प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें              

बडोदें, संस्थान- मुंबई इलाखा. हें हिंदुस्थानांतील तिसरें मोठें संस्थान असून याचा सर्व राजकीय संबंध हिंदुस्थान सरकारकडे आहे. या संस्थानचा प्रदेश, गुजराथ व काठेवाडमध्यें आहे. परंतु त्याची व ब्रिटिशांच्या ताब्यांतील जवळच्या प्रांतांची इतकी गुंतागुंत झाली आहे कीं, याच्या नक्की सीमा देणें शक्य नाहीं. या संस्थानचा बहुतेक भाग उत्तर अक्षांश २० ४५' ते २४९' आणि पू. रेखांश ७०४२' ते ७३५९' यांच्या दरम्यान आहे.

बडोद्याकडील लोक या संस्थानास व शहरास 'वडोदरा' म्हणतात. हा शब्द संस्कृत वटोदर याचा अपभ्रंश आहे, अशी दंतकथा आहे. कारण बडोदें शहरासभोंवतीं पुष्कळ वडाचीं झाडें होतीं. बडोद्याचें दुसरें नांव वीरक्षेत्र (वीरांची जन्म(?)भूमि) अथवा वीरवती असें होतें. १७ व्या शतकांत बडोदें येथें येऊन गेलेला प्रख्यात गुजराथी कवि परमानंद यानें वडोदरा शब्दाबरोबर वीरक्षेत्र अथवा वीरवाटि या शब्दाचाहि उल्लेख केला आहे. म्हणून हें नांव विशेष लक्षांत ठेवण्याजोगें आहे. आणखी असेंहि लिहिलेलें आढळतें कीं याचें फार प्राचीन नांव चंदनवती असें होतें. हें नांव जैनांपासून बडोदें हिसकावून घेणा-या रजपुतांच्या ढोर जातीच्या चंदन नांवाच्या ढोर रजपुताच्या नांवावरून पडलेलें आहे. त्यापासून पुष्कळ बदल होऊन हा शब्द कसा झाला हें कळत नाहीं, परंतु अगदीं प्रथम आलेले इंग्रज प्रवाशी व व्यापारी या गांवास ब्रोदरा असें म्हणत, व त्यापासून बडोदें शब्द झालेला आहे.

या संस्थानच्या गुजराथेंतील प्रदेशाचे तीन भाग अथवा प्रांत आहेत. उत्तरेस कडी प्रांत, मध्ये बडोदें आणि दक्षिणेस नवसरी आणि काठेवाडांतील भागास बहुधां अमरेळी प्रांत या नांवानें संबोधितात. संस्थानचें क्षेत्रफळ ८१३५ चौरस मैल आहे. संस्थानचा बराच भाग समुद्रकिना-यालगतच्या पट्टींत असून तो गुजराथ, माळवा व राजपुताना यांतील नद्यांमधून वहात आलेला गाळ खंबायतच्या आखातांतील उथळ प्रदेशावर सांचून बनलेला आहे. किना-यापासून आंत जमीन चढती होत गेली आहे. परंतु चढ फारच थोडा असल्यानें सामान्यतः सर्व प्रदेश सपाट वाटतो व पूर्वेकडील भागांत टेंकडया दिसूं लागतात.

गुजराथेंतील बहुतेक नद्या खंबायतच्या आखाताला मिळतात. परंतु उत्तरेकडील बनास व सरस्वती या कच्छच्या रणांत जातात. खंबायतच्या आखातास मिळणा-या चार मुख्य नद्या, साबरमती, मही, नर्मदा व तापी ह्या होत. ह्या सर्व नद्या बडोदें संस्थानच्या भागांतून जातात. याशिवाय धातूर, किम, मिंदोल, पूर्णा व अंबिका या लहान नद्या आहेत. नवसरीच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील प्रदेशांत फार दाट झाडी आहे. सोनगड तालुक्यांतील भाग फार डोंगराळ आहे. अमरेली जिल्हा अगदींच रुक्ष आहे. ओखामंडल विभाग समुद्रकिना-यावर असून त्यांत द्वारकेचें प्रसिद्ध बंदर असल्यामुळें तो कांहींसा रमणीय वाटतो. कडीप्रांतांत विस्तीर्ण अशीं तळीं बरींच बांधलेलीं आहेत त्यांपैकीं वडनगर येथील शर्मिष्ठा नांवाचें तळें, वीसनगरमधील व पाटणजवळचीं तळीं मुख्य आहेत. बडोदें प्रांतांत पुष्कळ मोठीं तळीं आहेत. पैकीं सावळी तालुक्यांत मावळ नांवाचें तळें सर्वांत मोठें आहे. बडोदें शहरास पाण्याचा पुरवठा करण्याकरितां आजवा येथें जो सयाजी सरोवर नांवाचा मोठा तलाव आहे तो पाहण्यासारखा आहे.

बडोदें संस्थानांत गुजराथेंत आढळणारीं वाघ, चित्ता अस्वल, डुक्कर वगैरे जंगली जनावरें आहेत, आणि वेगवेगळया प्रकारचे पक्षीहि सांपडतात. मही व नर्मदा यांमध्यें मासे पुष्कळ आहेत. नवसरी भागांत पूर्णा, मिंदोल व अंबिका या नद्यांमध्येंहि मासे मारण्याचा धंदा चांगला चालू असतो. बडोदें प्रांतात मे व जून महिन्यांत उष्णमान सर्वांत जास्त म्हणजे सरासरी १०५० असतें, परंतु तें कधीं कधीं १०७० पासून ११०० पर्यंतहि वाढतें. सप्टेंबर व आक्टोबरमध्यें हवा वाईट असते. कडीप्रांताची हवा सर्वांत निरोगी असते. नवसरी प्रांतांत महुब, व्यारा, सोनगड वेळाछाचा काहीं भाग या राणी (अथवा अरण्य) महालांची हवा रोगट आहे, परंतु नवसरी, पळसाण, कामरेज व गणदेवी ह्या रास्ती महालांची हवा चांगली आहे. अमरेळी प्रांतांत धारी व कोडिनार तालुके खेरीजकरून हवा कोरडी व निरोगी आहे. संस्थानांतील चार प्रांतांमध्यें वार्षिक पावसाची सरासरी पुढें दिल्याप्रमाणें आहे- नवसरी-५२ इंच, बडोदें ३८ इंच, कडी २७ इंच आणि अमरेळी २२ इंच.

इकडील शिल्पाची त-हा गुजराथी जैन पद्धतीची आहे. गुजराथी सुतार, गवंडी वगैरे कारागीर उत्तम कालाकुसरीचीं कामें करतात. हल्लीं पोरबंदरी पांढ-या दगडाचा उपयोग इमारती बांधण्यांत फार करतात. प्राचीन देवळें पाटण, सिद्धपूर, मोढेरा, डभई व वडनगर येथें आहेत.

गुजराथेंत पुरुषांपेक्षां स्त्रिया बहुश: कमी असतात. इकडे बालविवाह प्रचारांत आहे. हल्लीं बालविवाहाची चाल कायद्यानें (१९०४ च्या) बंद केली आहे, तरी पण दंड भरून असलीं लग्नें होतात. १२ वर्षांच्या आंत मुलीचें लग्न करणा-यास हा दंड भरावा लागतो. विधवाविवाहाचा कायदा १९०२ सालीं पसार झाला आहे. इकडील आदित्यब्राह्मण व रजपूत यांच्यांत मुली जास्त असल्यानें त्यांच्यांत बहुभार्यात्वाची चाल सुरू आहे. संस्थानांत गुजराथी, मराठी, हिंदुस्थानी व भिल्ली या भाषा प्रमुख आहेत. शेतकीवर एकंदर लोकसंख्याच्या शेंकडा ६३ लोक निर्वाह करतात. कोष्टी, साळी हे शेंकडा १४ व व्यापारी शेंकडा ४ आहेत. तांदूळ, गहूं, हरभरा, कोद्रा, पावंटा, कापूस, तंबाखू, कडधान्यें बाजरी, हीं मुख्य खाद्यधान्यें व पिकें आहेत. गुजराथ्यांनां तूप-खिचडी व दुधपाकपुरी फार आवडते. हे लोक रांकट नसतात. गुजराथी स्त्रिया (त्यांतहि पाटण प्रांतांतील नागर ब्राह्मणांच्या स्त्रिया) ब-याच देखण्या असतात.

नवसरी व अमरेळी प्रांतांतील डोंगराळ जमिनीखेरीज बाकीच्या प्रांतांत जमीन चांगली असून नदींतील पुळणीची बनलेली आहे. गोरठ (तांबूस), काळी व भेसळ (तांबूसकाळी) असे जमिनीचे तीन प्रकार आहेत. बडोदें प्रांतांत नर्मदेच्या दक्षिणेकडील ४० मैलपर्यंतची जमीन काळी असून उत्तरेकडे गोरठ आहे. गोरठ जमीनींत झाडी पुष्कळ असतें. कडी प्रांताची जमीन साधारण आहे. गोरठ जमिनींत दोन पिकें काढतां येतात; तींत बाजरीं व तंबाखू उत्तम होते. काळ्या जमिनींत कापूस फार पिकतो. शेतक-यांच्या उपयोगासाठीं एक शेतकीखातें, शेतकी शाळा व सरकारी शेतें आहेत. जनावरांची पैदास, बींबियाणें खतें, आउतें वगैरे या खात्यांकडून लोकांस पुरविलीं जातात, शेतक-यास तगाई दिली जाते व त्यावर ५०० रुपयांच्या रकमांखालीं व्याज घेत नाहींत. चार शेतकी बँका सरकारानें उघडलेल्या आहेत, त्यांचा खर्च सरकार करतें. शेतक-यांनां ६। टक्के व्याजानें कर्ज देतात. नफ्यापैकीं ३ टक्के सरकार घेतें व बाकीची रक्कम शिल्लक ठेवतात. हल्लीं ५४८ पतपेढयाहि स्थापन झाल्या असून त्यांचा कायदा पसार झाला आहे. (१९२३).

अमरेळी प्रांतांत घोडे चांगले निपजतात. देशी व कांक्रेजी अशा गुरांच्या दोन जाती आहेत. कांक्रेजी बैल फार दांडगे असून त्यांनां प्रत्येकीं २५० रु. पर्यंत किंमत पडते. राज्यांत गायरानें पुष्कळ आहेत. संस्थानांत कालवे बरेच आहेत, तळींहि पुष्कळ आहेत. तलावामुळें व कालव्यामुळें जवळ जवळ ३ लाख एकर जमीन भिजली जाते. संस्थानांत रयतवारी पद्धत चालू आहे. अमरेळी प्रांत सर्वांत मागसलेला आहे. नवसरी प्रांतांत झाडी फार असून साग, शिसूं हीं इमारती लांकडें बरींच होतात. सरकारी जंगलखातें असून सोनगडव्यारी इकडे राखीव जंगल आहे. त्याचा दुष्काळांत फार उपयोग होतो.

पूर्वी तापीच्या चुंबीयलोहमिश्रित वाळूपासून लोखंड व कांहीं नद्यांच्या पात्रांतून सोन्याचे कण काढीत. संखेडा भागांत चांगल्या इमारती दगडांची खाण आहे. कडीप्रांतांत वीरपूर व बडोदेंप्रांतांत भुळवण, बोडेली इकडे ग्रॅनाईट दगड आङेत. उत्तम हिरवे संगमरवरी दगड मोतीपुरास सांपडतात.

अमरेळी प्रांतांत उत्तम खादी (धेड व मुसुलमानांनीं विणलेली) निघते. पाटण येथें मश्रूचें कापड, पितांबर, पातळें तयार होतात. बडोद्यास जरीचें व कशिद्याचें काम उत्तम होतें. अतरसुंब (कडीप्रांत) येथें सु-या, तरवारी वगैरे शस्त्रें होतात. सोजित्रा, पेटलाद येथें कुलुपें व आडकित्ते होतात. बडोदें व कडीप्रांत (पाटण, सिद्धपूर, वडनगर येथें) लांकडी नक्षीकाम सुबक होतें.

बडोद्यास कापसाची व सुताची अशा दोन मोठ्या गिरण्या असून सरकी दाबण्याच्या ४-५ गिरण्या आहेत. यांखेरीज संस्थानांत १४ कापडाच्या, एक लोकंरीची व एक सिमेंटची गिरणी आहे; शिवाय अलेंबिक केमिकल वर्क्स (रासायनिक पदार्थ तयार करण्याचा कारखाना), रंगाचा, अल्कलीचा, पत्र्यांचा, भांडयांचा, हातमागांचा, बर्फाचा, विटें-कौलांचा वगैरे लहान मोठे १०० वर कारखाने आहेत. कर्ज देऊन, जमीन देऊन वगैरे उपायांनीं संस्थानाकडून असल्या धद्यांनां  मदत होते. संस्थानचा बहुतेक व्यापार मुंबईशीं चालतो. कापूस, धान्य, अफू, तंबाखू, गूळ, एरंडेल तेल, ताग, भांडी, रेशमी कापड यांचीं निर्गत होते व साखर, लोखंड, मीठ, कापड, राकेल यांची आयात होते. द्वारका, नवसरी, बिलिमोरा या बंदरांत थोडा व्यापार चालतो. संस्थानच्या कंपनी कायद्यान्वयें संस्थानांत एकंदर औद्योगिक व व्यापारी १११ कारखाने व कंपन्या (१९२३ पर्यंत) नोंदल्या गेल्या आहेत.

संस्थानांत आगगाडया ब-याच आहेत. बी.बी.सी.आय; आर.एम.आर; टी.व्ही.आर; वगैरे मुख्य रेल्वे असून खुद्द संस्थानच्या मालकीचीहि (जी.बी.एस.आर. ६५२ मैल) बरीच रेल्वे आहे. पक्कया खडीच्या सडका फार नाहींत. पोष्ट व तारखात्याची व्यवस्था इंग्रज सरकारच्या हातीं आहे. त्याच्या मोबदल्यांत संस्थानास लागणारा पोष्टांचा (तिकिटांचा वगैरे) खर्च इंग्रज सरकार देतें. दुष्काळाचा परिणाम सर्व संस्थानभर एकदम जाणवत नाहीं. द्वारका, बैयत, वेळण, बिलिमोरा वगैरे बंदरांची पहाणी (व्यापारी दृष्टीनें) चालू आहे.

संस्थान हिंदुस्थान सरकारच्या देखरेखीखालीं मोडतें. संस्थानचा कारभार कार्यकारी मंडळाच्या तत्त्वानें चालतो. या मंडळांत दिवाण, अमात्य व इतर तीन मिळून पांच मुख्य अंमलदार असतात. मंडळावर दिवाणाचा व महाराजांचा अधिकार असतो. खालसा मुलखाप्रमाणेंच पुष्कळ प्रकारचीं खाती निर्माण केलीं असून, त्यांच्यावर इकडील अधिका-यांसारखे अधिकारी नेमलेले आहेत. राज्यांत चार प्रांत व ४२ महाल आहेत. प्रत्येक प्रांतावर एख सुभा व चार सुभ्यांवर एक सरसुभा असतो. सुभ्याच्या हाताखालीं नायबसुभा व त्याखालीं वहिवाटदार असतो. स्थानिक स्वराज्याची वाढ करण्यासाठीं पुष्कळ ठिकाणीं (जेथें १ हजारावर लो.सं. आहे तेथें) ग्रामपंचायती स्थापन करण्यांत आल्या असून (१९०२ पासून) त्यांनां बरेचसे अधिकार दिले आहेत. त्यांत ५ पासून १० पर्यंत सभासद असून निम्मे लोकनियुक्त असतात. न्यायमंत्र्याच्या हाताखालीं एक न्यायखातें स्थापिलें असून तेथें (महाराजच्या संमतीनें) कायदे तयार होतात. एक कायदेमंडळ उर्फ धारासभा असून तींत लोकनियुक्त व सरकारनियुक्त सभासद असतात. त्याचा अध्यक्ष दिवाण असतो. सरकारी जादा सभासद ५, सरकारी ६, सरकारनियुक्त ४ व लोकनियुक्त १० मिळून २५ सभासद असतात. खुद्द बडोद्यास एक सर्व संस्थानचें हायकोर्ट आहे. हायकोर्टावरील (कांहीं बाबतींत) अपीलें महाराजांकडे जातात व त्यांचा निकाल तीन सभासदांच्या हुजूर न्यायसभेच्या सल्ल्यानें महाराज करतात. संस्थानांत ५०८६ कवायती व ३८०६ बिनकवायती सैन्य आहे. तैनाती फौजेबद्दल इंग्रज सरकारास सालिना ३.७ लाख रु. द्यावे लागतात. एकंदर म्युनिसिपालिटया ११ (१९२२) असून त्यांचा अध्यक्ष सरकारी अधिकारी असतो.

सन १९२२-२३ मध्यें संस्थानचें एकंदर उत्पन्न २२१२६४९१ रु. खर्च २११३८८६६ रु. झाला. उत्पन्नापैकीं मुख्य बाबी जमीनमहसूल (११३६३५५९), अबकारी (२९३९९५३), अफू (६१७८४४), आगगाडी (१२९१३५३), व्याज (१३४९९७२), मांडलिकांकडील (रेवाकांठा, महीकांठा, काठेवाड, पालनपूर व मियागाम इकडील खंडणी (६६६३८९) या आहेत. पूर्वी संस्थानचे बाबाशाही नाणें व टांकसाळ होती. परंतु बट्टा वगैरे  फार पडूं लागल्यानें ती बंद होऊन हल्ली (१९०१ पासून) इंग्रजी नाणें सुरू झालें आहे. मांडलिकांकडून मिळणारी खंडणी इंग्रज सरकारमार्फत वसूल होते. महाराजांचा खाजगी खर्च (खाजगी राजमहाल व हुजूर राज्यकारभार मिळून) जवळ जवळ २९ लाख (१९२२) आहे. संस्थानची एक (बडोदा) बँक आहे.

संस्थानांत निरनिराळ्या प्रकारच्या २८३६ शिक्षणसंस्था असून, त्यापैकीं ६८ संस्थांत इंग्रजी शिक्षण मिळतें. बडोदें कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीस जोडलेलें आहे. संस्थानांत पुष्कळशीं हायस्कुलें, औद्योगिक शाळा, मागासलेल्यांच्या व अस्पृश्यांच्या गायनाच्या, संस्कृत शिक्षणाच्या शाळा आहेत. प्राथिमक शिक्षण मोफत व सक्तीचें आहे. १८७१ सालीं शिक्षणखातें स्थापन झालें. संस्थानांत खेडयापाडयात व फिरतीं अशीं ७२२ वाचनालयें आहेत. खुद्द बडोद्यास १ लाख पुस्तकांचें एक मध्यवर्ती वाचनालय आहे. आयुर्वेदांस उत्तेजन देण्यासाठीं सरकारी पाठशाळा पाटण येथें आहे. गेल्या (१९२१च्या) खानेसुमारींत साक्षरतेचें प्रमाण शेंकडा दहा निघाले. शिक्षणाकडे कंदर ३०१०००५ रु. खर्च होतो. सर्व प्रकारच्या शिक्षणाकरितां संस्थानच्या खर्चानें परदेशीं पुष्कळ विद्यार्थी पाठविले जातात. प्रौढ स्त्रियांसाठीं झनानावर्ग आहेत व बालचरांचें शिक्षण सुरू आहे. सिनेमा व मॅजिक लँटर्न यांच्या योगानेंहि शिक्षण दिलें जातें.

न्याय व अम्मलबजावणी यांची फारकत १९०४ सालापासून केली आहे. खेडेगांवांतहि कांही मुनसफ नेमलेले आहेत. फांशीच्या शिक्षेस महाराजांची संमति लागते. सरदारदरकदारांसाठीं एक स्वतंत्र सरदारकोर्ट आहे. आरोग्यासंबंधीं किरकोळ खटले गांवचा पाटील चालवितो, त्यासंबधांत त्याला ५ रु. दंड व ४८ तास कैद देण्याचा अधिकार आहे. गांवाची आरोग्यव्यवस्थाहि तोच पहातो. सरकारी निरनिराळ्या खात्यांतील तक्रारींची चौकशी खातेनिहाय सदर अदालत कोर्टाकडे होते.

संस्थानांत शेतीची रयतवारी पद्धतच सुरू आहे; तरीपण तींत पुढील कांहीं प्रकार आहेत- कांहीं विशिष्ट ठेक्याच्या पद्धतीनें दिलेल्या जमिनीस बारखळी पद्धत म्हणतात. जमीनमहसूलखात्यांत बारखळीखातें स्वतंत्र आहे. या रीतीनें शेतच नव्हे तर गांवेच्या गांवेंहि ठेक्यानें देतां येतात. या जमिनी खेडण्यास गिराशिया लोक घेतात. धर्मादाय, देवस्थानइनामांस नकरी म्हणतात. नोकरीबद्दल सरकाराकडून देण्यांत येणा-या जमिनीस नौकरयास म्हणतात. ती घेणा-यास विकण्याचा अथवा गहाण ठेवण्याचा अधिकार नाहीं. गांवकामगारांच्या जमिनीस पासीत म्हणतात. मागसलेल्या जंगली लोकांकडून ऐनजिन्नसरूपानें सारा घेतात. एकरीं ७ रु. दरानें सरकारी ट्रक्टर शेंतक-यास नांगरण्यांस देतात. शेतजमिनीची वांटणी अमुक एकरांखालीं करूं नये व जमीन गहाण टाकतांना कुटुंबपोषणापुरती जमीन शेतक-यास ठेवावी असे कायदे सरकारनें केले आहेत. शेतीविषयक माहितीचें 'खेडूत' पंचांग छापण्यांत येत असतें. रयतवारीखेरीज भागदारी, नरबदारी, अंबदबंदी व एकंकडी अशा सारावसुलीच्या चार पद्धती कांहीं भागांत प्रचलित आहेत. संस्थानांत गरीब लोकांस खिचडी वाटण्यांत येते. धर्मदाय खातीं ८८ हजारांपर्यंत खर्च होतो, यांत श्रावणमासदक्षणा ५ हजार असते.

अफूची लागवड, विक्री वगैरेंचा हक्क फक्त सरकारचा आहे. अमरेळीस मीठ होतें. नवसरी प्रांतांत ताडीचा खप फार आहे, जातीवार व धंदेवार असे पुष्कळ कर पूर्वी होते. १९०५ सालीं त्यांची संख्या २१४ होती व उत्पन्न ८५००० होतें. मोठमोठ्या शहरीं सरकारी डेअ-या ठेवल्या आहेत. निरनिराळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटया ४५० वर आहेत.

तालुका व जिल्हा लोकलबोर्डांत आणि म्युनिसिपालिटयांत निम्मे लोकनियुक्त सभासद असतात. लोकलफंडापैकीं १/४ रक्कम दुष्कळासाठीं शिल्लक ठेवतात. १ हजार वस्तीच्या खेडयांत ग्रामपंचायत स्थापतात. कांहीं ठिकाणीं विशिष्ट पंचायती असून त्यांनां पंचायत व म्युनिसिपालिटीचा अधिकार आहे. औद्योगिक शिक्षणासाठीं कलाभुवन ही संस्था १८९० सालीं स्थापिली. यांत औद्योगिक शाखाचें ज्ञान मिळतें. महाराजानीं २ लाख रु. चें व्याज वाङ्मयाभिवृद्धीसाठीं कायमचें दिलें आहे. हल्लीं (१९२५) संस्थानांत प्रेस ऍक्ट लागू आहे; त्यामुळें १९२१-२२ सालीं ७ नवीन छापखाने निघाले तर ५ बंद झाले.

प्रांत- या प्रांतांत अकरा तालुके (व लष्कर आणि बडोदें शहर) आहेत. नर्मदा व मही या दुआबांत हा प्रांत आहे. यांत बडोदें, पादरा, पेटलाद, डभई, सोजिया, आणि सिनोर हीं प्रसिद्ध शहरें आहेत. या प्रांतात शे. ९३ लोक गुजराथी भाषा बोलतात. जमीन काळी, उत्तम व पिकाऊ असून तिला खताची विशेष जरूर नसते. पेटलाद तालुका तंबाखूसाठीं प्रसिद्ध आहे. डभईस पागोटीं, खोजित्रा, पेटलाद व बाक्रोळ येथें कापड, खादी, कुलुपें व बडोद्यास जरीचें व कशिद्याचें काम आणि दागदागिनें तांब्या-पितळेची भांडी होतात. बहुतेक तालुक्यांस म्युनिसिपालिटी आहे. प्रांतांत एक महारोग्यांचा, एक वेडयांच्या व इतर १० दवाखाने आहेत.

तालुका- बडोदें शहर व छावणी यांखेरीज यांत १११ गांवें आहेत; पांच नद्यांपैकीं विश्वामित्री व मही या मोठ्या आहेत. जमीन बहुतेक काळी आहे. कापसाचा पेरा बराच आहे. क्षे.फ. २६९ चौ.मै. व लो.सं.सु. ६६ हजार.

शहर- हीं संस्थानची राजधानी विश्वामित्रीच्या कांटावर, मुंबईपासून २४४॥ मैलांवर आहे. लष्करासह शहराची लोकसंख्या (१९२१) ९४७१२ असुन तींत ८१ मध्य हिंदुस्थान. ग्वाल्हेर संस्थानांत शिवपूर जिल्ह्यांत असलेले हे गांव उत्तर अक्षांश २५०२९' व पूर्व रेखांश ७६०४२' वर आहे. लोकसंख्या (१९११) ५०७३.ग्वालेरच्या अंमलाखालील शिवपूर-बडोदा जहागिरीचे बडोदा हे मुख्य ठिकाण आहे जहागिरदार बंगाल्यातील गौर रजपूत आहेत. बाराव्या शतकांत बछ राजानें अजमीर येथे आपली सत्ता स्थापन केली. परंतु पुढे २०० वर्षीनी मुसुलमानांनी त्या घराण्यास हांकून दिले. त्यांनी दिल्लीच्या बादशहास जी मदत दिली तीबद्दल पार्वती व कुंती या नद्यांमधील प्रदेश त्यांनां बक्षीस मिळाला व बडोद्याच्या उत्तरेस १२ मैलांवरील शिवपूर हे त्यांचे मुख्य ठिकाण झाले. १८ व्या शतकांत मराठयांच्या स्वारीच्या वेळेस राजाला शिंद्याची सत्ता कबूल करावी लागली. नंतर दौलतराव शिंद्याने शिवपूरचा राजा राधिकादास याच्या ताब्यांतील प्रदेशावर आपला सेनापति जॉन बॅप्टिस्टा फिलोस यास नेमिले, व त्याने त्या राजास तेथून काढून दिले. तथापि त्याला पूर्वीचा प्रदेश राहूं दिला. त्यांत २३ खेडी होती. बडोदा हे त्याने आपले राहण्याचे ठिकाण केले. १८१३ साली आणखी १२ खेडी मिळाली. १८५७ साली राजाने बंड केले. व त्याची मालमत्ता जप्त झाली. परंतु १८५९ साली ग्वाल्हेर येथील रेसिंडेंटच्या मध्यस्थीने पुन्हां ती मिळाली.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .