प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें  
           
फारशी वाङ्मय- फारशी अथवा पर्शियन राष्ट्रीय काव्याला आरंभ केव्हांपासून झाला याबद्दल पर्शियन इतिहासकारांमध्यें मतभेद आहे. सस्सानियन राज्यकर्त्यांनां आपल्या राष्ट्रांतील वाङ्मयांची आवड वाढविली हें निर्विवाद आहे. जुन्या पर्शियन भाषेमध्यें ९ व्या व १० व्या शतकांत अरबी शब्दांचें मिश्रण होऊन बनलेली जी पहलवी भाषा गेल्या हजार वर्षें कायम राहिली आहे तिचा या लेखांत विचार कर्तव्य नाहीं. ९व्या शतकाच्या आरंभीं राष्ट्रीय स्वातंत्र्य व राष्ट्रीय वाङ्मय यांबद्दलच्या चळवळीस खरा आरंभ झाला. स. ८०९  मध्यें अब्बास नांवाच्या कवीनें अर्वाचीन पर्शियन भाषेमध्यें पहिली कविता लिहिली. त्याच सुमारास खलीपांचा अम्मल नाहींसा होऊन होऊन ख-या तद्देशीय राजवंशाचा अम्मल सुरू झाला होता. तत्कालीन पर्शियन लेखकांच्या पुढें नव्या इस्लामी धर्मानें लादलेल्या कल्पनांचा आपल्या प्राचीन आर्यन कल्पनांशीं मेळ घालण्याचें मुख्य काम होतें; मुसुलमानीं धर्मांतील द्वितत्ववादाचें (डीइझमचें) तत्त्व आपल्या जन्मसिद्ध उच्चतर सर्वेश्वरी मताशीं त्याला जमवून घ्यावयाचें होतें.

१० व्या शतकामध्यें २ रा अमीर नासर याच्या आश्रयाखालीं अबुल-अबास, अबुल अबदल्ला, महंमद, खुसवानी, रूदगी, वगैरे भाट लोक होऊन गेले. त्यावेळच्या सामानिद राजांनीं ऐतिहासिक संशोधन, वैद्यकाचा अभ्यास वगैरे गोष्टींनांहि उत्तेजन दिलें. वलभीनें ताबरी नामक ग्रंथकाराच्या अरबीमधील जगाचा इतिहास या ग्रंथांचें पर्शियनमध्यें भाषान्तर केलें. शिवाय ताबरीच्या तफसीर नांवाच्या कुराणावरील टीकेचेहि भाषान्तर करविण्यांत आलें. स. ९७६च्या सुमारास दकीकी नामक राजकवीनें खोदाईनामा (राजांचें पुस्तक) याचें पर्शियनमध्यें काव्यबद्ध भाषान्तर करण्यास सुरवात केली होती; पण तो लवकरच मारला गेला. पण तें काम फर्दोसी नामक अधिक बुद्धिमान व समर्थ कवीनें (९४०-१०२०) पुरें केलें. या फर्दोसीपासून पर्शियांतील राष्ट्रीय महाकाव्याच्या सुवर्णयुगाला आरंभ होतो. फर्दोसीनें ३५ वर्षें अव्याहत परिश्रम करून १०११ सालीं आपला अवाढव्य व अजरामर ग्रंथ शाहनामा हा पुरा केला. होमरच्या ग्रंथाच्या तोडीचें शाहनामा हें पौरस्त्य बुद्धिमत्ता व विद्वता यांचें अत्यंत उज्वल स्मारक आहे, असें सर डब्ल्यू. जोन्सनें म्हटलें आहे. शाहनामा प्रसिद्ध झाल्यापासून त्यानें लोकांच्या मनावर अशी कांही अनिवार्य मोहिनी घातली होती कीं, ताबडतोब शाहनामाच्या नक्कलवजा ग्रंथ लिहिण्यास सुरवात झाली; व शाहनामाच्या धर्तीवर अनेक ऐतिहासिक काव्यें निर्माण झालीं. अलीअहंमद अल्असदी यानें स. १०६६ त युद्धविषयक अशा ९००० गोष्टींचा संग्रह तयार केला. सामानामामध्यें रुस्तुमच्या आजाची शौर्यकृत्यें वर्णन केली आहेत. याशिवाय जहागैरनामा, फरामुर्झनामा, बाबु गुशास्यनामा, बर्सूनामा, शहीयरनामा, ब्रह्यन्नामा इत्यादि ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

याप्रमाणें प्राचीन इराणी ऐतिहासिक गोष्टी सर्व खलास झाल्यावर बारीकसारीक गोष्टींच्या आधारावरच कित्येक काव्यें झालीं व सर्व गोष्टी संपल्यावर मग निव्वळ काल्पनिक गोष्टी व काव्यें लिहिण्यास सुरवात झाली. व त्यावेळीं पद्यस्वरूप जाऊन गद्यामध्यें अनेक कादंब-या व अद्भुत गोष्टी लिहिल्या गेल्या. त्यांत बूस्नान-इ-खयाल (कल्पनेचें उद्यान) या अद्भुतरम्य कादंबरीचे १५ मोठे भाग आहेत. अंबियानामा, इमला-इ-हैदरी, फरहनामा-इ-फतिमा, हातीमताईच्या गोष्टी वगैरे ख-या चरित्रात्मक व इतर निव्वळ काल्पनिक गोष्टी प्रसिद्ध आहेत.

ऐतिहासिक काव्यें लिहून सर्व प्राचीन ऐतिहासिक गोष्टी खलास झाल्यावर केवळ काल्पनिक कथाहि ब-याच निर्माण झाल्या. परंतु फर्दोसीच्या शहानामाची आवड इतकी अनावर होती कीं, पुन्हां पुन्हां तसलेच ऐतिहासिक चरित्रपर लेख लिहिण्याची परंपरा चालू राहिली. प्राचीन ऐतिहासिक विषय समाप्त झाल्यामुळें १६ व्या शतकापासून अलीकडीलहि राज्यकर्त्यांची चरित्रें व इतिहास लिहिले गेले. हातीफीचा तैमूरनामा, इत्रातीचा शाहनामा-इ-बादिरी, शाहिनशहानामा, जार्जनामा (सन १६००-१८१७ पर्यंतचा हिंदुस्थानचा इतिहास) झाफरनामा-इ-शहाजहानी, अदिलनामा (विजापूरच्या आदिलशहाचा इतिहास), तवारिख इ कूली कुतुबशहा (गोवळकोंडयाच्या), फतनामा-इ-टिप्पुसुलतान इत्यादि अगदीं अलीकडील राजांबद्दलचेहि इतिहासग्रंथ झालेले आहेत.

कविश्रेष्ठ फर्दोसा याचे शाहनामा या महाकव्याखेरीज दुसरेहि ग्रंथ आहेत. अद्भूतरम्य, उपदेशात्मक व गूढार्थक हीं तिन्ही प्रकारचीं काव्ये लिहिण्यास त्यानें प्रथम उत्तेजन दिलें. फर्दोसीचा यूसफ-उ-झलीखा हा दुसरा मोठा काव्यग्रंथ आहे. त्यांत बायबलमधील जुनी जोसेफ ही गोष्ट आली आहे. जोसेफच्या गोष्टीनें तर   पर्शियांतील कवींना फारच मोहून टाकिलें आहे. सुलतानाच्या केवळ स्तुतिपर कविता लिहिण्याचा फर्दोसीनें व सुलतान महमूदच्या पदरच्या इतर कवीनीं जो प्रघात पाडला तो पुढें फार वाढत गेला. परंतु इराण, अफगाणिस्तान वगैरे मुसुलमानी देशांत राज्यक्रांत्या होऊन वरचेवर राजघराणीं बदलत असल्यामुळें या कवींपैकीं कित्येकांवर देहान्तशिक्षादि घोर प्रसंग गुदरले. या कवींपैकीं अन्सारी हा ज्योतिषादि विषयांतहि मोठा विद्वान व उच्च दर्जाचा कवि होता. खाकानी हा दुसरा कवि त्याच्या तोडीचा होता.

याप्रमाणें दुसरे अनेक स्तुतिकाव्यलेखक १२ व्या व १३व्या शतकांत होऊन गेले. फर्दोसीच्या शाहनाम्यांत नित्युपदेशपर वचनेंहि पुष्कळ आलेली आहेत. परंतु केवळ नीत्युपदेशपर, धार्मिक व तत्त्वज्ञापर ग्रंथ लिहिण्याची एक निराळी पद्धत पडून सुफी पंथाची तत्त्वें वर्णन करून सांगणारें काव्य लिहिणारा खोरासान येथें अबू सय्यद म्हणून पहिला कवि (९६८-१०४९)  होऊन गेला. नाशीर खुश्रूचा रौषनाइनामा नांवाचा असलाच काव्यग्रंथ आहे. हिरात येथील अबदल्ला असान्रीचा मुनाजान, गझनीच्या हकीमसवाईचा हरिकत-उल्हकीत, पंदनामा, मंतिक-उंत्तैर वगैरे धर्मोपदेशपर कविताग्रंथ आहेत.

वर सांगितलेल्या सुफीधर्मपर लेखकवर्गाहून अगदीं भिन्न म्हणजे केवळ नीतिपर ग्रंथ लिहिणारा असा शिराझ येथील शेख सादी हा होय. त्याचे बेस्तां आणि गुलीस्तां हे दोन अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहेत. पुढें त्यांच्याच नमुन्यावर दस्तुरनामा, गुलझार, निगारीस्ता, बहारीस्तां वगैरे ग्रंथ झालें. तथापि या नमुन्याचें ग्रंथ एकंदरींत थोडेच आहेत. सुफीधर्मज्ञानपर दुसरें ग्रंथ लमयात, गुलशन-इ- राझ, मिहर-उ मुश्तरी, हुसन-उ-दिल, शहा-उ-गदा, नानव-उ-हलवा, शीर-उ-शकर इत्यादि ग्रंथ पुष्कळ आहेत.

वरील काव्यप्रकारांबरोबर रसात्मक काव्यलेखनहि चालू होतेंच. प्रेम आणि सुरा यांच्या सौख्यवर्णनपर काव्यें पुष्कळ आहेत. त्यांत हाफीझ या अप्रतिम बुद्धीच्या कवीनें रसात्मक काव्याचे उत्कृष्ट नमुने जगांत करून ठेविले आहेत; व त्याच्या पद्धतीवर सर्व गझल-लेखकांनीं काव्यें लिहिलीं आहेत. नौई कवीनें अकबराच्या कारकीर्दीत पतीबरोबर सती गेलेल्या एका हिंदु राजपत्नीवर सूझ-उ-गुदाझ नांवाचें काव्य लिहिलें आहे. दिल्ली येथें अमीर हसन व अमीर खुश्रू हे दोन मोठे प्रसिद्ध कवी होऊन गेले. शिवाय अलाउद्दीन खिलजी (१२९६-१३१६), फेरोझशहा, कुतुबुद्दीन मुबारिक, हुमायून, अकबर वगैरे राजकर्त्यांचे पद्यमय इतिहास लिहून ठेविले आहेत.

नाटकें- इराणच्या या राष्ट्रीय वाङ्मयाच्या इतिहासांत नाटकग्रंथांचाहि उल्लेख केला पाहिजे, कारण ९व्या शतकांपासूनच नाटकें लिहिलीं गेलीं आहेत. इराणांत ग्रीसप्रमाणेच नाटयप्रयोग हें एक धार्मिक उत्सवाचें अंग मानीत असत व कित्येक शतकें मोहरमच्या महिन्यांतील पहिल्या दहा दिवसांत असले नाटयप्रयोग केले जात असत. त्या नाटकांत बहुतकरून इराणांतील अल्ली खलीपाच्या घराण्यावर गुदरलेल्या दुःखकारक प्रसंगांचें व अल्लीचा मुलगा हुसेन व त्याचें कुटुंब यांच्या करबला येथील लढाईंत झालेल्या कत्तलीचें वर्णन असे. परंतु अलीकडे हें आकुंचित क्षेत्र सोडून अनेक तद्देशीय व परकीय कथानकांवर नाटकें होऊं लागलीं आहेत. बायबलमधील व इतर ख्रिस्ती गोष्टींबद्दलचीं नाटकें इराणांत होऊं लागलीं आहेत.

ऐतिहाससिका ग्रंथ.- काव्य व कादंबरी यांखेरीज इतरहि वाङ्मयांतील अनेक प्रकारांचे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. या सर्वांमध्यें इतिहासपर ग्रंथाचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या इतिहासग्रंथांत मार्मिक टीकेचा अभाव व कित्येक ठिकाणीं अत्यंत कृत्रिम भाषा हे दोष असले तरी या ग्रंथांचा आधुनिक संशोधकांच्या कामाला अत्यंत उपयोग होण्यासारखा आहे. तसेंच हिंदुस्थानांतीलहि गझनीच्या सुलतान महमुदापासून तों अगदीं ब्रिटीश अमदानीपर्यंतचें अनेक इतिहासग्रंथ अगदीं अप्रतिम आहेत. सर एलियटचा हिंदुस्थानचा इतहिास (१८६७-१८७८) या पुस्तकाच्या आठ भागांतहि त्याच ग्रंथांतील माहिती व प्रत्यक्ष भाषान्तरें दिलीं आहेत. त्याशिवाय पर्शियन लेखकांनीं जगाचें अनेक इतिहास, महंमूद व  पहिले खलीफ यांचे इतिहास, गझनवीपासून चालू कजर या इराणांतील घराण्यांची व चेंगीझखान व मोंगल ओणि तैमूरलंग व त्याचे वंशज यांची सविस्तर हकीकत, इराणांतील अनेक पंथ व संप्रदायांचे इतिहास, आणि इराण व तुराण येथील पुष्कळ स्थानिक गोष्टी लिहून ठेविल्या आहेत.

इतिहासाच्या खालोखाल महत्त्वाचें ग्रंथ म्हटले म्हणजे भूगोलवर्णनपर, सृष्टिवर्णनपर व प्रवासवर्णनपर ग्रंथ होत. चरित्रपरग्रंथांत मुखझन-उल्द्यराईब हा ३००० कवींच्या चरित्रांचा ग्रंथ व इतर पुष्कळ आहेत. यांशिवाय तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, राजनीतीशास्त्र, धर्म, कायदा, गणित, ज्योतिष, वैद्यकशास्त्र, अरबी, फारशी, तुर्की भाषांचें व्याकरणग्रंथ व शब्दकोश इत्यादिकांचा केवळ नामनिर्देश करण्यापेक्षां येथें जास्त लिहिण्यास सवड नाहीं. प्राचीन हिंदु काल्पनिक गोष्टी व दन्तकथा यांचीं पर्शियन भाषांतरें, सिंदबादनामा, संस्कृतांतील रामायण, महाभारत, भगवद्गीता, योगवाशिष्ठ, पुराणें, उपनिषदें इत्यादिकांचीं अकबराच्या कारकीर्दीत भाषान्तरें झालीं आहेत.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .