प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें  
            
बंगाल इलाखा- बंगाल प्रदेशाचा स्वंतत्र बंगाल इलाखा ता. १ एप्रिल १९१२ रोजी करण्यांत आला. तत्पूर्वी बंगाल प्रांतावर लेफ्टेनंट गव्हर्नर होता, सांप्रत गव्हर्नर आहे. इलाख्याचें क्षे.फ. ८२२७७ चौरस मैल व लो.सं. (१९२१) ४७५६९१४५ आहे. या इलाख्यांत कुचबिहार व त्रिपूर (टिप्पेरा) हीं संस्थानें येतात; त्यांच्यावर येथील गव्हर्नराचाच अधिकार चालतो. संस्थानाविरहित खालसा मुलुकाचें क्षे.फ. ७६८४३ चौरस मैल आहे. गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या कांठच्या सखल प्रदेशाचा यांत समावेश होता. या नद्यांच्या गाळाच्या मळईची जमीन बनलेली आहे; दक्षिणेकडे पुष्कळ नद्या-नाले आहेत. उत्तरेस हिमालयपर्वत व त्याचे दार्जिलिंग, जलपैगुरी वगैरे फाटे, व सिकीम, नेपाळ, भूतान संस्थानें आहेत; आग्नेयीस त्रिपूर व चितागांगचे फाटे आहेत; पश्चिमेस छोटानागपूर, बहार व ओरिसा प्रांत पूर्वेस आसाम व ब्रह्मदेश आणि दक्षिणेस बंगालचा उपसागर आहे. एकंदर प्रांत सखलच आहे, मात्र थेट जलपैगुरीपासून सुंदरबनापर्यंतचा सर्व प्रदेश सुपीक आहे; परंतु प्रदेश सखल व नदीनाल्यांनीं भरलेला असल्यानें आणि नद्यांच्या पुरामुळें पिकांची नेहमीं नासाडी होते.

इलाख्यांत २५४८६१२४ किंवा एकंदर लोकसंख्येच्या शेंकडा ५३.५५ मुसुलमान आणि २०८०९१४८ हिंदू आहेत. बाकीचे ख्रिस्ती, बौद्ध व वन्य लोक आहेत. शेंकडा ९२ लोक बंगाली व शेंकडा ३.८ लोक हिंदी व उर्दू भाषा बोलतात. उडिया भाषा २९८३७२ लोक व नेपाळी भाषा ९३०६० लोक (दार्जिलिंगकडील व जलपैगुरीकडील) बोलतात; पश्चिम आणि उत्तरेकडे संताळ लोक मुंड भाषा बोलतात.

सन १९२१ च्या खानेसुमारीच्या अहवालावरून दिसतें कीं, ३ कोटी ७० लक्ष (किंवा एकंदर लोकसंख्येपैकीं शेंकडा ७७) लोक शेतीभाती व शेतावरील मजुरी यांवर पोट भरतात. (शेतकरी ३। कोटी व बाकीचे मजूर). १९२२ सालीं १५५०००० एकरांत तागाची लागवड होती, ती १९२३ सालीं २४४४४०८ एकरांत झाली. उत्तर हिंदुस्थानांत बंगाल हाच तांदुळाच्या पिकाचा मुख्य प्रांत आहे. शेतजमिनीपैकीं शें. ८५ जमीन भाताच्या पेरणीकडे उपयोगांत आणतात. भाताशिवाय गहूं, कडधान्ये, गळिताचीं धान्यें, चणे वगैरे धान्य उत्पन्न होतें. गळिताच्या धान्यासाठीं (१९२३) १४८३७०० एकर जमीन पेरण्यांत आली होती. ऊंस व ताड आणि खजूर यांच्यापासून साखर करतात. तंबाखूहि दरेक जिल्ह्यांत पिकते परंतु तिचा रूप स्थानिकच आहे. चहाची लागवड १९२३ सालीं १८०२५८ एकरांत झाली होती. चहाचे मळे ३२५ असून त्यांतील मजुरांची सरासरी कायमचे १३८६७१ व तात्पुरते ७६५९ अशी होती.

शेतकीशिवाय या इलाख्यांत, तागाचा, चहाचा व कोळशाच्या उद्योगधंदा विशेष आहे. कलकत्त्याच्या आसपास तागाच्या गिरण्या पुष्कळ आहेत; स. १९२३-२४ मध्यें एकंदर ८३ गिरण्या काम करीत होत्या, त्यांत ४८०९४ भाग व १०२५३४३ चात्या होत्या व ३२३३५४ मजूर होते. कलकत्ता बंदरांतून ५५३००० टन कच्च्या तागाची २१४६.७९ लाख रुपयांची निर्गत झाली (१९२३). तीवरील ९.७२ लाखांची जकात कलकत्ता इंप्रुव्हमेंट ट्रस्टला मिळाली; ही बाब ट्रस्टच्या विशेष उत्पन्नापैंकीं एक आहे. कलकत्त्याच्या एकंदर निर्गत मालांत कच्चा व पक्का ताग निम्यापेक्षां अधिक असतो. हिंदुस्थानच्या निर्गतींत कापसाच्या खालीं तागाचाच अनुक्रम लागतो. तागाशिवाय पुढील मुख्य धंदे बंगाल्यांत चालू आहेत. सूत, साधें कापड, रेशमी कापड, हातमागावरील कापड, साखर, गूळ व कागद. कापडाच्या गिरण्या ११-१२ आहेत. रेशमी कापड तयार करण्याचा धंदा सांप्रत बसत चालला आहे. गेल्या सालीं (१९२४) फक्त एकच रेशमाची गिरणी चालू होती व तींत सारे १५८ मजूर कामावर होते. दार्जिलिंग व जलपैगुरी भागांत चहाची लागवड वाढत्या प्रमाणावर होत आहे. या धंद्यांत बहुतेक सर्व यूरोपीय भांडवल असून तें जाईंट स्टॉक कंपन्यांनीं उभारलें असून त्याची रक्कम ४३ कोटी आहे. सन १९२२ मध्यें एकंदर २८३ कोळशाच्या खाणी होत्या व त्या सालीं त्यांतून ४३२८९८६ टन कोळसा निघाला. त्याच्या पूर्वीच्या वर्षी ४२५९६४२ टन कोळसा निघाला होता व बंगाल-बहार-आसाम-ओरिसा या सर्व प्रांतांतून मिळून स. १९२२ मध्यें १७३८५१६६ टन कोळसा निघाला. या सर्व प्रांतांतील या धंद्यांत गुंतलेलें भांडवल (जाईंट स्टॉक कंपन्यांचें) साधारण ११ कोटी ३७ लक्षांचें आहे. सन १९२२ मध्यें बंगाल्यांत या धंद्यांत मजुरांची रोजची सरासरी ४४८९३ आणि बंगाल-बहार-आसाम-ओरिसा प्रांतांत १६८१५० होती. १८२३ सालीं कागदांच्या तीन गिरण्यांतून १२२२४०४० रुपये किंमतीचा २१६१८ टन कागद निघाला.

सन १९२२-२३ मध्यें बंगालचा दर्यावरील व्यापार २ अब्ज ५ कोटी (पैकीं ८५ कोटी आयात व १२० कोटी निर्गत) रुपयांचा झाला, त्यांत शेंकडा ९५ टक्के एकटया कलकत्ता शहराचा होता. मुख्य निर्गत मालांत अनुक्रमें पुढील वस्तू आहेत. ताग (पक्का व कच्चा), चहा, लाख, कडधान्यें, कणीक, गळिताचीं धान्यें, व कातडीं. आयात मालांत, कापड, भांडीं, साखर, तेलें, गिरण्यांचीं व आगगाडयाचीं यंत्रें.

बंगालच्या चालू राज्यकारभारास १९२१ च्या जानेवारी पासून आरंभ झाला. पूर्वीचा लेफ्टनंट गव्हर्नर जाऊन त्याऐवजीं गव्हर्नर-इन-कौन्सिल स्थापन झालें व मुंबई, मद्रास यांच्या जोडीला हा प्रांत बसला. मांटफर्डसुधारणाप्रमाणें स्थानिक राज्यकारभाराची पुनर्घटना होऊन कांहीं खातीं, कायदेमंडळांतील लोकनियुक्त सभासदांतून निवडलेल्या दिवाणांच्या हातीं सोंपविलीं. सरकारचे कार्यकारी मंत्री चार व दिवाण तीन असतात. परंतु गेल्या (१९२४) वर्षी कायदेमंडळाच्या अडथळयामुळें दोनच दिवाण निवडले गेले व त्यांनांहि, त्यांचा पगार का. मं. नें नामंजूर केल्यामुळें राजीनामे द्यावे लागले. त्यानंतर सोपींव खाती सरकारी मंत्र्यांनीं चालविलीं व याप्रमाणें कांहीं दिवस द्विदलराज्यपद्धति (डायार्की) मोडली गेली.

या इलाख्यांत, बरद्वान, राजशाही, डाका, चितागंज व प्रेसिडेन्सी (कलकत्ता) असे पांच प्रांत असून त्यांवर कमिशनर आहेत. त्यांच्या हाताखालीं प्रत्येक जिल्ह्यावर एक कलेक्टर आहे. कांहीं बाबतींत बोर्ड ऑफ रेव्हेन्यू याचा अधिकार कमिशनरांवर असतो. बरद्वान प्रांतांत (बरद्वान, बीरभूम, वांकूर, मिदनापूर, हुगळी, हौरा) सहा, प्रेसिडेन्सी प्रांतांत (चोवीस परगणे, कलकत्ता, नडिया, मुर्शिदाबाद, यशोहर, खुलना) सहा, राजशाही प्रांतांत (राजशाही, दिनाजपूर, जलपैगुरी, दार्जिलिंग, रंगपूर, बोग्रा, पवना, माल्डा) आठ, डाका प्रांतांत (डाका, मैमनसिंग, फरीदपूर, बाकरगंज) चार, चितागंज प्रांतांत (टिप्पेरा, नौखाली, चितागंज, चितागंज डोंकरीभाग) चार, मिळून एकंदर २८ जिल्हे आहेत. शिवाय कुचबिहार व त्रिपूर हीं संस्थानें आहेत.

कलकत्ता येथें एक हायकोर्ट, पांच प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेटांचीं कोर्टे, दोन म्युनिपल मॅ. चीं कोर्टे व इतर साधीं कोर्टें आहेत. म्युनिसिपालिटयांचे अधिकार वाढवून त्यांच्या ताब्यांत, जनावरांचे दवाखाने, आरोग्यखातें वगैरे देण्यांत आले आहे. अद्यापि कमिशनरांचा अधिकार ब-याच म्यु. वर चालतो; पाणीपुरवठा व इमारती बांधणें वगैरे त्याच्या नजरेखालीं असतें. खुद्द कलकत्त्याचें कॉर्पोरेशन हें १९२४ च्या ३-या कायद्यान्वयें चालतें. त्याचा सर्व कारभार लोकांच्या हातीं आहे. त्याचा मुख्य एक मेयर असून त्याच्या हाताखालीं एक डेप्यूटी मेयर,एक एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व एक डे.ए. ऑफिसर असतो;  हे सर्व लोकनियुक्त असतात. एकंदर ८५ सभासद असतात, त्यांतील १० सरकारनियुक्त असतात. मुसुलमानांचा स्वतंत्र मतदारसंघ आहे. कलकत्त्यास एक इंप्रुव्हमेंट ट्रंस्टहि असून त्याच्याकडे बहुतेक आरोग्यखातें आहे. प्रांतांतील जिल्हा व स्थानिक लोकलबोर्डांकडे पब्लिकवर्क्स, शिक्षण, दवाखाने दिले असून (खेडयापाडयांच्या) यूनियन कमेटयांच्या ताब्यांत रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य हीं खातीं दिलीं आहेत; सन १९१९ च्या ५ व्या बंगाल कानूप्रमाणें कांहीं ठिकाणीं ग्रामपंचायती स्थापन झाल्या असून त्यांनां खेडयांतील जातीजातींतील तंटे तोडणें, रस्तेदुरुस्ती, पाणीपुरवठा, रखवाली, आरोग्य, गांवठी शाळा, दवाखाने वगैरे कामें दिली असून, खर्च भागविण्यासाठीं कर बसविण्याचा अधिकार दिला आहे. या (ग्राम) चौंकीदारी पंचायतींनां व यूनियन कमिटयांनांच यूनियन बोर्ड असें नांव देण्यांत आलें आहे. यांच्याकडेच व्हिलेज बेंचांचें व कोर्टाचें काम सोंपवून त्यांनां कांहीं विशिष्ट मर्यादेपर्यंत निवाडे करण्याचा अधिकार देण्याचा सरकारचा विचार आहे सन १९२३ अखेर २ हजार यूनियन बोर्डें स्थापण्याचें ठरून १४०० च्या वर स्थापिलीं गेलीं.

पब्लिक वर्क्स खात्याकडेच आगगाडीचें खातें दिलें आहे. दोन्हीं खात्यांचा मुख्य, चीफ इंजिनियर आहे. याशिवाय इरिगेशन, मरीन, पोलीस, शिक्षण, मेडिकल वगैरे खातीं आहेत; शिवाय गुप्तपोलीसखातें स्वतंत्र आहे. पंचायती अथवा यूनियन बोर्डाच्या हाताखालीं व्हिलेज पोलीस (दफेदार व चौकीदार) असून त्यांचा पगार या पंचायतीकडून (खेडयांतून गोळा केलेला) मिळतो. एकंदर पोलीस खात्याकडे १ कोटी ८३ लाखांचा खर्च होतो. मेडिकल खात्यांत जनरल व डायरेक्टर ऑफ पब्लिक हेल्थ असे मुख्य दोन पृथक अधिकारी आहेत. खुद्द कलकत्त्यास २६ दवाखाने असून त्यांतील १० सरकारी खर्चानें चाललेले आहेत. याखेरीज बंगाल इलाख्यांत ९१४ दवाखाने आहेत.

शिक्षणाचें काम सरकार व लोक दोघांचेहि चालू आहे. खुद्द कलकत्त्यास सरकारी तीन (पैकीं एक खास स्त्रियांसाठीं व एक संस्कृत) कॉलेजें असून, हुगळी, कृष्णनगर, राजशाही, चितागंज येथें एकेक व डाका येथें दोन आहेत. खेरीज तीन ट्रेनिंग कॉलेजें, पांच नॉर्मल शाळा आहेत. ट्रेनिंग कॉलेजांतील शिक्षक दुय्यम दर्जाच्या शाळांत इंग्रजी (माध्यमाच्या) च्या द्वारें शिक्षण देतात तर नॉ. शाळांतील शिक्षक देशी भाषेंतून शिकवितात. याशिवाय १ इंजिनियरिंग कॉलेज, २ मेडिकल कॉलेजें, १ व्हेटरनरी कॉलेज, १ व्यापारी विद्यालय, १ कलाशाळा, १ विणकामाची शाळा व बहुतेक जिल्ह्याच्या ठिकाणीं हायस्कुलें आहेत. खुद्द कलकत्त्यास ४ सरकारीं हायस्कुलें आहेत. कलकत्ता, डाक्का वगैरे ५ ठिकाणीं मुलींचीं ५ हायस्कुलें आहेत. कांहीं कॉलेजें व हायस्कुलें लोकांचीं असून त्यांनां सरकार ग्रँटची मदत देतें. तसेंच दुय्यम व देशी शाळांपैकीं ब-याच खाजगी आहेत. म्युनिसिपालिटया व डि. लोकलबोर्डें यांच्या ताब्यांत प्राथमिक शाळा दिल्या आहेत. मागसलेल्या लोकांच्या शाळा मात्र खास सरकारी नियंत्रणाखालीं आहेत. प्राथमिक शाळांतील शिक्षक तयार करणारीं ९५ ट्रेनिंग स्कुलें, सरकार चालवीत आहे. मुसुलमानांच्या शिक्षणासाठीं सरकारच्या हुकमतीखालीं ५ मद्रसें चालू आहेत. थोड्याशा औद्योगिक व यांत्रिक शिक्षणाच्या शाळा डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजच्या ताब्यांत आहेत. याखेरीज मिशनरी लोकांच्या शिक्षणविषयक संस्था पुष्कळच असून त्यांनां सरकार ग्रँटच्या रूपानें बरीच मदत देतें. दरेक म्युनिसिपालिटीस आपल्या उत्पन्नापैकीं एक ठराविक भाग शिक्षणाप्रीत्यर्थ खर्च करावा लागतो. त्यांच्या प्रांतांतील प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, तरी पण सरकारकडून त्यांनां मदत मागतां येते. त्यांच्यातर्फें ३ हायस्कुलें व एक कॉलेज चालू आहे. सारांश, १९२४ सालीं आर्ट कॉलेजें ४२, कायद्याचीं ३, मेडिकल ३, इंजिनियरचें १, ट्रेनिंगची ५, व्हेटरनरीचें १, दुय्यम दर्जाचीं २६१९, प्राथमिक ४९४२५, स्पेशल २५४६, खाजगी १३५२ असून एकंदर विद्यार्थी २०५७१३८ आहेत. मुसुलमानांचें शिक्षण भिन्न असून त्यांच्यासाठी खास एक असिस्टंट डायरेक्टर नेमलेला आहे. कलकत्त्यास स. १९५७ त व डाक्यास स. १९२१ त विद्यापीठें स्थापन झालीं आहेत. कलकत्ता विद्यापीठानें नुकतीच पोस्ट ग्रॅज्युएट स्कीम सुरू केली आहे.

सन १९२४-२५ च्या बंगाल इलाख्याचें उत्पन्न पुढीलप्रमाणें होतें- एकंदर उत्पन्न १० कोटी ४१ लक्ष ४० हजार असून त्यांत ३ कोटी जमीनमहसूल, एक्साईज २ कोटी १६ लक्ष व स्टँप ३ कोटी ३० लक्ष या उत्पन्नाच्या मुख्य बाबी आहेत. एकूण खर्च १० कोटी १६ लक्ष असून त्यांत पहिला नंबर पोलिसखात्याचा (१ कोटी ८५ लक्ष) आहे व शिक्षणाचा तिसरा (१ कोटी १६ लक्ष ३५ हजार) आहे.

इतर इलाख्यांपेक्षां बंगाल्यांत मजुरांच्या संपांचें प्रमाण जास्त निघतें. सन १९२१ मध्यें १५० संप झाले होते. तर १९२२ सालीं ९१ झाले. सरकारी शेतीखात्याकडून तागाच्या लागवडींत सुधारणा चालली आहे. कोऑपरेटिव्ह मंडळयांची चळवळ साधारण चालली आहे. त्यासाठीं कांही बँका काढल्या आहेत. हातमागाच्या कारखान्यांकडे जास्त लक्ष देण्यांत येत आहे. बंगाल्यांत मलेरिया फार असतो. शिवाय इन्फ्ल्युएन्झा, कॉलरा वगेरे मधून मधून उद्भवतो; मलेरियासाठीं क्विनाईनकरितां साधारण सालीना ५० हजार रुपयांची ग्रँट सरकारकडून मिळते.

बंगाल्यांत (१९२२ मार्च अखेर) ३२२८.१७ मैल आगगाडीचे रस्ते होते. पुढील कालव्यांतून व नद्यांतून नावांनीं व्यापार चालतो; मिदनापूर, हिजली, कलकत्ता, नदिया, मदारीपूर, ओरिसा वगैरे; यांची लांबी १॥ हजार मैल आहे.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .