प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
             
फुफ्फुसदाह (न्यूमोनिया)- फुफ्फुसाची रचना सुजणें यास हें नांव आहे.  याचे ३ भेद आहेत ते असेः- (१) समग्रभागव्यापी किंवा धनीभूत, (२) असमग्रभागव्यापी व (३) दीर्घकालीन फुफ्फुसदाह.

समग्रभागव्यापीभेद.- फुफ्फुसाचे मोठले भाग ज्यांत थोडयां वेळांत खालून वर किंवा वरून खाली सुजतात तो. त्या भेदाचें वर्णन पुढें दिलें आहे. प्रथम सडकून ताप भरतो. हा दाह उत्पन्न करणा-या जंतूंचा पूर्ण शोध लागल्यापासून या रोगास जंतुजन्य व सांसर्गिक रोगच समजूं लागले आहेत. व म्हणून या प्रकारच्या इतर रोगांप्रमाणें त्याचा ठराविक मुख्य (फ्रांकेलचा) जंतु, तापाची मुदत व चढण्याउतरण्याचा ठरीव क्रम व रोग्याच्या शरीरावर त्या तापाच्या विषाचा होणारा परिणाम ही लक्षणपरंपराहि पहाण्यास सांपडते. हा जंतु बहुतेक रोग्यांच्या कफामध्यें व रक्तामध्यें सांपडतो. या जंतूबरोबर इतर नाना प्रकारचे जंतू (इन्फ्ल्युएंझा, घटसर्प, कोलाय जंतु, पूयोत्पादक जंतु व फ्रीडलांडरनें शोधून  काढलेला जंतु) पहाण्यांत येतात. उलटपक्षीं हा जंतु हृदयावरणदाह, हृदयांतर्गतदाह, आंत्रावरणदाह, पूयप्रधान फुफ्फुसावरणदाह यांसारख्या जंतुजन्य इतर रोगांतहि आढळतो; व हे रोग फुफ्फुसदाह रोगांमध्यें अगर शेवटी आंगतुक रोग म्हणूनहि प्रगट होतात. समशीतोष्ण कटिबंधांतील देशांत हा एक कायमच्या रोगांपैकींच रोग होऊन बसला आहे. तथापि कधीं कधीं तो सांथीचें रूपहि प्रगट करतो. हिंवाळा व वसंतॠतु या ॠतूंत त्याचा कडाका बराच असतो. हा सांसर्गिक रोग आहे असें जरी सिद्ध झालें आहे तरी प्रत्यक्ष स्पर्शानें (इन्फ्ल्युएंझा किंवा प्लेगमधील फुफ्फुसदाह हे वगळून) या रोगाचा फैलाव होत नाहीं असा अनुभव आहे. पुष्कळ निरोगी माणसांच्या घशांतील नेहमींचा स्वाभाविक कफ तपासून पाहून त्यांतहि हा जंतु असल्याचें आढळून आलें आहे; आणि फुफ्फुसदाह उत्पन्न होण्यास अशक्तपणा, कोंदट हवा इत्यादि अनेक कारणांमुळें रोग्याची स्वाभाविक रोगप्रतिबंधक शक्ति कमी झालेली असते असेंहि निदर्शनास येतें.

रोग होंण्यास आरंभ फुफ्फुसांत हवेनें भरलेले अतिसूक्ष्म कप्पे असतात त्यांत प्रथम होतो, व तेथून क्रमानें तो सर्व फुफ्फुसभर पसरून त्यामुळें फुफ्फुसाच्या स्वाभाविक रचनेमध्यें तीन प्रकारचा बदल झालेला आपणांस प्रेतपरीक्षेमध्यें आढळून येतोः- (१) रक्ताधिक्यावस्था-हींत फुफ्फुसांतील रक्तवाहिन्या फुगल्यामुळें तो फुफ्फुसाचा भाग मोठा व जाड होऊन काळसर आरक्त रंगाच होतो. तथापि त्यांतील सूक्ष्म कप्प्यांत अद्याप हवा शिल्लक असते. (२) रक्तयकृतीकरणावस्था-म्हणजे स्वाभाविक स्थितींत करडया रंगाचें व आंत हवा असते म्हणून पाण्यांत टाकलें तर तरंगणारें फुफ्फुस यकृताप्रमाणें भरीव दिसतें; बोटानें दाबलें तर फुटते; व कापून त्याचा त्याचा तुकडा पाण्यात टाकला तर आंत तो बुडतो. यावेळीं हवेच्या सूक्ष्म कप्प्यांत गोठलेली लस व रक्तपेशी आणि फुफ्फुसाचे सूक्ष्म खवले व पांढरे रक्तपेशी गच्च भरून जाऊन ते फुफ्फुस म्हणजे एक चिकट गोळाच होऊन जातो व यांत लहान मध्यम श्वासनलिकाहि दबून व गुरफटून जातात. व या फुफ्फुस दाहभेदांत लस व रक्त गोठून चिकट व घट्ट होतें म्हणून यास धनीभूतभेद असेंहि नांव आहे. (३) धूसरयकृतीकरणावस्था-या अवस्थेंतहि फुफ्फुस यकृताप्रमाणें भरीव असतें. पण त्याचा रंग करडा बनतो. कारण त्यांत जमलेल्या पदार्थांचें पूय, वसा व द्रवीभवन होतें. पुढें या दुष्ट पदार्थाचें (४) विलयनावस्था-विलयनहि होतें व हवेचे सूक्ष्म कप्पे पूर्ववत होण्याच्या पंथास लागतात. हें सर्व होण्यास काळहि थोडाच पुरतो व विकृत फुफ्फुस आपलें काम करण्यास पूर्ववत समर्थ होतें. कांहीं परिणामक्रांतिकारक जंतूच्या योगानें या विकृत पदार्थांचें पृथक्करण् होऊन रसवाहिन्या व रक्तवाहिन्यांच्या मार्गे ते दुष्ट पदार्थ विलय पावतात व हवेचे कप्पे रिकामे होऊन कार्यक्षम होतात. याप्रमाणें हे दुष्ट पदार्थ पचविले जाऊन ती घाण मूत्रपिंडाच्या मार्गे शरीराबाहेर पडते; व यावेळीं मूत्रांत नायट्रोजनयुक्त द्रव्यें फार जातात. पण हें सर्व वर्णन जे रोगी बरे होतात. त्यांच्यासंबंधीं झालें; व सुदैवानें बरेच रोगी माहीतगार वैद्याच्या हातून बरे होतात. (५) जे रोगी मृत्युवश होतात त्यांच्या फुफ्फुसाची अवस्थाः-वर वर्णिलेल्या दोन्ही तिन्ही अवस्थांतून फुफ्फुसांचे अधिकाधिक भाग व्यापले जाऊन त्यांचें विषोत्सर्जन रोग्यास सहन न होईल इतकें होऊन त्यामुळें हृदयक्रिया एकदम बंद पडणें, फुफ्फुसांत विद्रधि अगर क्वचित्प्रसंगी कोथक्रिया (कुजणें) होणें अगर पुढें रोगलक्षणांत दिलेले अनेक आंगतुक दोष किंवा रोग होणें यांपैकीं एखाद्या दुस-या कारणानें रोगी मरतो. दाहक्रियेस आरंभ बहुधां खालून होऊन रोग नंतर वर पसरतो; परंतु याच्या उलट प्रकारहि कधीं कधीं घडतो. उजव्या फुफ्फुसाचा दाह अधिक प्रमाणांत आढऴतो. दोन्ही फुफ्फुसांसहि कधीं दाहरोग होतो. शेंकडा १७ ते २० पर्यंत रोगीं दगावतात व बाकीचे बरे होतात. रोगी दारूबाज, मधुमेह, अगर मूत्रपिंडदाहपीडित किंवा इतर रोगांनीं अशक्त झाला असेल तर त्यास झटकन फुफ्फुसदाह होण्याचा संभव फार असतो. स्त्रियांपेक्षां पुरुषांनां हा रोग लवकर होतो; व एकदां झाला असला तर पुन्हां होण्याचा संभवहि बराच असतो. रोगलक्षणांस आरंभ येणेंप्रमाणें होतो-रोगी मोठें माणूस असल्यास थंडी वाजून किंवा लहान मूल असल्यास झटके येऊन ज्वर पुष्कळ येतो (१०१० ते १०४० किंवा अधिकहि); नाडीच्या ठोक्यांचें प्रमाण वाढतें व श्वास घेण्यास त्रास होऊन श्वासोच्छ्वास जलद व धांपा टाकल्यासारखाच होतो. श्वासाचें प्रमाण नेहमींपेक्षां दुप्पट किंवा तिप्पट वाढून ओंठ काळसर होतात; चेहरा काळवंडतो, छातीत किंवा बरगडीत श्वासाबरोबर दुखतें; कारण कारण या रोगांत बहुधां थोडा फार फुफ्फुसावरणदाह असतोच. खोकल्यास आरंभ लवकरच होतो. प्रथम नुसती कोरडी ढास असते, नंतर अति चिकट कफ लाळेसारख्या रंगाचा व थोडा पडून नंतर तो अधिक पडूं लागून खाके-यांत लोखंडावर गंज चढतो तशा रंगाचें मिश्रण असतें; त्यांतच फेंसाळ, चिकट कफ आणखी असतो. हा कफ सूक्ष्मदर्शक यंत्रानें पाहिला तर त्यांत खवले, हवेचे तुटके कप्पे, तांबडे, पांढरें व पूयपेशी, फुफ्फुसदाहाचे व इन्फ्ल्युएंझाचे व इतर जंतूहि सांपडतात. प्रथमावस्थेंत छाती तपासून (वैद्यानें) पाहिली असतां तींत विकृत फुफ्फुस असेल त्या जागेवर बारीक ''तड्तड्'' असा आवाज नेहमींच्या सूक्ष्मश्वासध्वनीच्या ऐवजीं ऐकूं येतो. एखाद्या वेळीं हाहि विकृतध्वनि ऐकूं येत नाहि. द्वितीयावस्थेंत विकृत बाजूचा छातीचा भाग निरोगी भागापेक्षां श्वसनिक्रिया करतांना कमी हालतो. तो भाग बोटांच्या अग्रांनीं ठोकून पाहिला तर त्या फुफ्फुसांत हवा नसते म्हणून बद आवाज ऐकूं येतो. व हातास त्या जागीं शब्दकंप झालेला कळून येतो. नलिकायंत्रानें तपासून पहातां नेहमींच्या श्वासध्वनींऐवजीं बारीक नळींतून फुंकल्याप्रमाणें पोकळ आवाज येतो. तृतीयावस्थेंतहि अशीच लक्षणें असतात; परंतु बारीक ''तड्तड्'' ध्वनीच्या ऐवजीं ''बुडबुड'' असे अंमळ मोठे ध्वनी ऐकूं येतात. रोगोपशम स्थितीमध्यें हीं सर्व लक्षणें कमी होऊन मग नाहींशीं होतात. हीं वरील श्वासध्वनीचीं लक्षणें वाढत असतां ताप व जलद श्वासाचें प्रमाण चढतें असतें. सर्व दुखण्यांत रोगी उताणा अगर जें फुफ्फुस बिघडलें आहे त्या कुशीवर निजलेला असतो. फुफ्फुसांतील रक्ताभिसरणांत व्यत्यय आल्यामुळें नाडी बारीक आणि अशक्त झालेली लागते. रोग्यास किंचित कावीळ झाल्याची छटा कधीं कधीं दिसते. लघ्अवी थोडी, कधीं तींट आल्ब्यूमिन असलेली, व क्लोराइड क्षारविहीन अशी असते. रोग्यास सहा ते आठव्या दिवसाच्या दरम्यान घाम दरदरून सुटून व क्षारयुक्त पुष्कळ लघवी होऊन ताप एकदम कमी होऊं लागतो व हें सुचिन्ह आहे असें समजावें. छाती तपासून त्यावरून रोग मोठासा कमी झाला आहे असें जरी आढळून आलें नाहीं तरी रोगी अंमळ कमी कष्टानें श्वासोच्छास करीत आहे व त्यास सुखाची व स्वाभाविक निद्र येऊं लागते आहे असें दिसतें व नंतर बहुतेक रोगी झपाटयानें बरे होऊं लागतात. रोग असाध्य असल्यास-विशेषतः दोन्ही बाजूंस रोग असल्यास-सर्व लक्षंणें (तापासुद्धां) वाढतात. नंतर वरच्याप्रमाणें उतार पडण्याच्या ऐवजीं ताप कमी होऊन हृदयक्रिया  एकदम थांबते किंवा असाध्य शक्तिपात होतो, किंवा रोगी जुनाट रोगामुळें अगोदरच खंगला असल्यास त्यास वायु होऊन तो बडबडतो व कफ हिरवा, रसासारखा व थोडा होऊन रोगी शक्तिपात होऊन मरतो. रोग्याच्या फुफ्फुसाचें दुस-या व तिस-या अवस्थेंत घनीभवन झालें असतां क्ष किरणाच्या योगानें चित्रलेख काढला असतां घनीभूत भाग काळा दिसतो. जो खोल भागीं असल्यामुळें तपासण्यास एरव्हीं कठीण पडत असला तरी हा भागहि अशा त-हेनें विकृत झालेला पहातां येतो हा एक नवीन शोध आहे.

या रोगांत होणारे दोष व आंगतुक रोगः- (१) फुफ्फुसावरणदाह हा बहुधां असतोच हें पूर्वी सांगितलें आहेच. (२) पूयफुफ्फुसावरणदाह हा रोगहि कधीं होतो व त्या पुवांत या रोगाचे व पूर्वीचे जंतु सांपडतात. (३-४) हृदयावरणदाह व हृदयांतर्गतदाह हें दोन्ही रोग या ज्वराच्या विषोत्सर्जनबाधेमुळें होतात. (५) मस्तिष्कावरणदाह हा उपस्थित होणें हें असाध्यपणाचें सूचक आहे व दगावणा-या ब-याच रोग्यांनां हा होतो. व तेथील विकृत लशीमध्यें या रोगाचा जंतु प्रेततपासणींत सांपडतो (६) विषमज्वर, गोंवर, इन्फ्लुएंझा, प्लेग वगैरे सांथीच्या तापानंतर आंगतुक रोग् म्हणून मागाहून हा रोग होतो; व त्याचें कारण अगोदर मूळ रोगानें प्रकृति क्षीण होऊन नंतर त्या स्थितींत या जंतूचा (जो एरवीं निरुपद्रवी स्थितींत पुष्कळांच्या कफांत सांपडतो) जोर होतो. अशा वेळीं मूळच्या सांथीच्या ज्वरांच्या लक्षणांचा जोर असून त्यांत या फुफ्फुसदाहाची भर पडल्यामुळें त्याच्या लक्षणाकडे वेळेस दुर्लक्ष होण्याचा बराच संभव असतो.

रोगचिकित्साः- पूर्वीपेक्षां हल्लीं या रोगास उपचार करण्याच्या पद्धतींत पुष्कळ फरक पडला आहे. औषधींचा प्रत्यक्ष रोगावर परिणाम होऊन उतार पडत नाहीं, तर इतर रोगांत हृदय व श्वसनक्रियेची शक्ति टिकविण्यासाठीं, मेंदु, डोकें शांत ठेवण्यासाठीं, कोठा साफ ठेवण्यासाठीं जरूरीप्रमाणें औषधें योजावयाचीं असतात. उपचार पुढील तीन प्रकारांनीं करतातः-(१) सर्वसाधारण उपचार, (४) लक्षणानुसार उपचार, (३) जंतुयुक्त जनावरांची अगर रोग्यापासून तयार केलेली लस टोंचणें. (१) विषमज्वरादि इतर मोठ्या दुखण्यांत जसें रोग्यास अगदीं अंथरुणांत निश्चेष्ट निजवून ठेवावें लागतें तसेंच या रोगांतहि करणें अगदीं जरूर आहे. म्हणजे त्यामुळें ज्वराच्या विषाची शरीरास पीडा बरीच कमी होते. रोग्याच्या खोलींत पुष्कळ व ताजी हवा येऊं दिल्यानें रोगोपचारास मदत होते. ज्या जागीं छातींत दुखतें तेथें फडक्यांत बर्फ गुंडाळून ठेवल्यानें वेदना शमतें. सर्वांग कोमट अगर थंड पाण्याच्या बोळयांनीं ज्वरादाहशांतींसाठीं पुसून वरचेवर जरूरीप्रमाणें काढावें. दूध, पेज, मांसक षाय इत्यादि, रोग्यास परिचित व पचनास हलके असून पातळ व पौष्टिक असे पथ्यकर पदार्थ खाण्यापिण्यास देऊन रोग्याची शक्ति दुखण्यांत कायम ठेविली पाहिजे. (२) श्वसनक्रिया व हृदयक्रिया दुखण्यांत शाबूत रहाण्यासाठीं स्ट्रिकनियाचा अर्क (पोटांत देऊन अगर टोंचून) व डिजीटालीसचा अर्क, अमोनिया अशा औषधांचीं जरूरी फार असते. जंतुघ्न द्रव्यांनीं अगर जाळून कफविसर्जन करावें; म्हणजे रोगप्रसार बहुधां होत नाहीं. छातीत कळ आली असतां मार्फिया टोंचणे अगर पोटांत अफूचा अर्क किंवा डोव्हर चूर्ण देणें. वायु होऊन रोगी बडबडूं लागल्यास हायोनीस टोंचणे हे सर्व लक्षणानुसार उपाय झाले. (३) अनेकांनीं तयार केलेली जनावराची जंतुयुक्त लस, टोंचून बराच अनुभव घेऊन पहातां ती निरुपयोगी ठरली. त्यापेक्षां वरील पहिल्या दोन प्रकारांनीं उपचार करूनहि चांगला गुण येतो. मृत जंतुयुक्त लशीचा उपयोग अतितीव्र अशा पुष्कळ रोगांत करून पहातां तो पुष्कळ उपयुक्त असल्याचा अनुभव आला. रोग्याच्या रक्तापासून तयार केलेली लस अधिक सरस ठरली पण तींत दोष एवढाच कीं ती तयार करण्यास वेळ लागून कालक्षेप बराच होतो; पण ती निःसंशय अधिक गुणावह असते.

असमग्रभागव्यापी भेदाचें वर्णनः- यांत प्रथम श्वासनलिकादाहाचा रोग सुरू होऊन तो पुढें पसरण्यानें मागाहून या प्रकारचा दाह संबंध फुफ्फुसभागांत न होतां फुफ्फुसांत निरनिराळ्या ठिकाणीं बारीकशा भागांतील हवेच्या कप्यांत पसरतो. कोंदट हवेंत रहाणा-या तीन वर्षाच्या आंतील अशक्त मुलांनां विशेषतः अगोदर डांग्या खोकला, गोंवर इत्यादि सांथीचें मोठें दुखणें येऊन गेल्यावर हा रोग होण्याचा संभव फार असतो. मोठ्या माणसांनांहि हा रोग कधीं कधीं होतो व त्याचें कारण घशांत घटसर्प किंवा घशांतील कुजणा-या इतर घाणींपासून श्वासनलिकामार्गे जंतुप्रवेश होऊन हा रोग होतो. मुलांनां कधीं आरंभापासूनच हा रोग होतो. व सांथीच्या रोगानंतर त्यांनां हा रोग झाल्यास बहुधां मृत्यु येतो. मोठ्या माणसांनां इनफ्लुएंझा, मूत्रपिंडदाह, व इतर रोगानंतर किंवा मुख, कंठ ह्या ठिकाणीं शस्त्रक्रिया केल्यानंतर महाश्वासनलिकेंत आगंतुक पदार्थ जाऊन, किंवा क्षयामध्यें फुफ्फुसांत आगंतुक दोष म्हणून हा रोग उत्पन्न होतो.

फुफ्फुसांत खालील बदल होतातः- विकृत भागांत प्रथम घट्टपणा असून रंग निळसर तांबडा असतो व अशीं ठिकाणें फुफ्फुसभर निरनिराळ्या जागीं सांपडतात. बोटानें दाबल्यानें तीं फूटून त्यांतून लालसर पाणी निघतें. सूक्ष्मदर्शक यंत्रानें पाहिलें असतां वरील भेदाप्रमाणेंच फुफ्फुसांतील विकृतावस्था नजरेस पडते. श्वासनलिकादाहाचीं चिन्हें सुद्धां स्पष्ट असतात. फुफ्फुसांतील बरेच विकृत भाग करडया व पिवळया रंगाच्या स्थितींतहि असतात.

रोगलक्षणें- एकदम, किंवा अगोदर गोंवर, डांग्याखोकला इत्यादि रोगांतच एकच दिवशीं सडकून ताप भरून नाडीचें व श्वासाचें प्रमाण वाढणें व श्वासोच्छ्वासास अडचण पडूं लागणें हीं प्रथम लक्षणें होत. खोकतांनां घशांत दुखतें व कफ फारसा पडत नाहीं. श्वासनलिकादाह अगोदर असल्यानें फुफ्फुसदाहाचीं स्पष्ट चिन्हें छाती तपासून नेहमींच स्पष्टपणें सांपडतात असें नाहीं मात्र बद आवाज व नळींतून वारा फुंकल्यासारखे श्वासध्वनी ऐकूं येतात. श्वास कोंडल्याप्रमाणें होऊन रोग्याचा जीव बराच गुदमरतो व हृदयक्रिया बंद पडून मृत्यु येतो. पांच वर्षांच्या आंतील मुलांमध्यें शेंकडा ३० ते ५० पर्यंत मुलें दगावतात असा हिशेब निघतो. यावरून हा रोग किती घातक आहे ह्याची कल्पना होईल. मागील भेदाप्रमाणें याची ठराविक मुदत नसते. म्हणून हा रोग अधिक कालपर्यंतहि चालू असतो व पूर्वस्थिति येण्यास बराच काळ लागतो. वायु होणें, झटके येणें ही दुश्चिन्हेंच आहेत तथापि असाध्य वाटणा-या स्थितींतूनहि कांहीं मुलें बरी होतात; परंतु वृद्ध माणसांनां हा रोग होणें म्हणजे असाध्य दुखणेंच आहे.

रोगचिकित्सा- ही वरील भेदांत सांगितल्याप्रमाणें सामान्य धोरणाप्रमाणें करण्यांत यावी. जसजशीं लक्षणें होतील त्याप्रमाणें औषधयोजना करावी. वमन होणारें औषध दिल्यानें सांचलेला कफ पडून जाऊन छाती मोकळी होते. खोकल्याची ढास कमी होण्यासाठीं कफशामक हुंगण्याचीं औधषें उपयुक्त असतात. स्ट्रिकनिया (कुचल्याचें सत्व) टोंचून घातल्यानें रोग्याची श्वसनशक्ति रोगांत टिकाव धरूं शकते. मुलांनां व वृद्ध माणसांनां या रोगांत ब्रँडीसारख्या उत्तेजक औषधाची जरुरी विशेष आहे. व ती दर तासास मुलास, १५-२० थेंब प्रमाणें व मोठ्या माणसास एक चमचाभर किंवा जरा कमी अगर जास्ती देत जावी. चेहरा काळसर पडल्यास बाहूची शीर तोडावी. लशीचा उपयोग या भेदांत करु नये. हा रोग बरा झाल्यानंतर क्षीणता येऊन कफक्षय होण्यास अनुकूल स्थिति असते; म्हणून उत्तम कोरडी हवा आणि पौष्टिक आहार ठेवावा.

दीर्घकालीन फुफ्फुसदाह- फुफ्फुसांत मध्यम, लहान व मोठ्या श्वासनलिका व रक्तवाहिन्या असतात. त्यांच्या भोंवताली फुफ्फुसरचनेमध्यें स्वसावृद्धि म्हणजे तंतुमय जाल उत्पन्न होऊं लागून फुफ्फुसांतील हवेच्या कप्प्यावर दाब पडून फार दिवासांनीं हे हवेचे फुगे व कप्पे नष्ट होतात. व या तंतुमय स्वसावृद्धीची वाढ फुग्याच्या समूहामधील अनेक प्रकारच्या भागांत होऊन विकृत फुफ्फुसांतील हवेचे फुगे बहुतेक नष्ट होतात; व नंतर फुफ्फुस लहान संकुचित होतें. व जे भाग शाबूत रहातात ते हवेनें फाजील फुगलेले व बाकीचे भाग घट्ट परंतु लहान होतात श्वासनलिका विस्तरण पावतात, फुफ्फुसावरण जाड होतें, फुफ्फुसाचा रंग बदलतो, कोळशाच्या खाणींतील माणसांचें फुफ्फुस काळें होतें, दुस-या बाजूचें फुफ्फुस विस्तरणरोग होऊन मोठें झालेलें असतें, हृदयांतील उजवी बाजू विशेषतः विकृतीनें मोठी होते, रक्तवाहिन्यांमध्यें काठिण्य येतें व शेवटीं तें फुफ्फुस म्हणजे विस्तारित श्वासनलिकांचे ठिकठिकाणीं कोनाडे असलेला एक गोळाच बनतो. अशी स्थिति फुफ्फुसाच्या इतर दीर्घकालीन रोगांतहि कमी प्रमाणांत आढळते. शिवाय ज्या माणसांनां धुराळा, खकाणा, बारीक कण, यांत नेहमीं काम करावे लागते म्हणजे पिंजारी, पाथरवट, पिठाच्या गिरणींतींल मजूर, कोऴशाचा धंदा करणारे यांच्यामध्यें हा रोग बराच आढळतो.

याचीं लक्षणें दीर्घकालीन कफक्षयाप्रमाणेंच असतात. म्हणजे जरा श्रम केल्यानें धाप लागणें, कोरडा किंवा ओला खोकला, कधीं पुष्कळ तर कोणास दुर्गंधियुक्त कफ (कोळसेवाल्यांनां तर काळा कफ पडतो) हीं लक्षणें असतात.विकृत बाजू श्वासोच्छवासाच्या वेळीं चांगलीशी हलत नाहीं. कारण बहुधा रोग एका फुफ्फुसांलाच होतो. छाती ठोकून पाहिली असतां बंद आवाज, नलिकेंत फुंकल्याप्रमाणें श्वासध्वनि व ''बुडबुड'' असा आवाज छाती तपासणींत वैद्यास ऐकू येतो. रोगाचा प्रसार अधिक होऊन विकृत बाजू खालीं दबल्यासारखी डोळयास स्पष्ट दिसते व त्यामुळें हृदय व यकृत निराळया जागीं हातास लागतात. नंतर पुढील अवस्थेंत शक्तिपात होऊन कफक्षयाप्रमाणें लक्षणें होतात. व शेवटीं शरीर झिजत जाऊन मृत्यु येतो. कधीं कधीं हृदय विकृतीमुळें उदररोगहि होतो. हा रोग पुष्कळ वर्षें आहे त्याच स्थितींत राहिल्यानें पुष्कळ वर्षें चालू रहातो. कधीं तर थोडी सुधारणाहि झालीशी वाटते. पण एकंदरीत प्रकृति खचत जाते. उपचार- हवामानाप्रमाणें हवेंत बदल करावा. पौष्टिक आहार ठेवावा. गारठयास आणि ओलीस फार जपावें.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .