच व इंग्रज आरमारांची ट्राफल्गार येथें लढाई (१८ आक्टोबर १९०५) होऊन तींत फ्रेंच आरमाराचा बहुतेक नाश झाला. ­­

नेपोलियनविरुद्ध उत्तर युरोप:-- गेल्या महायुद्धांतील जर्मन कैसरप्रमाणें नेपोलिनचेहि पहिले बेत फ्रान्सला ईजिप्त, हिंदुस्थान वगैरे दूर देशीं वसाहतींचे साम्राज्य­­ (कलोनियल एम्पायर)  मिळवून देण्याचे होते, पण ते बेत, ब्रिटिश आरमाराच्या मानानें फ्रेंच आरमार कमकुवत असल्यामुळे व फ्रान्सचा अन्त:कारभार नीट चालविण्यास समर्थ डिरेक्टर न लाभल्यामुळें ते फसले. रिपब्लिक राज्यपद्धतीचे चहाते फ्रेंच राज्यक्रांतीवाले आसपासच्या देशांत पारतंत्र्याऐवजीं स्वातंत्र्य व राजशाहीऐवजी लोकशाही स्थापण्याच्या मताचे असल्यामुळें नेपोलियननें इटली वगैरे देशांत रिपब्लिक राज्ये स्थापिली. फ्रान्सच्या रिपब्लिक राज्यें स्थापण्याच्या धोरणाला आस्ट्रिया, प्रशिया, वगैरे राजशाही देशशत्रू व वसाहतीच्या साम्राज्याच्या धोरणाला इंग्लंड देशशत्रू असल्यामुळें नेपोलियन बादशहा होण्यापूर्वीहि फ्रान्सतर्फे त्याला सतत लढाया कराव्या लागल्या. पुढे  बादशहा झाल्यावर त्यानें इटली स्वित्झर्लंड, हॉलंड, स्पेन वगैरे देश फ्रेंच साम्राज्याचे मांडलिक राजशाही बनविण्याचें धोरण स्वीकारलें. हें राजसत्ताक पद्धतीचें पुनरुज्जीवन खुद्द फ्रेंच रिपब्लिकवादी मुत्सद्यांनांहि न पटल्यामुळें या सर्व गोष्टींनां नेपोलियनच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेचें स्वरूप आलें व त्याविरूद्ध सर्व यूरोपीय देशांनां उठविण्याचें काम इंग्लंडला सहज साधलें. याप्रमाणें आस्ट्रिया एक लक्ष, प्रशिया दीड दोन लक्ष व रशिया दीड लक्ष सैन्यानिशीं फ्रान्सवर संयुक्त स्वारीची तयारी करून आले. या प्रचंड अरिष्टाला तोंड देण्याकरितां नेपोलियननें मुख्य युक्ति, त्या तीन सैन्यांनां, एकत्र होण्यापूर्वी पृथक् गांठून लढाई देण्याची केली. प्रथम त्यानें आस्ट्रियाचा उल्म येथें व आस्ट्रियन व रशियन संयुक्त सैन्यांचा आस्टरलीड्झ येथें पराभव केला. तेव्हां आस्ट्रियाच्या बादशहानें प्रेसबर्ग येथें तह केल्यावर (ता.१ जानेवारी १८०६) नेपोलियन पॅरिसला परत आला. नंतर पृथक् पणें खुद्द प्रशियावर चाल करून येना येथें प्रशियाचा पराभव केला. बर्लिन हस्तगत करून व सर्व प्रशिया पादाक्रांत करून नेपोलियन पोलंडमधून रशियावर चाल करून गेला. कारण आस्टरलिड्झ येथें पराभव झाला तरी रशियांत परत येऊन झारनें युद्धाची पुन्हां तयारी केली. फ्रेंच व रशियन फौजांच्या पुलटुस्क, गोलीमीन, हाफ, येलो, डांझीग, हिल्सबर्ग, फ्रीडलंड इतक्या ठिकाणीं लढाया होऊन नेपोलियनला जय मिळाले व रशियन सैन्य मागें हटत गेलें. अखेर टिलसिट येथें नेपोलियन, व झार यांचा तह (जून १९०७) झाला. प्रशियाच्या राज्याचा अर्धा भाग त्या राजाराणीच्या विनवण्या न ऐकतां नेपोलियननें घेतला.

बर्लिन डिक्री व इंग्लंडवर व्यापारी बहिष्कार:-- येनाच्या लढाईंत प्रशियाचा पराभव केल्यानंतर बर्लिनमध्यें असतांना नेपोलियननें एक हुकूम (डिक्री) सोडला. या बर्लिन डिक्रीनें (१) इंग्लंडला वेढा पडल्याप्रमाणें मानून इंग्लंडबरोबर कोणी व्यापार करूं नये, (२) इंग्लंडमधून आलेलें व्यापारी जहाज फ्रेंच किंवा फ्रेंचांचे दोस्त यांनीं आपल्या बंदरांत घेऊं नये, (३) हा नियम मोडून इंग्रज जहाज आल्यास तें पकडून ठेवावें, आणि (४) फ्रान्स व फ्रान्सचे दोस्त यांच्या देशांत इंग्रज इसम आढळल्यास त्यास कैद करावें, असे फर्माविलें होतें. अशा रीतीनें इंग्लंडचा व्यापार नष्ट करून खुद्द इंग्लंडचा नाश करावा असें त्यानें योजिलें. टिलसिटच्या तहामुळें रशिया, प्रशिया आस्ट्रिया वगैरे उत्तर यूरोपीय सर्व देश, नेपोलियनचें हें धोरण मान्य करण्यास बांधले गेले. बर्लिन डिक्रीच्या प्रतिकारार्थ इंग्लंडनें असा ठराव केला की, “ दर्यावर्दी सर्व जहाजांनीं इंग्लंड व इंग्लंडच्या दोस्त बंदरांत थांबून तेथें स्वत:ची नोंद केली पाहिजे, न केल्यास तें जहाज शत्रुतर्फेचें समजून आम्ही तें अडकवूं व माल जप्त करूं ”. दर्याची सफर बिनधोक व्हावी म्हणून सर्व जहाजें अशी नोंद करू लागलीं. तें कळतांच नेपोलियननें इटालींत मिलन येथून ‘ मिलनडिक्री ’ नांवाचा असा हुकूम सोडला कीं “ जी जहाजें अशी नोंद करतील ती सर्व शत्रूपक्षाचीं समजून त्यांचा माल जमिनीवर उतरूं देऊं नये. उतरल्यास मालासह जहाज जप्त करावें ”. या दोघांच्या ठरावामुळें व्यापारी जहाजांची त्रिशंकूसारखी स्थिती झाली. तीं इंग्लंडपक्षाच्या बंदरांत न लावलीं तर इंग्रज लुटणार व लावलीं तर नेपोलियन लुटणार ! यामुळें युरोपचा व्यापार नष्ट होण्याची वेळ येऊन नेपोलियनचा हुकूम अमान्य करण्याकडे यूरोपीय देशांचा कल झाला. पोर्तुगाल देश व्यापाराचें केंद्र असल्यामुळें तो देश जिंकणें नेपोलियनला जरूर झालें व त्याकरितां प्रथम स्पेन हस्तगत करण्याच्या उद्यागास तो लागला. स्पेनचा राजा व राजपुत्र यांच्यामध्यें भांडण होतें तें तोडण्याचें काम त्यांनीं नेपोलियनला सांगितलें. तेव्हां त्यानें दोघांकडून राजीनामे घेऊन आपला भाऊ जोसेफ याला राजा नेमलें. पण या सर्व कारवाईमुळें स्पॅनिश लोक चिडून त्यांनीं बंड करून नेपोलियनचा सरदार डयूपाँ याच्या सैन्याचा बेलेन येथें पराभव करून त्याला कैद केलें. स्पॅनिश लोकांच्या या बंडास मदत करण्याकरितां इंग्लंडनें पोर्तुगालमध्यें सर जॉन मूरच्या हाताखालीं मोठें सैन्य उतरविलें. या सुमारास टिलसिटच्या तहांत कांहीं फेरफार करण्याच्या उद्देशानें नेपोलियन व अलेक्झांडर झार यांची मुलाखत झाली (ता. २७ सप्टेंबर ते १४ आक्टोबर १८०८) . पण अलीकडे विश्वासघातकी बनलेला नेपोलियनचा परराष्ट्रमंत्री टालेरांड ह्यानें गुप्तपणें झारचें मन नेपोलियनविरुद्ध कलुषित केल्यामुळें मुलाखतींत नेपोलियनचा उद्देश साधला नाहीं.

पेनिन्शुलर युदध:-- पॅरिसला परत आला त्या वेळीं नेपोलियनला स्पेनची परिस्थिति कळल्यामुळें तिकडे स्वत: स्वारी करण्याकरितां तो दोन लक्ष सैन्य घेऊन गेला, व सोमोरीरा येथें स्पॅनिश सैन्याचा पराभव करून व मॅड्रिड राजधानी काबीज करून सर जॉन मूरच्या इंग्रज सैन्यावर चाल करून गेला. पण मूरनें लढाई न करतां माघार घेऊन समुद्रावर आरमारांत आश्रय घेतला. तेव्हां त्याच्या बंदोबस्ताचें काम सौल्ट या सरदारास सांगून नेपोलियन आस्ट्रियावर स्वारी करण्याकरितां फ्रान्सला परत गेला. नंतर फ्रेंच व इंग्रज यांची कोरुना येथें लढाई होऊन फ्रेंचांचा पराभव झाला. या लढाईंत मूर मरण पावला व आर्थर वेलस्ली उर्फ डयूक ऑफ वेलिंग्टनकडे इंग्रजांचे सेनापतित्व गेलें. इंग्रज व स्पॅनिश सैन्यांची पुढे सरशी होत गेली. पण स्वत: नेपोलियनला स्पेनमध्यें पुन्हां येण्यास अवसर मिळाला नाही.

आस्ट्रियाशीं युद्ध:-- स्पेनमधून नेपोलियनला वळविण्याकरितांच इंग्ल्डंनें पुन्हां आस्ट्रियाला भर देऊन युद्धास सिद्ध केलें. तीन लक्ष सैन्य घेऊन आर्चडयूक चार्लस हा फ्रान्सवर निघाला. तें ऐकून स्वत: नेपोलियन अनेक सरदारांसह विद्युद्वेगानें आस्ट्रियांत शिरला. एकमल, राटिसबन व व्हिएन्ना या तीन लढायांत जय, एसलिंग्टन येथें पराजय, पण शेवटीं वाग्रामच्या लढाईंत नेपोलियनला जय मिळाला व शौनब्रुन येथें १४ आक्टोबर १८०९ रोजीं त्यानें तह केला. याच सुमारास नेपोलियनचा पोपशीं बेबनाव झाल्यामुळें त्यानें पोपचा मुलूख खालसा केला व खुद्द पोपला कैद करून फ्रान्समध्यें आणलें. इंग्लंडवरील व्यापारी बहिष्कार नीट अमलांत यावा म्हणून त्यानें हॉलंड व जर्मनीचा कांहीं वायव्य किनारा आपल्या साम्राज्यास जोडला. नेपोलियनच्या राज्यतृष्णेमुळें देशोदेशींचे लोक त्याचे शत्रु बनत होते. वाग्रामच्या लढाईनंतर एका आस्ट्रियन तरूण विद्यार्थ्यानें भर दिवसां नेपोलियनच्या खुनाचा प्रयत्‍न केला. खुद्द फ्रेंच जनसमाज आतां नेपोलियनच्या लढायांनां कंटाळला होता. पूर्वी सैन्यांत स्वखुशीनें वाटेल तितकी भरती होत असे, त्याऐवजीं आतां सक्तीनें भरती करावी लागे. शिवाय पूर्वीचे अनेक अनुभवी सेनापती व शिपाई मरण पावून सैन्यांत बरीचशी नवी भरती झाली होती, व सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वत: नेपोलियन अविरत मानसिक व शारीरिक श्रमामुळें व वयोमानाप्रमाणें कांहींसा कमकुवत बनला होता. पण नेपोलियननें स्वत:ला साम्राज्यतृष्णेमुळें इतके शत्रू उत्पन्न करून ठेवले होते कीं, युद्ध कायमचें थांबवून स्वस्थपणें केवळ राज्याचा कारभार पहात राहणें त्याला अशक्य झालें होतें.

घटस्फोट व नवें लग्न:-- वाढती साम्राज्यतृष्णा व अनियंत्रित अधिकार या दोन चुकांच्या जोडीला औरस संततीकरितां धडपड सुरू केल्यामुळें नेपोलियनचे लोकसत्ताक राज्यपद्धतीच्या तत्वाविरूद्ध जणूं शंभर अपराध पुरे झाले ! पहिल्या जोसेफाइन बायकोपासून पुत्र न झाल्यामुळें व फ्रान्समध्यें एक पत्‍नीव्रताचा कायदा असल्यामुळें घटस्फोट केल्याशिवाय दुसरें लग्न शक्य नव्हतें. पण जोसेफाइननें नेपोलियनला मुलगा होणारच नाहीं अशी त्याची समजूत केली होती. ही समजूत अलीकडे नेपोलियनला झालेल्या अनौरस संततीमुळें दूर होऊन त्यानें घटस्फोटाचा विचार कायम केला. नेपोलियन स्त्रीविषयक नीतींत इतका सैल होता कीं, त्याचा जनानखाना आशियांतल्या बादशहाला साजेलसा असे. १८०६ सालीं मॅडम डेन्यूली या उपस्त्रीपासून नेपोलियनला मुलगा झाला व १८०९ सालीं मॅडम वालावास्का नांवाच्या त्याच्या उपस्त्रीलाहि मूल होण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं.यामुळें खात्री पटून नेपोलियननें जोसेफाइनशीं  ‘ डायव्होर्स ’  [घटस्फोट] (जाने. १८१०); केलें व झारच्या बहिणीला मागणी घातली. झारच्या मनांत असतांहि त्याच्या आईनें पिढीजादे राजघराण्याबाहेर मुलगी देण्याचे नाकारलें;  तेव्हां नेपोलियननें आंस्ट्रियन बादशहाला विनंति केली. ती मान्य होऊन आंस्ट्रियन राजकन्या मराया लुइसा हिच्याबरोबर त्याचा विवाह २ एप्रिल १९१० रोजीं   लागला, व २० मार्च १९११ रोजीं मुलगा होऊन नेपोलियनची वारसेच्छा सफळ झाली.

रशियावरील मोहिम:-- रशियन राजकन्येशी विवाहाचें न जमल्यामुळें नेपोलियन व झार दोघेहि नाखुष झाले होते. शिवाय टिलसिटच्या तहाप्रमाणें पोलंड व कॉन्स्टांटिनोपल रशियाला देण्याची टाळाटाळ नेपोलियन करीत होता. उलट ‘ कान्टिनेंटल सिस्टिम ’ मुळें रशियन लोक नाखुष होऊन पूर्ववत व्यापार सुरू करण्याचें आतां झारनें ठरविलें. झारची मुलाखत घेण्याचा नेपोलियननें प्रयत्‍न केला पण तो रशियन मुत्सद्यांनीं साधूं न दिल्यामुळें नेपोलियनला रशियावर स्वारी करणें भाग झालें. सहा लक्ष सैन्य व सोळाशें तोफा घेऊन तो ९ मे १८१२ रोजीं निघाला. रशियांत विल्ना, विटेप्स्क, स्मोलेन्स्क, बोरोडिनो व शेवटीं मास्को इतक्या ठिकाणीं रशियन सैन्याशीं मोठी लढाई देण्याचा नेपोलियननें यत्‍न केला. पैकीं बोरोडिनो येथें मात्र लढाई झाली तींत नेपोलियन विजयी झाला. पण इतर ठिकणीं रशियानें गनिमी काव्याची योजना केली. नेपोलियनचें सैन्य अंगावर पूर्ण चालून आलें कीं, लढाई न देतां माघार घ्यावयाची, हा क्रम ठेवून रशियनांनी नेपोलियनला आंत मास्को शहरापर्यत खेचलें व तेंहि शहर त्याच्या हवालीं बिनहरकत केलें; इतकेंच नव्हे तर नेपोलियनचा मुक्काम शहरांत असतां रात्री शहरास आग लावून फ्रेंच सैन्याचे हाल केले. नेपोलियननें तहाचें बोलणें सुरू करण्याचे प्रयत्‍न केले, तिकडे झारनें दुर्लक्ष केलें. याप्रमाणें सामोपचाराचा किंवा विजयाचा कोणताच तह न साधल्यामुळें नेपोलियन पक्का नाडला गेला, व पूर्ण नामुष्की व लढाईपेक्षांहि केवळ रशियन हिवाळ्यानें सैन्याचा मोठा नाश पदरी घेऊन तो डिसेंबर अखेर फक्त तीस हजार सैन्यासह पॅरीसला परत आला.

नेपोलियनविरुद्ध रशिया, प्रशिया, इंग्लंड, आस्ट्रिया व फितुर फ्रेंच सरदार:-- नेपोलियनच्या मागोमाग रशियाचा अलेक्झांडर झार युद्धाच्या बेतानें आला व प्रशियन राजा फ्रेडरिक, आस्ट्रियाचा राजा व इंग्लंड या सर्वांच्या मदतीनें फ्रान्सवर चाल करण्याच्या उद्योगास लागला. नेपोलियननें या संकटास तोंड देण्याची तयारी लगेच सुरू केली. प्रथम कैदेंतील पोपला सोडून त्याच्याशी सलोखा केला. सेनेट सभेला सर्व परिस्थिति कळवून साडेतीन लाख सैन्यभरतीचा कायदा करून घेतला; व घरंदाज लोकांकडून स्वयंसैनिकांची पथकें उभारली. थोडक्या दिवसांत सर्व तयारी करून संयुक्तांच्या फौजा एकत्र होण्यापूर्वी त्यांचा पृथक्-पृथक् पराभव करण्याच्या योजनेनें तो निघाला. आस्ट्रिया स्वत:ला मिळावा निदान तटस्थ रहावा म्हणून त्यानें खटपट केली, पण आस्ट्रियन प्रधान मेटरनिक यानें नेपोलियनची अखेर लावण्याच्या दूरवर धोरणानें वरून तहाचीं बोलणीं लावून आंतून संयुक्तांनां पूर्ण मदत केली, व अखेर उघडपणें संयुक्तांस मिळाला. शिवाय या वेळीं नेपोलियनविरुद्ध संयुक्तांनीं “ सर्व राजांनीं व संस्थानिकांनीं आपापलीं सैन्यें घेऊन नेपोलियनच्या जाचांतून यूरोप मोकळें करण्यास मदत करावी ” असा जाहीरनामा ता. १९ मार्च १८१३ रोजीं काढला आणि झारनें प्रत्यक्ष पत्रें पाठवून व लालूच दाखवून नेपोलियनच्या अनेक मांडलिकांनां नेपोलियनविरुद्ध उठविलें: इतकेंच नव्हे तर खुद्द नेपोलियनचे जुने सरदार व सैन्य यांनां फितुर करण्याचे यत्‍न केले. उभय सैन्यांची पहिली लढाई लटझेन येथें, दुसरी ड्रेसडेन व तिसरी बटझेन येथें होऊन  तिन्हींत नेपोलियनला जय मिळाला. तेव्हां मेटरनिकनें तहाचीं बोलणीं सुरू केली. अद्याप आस्ट्रिया तटस्थ होता. तह करण्याचा संयुक्तांचा विचार नसून केवळ तयारीस फुरसत मिळण्याकरितां तहाचीं बोलणीं चालू ठेवलीं होतीं नेपोलियनलाहि तयारीला अवसर मिळाला; तथापि त्याला तह मनापासून पाहिजे होता.पण मेटरनिकनें अशक्य अटी हळूहळू पुढें करून संयुक्तांची पुन्हां तयारी होतांच तह होत नाहीं असें जाहीर केलें, व आस्ट्रिया उघडपणें संयुक्तांस मिळाला. या वेळेच्या संयुक्तांच्या तयारींत अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरनेडो, मोरेऊ व जोमिनी या नेपोलियनकडील कसलेल्या सरदारांची प्राप्ति. या फितूर सरदारांनीं संयुक्तांनां असा सल्ला दिला कीं, “ संयुक्तांचें सैन्य केवढेंहि असलें तरी प्रत्यक्ष नेपोलियन जेथें जातीनें हजर असेल तेथें त्याच्या सामन्यास उभे राहूं नये व लढाई देण्याचें धाडस करूं नये. तेथून पळ काढावा  आणि तो नसेल तेथें त्याच्या सरदारांशीं लढाई देऊन फ्रेंच सैन्याचा नाश करावा ”.  ही युक्ति लिजनिटस, ड्रेसडेन, गोरलिझ वगैरे ठिकाणीं अवलंबिल्यामुळें नेपोलियनला विनाकारण धांवपळ करावी लागून सैन्यांत अव्यवस्था फार झाली. शिवाय सैन्याच्या तुकड्याच्या तुकड्या फितूर होऊन संयुक्तांनां मिळूं लागल्या अशा स्थितींत संयुक्तांनी मोठ्या सैन्यानिशीं खुद्द नेपोलियनशीं लिप्झिक येथें मोठी लढाई दिली तींत नेपोलियनचा पराभव झाला. तेव्हां माघार घेत नेपोलियन ९ नोव्हेंबर १८१३ रोजीं पॅरिसला परत आला. कारण पॅरिसमध्येंहि फितुरी माजून सर्व अव्यवस्था झाली होती. येथें फितुरांचा अग्रणी खुद्द टालेरांड होता.नेपोलियन  ‘ लेजिस्लेटिव्ह बॉडी ’,  या सभेपुढें नवें सैन्य मागूं लागला पण तें नाकारण्यांत आलें. तथापि संयुक्तांची फौज फ्रेंच सरहद्दीवर जमल्यामुळें खुद्द फ्रान्सच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, हें निरनिराळ्या लष्करी व मुलकी शिष्टांच्या सभेंत समजून सांगितल्यावर नेपोलियन म्हणाला “ जगाची सत्ता फ्रान्सला मिळवून द्यावी अशी मी हिंमत बांधली होती. पण फ्रान्सच्या लोकवस्तीच्या मानानें पाहतां माझे बेत अफाट होते. या बाबींतल्या चुकीमुळें माझे अंदाज फसले. त्याकरितां कांही भोगावें लागल्यास मी स्वत: भोगीन प्रसंग पाहून वेळ पडेल त्याप्रमाणें मी तहहिं करीन ”. या भाषणानें देशसंरक्षणाकरितां सैन्यांत दाखल झालेले लोक घेऊन नेपोलियननें संयुक्तांविरुद्ध मार्मंड, मांटेरू, मेरी, सोइसन्स, क्रेओन, र्‍हीम्स वगैरे ठिकाणीं जय मिळविले. पण त्यांत त्याचें बरेच सैन्य नाश पावलें, आणि सर्व तर्‍हेची सामुग्री पॅरिसमधून घेऊन येणारे खटारे शत्रूंनी हस्तगत केले. तेव्हां संयुक्तांनां अडविण्याचें काम अशक्य होऊन त्यांच्या दोन लाख सैन्यानें चाल करून पॅरिस शहर हस्तगत केलें.
     
राज्यत्याग, एल्बानिवास, पुन: राज्यप्राप्ति व वाटर्लूस पराजय:-- सैन्याच्या अभावामुळें लढाई न करतां नेपोलियन फान्टेनब्लू येथें राहिला. पॅरिसमध्यें टालेरांडनें  सीनेट सभा भरवून ‘ नेपोलियनला सिंहासनावरून दूर केलें आहे ’ असा ठराव केला. नेपोलियनचे बहुतेक सरदार आतां संयुक्तांना मिळाले होते. त्यांपैकी ने, बरथियर, लेफेरे, उदीनो व कालिनकूर यांनीं नेपोलियनची गांठ घेऊन राज्याचा राजीनामा देण्यास त्याचें मन वळविलें. राजीनामा दिल्यावर संयुक्तांशीं फान्टेनब्लूचा तह कालिनकूरनें जुळवून आणून (१) नेपोलियनला एल्बाबेट द्यावें, (२) त्याला तेथील बादशहा व पूर्ण स्वतंत्र मालक समजावा, (३) त्यानें तेथें सैन्य ठेवावें, (४) फ्रेंच खजिन्यांतून वीस लक्ष फ्रँक त्याला मिळावे, (५) व त्याची आई, मुलगा वगैरेंनां अशाच रकमा मिळत जाव्या वगैरे अटी ठरल्या. तदनुसार ३ मे १८१४ रोजीं तो एल्बांत दाखल झाला, व राजा या नात्यानें सर्व कारभार त्यानें सुरू केला. मुलकी व लष्करी अधिकारी नेमले; सडका, कालवे, शेतकीसुधारणा, खाणी, तसेंच सैन्य, आरमार, तटबंदी वगैरे गोष्टी त्यानें सुरू करून त्या बेटाला लवकरच नवें रूप दिलें. पण या सुधारणांकरितां त्याला लवकरच पैशाची अडचण भासूं लागली. त्याच्या स्त्रीपुत्राला मेटरनिकनें एल्बास धाडण्याचें नाकारलें. तिकडे फ्रन्समध्यें लुई राजानें अनियंत्रित राज्यकारभार सुरू केल्यामुळें लवकरच तो अप्रिय बनला. हे सर्व जाणून नेपोलियननें पुन्हां फ्रान्समध्ये परत येण्याचें अगदी गुप्तपणें ठरवून दहा महिन्यांनीं ता. १ मार्च १८१५ रोजीं १२१९ लोकांसह तो फ्रान्सच्या किनार्‍यावर उतरला व अत्यंत युक्तीनें त्यानें फ्रेंच लोकांस व लुई बादशहाच्या लष्करास आपल्या बाजूस वळवून घेऊन एकहि बंदूक न झाडतां पॅरिस शहर हस्तगत केलें. लुई राजा सैन्य फितल्यामुळें पळून पुन्हां संयुक्तांच्या आश्रयास गेला. पॅरिसला येतांच नेपोलियननें राज्यकारभार सुरू केला. मुलकी व लष्करी अधिकारी नेमले व बेंजामिन कान्स्टंट यानें तयार केलेली इंग्लंडच्या सारखी नियंत्रित राज्यपद्धति (लिमिटेड मॉनर्की) मान्य केली, आणि कालिनकूर, फूशे, सावारी, दाव्हू, सौल्ट, वगैरे जुन्या इसमांस अधिकारी नेमलें. नेपोलियन परत आल्याचें कळतांच संयुक्तांनीं पुन्हां प्रत्येकी दीड लाख सैन्य घेऊन फ्रान्सवर स्वारी केली. ‘ मी यापुढें फ्रान्सच्या बाहेर ढुंकूनहि पाहणार नाही ’ असे अनेक वार जाहीर  केलें. पण संयुक्तांनीं तिकडे लक्ष न देतां चाल केली. तेव्हां नेपोलियन नवें सैन्य घेऊन ता. ११ जून, १८१५ रोजीं लढाईवर निघाला. संयुक्तांचे सेनापती ब्लूचर व वेलिंग्टन यांना प्रथम लढाई देण्याचे ठरवून ने, सौल्ट, रिय्या, एरला वगैरे सरदारांस हुकूम दिले. लिग्नी येथें ब्लूचरच्या सैन्याचा फ्रेंचांनीं पराभवहि केला. क्वाटरब्रासच्या लढाईत इंग्रज व फ्रेंच यांची बरोबरी झाली. पण पुढें वाटर्लू येथें एकट्या वेलिंग्टनला गांठण्याचा डाव , नेपोलियनच्या ग्राऊची सरदारास ब्लूचरचें प्रशियन सैन्य अडवून धरण्याचें न साधल्यामुळें, अखेर फसला; आणि वाटर्लूच्या लढाईत (ता. १८ जून, १८१५) फ्रेचांनां वेलिंग्टनच्या सैन्यावर जय मिळणार अशा संधीस ब्लूचरची कुमक येऊन पोहोंचल्यामुळें फ्रेचांचा पूर्ण मोड झाला.

कैद व सेंट हेलिना बेटांत अखेर:-- सैन्य न उरल्यामुळें लढाई थांबवून नेपोलियननें लेयॉन येथून सर्व वृत्त पॅरिसला कळविलें व नंतर २१ जून रोजी पॅरिसमध्यें गेला, व कोरनो, फूशे, रेनो, लुसीन वगैरेंचा सल्ला त्यानें विचारला. प्रतिनिधिसभेची (चेंबर ऑफ डेप्युटीज) बैठक भरविण्यांत आली.  “ राष्ट्र संकटात आहे. यावेळीं जो आमची सभा बरखास्त करण्याचा प्रयत्‍न करील तो राष्ट्रद्रोही समजला जाईल, व त्यास त्या गुन्ह्याचें शासन मिळेल. लष्करी अम्मलदार, परराष्ट्रीय वकील व राष्ट्रांतले अधिकारी यांनीं एकदम येथें जमावें अशी आम्ही आज्ञा करतो ” असा ठराव सभेनें करून तो नेपोलियनकडेहि पाठविला. पुन्हां भरलेल्या बैठकींत स्वत: हजर न राहतां  नेपोलियननें लुसीन बोनापार्टला लढाईची हकीकत सांगण्यास पाठविलें. सभेनें पुढील सूचना करण्याकरितां पांच जणांची कमिटि नेमली. त्यांच्या सूचना आल्यावर दुसर्‍या दिवशीच्या बैठकींत “ नेपोलियन बादशहास आपल्या राज्यचा राजीनामा देण्यास सुचवावें ” असा ठराव केला. त्याप्रमाणें नेपोलियननें राजीनामा लिहून दिला तो :- “ माझें राजकीय जीवित संपलें, आणि आतां मी आपल्या मुलास ‘ दुसरा नेपोलियन ’ या नांवानें फ्रान्सचा बादशहा जाहीर करतों. ‘ स्वतंत्र राष्ट्र ’ असें राहतां यावें व्हणून सर्वांच्या संरक्षणाकरितां एकदिल व्हा ”. इत्यादि राजीनामा झाल्यावर चेंबर्स सभांनीं तात्पुरत्या मंत्रिमंडळाकडे राज्यकारभार सोंपविला. मंत्रिमंडळानें दोस्तांच्या पॅरिसवर चाल करून येणार्‍या सरदारांस तह करण्याची विनंति केली; तिला ब्लूचरनें उत्तर दिलें कीं, “ नेपोलियनला धरून माझ्या सैन्यामध्यें सर्व शिपायांदेखत फांशीं दिल्याशिवाय मी कांहींएक ऐकणार नाहीं ”. ही परिस्थिति पाहून नेपोलियननें अमेरिकेंत जाण्याचें ठरविलें. समुद्रावर ब्रिटिश आरमार पहारा करीत होतें. त्याच्या मेटलंड नांवाच्या अधिकार्‍यास ब्रिटिश सरकारकडून अमेरिकेस जाण्याचा परवाना देण्याबद्दल विचारलें. परवान्याचें नक्की न सांगतां मेटलंडनें नेपोलियनला इंग्लंडांत नेण्याचें कबूल करून आपल्या जहाजावर नेपोलियन व त्याच्या मंडळीस घेतलें. ब्रिटिश किनार्‍याजवळ आल्यावर ब्रिटिश सरकारनें इंग्लंडांत उतरण्याची परवानगी न देतां नेपोलियनला कैदी म्हणून सेंट हेलिना बेटांत ता. १६ नोव्हेंबर, १८१५ रोजीं नेऊन ठेविलें. सर हडसन लो नांवाचा लष्करी अम्मलदार बेटाचा गव्हर्नर नेमला. फ्रान्स, आस्ट्रिया व रशिया यांनीहि एकेक कमिशनर  नेमला होता. ते सर्व नालायक असल्यामुळें नेपोलियननें कोणाचीहि भेट घेतली नाहीं.

नेपोलियनला खर्चाकरितां सालीना ८००० पौंडांची नेमणूक होती. तेथें बरट्रांड, गोरगोड, लास कासेस, माँथोलोन वगैरे ५१ माणसें होतीं. नेपोलियननें तेथें आपलें आत्मचरित्र व इतर कांहीं विषयांवर लेख लिहिले व शेवटीं एक मृत्युपत्रहि लिहिलें. तेथून पळून जाण्याचें त्यानें कधीं मनांतहि आणलें.  सेंट हेलिनाला गेल्यापासूनच त्याची प्रकृति खालावत जाऊन अखेर तो ता. ५ मे, स. १८२१ रोजीं मरण पावला. त्याचे मृत शरीर फाडून कोथळा व काळीज शस्त्रवैद्याकडून हडसन लो यानें बाहेर काढवलें व नंतर त्याच्या शवाचे दफन त्या बेटांतच केलें. पुढें एकोणीस वर्षांनीं नेपोलियनचें तें शव मोठ्या समारंभानें पॅरिस येथें नेऊन पुरण्यांत आले.      

नेपोलियनचें युद्धकैशल्य:-- अलीकडे फ्रेंच जनरल स्टाफनें नेपोलियनचें प्रत्यक्ष रणांगणावरचे बरेचसे हुकूम प्रसिद्ध केल्यामुळें या बाबतींत निश्चित मत बनवितां आलें आहे. तत्पूर्वी “ नेपोलियन म्हणजे ४० हजार सैन्य ” इतकें त्याच्या रणांगणावर प्रत्यक्ष हजर असण्यास महत्व त्याच्या शत्रूनीं दिलेलें वाचून मोठें गूढ वाटत असे, तें आतां उकललें आहे. त्याला उत्कृष्ट शिक्षकांकडून लष्करी शिक्षण मिळालें होतें; त्याला तोफखाना, तटबंदी व डोंगराळ मुलुखांतल्या लढाया यांविषयींचें पक्के ज्ञान होतें. लष्करी ज्ञानाला तो शास्त्रीय व गणिती पद्धति लागू करून प्रत्यक्ष लढाईंत त्याची यशस्विता सिद्ध करण्याचे प्रसंग त्यानें लवकरच मिळविले. लढाईच्या तत्कालीन सर्व डावपेचांचें पूर्ण ज्ञान, अविरत उद्योग, हिंमत व विलक्षण धाडस या अनेक गुणांवर त्यानें १८०५ सालापर्यंतच्या सर्व लढाया जिंकल्या. त्यांत नेपोलियनची स्वत:ची नवी युक्ति किंवा शोध कोणताहि नव्हता. पण या सर्व काळांत कांहीं तरी नवी युक्ति शोधून काढण्याकडे त्याचें गणिती मन सारखें गुंतलें होतें. घोडेस्वारांच्या पथकाचा आडोसा (कॅव्हलरी स्कीन)  पुढें करून त्याच्या मागून सर्व पायदळ सैन्य न्यावें अशीं योजना त्यानें १८०५ सालीं सुरू केली. पण एका विशिष्ट घटकेला शत्रुसैन्याची असलेली रचना ४८ तासांनंतर तशीच कायम राहणें शक्य नसल्यामुळें घोडदळामागें सर्व सैन्य एकत्र ठेवणें इष्ट नसे. म्हणून १८०६ सालीं नेपोलियननें अशी युक्ति काढली कीं घोडेदळामागें फक्त सर्व हत्यारबंद असलेली आघाडी पलटण (अडव्हान्स्ड गार्ड) ठेवून बाकीचें सैन्य एक दिवसाच्या अंतरावर ठेवायचें आणि शत्रुसैन्याच्या हालचालीनुरूप या मागल्या सैन्याच्या हालचाली करावयाच्या. आस्टरलिझ, येना, फ्रिडलँड वगैरे लढायांत व नंतरच्या कांहीं लढायांत त्यानें हीच युक्ति योजली. पण पुलटुस्क, हील्सबर्ग वगैरे लढायांत ती योजली नाहीं. कारण या युक्तिवर त्याचा पूर्ण विश्वास नव्हता, व ती त्यानें स्वत:च्या कोणाहि सेनापतीला सांगितली नव्हती. नेपोलियन व त्याचे तत्कालीन प्रतिस्पर्धी त्यांच्यामध्यें एक विशेष महत्वाचा फरक हा असे कीं, लढाईच्या अगदी आणीबाणीच्या व अवघड प्रसंगींहि नेपोलियन अगदी शांतचित्त असे; कारण शत्रु कोणत्या स्थितींत असेल, काय हालचाली करील यासंबंधी सर्व गोष्टी आगाऊ नीट लक्षांत आणून तो आपली लढाईची योजना आगाऊ ठरवित असे. उलटपक्षीं फ्रेंच सैन्याच्या लढाई जुंपल्यावरच्या विविध हालचाली पाहून शत्रूकडील सेनापती गोंधळून जात व लढाईच्या ऐन धामधुमींत क्षणोक्षणीं बदलणार्‍या परिस्थित्यनुरूप निर्णय ठरवून निरनिराळे हुकूम सोडण्याचें त्यांनां साधत नसे, या एका गोष्टींतच नेपोलियनच्या सर्व विजयांचें रहस्य आहे.

नेपोलियची योग्यता:-- नेपोलियनची बुद्धि सर्वगामी होती. त्याला अगम्य व असाध्य असा कोणताच विषय नव्हता. या अचाट बुद्धिमत्तेबरोबरच सर्व विषयांचें, अगदीं चालू काळापर्यंतचें ज्ञान मिळविलें पाहिजे ही जाणीव नेपोलियनला पूर्ण होती. बुद्धिमान इसम बहुधां ज्ञानार्जनांत आळशी असतात व थोडक्या वाचनानें सर्वज्ञ बनण्याचा त्यांनां मोह पडतो. नेपोलियनचें ग्रंथवाचन किती विस्तृत व विविध होतें हें त्याच्या उपलब्ध नोटबुकांवरून कळतें. फ्रेंच राज्यक्रांतींतील राजनितीशास्त्र, समाजशास्त्र वगैरे विषयांत कसलेल्या पंडितांवरहि त्यानें प्रथम प्रथम भाषणानें व निबंधलेखनानें छाप पाडली; गोएटे वगैरे यूरोपीय कविवर्यांकडून त्यानें प्रशंसा मिळविली. राज्यकारभार, समाजनियमन, धर्मकारण, कायदा, युद्धकला,व सेनापतित्व वगैरे विषयांत केवळ तात्विक सिद्धांतांनीं नव्हे तर प्रत्यक्ष कार्य करून दाखवून त्यानें राजांनां व राज्यमंत्र्यांनां तसेंच योद्धयांनां व सेनापतींनां आदर्शभूत व्हावें असें आचरण करून ठेविलें आहे.

नेपोलियनचे दोष:-- नेपोलियनचे मुख्य दोष त्याचे स्त्रीविषयक अनिर्बंध वर्तन व राक्षसी महत्वाकांक्षा हे दोन प्रामुख्यानें दाखविण्यांत येतात. भारतीय नीतिमत्तेच्या अभिमानी लेखकांना तर नेपोलियनचा कमीपणा फक्त उपयुक्त नैतिक दुराचरणांत दिसतो. कोणत्याहि इसमाचें सार्वजनिक महत्पद खाजगी निर्दोष आचरणाच्या कोदणांत विशेष खुलते यांत शंका नाहीं. पण नेपोलियनला या बाबतींत विशेष दोष देतांना पौरस्त्यांच्या विशिष्ट नीतिकल्पना यूरोपीयन समाजांत कधींच रूढ नव्हत्या व नाहींत हें लक्षांत ठेवलें पाहिजे. तत्कालीन फ्रान्सचा लुई व इंग्लंडचा जार्ज बादशहा यांच्याहून अधिक दुराचरणी नेपोलियन खास नव्हता व यामुळें पाश्चात्त्य लेखक नेपोलियनच्या या वैगुण्याकडे फारसें लक्ष देत नाहींत. उलटपक्षीं पौरस्त्य लेखकांनां अनियंत्रित राज्यपद्धति युगानुयुगें हाडीमांसीं खिळलेली असल्यामुळें “ रिपब्लिक ” (लोकशाही)  किंवा नियंत्रित राज्यपद्धति (लिमिटेड मॉनर्की) या यूरोपांतील परिणत शासनपद्धतीविरूद्ध नेपोलियननें केलेल्या घोर चुकांचें फारसें महत्व वाटत नाहीं. नेपोलियनची साम्राज्य स्थापण्याची महत्वाकांक्षा काहीं मराठी लेखकांनां राक्षसी वाटते, पण इंग्लंडनें अखिल जगावर स्थापलेलें साम्राज्य त्यांनां आसुरी वृत्तीचें द्योतक वाटत नाहीं हें आश्चर्य आहें. नेपोलियनची अलीकडील जर्मन कायरसशीं किंवा प्राचीन अलेक्झांडर, सीझर, वगैरे जगजेत्यांशीं तुलना करतात. राज्यक्रांतीतील पुढारी म्हणून त्याची तुलना इंग्लंडच्या क्रामवेलशींहि करावयास पाहिजे. सेनापति या नात्यानें तो वरील चौघांहून श्रेष्ठ होता, कारण कायसर प्रत्यक्ष सेनापति नसे; अलेक्झांडर व सीझर यांचे विजय युद्धकलेंत मागासलेल्या लोकांवर मिळविलेले होते आणि क्रामवेलनें तर लष्करी पेषांत न मुरलेल्या आपल्याच देशबांधवांवर काय ते जय मिळविले; यूरोपीय रणसंग्रामावर त्याचें युद्धकौशल्य कसास लागलेंच नाहीं.

नेपोलियनच्या धोरणांतल्या मुख्य चुका दोन दिसतात:-- (१) लोकशाहीच्या राज्यपद्धतीकडील तत्कालीन विद्वानांच्या ओढ्याकडे त्यानें केलेलें दुर्लक्ष्य; आणि (२) यूरोपांत साम्राज्य स्थापण्याची अशक्यता या ऐतिहासिक सिद्धांताचें अज्ञान. पहिल्या चुकीमुळें टालेरांड, फूशे, प्रत्यक्ष त्याचा भाऊ लुसीन बोनापार्ट वगैरे प्रमुख फ्रेंच विद्वान नेपोलियनचे विरोधी बनले; आणि टालेरांड व फूशे यांनीं तर रशिया व इंग्लंडशीं फितुरीनें संगनमत करून नेपोलियनला रसातळास पोंचविलें. रशियन झारला टालेरांड हा गुप्तपणें नेपोलियनचे सर्व बेत कळवी आणि फूशेनें शेवटच्या मोहिमेचे (बाटर्लू वगैरे लढायांच्या वेळेचे)  नेपोलियनचे नकाशे व कागदपत्र वेलिंग्टनकडे आगाऊ धाडले. अनेक फ्रेंच मुत्सदी व सेनापती फितूर झाले. या सर्वांचें कारण नेपोलियनची अनियंत्रित बादशाही सत्ता फ्रेंच पुढार्‍यांनां नको होती. नेपोलियननें वॉशिंग्टनप्रमाणें लोकशाहीचा अध्यक्ष होण्याचें ध्येय ठेवलें असतें तर त्याला वॉशिंग्टनप्रमाणें फ्रेंच राष्ट्रानें एकदां सोडून दोन चारदां अध्यक्षपद दिलें असतें; कारण फ्रेंच राष्ट्राच्या सुधारणेच्या गोष्टी त्यानें अल्पावधींत कोणाहि यूरोपीय प्रधानापेक्षां किवा लोकशाहीच्या अध्यक्षापेक्षां अधिक केल्या होत्या. फ्रेंच राज्यक्रांतीच्या धामधुमीनंतर सुलतानी सत्ता गाजविणार्‍याचीच जरूरी होती, असें कांहीचें मत आहे; पण अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धकाळीं तिकडेहि अशी धामधूम माजली होती. पण जॉर्ज वॉशिंग्टननें पूर्ण निर्लोभी वृत्ती ठेवून लोकशाही राज्यपद्धति पूर्ण यशस्वी करून दाखविली. फ्रान्सचे पुढारी अमेरिकन पुढार्‍यांपेक्षा कांहीं विलक्षण मूर्ख नव्हते. नेपोलियननें क्रॉमवेलचें अनुकरण न करतां वॉशिंग्टनचें केलें असतें म्हणजे हेकेखोर व नाठाळ फ्रेंच वावदूकांनाहि जरूर तर लष्करी सत्तेच्या जोरावर गप्प बसवून शिवाय लोकशाही राज्यपद्धति यशस्वी करतां आली असती. परंतु त्याला विद्वत्तेच्या जोरावर राजकारणी फ्रेंच विद्वानांचा पुढारी बनतांच आलें नाहीं; इतकेंच नव्हे तर खर्‍या लोकप्रतिनिधिसभेंत भाषण करण्यास तो भीत असे, ही गोष्ट, कान्सोलेट स्थापण्याच्या वेळीं व वाटर्लूच्या लढाईनंतर प्रतिनिधिसभेंत त्याची बाजू सावरण्याचें काम लुसीन बोनापार्टला करावें लागलें यावरून स्पष्ट दिसते. याचे कारण तो केवळ लष्करी शाळेंत व बहुतेक खाजगी वाचनानें शिकलेला एकांगी विद्वान बनलेला होता; युनिव्हर्सिटींत पंडितांच्या आखाड्यांत कसून बनलेला विद्वान नव्हता.

त्याची दुसरी चूक, साम्राज्य कोठें वाढवावें या बाबतची. सर्व यूरोपीय देश बहुतेक समबलाचे व समसंस्कृतीचे असल्यामुळें यूरोपीय देशांनां एकमेकांवर साम्राज्य स्थापणें शक्य नाहीं ही गोष्ट फ्रान्स-इंग्लंडमधील शतसांवत्सरिक युद्धानें (हंड्रेड ईयर्स वॉर)  चांगली ठरली. अगदीं नुकतेंच पराभूत झालेल्या जर्मन रूहर प्रांतावर फ्रेंचांनां राजसत्ता स्थापतां आली नाहीं आणि जमीनदोस्त केलेल्या जर्मनीवर  परकी राज्य चालविणयाचें इंग्लंड, फ्रान्ससारख्या बलाढ्य राष्ट्रांच्या स्वप्नांतहि आलें नाहीं, ह्यावरून स्पष्ट दिसते. याच्या अगदीं उलट म्हणजे यूरोपवर फ्रेंच साम्राज्य स्थापण्याची नेपोलियनची महत्वाकांक्षा, शस्त्रबलांत व संस्कृतींत मागासलेल्या देशांवर प्रगत देशांनां साम्राज्य स्थापणें शक्य आहे, इतकेंच नव्हे तर पुढारी राष्ट्रांनां संमत आहे ही गोष्ट, हल्लीं रीफ लोकांनां पारतंत्र्यांत ठेवण्याकरितां चालविलेल्या स्पेन-फ्रान्सच्या प्रयत्‍नांचा निषेध, राष्ट्रसंघ ही जगमान्य संस्था करीत नाहीं यावरून स्पष्ट दिसतें. नेपोलियनचे ईजिप्त वगैरे मागासलेले आफ्रिकन व आशियाटिक देश जिंकण्याचे प्रयत्‍न यशस्वी झाले असते, तर त्याला इंग्लंडेतर यूरोपीय देशांचा फारसा विरोधहि झाला नसता. पण ती दिशा सोडून नेपोलियन यूरोपीय राजांनांच पदच्युत करूं लागला व मांडलिक बनवूं लागला तेव्हां सर्व यूरोपनें खुद्द त्याच्याच देशबांधवांच्या मदतीनें त्याला गारद केलें यांत आश्र्चर्य  कांहींच नाहीं; यांत नेपोलियनच्या शोचनीय चुकांची मात्र कींव येते.

  [ संदर्भग्रंथ—जे. हॉलंड रोज—दि लाईफ ऑफ नेपोलियन;  डब्ल्यू. एम. स्लोन—नेपोलियन: ए. हिस्टरी;ओकोनेर मिरिस—नेपोलियन; दि केंब्रिज मॉडर्न हिस्टरी, व्हा. ९वा, नेपोलियन; कॉरसपॉन्डन्स डी नेपोलियन दि फर्स्ट (३२ व्हाल्यूम्स,पॅरिस ऍबट—दि लाईफ ऑफ नेपोलियन; ओ. ब्रौनिंग—नेपोलियन दि फर्स्ट फेज, इंग्लंड अँड नेपोलियन इन १८०३; एच. ए. एल. फिशर—नेपोलियनिक स्टेट्समनशिप; लेडी मालकम—ए  डायरी ऑफ सेंट हेलेना: डब्लू फॉरसिथ—हिस्टरी ऑफ दि कॅप्टिव्हिटी ऑफ नेपोलियन ऍट सेंट हेलेना; अर्ल ऑफ रोजबरी—नेपोलियन: दि लास्ट फेज; वि. ल. भावे-चक्रवर्ती नेपोलियन.]

दुसरा. – पहिला नेपोलियन याच्या मुलाला बोनापार्टिस्ट पक्षानें दुसरा नेपोलियन हे पद दिलें होतें. १८१४ सालीं पहिल्या नेपोलियननें राज्यत्याग केला त्यावेळी कांहीं दिवस दुसरा नेपोलियन राजा मानला गेला होता व म्हणूनच पुढें प्रिन्स लुई या नेपोलियननें तिसरा नेपोलियन हें नांव धारण केलें.

तिसरा. – (सन १८०८ ते १८७३) चार्लस लुई नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा बादशाहा १८०८ च्या एप्रिलांत पॅरिस येथें जन्मला. हा पहिल्या नेपोलियनचा भाऊ लुई, याचा तिसरा मुलगा. त्याची आई, महाराणी जोसेफाईन हिच्या पहिल्या नवर्‍याची  मलगी हॅर्टन्स ही होय. यामुळें त्याचें, पहिल्या नेपोलियनशीं पुतण्या व सावत्र नातू असें नातें होतें. लुई नेपोलियनच्या औरसपणाबद्दल त्यावेळी शंका प्रदर्शित करण्यांत आल्या होत्या. कारण त्याचा बाप लुई बोनापार्ट हा नेहमीं आजारीं, अस्वस्थ व स्वपत्‍नीविषयीं साशंक असे व आई देखणी व लहरी असून इतकी बेमुवर्त असे की, नवराबायकोचें मुळींच जमत नसे. परंतु बापलेकांतील स्वभावसाम्यामुळें वरील शंका अयोग्य ठरतात. हा प्रथमपासूनच गंभीर व कल्पनासृष्टींत भरार्‍या मारणारा होता. लुई राजाला हद्दपार केल्यावर हॉर्टेन्स आपल्या दोन मुलांसह फ्रान्समध्येंच राहिली होती.

बोर्बोन राजे राज्य करूं लागतांच (सन १८१५) हॉर्टेन्सला फ्रान्स सोडून जावें लागलें. त्या वेळीं माजी लुई राजा फ्लॉरेन्समध्यें रहात होता, त्यानें कोर्टामार्फत वडील मुलाचा कब्जा मिळवला. तेव्हां हॉर्टेन्स ही स्वतंत्र व एकटी कॉन्टन्सरोवरानजीक राहिली. तेथें नेपोलियनचें सिक्षण तिच्या देखरेखीखालीं झालें. त्याला वाङमयाचीच अधिक गोडी असून शारीरिक खेळांतहि तो तरबेज होता. त्याच्या शिक्षकांनीं त्याला फ्रेंच राज्यक्रांती, लोकशाही, फ्रेंच साम्राज्य वगैरे राजकीय प्रश्नांची सविस्तर माहिती देऊन बादशाहा होण्याबद्दलच्या कल्पना लहानपणापासूनच त्याच्या मनांत भरवून दिल्या होत्या. सन १८२३ मध्यें तो आपल्या आईबरोबर बापाला भेटून परत आल्यावर त्यानें लष्करी शिक्षण मिळविलें. २३ व्या वर्षीच तो लिबरल म्हणून राजकारणांत पडला. १८३० सालच्या राज्यक्रांतीनें त्याच्या आकांक्षा प्रबळ झाल्या. परंतु बोनापार्ट घराण्याला फ्रान्समध्यें राहाण्याची कायद्यानें मनाई असल्यामुळें तो इटलींतच राही. तेथें तो कार्बोनरी संस्थांत शिरला. रोमोग्रा येथील बंडांत व रोममधून पोपला हांकून लावण्यांत नेपोलियन व त्याचा भाऊ दोघेहि सामील होते. इतक्यांत ऑस्ट्रियन सैन्य चालून आले, त्या गडबडींत त्याचा थोरला मुलगा वारला व लुई नेपोलियन पॅरिसला पळून त्याला व लुई फिलिफच्या खास परवानगीनें तेथें राहिला. परंतु पुढें लोकशाही पक्षाशीं संगनमत करण्याच्या आरोपावरून त्याला पुन्हां फ्रान्स सोडून जावें लागलें. इतक्यांत रीचडॅटचा ड्यूक मरण पावला, आणि त्याचा चुलता व बाप यांनीं आपला राज्यावरील वारसा-हक सोडलेला असल्यामुळें लुई नेपोलियनच बोनापार्ट घराण्यांतील वारस उरला त्यानें.’ रेव्हरी पॉलिटिक्स ’, ‘ कन्सिडरेशन्स पॉलिटिक्स ’, व ‘ मॅन्युअल डी आर्टीलरी ’ हीं तीन पुस्तकें लिहीलीं.   

१८३६ सालीं त्यानें व्हाड्रे, लेटी वगैरे मित्रांच्या मदतीनें स्ट्रासबर्ग येथील लष्करांत बंड उभारण्याचा प्रयत्‍न केला, पण तो फसला आणि लुई फिलिपच्या हुकुमानें त्याला अमेरिकेंत हद्दपार केलें. पण तेथून खोटा पासपोर्ट घेऊन तो १८३७ मध्यें परत आला व लंडनला जाऊन राहिला. तेथें ऑर्से, डिझरायली, लेडी ब्लेमिंग्टन यांच्याबरोबर त्याची मैत्री जमली. स. १८३९ त बोनापार्टशाही, समाजसत्ताशाही व शांततावाद याबद्दल एक पुस्तक त्यानें लिहिलें. शिवाय फ्रान्समध्यें त्याच्या पक्षाच्या लेखकांनीं वर्तमानपत्रद्वारें त्याला अनुकूल मत बनविण्याचा उद्योग चालविलाच होता. नेपोलियननें (१८४० त) बोलोन येथें बंड उभारून पॅरिसवर चालून जाण्याचा प्रयत्‍न केला; पण तो फसला व त्याच्यासह बर्‍याच जणांनां कैदेची शिक्षा झाली; त्यानें कैदेंत अनेक लेख लिहिले; सहा वर्षें कैदेंत काढल्यावर १८४६ त बापाच्या मरणाच्या निमित्तानें तो लंडनला येऊन राहिला. तेथें त्यानें अतोनात चैन केली. परंतु फ्रान्सच्या परिस्थितीवर त्याची पूर्ण नजर होती. स. १८४८ च्या राज्यक्रांतीच्या सुरवातीस तो पुन्हां पॅरिसला आला. त्याच्या मित्रांनीं वर्तमानपत्रांतून लेख लिहून लोकमत त्याच्या बाजूचें बनविलें होतें. त्यामुळें लोकशाही स्थापन झाल्यावर सीस, यॉन, चॅरेंट-इंफीरियर व कॉर्सिका या चार भागांनीं अध्यक्षाच्या जागेकरितां त्याचें नांव सुचविलें; आणि कार्यकारी कमिटीचा विरोध असतांहि असेंब्लीनें त्याचीच निवड कायम केली. तेव्हां त्यानें लंडनला परत जाऊन तेथून राजीनामा पाठविला, व त्यांत ‘सर्व लोकांनीं ऐक्यमत्यानें मला निवडल्यास मी जबाबदारी घेण्यास तयार आहे’ असा खुलासा केला. याप्रमाणें या कामीं त्यानें विलक्षण बुद्धिमत्ता व व्यवहारचतुरता दाखविली. त्याच्या राजीनाम्याचा इष्ट परिणाम होऊन मध्यम व सामान्य वर्गांतील लोक सर्वस्वी त्याला अनुकूल झाले. बोनापार्ट घराण्यावरील प्रतिबंध काढून टाकला; अखेर स. १८४८ च्या दिसेंबरमध्यें तो अध्यक्षाच्या जागीं निवडून आला व त्यानेंहि लोकशाहीशीं सत्यनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. पुढें १८४८ पासून १८५२ पर्यंत त्यानें संपूर्ण सत्ता आपल्या हातांत घेण्याचा प्रयत्‍न चालवून, रोमन लोकशाही मोडून तेथें पोपची सत्ता पुन्हां स्थापण्याकरतां त्यानें सैन्य पाठविलें; छापखाने, क्लब, भाषणस्वातंत्र्य, शिक्षणसंस्था यांवर कडक निर्बंध घातले, व प्रधानमंडळांत आपल्या पक्षाचे लोक भरले.

याप्रमाणें बादशाही धोरण जाहीर करून त्यानें लोकशाही सभासद दूर केले; त्यानें १८५९ त मतदारांची संख्या ९० लक्षांची ६० लक्षांवर उतरविली; व सार्वत्रिक मतदारीच्या तत्वावर हरताळ फांसला. याप्रमाणें रिपब्किन पक्ष मारून चाकण्याचा प्रयत्‍न करीत असतां, उपाध्यायांची स्तुति करून शिपायांस बक्षिसें वाटून, व्यापार्‍यांनां उत्तेजन देऊन, कामगारांनां ममता दाखवून व शेतकर्‍यांनां वश करून सर्व देशभर लोकप्रियता जोडण्याची त्यानें जंगी मोहीम सुरू केली. एकदम बादशाहीपदास हात न घालतां तें हळू हळू गांठण्याचा त्याचा हा डाव होता. स.१८५२ त पुन्हां निवडणूक सुरू झाली. पुनर्निवडणुकीवर असलेला निर्बंध दूर करण्याचें असेंब्लीनें नाकारलें, तेव्हां मात्र त्यानें एकदम लोकसभा नष्ट करून स्वत:च्या नावांनें बादशाही जाहीर केली. पण देशभर पसरलेल्या लोकशाही मतवाल्यांनीं त्याला विरोध केला, तेव्हां त्यानें दडपशाही सुरू केली व कॅथोलिक पक्षाला देणग्यांनीं वश करून राज्यकारभार चालविला. तीन चार वर्षांत त्याला कोणी प्रतिस्पर्धी अथवा अडथळा करणारा उरला नाहीं. पुढें त्यानें उद्योगधंद्यांनां उत्तेजन दिलें, दळणवळाचीं साधनें वाढविलीं, सार्वजनिक कामें काढून गरीबांच्या पोटापाण्याची सोय करून दिली; व दरबारचा थाट डोळे दिपवील असा ठेवला. त्यानंतर वयाच्या ४४ व्या वर्षी त्यानें लग्न केलें. त्याच्या बायकोचें वय तेव्हां २६ होतें. यावेळीं फ्रान्समध्यें सर्वत्र शांतता, सुव्यवस्था व भरभराट असल्यानें जनता नेपोलियनवर संतुष्ट होती. पुढें किमियन युद्धांत फ्रान्सनें इंग्लंडला मदत केली. याप्रमाणें स. १८१५ व १८४० या सालांतील अपमानाबद्दल रशियावर सूड उगविल्यामुळें नेपोलियनची सत्ता शिखरास पोहोंचली. १८५६ सालीं त्याला मुलगाहि झाला, व नेपोलियनचे सर्व मनोरथ फलद्रुप झाले. मग त्यानें इतर देशांतील पारतंत्र्यांत रुतलेल्या प्रजाजनांनां राजकीय हक्क संपादण्यांत मदत करण्याचें ठरविलें, प्रथम त्यानें इटलीला सहाय्य केलें. इटली स्वतंत्र झाल्यास पोपची सत्ता खालावेल या भीतीनें फ्रेंच कॅथोलिक पक्षानें व खुद्द महाराणीनें इटलीस मदत न करण्याबद्दल गळ घातली व त्यामुळें तो टाळाटाळ करणार, इतक्यांत एका इटालियनानें त्याला ठार मारण्याचा प्रयत्‍न केला, पण तो फसला, तेव्हां त्यानें इटालीला मदत केली. नंतर त्यानें इंग्लंडबरोबर खुल्या व्यापाराचा तह केला, पण या दोन गोष्टींमुळें फ्रान्समध्यें बरेच लोक नाखूष झाले. लोकशाही व कॅथोलिक हे दोन्ही पक्ष त्याच्या विरुद्ध उठले. तेव्हां सर्व फ्रान्सला व यूरोपियन राष्ट्रांनां दिपविण्याकरतां व आपलें घराणें चिरस्थायी करण्याकरतां त्यानें मेक्झिको प्रकरण सुरू केलें. याच वेळीं जर्मन प्रधान बिस्मार्क जर्मनराष्ट्र बनवीत होता. १८५५ सालीं दोघांनीं फ्रँको-जर्मन मित्रसंघ स्थापण्याचें ठरविलें. पण उलट उत्तर जर्मनी प्रशियानें घेतला, त्यावेळीं नेपोलियन आजारी होता; पण त्यामुळें सोशिऑलिष्ट, लिबरल व रिपब्लिक पक्षांनीं मोठा विरोध केला, तेव्हां त्यांनां नेपोलियननें कांहीं हक्क दिले, परंतु लवकरच बिस्मार्कच्या कारस्थानास बळी पडून त्यानें स. १८७० मध्यें फ्रँको-जर्मन युद्ध सुरू केलें, पण त्यांत फ्रान्सचा भयंकर पराभव झाला. नेपोलियनची प्रकृतीहि आजारानें फार क्षीण झाली होती. राणीच्या तंत्रानें तो फार चालू लागला. तिनें त्याला पुत्रासह रणभूमीवर पाठविलें, पण तेथें पराभव पावून तो शत्रूच्या हातीं सांपडला. इकडे क्रांतिकारकांनीं त्याला पदच्युत करून लोकशाही स्थापिली. तो स. १८७३ त मरण पावला.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .