प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें  
         
नेपाळ- हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे हिंदुस्थानाच्या उत्तर सीमेवर ५२० मैल लांबीचें विस्तृत असें हें एक एतद्देशीय स्वतंत्र संस्थान आहे. येथें गुरखे लोकांची वस्ती आहे. एकंदर लोकसंख्या ५० लाख; बहुतेक लोक हिंदु आहेत. नेपाळ शब्दाची उपपत्ति अशी आहे (इं.अँ.पु. २२ पृ. २९३-९४). गुरखे लोकांच्या सर्व डोंगरी प्रदेशास हिमालयांतील हिंदु नसलेले डोंगरी लोक व तिबेटी लोक पाल म्हणतात; व पाल प्रदेशाच्या या भागास मूळचें नांव ने असावेसें दिसतें. यावरून या भागांतील लोकांस हिंदु लोक नेवार म्हणजे नेचे रहिवाशी म्हणतात. नेचा अर्थ आश्रयार्थ अथवा वसतीकरितां गुहांची जागा असा आहे. इंडो-चिनी लोकांच्या बर्‍याच भाषांत नेचा अर्थ वसतिस्थान आहे. येणेंप्रमाणें नेपाळचा अर्थ पाल देशाचें ने म्हणजे वसतिस्थान, अथवा मुख्य ठिकाण अथवा देऊळ असा आहे.

प्रदेश- क्षेत्रफळ ५४ हजार चौ. मैल उत्तरेस तिबेट; पूर्वेस सिकीमचें संस्थान व दार्जिलिंग जिल्हा; दक्षिणेस बंगाल व संयुक्तप्रांत; पश्चिमेस कुमाऊन व कालीनदी. उत्तरेकडील हिमालयाचा भाग अगदीं बर्फाच्छादित आहे. ह्या प्रदेशाचे चार भाग केले आहेत- (१) तराई, (२) शिवालिक पर्वत, (३) हिमालयाचा प्रदेश उर्फ खाटमांडूचें खोरें (हिमालयाचा १० हजार फूट उंचीचा प्रदेश.) (४) अज्ञात हिमालयाचा प्रदेश (ह्यांत एवरेस्ट शिखर व इतर बर्फाच्छादित प्रदेशाचा समावेश होतो.)

हिमालयाच्या इतर शिखरांचा उल्लेख:- नन्दादेवी २५७०० फूट); धवलगिरी (२६८२६ फूट); गौसंतान (२५३०५ फूट); व कांचनगंगा (२८१४६ फूट).

नद्या:- कौरिआला (कर्णालि) किंवा घोग्रा, गंडक, व कोसी. पश्चिम भागांतून शारदा नदी वहाते व ही नदी नेपाळ व कुमाऊनमधील सीमा आहे. काली, बबई आणि राप्ती ह्या नद्या गंगेस जाऊन मिळतात.

मध्यप्रदेशाला नेपाळी लोक `सप्तगंडकी’ हें नांव देतात. ह्या सात गंडकी नद्यांमुळें धवलगिरी व गोसंतान ह्या दोन शिखरांमधील प्रदेशास पाणी मिळतें. अगदी पूर्वेकडे त्रिशूळगंगा नदी वहाते. पूर्वप्रदेशाला सप्तकोसी हें नांव आहे व त्यापैकीं सानकोसी ही नदी मुख्य आहे. ह्या नदीमुळें कधीं कधीं मोठा पूर आला तर पिकाचें व मालाचें फार नुकसान होतें. ह्या सर्वांपासून बराच निराळा असा खाटमांडूच्या भोंवतालचा प्रदेश होय. या भागातून वाग्मती व विष्णुमती या नद्या वहातात. नेपाळांत मोठमोठे तलाव नाहींत. नेपाळच्या खोर्‍यापलीकडे पोख्राच्या प्रदेशांत लहान लहान तळीं आहेत.

अरण्यें- येथील वनशोभा फार मनोरम आहे. कांहीं भागाचा शेतकीकडे उपयोग केला असून अर्ध्याअधिक भागांत जंगल आहे. साल व शिसवी हीं झाडें जंगलांतील कांहीं भागांत विपूल आहेत. सर्व जंगल एखाच तर्‍हेचें नाहीं. कांहीं ठिकाणीं १० ते १५ फूट उंचीचें गवत वाढतें व तराईच्या पूर्वभागांत तर हत्तीला देखील मार्ग काढतां येणार नाहीं इतकें दाट व उंच गवत आहे. यांत मोठ्या व धोक्याच्या पाणथळी जागा आहेत. कांहीं कांहीं दर्‍याखोर्‍यांतून तांदुळाचें व मक्याचें पीक दृष्टीस पडतें. अगदीं पूर्वटोकांवर गौरीशंकर- शिखर आहे. ह्या प्रदेशाचें एकंदर नीट निरीक्षण करून त्याविषयीं अद्याप कोणी माहिती दिलेली नाहीं. मेडलीकोटनें केलेले खाटमांडूच्या पलीकडील कांहीं शोध वाचनीय आहेत. डेहराडूनच्या दक्षिणेस असलेल्या शिवालिक पर्वताच्या ओळीप्रमाणेंच चुरिया घाटी म्हणून एक ओळ आहे. दोन्ही ठिकाणची जमीन सारखीच आहे.

प्राणी- तराईच्या दाट जंगलांत सर्व तर्‍हेचें वन्य पशू सांपडतात. जरी त्यांची संख्या आतां कमी होऊं लागली आहे तरी अजून असे कित्येक भाग आहेत, कीं ज्यांत सिंहादि हिंस्र पशूहि आढळतात. तराईंत रानटी हत्ती पुष्कळ आहेत पण त्यांस गोळी घालून न मारतां पकडावें असा नियम आहे. माणसाळलेल्या व रानटी हत्तींची झुंज जुंपवून त्यांस पकडण्याची इकडे चाल आहे.

हवामान- मे व डिसेंबरच्या दरम्यान तराईची हवा अतिशय पावसामुळें फार खराब व रोगकारक असते. तेव्हां येथें नवज्वराच्या तापाची सांथ पसरतें. येथील थारस लोकांवर ह्या सांथीचा कांहीं परिणाम होत नाही असें म्हणतात. उत्तरेस नेपाळच्या खिंडीच्या प्रदेशांत हवा फार उत्तम आहे. खाटमांडु येथें वार्षिक पावसाची सरासरी छप्पन्न पूर्णांक एक द्वितियांश इंच असतें.

प्राचीन कामें- बृहत्संहितेंत (४. २२; ५. ६५) व प्रयागच्या समुद्रगुप्ताच्या शिलास्तंभांत नेपाळचा उल्लेख येतो. फाहिआन व ह्यूएनत्संग यांच्या प्रवासवर्णनांवरून सध्यां बौद्ध काळांतील संशोधनाचें काम सुरू आहे. कपिलवस्तूचें स्थान उत्तरेस तराईंत पडेरियाजवळ पुराव्यावरून निश्चित ठरलें आहे. गौतम बुद्धाचा ज्यांत जन्म झाला अशा शाक्य राजघराण्याचें हें राजधानीचें शहर होतें. नेपाळांत अशोकाचे कांहीं लेखस्तंभ असून त्यावरून अशोकाच्या प्रवासाची कल्पना येते. खुद्द नेपाळसरकारनें यूरोपीयन भूस्तरशास्त्रज्ञ व पुराणवस्तूसंशोधक लोकांच्या नेतृत्वाखालीं संशोधनाचें काम आपल्या हातीं घेतलें आहे. नेपाळ खोर्‍यांत बौद्ध लोकांचा केव्हां शिरकाव झाला हें अजून नक्की बाहेर आले नाहीं. ख्रि.पू. ३०० च्या सुमारास ह्या धर्माचा झपाट्यानें प्रसार झाला असें कित्येकांचे मत आहे, तर इ.स.च्या पहिल्या शतकांत प्रसार झाला असें कोणी म्हणतात. खाटमांडु येथून जवळच शंभुनाथ व बोधनाथ ह्यांच्या प्रसिद्ध समाधी आहेत. नेपाळांतील सर्व कलाकौशल्यकाम चीनच्या धर्तीचे आहे. नेवार लोकांच्या वेळी शिल्पकामास बराच वाव मिळाला.

रोग- संधीवात, बद्धकोष्टता, त्वग्रोग व (पावसाळ्यांत) महामारी, नवज्वर वगैरे रोगांचा इकडे प्रसार आहे. महामारीसारखा रोग तराईच्या भागांत फार आहे. इकडे अद्यापि प्लेग आला नाही असें म्हणतात.

लोक.– नेवार लोकांइतकी गुरखा लोकांत विवाहबंधनें नाहींत. मुलीला काडी मोडून देण्याचा अधिकार असतो व कांहीं अटींनंतर ती पहिल्या नवर्‍याकडे परतहि येऊं शकते. विधवाविवाहाची चाल इकडे नाहीं. मूळचे रहिवाशी मंगोलियन आहेत. खष, पगार, गुरंग व ठाकूर इत्यादि जातींचे लोक लष्करांत आहेत. येथें येऊन राहिलेल्या बाहेरील हिंदू लोकांचा येथील मूळच्या रहिवाश्यांशीं  बेटीव्यवहार होऊन ही प्रज्ञा झालेली आहे. नेपाळखोर्‍याच्या पश्चिमेस जरी त्यांचा मूळप्रदेश आहे तरी गुरखा लोकांनीं हा देश पादाक्रांत केल्यापासून हे संकरज लोक सर्व देशभर पसरले. नेपाळखोर्‍यांत नेवारी लोक रहातात. ह्या लोकांनां शेतकीचें, व्यापाराचें व लांकूड व धातूंवरील खोदीव कामाचेंहि चांगलें ज्ञान आहे. येथें तिबेटियन ज्ञातींतींल कांहीं लोक असून, त्यांनां ‘भोतिया’ (भूत) लोक म्हणतात. त्याचप्रमाणें किरान्ती, भुमीं, लिम्बू, लेपचा, थारू, बोकसा वगैरे जातींचे लोक आहेत. गुरखा लोक शरीरबांध्यानें ठेंगणे पण आडदांड, धिप्पाड व काळे आहेत. नेवार लोक जरा उंच व सडपातळ असतात.

भाषा -   पश्चिम नेपाळांत कामी व भ्रामु ह्या दोन भाषा प्रचारांत आहेत. मध्यनेपाळांत पधि, पहाडी आणि धृइ;  व कोसी भागांत हायू अथवा वायू ह्या भाषा बोलतात. सार्‍या नेपाळची एक सर्वसाधारण पर्वतिया नांवाची भाषा आहे. पाल्पा येथील लोक पाल्पा नांवाची एक वेगळीच भाषा बोलतात.

धर्म -  येथील बहुतेक लोक हिंदू धर्माचे व कांही बौद्ध आहेत. चीनहून आलेल्या मनजुसरीनें नेवारी लोकांत बौद्ध धर्माचा प्रसार केला असें म्हणतात. पण सध्यां प्रचारांत असलेला बौद्ध धर्म खरा नसून त्यांत हिंदू धर्माच्या तत्वांची भेसळ आहे. भोतिया, लिम्बू, लेपचा ज्ञातींतहि कांहीं लोक बौद्धधर्मीय आहेत. पण ह्या सर्वांच्या चालीरीतींत पुष्कळ साम्यता आहे. येथील लोक फारच धर्मभोळे आहेत. व्यवहारांतील प्रत्येक गोष्टीला ते कांहीं तरी मोठे धार्मिक स्वरूप देतात. ह्यामुळें भोंदू लोकांचें व फलज्योतिषांचें चांगलें फावतें. बौद्ध व हिंदू दोघेहिं प्रेतें जाळतात. येथील हिंदू मांसाहारी आहेत. ते रक्षी नांवाची दारूहि पितात. मच्छेन्द्रजत्रा, इन्द्रजत्रा, दसरा, दिवाळी, होळी, हे जरी हिंदूंचे सण आहेत तरी बौद्ध लोकहि ते पाळतात.

शेतकी -  नेपाळच्या खोर्‍यांत दोन तर्‍हेची जमीन आहे. कांहीं प्रदेश वालुकामय आहे व कांहीं ठिकाणीं पिकाऊ जमीन आहे. नेवार लोक बहुतेक शेतकीचा धंदा करतात. पेरणी व कापणी वगैरे सर्व हातानेंच करतात. जमीन उंचीपैकीं नसल्यामुळें खत घालण्याची जरूरी पडते. येथील खत म्हणजे एक तर्‍हेची जमिनींत सांपडणारी मातीच असते. हिंवाळ्यांत ती खणून आणून शेताच्या बाजूनें तीचे ढीग घालून ठेवतात, व पेरणीच्या अगोदर ती वाळली म्हणजे सर्व शेतभर पसरतात. शेतें फार मोठीं नसतात. ह्या भागांत भाताची पेरणी होते. स्वाभाविकच हिमालयाच्या पायथ्याच्या उतारांत हा प्रदेश असल्यामुळें पाटाच्या द्वारें शेतांनां पाणी पुरविण्याची चांगलीं सोय झाली आहे.

कांहीं ठीकाणीं नद्यांच्या तीरांनी पाणथळ जागी नुसतें भाताचेंच उत्पन्न होतें. कोठें कोठें हिवाळ्यांत गहूं व पावसाळ्यांत उडीद पेरतात. भाताचें उत्पन्न मुख्य असून गव्हाचें उत्पन्नहि बरेंच आहे पण गहूं हें लोकांचें खाण्याचें मुख्य धान्य नसल्यामुळें या पिकाकडे फारसे लक्ष देत नाहींत. गव्हापासून बहुतकरून आंब व दारू काढतात. खोर्‍यामध्यें जव व ओट नांवाचें धान्यहि थोड्या प्रमाणावर काढतात. ओट धान्याचा उपयोग घोड्याला दाणा देण्याकडे करतात. मकाई खोर्‍यांतील उंचवठ्याच्या भागांत पेरतात. त्याप्रमाणें आरुआ नांवाचें धान्यहि मकाईप्रमाणेंच माथ्यावर पेरतात. बटाट्याचें पीक बरेंच असून व ज्वारीहि बरीच पिकते. इकडे दुष्काळ बहुधां पडत नाहीं. खोर्‍यांत सर्व तर्‍हेचा भाजीपाला होतो. उत्तमपैकीं चवदार संत्रीं व ईडलिंबें होतात. तरांईतील पीक बहुतेक अंशीं जमिनीवर अनलंबून आहे. तांदूळ, गहूं व ऊंस हीं येथील मुख्य पिकें होत. नेपाळ सरकारला तराईपासून फार मोठें उत्पन्न आहे. शेतसारा रयतवारी तत्वावर आहे. सरकारास किंवा मालगुजरास कूळ जो सारा देतें तो किती द्यावयाचा हें जमिनीवर व उगवणार्‍या पिकावर अवलंबून असतें. सारा पैशाच्या किंवा धान्याच्या रूपानें सरकार घेतें.

जंगली प्रदेश -  जंगलाचे तीन विभाग केले आहेत: (१) तराई,(२) डोंगरखोरें व (३) पर्वतमाथा. तराईमध्यें मोठमोठें गवत व दलदलीची जमीन असते. यांत शिसवी वृक्षांचें मोठें जंगल असून खैराचीं झाडेंहि मुबलक आहेत. डोंगरखोरें जंगलांत साल, असेना वगैरे वृक्षांचें जंगल आहे. येथून इमारती लांकूड फार चांगलें निघूं शकतें. येथें देखील बावर जातीचें गवत फार आहे. तिसर्‍या भागांत देवद्वार लांकूड मुबलक असून शिसपेन्सिलीस लागणारें लांकूडहि पुष्कळ आहे. कांहीं भागांत चांफ्याची झाडें आहेत. सरहद्दींतील सर्व जंगल खुद्द नेपाळसरकारच्या ताब्यात आहे. जंगलाची जशी घ्यावी तशी काळजी घेतली जात नाहीं. सरहद्दीपर्यंत रेल्वे गेली आहे तरीपण इमारती लांकडाचा व्यापार वाढला आहे. मेण, मध वगैरे इतर उत्पन्न मात्र मोठ्या प्रमाणावर आहे.

धंदे – तराईच्या जंगलांत थारु लोक रहातात. ब्रह्मदेशांतील काचीन लोकांप्रमाणेंच यांची राहणी आहे. हे लोक शिकारी असून शेतकीहि करतात व गुरें पोसून दुधदुभत्याचाहि व्यापार करतात. खनिज पदार्थांकडे सरकारनें अजून लक्ष पुरविलें नाहीं. इकडे तांबें लोखंड, व गंधक विपुल सांपडतें. वापरण्याचें जाडेंभरडें सुती कापड बहुतेक बायकाच घरीं विणतात. भुतिया हे लोक लोंकरीचीं कांबळीं तयार करतात. येथें एक तर्‍हेचा जाड कागद तयार होतो. नेवार लोक सोनारी व सुतारी कामामध्यें कुशल असून व्यापारीहि आहेत.

व्यापार व दळणवळण – नेपाळांत व्यापार दोन तर्‍हेचा आहे. एक हिमालयांतील मार्गांतून तिबेटाशीं व दुसरा दक्षिणेकडे इंग्रज सरहद्दीवरील प्रांतांशीं. पैकीं तिबेटच्या व्यापारापासून सरकारास तीन लाख रुपयांचें उत्पन्न येतें. नेपाळांतून तिबेटांत तांब्याचीं घडविलेलीं भांडीं, कासें व लोखंड वगैरे माल जातो, व तिबेटांतून पशमिना ( शालजोड्याकरितां लोंकर ), जाडेभरडें लोंकरी कापड, मीठ, टांकणखार, पारा, सुवर्णरज व सुकी फळें इत्यादि माल येतो. नेपाळच्या ब्रिटिश हिंदुस्थानाबरोबरच्या आयातनिर्गतीचे    १९१७ – १८ सालचे आंकडे पुढीलप्रमाणें आहेत. हिंदुस्थानांत आयात १५६३०४० पौंड व निर्गत १४०५००० पौंड होती. सरहद्दीवरील व्याराचीं मुख्य ठिकाणें बीरगंज, नेपाळगंज, बटवाल, हनुमाननगर, धुलबारी हीं होत. सरहद्दीवरून थेट खाटमांडूपर्यंत पक्का रस्ता आहे. भीमजेडीच्या पुढें पायीं हमालाच्या पाठीवर ओझें देऊन जावें लागतें. नेपाळांत दळणवळणाची चांगली व्यवस्था नाहीं. रस्ते वगैरे केल्याने पहाडांतील ठिकाणाचें अजिंक्यत्व जातें व परवशतेस बळी पडावें लागतें अशी स्थानिक लोकांची समजूत आहे. रक्षाल व खाटमांडूमध्यें जो रस्ता आहे त्याच रस्त्यानें फक्त यूरोपियन लोक नेपाळांत जाऊं येऊं शकतात.

राज्यव्यवस्था –  मुख्य राज्यव्यवस्था प्रधानाच्या हातीं असते. ह्याच्या परवानगीशिवाय सार्वजनिक पैशाचा व्यय केला जात नाहीं. सर्व तर्‍हेच्या नेमणुका करण्याचा व अधिकार्‍यांनां शिक्षा करण्याचा अधिकार प्रधानाकडेच असतो. राज्यांत इलम, धनकूट, गुरखा, पल्या, दोती, नकमुलुख, बटवाल, चितवण, मुरंग, इत्यादि जिल्हे मुख्य व मोठे होत. दिवाणी व फौजदारी न्यायासनें येथें आहेत. सर्व प्रदेशांची ‘ सर्कलां ’त विभागणी केली आहे.
खून किंवा गोवध करणारांस देहान्तशासन असून ब्राह्मणांनां किंवा बायकांना फांशीं देण्यात येत नाहीं. नेपाळी लोक मोठे कायदेनिर्बंध मानणारे अशी त्यांची ख्याति असल्यामुळें बहुतेक अन्याय किंवा अपराध फार थोडे घडतात. उत्पन्न व खर्चाच्या बाबींचें खातें प्रधानाच्या हातीं असल्यामुळें त्याविषयीं निश्चित असें कांहींच सांगतां येत नाहीं. नेपाळी सरकारचें वार्षिक उत्पन्न सुमारें २ कोटी रूपयांचें आहे. शेतसारा, कर व महसूल, खाणीं, जंगल व हक्कबाबी इत्यादि उत्पन्नाचीं मुख्य द्वारें होत.

मोहोर नांवाचें चांदीचें नाणें प्रचारांत आहे. ह्याची किंमत साधारणपणें आपल्याकडील ६ आणे ८ पैबरोबर असते. खाटमांडु येथें टांकसाळ आहे. तांब्याचे ५० पैसे म्हणजे वरील एक मोहोर. हिंदुस्थानातलि नाणी तिकडे चालतात.

जे लोक आपखुशीनें फौजेंत शिरतात त्यांस कमींत कमी ३ वर्षें नोकरी करावी लागते. नेवार लोकांनां हत्यारें वापरण्याची परवानगी नाहीं. निकडीच्या समयीं प्रत्येक सुदृढ मनुष्यास लढण्यास तयार असावें लागतें. सेनापति हा नेहमी प्रधानांचा कनिष्ठ बंधू असतो. सैन्यांतील इतर जागा देखील प्रधानाच्या आप्तबंधूंस मिळतात. गुणाप्रमाणें निवड करण्याची चाल तिकडे नाहीं.

नेपाळच्या वैद्यकखात्यानें फार सुधारणा केल्या आहेत. खाटमांडु येथील वीर हॉस्पिटलमध्यें डॉ. के. एल्. गुप्त हे चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. तुरुंगाकरितां निराळा डॉक्टर आहे. स्त्रियांच्या हॉस्पिटलवर मिस् एच्. सेन, एम्. बी. या मुख्य आहेत. बॅक्टिरिऑलॉजिकल लॅबोरेटरी ( जंतूविषयक प्रयोगशाला ) उत्तम साधनयुक्त आहे. एक्सरेज् बिल्डिंग नुकतीच पुरी झाली असून तींत सामान भरपूर आहे. ऑपरेशन थिएटर ( शस्त्रक्रियेची जागा ) वीर हॉस्पिटलमध्यें नवें बांधलें असून त्यांत शस्त्रसामुग्री उत्तम व भरपूर आहे. याशिवाय नेपाळांत एकंदर १४ मोफत दवाखाने आहेत.

इंजिनियरिंगखात्यांत हल्लीं नेपाळी इसम पाटणा, पुणें, रुरकी वगैरे ठिकाणीं शिकलेले आहेत व ते इंग्लंड व अमेरिकेंतील इंजिनियरिंग असोशियनांचे ऑननरी सभासद आहेत. सडकांची व ड्रेनेजची सुधारणा सर्वत्र सुरू आहे. तसेंच लांकडी व लोखंडी पूल, विश्रांतिगृहें ठिकठिकाणीं बांधण्यांत येत आहेत. अलिकडे भिमफेदी, भिछकर, भाटगांव व पाटण या चार ठिकाणीं नवे जलसंचय ( वॉटर—वर्क्स ) बांधले आहेत, व हीं कामें नेपाळी इंजिनिंयरांनीं केलीं आहेत. फारपिंगपासून सुमारें ७ मैलांवर हायड्रो—इलेक्ट्रिक पॉवर-हाऊस बांधलें असून शहरांत सर्वत्र विजेचे दिवे झाले आहेत. रोपरेल्वेचे दोन फांटे बांधण्याचें काम चालू आहे. टेलिफोनची योजना पुरी झाली असून सरहद्दीवरील विरगुंज व रक्झौल या ठिकाणांपासून राजधानीपर्यंत त्वरित-संदेश जाऊ लागले आहेत. विजेच्या शक्तीवर दळण्याच्या गिरण्या व छापखाने चालू आहेत. शेती व खाणी यांची सुधारणा चालू असून तोफ व दारुगोळा तयार करण्याचे कारखाने सुरू झाले आहेत. ही सर्वांगीण सुधारणा सांप्रतच्या प्रधानाच्या कारकीर्दींतील आहे.

नेपाळांतून लोक बाहेरदेशीं सारखे जात असतात व यांची वस्ती पूर्वेकडील प्रदेशांत पसरत आहे. हल्लींच्या मुख्य प्रधानानें नेपाळांत चालू असणारा गुलामांचा व्यापार बंद करण्याकरितां फार खटपट केली आहे. नेपाळांत १५७१९ गुलामांचे मालक असून गुलामांची संख्या ५१४१९ आहे. गुलामांच्या मालकांचे तीन प्रकार आहेत :- (१) ज्यांनां वडिलोपार्जित मालमत्ता म्हणून गुलामांवर मालकी मिळते असे इसम; हे गुलामांनां घरांतील नोकरांप्रमाणें किंबहुना घरांतील कुटुंबीयांप्रमाणें ममतेनें वागवितात. (२) शेतीच्या कामाला गुलामांस लावणारे मालक; आणि (३) जे लोक केवळ व्यापार करण्याकरितां गुलाम बाळगतात ते. नेपाळच्या राजानें खुषी असेल त्या मालकाकडून गुलाम विकत घेऊन नंतर त्यांना स्वातंत्र्य देण्याच्या कार्याकरितां १४ लक्ष रुपये या कार्याकरितां उभारलेल्या फंडास दिले आहेत. नेपाळांतील सर्वच गुलामांस त्यांच्या मालकांनां कायद्यानें ठरविलेली नुकसानभरपाई देऊन व त्याच गुलामांनां त्याच मालकांकडे आणखी ७ वर्षें कामाकरितां ठेवून नंतर पूर्णपणें स्वातंत्र्य देण्याचा विचार येथील राजाच्या मनांत आहे.

इतिहास – डॉ. भगवानलाल इंद्राजी याचा “ नेपाळमधील शिलालेख ” हा ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वींचा ‘ नेपाळचा इतिहास ’ म्हणजे आधुनिक वंशावळीवरून लिहिलेला होय. कर्कपट्रिक व प्रिंसेस यांनीं दिलेल्या वंशावळ्या बहुधां पार्वतीय भाषेंतील एका लहान ग्रंथाधारें दिलेल्या असाव्या. डॉ. राईट याचा इतिहास ललितपूरच्या महाबुद्धविहारांत सुमारें शंभर वर्षांपूर्वीं राहणार्‍या बुद्ध भिक्षूच्या वंशावळीच्या आधारें बहुतेक रचिला आहे.

राईटच्या पुस्तकांशीं डॉ. भगवानलाल यानें आपल्या हस्तलिखित पार्वतीवंशावळ्या ताडून पाहून राईटचा ग्रंथ विश्वसनीय आहे असें त्यानें जाहीर केलें. परंतु त्यानें कांहीं महत्वाच्या चुकांच्या दुरुस्तीबद्दल सूचना केल्या आहेत. या बौद्ध पार्वतीय वंशावळीप्रमाणें नेपाळच्या निरनिराळ्या राजवंशावळी व त्यांच्या कारकीर्दींचीं वर्षें पुढें दिल्याप्रमाणें आहेत :-

(१) मातातीर्थ याचें गोपाळघराणें:-- हें ५२१ वर्षें टिकलें. याला गोपाळ म्हणण्याचें कारण याचा मूळ पुरुष गोपाळ ( गवळी ) होता हें होय. (१) भुक्तमानगत ८८ वर्षें. (२) जयगुप्त ( भुक्तमानगतचा पुत्र ) ७२ व. याचा पुत्र (३) परमगुप्त ८० व. याचा पुत्र (४) हर्षगुप्त ९३ व. याचा पुत्र (५) भीमगुप्त ३८ व. याचा पुत्र (६) मणिगुप्त ३७ व. याचा पुत्र (७) विष्णुगुप्त ४२ व. याचा पुत्र (८) यक्षगुप्त ७२ वर्षें हा निपुत्रिक वारल्यामुळें यानंतर अहीर घराणें सुरू झालें.

(२) अहीर घराणें:-- हें घराणें हिंदुस्थांतून आलें. (१) वरसिंह, (२) जयमतिसिंह, (३) भुवनसिंह ( याला पूर्वेकडील किरात घराण्यानें जिंकिलें ).

(३) किरात घराणें:-- हें गोकर्ण येथें रहात होतें. हें एकंदर १११८ वर्षें टिकलें. (१) कलंबर हा १२ द्वापारशेषमध्यें आला. त्याचा पुत्र (२) पवी, नंतर (३) स्कंधर, (४) वलंभ, (५) हृंती, (६) हुमति, हा पांडवांबरोबर अरण्यांत गेला. याचा पुत्र (७) जितेदास्ति, यानें भारतीय युद्धांत पांडवांना मदत केली, व त्यांतच तो मारला गेला. याच्याच हयातींत शाक्यसिंहबुद्ध हा नेपाळांत आला. त्याचा पुत्र (८) गलि, नंतर (९) पुष्क, (१०) सुयर्म, (११) पर्ब, (१२) हुंक, (१३) स्वानंद, (१४) स्थुंकरे, याच्याच वेळीं पाटलीपुत्राचा राजा अशोक हा नेपाळांत आला होता. अशोकाच्या चारुमतिनामक मुलीचें लग्न देवपालनामक क्षत्रियाशीं झालें, व त्यानें देवपाटणाची स्थापना केली. नंतर (१५) गिघ्रु, (१६) नने, (१७) लुक, (१८) थोर, (१९) ठोको, (२०) वर्म, (२१) गुज, (२२) पुष्कर, (२३) केस, (२४) सुंस, (२५) सम्मु, (२६) गुणन, (२७) खिंबु, (२८) पटुक, याच्यावर सोमवंशी रजपुतांनीं हल्ला केला होता. यानें शंखमुलतीर्थ हा नवा किल्ला बांधला (२९) गस्ति, यास सोमवंशीयांनीं हांकून लावलें यानें गोदावरी जवळील फुलोच्छ या ठिकाणीं नवीन किल्ला बांधला, व अखेरीस यानें आपलें राज्य गमावलें.

(४) सोमवंशीं घराणें:-- (१) निमिष, (२) मनाक्ष, (३) काकवर्मन, (४) पशुप्रेक्षदेव, यानें पशुपतीचें देवालय पुन्हां दुरुस्त केलें व हिंदुस्थानांतून बर्‍याच लोकांनां वसाहती करण्यास नेपाळांत आणलें. ( ख्रि. पू. १८६७; कलियुग १२३४ ). (५) भास्करवर्मन, यानें सर्व हिंदुस्थान देश जिंकला, देवपाटणचा विस्तार वाढविला व पशुपतीची आराधना त्यानें ताम्रपटावर खोदवून घेऊन चारुमतीविहारांत ती ठेवली. याला मुलगा नसल्यामुळें यानें सूर्यवंशीय मुलगा दत्तक घेतला.

(५) सूर्यवंशी घराणें:-- हें लिच्छिवि असून पूर्वभागांत राज्य करीत होतें. (१) भूमिवर्णन कलियुग याचा १३८९ मध्यें राज्यभिषेक झाला ( म्हणजे ख्रि. पू. १७१२ ). यानें आपली राजधानी बाणेश्वर येथें नेली. (२) चंद्रवर्मन, ६१ वर्षें. (३) जयवर्मन, ८२ व. (४) वर्षवर्धन, ६१ व. (५) सर्ववर्मन, ७८ व. (६) पृथ्वीवर्मन, ७६ व. (७) ज्येष्टवर्मन ७५ व. (८) हरिवर्मन, ७६ व. (९) कुबेरवर्मन, ८८ व. (१०) सिद्धिवर्मन, ६१ व. (११) हरदत्तवर्मन, यानें (८१ वर्षें) चार नारायणानां चांगु, चैणजु, इचांगु, व शिखर हीं देवळें बांधलीं व बुद्धनीलकंठ येथें जलशयनाचें देऊळ बांधिलें. (१२) वसुदत्तवर्मन, ६३ वर्षें; (१३) पतिवर्मन ५३ वर्षें; (१४) शिववृद्धिवर्मन, ५४ व. (१५) वसंतवर्मन, ६१ व. (१६) शिववर्मन, ६२ व. (१७) रुद्रदेववर्मन ६६ व. (१८) वृषदेववर्मन, यानें विहार बांधलें व अन्य बुद्धदेवतांच्या मूर्ती स्थपिल्या. याच्या भावाचें नांव बालार्चन असून हाहि बुद्धच होता. ६१ व. (१९) शंकरदेव यानें पशुपतीच्या त्रिशूळाची स्थापना केली. ६५ वर्षें. (२०) धर्मदेव, ५९ व. (२१) मानदेव यानें मतिराज्यानजीक बिहार बांधिला. त्याचें नांव चक्रविहार असून कांहींच्या मतें खासा-चैत्य असें होतें. ४९ वर्षें (२२) महीदेव, ५१ व. (२३) वसंतदेव; याचा राज्यारोहणकाल २८०० किंवा ख्रि. पू. ३०१ हा होता. ३६ व. (२४) उदयदेववर्मन ३५ व. (२५) मानदेववर्मन, ३५ व. (२६) गुणकामदेववर्मन ३० व. (२७) शिवदेववर्मन, यानें देवपाटण शहर बरेंच वाढविलें, व त्या ठिकाणीं आपली राजधानी नेली. त्यानें पुन्हां शाक्तविधी सुरू केले व आपण स्वतः भिक्षु झाला. त्याचा मुलगा पुण्यदेववर्मन यानेंहि त्याचेंच अनुकरण केलें. एक शिवदेव श्रीहर्षाचा समकालीन होता. ५९ व. (२८) नरेंद्रदेववर्मन, ४२ व. (२९) भीमदेववर्मन्, ३६ व. (३०) विश्वदेववर्मन, ४७ व. याच विश्वदेववर्मननें आपली कन्या अंशुवर्धन नांवाच्या ठाकुरी वंशजास दिली. याच्याच राज्यांत विक्रमादित्य नेपाळांत आला व त्यानें आपला संवत्सर तेथें सुरू केला (५१ वर्षें).

(६) ठाकुरी वंश:-- (१) अंशुवर्धन हा शेवटल्या सूर्यवंशी राजाचा जांवई असून फार शूर व विद्वानहि होता. यानें शब्दविद्याशास्त्र हा ग्रंथ लिहिला आहे. ह्यूएनत्संग म्हणतो कीं अंशुवर्मन व अंचुफमो हे एकच आहेत. हा प्रथम श्रीहर्षाचा मांडलिक होता; त्याच्या पश्चात हा स्वतंत्र झाला (६४८). हा पश्चिम नेपाळचा राजा होता. त्याच्या वंशाचा मगध राजाशीं संबंध होता. यानें आपली राजधानी मध्यलखु येथें नेली. यानें एक ७ तोट्यांची पाणपोई बांधली व तीवर एक शिलालेख लिहिला. (२) कृतवर्मन, ८७ व. (३) भीमार्जुन, ९३ व. (४) नंददेव याच्या राज्यांत शालिवाहन शक नेपाळांत प्रथम सुरूं झाला. २५ वर्षें. (५) वीरदेव, यानें ललितपट्टनामक शहर वसविलें. हें नांव घ्यावयाचें कारण या नांवाचा एक गवत विकणारा होता; यानें तलाव, देवळें, लिंगें यांची स्थापना केली. त्या तलावाचें नांव मणितलाव असें होतें, व हें नांव देण्याचें कारण या राजाची इष्टदेवता मणियोगिनी होती. ९५ वर्षें. (६) चंद्रकेतुदेव – याला याच्या शत्रूंनीं भयंकर त्रास दिला, व लुटलें. (७) नरेंद्रदेव – यानें लोमरी देवीजवळ तीर्थविहार बांधला, व तो आपल्या बापाचा जो धर्मगुरू बंधुदत्त आचार्य त्यास दिला. त्याला तीन मुलें होतीं. त्यांपैकीं पहिले दोन पद्मदेव व रत्‍नदेव हे संन्याशी बनले, व तिसरा वरदेव हा गादीवर बसला. हाहि आपल्या मृत्यूपूर्वी अलग किंवा अकबहाल ( विहाराचें नांव ) मध्यें रहावयास गेला (७००). (८) वरदेव, यानें आपली राजधानी ललितपट्टणला. नेली. याच्या वेळेस शंकराचार्य आणि अवलोकितेश्वर हे नेपाळांत आले होते. (९) शंकरदेव १२ वर्षें, (१०) वर्धमानदेव यानें शंखु शहर वसविलें व तें उग्रतादेवीला अर्पण केलें. १३ व. (११) बलिदेव – १३ व. (१२) जयदेव (७५१). (१३) बालार्जुनदेव – १५ व. (१४) विक्रमदेव – १७ व. (१५) गुणकामदेव यानें कान्तिपूर वसविलें. हेंच सांप्रतचें खाटमांडु होय. हें शहर इ.स. ७२३ या वर्षी वाग्मती व विष्णुमती या नद्यांच्या संगमावर वसविलें. त्याचप्रमाणें थाबेल हें खेडेगांवहि ( या ठिकाणीं विक्रमाचा विहार व इतर पुष्कळ देवळें आहेत ) या शहरानजीकच वसलें आहे. (५१ व.). (१६) भोजदेव – ८ व. (१७) लक्ष्मीकामदेव – २२ व. (१८) जयकामदेव (२० व.) याला मुलगा नसल्यानमुळें नवाकोट ठाकुरी घराण्यांतील पुरुष याच्या पश्चात गादीवर आला.

(७) नवाकोट ( नयाकोट ) ठाकुरी घराणे:-- (१) भास्करदेव, (२) बलदेव, (३) पद्मदेव, (४) नागार्जुनदेव (१०७२), (५) शंकरदेव याच्या राज्यांत प्रज्ञापारमिता नांवाचा एक हस्तलिखित ग्रंथ एका विधवा ब्राह्मणीनें सोनेरी अक्षरांनी लिहून ठेविला आहे. वि. संवत् २४५ मध्यें ही ब्राह्मणी मूळची गौडदेशीय अफी येथील असून ती नेपाळांत झाल या खेड्यांत येऊन राहिली होती. याच्या मरणानंतर अंशुवर्धनच्या घराण्यांतील वामदेव नांवाच्या एका गोत्रजानें कांतिपूर व ललितपूर येथील राजांच्या मदतीनें नवकोट ठाकुरी घराण्यास जिंकून त्यांस पुन्हां आपल्या पूर्वीच्या ठिकाणीं हुसकून लाविलें ( १०९२ ).

(८) अंशुवर्धनाचें दुसरें ठाकुरी घराणें: -- (१) वामदेव, (२) हर्षदेव, (३) सदाशिवदेव, यानें कीर्तिपूर हें शहर खाटमांडूच्या नैर्ऋत्येस वसविलें, व इ.स. ७५० त एक नवीन सोन्याचा कळस पशुपतीच्या मंदिरावर चढविला. यानें तांबें व लोखंड यांच्या मिश्रणाचीं नवीन सिंहछाप असलेलीं नाणीं चालू केलीं. (४) मानदेव हा चक्रविहारांत संन्याशी होऊन राहिला. १० व. (५) नरसिंहदेव, २२ व. (६) नंददेव, २१ व. (७) रुद्रदेव हा बुद्धभिक्षु झाला. १९ व. (८) मित्रदेव, २१ व. (९) अरिदेव, २२ व. (१०). अभयमल्ल, ९ व (११) जयदेवमल्ल यानें शाखवालच्या मदतीनें नेवारी शक इ.स. ८७९ त सुरु केला ( १० व.). हा कान्तिपूर व ललितपट्टणावर राज्य करी व याचा भाऊ (१२) आनंदमल यानें भक्तपूर किंवा भाटगांव वसविलें, व वेणीपूर, पणौती, नाला, धोमखेल, खड्पु अथवा शड्पु, चौकटशंगा हीं ७ गावें वसविलीं. हा (२५ व.) भाटगांव येथें रहात असे या दोन भावांच्या राज्यांत दक्षिणेंतून कर्नाटक घराण्यांतील नान्यदेव या मूळ पुरुषानें प्रवेश केला.  

(९) कर्नाटक घराणे:-- (१) नान्यदेव यानें नेपाळ संवत् ९ श्रावण शुद्ध ७ ला, दोन्ही मल्लांनां तिरहूतकडे हांकून लाविलें. यानें भाटगांव येथें ५० वर्षे राज्य केलें. याच्या बरोबरच नेपाळांत नेवार लोक आले व त्यांच्या नांवावरूनच नेपाळ हें नांव देशास मिळालें. नेवारशकहि यापुढें म्हणजे ता. २० आक्टोबर इ.स. ८७९ मध्यें सुरू झाला ( वि. सं. ९३६ कार्तिक शुद्ध प्रतिपदा). (२) गंगदेव, ४१ व. (३) नरसिंहदेव, ३१ व. [  नेपाळसंवत् १११ फाल्गुन शुद्ध ६ ला राजा मल्लदेव व कभ्यमल्ल ( ललितपट्टणचा ) यांनीं चापागांव व चंपापुरी हीं शहरें वसविलीं. ]  (४) शक्तिदेव, ३९ व. (५) रामसिंहदेव, ५८ व. (६) हरिदेव यानें आपली राजधानी खाटमांडु येथें नेली. पाटणच्या त्याच्या सैन्यानें बंड करून हरिदेवास थाबेलास हांकून लावलें. (७) राजा हरिदेवाच्या तैनातींतून एका मगर नौकरास काढून टाकण्यांत आलें व मुकुंदसेनाकडून देश जिंकवून त्याला गाडींत घालून मिरवीत आणलें. मुकुंदसेनाच्या मगर व खष सैन्यानें पवित्र देवालयांचा विध्वंस केला व मत्स्येंद्रनाथाच्या देवालयांतून भैरवाची मूर्ति पाल्पाला नेण्यांत आली. यामुळें पशुपतीचा क्रोध होऊन मुकुंदसेनाची सर्व सेना पटकीच्या आजारास बळी पडली. मुकुंदसेन एकटाच काय तो साधुवेशांत प्राण घेऊन पळून जाऊं शकला. हा देवीघाटावर मरण पावला.

नेपाळ देश अगदीं धुळीस मिळाल्यामुळें, गादी रिकामी पडून जिकडे तिकडे सात आठ वर्षे बेवंदशाही माजली. तेव्हां नवाकोटचें बैस ठाकुराणी घराणें पुन्हां मुलुख मिळविण्यास आलें. ललितपट्टणांत प्रत्येक टोलाला ( पेठ ) एक राजा होता, व कान्तिपूरला तर एकसमयावच्छेदेकरून १२ राजे होते. भाटगांव हा ठाकुरीच्या ताब्यांत होता ह्या ठाकुरी घराण्यांतील पुरुषांनीं २२५ वर्षे राज्य केलें व पुष्कळ बुद्ध मंदिरें आणि विहार बांधिले. या सुमारास सूर्यवंशी अयोध्याभूप हरिसिंहदेव याला मुसुलमानांनीं हाकून दिल्यामुळें त्यानें सिमरोणगढ येथें गादी स्थापिली. हें सिमरोणगढ तराईमध्यें आहे. तो आपल्या देवीच्या ( तुळजा भवानीच्या ) आज्ञेवरून नेपाळांत आला व त्यानें सूर्यवंशी घराणें स्थापिलें.

(१०) भाटगांवचें सूर्यवंशी घराणें:--  (१) हरिश्चंद्रदेव ( २८ वर्षे ) यानें इ.स. १३२४ त सर्व नेपाळचें खोरें पादाक्रांत केलें. (२) मतिसिंहदेव, १५ व. (३) शक्तिसिंहदेव (३३ व.) याला चीनच्या बादशहाकडून चीनी शकाच्या ५३५ व्या वर्षी एक पत्र आलें, त्या पत्रावर शक्तिसिंहराम हें नांव होतें. मग त्याने राज्यत्याग केला. (४) श्यामसिंहदेव (१५ व.) याच्या वेळीं इ.स. १४०८ मध्यें म्हणजे नेपाळशकाच्या भाद्रपद शुद्ध १२ ला एक मोठा थोरला भूकंपाचा धक्का बसला. याची मुलगी मल्लांच्या एका वंशजास दिली होती. ह्याच्या ताब्यांत तिरहूत हा प्रांत होता. या राजाच्या मृत्यूनंतर तिसरें ठाकुरी घराणें गादीवर आलें.

(११) तिसरें ठाकुरी घराणें:-- (१) जयभद्रमल्ल, १५ व. (२) नागमल्ल १५ व. (३) जयजगत्मल्ल ११ व. (४) नागेंद्रमल्ल, १० व. (५) उग्रमल्ल, १५ व. (६) अशोकमल्ल (१९ व.) यानें बैस ठाकुरींनां पाटणाहून हांकून लाविलें. याच्या वेळीं पश्चिमेकडून खष लोकांचे हल्ले नेपाळवर होऊं लागले. यानें स्वयंभूनाथच्या नजीक काशीपूर नांवाचें शहर वसविलें. हें मन्मती, वाग्मती व रुद्रमंती या नद्यांच्या मध्यें आहें. (७) जयस्थितिमल्ल यानें जातीविषयीं व वंशविषयक कायदे केले. बर्‍याच मूर्ती व देवळें बांधली. नेपाळसंवत् ५१२ चा, या राजाचा शिलालेख ललितपट्टणनजीक सांपडला आहें. याच्या वेळीं बौद्ध झालेले लोक पुन्हां हिंदु झाले. (८) यक्षमल्ल यानें भाटगांवचा तट बांधला. या शहराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या हातास श्रावण शुद्ध नेपाळसंवत् ५७३ ( इ.स.१४५३ ) चा एक शिलालेख आहें. यानें व याच्या नंतरच्या राजानें एक दत्तात्रेयाचें देवालय बांधलें आहे. हा नेपाळसंवत् ५९२ मध्यें वारला;  त्याला तीन मुलगे होते. त्यांपैकीं पहिला व तिसरा यांनी दोन गाद्या भाटगांव आणि खाटमांडु येथें स्थापना केल्या, व मधला रणमल्ल यानें बाणेपा शहर घेतलें. बाणेपा येथील वंश साधारण एक शतक चालून मग भाटगांव शाखेतं सामील झालें.

(अ) भाटगांव शाखा:-- (९) जयरायमल्ल, १५ वर्षे; त्याचा पुत्र (११) सुवर्णमल्ल, १५ वर्षे; त्याचा पुत्र (११) प्राणमल्ल, १५ वर्षे; त्याचा पुत्र (१२) विश्वमल्ल, १५ वर्षे; त्याचा पुत्र (१३) त्रैलोक्यमल्ल, १५ वर्षे; त्याचा पुत्र (१४) जगज्योतिर्मल्ल किंवा जयज्योतिर्मल्ल १५ वर्षे; त्याचा पुत्र (१५) नरेन्द्रमल्ल, २१ वर्षे; त्याचा पुत्र (१६) जगत्प्रकाशमल्ल, २१ वर्षे; याच्याच कारकीर्दीत हरसिंह भारो व वासिंह भारो यांनीं भीमसेनाचें देवालय बांधलें, व तेथें उभारलेल्या एका दगडी सिंहावर नेपाळ संवत् ७७५ ( इ.स. १३५५ ) हा खोदला आहे. या राजानें ५ श्लोक, भवानी देवीच्या प्रीत्यर्थ, विमलसुचमंडपांतील एका शिलेवर कोरून ठेविले आहेत. जेष्ठ वद्य ३ नेपाळसंवत् ७८५ या वर्षी त्यानें एक श्लोक गरूडाप्रीत्यर्थ एका गरूडस्तंभावर नारायणचौकांत खोदून ठेवला आहे. (१७) जितामित्रमल्ल (२१ वर्षे) यानें दरबाराजवळील हरिशंकराची मूर्ति अर्पण केली. यानें दुसरीं अनेक देवालयें बांधलीं, व ज्येष्ठ शु॥ १५ ला ( इ.स. १६८३ ) एक लेख एका धर्मशाळेवर खोदला आहे. (१८) भूपतीन्द्रमल्ल (३४ वर्षे) याच्या वेळचे शिलालेख पुढीलप्रमाणें आहेत: - (अ) नेपाळसंवत्, ८१७, कलि ४७९९, शकसंवत् १६२०, फाल्गुन शु॥ ९ हा लेख मालतीचौकांत आहे. (आ) इ.स.१७०३ चा लेख तांत्रिक गुप्तदेवतांच्या देवालयांत आहे. (इ) इ.स. १७०७. (ई) इ.स. १७०७ हा लेख दरबारांत आहे. (उ) इ.स. १७१८ हा लेख भैरवाच्या देवळांत आहे. (ऊ) इ.स. १७२१ वगैरे. (१९) रणजितमल्ल यानें अन्नपूर्णादेवीला एक बैल बळी दिला (स. १७३७). याच्या वेळीं गुरखा लोकांचा राजा नरभूपालशाह् यानें नेपाळवर स्वारी केली. या राजाबरोबर नेपाळचें भाटगांव घराणें लोपलें. तसेंच यानें पृथ्वीमल्ल या गुरखा राजास मदतीस बोलाविलें. गुरखे हे मूळचे राजपुतान्यांतील असून अल्लाउद्दीन खिलजीच्या त्रासामुळें इकडे आले. पृथ्वीमल्लानें रणजित यास साहाय्य केलें पण पुढें त्याचेंहि राज्य खालसा केलें. त्या वेळी त्यानें इंग्रजांची मदत मागितली. कॅ. किनलॉक हा मदतीस गेला असतां त्याचा पराभव झाला. तेव्हा गुरख्यांनीं खाटमांडु, भाटगांव व पाटण हीं सर्वच शहरें काबीज केलीं. अशा तर्‍हेनें नेपाळ गुरख्यांच्या ताब्यांत गेलें (१७६९).
  
(ब) खाटमांडु शाखा: -- (१) रत्‍नमल्ल (७१ वर्षे) यानें कान्तिपूरच्या १२ ठाकुरी राजांचा वध केला. इ.स. १४९१ नंतर त्यानें नवाकोटच्या ठाकुरींचा पराजय करून मग भोतियांचा पाडाव केला ( भोतिया हे तिबेटी लोक होत ), याप्रीत्यर्थ त्यानें सीनाचा राजा पाल्पा याची मदत घेतली होती. याच राजाच्या राज्यांत मुसुलमानांनीं प्रथम स्वारी केली. पण तींत त्यांनां यश आलें नाहीं. सोमशेखरनंद नांवाचा एक दक्षिणी ब्राम्हण पशुपतीच्या देवालयांतील मुख्य पुजारी झाला. तुळजादेवीचे मंदीर यानें बांधलें, व सिंह छापाचें एक नवीन नाणें चालू केलें. (२) अमरमल्ल यानें २८ गांवें व खेडीपाडीं यांवर राज्य केले. याच्या कारकीर्दीत गयेच्या देवळांच्या नमुन्यावर एक देऊळ ललितपट्टण येथें बांधलें गेलें. (३) सूर्यमल्ल यानें भाटगांव शाखेपासून शंखपूर आणि चांगूनारायण घेतलें. (४) नरेंद्रमल्ल, (५) महीन्द्रमल्ल यानें दील्लीश्वराची चांदीचें नाणें काढण्याकरितां परवानगी मिळविली. हा त्रैलोक्यमल्ल नांवाच्या भाटगांवच्या राजाचा स्नेही झाला व यानें माघ शु॥ ५ ला तुळजादेवीला एक देऊळ अर्पण केलें, ( नेपाळसंवत् ६६९ ). याच्याच राज्यांत पुरंदर राजवंशी यानें एक  नारायणाचें देवालय बांधिले. तें ललितपट्टणच्या राजवाड्यानजीक आहे (इ.स. १५६६). (६) सदाशिवमल्ल याला लोकांनी भाटगांव येथें हांकून लाविलें व तेथें त्याला कैदेंत टाकण्यांत आलें. (७) शिवसिंहमल्ल, यानें एका लेखाप्रमाणें इ.स. १५९४ मध्यें स्वयंभूचें देवालय दुरुस्त केलें, व याच्या गंगा नांवाच्या राणीनें चांगूनारायणाचें देऊळ इ.स. १५८५ मध्यें दुरुस्त केलें. याला दोन मुलगे होते. थोरला हा कान्तिपूरच्या गादीवर बसला, व धाकट्यानें तर बाप जिवंत असतांच ललितपट्टण हस्तगत करून घेतलें. (८) लक्ष्मीनरसिंहमल्ल याच्या कारकीर्दीत खाटमांडु नांवानें प्रसिद्ध असलेलें गोरखनाथाचें देवालय ( इ.स. १५९५ ) बांधलें गेलें. याला पुढें वेड लागलें व याला गादीवरून काढून टाकण्यांत आलें, व याच्या मुलानें यास १६ वर्षे बंदिवासांत ठेविलें. (९) प्रतापमल्ल हा इ.स. १६३९ त गादीवर बसला. हा कवि होता. याच्या राज्यांतील लेख पुढीलप्रमाणें आहेत :-- (अ) स्वयंभू मंदीर जेव्हां पुन्हां बांधलें त्या वेळच्या लेखांचा संग्रह. हे एका लामानें इसवी सन १६४० त बांधिलें. (आ) स्वयंभूस्तोत्र, इसवी सन १६५०. (इ) गुह्येश्वरस्तोत्र, इसवी सन १६५४. (ई) १५ अक्षरांत कालिकास्तोत्र ( राईट याचा ताम्रपट पहा ). इसवी सन १६५४. (उ) लायकुलबहाल येथें विश्वरूपाची मूर्ति (स.१६५७) स्थापिली, त्यावेळच्या कागदपत्रांत उल्लेख केल्याप्रमाणें याला ४ मुलें होतीं. तीं म्हणजे पार्थिवेंद्र, नृपेंद्र, महीपतींद्र, चक्रपतींद्र हीं होत. या सर्वांस या राजानें एकामागून एक या क्रमानें आपल्या हयातींत राज्य करण्यास लाविलें होतें. नृपेंद्रानें पशुपतीच्या नंदीला एक कोट बांधिला. त्यांचा एक लेख आहे. चक्रपतींद्र यानें एक दिवस राज्य केलें व लगेच मरण पावला. याच्या नाण्यांवर धनुष्य आणि बाण असून शिवाय पाश, अंकुश, यक्षाची शेंपूट आणि ने. सं. ७८९ ( इ.स. १६६९ ) आहे. (१०) महिंद्रमल्ल हा स. १६९४ मध्यें वारला. (११) भास्करमल्ल यानें ने. सं. ८२२ पर्यंत राज्य केलें. हा प्लेगनें वयाच्या २२ व्या वर्षी वारला. याला संतान नव्हतें. (१२) जगज्जयमल्ल; एक लांबचा नातेवाईक असून याला भास्कराच्या बायकांनीं गादीवर बसविलें. याला राजेंद्रप्रकाश, जयप्रकाश, राज्यप्रकाश, नरेंद्रप्रकाश, चंद्रप्रकाश हे ५ मुलगे होते. (१३) जयप्रकाश यानें आपला भाऊ राज्यप्रकाश याला हांकून दिलें. तो आपल्या ललितपट्टण येथील विष्णूमल्लनामक भावाकडे पळून गेला. याला इ.स. १७६८ मध्यें पृथ्वीनारायण या गुरखा राजानें पदच्युत केलें.

(क) ललितपट्टण येथील शाखा:-- (१) हरिहरसिंह हा कांतिपूरच्या शिवसिंहाचा धाकटा मुलगा होता.  (२) सिद्धिनृसिंह यानें इसवी सन १६२० मध्यें ललितपुरास एक राजवाडा बांधला. याच वर्षी यानें तुळजादेवीची मूर्ति स्थापिली व स. १६३७ या वर्षी राधाकृष्णाचें देवालय बांधिलें; तसेंच त्यानें एक जलमार्ग तयार केला (इ.स. १६३६) व नंतर तो संन्याशी बनला. (३) श्री निवासमल्ल यानें इ.स. १६५७ पासून राज्याचीं सूत्रें हातीं घेतलीं. खाटमांडूच्या प्रतापमल्लाबरोबर याची लढाई झाली (इ.स. १६५८-१६६२). याच्या कारकीर्दीतील शेवटचा लेख स. १७०१ चा आहे. (४) योगनरेंद्रमल्ल याचा मुलगा वारल्यामुळें यानें संन्यासदीक्षा घेतली. (५) महीपतींद्र ( किंवा महींद्रमल्ल ) हा खाटमांडूचा राजा झाला. हा इ.स. १७२२ मध्यें दिवंगत झाला. (६) जययोगप्रकाश याच्या राज्यांतील स. १७२३ चा एक लेख आढळतो. (७) विष्णुमल्ल हा योगनरेंद्र याच्या मुलीचा मुलगा; यानें मूलचौकांतील एक घंटा स. १७३७ त अर्पण केली. नंतर लवकरच हा निपुत्रिक मरण पावला.   (८) राज्यप्रकाश (७ वा) याला विष्णुमल्ल यानें राजा केलें. त्याच्या प्रधानांनीं डोळे काढून त्याला हांकून लावलें. (९) याचें नांव आढळत नाहीं. (१०) जयप्रकाश कान्तिपूरचा राजा यानें ललितपट्टणवर २ वर्षे राज्य केलें. यालाहि प्रधानांनीं घालवून लाविलें. (११) विश्वजितमल्ल ( विष्णुमल्लाच्या मुलीचा मुलगा ) याला प्रधानांनीं ठार केलें. (१२) दलमर्दनशहा ( नवकोटचा ) याला प्रधानांनीं राजा केलें, व नंतर ४ वर्षांनीं यास हांकून लाविलें. (१३) तेजनरसिंह हा राज्यावर आल्यावर ३ वर्षांनीं याचा सर्व प्रदेश पृथ्वीनारायणानें जिंकून घेतला.   

यावरूंन ही वंशावळी जरी बरीच सत्य आहे तरी वास्तविक तिला महत्व नाहीं. सामान्यत­­­­­: हिंदुस्थानचे वंशावळी लेखक आपल्या वंशावळींत भारतीय कथा व कौरवपांडव यांचा कसाना कसा तरी संबंध जुळवून थेट सत्ययुगापर्यंत चारहि युगांची वंशीवळी देण्याचा प्रयत्‍न करतात असाच समज प्राचीन ग्रीक लोकांचा होता. त्यांच्या मतें प्रत्येक प्रजासत्ताक संस्थानांतील किंवा शहरांतील कोणीना कोणी तरी प्राचीन योद्धयानें ट्रॉयच्या घनघोर युद्धांत भाग घेतल्याशिवाय त्या शहरास किंवा प्रजासत्ताक संस्थानास महत्वच नाहीं म्हणूनच हिरोडोटससारख्या इतिहासकारांचा कल तत्कालीन परिस्थितीच्या मूलकारणांचा शोध करतांना होमरनें सांगितलेल्या दंतकथांकडे फार असे.

ज्योतिर्विदांनीं चारहि युगांचा काल ठरवून कलियुगाच्या सुरवातीस भारतीय युद्धाचा काल ठरविल्यावरच बहुतेक सार्‍या वंशावळीकारांनीं आपले ग्रंथ लिहिले आहेत. यामुळें त्यांनीं प्रत्येक राजाच्या आयुर्मर्यादेंत भर घातली, शिवाय या वंशावळीकारांनीं निरनिराळे शक उपयोगांत आणल्यामुळें आणखीहि घोटाळा झाला. आधुनिक लेखकांनां शालिवाहन आणि विक्रमसंवत् हे दोन कायते शक माहीत आहेत. परंतु, हिदुस्थानांत कितीतरी शक अस्तित्वांत आले होते. इतकेंच काय, पण एकाच नांवाचे दोन तीन राजे होऊन गेले आहेत, व दोन तीन विक्रमादित्य शककार असावेत असें “संवताचे उत्पादक” या मूलग्रंथांतील शब्दावरून उघड दिसतें.

या वंशावळ्यांतील पाल्हाळ वर्णनेंच काय तीं अविश्वसनीय आहेत असें नव्हे तर कांहीं वंशचे वंशच बनावट असले पाहिजेत. महाभारत, आणि महात्म्यग्रंथांतून नांवें घेऊन नेपाळच्या खर्‍या राजांच्या याद्यांच्या सुरवातीस तीं दडपून दिलीं असलीं पाहिजेत. अहीर वंशालाहि वरील विधानें लागू आहेत. किरातांनां मात्र ही गोष्ट लागू पडत नाहीं. एकंदरीनें पाहतां पहिले पहिले वंश हे बराच काल अडवून बसले आहेत. मात्र पुढील वंशवृक्ष बरोबर असावेत असें दिसतें. हा काळ म्हणजे ठाकुरी घराण्यांतील, खाटमांडु शाखेचा संस्थापक जो गुणकर्मदेव त्याच्यापासूनचा होय. या सुमाराची (इ.स. ७२३) माहिती खरी असावी परंतु गुणकर्मदेवाच्या नंतर लागलीच आलेले राजे भोजदेव, लक्ष्मीकामदेव यांचा काल एका लेखांत इ.स. १०१५-१०३९ यांच्यामध्यें दिला आहें. एवढेंच नव्हे तर हस्तलेखांतील तारखांवरून ७ व ८ हीं वैश्य ठाकुरी घराणीं ११ व्या शतकापासून १४ व्या शतकापर्यंत गादीवर होतीं. अर्थात ८, ९, १० या शतकांतील वंशवृक्ष पूर्ण नाहीं असें वाटतें, व ही अपूर्णता झांकण्यासाठी कांहीं कांहीं राजांचे राज्यकाल बरेच वाढविण्यांत आले आहेत. जर्मन प्राच्य भाषासंशोधक मंडळानें नारायणदेवाचा राज्यारोहणकाल इ.स. १०९७ हा ठरविला आहे.  

याप्रमाणें वंशावळ्या अविश्वसनिय असून त्यांत जागोजाग मोठमोठ्या ढोबळ चुका आहेत. अंशुवर्धन याचें नांव मात्र, वंशावळ, हस्तलिखितें, ताम्रपट, व ह्युएनत्संग याच्या पुस्तकांत आलेलें आहे. याचा काल वंशावळीप्रमाणें ख्रि. पू. १०१ हा आहे. त्याच्या ताम्रपटांवर ३४, ३९, ४५ हे संवत आहेत. ह्युएनत्संगच्या मतें अंशुवर्धन हा इ. सनाच्या ७ व्या शतकाच्या पूर्वार्धात राज्य करीत असावा.  

अंशुवर्धन हा सामंत होता. तेव्हां अर्थात त्यानें स्वत:चा शक निर्माण केला नसावा.त्याच्या शिलालेखांतील शक श्रीहर्ष याचा असावा. हा इ. स. ६०६-७ मध्यें सुरु झाला. हर्षाच्या राज्याची सीमा नेपाळपर्यंत पोंचल्यामुळें साहजीकच त्याचा नेपाळ सामतांनी हा हर्षशक सुरु केला असावा. कनिंगहॅम असेंच म्हणतो. वंशावळींतील विक्रमादित्य म्हणजे हर्षवर्धन होय. शिवाय कनिंगहॅमच्या मतें हर्ष हा वैश्य जातीचा होता व त्याच जातीचें नवाकोटचें वैश नांवाचें आठवें घराणें होतें. ह्युएनत्संग यानें लिहीलेल्या ग्रंथांत आणि शिलालेखामधील तारखेंत तफावत आहे. त्यावरून तो प्रत्यक्ष असा नेपाळांत गेला नव्हता असें वाटतें. अंशुवर्धन व जिष्णुगुप्त यांच्या कारकीर्दीत नेपाळांत दोनहातीं राज्यपद्धति होती, व ह्युएनत्संग नेपाळांत लिच्छवीवंशी राजा होता व तो अंशुवर्धन होता असें जें म्हणतो त्याचा अर्थ एवढाच कीं लिच्छवीवंशी राजा व अंशुवर्धन अशा दोघांची सत्ता एकसमयावच्छेदेंकरून नेपाळांत तेव्हां चालू असावी. अंशुवर्धन फार पराक्रमी असल्यामुळें त्याची कीर्ति हर्षाच्यासारखी पसरली. हर्षाच्यानंतर त्यानें महाराजाधिराज ही पदवी धारण केली असावी.

या अंशुवर्धनाच्या पाठोपाठ याच वंशांत जिष्णुगुप्त झाला असावा. या वेळच्या शिलालेखांवरून नेपाळमध्यें दुहेरी राजसत्ता होती हें स्पष्ट होतें. अंशुवर्धन हा पहिला शिवदेव याचा नोकर होता. पण पुढें त्यानें हळू हळू सर्व राजसत्ता बळकावली. शिवाय त्याला त्या राजानें महाराज ही पदवीहि अर्पण केली परंतु, अलीकडील इतिहासांतील जंगबहादूरप्रमाणें त्यानें आपल्या मालकाचें व त्याच्या पुढील वंशजांचें स्वातंत्र्य वरपंकीं तरी ठेवलें होतें. अशा प्रकारचा अर्थ जिष्णुगुप्ताच्या दोन्ही लेखांवरून निष्पन्न होतो. पुढें पूर्वीच्या राजघराण्याच्या हातांत पुन्हां सर्व सत्ता आली; ही सत्ता त्यांनीं कशी मिळविली हें नीटसें कळत नाहीं. अंशुवर्धनाचें घराणें अगदी लहान होतें, म्हणून त्यांत फारच थोडे राजे झाले.

शिलालेखांतून उल्लेखिलेले लिच्छवी घराणें हें वंशावळींत दिलेलें सूर्यघराणेंच होय हें दोघांच्या एकवाक्यतेवरून सिद्ध होतें. वंशावळींत जयवर्मन व वृषदेवर्मन या दोन राजांच्यामध्यें १४ नांवें जास्त सांपडतात. परंतु शिलालेखांमध्यें मात्र त्यांचा मागमूसहि नाहीं. या नंतरचे ६ राजे – शंकरदेव, धर्मदेव, मानदेव, महीदेव, वसंतदेव आणि उदयदेव हे वंशावळी व शिलालेख यांत ओळीनें आले आहेत.

लिच्छवीवंशाचा शक नीट ठरविण्यासाठीं, शिवदेव, धृवदेव याचे काल ठरविले पाहिजेत. वंशावळी व  शिलालेख यांवरून सामान्यपणें धृवदेव हा ११ वा येतो. वसंतदेव व जयदेवाचा बाप यांच्यामध्यें १५ राजे झाले, व वसंतसेनाच्या राज्याच्या सुरवातीसच संवत् ४३५ येतो. याप्रमाणें सुमारें २०७ – २१३ वर्षेपावेतों १६ राजांनी राज्य केलें.   

तौलनिक भाषापद्धतीप्रमाणें पाहतां गुप्तशिलालेखांची लिपि ही बहुतेक जुळते; व विशेषत: स्कंधगुप्ताच्या वेळच्या स्तंभावरील लिपीशीं तर ती फारच जुळते. गुप्तकाल हा इ.स. च्या दुसर्‍या शतकांत सुरू झाला. बेलीच्या म्हणण्याप्रमाणें तो इ.स. १९० पासुन सुरू होतो. समुद्रगुप्त हा इ. सनाच्या ४ थ्या शतकांत झाला. याच वेळीं इकडे मानवदेव हाहि राज्य करीत होता.

वर दिलेल्या एकंदर माहितीवरून वंशावळीकारांजवळ ऐतिहासिक पुरावा चांगलाच होता हें सिद्ध होतें. म्हणूनच वंशावळींतील पुष्कळ नांवें खरी आहेत.

गुरखा घराणें:-- पृथ्वीमल्ल उर्फ पृथ्वीनारायण यानें स. १७६९ त सर्व नेपाळ जिंकला हें मागें आलेंच आहे. त्यानंतर तो दोन वर्षांनीं मेला (१७७१) त्यास सिंहप्रताप व बहादूरशहा असे दोन पुत्र होते. सिंहप्रताप स. १७७५ त मेला. त्याला राणाबहादुर हा पुत्र होता. तो लहान असल्यानें त्याचा चुलता बहादुरशहा हा कारभार करी परंतु त्याच्या भावजयीस तें पसंत पडेना; म्हणून बहादुरशहा हिंदुस्थानांत आला. पुढें जेव्हां राजमाता वारली (१७८६), तेव्हां तो परत आला व त्यानें पुन्हां स. १७९५ पावेतों कारभार केला. ह्याच्या कारकीर्दीत राज्याची चतु:सीमा एकीकडे भूतानपावेतों व दुसरीकडे काश्मीरपावेतों वाढली. लॉर्ड कार्नवालीसच्या कारकीर्दीपर्यंत ह्या देशाचा ब्रिटिश हिंदुस्थानाशीं कांहीं संबंध नव्हता. पण पुढें बनारसच्या रेसिडेन्टामार्फत इंग्रजांनीं गुरखा लोकांशीं बोलणें सुरू केलें व त्याप्रमाणें १७९२ सालीं एक तहहि झाला. गुरखे लोक पूर्वी तिबेटच्या बाजूस स्वार्‍या करीत असत. त्यामुळें एकदां चीनच्या बादशहानें लामाचा शिष्य म्हणून नेपाळी लोकांवर एक मोठें सैन्य पाठविलें. तें सैन्य नयाकोटच्या अलीकडे येऊन पोहोंचलें. तेव्हां गुरखा लोकांनीं इंग्लिशांजवळ मदत मागितली, व कॉर्नवालीसनें कर्नल कर्कप्याट्रिक ह्यास पाठवून चीन व नेपाळ ह्या दोन देशांत तह घडवून आणण्याचा घाट घातला (१७९२). पण गुरखा लोकांनीं चीनचें स्वामित्व अगोदरच कबूल केल्यामुळें, कर्नलास मध्यें तोंड घालण्याचीं जरूरी पडली नाहीं, म्हणून १७९३ सालीं तो परत आला. पुढें (१७९५ त) राणाबहादूरशहा ह्यानें राज्याचीं सूत्रें चुलत्याकडून आपल्या हातीं घेतलीं तेव्हांपासून १८०० पर्यंत राज्यांत जिकडे तिकडे बेबंदशाही माजली. शेवटीं ही स्थिति असह्य होऊन दामोदर पांडे व इतर सरदारांनीं राजास पदच्युत करून त्याच्या अज्ञान पुत्रास गादीवर बसविलें. पण राणीच सर्व कारभार पहात असे. राणाबहादुरशहा बनारसला गेला. तेथें कॅप्टन नॉक्स यास त्याचा पोलिटिकल एजन्ट नेमण्यांत आलें. राणाबहादुर ह्याप्रमाणें ब्रिटिश हद्दींत असल्यामुळें नेपाळशीं दोस्ती जोडण्यास ही चांगलीच संधि मिळाली, व त्याप्रमाणें राण्यास कांही तरी नेमणूक मिळवून देण्याच्या उद्देशानें इंग्रजांनी नेपाळच्या राण्याशीं बोलणें लाविलें. पुढें स. १८०१ च्या तहाप्रमाणें १८०२ साली नॉक्स हा खाटमांडु येथें रेसिडेन्ट ठेवण्याची अट नेपाळाधिपतीनें कबूल केली, व त्याप्रमाणें १८०२ सालीं नॉक्स हा खाटमांडु येथें जाऊन पोहोंचला. पण त्यास दरबारीं मानानें वागविण्यांत न आल्यामुळें १८०३ सालीं तो परत आला. पुढें राणाबहादुर नेपाळास परत गेला व आपल्या विरूद्ध पक्षांतील एका पुढार्‍याचा खून करून राज्यपदारूढ झालां. पण पुढें लवकरच भावाच्या झगड्यांत तो स्वत:च मारला गेला व भीमसेन या नांवाच्या एका तरूण व महत्वाकांक्षी पुरुषाने बालराजाच्या वतीनें व राणीच्या संमतीनें राज्यकारभारसूत्रें आपल्या हातीं घेतली.

ब्रिटिश व नेपाळ यांच्यामधील सरहद्दीवरील डाकू व इतर वाटमार्‍या लोकांचा नाश करण्याकरीतां इंग्रजांनीं ६-७ वर्षे प्रयत्‍न केला. शेवटी दोघांनीं मिळून कमीशन नेमलें, व इंग्रजांनीं त्या जागेचा ताबा घेऊन बंदोबस्त करावा असें ठरलें. पण हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळें इंग्रजी पोलीसठाण्यावर नेपाळी लोकांनी हल्ले केले. ह्यामुळें १८१४ सालीं नेपाळशीं लढाई करण्याचे जाहीर करण्यांत आले. त्याप्रमाणें पश्चिमेकडून यमुना व सतलज ह्या नद्यांच्या पलीकडून स्वार्‍या करण्यांत आल्या. पण किल्ले वगैरे घेण्याच्या प्रयत्‍नांत इंग्रजांनां फार नुकसानी व हार खावी लागली. कलंगा येथील हल्ल्यांत बेदम मार मिळून जनरल गिप्सी ठार झाला (१८१५). त्याच्या जागीं डेव्हिड ऑक्टरलोनी ह्याची नेमणूक झाली. ह्यानें फार कुशलतेनें लढून गुरखा लोकांकडून युक्तीनें काली नदीच्या पलीकडील सर्व प्रांत ब्रिटिशांचा असें कबूल करवून घेतलें. कुमाऊन प्रांतांतूनहि ब्रिटिशांनी गुरख्यास हांकलून लाविलें. तेव्हां नोव्हेंबर १८१५ त एक तह झाला. पण राजानें सही करण्याचें नाकारल्यानें पुन्हां युद्धास सुरूवात होऊन स. १८१६ च्या सुरवातीस खाटमांडु राजधानीवर मोठें सैन्य पाठविण्यात आलें. अडचणीस न जुमानतां व हर एक ठिकाणीं गुरख्यांचा पराभव करीत करीत इंग्रज हे खाटमांडूच्या जवळ तान दिवसांच्या वाटेवर आले, तेव्हां मात्र राजानें तह करण्याकरितां आपला वकील पाठविला (१८१६). या तहांत मागील तहाचीच पुनरावृत्ती करण्यांत आली. गुरखे लोकांनीं ह्या तहाबरहुकूम काली नदीच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश, कुमाऊन, डेहराडून, अलमोरा आणि सिमला हीं सर्व ठिकाणें इंग्रजांस दिलीं. ह्याच वर्षाच्या शेवटीं येथील राजा देवीं मरण पावला, व त्याचा पुत्र राजेन्द्र विक्रमशाह त्याच्या पश्चात गादीवर आला. पण राजाचें पोरवय असल्यामुळें भीमसेन थापा हाच सर्व कारभार पहात असें. १८३७ सालीं राजाचा कनिष्ठ पुत्र एकाएकीं वारला व भीमसेनानें त्यास विष घालून मारलें अशी अफवा पसरली. यामुळें भीमसेनास नोकरी सोडावी लागली व त्याने आत्महत्या करून घेतली. त्याचा पुतण्या मातबरसिंग यानें लाहोर दरबारांत नोकरी मिळविली. पुढें १८४३ सालीं मातबरसिंगास प्रधानकीचीं वस्त्रें घेण्यासाठीं परत बोलाविलें. पण त्याचा पुतण्या जंगबहादूर यानें दोन वर्षांनंतर त्याचा खून केला. जंगबहादूर हा फार हुषार, शूर व विलक्षण महत्वाकांक्षी होता. विक्रमशहाच्या राणीच्या शिकवणीवरून त्यानें चुलत्याचा खून केला. नंतर तो सैन्याचा मुख्य अधिपति झाला. सन १८४६ त गगनसिंग नांवाच्या नवीन प्रधानाचा खून झाला, तेव्हां राणीच्या सांगण्यावरून जंगहादुरानें खुनाबद्दल सूड उगविला. सरदार व मानकरी लोकांची एक सभा भरून खून करणार्‍यांस शोधून काढून त्यांचा इन्साफ करण्याचें ठरलें. पण राणीचा हुकूम सरदारांनी अमान्य केल्यावरून त्याचा परिणाम ‘खोत’ येथील कत्तलींत झाला; तींत १५० सरदार लोक ठार झाले. नंतर जंगबहादुर यास प्रधानकीचीं वस्त्रें देण्यांत आलीं. पुढें थोड्याच दिवसांनीं याच्या खुनाचा कट केल्याच्या संशयावरून बर्‍याच कटवाल्यांस फांशी देण्यांत आलें व खुद्द राणीस तिच्या दोन तरूण पुत्रांसह हद्दपार करण्यांत आलें. बालराजाहि त्याच्याबरोबर गेल्यामुळें सुरेंद्र विक्रमशहा ह्यास त्याच्याऐवजीं गादीवर बसविण्यांत आलें. जंगबहादुर हा दूरदर्शी, न्यायी व सत्तेचा योग्य उपयोग करणारा मनुष्य होतां असें म्हणतात. त्यानें राज्यांतील आपल्या सर्व शत्रूंचा नाश केला, व तरूण राजास आपल्या पूर्ण कह्यांत ठेविलें. इंग्रजांची व ह्यांची मैत्री होती. पुढें १८५० सालीं तो यूरोपांतून जाऊन आल्यानंतर ती अधिकच दृढ झाली. हिंदुस्थानच्या एका कोंपर्‍यांतील देशांतून जंगबहादुरसारख्या सत्ताधीशानें पाश्चात्त्य देशांतून हिंडणें व तेथील राजनीति आणि बलाबल ह्यांचा अभ्यास व अनुभव घेणें हें वाखाणणीय होय. १८५७ सालच्या धामधुमींत देखील जंगबहादुर हा पलटणवाल्यांस न मिळतां, इंग्रजांस मदत करण्यास तयार झाला. पण दिल्ली घेईपर्यंत त्याच्या मदतीची जरूरीच पडली नाहीं. गोरखपूर व लखनौ घेण्यांत जंगबहादूरनें इंग्रजांस मदत केली. श्री. धोंडोपंत नाना पेशवे हे नेपाळांत वारल्यावर त्यांच्या राजकुटुंबास यानें नेपाळांत आश्रय दिला होता. नेपाळच्या राजानें जंगबहादूरास महाराजा हा किताब दिला व इंग्रजांनीं जी.सी.बी. ही पदवी दिली, आणि १९ तोफांच्या सलामीचा मान दिला पुढें १८६० सालीं जो तह झाला, त्यांत अयोध्या प्रांताच्या सीमेवरील कांहीं प्रदेश नेपाळच्या महाराजास परत देण्यांत आला. जंगबहादूर हा १८७७ सालीं वारला.       

सन १८८१ त सुरेन्द्र विक्रमशहाचा नातु महाराजाअधिराज पृथ्वीवीर विक्रमशहा आपल्या आजोबानंतर गादीवर आला. राणा दीपसिंग प्रधान व त्याचा बंधु धीरसमशेर सेनापती ह्यांच्याविरुद्ध झालेला एक गुप्त कट १८८२ सालीं उघडकीस आला. त्यांत जंगबहादुराचा पुत्र जगतसिंग ह्याचें अंग असल्याचें दिसून आलें, म्हणून त्यास हद्दपार करण्यांत आलें, पण १८८५ सालीं त्यास परत देशांत येण्याची परवानगी मिळाली.  धीरसमशेर हा १८८४ च्या सुमारास मरण पावला. पुढें त्याच्या पुत्रांनीं राणादीपसिंगाच्या विरुद्ध कट करुन त्यास ठार मारलें व सर्व सत्ता आपल्या हातीं घेतली. जगतसिंगाचा, व त्याच्या पुत्राचाहि ह्याच गडबडींत खून करण्यांत आला. धीरसमशेरचा ज्येष्ठ पुत्र वीरसमशेर हा प्रधान झाला. ह्याच्या कारकीर्दीत राज्यांत शांतता व भरभराट होती. कलकत्ता येथें ह्यानें स्वत:करितां एक भव्य प्रासाद बांधिला. ह्याचें व इंग्रज सरकारचें सूत चांगलें होतें. गुरखा लोकांच्या लष्करभरतीकरितां ह्यानें इंग्रजांस बरीच मदत केली. हा १९०१ सालीं मरण पावला. वीरसमशेरानंतर देवसमशेर हा (त्याचा बंधु) प्रधान झाला, पुढें तीनच महिन्यांनी चंद्रसमशेर ह्याची प्रधानाच्या जागेवर नेमणूक झाली. १९०३ सालीं दिल्लीस भरलेल्या बादशाही दरबारास चंद्रसमशेर, त्याचे बंधू व इतर प्रमुख लोक सरकारी पाहुणे म्हणून आले होते.    
   
अलीकडील माहिती.--  महाराजाधिराज सुरेंद्र विक्रमशहा हा ११ डिसेंबर १९११ रोजीं वारल्यावर त्याचा पुत्र त्रिभुवनवीर विक्रम गादीवर आला. त्याचा जन्म स. १९०६ मध्यें झाला. येथील सर्व सत्ता मुख्य प्रधानाच्या हातीं असते. हल्लीं महाराजा सर चंद्रशेखर समशेरजंग बहादुर राणा हा मुख्य प्रधान असून त्याची नेमणूक स. १९०१ मध्यें झालेली आहे. ब्रिटीश सैन्यांतील ऑनररी जनरलचा हुद्दा त्याला आहे. त्याला अनेक (इंग्रजी व चिनी लष्करी) पदव्या आहेत. या प्रधानाच्या कारकीर्दीत राज्यकारभाराच्या प्रत्येक खात्यांत सुधारणा करण्यांत आंली आहे. जुन्या कायद्यांत नव्या परिस्थितीला अनुरुप अशी दुरुस्ती करण्यांत आली. अव्वल व अपील कोर्टे आणि हायकोर्टे स्थापण्यांत आलीं व त्यांवर शेवटचें अपील ऐकणारें प्रीव्हीकौन्सिलसारखें ‘निक्षरीं आद्दा’ हें आहें.  स. १९१८ मध्यें त्रिभुवनचंद्र कॉलेज स्थापन झालें असून त्यांत बी. ए. परीक्षेपर्यंतचें शिक्षण हिदुस्थानांतील मैत्र एम्. ए. प्रिन्सिपाल व इतर प्रोफेसर यांच्याकडून दिलें जातें. हल्लीं बरेच नेपाळी ग्रॅज्युएट तयार झाले असून पांच नेपाळी इसम कलकत्ता युनिव्हर्सिटीची एम्. ए. ची पदवी घेतलेले आहेत. शिवाय हिंदुस्थानांतील शेतकी, वैद्यक, कायदा, व्यापार वगैरे शिक्षणाच्या कॉलेजांत अनेक नेपाळी विद्यार्थी आहेत. प्राथमिक शिक्षणाच्या मोफत शाळा नेपाळांत सर्वत्र स्थापल्या आहेत.  
      
राज्यकारभारविषयक नेपाळसरकारचा दर्जा निश्चित सांगतां येत नाहीं. फार तर तो अफगाणिस्तानसारखा आहे असें म्हणतां येईल. संस्थानासंबंधीच्या अंतस्थ सर्व कारभांरात पूर्ण मोकळीक अफगाणिस्तानाप्रमाणें नेपाळला आहेच. नुक्तेच (ता. २१ डिसेंबर १९२३) नेपाळ हें पूर्ण स्वतंत्र राष्ट्र आहे, अशी इंग्रजांनी त्यास मान्यता दिली आहे. त्याला वाटेल तितका दारुगोळा व हत्यारें हिंदुस्तानांतून घेऊन जाण्याची परवानगी इंग्रजांनीं दिली आहे. मात्र त्याचा उपयोग इंग्रजांविरुद्ध करुं नये असा निर्बंध आहे. त्यास सांप्रत दोस्तराष्ट्र असें संबोधण्यांत येतें. हल्ली खाटमांडु येथें इंग्रजांचा एक वकील असतो व नपाळचाहि वकील दिल्लीस असतो. तिबेटांत ल्हासा येथेंहि एक नेपाळचा वकील आहे. नेपाळसरकारचा व चीनच्या अध्यक्षाचा संबंध हल्लीं मित्रत्वाचा आहे. पूर्वी दर पांच वर्षांनीं नेपाळच्या राज्यास चीनला कांही तरी मौल्यवान नजराणा पाठवावा लागे.

नेपाळात ४५ हजार खडें सैन्य आहे. त्यांत मार्टिनीहेनरी बंदुका वापरतात. शिवाय २५० तोफा असलेला तोफखानाहि आहे. गुरखे लोकांनां ब्रिटीश सरकार आपल्या सैन्यांत घेतें गेल्या महायुद्धाच्या वेळी गुरखे लोकांची सैन्यांत भरती फार मोठ्या प्रमाणांत झाली. व त्याला नेपाळसरकारनें सबलत दिली. इतकेंच नव्हे तर नेपाळसरकारनें स्वत:च्या सैन्यापैकीं उत्तम सैन्य हिंदुस्थानसरकारच्या मदतीला दिलें. या सैंन्याने १९१७ साली हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील युद्धकार्यांत चांगली कामगिरी बजावली. ब्रिटीश सार्वभौम बादशाकडुन युद्धसमाप्तीनंतर नेपाळच्या मुख्य प्रधानांनां गेलेला संदेश व तत्कालीन व्हाइसरायांनी स्वदेशीं परत जाणार्‍या नेपाळी सैन्याला उद्देशून केलेलें स्तुतिपूर्ण भाषण यांतहि नेपाळसरकारच्या महायुद्धांतील मदतीबद्दल कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला होता. नेपाळने १९२५ सालीं गुलामगिरी बंद करण्यासाठी जोरानें खटपट केली.

[ संदर्भग्रंथ:-- जिऑलॉ.सर्व्हे ऑफ इंडिया. नेपाळ भा.८; बृहत्संहिता; गुप्त-इन्सक्रिप्शन्स; वान्सिटार्ट - हिस्टरी ऑफ  नेपाळ. ए नोट; लेव्ही - नोट ऑन नेपाळ; इंडियन अँटिक्वरी, १८८० - ८४, भा.९; १३ व १४, पूर्णचंद्र मुकर्जी -- नेपाळ अँड तिबेट; हूकर - तराई, नेपाळ एक्सफ्लोरेशन रिपोर्ट; वॅडेल -- सिक्कीम अँड नेपाळ; प्रिन्सेप - अंमग दि हिमालयाज; हंटर - पोलिटिकल, मिलिटरी ट्रॅन्झ्याक्शन्स; इंपे. ग्याझे. भा.१९; ओल्डफिल्ड - हिस्टरी ऑफ नेपाळ; बेन्डाल स्केचेस फ्रॉम नेपाळ; माबेल.डफ - क्रॉनॉलजी; राईट - नेपाळ स्टेट नोट्स.]

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .